पुण्यातील FIIT, JEE साठीचे चांगले क्लासेस कोणते?

विक्रांत's picture
विक्रांत in काथ्याकूट
10 Jun 2016 - 8:52 am
गाभा: 

पुण्यातील FIIT, JEE साठीचे चांगले क्लासेस कोणते? IIT मध्ये रस नाही...

प्रतिक्रिया

विक्रांत's picture

10 Jun 2016 - 8:58 am | विक्रांत

फंडे क्लीअर व्हायला हवेत, स्टाफ उत्तम, अनुभवी हवा व संस्थेचे सक्सेस ट्रॅक रेकॉर्ड उत्तम हवे. उगाच बाजारू, पैसे उकळणाऱ्या संस्था/क्लासेस नकोत!

फिट्जी FIIT JEE चांगल्या क्लास बाबत काय सांगता येईल. Contact No असेल तर कृपया द्यावा.

विद्यालंकार क्लासेस बरे की इतर फिटजी FIIT JEE??

फंडे क्लीअर व्हायला हवेत

FIIT आणि JEE मधे स्वल्पविराम का दिला आहे?

सतिश पाटील's picture

10 Jun 2016 - 11:34 am | सतिश पाटील

IIT मध्ये रस नाही

मग उस घ्या, त्यात खूप रस असतो...

खेडूत's picture

10 Jun 2016 - 11:55 am | खेडूत

:)
आपल्याला US म्हणायचंय का?

बाकी धाग्यात विचारलेली आखूड्शिंगी म्हैस पुण्यात तर आढळली नाय कधी!

सतिश पाटील's picture

10 Jun 2016 - 12:54 pm | सतिश पाटील

नाही हो , मला ऊसच म्हण्यायचं आहे.

उस डोंगा परी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलिया रंगा

अशी एक कविता होती आम्हाला शाळेत.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2016 - 2:12 pm | श्रीगुरुजी

पुण्यातील FIIT, JEE साठीचे चांगले क्लासेस कोणते? IIT मध्ये रस नाही...

FIIT म्हणजे Foundation for IIT.

JEE म्हणजे IIT साठी असलेली Joint Entrance Examination.

IIT मध्ये रस नाही असे म्हणता, परंतु तुम्हाला FIIT व JEE चे चांगले क्लास हवे आहेत. म्हणजे IIT कोचिंगचेच क्लासेस हवे आहेत का? का अजून काही वेगळं शोधताय?

साधारणतः दोन्ही एकत्र होतात म्हणून पण JEE मेन एडव्हान्सवाला क्लास हवा.... पाल्याला (भाचा) IIT करायचेच नाहीये.
त्याचा मामा जर्मनीत असतो. JEE करून ब्रीज कोर्स, पात्रता एक्झाम देऊन जर्मनीत ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पदवी शिक्षण घ्यायचे आहे. वडील जर्मन कंपनीत CEO आहेत. पाल्यास फिजिक्स मध्ये रुची आहे (रसही!) ....
कृपया म्हणूनच JEE ची उत्तम तयारी करून घेणारे पुण्यातील चांगले क्लास सुचवा. FIIT JEE म्हणजेच फिटजी स्वरूपाचे कॉम्बो क्लास अनेक असतात. फिटजी नावाचे दिल्लीतील क्लासेसही आहेत. पुण्यात फिटजी कसे आहे? पालवे क्लासेस, विद्यालंकार, आकाश अशा अनेक नावांचा गोंधळ आहे. कृपया योग्य JEE वर भर देणारा क्लास शिकवा!

हेमन्त वाघे's picture

10 Jun 2016 - 3:53 pm | हेमन्त वाघे

कोण ? कोणती कम्पनी ? कृपया नाव कळेल की ?

कृपया पुण्यातील योग्य JEE वर भर देणारा क्लास सांगा...
(क्लास "शिकवा" असे चुकून लिहिले गेले.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2016 - 3:17 pm | श्रीगुरुजी

मला पुण्यातील फक्त शुद्ध आयआयटी कोचिंग देणार्‍या संस्था माहिती आहेत. फक्त JEE मेन एडव्हान्सवाला क्लास मला माहिती नाही. आयआयटी प्रशिक्षण देणार्‍या क्लासमध्ये JEE मेन व JEE अ‍ॅडव्हान्स हे दोन्ही कव्हर होते. FIIT JEE ही देशपातळीवर JEE मेन व JEE अ‍ॅडव्हान्स याचे संयुक्त शिक्षण देणारी प्रशिक्षण संस्था आहे. पुण्यातील फिटजी ही दिल्लीतल्या फिटजीचीच शाखा आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2016 - 6:41 pm | श्रीगुरुजी

JEE मेन साठी देवधर क्लास चांगला आहे असे ऐकून आहे.

आयआयटीयन्स IITPK प्रशिक्षण केंद्र व पेस IIT PACE यात कुठला पर्याय योग्य? बाल्टीवाला, आकाश, फिटझी FIIT JEE, बन्सल हे उत्तरेत नामांकित असले तरी पुणे शाखा तितक्या चांगल्या आहेत का? देवधर, पावगी यांचे ट्रॅक रेकॉर्ड कळेल का?

जर्मनीतील पदवी शिक्षणाच्या, इंजिनीअरिंग संधी काय? त्यासाठीच JEE एडव्हान्स वर भर देणारा क्लास हवाय. JEE मेन्स, IIT फौंडेशन, MHT CET हे काही उपयोगाचं नाही जर्मनीत जाताना म्हणून त्यावर कमी भर व JEE एडव्हान्स स्पेशल क्लास कृपया सुचविलात तर आभारी राहीन....

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

आयआयटीयन्स IITPK प्रशिक्षण केंद्र व पेस IIT PACE यात कुठला पर्याय योग्य?

दोघेही जवळपास सारखेच आहेत.

बाल्टीवाला, आकाश, फिटझी FIIT JEE, बन्सल हे उत्तरेत नामांकित असले तरी पुणे शाखा तितक्या चांगल्या आहेत का?

आकाश व बन्सलबद्दल माहिती नाही. बाकलीवाल व फीटजी चांगले आहेत.

JEE एडव्हान्स स्पेशल क्लास कृपया सुचविलात तर आभारी राहीन....

पेस, फिटजी, आयआयटीयन्स प्रशिक्षण, बाकलीवाल, एम प्रकाश अ‍ॅकॅडमी

रॉजरमूर's picture

27 Jun 2016 - 3:32 am | रॉजरमूर

जर्मनीतील पदवी शिक्षणाच्या, इंजिनीअरिंग संधी काय?

काही दिवसापूर्वीच या विषयावर टुंड्रा यांचा माहितीपूर्ण असा

जर्मनीतील शिक्षणाच्या संधी

हा लेख मिपा वर येऊन गेला आहे त्याचा संदर्भ घ्या.

विनायक प्रभू's picture

26 Jun 2016 - 12:20 pm | विनायक प्रभू

शोध पुर्ण झाला असेल तर व्य. नी.करा. विद्यार्थ्याला बरेच मार्ग दर्शन लागेल. बाकी अमुक क्लास चांगला म्हणजे काय ते गेल्या २० वर्षात मला कळलेले नाही.

महासंग्राम's picture

27 Jun 2016 - 3:14 pm | महासंग्राम

सुरवातीला FTII वाचले होते.