डायग्नोस्टिक कंपन्यांचे उद्योग

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in काथ्याकूट
29 May 2016 - 2:19 pm
गाभा: 

गेल्या वर्षभरात शेअरबाजारात डायग्नोस्टिक कंपन्यांचे IPO इश्यु प्राइसच्या ४०-५०% अधिक किंमतीने लिस्ट झाल्या. ह्या कंपन्यांना भविष्यात होणारा नफा गृहीत धरुनच गुंतवणुकदारांनी ही किंमत मोजली असणार. डायग्नोस्टिक कंपन्यांचा बिझनेस कळणे सहज शक्य नसते. परंतू आज मटा मध्ये आलेल्या बातमीनुसार आपल्याला ह्या कंपन्यांचा बिझिनेस कसा चालतो ह्याचा अंदाज घेणे सोपे होणार आहे. अंतिम ग्राहकाच्या खिश्यातून जाणार्‍या पैशापैकी नेमके किती पैसे कंपनीला मिळनार हे कळू शकेल. इतके दिवस वैद्यकीय चाचण्यांमधून डॉक्टरांना मिळणारे कमिशन हे अधिकृतपणे कोणालाही माहीत नव्हते. परंतू
डायग्नोस्टिक कंपन्यांनी आता त्यात 'पारदर्शकता' आणल्यामुळे हे काम सोपे झाले आहे. कदाचीत आता वैद्यकीय चाचण्यांचे 'प्राईस वॉर' सूरू होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

30 May 2016 - 7:42 pm | आनंदी गोपाळ

दवाखान्यात एकदा शॉपअ‍ॅक्ट लायसन्स लटकवल्यावर, होलसेलरने रिटेलरला एमआरपी व कमिशन कळवणे, व हे, यातला गुणात्मक फरक समजला नाही.

पेशंट डायरेक्ट कंपनीकडे गेल्यास कंपनीने त्याला पूर्ण कमिशन देऊन उदा. २५० ऐवजी रिटेलरला सांगितलेल्या १०० रुपयांत थायरॉईड तपासणी करून दिली तर कुणालाच त्रास व्हायचे काही कारण नाही. पण सहसा होलसेलर किरकोळ गिर्‍हाईक स्वीकारत नाहीत. स्वीकारले, तरी रिटेलचाच भाव लावतात, कारण मग धंद्याची खोटी होते.

असेही, डॉक्टर्स चिठी लिहून देतात. तपासणी क्वालिफाईड पॅथॉलॉजिस्टकडून करावी, व सहसा रिलायेबल रिपोर्ट्स देणार्‍या पॅथॉलॉजिस्टकडून रिपोर्ट्स यावेत इतकीच अपेक्षा असते. ती कुणाकडे करायची हा रुग्णाचा चॉईस असतो, व असायला हवा.

इनडोअर पेशंट्स असताना मात्र सँपल कलेक्ट करून पॅथॉलॉजीकडे जर हॉस्पीटल पाठवत असेल, तर त्या सेवेसाठी एक्स्ट्रा चार्ज लागणे स्वाभाविक आहे. नातेवाईकाच्या हातात सँपल दिल्यास ते योय्ग रित्या नेणे, व त्याचे जाणे/येणे प्रवासखर्च गृहित धरता तो एनीवे जास्त पैसे खर्च करीतच असतो.

कमिशनच्या आशेने विनाकारण तपासण्या जर कुणी सुचवित असेल, तर ते अत्यंत नीच व निषेधार्ह काम आहे, हे मात्र नोंदवितो.