मुरमुरा दोसा/ उत्तपा व टमाटो चटणी

मानसी१'s picture
मानसी१ in पाककृती
25 Jun 2016 - 11:50 pm

दोसा साहीत्य:
३ वाटी मुरमुरा
३ वाटी तांदुळ ( जाड / उकडा)
१/२ वाटी उडीद डाळ
१/२ चमचा मेथी दाणे (ऐच्छीक)

कॄती:
डाळ व तांदुळ स्वच्छ धुवुन घ्या .
वरील सर्व साहीत्य एकत्र करुन रात्रभर भीजत ठेवा
सकाळी मिक्सर वर बारीक वाटुन उबदार जागी ठेवा.
पीठ फुगुन आल्यावर, मीठ व पाणी टाकुन सरसरीत करुन घ्या.

तवा गरम करा, तेलाचा हात फिरवुन घ्या.
पीठ पळीने तव्यावर घाला. हा दोसा जाडसरच ठेवतात.
बाजुने थोडे तेल सोडुन झाकण ठेवा. एका बाजुने झाल्यावर दुसर्या बाजुने पण शेकुन घ्या.
दोसा झाल्यावर ताटात काढुन घ्या. आवडीच्या चटणी बरोबर खायला द्या.
हवे असल्यास वरुन कांदा आणी कोथींबीर पेरा.

टमाटो कांदा चटणी
साहीत्य:
टमाटो २
कांदा १
लसुण ७-८ पाकळ्या
मिर्च्या २
तेल
मीठ
साखर चिमुुुुटभर

राई/ कढीपत्ता फोडणी ऐच्छीक

कृती:
कढईत तेल गरम करा. कांदा परतवुन घ्या.
लसुण व मिर्च्या टाकुन परतवुन घ्या
शेवटी टमाटो घालुन टमाटो नरम होइ पर्यंत शिजवुन घ्या.
थंड झाल्यावर मिक्सर वर मीठ आणी साखर घालुन बारीक वाटुन घ्या. चटणी तयार.

चटणी वर हवे असल्यास राई/कढीपत्ता ची फोडणी करा.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

26 Jun 2016 - 2:13 am | विजुभाऊ

वा मसत .
एकदम सोपी आणि मस्त डिश
फोटो मस्त

अजया's picture

26 Jun 2016 - 6:56 am | अजया

छान पाकृ.

विवेकपटाईत's picture

26 Jun 2016 - 10:10 am | विवेकपटाईत

मस्त आवडली, आमची सौ. सुद्धा बर्याच वेळा मुरमुरे टाकते, एक वेगळा क्रंची स्वाद येतो. चटणी हि मस्त दिसते आहे. पावसाळ्यात भाज्यांच्या जागी खाण्यासाठी मस्त.

इशा१२३'s picture

26 Jun 2016 - 12:41 pm | इशा१२३

मस्त दिसताहेत चटणी दोसे!

नूतन सावंत's picture

26 Jun 2016 - 11:05 pm | नूतन सावंत

करून पहिले पाहिजेत एकदा.

मस्त पाकृ! टोम्याटो चटणीचा फोटू आवडला.

किसन शिंदे's picture

27 Jun 2016 - 10:19 am | किसन शिंदे

मस्त

जागु's picture

27 Jun 2016 - 11:41 am | जागु

छान.

जागु's picture

27 Jun 2016 - 11:41 am | जागु

छान.

पिंगू's picture

27 Jun 2016 - 8:45 pm | पिंगू

चटणी मस्त आहे.

मस्त वाटले दोसे. लोणी स्पंज डोश्यासारखे दिसतायत. करून पाहीन थोड्या दिवसात

मानसी१'s picture

27 Jun 2016 - 10:50 pm | मानसी१

मिपावरील पाठींब्या मुळे अजुन चांगले करायला हुरुप येतो

राका's picture

13 Jul 2016 - 11:02 am | राका

मस्तच आहे पाकृ...

अनिल कपूर's picture

13 Jul 2016 - 3:10 pm | अनिल कपूर

मस्तच ....

माम्लेदारचा पन्खा's picture

13 Jul 2016 - 8:16 pm | माम्लेदारचा पन्खा

क्या बोला !

पैसा's picture

13 Jul 2016 - 9:36 pm | पैसा

पाकृ आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2016 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

छाण.

tushargugale's picture

13 Jul 2016 - 11:27 pm | tushargugale

मस्त

सोपी आणि रूचकर दिसते पाकृ. करून पहायला पाहीजे.

अनन्न्या's picture

15 Jul 2016 - 6:11 pm | अनन्न्या

पण जमत नाहीय.. चटणी वेगळी आहे. मस्त दिसतेय.