५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
18 May 2016 - 2:59 pm
गाभा: 

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १९ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी हा धागा. सर्व राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज केवळ बातमी म्हणून देत आहे. या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.

_________________________________________________________________

(१) तामिळनाडू

२०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.

एकूण जागा - २३४
अद्रमुक+ : एकूण २०३ (अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १)
द्रमुक+ : एकूण २०३ (द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३)
भाजप व इतर पक्ष - ०

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.

एकूण जागा - ३९
अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%)

२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज

इंडीया टीव्ही - सी व्होटर: अद्रमुक - ११६, द्रमुक - १०१, इतर - १७
सी व्होटरः अद्रमुक - १३०, द्रमुक - ७०, इतर - ३४

२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज

आजतकः अद्रमुक+ ८९, द्रमुक+ १२४
न्यूज नेशन: अद्रमुक+ ९५, द्रमुक+ ११४
चाणक्यः अद्रमुक+ ८१-९९, द्रमुक+ १२९-१५१
अ‍ॅक्सिसः अद्रमुक+ ८९-१०१, द्रमुक+ १२४-१४०
सीव्होटरः अद्रमुक+ १३९, द्रमुक+ ७८

मतदानपूर्व सर्वेक्षणात अद्रमुक+ आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज होता. परंतु मतदानोत्तर चाचणीत ५ पैकी फक्त एका चाचणीत अद्रमुक+ आघाडीला बहुमताचा अंदाज आहे.

तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलते. यावेळीही तीच परंपरा कायम राहणार असा माझा अंदाज आहे.

_________________________________________________________________

(२) केरळ

२०११ मधील विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.

एकूण जागा - १४०

संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७)
डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५)
भाजप - (६:०३% मते) आणि शून्य जागा

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.

एकूण जागा - २०

काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते)
सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १
भाजप - ० (१०.३० % मते)

२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज

इंडीया टीव्ही - सी व्होटर: डालोआ - ८९, संलोआ - ४९, रालोआ - १, इतर - १
सी-व्होटरः डालोआ - ८६, संलोआ - ५३, रालोआ - १, इतर - ०
सी फोर एशियानेटः - ७७-८२, संलोआ - ५५-६०, रालोआ - ३-५, इतर - ०

२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज

आजतक-अ‍ॅक्सिस: डावी आघाडी ९४, संयुक्त लोकशाही आघाडी ४३, भाजप ०-३
सी व्होटरः डावी आघाडी ७४, संयुक्त लोकशाही आघाडी ५४
टाइम्स नाऊ: डावी आघाडी ७८, संयुक्त लोकशाही आघाडी ५८
चाणक्यः डालोआ ६६-८५, संलोआ ४८-६६, भाजप+ ४-१२

केरळमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात डालोआला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. केरळमध्ये सुद्धा दर ५ वर्षांनी सत्तांतर होत असल्याने यावेळी डालोआ सत्तेवर येणार असा माझा अंदाज आहे. भाजप स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच केरळ विधानसभेत खाते उघडण्याची शक्यता आहे.

_________________________________________________________________

(३) पश्चिम बंगाल

२०११ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते.

एकूण जागा - २९४

तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते
डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते
भाजप - शून्य जागा, ४.०६% मते

बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.

एकूण जागा - ४२

तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते)

२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज

इंडीया टीव्ही - सी व्होटर: तॄणमूल - १६०, डावे पक्ष + कॉंग्रेस - १२७, भाजप - ४, इतर - ३
नेल्सनः तॄणमूल - १७८, डावे पक्ष + कॉंग्रेस - ११०, भाजप - १, इतर - ५

२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज

आजतक-अ‍ॅक्सिस: तृणमूल २३३, काँग्रेस्+डावे पक्ष ३८
एबीपी न्यूजः तृणमूल १७८, काँग्रेस्+डावे पक्ष ११०
सी व्होटरः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७१-७९
टाइम्स नाऊ: तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष १२०
चाणक्यः तृणमूल १९६-२२४, काँग्रेस्+डावे पक्ष ६१-७९, भाजप ९-१९

पश्चिम बंगालमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल न करण्याची व स्थिर सरकारची परंपरा आहे. भाजप बर्‍याच कालावधीनंतर पश्चिम बंगाल विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

_________________________________________________________________

(४) आसाम

२०११ च्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते.

एकूण जागा - १२६

काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा)

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.

एकूण जागा - १४

काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १

२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज

इंडीया टीव्ही - सी व्होटर: काँग्रेस - ४४, भाजप+ - ५७, एआययुडीएफ - १९, इतर - ६
सी व्होटर: काँग्रेस - ५३, भाजप+ - ५५, एआययुडीएफ - १२, इतर - ६
नेल्सन: काँग्रेस - ३६, भाजप+ - ७८, एआययुडीएफ - १०, इतर - २
एव्हीसी: काँग्रेस - ४०, भाजप+ - ४८-५४, एआययुडीएफ - २५, इतर - १०

२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज

आजतक-अ‍ॅक्सिस: भाजप+ ७९-९३, काँग्रेस+ २६-३३
एबीपी न्यूजः भाजप+ ८१, काँग्रेस+ ३३
सी व्होटरः भाजप+ ५७, काँग्रेस+ ४१
न्यूज नेशनः भाजप+ ६३, काँग्रेस+ ४७
चाणक्यः भाजप+ ९०, काँग्रेस+ २७

_________________________________________________________________

बहुतेक सर्व मतदानपूर्व चाचण्यांचा असा अंदाज होता की आसाममध्ये भाजप आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असेल, परंतु ते बहुमतापासून थोडेसे दूर राहतील. पण बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज असा आहे की आसाममध्ये भाजप+ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तसे झाले तर प्रथमच पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपची सत्ता येईल.

एकंदरीत आसाममध्ये भाजप चांगली कामगिरी करून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसची पराभवाची परंपरा सुरूच राहणार असून काँग्रेस केरळ व आसाममध्ये सत्ता गमाविण्याची शक्यता आहे. बदल न करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. केरळ व तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा सुरू राहण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

18 May 2016 - 5:13 pm | ऋषिकेश

सी एस् डी एस ने या वेळी एज्झिट पोल्स घेतलेत नाहित काय?
ही एक त्रस्यस्थ आनि बर्‍यापैकी विश्वसनीय संस्था आह (योगेन्द्र यादव यात असेपर्यंत तरी होती.)

श्रीगुरुजी's picture

18 May 2016 - 8:54 pm | श्रीगुरुजी

सी एस डी एस चे सर्वेक्षण कोठेही दिसले नाही.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 8:00 am | गॅरी ट्रुमन

हे लिहिताक्षणी मतदानयंत्रे उघडली जाऊन मतमोजणीला सुरवात होत आहे. पहिले कल दहा मिनिटात हाती येतील.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 8:15 am | गॅरी ट्रुमन

पहिला अर्धा तास पोस्टल मते मोजली जातात आणि या मतांचा आकडा फार जास्त नसतो. त्यामुळे पहिल्या अर्ध्या तासात आलेले कल तितकेसे प्रातिनिधीक नसतात. मी २०११ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह बघितले नव्हते. आताच टाईम्स नाऊवर चर्चा झाली की त्यावेळी पहिल्या अर्ध्या तासात पोस्टल मतांमुळे तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीवर होता.पण नंतर मशीनमधली मते मोजली जाणे सुरू झाल्यावर अण्णा द्रमुकने मुसंडी मारली.

NDTV वर सांगितले की केरळमध्ये एका मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. (पोस्टल मतांमध्ये)

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 8:28 am | गॅरी ट्रुमन

पहिले कल हाती आले आहेत. मी टाईप करण्यापेक्षा एका जेपीजी इमेजमध्ये सर्व माहिती कळेल अशा पध्दतीने इमेज पेस्ट करत आहे. त्यामुळे पोस्ट करण्यात थोडा उशीर होईल (काही मिनिटांचा)

Trend

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 9:02 am | गॅरी ट्रुमन

सकाळी ८.५८ वाजता पुढील कल उपलब्ध आहेत:

Trend

आताचे चित्रः

१. पश्चिम बंगाल: तृणमूलचा जबरदस्त स्वीप
२. तामिळनाडू: अण्णा द्रमुकची कामगिरी द्रमुकपेक्षा जास्त चांगली. जयललिता जिंकल्यास आश्चर्य वाटू नये.
३. आसामः भाजपची जोरदार मुसंडी
४. केरळः डावी आघाडी पुढे.

हे लिहिताक्षणी भाजपने केरळमध्ये ५, बंगालमध्ये ६ तर तामिळनाडूमध्ये १ जागेवर आघाडी घेतली आहे. भाजपचा "उत्तर भारतीय जनता पार्टी" हा टॅग काही प्रमाणात पुसायला या निकालांमुळे मदत होईल असे दिसते. एकूणच अमित शहा आतापर्यंतच्या कलांवरून खूष असतील.

