.....माझा शेतकरी राजा.....

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
26 Jun 2016 - 10:35 pm

शेतामध्ये राबतो माझा शेतकरी राजा
मन त्याचे साधेभोळे, नाही कुणाचा हेवा
मनाच्या गाभार्यात शोधता नाव
त्याचेच सापडे अशी कशी वेडी मी
त्याच्या वरी प्रेम करे
माझ्या सुखासाठी तो रात्रंदिस झरे
असा माझा साधाभोळा शेतकरी राजा
मन जीवन कोरे पान माझे त्यावरी
नाव त्याचे मी लिहिले माझे सौभाग्य
त्याचे अर्धांगिणी मी झाले
सात जन्मांची साथ आमची
जगा सांगुणही न कळे प्रीती त्याची
त्याच्या वेदनांना औषध माझ्या प्रेमाचे
काट्यांच्या वाटेवर गाव त्याचे लागते
मन माझे त्या काट्यांच्या वाटेवरही
त्यालाच शोधते, शोधते मन जिथे तो
नसतो माझा हा वेडेपणा पाहून
आरसा माझ्यावर हसतो, एकटी माझी
सावली प्रश्न मला करते होता
जो सोबतीला आता कुठे हरवला.......!

भावार्थ- "माझा शेतकरी राजा" ह्या कवीतेत एका स्रिच भावनाविश्व सामावलेल आहे
समाजातील प्रस्थापित बंधनना झुगारुन नायिका लग्न करते त्यांचा संसार सुखाचा असतो...पण
त्याच्या एकाएकी जाण्याने तिच्यावर दुखा:चा डोंगर कोसळतो... असा तिच्या आयुष्याचा आढावा
कवितातेत घेतलेला आहे....

प्रेम कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

भोळा भाबडा's picture

26 Jun 2016 - 10:48 pm | भोळा भाबडा

बास्स बास ....
डोल्यातनं पाणी आलं ना!!!

जव्हेरगंज's picture

26 Jun 2016 - 11:06 pm | जव्हेरगंज

प्रामाणिकपणे लिहीताय,
आवडलं!!!

आणखीन पाहिजे!!!

कथा वगैरे लिहा ना!

चांदणे संदीप's picture

27 Jun 2016 - 9:22 am | चांदणे संदीप

ब्याट्सम्न कडन लै राव अपेक्षा तुमच्या!!
आपली करा की आधी सेंचुरीची सेंचुरी!!

रच्याकने, क्विता लै आवडली! :)

Sandy