लाज कुणाला

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
15 Jun 2016 - 6:42 pm

शतशब्दकथा-- वेल्लाभटांच्या "थक्क करणारी एक घोडदौड" धाग्याला प्रतिसाद देताना सुचलेली(सत्यकथा)

माझ्याकडे तब्येत बरी नाही म्हणून आलेला एक माणूस. वय वर्षे ५७. करत काहीच नाही.
पूर्वी काय करत असे सुतार काम. आजकाल काम झेपत नाही. केंव्हापासून १२ वर्षेपासून.
कारण?
बायको म्हणाली त्यांची तब्येत बरी नसते ना?
तब्येत बरी नसते म्हणजे काय?
मी त्याच्या दहा वर्षात झालेल्या सर्व तपासण्याचे बाड अथपासून इतिपर्यंत पाहिले.
कुठेच काही नव्हते.
आमच्या आईच्या शब्दात -- त्याचे "सुख" दुखत होते.
याला दोन मुली कमावतात आणी बापाला पोसतात.
बापाने मुलीना सांगितलेले तुमच्या लग्नाचे तुम्ही पहायचे.
मुलीनी कुणाकडे भिक मागायला जायचे आमच्याशी लग्न करा म्हणून?
बायको माझ्याकडे तपासणीत "सवलत" द्या म्हणून सांगत होती.
सवलत दिली
शेवटी लाज कुणाला हगत्याला कि बघत्याला.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

15 Jun 2016 - 6:56 pm | मराठी कथालेखक

डॉक्टरसाहेब,
avoidant personality disorder बद्दल मागे साप्ताहिक सकाळच्या एका अंकात (मार्च २०१६) वाचले होते. पण साप्ताहिक सकाळ आणि विकीपीडियातील माहितीत थोडा फरक आहे (सासचा तो अंक मात्र मला प्रयत्न करुनही मिळू शकला नाही). याबद्दल अधिक कुणी सांगू शकेल काय ?
वर आपण उल्लेखलेल्या सुताराने वय वर्षे ४५ पासून काम सोडले आहे असे दिसते. मी तर यापेक्षा कितीतरी कमी वयात काहीच न करणारा तरूण पाहिला आहे. अशा लोकांची नेमकी मानसिकता जाणून घ्यायला आवडेल.

मराठी कथालेखक's picture

15 Jun 2016 - 7:04 pm | मराठी कथालेखक

साप्ताहिक सकाळ मधला तो लेख

सुबोध खरे's picture

16 Jun 2016 - 7:28 pm | सुबोध खरे

avoidant personality disorder चा हा प्रकार नाही. हा माणूस वयाच्या ४५ पर्यंत काम करीत होता. त्या नंतर नानेपाड्यात नुसता चकाट्या पिटत
गावगप्पा मारत बसलेला असतो. कुठे कोपऱ्यात बसलेला नाही की स्वतः बद्दल न्यूनगंड नाही. बायको दोन वेळेस जेवायला घालते मुली कमावून आणत आहेत. त्यांचं लग्नाचं वय उलटून चाललंय. (याच्या दोन मुलींपैकी एक माझ्या मित्राच्या दवाखान्यात स्वागति़का म्हणून काम करते)
याला त्याची काही फिकीर नाही. एकदा काहीच न करण्याची सवय लागली की तेच बरं वाटायला लागतं.
पुलंच्या "बटाट्याची चाळ" मधलं "एक चिंतन" या लेखातील वाक्य आठवतं.
वयात आलेल्या मुलीचं लग्न कसं होईल या ऐवजी कमावती मुलगी लग्न होऊन गेली तर आपलं कसं होईल याची चिंता करणारे बाप पाहिली की त्याच्या डोक्यावर तुळई हाणावी असे चाळीला वाटते.
याचा हा नमुना आहे. अशा माणसांकडे पाहून संताप होतो आणि त्या मुलींकडे पाहून कणव येते. बिचार्या केवढ्या काळजीने बापाकडे पाहत असतात.

मराठी कथालेखक's picture

16 Jun 2016 - 7:57 pm | मराठी कथालेखक

हा प्रकार नसेल कदाचित AvPD चा, पण AvPD बद्दल जास्त माहिती देवू शकता का ? (होण्यामागची कारणे, उपाय ई) जमल्यास धागा निघू शकेल काय AvPD वर ?

अमेरिकन त्रिशंकू's picture

17 Jun 2016 - 4:54 am | अमेरिकन त्रिशंकू

वृद्धांच्या समस्येवर झालेल्या एका पीबीएसवरच्या प्रोग्रॅममध्ये असं म्हणलं होतं
The best thing you can do to make sure that you are taken care of in your old age is to have a daughter. हे जनरलायझेशन आहे पण मुली आईबापांना सहसा म्हातारपणात उघड्यावर टाकत नाहीत असा मतितार्थ.
प्रोग्रॅम अर्थात अमेरिकेतील वृद्धांवर होता.