भोळा भाबडा's picture

19 May 2016 - 9:19 am | भोळा भाबडा

आसाम-भाजप सत्तेत येण्याची शक्यता
बंगाल-भाजपची वाढती टक्केवारी
केरळ-भाजपचा चंचुप्रवेश

(रूझान के अनुसार)

अनुप ढेरे's picture

19 May 2016 - 9:34 am | अनुप ढेरे

आसाममध्ये विजय, केरळात डाव्यांचा विजय, आणि जयललिथाचा-ममतांचा विजय ही भाजपासाठी विन-विन सिचुएशन आहे.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 9:43 am | गॅरी ट्रुमन

सहमत आहे.

जयललितांचा तामिळनाडूत विजय झाला तर तथाकथित तिसऱ्या आघाडीमध्ये जयललिता स्वत:ची दावेदारी सांगणारच. ममता, नितीश आणि नवीन पटनायक हे नेते पण त्या शर्यतीत असणारच आहेत. त्यात भरीस भर म्हणून केजरीवालही असणारच आहेत. तेव्हा विजय मिळविल्यामुळे आपले वाढलेले इगो घेऊन हे सगळे नेते आपली दावेदारी नेतृत्वासाठी सांगायला लागले तर २०१९ मध्ये तिसऱ्या आघाडीमध्ये हे सगळे नेते एकत्र आले तरी हे किती वेळ एकत्र राहणार हा प्रश्न उभा राहिलच. आणि लोकसभा जागांच्या दृष्टीने बंगाल आणि तामिळनाडू ही मोठी राज्ये आहेत. त्यामुळे नितीश कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी त्यांच्यापुढे आता जयललिता आणि ममता हे दोन तगडे प्रतिस्पर्धी असतील. अगदी असेच व्हावे असे मला वाटतच होते.

अर्धवटराव's picture

19 May 2016 - 9:49 am | अर्धवटराव

पण दिदी आणि अम्मा यांना इतर घटकांचा पाठिंबा मिळणं कठिण आहे. नितीश केंद्रस्थानी ठेवण्यासाठी लालु जीवाचं रान करतील. दिदीला डावे पाठिंबा देणार नाहि. अम्मांना केजरीवाल स्विकारणार नाहि. (केजरीवालला बहुतेक कुणीच स्विकारणार नाहि)

अनुप ढेरे's picture

19 May 2016 - 10:10 am | अनुप ढेरे

नवीन पटनाईक त्या कडबोळ्यात पडतील असं वाटत नाही. न्याशनल अँबिशन आहे त्यांना अस वाटत नाही. तो माणूस कधीच चुकीच्या कारणासाठी बातम्यांमध्ये नसतो. काम चांगलं करतो आहे असं वाटतय. कारणं मोदी लाटेतही ओरिसामध्ये भरभरून शीटा आलेल्या यांच्या.

विकास's picture

19 May 2016 - 3:53 pm | विकास

तथाकथित तिसऱ्या आघाडीमध्ये

आता काँग्रेसचे अस्तित्व नगण्य झालेले असल्याने, दुसरी आघाडी असे म्हणणे योग्य ठरेल. ;)

अनुप ढेरे's picture

19 May 2016 - 10:00 am | अनुप ढेरे

आसाममध्ये भाजपा जिंकेल असं आत्ता तरी वाटतय. पण त्यांची तेवढीच मोठी अचिव्ह्मेंट म्हणजे बंगालमध्ये १०-१२ सीट्स आणि केरळमध्ये ३-४ सीट्स येणं (जेवढ्या आत्ता लीड्स आहेत.)

बॅटमॅन's picture

19 May 2016 - 10:33 am | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 10:32 am | गॅरी ट्रुमन

सकाळी १०.३२ वाजताचे कल--

Trend

मराठी कथालेखक's picture

19 May 2016 - 10:36 am | मराठी कथालेखक

सर्व राज्यांचे कल एकाच वेळी (शक्यतो मराठीत) बघण्याकरिता कोणते संकेतस्थळ चांगले ? (मिपाचा हा धागा आहेच म्हणा.. पण तरी.. :)

लोकसत्ता: आपोआप उप्देत् पण होतंय.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 10:38 am | गॅरी ट्रुमन

आसामात भाजपने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या क्षणी भाजप आघाडी ७१ जागांवर पुढे आहे. केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल मुख्यमंत्री होणार हे नक्की झाले आहे. हे मुळचे आसाम गण परिषदेचे नेते होते. बांगलादेशी घुसखोरांविरूध्दच्या आंदोलनातून जन्माला आलेला हा आसाम गण परिषद पक्ष आहे. NDTV वर बोलताना सोनोवाल यांनीही बांगलादेशी घुसखोरांविरूध्द भूमिका मांडली. त्या भूमिकेवर त्यांनी कायम राहावे ही अपेक्षा.

आणि हो जर एका एक वर्षात धर्मनिरपेक्ष बुबुडाविपुमाविंनी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केजरीवाल आणि आआप समर्थकांनी सोनोवाल यांच्यावर टिका करायला सुरवात केली नाही तर सोनोवाल काहीही करू शकलेले नाहीत हेच अनुमान मी काढेन. मी स्वत: कुठल्याही नेत्याविषयीची भूमिका ठरविताना धर्मनिरपेक्ष बुबुडाविपुमावि टिका करत आहेत की नाही हा एक महत्वाचा घटक मानतो.

आबा's picture

19 May 2016 - 10:52 am | आबा

आसामवासीयांना सहानुभूति

का ब्वॉ?
आमची तर तमीळींना.

चालायचंच, आपलं आपलं मत..

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 11:58 am | बोका-ए-आझम

मनातल्या मनात दोन मिनिटं मौन पाळून.

मुक्त विहारि's picture

19 May 2016 - 12:02 pm | मुक्त विहारि

१. मुग्धा गोडे आपल्या कोण?

२. हितेश भाऊ कसे आहेत?

३. नाना नेफळे आजकाल काय करतात?

४. माईंना नानांशिवाय करमते का?

५. उद्दाम आणि सचिन, अजूनही आंतरजालावर आहेत का?

६. तुम्ही पण तिसर्‍या मुंबईत हितेशभाऊंच्या बरोबर रहायला जाणार का?

आणि

७. अज्जून आपले इथे किती नातेवाईक आहेत?

=================================================

काही प्रश्र्न अज्जून पण ते मिपाकरांना....................

अ) ७-७ वर्षे झोपलेले आय.डी. अचानक कसे जागे होतात?

आ) ते नेमके काही ठराविक धाग्यांवरच प्रतिसाद द्यायला आणि तीच तीच ठराविक विचारसरणी घेवून का येतात?

आबा's picture

19 May 2016 - 3:25 pm | आबा

:)
अवघड आहे

अनुप ढेरे's picture

19 May 2016 - 3:44 pm | अनुप ढेरे

+१

मिहिर's picture

20 May 2016 - 3:20 am | मिहिर

एक आपल्याला न पटणारा/आवडणारा प्रतिसाद दिला की थेट नाना, माई, हितेश वगैरेंचा डु-आयडी? असो. आता मलापण डुआयडी म्हणतील ‌वाटतं!

ते तेव्हढ्यावरून ठरत नाही. प्रतिसाद लिहुण्याची पद्धत, पॅटर्न, मुद्द्यांची निवड वगैरे असे बरेच निकष असतात.

आबा's picture

20 May 2016 - 10:43 am | आबा

Ay, That's remarkable Holmes! :)

कपिलमुनी's picture

20 May 2016 - 11:03 am | कपिलमुनी

काही आयडी लाडके असतात, त्यांचा ट्रोलींग चालता

आबा's picture

20 May 2016 - 11:35 am | आबा

पण मी ट्रोलींग करत नव्हतो
माझं खरंच तसं मत आहे आसाम बद्दल

अनुप ढेरे's picture

20 May 2016 - 11:36 am | अनुप ढेरे

हेच बोल्तो. आणि इथेतर ट्रोलिंग अजिबात नाही दिसलं. केवळ विरोधी मत दिसलं.

कपिलमुनी's picture

20 May 2016 - 2:25 pm | कपिलमुनी

विरोधी मत दिसला की त्याला डुआयडी ठरवून प्रतिसाद देण्याबद्दल लिहीला आहे.

बोका-ए-आझम's picture

20 May 2016 - 7:58 pm | बोका-ए-आझम

तुम्ही, सोन्याबापू, संदीप डांगे, बाळ सप्रे - अनेकांनी विरोधी प्रतिसाद दिलेले आहेत. तुम्हाला कधी कुणी डू आयडी वगैरे म्हटलंय कधी? जे डू आयडी आहेत त्यांनाच डू आयडी म्हटलं जातं.

आबांच्या मूळ प्रतिसादात नक्की काय ट्रॉलिंग दिसलं?

आबा's picture

21 May 2016 - 9:57 am | आबा

काही अबजेक्टीव पुरावा आहे, की अश्याच हवेत गोळ्या?!
स्वतः बाळोत्यात असलेल्या आयडीना दुसर्याची लिजीटमसी काढताना पाहून मजा येतेय :)

अवांतर: मिपा वरचं वातावरण या पातळीला आनण्यात श्रीगुरूजी या आयडीचा मोठा वाटा आहे (असं माझं निरीक्षण आहे)

मुक्त विहारि's picture

21 May 2016 - 10:00 am | मुक्त विहारि

"मिपा वरचं वातावरण या पातळीला आणण्यात "डू-आयडींचा" मोठा वाटा आहे. (असे माझे ठाम मत आहे.)

