नटरंग ,माझे पण एक parikshan

वाल्मिक's picture
वाल्मिक in जनातलं, मनातलं
29 May 2016 - 3:09 pm

नमस्कार
तसा नटरंग खूप जुना आहे ,पण मी नुकताच बघितला
मला आवर्जून खटकलेली गोष्ट

ह्यात नायकाचे खरेच कलेवर प्रेम होते का ?
आधी नाटक फक्त पैसे कमावण्यासाठीच केले
जेवा फड कोसळला तेवा पण आधी घरची वाट पत्करली
बायका पोरांनी बाहेर काढले तेव्हाच कलेची सेवा केली
मग हा माणूस नटरंग कसा ?

चित्रपटविचार

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

29 May 2016 - 5:56 pm | चांदणे संदीप

काय सांगता!! भारीच!!

Sandy

संजय पाटिल's picture

29 May 2016 - 5:57 pm | संजय पाटिल

=)))

मला आवर्जून खटकलेली गोष्ट
हे खरंच परीक्षण आहे का ?

त्यांनीच सांगितलय. हे परीक्षण नाही, हे parikshan आहे.

बबन ताम्बे's picture

30 May 2016 - 3:35 pm | बबन ताम्बे

पण मुळात जो नाच्या किंवा सोंगाडया दाखवतात ( त्याचा पोषाख, बाईसारखे बोलणे , मुरडणे ) , तो मराठी तमाशांत नसतोच. मग मराठी चित्रपटात हे नसलेले पात्र का दाखवतात? महाराष्ट्रातील तमाशांत सोंगाडया हा पुरुष पात्रच असतो.
गणपत पाटलांची मुलाखत मी फार पुर्वी एका दिवाळी अंकात वाचली होती. त्यांनी जी भूमिका केली, त्यामुळे लोक त्यांना तृतीय पंथीच समजत आणि हिणवत होते. त्याचे त्यांना खूप वाईट वाटायचे.
नटरंगमधे पण शाहीर कामावलेली तब्येत नाच्याच्या भूमिकेसाठी कमी करतो. मुळातच हे पात्र मराठी तमाशा परंपरेत बसत नाही. त्यामुळे उत्कॄष्ट गाणी सोडली तर हा चित्रपट मला आवडला नाही.

आनन्दा's picture

30 May 2016 - 4:40 pm | आनन्दा

असो.. बाकी मला पडलेला सार्वकालीन प्रश्न.. चित्रपटामध्ये रडारड असल्याशिवाय चित्रपट हिट होतच नाही का?

एकुलता एक डॉन's picture

3 Jun 2016 - 11:33 am | एकुलता एक डॉन

kick ३ idiots ready
कुठेच रडारड नाहीये

आनन्दा's picture

3 Jun 2016 - 12:53 pm | आनन्दा

हो अपवाद आहेतच, पण ते फार थोडे. मी विशेषतः मराठी चित्रपटांबद्दल बोलत होतो. नटसम्राट घ्या, सैराट घ्या, आणखीन राष्ट्रीय पुरस्कारविजेते कोणतेही मराठी चित्रपट घ्या.

एकुलता एक डॉन's picture

3 Jun 2016 - 2:56 pm | एकुलता एक डॉन

alka kubal wale
baki mahesh kothare ,lakshya ,ashok यांच्यात नसते रडारड

बोका-ए-आझम's picture

4 Jun 2016 - 12:23 am | बोका-ए-आझम

पण जगातले बहुतांशी superhit चित्रपट शोकांतिकाच आहेत. अगदी शोले सुद्धा.

अनिरुद्ध प्रभू's picture

3 Jun 2016 - 1:00 pm | अनिरुद्ध प्रभू

काय परिक्षण आहे.....>>>>>

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2016 - 5:14 pm | अत्रुप्त आत्मा

काय तो लेख! खिक्क!
टनाटनी
दिसताय .

जव्हेरगंज's picture

3 Jun 2016 - 5:58 pm | जव्हेरगंज

लय बकवास पिच्चर होता.

बोका-ए-आझम's picture

4 Jun 2016 - 12:21 am | बोका-ए-आझम

गाणी छानच आहेत. आणि मूळ कादंबरी दणदणीत आहे. आनंद यादवांनी फारच सुंदर आणि भेदक लिहिलेलं आहे. चित्रपट त्याच्या १०% पण नाही.

भाते's picture

3 Jun 2016 - 8:19 pm | भाते

मिपावर सदस्यत्व घेतल्यावर का त्याआधी तुम्ही हा चित्रपट बघितला? इतके वर्ष हा चित्रपट का पाहिला नाही?
चेपुवर तुमचे खाते असल्यास तिकडे तुमच्या भिंतीवर हे परीक्षण (?) लिहिले होते का? त्यावर कोणी काही प्रतिक्रिया दिली होती का?
असल्या चारोळी परीक्षणासाठी मिपावर पहिलाच धागा का काढला?

बन्डु's picture

4 Jun 2016 - 3:59 am | बन्डु

"रामायण" लिहुन कंटाळा आला असेल

नाखु's picture

4 Jun 2016 - 9:11 am | नाखु

विनंती अता पुन्हा वालिमीकीचा वाल्या बनवू नका !

अता पुर्वीसारखी वाटमारी नीट चालत नाही.

तेंव्हा नवलेखकांना मागेल त्याला शेततळे अंतर्गत काही प्रतिसादाचा अनुदान द्या.

याचकांची पत्रेवाला नाखुस