शेवटी बाप हाय म्या-3

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
25 Jun 2016 - 12:44 am

तुला बुलट घिवुन द्यायची आपली ऐपत नवती अण एवढंच काय हे बी कबुल हई म्या तुला कधी खेळायची मोटर बी नै घिउ शकलो. पर तु आठीव अतापोस्तवर तुला कदी बी शाळाची वाट सोडुन रानाची वाट धरा लावली नाय. दोन घास कमी खाल्लं पर तोहया पुस्तकाची सोय लावली.
तु बारवी झालास तवापासुण त्याट छाती काडुन गावात फिरायचु. आपुण लावलेलं झाड़ आता गार गार सावली देणार म्हणायचु.
मस लोकं मनली, तोहं पोरगं कालेज सोडुन गावांत उंडरतय, पाटलाच्या लेकिवर् उडतय. पर आपला भरुसा होता. म्या म्हणायचु, आपलं रघत हाय फुकट जाणार नाय. पर महा शिक्का खोटा निघला. म्या पिरमात आंधळा झालतु. तेव प्रिंसदादा दारात यिवुन सांगुन गिलता पर माहिच अक्कल शेन खायला गिलती.
पर तु त् शिकला सवरला हुतास ना?
अरं! पाटलाच्या पोरिवर उडायच्या आधी इच्चार त् करायचा आपल्या भैनिचा?
तोहया वह्या पुस्तकासटि, स्वत्ताच्या शाळावर् पाणी फिरून लोकायाच्या रानायनि बिनचपलीचं फिरलं ते लेकरु. तेच्या पायाला आलेल्या फोडाचा त् इचार करायचास.
"महा भौ मोटा हाफिसर झाल्याव माहं लगीन लए मोठ्या घरात करुन देणार हाई" म्हणायचं ते लेकरु. आता तेच लेकरु तोहयामुळं लगीन होईना मनुन गोधड़ित मुंडकं खुपसुन ढसा ढसा रडतय. काय गुना होता रं त्या कवळ्या लेकराचा? तरी बी तुला उलशिक बी दूषणं देत नै. "आये, महा दादा कुठं झोपत आसन गं?" रातच्याला झोपताना रोज मइला इचारतय ते लेकरु. ते खरं पिरेम. पर आमालाच आता कळालै. ज्याला शिकुन मोठं करायचं तेला आमी उनातानाचं रानात धाडलं अण जेला नै तेला गावात उंडरायला सोडलं.
उनातानाचं माय-बाप राबलं नै त् सांच्याला घरातली चुल पेटत नै हे त् तुह्या ध्यानात यायला पैजी हुतं.
चाळीस हजार पगार घरात आल्यार, नवा कोरा फिलाट घेतल्यार तरी तुला घासलेटची चिमनी लवून पत्र्याच्या खोलीत झोपणाऱ्या मई-बापाचं ध्यान व्हायला पाहिजी होतं. निदान वयात आलेली भैन उघड्यावर नहायला बसती अण आपुण पाटलाच्या पोरिला फुलागत ठिवतुया असलं त् कै तरी तुह्या डोसक्यात यायला पायजी हुतं. पिरेम करुन अण पळून लगीन करुन तु जिकलास पर माघ्ं आपल्या घरादाराचं काय झालं हे एक रूपड्याचा फोन लाउन इचारायचं काळीज बी तुह्याजवळ नै राहिलं अण मंग तु कसला रं पिरेम करणारा माणुस? तु मतलबी निघलास.
तेव पाटिल आपल्या खानदानावर कसा अण कुठून कुठून उडल याचा एकदा तरी इचार तुह्या डोसक्यात आलता का रं?
आलता त् मंग खरं सांग परश्या, तोही कवळी भैण त्या पाटलाम्हवरं हात जोडून आक्रोश करताना नई का दिसली तुला?
...आज पहायला येणाऱ्या पोराने दुकानावर फोन करुन, पोरिचा भाऊ काय करतो असं परश्याच्या बापाला विचारलं. बाप पुढं बोललाच नाही. पोरगा समजून गेला. आपलं जमणार नाही बोलला.
दारात काढलेली रांगोळी स्वतःच्या पायाने विसकटुन 'तो' लाल साडित नटुन बसलेल्या कोवळ्या पोरिला कवटाळून ढोरागत रडू लागला.
कमुन हेव भोग माह्या लेकिच्या वाट्याला आला?
तिचा काय गुन्हा झाला?
पिरेम करायची खाज त् तुला हुती रे परश्या!
सल्ल्या धावतच आला. अंगणात लेकीची समजूत काढत बसलेल्या बापाकड़ पाहुन मोठ्याने ओरडला;
"परश्याला अण आर्चीला कुणीतरी मारून टाकले. पोलिस बोड़या घिउन बाजरतळाला बसलेत. पाटिल ओळख दाखिना. तुमी तरी चला"
बापाला आवंढा बी गिळता आला नाही. तसाच आ वासुन पडला.
सल्ल्याने पाणी मारल्यावर थरथरत्या अंगाने बाजारतळला आला.
दोन चार पोलिस सोडले तर कुत्रं बी तिथं उभा नव्हतं.
लेकाला पाहुन बापाचं अवसान गळालं. प्रेत बांधलेल्या गठुड्याला आवळून त्यानं हंबरडा फोडला.
"देवा, माह्या लेकानी गुना केला पर एवढी सजा नवती रे त्या गुन्याची. म्या दोनच लेकराचा बाप है. पर तु त् साऱ्या जगाचा हैस ना? मंग कावुन असला न्याव केलास?"
रडून रडून गार पडलेला बाप दुसऱ्या गठुड्याकड़े पाहुन ताटकण उठला. छाती बड़विणाऱ्या बायकुच्या गळ्याताला मंगळसूत्र तोड़ला आणि नीट कापडाच्या दुकाणात गेला. लालजरित डोळे अण शुन्यात नजर.
"शेटजी, आधी एक हिरी साड़ी अन चोळी दया. एकदम नवी कोरी. म्या तिला बेवारस पडु देणार नै. कोरया साडी चोळीत सजिन अण स्वत्ता मह्या हातानी अग्नि देईन. शेवटी कई बी झालं त् म्या एक बाप हाय अन ति सुन हाय माही"