इरसाल's picture

21 May 2016 - 5:27 pm | इरसाल

म्हणजे तुम्हाला, मला (उर्फ डु-आयडी) असे म्हणायचेय ना मुवि.
माझे एक्सेलशीट हरवलेहो नायतर तुम्हाला दाखवले असते मी..........

हो नाही तर काय?

तू, सूड आणि झालंच तर जेपी, तुम्ही सगळे एका माळेचे मणी.

कधी कुणाचे धोतर फेडून जाल, काही सांगता येणार नाही.....

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 10:04 am | नाईकांचा बहिर्जी

10000% सहमत! श्रीगुरुजी ह्या आयडीने जाहिर मी अन ते कुठले कोण चंद्रनील मुल्हेरकर एकच आहोत असे ठोकुन दिले होते! त्यांची संबंधितांकडे तक्रार करुन सुद्धा काहीच निवाडा झाला नाही, मुल्हेरकर स्वतः एक ट्रोल आयडी होता अन तो उडाला त्यात काही विशेष नाही पण विशेष हे वाटते की श्रीगुरुजी सर्रास इतर आयडीवर कॉमेंट्स मधुन चिखलफेक करताना दाखवून दिल्या नंतर सुद्धा त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. असो!

बोका-ए-आझम's picture

21 May 2016 - 5:44 pm | बोका-ए-आझम

त्यांनी चंद्रनील मुल्हेरकर आणि पिंपळगावचा पिराजी हे नाव घेतलं होतं. तुमचं नाव घेतलेलं नाही. हवंतर चेकवू शकता. बाकी आबांनी आपण डू आयडी नाही याचा पुरावा दिलाय का?

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 5:59 pm | नाईकांचा बहिर्जी

पिंपळगावचा पिराजी मीच होतो सर, ह्या असल्या दळभद्री कॉमेंट अन टिका पाहून "मैत्री नको टिका आवर" नियम लावला अन प्रशांतजी ह्यांना वैयक्तिक निरोप करुन आयडी बदलून घेतला मी! शिवाय माझा आयडी बदलल्याबद्दल ज्या धाग्यावर (विन्स्टन चर्चिल) ह्या श्रीगुरुजीने माझ्यावर वहीम घेतला तिथे स्पष्टीकरण सुद्धा टाकले होते की बुआ असो पुढे गैरसमज नको म्हणून आयडी बदलून घेतो आहे, ह्यांच्याकडे दखल घेण्या इतपतही सौजन्य नाही अन त्याची कंपुवाली मित्रमंडळी इथे येऊन आमचीच तासते आहे.
इतकेच काय तर माझं मुळ नाव शिक्षण वगैरे इंट्रो टाइप मी खरड़फळा इथेही टाकले होते! त्यावरही काही सन्माननीय सदस्यांनी मला डू आयडी समजून "बाळ चार दिवसांचं आहे" "गाठोडे वळले तरी हात बाहेर काढतंय" वगैरे म्हणले होते!. असो.

आयडी बदलल्या बद्दल प्रशांतजी ह्यांना विचारू शकता आपण साक्ष म्हणून "वैयक्तिक निरोप उघड्या फोरम वर" पेस्ट करणे तितकेसे रुचत नाही म्हणून म्हणतो आहे

बोका-ए-आझम's picture

21 May 2016 - 6:05 pm | बोका-ए-आझम

तसं असेल तर मला हे माहित नव्हतं. क्षमस्व.

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 6:19 pm | नाईकांचा बहिर्जी

तुम्ही नका राव सॉरी वगैरे म्हणू कृपया! तुमची काहीच चुक नाही :/ :( _/\_

अनुप ढेरे's picture

21 May 2016 - 10:40 am | अनुप ढेरे

मिपा वरचं वातावरण या पातळीला आनण्यात श्रीगुरूजी या आयडीचा मोठा वाटा आहे

+१

मुक्त विहारि's picture

21 May 2016 - 4:32 pm | मुक्त विहारि

थोडक्यात काय तर तुमचा (आबा, बहिर्जी आणि अनूप) राग, श्रीगुरुजी ह्यांच्यावर आहे तर....

असो,

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 5:33 pm | नाईकांचा बहिर्जी

होय माझा स्पष्ट राग आहेच अन त्याला कारण त्यांचे धागे किंवा विचार नाहीत कारण मुळात मी तितके वाचलेले नाहीत श्रीगुरुजी, फ़क्त ज्याची आपली जालीय किंवा वैयक्तिक ओळख नाही अश्या माणसाने एखादा वेगळा अन विरोधी विचार दिल्यास किंवा त्याचे आयडी साधर्म्य एखाद्या जुन्या ट्रोल आयडी सोबत असणे ह्या सुतावरुन त्या मेंबरची जाहिर बदनामी करणाऱ्या कॉमेंट्स करत्या माणसाची एकंदरित काय लायकी असेल ते लक्षात येते!

ह्या कारणांमुळे माझा हे कोण श्रीगुरुजी आहेत त्यांच्यावर राग आहे! बाकीच्या मंडळीचं मला माहीती नाही अन माहीती करुन घ्यायची इच्छा ही नाही , माझा श्रीगुरुजींवर राग असल्यामुळे त्यांच्या कंपुतल्या कोणाला माझा राग दुस्वास वगैरे करायचा असल्यास करोत मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही.

अनुप ढेरे's picture

21 May 2016 - 5:34 pm | अनुप ढेरे

मुवि, माझा तरी आक्षेप इथे तुमच्या वरच्या प्रतिसादावर होता. केवळ आबांना भाजपाच विजय आवडला नाही म्हणून डायरेक ते डुआयडी त्या ग्रेटथिंकरचे? श्रीगुरुजी देखील हे असे आरोप खूप वेळेला करत असतात त्या माईसाहेब आयडीलापण असच उगा श्या घातल्या लोकांनी.

बोका-ए-आझम's picture

21 May 2016 - 5:51 pm | बोका-ए-आझम

याचा पुरावा आहे का? बाकी आबांच्या एका फालतू comment मुळे हे सगळं घडलं त्यामुळे मिपावर हे वातावरण झालंय त्याला तेच जबाबदार आहेत. त्यांना भाजपचा विजय सहन होत नाही तर त्यांनी सरळ ऐसी किंवा अन्य डाव्या संस्थळावर आपला राग काढावा नाहीतर इथे दुसरा धागा आढून त्यावर मनसोक्त रडावे. माझा तरी पाठिंबा श्रीगुरुजींना आहे. आता होऊनच जाऊ दे.

मग....भले त्यांचे राजकीय विचार मला पटोत अथवा न पटोत किंवा त्यांचे आय.पी.एल.वरचे धागे मला पटोत किंवा न पटोत.

श्रीगुरुजी विचारांना विरोध करतात आणि बर्‍याचवेळा त्यांच्या विचारसरणीला अनुसरून लिंका पण देतात.

व्यक्ती-विरोधापेक्षा विचारांमध्ये भेद असणे, हे कधी पण योग्यच.

व्यक्ती विरोध किंवा व्यक्ती-स्तोम वाईटच.

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 6:35 pm | नाईकांचा बहिर्जी

श्रीगुरुजी विचारांना विरोध करतात आणि बर्‍याचवेळा त्यांच्या विचारसरणीला अनुसरून लिंका पण देतात.

अहो असतील तुमचे जवळचे म्हणून इतके फेकु नका हो सर!! विचारसरणीचा एक मुद्दा दिला ते ही बीजेपी काँग्रेस वगैरे विषय नाही तर विन्स्टन चर्चिल विषयावर तर विचारावर न बोलता तुमचे हे मित्रवर्य थेट आमच्या आयडीवर घसरले होते! किती पट्टया बांधणार अजुन डोळ्यावर!

हेच आपल्याला पण लागू होतेच...

आणि निव्वळ एखादा आय.डी. न आवडणे हे पण त्याचेच उदाहरण...

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 8:55 pm | नाईकांचा बहिर्जी

ऑ!!! ओ सर मी काही मिपावर "तिथे किनै एक श्रीगुरुजी आयडी आहे मी किनै गड़े त्याचा द्वेषच करेल" असं ठरवून आलो नव्हतो हो! सुरुवात कोणी केली हे न पाहताच आपण असा बेछुट गोळीबार करू नयेत ही विनंती. माझा अगोदरचा आयडी ह्याचे उच्चार अन नाम साधर्म्य दुसऱ्या कोण्या टवाळ आयडीशी असल्यामुळे मला खुशाल ट्रोल आयडी म्हणाले तुमचा गुरूजी त्याच्याकडे दुर्लक्ष? हद्द आहे राव कंपुबाजीची!!एक नवा सदस्य येतो त्याची रेवड़ी उड़वा ragging घ्या वाटल्यास गमतीचा भाग म्हणून! बाकी काथ्याकुट असला तर तुम्ही म्हणता तसा विचारांना विचारांनी बोला ना उगाच थेट आयडीवर कश्याला घसरतात तुमचे परममित्र! काहीही उग्गाच्!!

