पेटती चूल

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 May 2016 - 10:22 am

ए.आय डी सी ला असताना अनेक युनिट्स इलेक्ट्रिसिटी चा "स्यान्क्शन लोड" आहे त्या पेक्षा जास्त मशीन कारखान्यात लावत असत. काही वेळा.सारी मशीन्स युनिट मधली एकदम चालू झाली की ओव्हर हेड हाय टेन्शन लाइन वर लोड येत असे व वायर गरम होऊन वायर जळत असे..
परिणास्वरुप वीज पुरवठा खंडीत होत असे..३-४ महिन्यातून एखाद्या वेळी हा प्रकार हमखास घडत असे....
वीज प्रवाह थांबला की एम एस ए बी ला फोन करा ..जोडणी कामगाराना बोलवा..मग ते आले की पोलवर चढणार केबल बदलणार आदी सोपस्कारात २-४ तास सहज निघून जात असत...
थोरात नावाचा एक जोडणी कामगार होता .तो या केबल जोडण्यातला दादा माणूस होता...
तो आला की आम्ही सारे त्याला म्हणत असू"बाबा लवकर केबल जोड मशीन्स बंद आहेत..कामगार बसून आहेत"
असे म्हणाले की त्याचे हमखास एक वाक्य असायचे..तो म्हणायचा.."बरोबर आहे साहेब समजते मला..."चूल बंद पडली की अक्कल बंद पडते" असे म्हणत कामाला लागायचा...
"चूल बंद पडली की अक्कल बंद पडते" लहानसे पण किती व्यावहारिक अर्थ असलेले वाक्य आहे..
माणसाच्या गमजा..उपदेश सुविचार आदी तो पर्यंत चालू असतात जो पर्यंत घरातली चूल पेटती असते....ज्या क्षणी चूल बंद होण्याचे वेळ येते त्या वेळी माणूस स्वैरभैर होतो.मन सैराट होते व त्याची सारी एनर्जी चूल पेटती ठेवण्या कडे जाते...
व्यवसायात व मानवी जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात..
त्या दयाघना कडे प्रार्थना प्रत्येकाच्या घरची चूल पेटती राहू देत...

मुक्तक

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

27 May 2016 - 11:37 am | आनन्दा

मस्त.. आवडले. खरे आहे.

प्रदीप's picture

27 May 2016 - 1:24 pm | प्रदीप

मुक्तक, आवडले.

एस's picture

27 May 2016 - 1:25 pm | एस

छान आहे!