मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग २, Million Dollar Baby.........

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
28 May 2016 - 11:30 am

मी पौंगसावस्थेत असतांना काही कारणांमुळे माझे शिक्षणातून लक्ष उडाले.बरीच वर्षे अशी वाया गेली.पण वाचन मात्र सोडले न्हवते.त्याच सुमारास एक कथा वाचनात आली.

एका ऋषी कडे एक शिष्य असतो.त्या शिष्याला पण माझ्यासारखाच शिक्षणात रस न्हवता.एक दिवस तो ऋषीचे घर आणि शिक्षण, ह्या दोघांना रामराम करतो आणि परत आपल्या गावी जायला निघतो.वाटेत तहान लागल्यामुळे, तो एका विहिरीपाशी पाणी प्यायला जातो.तेंव्हा त्याला दिसते की, सतत दोरी घासल्या मुळे तिथल्या एका दगडाला चीर पडली आहे.त्याच क्षणी त्याला जाणवते, की एखादे ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवून, ते ध्येय गाठायचा प्रयत्न केला की, आज नाही तर उद्या, ते ध्येय साध्य होतेच.

तो परत आपल्या गुरुजींकडे जातो आणि शिक्षण पूर्ण करतो.

शिक्षणाला वयाची अट नसते, तर अट असते ती फक्त ध्येयाची आणि कष्टाची, हेच दाखवणारा एक नितांत सुंदर सिनेमा म्हणजे, Million Dollar Baby.

=========================================

ओझार्क्स प्रांतातल्या मिसूरी नावाच्या शहरात, मार्गारेट फित्झेराल्ट (मॅगी) नावाची एक वेट्रेस रहात असते.तशी ती वयाने थोराडच, पण तिची इच्छा असते एक बॉक्सर बनण्याची,त्यासाठी ती एका गुरुजींचा गंडा बांधायचा ठरवते.थोराड वयामुळे तो शिक्षक तिला शिकवायला नकार देतो.परंतू तिची शिक्षणाची जिद्द आणि ओढ बघून, तो तिला शिकवायला होकार देतो.

==========================================

आता आमची चित्रपटाची तोडओळख इतपतच.कारण इथून पुढे आपण अंदाज करू शकाता, की पुढे नक्की काय होणार म्हणून.

हा चित्रपट मला अतिशय आवडला, कारण....

१. क्लिंट इस्टवूडची चाकोरी बाहेरची भुमिका आणि त्याचे अप्रतिम दिग्दर्शन.

२. मॉर्गन फ्रीमॅनची तितकीच तोलामोलीची साथ.

३. हिलरी स्वांकचा सहजसुंदर अभिनय.

आणि

४. ज्ञानासाठी वाट्टेल ते करण्याचे, स्फूलिंग चेतवणारा सिनेमा.

===========================================

हे ठिकाणआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 May 2016 - 11:34 am | प्रचेतस

प्रचंड ताकदीचा चित्रपट.
नेहमीच्याच सरधोपट मार्गाने पुढे जाणार असं वाटत असतानाच इस्टवूड अनपेक्षित धक्का देतो. चित्रपटातून बाहेर येणं पुढचं काही दिवस कठीण होऊन जातं.

सिरुसेरि's picture

28 May 2016 - 12:25 pm | सिरुसेरि

ऑस्कर विजेता चित्रपट . इस्टवूडचे "इनव्हिक्टस" आणी " लेटर्स फ्रॉम आय ओ जिमा " हेही गाजलेले चित्रपट .

सांरा's picture

28 May 2016 - 7:19 pm | सांरा

हा मी बघितला आहे, आवडणाऱ्या बाबी म्हणजे याच संगीत, चित्रीकरण, आणि अभिनय. जपानी बाजूने दुसरे महायुद्ध दाखवतांना दोन्ही बाजूंची क्रूरता, शौर्य, भावना चपखलपणे दाखविलेल्या आहेत.