आबा's picture

21 May 2016 - 6:53 pm | आबा

:D :D

आबा's picture

21 May 2016 - 6:50 pm | आबा

फक्त कमेंटला फालतू म्हणाला असतात, तर विषय वाढलाच नसता...
"मी कोणाचा आयडी आहे" वगैरे फालतू धुणी धूत बसलात त्यामुळे मी पुढची प्रतिक्रिया दिली

तुमची पुढची आदळआपट सुद्धा अडोरेबल आहे... ऊदा.

त्यांना भाजपचा विजय सहन होत नाही तर त्यांनी सरळ ऐसी किंवा अन्य डाव्या संस्थळावर आपला राग काढावा नाहीतर इथे दुसरा धागा आढून त्यावर मनसोक्त रडावे...

का? या धाग्यावर अँटीभाजपा प्रतिक्रियांना बंदी आहे का?! आणि
5 राज्यापैकी 4 राज्यातल्या नागरिकांना भाजपा सहन* झालं नाही, असं निकाल सांगतायत, तेव्हा माझी प्रतिक्रिया काही फार वेगळी नाहीये.

*हा तुमचाच शब्द

मी मोठा आहेच. तुम्ही सांगण्याची गरज वाटत नाही. ट्रोलभैरवांकडून काही ऐकण्याची वेळ आणि गरज अजिबात आलेली नाही. अाणि मिपावर भाजपविरोधी प्रतिक्रियांना बंदी अजिबात नाही पण भाजपविरोधी प्रतिक्रियेच्या विरोधी प्रतिक्रिया तुम्हाला सहन होत नाहीत हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.
नीलमोहर यांच्या रवींद्र पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूवर असलेल्या धाग्यावर पण तुम्ही - ' इथे हजारो लोकांची organized हत्या करणाऱ्यांना पण fan following असतं ' अशी comment दिलेली आहे. त्यानंतरही तुम्ही आपण ट्रोल नाही आणि श्रीगुरुजींनी मिपावरचं वातावरण बिघडवलं असं म्हणताय. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.
आणि दुसरी गोष्ट - इथे आसामींना सहानुभूती असली comment तुम्ही पहिल्यांदा टाकलीय. त्याला विरोध झालेला तुम्हालाच सहन होत नाहीये त्यामुळे हे पुढचे सगळे प्रकार झालेले आहेत. अाणि तुम्ही जर डू आयडी नाही आहात तर सिद्ध करा.
यावरचं तुमचं उत्तर पण मी सांगतो - मला असं करायची गरज वाटत नाही वगैरे वगैरे. त्यावरुन खरं काय ते कळतंच.
त्यामुळे तुम्ही आधी तुमचे डोळे उघडून आजूबाजूचं जग पहा. मग इतरांना मोठे व्हा असं सांगा.
बाकी ५ पैकी ४ राज्यांत भाजपची मतं वाढली आहेत आणि केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत खातं उघडलेलं आहे हे सांगू इच्छितो.
७ वर्षांनी तुम्हाला एवढा trp मिळवून दिल्याबद्दल खरं तर तुम्ही गुरुजींचे आभार मानले पाहिजेत पण तेवढे manners तुमच्यात असतील असं वाटत नाही.

आबा's picture

21 May 2016 - 8:01 pm | आबा

खेडूत यांना दिलेली प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला विरोध सहन होतो की नाही ते कळेल, आणि manners ही कळतील...

रविंद्र पाटलांच्या धाग्यावरील प्रतिक्रियेत काय चुकीचं आहे?! काय पार्टी वगैरे दीली होती का मी?!

आणि trp? :D
हिलेरीयस :D :D
यासाठी येता की काय मिपा वर?
काय उपयोग?! काय पगार बिगार वाढणार आहे की काय त्यामुळे?!
इथल्या चार-दोन प्रतिक्रियांना जर trp समजत असाल तर शुभेच्छा;
तुमच्या धाग्यावर प्रतिक्रिया देत जाईन :D :D

आता एक though experiment: एखादा आयडी (समजा श्रीगुरूजी) हा तुमचा आयडी नाही; हे कसं सिद्ध कराल?! :)
पांचटपणा च्यायला

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 8:18 pm | नाईकांचा बहिर्जी

:D :D :D :D च्यायला राहावले नाही हो आबा तुमची खंगरी कॉमेंट वाचुन! तसंही इथल्या कंपुशाहीचा मुकुटमणी असलेल्या खरड़फळा नामक पेज थ्री वर तुम्ही आम्ही अन ढेरे "त्रिकुट" असल्याचे जाहिर झालेच आहे! हे आम्हाला नवेच आहे बरंका! आमचा पाठिंबा आबांना! मुद्द्याला मुद्दा देतात म्हणे गुरूजी ! मग त्यांचे पाठीराखे (मिसळपावचे मालक संपादक कोणीही नसताना सुद्धा) अमुक "डाव्या" साईट वर जावा वगैरे फतवे कसे काढू शकतात किंवा आयडीची मापे कशी काढू शकतात बुआ!? हा तर्क आहे? असलाच तर आम्ही अतार्किक बरे! तरी बरं खुद्द गुरुजींनी आमच्याच आयडी विरुद्ध केलेला शिमगा उदाहरण म्हणून दिलाय !

मजा मजा आहे बुआ!! :D

@बोका सर, काय सर तुम्ही तरी भावनिक आंदोलने असलेल्या कॉमेंट्स देणार नाही असे वाटले होते बघा! , आमचे हे असे आहे जे पटले त्यासाठी तुमचे शिष्यत्व पत्करु हात बांधून जिथे शंका असेल तिथे प्रश्न विचारुन भंडावोन सोडु, नथिंग पर्सनल ! :)

बोका-ए-आझम's picture

21 May 2016 - 9:29 pm | बोका-ए-आझम

आबांनी ऐसीवर जावे असा 'फतवा' वगैरे काढलेला नाहीये. तेवढे ते महत्वाचे नाहीत हो. अाणि तो ऐसीचा अपमानच होईल. He is not at all important. पण कसं आहे, ट्रोलांना ठोकणे ही आमची जुनी सवय आहे. आदतसे मजबूर!

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 9:40 pm | नाईकांचा बहिर्जी

ते ठीके हो सर! फ़क्त नेमके ट्रोल ठोका ही विनंती करतोय! नाही आमची पाठ अजुन हुळहुळती आहे :D :D असो!

तर्राट जोकर's picture

21 May 2016 - 9:33 pm | तर्राट जोकर

=)) सहि जा रहे हो... दोनो तिनो... ;)

बोका-ए-आझम's picture

21 May 2016 - 9:38 pm | बोका-ए-आझम

जय खरडवहीसम्राट!

तर्राट जोकर's picture

21 May 2016 - 10:04 pm | तर्राट जोकर

काय भाऊ, लै डोळ्यासमोर येते आहे का ती खरड? तुमच्याकडे अजून काय नाय काय? एवढ्याशा बारुदवर तेही फुसक्या लै टिकाव नै लागायचा. माझ्यावर मुद्दाहिन टिका करणार्‍या सर्वांसाठी आहे ती खरड. काही लोकांच्या छुप्या हिंस्र स्वभावापेक्षा थेट बोलणं आवडतं आपल्याला. त्याचीच आयडेन्टीटी आहे ती खरड. समझ लो जो समझना है.

तुमचं ट्रोलींग कधी थांबेल याची मालकांकडे चौकशी केली होती. उत्तर आले नाही. तुमच्यासाठी खास नियम दिसत आहेत मिपाचे. बाय द वे, मला विचारण्यापेक्षा, संपादक/मालकांनाच खरडवहीचे संदर्भ मेनबोर्डावर देऊ की नको ह्याबद्द;ल काअही नियम आहेत का हे विचारायला हवे होते.

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 8:35 am | बोका-ए-आझम

तर त्या खरडीचा दुवा दिल्यावर ' हे मिपाच्या धोरणांत बसत नाही, दुस-याची खरडवही कशी काय जाहीर करु शकता - असले अस्तित्वात नसलेले नियम सांगायला का आला होतात? वर परत ' मला त्या खरडीबद्दल काहीही चुकीचं वाटत नाही ' असं तुम्ही म्हणालात आणि त्यावर खरडफळ्यावर सगळ्यांनी तुमची बिनपाण्याने केली - त्याला फार दिवस झालेले नाहीत.
आणि माझ्याकरता काही खास नियम वगैरे नाहीत. पण एवढ्या घाणेरड्या भाषेत लिहून तुम्ही अजूनही आहात म्हणजे तुमच्यासाठी खास संपादकीय धोरण दिसतंय हे काय आम्हाला कळत नाही?
रच्याकने मी तुम्हाला खरडवहीसम्राट म्हटल्यावर तुम्हाला तीच खरड आठवते यावरून तुमच्या मनात त्याबद्दल अजूनही खुपतंय हे तर कळतंच. मी कोणती खरड, काय खरड हे काहीही लिहिलेलं नसताना तुम्हाला अगदी अचूक समजतं कोणती खरड ते. तुमची ही केविलवाणी अवस्था बघून फार काही नाही,कीव वाटते. वर परत मला त्याबद्दल काही वाटत नाही वगैरे उसनं अवसान! छे! कुठे ते विठांना अध्यात्मावरुन आवाज देणारे तजो आणि कुठे हे तजो! बराच फरक आहे हो! यावरून काही शंका यायला लागलेल्या आहेत एवढं नक्कीच सांगू इच्छितो.