ओह आय सी असा सगळा प्रकार झाला तर

धनंजय माने's picture

15 Jun 2016 - 7:16 pm | धनंजय माने

?

हा शुद्ध हलकटपणा आहे रॉजर्स!
-महाहलकट धनंजय माने.

ओ तुम्हाला लाग्ली का नोकरी का अजून त्याच दुकानात कामाला आहात ?

धनंजय माने's picture

15 Jun 2016 - 10:48 pm | धनंजय माने

नोकरी करत आहे.
(सारखं सारखं काय तेच झाड़?)

खटपट्या's picture

15 Jun 2016 - 11:23 pm | खटपट्या

तसं नाय वो. तुमच्या मालकीणबाईंचा मी फॅण हाय ना...

धनंजय माने's picture

15 Jun 2016 - 11:57 pm | धनंजय माने

फॅन च राहा. उगाच आणखी काही बनू नका.

मनात आणलं तरी बनू नाही शकत हो.

सूड's picture

15 Jun 2016 - 7:24 pm | सूड

यू टू रॉजर्स?

चुकून वेल्लाकाकांचा धागा समजून तर लिहीलं नाहीस ना?

स्पा's picture

15 Jun 2016 - 7:28 pm | स्पा

जीलबी ती जीलबी :D

रिम झिम's picture

16 Jun 2016 - 10:35 am | रिम झिम

तुम्ही काय विकता? गुलाबजामुन ? :D

सूड's picture

16 Jun 2016 - 7:20 pm | सूड

तुम्हाला काय हवंय?

अभ्या..'s picture

16 Jun 2016 - 7:22 pm | अभ्या..

सगळं एकेक छ्टाक. ;)

सूड's picture

16 Jun 2016 - 8:00 pm | सूड

आयसी!!

डॅाक्टरसाहेब खरं आहे. हल्ली डिस्काउंट या शब्दाला काही अर्थ राहिला नाहीये.प्रत्येक ठिकाणी लोकांस "भाव कमी करायला " लावले की बरं वाटतं. तुम्ही तुमची फी दीडपट दुप्पट सांगून " तुमच्यासाठी फक्त दहा पंधरा टक्के कमी करतोय" हे सांगून वाजवी फी घ्या.मुंबईत काहींना अमुक एक महागड्या ठिकाणची सेवा घेतो/आमच्या बाबांना चांगली मेडिकल ट्रिटमेंट देत आहोत हे अभिमानाने सांगायची सवय झाली आहे तर आपणही तसे करू शकतोच.शिवाय आपल्याला माणसांची पारख असतेच त्याप्रमाणे गरजवंतास कमी दरात सोय नक्कीच देऊ शकू.
माझा हा मुद्दा तुम्हास एखादवेळेस पटणार नाही पण मार्केटिंगच्या फेय्रात आता वैद्यकीय सेवा आली आहे हे नाकारून चालणार नाही.उनका भला अपना भला दुसरं काय?

सुबोध खरे's picture

16 Jun 2016 - 7:17 pm | सुबोध खरे

कंजूस साहेब
व्यवसायाच्या सुरुवातीच्या वर्षात एकदा दोनदा गुजराती लोक "सवलत" मागणार म्हणून मी त्यांना जास्त भाव सांगून मग सवलत दिली. परंतु माझ्या तत्वात ते बसणारे किंवा मला पटणारे नव्हते म्हणून मी तसे करणारे सोडून दिले आणि स्वच्छ पणे अशा लोकांना विचारू लागलो की तुम्हाला सवलत का द्यायची? बहुसंख्य लोक अशाने अवाक होत? उगाच "हॅ हॅ हॅ" करत बोलण्यापेक्षा असे थेट प्रश्नाला भिडणे (DIRECT APPROACH) मला सोपे वाटते.
कित्येक लोक सवलत मागतात आणि ती दिल्यावर परत बिल पूर्ण रकमेचे द्या म्हणून सांगतात. तुम्हाला जर पैशाचा परतावा मिळत आहे तर तुम्ही सवलत का मागता आणि वर त्यातून थोडे पैसे ढापायचा प्रयत्न ही करता. हा रोजचा अनुभव आहे.
"बिल" हवे असेल तर पैसे "जास्त" भरावे लागतील असा प्रकार माझ्याकडे नाही.
महापालिकेच्या दवाखान्यातून येणाऱ्या माणसाला मी न विचारता सवलत देतो. जो माणूस पैसे नाहीत/ परवडत नाही म्हणून तेथे रांगेत तिष्ठत बसतो त्याला सवलत द्यायला मला कधीच वाईट वाटले नाही.
वाईट म्हणजे त्यांना मी सवलत देतो म्हणून टोयोटा इटियॉस होंडा सिटी मधून आलेला माणूस सुद्धा सवलत मागतो. अशा लोकांना मी सांगतो की महापालिकेच्या दवाखान्यातून चिठी आणा. तुम्हाला पण सवलत मिळेल.
वर वर्णन केलेल्या माणसाला सवलत मी दिली. खरं तर त्या "माणसाची" अजिबात लायकी नाही परंतु त्याचा खर्च त्याच्या मुलींच्या डोक्यावर बसणार म्हणून मी ही सवलत दिली.
मार्केटिंग च्या फेऱ्यात मी नाही. कारण मला मर्सिडीझ मधून फिरायची हौस नाही. माझा कोणीही मार्केटिंग एजंट नाही. माझ्याकडे लोकांच्या मौखिक प्रसिद्धीतून रुग्ण येतात आणि माझ्या गरजेपेक्षा मला नक्कीच जास्त पैसे मिळतात. माझ्या तिप्पट पैसे मिळवणाऱ्या माणसाचा /डॉक्टरचा मला हेवा वाटत नाही. किंवा त्यांच्या हून जास्त पैसे मिळवावेत अशी माझी ईर्षाही नाही सुदैवाने माझ्या बायकोलाही अशी हाव नाही. त्यामुळे मी माझा व्यवसाय "माझ्या" तत्वांवर चालवू शकतो.