मांडणीसमाज

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

25 Jun 2016 - 1:21 am | पद्मावति

कथा खूप आवडली. शेवटले वाक्य....निशब्द झालेय!!!!

वाचताना परश्याचे वडील (सिनेमा मधील) अगदी डोळ्यासमोर आले व समोर बसून सांगत असल्यासारखं वाटलं.
लेख आवडला व लेखातील विचार देखील विचार करायला लावणारे आहेत.

धन्यवाद!

धनंजय माने's picture

25 Jun 2016 - 3:23 am | धनंजय माने

___/\___

सुन्न झालो.

आनि आता बास करा लगा, लै डॉक्यात किडं पडायल्यात आता.
मायलीला येका 'मी कुठं म्हनलं मला आवडत नाय' ने लै घोळ घातलाय राव!

असंका's picture

25 Jun 2016 - 9:29 am | असंका

सुरेखच जमलंय..

धन्यवाद..

(धनंजय माने यांना +१)

विअर्ड विक्स's picture

25 Jun 2016 - 11:11 am | विअर्ड विक्स

सुंदर ...... इच्छा पूर्ण झाली. मी लिहायचा प्रयत्न करणार होतो , पण ते सोलापुरी न होता , मुम्बैय्या झाले असते. धन्यवाद.

लैच भारी जमलंय आनंदाभाऊ. एकदम परफेक्त.
उगा उलूसं तीट. भाषा वेगळी झालिया. ही भाषा करमाळा साईडला वापरात नाही. अर्थात तुमच्या मनातून डायरेक्त आलीय तो सच्चेपणा हायेच.

स्पा's picture

25 Jun 2016 - 11:27 am | स्पा

प्रदीप ,सलीम,आरचीची मयतरीण, शाळेतले शिक्षक, हैदराबादची डोसेवाली अम्मा, अजय अतुल, नागराज मंजुळे, निखिल साने यांच्या बापांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत

अभ्या..'s picture

25 Jun 2016 - 11:35 am | अभ्या..

'ते' राहिले ना.
आपणपण लिहाल काय आपल्या समर्थ लेखणीद्वारे?