तर्राट जोकर's picture

22 May 2016 - 9:38 pm | तर्राट जोकर

मी मिपावर असल्याचं ठसठसतंय होय... उगी उगी.
लोक तुम्हाला मोठे व्हा उगाच म्हणत नाहीयेत.

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 9:51 pm | बोका-ए-आझम

तुम्ही आणि आम्ही या जगात आहोतच की. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे थोड्याच होतात? तुम्ही काय आहात, तुमची पातळी काय आहे, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता हे आता प्रत्येकाला कळलेलं आहेच. त्यामुळे यापुढे लोक्स जे काय निष्कर्ष काढायचे ते काढतील. बाकी मिपावर मी किंवा तुम्ही असल्याने किंवा नसल्याने मिपाला काहीही फरक पडत नाही. आपल्याआधीही ते सुशेगाद चालू होतं, आपल्यानंतरही चालू राहील. काळजी करु नये. बरं, तुमची लोक ही व्याख्या स्वतः पाळण्यात असलेल्यांपुरतीच मर्यादित आहे हे बघून मजा वाटली. तुम्हाला मात्र कुणीही काहीही सांगत नाही. उपयोग होणार नाही हे माहित आहे ना सगळ्यांना.

तर्राट जोकर's picture

22 May 2016 - 9:56 pm | तर्राट जोकर

सगळे म्हणजे कोण? सगळ्यांनी आपले मुखत्यारपत्र तुम्हालाच दिले आहे जणू...

तुम्हाला पगार म्हणजे काय असतं हे माहित आहे हे बघून आनंद झाला. देशात बेकारीची परिस्थिती इतकी काही वाईट नाहीये तर. आणि समजा मी श्रीगुरुजींचा डू आयडी आहे. तर काय कराल हो? हिंमत तुमची काही करायची. मतांच्या पिंका टाकून भिंत लाल करणे याशिवाय दुसरं काही विधायक कार्य केलंत तर पगार वाढेल कदाचित. बघा, जमतंय का.
चला, अजून trp वाढवला तुमचा.

आबा's picture

21 May 2016 - 11:40 pm | आबा

:D

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 9:45 pm | नाईकांचा बहिर्जी

बाकी आबांच्या एका फालतू comment मुळे हे सगळं घडलं

अहो फालतू सगळ्यांना वाटेल असे नाही ना! हे म्हणजे त्या छपरी यूपी बिहारच्या भैया लोकांसारखे झाले! 'हमरे इहां छठ पूजा होता है जिधर नहीं होता ऊ हिंदुए नाहीये'

आता होऊनच जाऊ दे.

ह्याने नेमके काय साधले / साधते??

तर्राट जोकर's picture

21 May 2016 - 10:09 pm | तर्राट जोकर

जे जे मोदी भाजप विरोधक ते सर्व ट्रोल असे समजणार्‍यांच्या काय नादी लागता बहिर्जी? कंपुबाजी करणारे एकट्या दुकट्या सदस्यांवर तुटून पडतात हिंस्र श्वापदांसारखे. ह्याला हे सभ्य लोकांचे सुसंस्कृत स्थळ म्हणतात.

जोकर तर आम्ही आहोत, पण मनोरंजन हेच चांगलं करतायत. आनंद उठाओ. आम्ही बसलोय बाल्कनीत, शेम्पेन घेऊन. =))

नाईकांचा बहिर्जी's picture

23 May 2016 - 6:46 am | नाईकांचा बहिर्जी

तर्राट सर, मी मोदींचा द्वेष्टा तर अजिबात नाही अन अंधसमर्थक सुद्धा नाही , तसे पाहता थोड़ा पंखा असेल त्यांच्या कार्याचा. माझा मुद्दा आहे नव्या आयडीचा मानसिक छल करणे त्यात मोदी नॉन मोदी वगैरे विषय नाहीच मोठमोठे प्रश्न साधे होते (अन अजुनही अनुत्तरीत आहेत)

1 माझी साधी तोंड ओळख नसताना सुद्धा माझ्या आयडीवर घसरायचा तो कोण श्रीगुरुजी आहे त्याला काय हक्क?

2 बरं इतकं करूनही त्याचे काही पाठीराखे येऊन गुरूजी मुद्दे धरून बोलतात वगैरे म्हणत मलाच झोड़पायचा क्षीण प्रयत्न का करतात??

3 संपादक मंडळ झोपलेले आहे का??

4"एकमेकांची पाठ खाजवु मिपा गेले खड्डयात" सारखी मानसिकता असलेले लोकं खरड़फळ्याला वैयक्तिक पेज थ्री सारखे कुठल्या हक्काने ट्रीट करू शकतात?

जितपत मला आठवते साहेब आपणही तिकडेच (खरड़फळ्यावर) माझ्या आयडीवर घसरला होतात ! असो.

बाकी ज्या माणसाने असे विचित्र आयडी घेऊन, ते सुद्धा ओळीने असे आयडे घेऊन ट्रोलिंग करणार्‍या आयडीबद्दल कोणीच का बोलत नाही?
जर एखाद्या आयडी ने कोणता पॅटर्न बनवला, तर मग तो पॅटर्न वापरणार्‍या आयडी वर डुआयडे असल्याचा संशय निर्माण होणारच की. जसे मी वर आबा या आयडी च्या पोस्ट वर म्हणले - की प्रतिक्रियेत सुरूवातीला "." टाकणे, उगाच काड्या सारणे या गोष्टी काही डुआयडींची सिग्नेचर झालेल्या आहेत. त्यामुळे त्यात बसलात डुआयडी असल्याचा संशय आम्ही घेणारच.

तुम्ही ज्या श्रीगुरुजी या आयडी बद्दल बोलत आहात त्या आयडी ला "मी डु आयडी नाही" असे स्पष्ट सांगितलेत काय? जर सांगितलेत तर त्यांची प्रतिक्रिया काय होती? व्यक्तिगत संदेशांमध्येतरी तुमचे अस्सल असणे सिद्ध करण्याची तयारी आहे का? ते सांगितल्यावरदेखील त्यांनी तुमचे चारित्र्य हनन चालूच ठेवले का? जर ठेवले नसेल तर आत्ता तुम्ही त्यांचे चारित्र्यहनन कश्याच्या आधारावर करत आहात? जर श्रीगुरुजी या आयडीने तुम्हाला नानासाहेब या आयडीचा डुआयडी म्हणले तर नानासाहेब या आयडीने ते नाकारले का? मग तुमचे अस्सलपण कश्याच्या आधारावर सिद्ध होणार?

दुसरी गोष्ट म्हणजे इतरत्र ग्रेट्थिंकर या नावाने वावरणारा आयडी अजूनदेखील मिपावर डुआयडी काढून काड्या सारत असतो हे बर्‍याच वेळेस सिद्ध झाले आहे. त्यामुळे मिपावर त्याच्या पॅटर्नमध्ये बसणारा कोणताही आयडी डुआयडी असण्याची शंका येणे अत्यंत साहजिक आहे. आणि आम्ही ती घेणारच. त्यामुळे आपल्याला सिद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे हे लक्षात घ्या, एव्हडेच नव्हे तर इथे बर्‍याच आयडींनी अशी (अग्नि)परीक्षा दिलेली आहे. गॅरी ट्रुमन आणि गॅरी शोमन या नावावरून झालेल्या वादाला अजून वर्ष देखील झालेले नाही. जेपी या आयडीने देखील कुठेतरी या प्रसंगाला तोंड दिलेले आहे असे पाहिलेले आहे.

असो. तात्पर्य - आपण कसे वागायचे हे आपण ठरवा, तुमचे जर कोणत्या आयडीशी साधर्म्य दिसून आले तर आम्ही प्रश्न विचारणार, त्याची सवय करून घ्या.

जाता जाता - मध्यंतरी माईसाहेब याअ आयडीच्या वयाचा आणि व्रुद्धपणाचा विषय कोणीतरी काढला होता, मला प्रश्न असा पडला आहे की हा वयोव्रुद्ध स्त्री आयडी अनाहितामध्ये होता का? नसेल तर गिरिजा या आयडीने यावरूनच काय सोसले ते बघा आणि मग आरोप करायला या.