सुंड्या's picture

28 May 2016 - 11:36 pm | सुंड्या

INVICTUS by WILLIAM ERNEST HENLEY

Out of the night that covers me,
Black as the pit from pole to pole,
I thank whatever gods may be
For my unconquerable soul.
In the fell clutch of circumstance
I have not winced nor cried aloud.
Under the bludgeonings of chance
My head is bloody, but unbowed.
Beyond this place of wrath and tears
Looms but the Horror of the shade,
And yet the menace of the years
Finds and shall find me unafraid.
It matters not how strait the gate,
How charged with punishments the scroll,
I am the master of my fate,
I am the captain of my soul.
-----------------------------------

शिव कन्या's picture

28 May 2016 - 6:37 pm | शिव कन्या

बोटभर ओळख करुन देण्याचा प्रकार छान.

मुक्त विहारि's picture

28 May 2016 - 10:57 pm | मुक्त विहारि

धन्यवाद.

आणि मला पण अशीच ओळ्ख करून दिलेली आवडते.

"खामोश, मस्त सिनेमा आहे." इतपतच ओळख, मला "खामोश" सिनेमा बघायला पुरते.

बोका-ए-आझम's picture

28 May 2016 - 6:42 pm | बोका-ए-आझम

अप्रतिम. क्लिंट ईस्टवूड आणि माॅर्गन फ्रीमन या दोघांनीही कमाल केलीय पण हिलरी स्वँकची मॅगी विसरू शकत नाही. तिला अभिनयाचं आॅस्कर मिळणं हे अगदी perfect होतं.

भंकस बाबा's picture

28 May 2016 - 6:50 pm | भंकस बाबा

शेवट बघताना मी मनसोक्त रडून घेतले आहे, इतके की माझी बायको जी हळव्या मनाची आहे तिने माझी नंतर भरपूर फिरकी ताणली होती.
तसापण मी क्लिंट ईस्टवूडचा पंखा आहे, आंधळा माणूस कसा असेल हे जसे हेपबर्न तंतोतंत् दाखवते तसेच प्रशिक्षक कसा असावा हे ह्या चित्रपटात ईस्टवुड दाखवुन देतो, तो इतका प्रभावी असतो की त्यासमोर माधवन, शाहरुख फीके पडतात.

थोडक्यात संपवलेत … मी बैठक मारून वाचायला बसलो आणि एकदम प्रतिक्रिया सुरु पण झाल्या … पण उत्सुकता वाढवणारी छान ओळख … धन्यवाद आता पोरांबरोबर बघेन.

स्वामी संकेतानंद's picture

28 May 2016 - 9:36 pm | स्वामी संकेतानंद

अस्वस्थ करतो हा सिनेमा..

महामाया's picture

28 May 2016 - 10:05 pm | महामाया

सुंदर ओळख करून दिलीय...

थोडीअजून माहिती अपेक्षित होती।

आबा's picture

29 May 2016 - 4:05 pm | आबा

हा माझ्याही आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे.
डायरेक्टर ईस्टवूड आणि अँक्टर ईस्टवूड यांच्या शैलीमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे...

चतुरंग's picture

30 May 2016 - 6:22 am | चतुरंग

अफाट सिनेमा आहे. डायरेक्टर आणि अ‍ॅक्टर दोन्ही क्लिंट ईस्टवुड बेफाट आहेत!
मॉर्गन फ्रीमन, क्लिंट आणि हिलरी स्वँक तीघांनी जबरा कामं केलीयेत.
जिथे तिची मान मोडते त्याक्षणी क्लिंट्च्या चेहेर्‍यावरचे जे भाव आहेत ते अशक्य आहेत..
तिथे आपलीच मान काटकन कोणीतरी मोडतं!! :(
पुढे कथानक ज्या पद्धतीने हाताळलं आहे त्याला तोड नाही. नियतीसमोरची अपरिहार्यता, परिस्थितीत वेगाने होणारी घसरण, एकेक फासा मनाविरुद्धच पडत जाणे आणि सरतेशेवटी यावरचा उपाय म्हणून तो क्लायमॅक्सचा सीन जवाब नही!
शेवटल्या सीनच्या आधी पिशवीत सामान भरताना क्लिंट्च्या हाताच्या हालचाली, मॉर्गन फ्रीमनचे डायलॉग्ज आणि क्लिंट खोलीबाहेर पडतो तेव्हाचे मॉर्गनचे डोळे आणि चेहरा खलास! __/\__

(क्लिंट ईस्टवुडचा पंखा)रंगा