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2016 - 10:36 am | टवाळ कार्टा

_/\_

मानसी१'s picture

16 Jun 2016 - 4:34 am | मानसी१

जवळच्या नात्यात ्स्सला रिकामटेकडा गॄहस्त बघीतला ााहे. गेली २० वर्ष काहीही न करता बायको व पोरांच्या जिवावर बसुन खातो ााहे.् जीबात लाज नाही
कहर म्हणजे त्याच्या घरच्यांना त्याच फालतु कौतुक ााहे

गेली २० वर्ष काहीही न करता

घर सांभाळत असेल. तसे असेल तर घर सांभाळने या कामाची काहीच किंमत नाही का? त्या न्यायाने किती तरी लोक रिकामटेकडे आहेत मग :)

नाखु's picture

16 Jun 2016 - 8:44 am | नाखु

महोदय त्यांच घर चाल्वायला मुलींना आणि बायकोला काम करावे लागत आहे त्यामुळे हा "आयतोबा" असेल तर चांगले आहे का? घर सांभाळण्य्ची जबाबदारी कमावत्या मुलींच्या जेवावर नक्की काय असू शकेल असे तुम्हाला वाटते?

प्रतिसादक आणि धागालेखक यांनी नुसते बसून राहणार्या (कुटूंबासाठी काहीही न कमावता) अडेलतट्टूंसाठी लिखाण केले आहे , घर सांभाळ्णार्या आजी-आजोबा,गृहीणींसाठी नाही हे ध्यानात घेतले म्हणजे असले प्र्शन पडणार नाहीत.

मिपा अडाणी नाखु

नेमकी माहिती नसल्यामुळेच मी विचारलं होतं. कारण काहीच काम करत नसतील तर मग घरच्यांना कौतुक का असेल? दाल मे कुछ काला है ..

अप्पा जोगळेकर's picture

16 Jun 2016 - 10:21 am | अप्पा जोगळेकर

काही अशी माणसे पाहिली आहेत ज्यांनी आयुष्यभर फक्त नोकरीच केली. म्हणजे घरातले आजारपण, आपल्या लहान मुलांचे हगणे-मुतणे, भाजी आणणे इथपासून ते मयतापर्यंत सग्ळी कामे घरातल्या इतरांनी करायची. हे फक्त महिन्याला ठराविक रक्कम आणून देणार.
आमचे एक नातलग तर मुले आजारी असली की डोंबिवलीहून पळून जायचे दादरला स्व्तःच्या आई वड्लांच्या घरी. आणि बायको एकटी बिचारी धावतेय.
या माणसाम्नाही सेम पंगतीत बसवावे काय ?
अवांतर - खरतर नोकरी करणे, बढती मिळवणे हे किती सोपे आहे ? वर पुन्हा आम्ही किती कष्ट काढतो, साहेबाच्या शिव्या खातो?अशा बाता मारता येतात.

धनंजय माने's picture

16 Jun 2016 - 10:27 am | धनंजय माने

अहो संसार सुखी करायचा तर नुसता पैसा उपयोगाचा नाही किंवा नुसते शारीरिक कष्ट सुद्धा.

आर्थिक आवक व्यवस्थित असली तर इतर गोष्टी बऱ्या पैकी सुरळीत होत असल्याने आर्थिक आवक करुन देणाराला मान मिळतो. पण बऱ्याचदा आलेली आवक कशी वापरायची याची जाण नसते, बऱ्याचदा आणखी काही घोळ होतात तेव्हा ताटाखालचं मांजर बनावं लागतं. काही ठिकाणी पैसा आणून दिला की काम झालं अशीही भावना असतेच.

नंदन's picture

17 Jun 2016 - 3:40 am | नंदन

माझ्याकडे तब्येत बरी नाही म्हणून आलेला एक माणूस. वय वर्षे ५७. करत काहीच नाही. पूर्वी काय करत असे सुतार काम.

'करवत' नसेल हा पुलंचा विनोद आठवला. (अस्थानी वाटल्यास दिलगीर आहे)