कपिलमुनी's picture

24 May 2016 - 12:21 am | कपिलमुनी

प्रश्न विचारणे आणि आरोप करणे यात फरक आहे.
पण काविळ झाली की जग पिवळा दिसता

नाईकांचा बहिर्जी's picture

24 May 2016 - 7:32 am | नाईकांचा बहिर्जी

बाकी ज्या माणसाने असे विचित्र आयडी घेऊन, ते सुद्धा ओळीने असे आयडे घेऊन ट्रोलिंग करणार्‍या आयडीबद्दल कोणीच का बोलत नाही?

मी का अखिल मिपा ठेकेदारी करू म्हणता हो तुम्ही? मला कोणासंबंधी प्रश्न पडावे हे पण आपण ठरवणार का काय आता??

उगाच काड्या सारणे या गोष्टी काही डुआयडींची सिग्नेचर झालेल्या आहेत. त्यामुळे त्यात बसलात डुआयडी असल्याचा संशय आम्ही घेणारच.

अहो एक काय लाख शंका घ्या , फ़क्त "शंका घेणे" अन "ठाम प्रतिपादन" करणे ह्यातला फरक समजून घ्या असे म्हणतो बुआ, तुमच्या त्या श्रीगुरूजी ने शंका घेतली नव्हती नुसती तर दणक्यात "मुल्हेरकर बरोबरच पिराजी" हे दामटले होते! काय वाटेल ते बोलणार तो अन ते चुक आहे हे मी का सिद्ध करत रहावे म्हणे!?

तुम्ही ज्या श्रीगुरुजी या आयडी बद्दल बोलत आहात त्या आयडी ला "मी डु आयडी नाही" असे स्पष्ट सांगितलेत काय? जर सांगितलेत तर त्यांची प्रतिक्रिया काय होती? व्यक्तिगत संदेशांमध्येतरी तुमचे अस्सल असणे सिद्ध करण्याची तयारी आहे का? ते सांगितल्यावरदेखील त्यांनी तुमचे चारित्र्य हनन चालूच ठेवले का? जर ठेवले नसेल तर आत्ता तुम्ही त्यांचे चारित्र्यहनन कश्याच्या आधारावर करत आहात? जर श्रीगुरुजी या आयडीने तुम्हाला नानासाहेब या आयडीचा डुआयडी म्हणले तर नानासाहेब या आयडीने ते नाकारले का? मग तुमचे अस्सलपण कश्याच्या आधारावर सिद्ध होणार?

सर तुम्ही एकतर नेमके हवे तेवढे वाचता किंवा अजिबातच काही वाचत नाही का?? तरी एकदा उत्तर देतो, ते म्हणजे होय मी डू आयडी नाही हे मी गुरुजीला स्पष्ट बोललो होतो , गुरूजी ने माझ्यावर डू आयडीचा आळ घेतला तेव्हा मी समन्वयवादी भूमिका घेत प्रशांत जी ह्यांना व्यनि करुन आयडी बदलून घेतला माझा, पिंपळगावचा पिराजीचा - नाईकांचा बहिर्जी असा ती बदल होता, त्या बदला बद्दल जिथे गुरूजी न माझ्यावर प्रथम आळ घेतला त्या विन्स्टन चर्चिल नामे धाग्यावर मी स्पष्टीकरण सुद्धा दिले, त्यावर एक ओळीची पोच देण्याचे सुद्धा सौजन्य नाही ह्या गुरुजीला ते एक असो, इतके सगळे करुनही संघाच्या थ्रेड वर हाच आयडी परत एकदा मी अन मुल्हेरकर एकच असल्याचे भेकु लागला अजुन काय स्पष्टीकरण हवंय म्हणे?? व्यक्तिगत संदेशात माझे अस्सल असणे सिद्ध करण्याबाबत मी इतकेच म्हणतो की तुम्ही किंवा तुमचा तो गुरुजी कोण आहात कोण हो माझे अटेस्टेशन करणारे? तुम्ही संपादक आहात का मिपामालक आहात? Who the hell are you so that I have to entertain your all whims instantly? Beat it! U r not so important. नानासाहेब हा आयडी डू आहे हे जाहिर आहे ज्याचे कामच trolling आहे तो दुसऱ्या आयडीची साक्ष देऊन मॅटर क्लोज करेल का आपल्या विकृत स्वभावाला अनुसरुन मजा पाहात बसेल हे तुम्हीच ठरवा, जर बॅलन्स विचार करता येणे अजुन जमत असेल तर!!, माझे अस्सलपण सिद्ध करणे कठीणच आहे हो कारण मी सभासदत्व घेतल्या घेतल्या इमानेइतबारे तुमच्यात्या खरड़फळा नामक पेज 3 वर खऱ्या नावासहित इंट्रो टाकला होता त्याचीही रेवड़ी उडवली होती की ह्या तर्राट जोकर अन अजुन एक स्त्री सदस्या आहेत त्यांनी ! तुम्हाला आठवते का श्रीगुरुजीचं मुळ खरे नाव? टाकले आहे का त्यांनी ते मिपावर नसेल टाकल्यास त्यांचे अस्सलपण त्यांनी सुद्धा सिद्ध करायला नको का? की बस तुमच्या कंपुतले आहेत म्हणून सुट अन नवखे मेंबर सापडले तावडीत का द्या दणके हे धोरण आहे तुमचेही त्या मुक्तविहारींसारखे?? आता मागाल का गुरुजीला खरे पणाची साक्ष?? म्हणाल का त्याला की त्याचे खरेपण सिद्धकरायची जबाबदारी त्याचीच आहे म्हणून??

दुसरी गोष्ट म्हणजे इतरत्र ग्रेट्थिंकर या नावाने वावरणारा आयडी अजूनदेखील मिपावर डुआयडी काढून काड्या सारत असतो हे बर्‍याच वेळेस सिद्ध झाले आहे. त्यामुळे मिपावर त्याच्या पॅटर्नमध्ये बसणारा कोणताही आयडी डुआयडी असण्याची शंका येणे अत्यंत साहजिक आहे. आणि आम्ही ती घेणारच. त्यामुळे आपल्याला सिद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे हे लक्षात घ्या, एव्हडेच नव्हे तर इथे बर्‍याच आयडींनी अशी (अग्नि)परीक्षा दिलेली आहे. गॅरी ट्रुमन आणि गॅरी शोमन या नावावरून झालेल्या वादाला अजून वर्ष देखील झालेले नाही. जेपी या आयडीने देखील कुठेतरी या प्रसंगाला तोंड दिलेले आहे असे पाहिलेले आहे.

तुमचे कुठल्या आयडी सोबत वाजले आहे किंवा कोण काड्या सारतो हे लक्षात ठेवणे नव्या सभासदत्व घेणाऱ्या मंडळीला लक्षात ठेवणे गरजेचे आहे काय? कोण ते गॅरी ट्रूमन अन जेपी ह्याना विचारले कोणी ओरिजिनल का डू त्याच्याशी माझे काय घेणे देणे आहे म्हणे?? मी ओरिजिनल आहे का डू हे मी स्वतःच नीट इंट्रो दिल्यावर सुद्धा त्या गुरूजीला किंवा तुम्हाला कळत नसेल त्याला मी जबाबदार नाही, त्याहुन पुढे तुम्हाला येणाऱ्या सदस्यांची सत्यासत्यता तपसायची जबाबदारी कोणी दिली आहे? कुठल्या हक्काने तुम्ही मला जाब विचारणार हो साहेब?

असो. तात्पर्य - आपण कसे वागायचे हे आपण ठरवा, तुमचे जर कोणत्या आयडीशी साधर्म्य दिसून आले तर आम्ही प्रश्न विचारणार, त्याची सवय करून घ्या.

धमक्या देऊ नका फरक पडणार नाही ! कोणी मला एकांगी टारगेट करत असला तर मी त्याची वाट लावणारच ! मी नीट वागलो होतो सामान्य संकेताप्रमाणे नवीन जागी आल्यावर इंट्रो देतात तसा दिला होता, एका सदस्याला माझ्या आयडीमुळे कंफ्यूजन होते तर मी पड़ती बाजु घेऊन आयडी सुद्धा बदलून घेतला माझा, तरीही त्याचा कंपु येऊन मलाच धमक्या देतोय ह्यावरुन काय ते समजा , परत सांगतो असल्या धमक्या द्यायच्या नाहीत भिक घातली जाणार नाही

जाता जाता - मध्यंतरी माईसाहेब याअ आयडीच्या वयाचा आणि व्रुद्धपणाचा विषय कोणीतरी काढला होता, मला प्रश्न असा पडला आहे की हा वयोव्रुद्ध स्त्री आयडी अनाहितामध्ये होता का? नसेल तर गिरिजा या आयडीने यावरूनच काय सोसले ते बघा आणि मग आरोप करायला या.