छे आप्लया सारख्या सिद्ध असली गावरान मातीतल्या झणझणीत लेखणी पुढे आम्ही म्हणजे सुर्यापुढे काजव्याने नाचणे,

धनंजय माने's picture

25 Jun 2016 - 3:09 pm | धनंजय माने

तुम्ही भांडताय का? भांडू नका ना गड़े.
आम्हाला तुम्ही दोघेही लेखक म्हणून कुपकुप आवडता.

अभ्या..'s picture

25 Jun 2016 - 3:26 pm | अभ्या..

नाय ना प्यारेकाका. आम्ही डॅन्स करतोय झिंगालाला हुर्र्र करत.
एखादा विजूखोटे आलाकी एक व्हायची बनवाबनवी आम्हा दोघा भावांना जमते. ;)

धनंजय माने's picture

27 Jun 2016 - 6:24 pm | धनंजय माने

दु दु अभ्या..
झिंगालाला हु झिंगालाला हु हुर्र हुर्र करत डान्स करणारे दोघे दिसले.

जेपी's picture

25 Jun 2016 - 11:29 am | जेपी

...

जगप्रवासी's picture

25 Jun 2016 - 11:37 am | जगप्रवासी

सगळ्यांचे विचार पटतात, बास्स झालं यार हे सैराट प्रकरण. डोकं बधिर होत अस वाचून. छान लिहलंय आनंद भाऊ

जब्राट. दंडवत स्वीकारावा! आता आर्ची न परश्याच्या बाळाची बाळ हाय मी स्टोरी लिहू नका कुणी. ती वाचायची हिम्मत होणार नाही.

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2016 - 12:52 pm | टवाळ कार्टा

+११११

संजय पाटिल's picture

25 Jun 2016 - 12:02 pm | संजय पाटिल

__/\__
....

सोनुली's picture

25 Jun 2016 - 3:46 pm | सोनुली

आवडले.

जव्हेरगंज's picture

25 Jun 2016 - 6:39 pm | जव्हेरगंज

हे अगदी जबरी झालय...

डिट्टो!

घ्या दंडवत

_/\_

स्मिता_१३'s picture

25 Jun 2016 - 7:29 pm | स्मिता_१३

जबरी लिहीलंय !!!

अशोक पतिल's picture

26 Jun 2016 - 11:40 pm | अशोक पतिल

आता आर्ची न परश्याच्या बाळाची बाळ हाय मी स्टोरी लिहू नका कुणी.
_/\_ अगदी सहमत !

बाकी माय भाषेची खरीखुरी साहित्य सेवा मिपा वर होतेय हे मात्र अगदी खरयं .

सिरुसेरि's picture

27 Jun 2016 - 7:47 am | सिरुसेरि

सर्वच मनोगते अप्रतिम आहेत . या सर्व मनोगतांचा एकत्र परिणाम म्ह्णुन डोळ्यासमोर "आर्ची , परशा कोणा आटिंग्या रानात तुमच्यावर काळानं झडप घातली रं ?" असा आक्रोश करणारे आर्ची , परशाचे आई वडील दिसु लागले .

नाखु's picture

27 Jun 2016 - 9:16 am | नाखु

"बाप" लिखाण....

"बाप" झाल्याखेरीज वेदना कळत नाही .

बापु(ड्)वाणा नाखु

:(
सगळ्यात आवडलेला भाग हाच.

दिग्विजय भोसले's picture

27 Jun 2016 - 5:46 pm | दिग्विजय भोसले

छान लिहलय,शंकाच नाही
पण जास्ती नेगेटिव(दुखदायक)गोष्टी वाचू वाटत नाहीत,मनावर परिणाम होतो.
बाहेर फिरताना कोणी गरीब,भिकारी नजरेस पडला तरी मी त्याच्याकडे बघायचं टाळतो,त्यांच्याबद्दल सहानुभूती ही आहेच पण उगाच मन उदास होते.आणि उदास जीवन जगण्यासाठी जन्म नाही आपला.
.
.
जैसे ज्याचे कर्म तैसे....