पहिले तर हे "त्यांनी काय काय सोसले ते बघा" वाले तूणतूणे आवराच आता तुम्ही , सहन करणारे असतील शांतिसागर मी नाहीये अन त्यांनी सहन केले म्हणून मी करावे हा नियम मिपाच्या धोरणातला नसताना उगाच कंपुबाजी करत धमक्या देत फिरू नका, माझे तुमच्याशी वैर नाही हे ही क्लियर करतो इथेच फ़क्त जर कंपुबाजी करत कोणाच्या चुकीची भलामण करायला येऊ नका कारण मी शांत बसणाऱ्यातला नाही. ते कोण गिरिजा ट्रूमन अन जेपी असतील ते असूद्या त्यांनी सहन केले म्हणून मी सहन करणार नाही

आनन्दा's picture

24 May 2016 - 10:00 am | आनन्दा

मी धमकी देत नाही. मी केवळ इतिहासात काय झाले आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून वर्तमानात काय होणे अपेक्षित असू शकते ते सांगितले. दुसरे म्हणजे मी तुम्हाला संस्थळाची रीत सांगितली. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे -
१. श्रीगुरुजी हे खरे नाव नाही हे तर सार्‍यंनाच माहीत आहे, पण त्या आयडीने डुआयडी काढून ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही हे देखील तेव्हढेच खरे आहे. श्रीगुरुजी या आयडीचे आत्यंतिक भाजपा समर्थन मला देखील पटत नाही, परंतु एक विशिष्ट नावाचा पॅटर्न घेऊन त्याच आयडीला ट्रोल करण्याचा प्रयत्न पूर्वी मिपावर झालेला आहे, त्यामुळे तुम्ही तटस्थपणे विचार केला तर तुम्हाला त्या आयडीचा राग समजून येईल. आणि याच न्यायाने तुम्ही आयडी बदलून तो थांबणार नाही हेदेखील तेव्हढेच सत्य आहे. ते थांबू शकेल केवळ तुम्ही संयम राखून दिलेल्या प्रतिक्रियांमुळे. आणि तुमच्या जालीय वावरातून तुम्ही डुआयडी नाही याचा पॅटर्न तयार झाला की. एकोळी काड्या सारणे ही काही आयडींची खासियत आहे आणि त्याचा त्रास इथे प्रत्येकाने भोगला आहे.

सहन करणारे असतील शांतिसागर मी नाहीये अन त्यांनी सहन केले म्हणून मी करावे हा नियम मिपाच्या धोरणातला नसताना उगाच कंपुबाजी करत धमक्या देत फिरू नका,

मी कुठे तुम्हाला सहन करा म्हणून सांगतोय, पण तुम्ही जर जालावर टोपणनाव घेऊन वावरायला लागलात तर त्याचे प्रतिसाद असे देखील येउ शकतात एव्हढेच सांगत आहे. फुकटचा सल्ला म्हणा हवे तर. लोक तुमच्या टोपणनावापलिकदे जाण्याचा प्रयत्न करणारच, आणि तुम्ही जेव्हढा त्रागा कराल तेव्हढा तुम्हालाच त्रास होईल.

मी का अखिल मिपा ठेकेदारी करू म्हणता हो तुम्ही? मला कोणासंबंधी प्रश्न पडावे हे पण आपण ठरवणार का काय आता??

हा प्रश्न तुम्हाला नव्हता. तुमच्या समर्थनासाठी जे आयडी पुढे सरसावले होते त्यांच्यासाठी होता. त्यांना इतिहास माहीत आहे तर त्यांनी वास्तववादी भूमिका घेतली पाहिजे.

Who the hell are you so that I have to entertain your all whims instantly? Beat it! U r not so important.

महत्व तुम्हीच देत आहात. एखाद्या जुन्या आणि सर्वांना माहीत असलेल्या आयडीबद्दल जाहीरपणे असहिष्णुतेचे आरोप करताना त्या आयडीबरोबर तुमचे सामोपचाराचे प्रयत्न झाले आहेत का हे कळणे आम्हाला आवश्यक आहे.

तुमचे कुठल्या आयडी सोबत वाजले आहे किंवा कोण काड्या सारतो हे लक्षात ठेवणे नव्या सभासदत्व घेणाऱ्या मंडळीला लक्षात ठेवणे गरजेचे आहे काय? कोण ते गॅरी ट्रूमन अन जेपी ह्याना विचारले कोणी ओरिजिनल का डू त्याच्याशी माझे काय घेणे देणे आहे म्हणे?? मी ओरिजिनल आहे का डू हे मी स्वतःच नीट इंट्रो दिल्यावर सुद्धा त्या गुरूजीला किंवा तुम्हाला कळत नसेल त्याला मी जबाबदार नाही, त्याहुन पुढे तुम्हाला येणाऱ्या सदस्यांची सत्यासत्यता तपसायची जबाबदारी कोणी दिली आहे? कुठल्या हक्काने तुम्ही मला जाब विचारणार हो साहेब?

ठीक आहे. मी तुम्हाला जाअब विचारणार नाही. मग तुम्ही पण मला विचारायचा नाही. आहे मान्य? मी चर्चा करायला आलो होतो. तुम्ही डायरेक्ट धमक्यांवर उतरलात.

असो - शेवटचे एकच सांगून ही चर्चा संपवतो - तुम्ही डु आयडी नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी केवळ तुमची आहे. तुम्ही जेव्हढे आकांडतांडव करत जाल तेव्हढा आमचा संशय आणखीन वाढत जाईल, कारण तसा पॅटर्न आहे. तर्राट जोकर आ आयडी देखील माझ्या मतांच्या विरूद्ध बरेच काही लिहितो, पण त्याला आम्ही कधी डुआयडी असल्याचा आरोप केलेला नाही. कारण त्याच्या स्वतःच्या मतांचा एक पॅटर्न आहे, आणि त्याचा आम्ही अंदाज करू शकतो. तुमच्याबद्दल जेव्हा असा अंदाज यायला लागेल तेव्हा आपोआपच तुम्ही डुआयडी असल्याचा समज (जर गैरसमज असेल तर) गळून पडेल. आणि हो, इथे आम्ही याचा अर्थ आमचा कंपू असा होत नाही, कारण माझा कोणाशी खरडींमधून्देखील संपर्क नाही. तुमचे आयडी आणि त्यांचे लिखाण हीच तुमची ओळख.

चूक भूल देणे घेणे. तुमच्यावर आरोप करण्याचा माझा हेतू नाही, पण तुम्ही आक्रस्ताळेपणा करू नये एव्हढीच इच्छा आहे.

नाईकांचा बहिर्जी's picture

24 May 2016 - 10:10 am | नाईकांचा बहिर्जी

ठीक आहे तुमचा मुद्दा कळला आनंदा सर, थोड्या एग्रेसिव प्रतिसादाकरीता मी आपली जाहीर माफ़ी मागतो, दूसरे म्हणजे मी गुरूजीला दिलेले प्रतिसाद ह्यावर आपण काय म्हणाल? त्यांनी चक्क मला अतिरेकी स्लीपरसेल वगैरे म्हणले आहे हे खेदपूर्वक नमूद करतो इथे मी, त्यावर आपले मत काय असेल? जिथुन हे सगळे सुरु झाले तिथे मी मुद्द्यावरच बोलत होतो, गुरूजी येऊन विषयसंबंध असणारा एकही शब्द न उच्चारता थेट आरोप करुन गेला होता इतके आपल्या माहीतीकरता सांगतो

ती श्रीगुरुजी या आयडीची चूकच आहे. पण ती चूक गैरसमजातून झालेली आहे. आणि तो गैरसमज आपणच आपल्या वावरातून दूर करू शकता.
आणि माझी माफी वगैरे मागण्याचा प्रश्नच नाही. मी काही मिपाचा मालक्/संपादक नाही. त्यामुळे तुम्हाला माफ करण्याचा मला अधिकार नाही. लोभ असावा हे विनंती.

तर्राट जोकर's picture

28 May 2016 - 10:13 pm | तर्राट जोकर

जितपत मला आठवते साहेब आपणही तिकडेच (खरड़फळ्यावर) माझ्या आयडीवर घसरला होतात ! असो.

>> इसके वास्ते 'सॉरी' बॉस. आपका नाम एक आयडीके हुबहू लग रहा था... करके.

अनुप ढेरे's picture

21 May 2016 - 11:19 pm | अनुप ढेरे

पुरावा आरोप करणार्‍याने द्यायचा असतो. या केसमध्ये मुवि. इतर अनेक केसेसमध्ये गुरुजी.

बाकी आबांच्या एका फालतू comment मुळे हे सगळं घडलं

ती कॉमेंट फाल्तू कशी? त्यांना नाही आवडली एखादी पार्टी जिंकलेली ते लिहिलं तर ती कॉमेंट फाल्तू? हा धागा भाजपाच्या अभिनंदनाचाच आहे काय?

पण फालतू तर फालतू म्हणायचं ना...
उगं ड्यूप्लीकट आयडी, ऐसीवर जा, अमकं करा न् फलानं करा ही झील कशाला

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 8:22 am | बोका-ए-आझम

असं म्हणून फालतू शब्दाचा अपमान करण्याची इच्छा नव्हती, बाकी काही नाही.

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 8:39 am | बोका-ए-आझम

निकाल १९ तारखेला लागलेत. तेव्हा भाजप जिंकणार हे कुणाला माहित होतं? बरं, उत्तराखंडमध्ये भाजपचे नाक ठेचले असे उघडउघड धागे येऊ शकतात तर भाजपच्या अभिनंदनावर येऊ शकत नाहीत? विरोध करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि बाजू घेण्याचं स्वातंत्र्य नाही?

अनुप ढेरे's picture

22 May 2016 - 10:20 am | अनुप ढेरे

बजू घेणार्‍यांवर डुआयडीचे आरोप होत नाहीत. विरोधकांवर होतात.

उदाहरणादाखल त्यांची नावंसुद्धा वर लिहिलेली आहेत मी.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 10:52 am | गॅरी ट्रुमन

तामिळनाडूमध्ये १९८५ नंतर प्रथमच सत्ताधारी आघाडीचा परत विजय होताना दिसत आहे. एम.जी.रामचंद्रन मुख्यमंत्री असताना अण्णा द्रमुकने १९८५ मध्ये आणखी जोरदार विजय मिळवला होता. २०१२ मध्ये पंजाबमधील यो-यो (एकदा हे आणि एकदा ते) हा ट्रेंड बदलला होता. आता २०१६ मध्ये तामिळनाडूमध्ये तेच अनुभवायला येत आहे. केरळमधील यो-यो ट्रेंड कायम राहिला आहे. बंगालमधील मतदारांना एकच नेता कित्येक वर्षे सत्तेत असावा असे वाटते असे वाटते. यापूर्वी बिधनचंद्र रॉय १४ वर्षे, ज्योती बसू २३ वर्षे तर बुध्ददेव भट्टाचार्य १०.५ वर्षे मुख्यमंत्रीपदी होते. आता ममता बॅनर्जी कमितकमी १० वर्षे मुख्यमंत्री राहतील असे दिसते.

आसाममध्ये मात्र भाजपने अगदीच जोरदार मुसंडी मारली आहे. यापूर्वी १० पेक्षा जास्त जागा भाजपला आसाम विधानसभेत मिळालेल्या नव्हत्या. तिथपासून मित्रपक्षांच्या मदतीने ७० चा आकडा ओलांडणे म्हणजे नक्कीच जोरदार विजय झाला.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 11:11 am | गॅरी ट्रुमन

२०१६ च्या विधानसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेस पक्षाची अवस्था मात्र फारच दयनीय झालेली दिसते.

केरळमध्ये कॉंग्रेसचा पराभव अपेक्षित जरी असला तरी भाजप प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट पाडेल आणि त्यातून पक्षाला विजयाची संधी मिळेल अशी अपेक्षा असावी. पण भाजपने डाव्या आघाडीपेक्षा कॉंग्रेसचीच मते कापलेली दिसत आहेत असे विविध चॅनेलवरील चर्चांवरून समजते. तामिळनाडूमध्ये द्रमुकबरोबर युती करून विजय मिळेल अशी पक्षाची अपेक्षा असावी.पण ते फासेही उलटेच पडलेले दिसतात. आसामात भाजपने कॉंग्रेसचा जोरदार पराभव केलेला दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसला ३८ जागा मिळताना दिसत आहेत हीच त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. पण बंगालमध्ये कॉंग्रेसची मते मुख्यत्वे मालदा आणि मिदनापूर जिल्ह्यात एकवटलेली आहेत. NDTV वर दाखविले की कॉंग्रेसला बंगालमध्ये ९% मते मिळाली आहेत. भाजपने प्रथमच कॉंग्रेसपेक्षा जास्त मते बंगालमध्ये मिळवली आहेत. कॉंग्रेसला त्यातल्या त्यात आघाडी पुद्दुचेरीमध्ये मिळालेली दिसत आहे आणि तिथेही स्वबळावर बहुमत दिसत नाही. आणि अर्थातच हा केंद्रशासित प्रदेश अगदीच छोटा आहे त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर त्या आघाडीचा प्रभाव शून्य पडेल.

२०१४ मध्ये सफाया झाल्यानंतर कॉंग्रेसची अवस्था अजूनच दयनीय होत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर ढकलले जाणे, दिल्लीमध्ये व्हाईटवॉश मिळाला होता त्यानंतर बिहारमध्ये लालू-नितीशबरोबर युती करून थोड्याफार जागा मिळाल्या. पण आता आसामात मोठाच झटका बसला, केरळमध्ये पराभव झाला, तामिळनाडू आणि बंगालमध्ये फार प्रभाव पडलेला दिसत नाही. आता कॉंग्रेसकडे कर्नाटक हे एकच मोठे राज्य राहिले आहे. उत्तराखंड, हिमाचल, मेघालय, मणिपूर या राज्यांमध्ये मिळून १२ पेक्षा जास्त लोकसभा जागा नाहीत.

एका अर्थी कॉंग्रेसचे असे पतन होणे वाईट आहे. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय विरोधी पक्ष प्रबळ हवाच. पण कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत असतील तर ते भविष्यात स्थैर्याच्या दृष्टीने वाईट आहे.

सतीश कुडतरकर's picture

19 May 2016 - 11:20 am | सतीश कुडतरकर

congress che patan honarach.

saglikade harlyavar suddha jantemadhye kay sandesh jaatoy, tar 'Aamchyakade Bhrashtachari mandalinvar kontihi karvai keli jaat naahi'.

Karvai karnaar tari konavar, thikthikanchye saramjamdar, yanchyach jivavar tar congress paksh kasabasaa tag dharun ubha aahe.

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 11:22 am | बोका-ए-आझम

पण अल्पसंख्यांक तुष्टीकरण आणि गांधी परिवार लांगुलचालन हे मुख्य कार्यक्रम जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत काँग्रेसला पुनरागमन करणं कठीण आहे. आता सध्या उत्तराखंड, हिमाचल आणि कर्नाटक ही तीनच राज्ये काँग्रेसकडे आहेत. पंजाबमध्ये आआपचं आव्हान आहे. माझी तिथे काँग्रेस यावी अशीच इच्छा आहे. बाकी उत्तर प्रदेशात काँग्रेसने जनाधार ब-यापैकी गमावला आहे.

नाईकांचा बहिर्जी's picture

19 May 2016 - 11:43 am | नाईकांचा बहिर्जी

गांधी परिवारापासुन मुक्ति मिळाल्यास काँग्रेस हा एक उत्तम विरोधीपक्ष होऊ शकतो, आज काँग्रेस मधे खऱ्या मुद्द्यांची जाण असणारे सगळे नेते फ़क्त गांधी परिवाराने केलेले कीड़े सावरण्यात खर्ची पडत आहेत अन पर्यायाने ते आपल्याच पानीपताचे कारण बनत आहेत असे वाटते,

अल्पसंख्याक तुष्टिकरण ह्या मुद्द्यात तितकासा दम वाटत नाही मला तरी कारण बहुतांशी ह्या मुद्द्याच्या समर्थनार्थ जे दाखले दिले जातात ते ऐतिहासिक अन समकालीन नसलेले अर्थात 55 कोटीचे बळी ते फाळणी अन मोपला बंड वगैरे घासुन गुळगुळीत झालेले मुद्दे असतात, आकड़े सुद्धा काँग्रेस शासित राज्य सरकारे असताना विविध राज्यांत घडलेले दंगे इत्यादी असतात. फारच समकालीन स्ट्रेच केल्यास ते शाहबानो प्रकरण इथपर्यंतच पोचतात.

मला काँग्रेस अल्पसंख्य बाबतीत आततायी वाटते म्हणजे एकीकडे पार जबरदस्तीच्या नसबंदी कार्यक्रम ते दुसरीकडे शाहबानो प्रकरण अर्थात माझा तितकासा अभ्यास नाहीये म्हणा , तरीही त्या मुद्द्यात् मला तरी जोर वाटत नाही बुआ. असो.

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 12:43 pm | बोका-ए-आझम

हा १९७५ च्या आणीबाणीच्या कालखंडातला मोठा अध्याय आहे, पण आज साठीत आणि सत्तरीत असलेल्या आणि उत्तर प्रदेश आणि हरियाणा इथे राहिलेल्या पिढीला त्याच्याबद्दल माहिती असेल आणि असलंच तर काही सोयरसुतक असेल. जी पिढी आत्ता ३५ ते ५० या वयोगटातील आहे (१९६६ ते १९८१ या काळात जन्मलेले) त्या पिढीला हा मुद्दा academic interest आहे. पुढच्या पिढ्यांचा तर काही संबंधच नाही.
शाह बानो हा मात्र वेगळा मुद्दा आहे, कारण त्याचे परिणाम दूरगामी आहेत, आणि तो काँग्रेसने केलेल्या ऐतिहासिक घोडचुकीचा पुरावा आहे. तेव्हा काँग्रेसला लोकसभेत अाणि राज्यसभेत राक्षसी बहुमत होतं. त्याचा फायदा घेऊन त्यांनी मुस्लिम महिलांच्या तलाकचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायला हवा होता. पण इतका दूरगामी विचार करणारे कुणी तेव्हा काँग्रेसमध्ये नव्हते. आरिफ मोहम्मद खान यांच्यासारख्या पुरोगामी मुस्लिम नेत्यांना डावलून काँग्रेस नेतृत्वाने सय्यद शहाबुद्दीन आणि खुर्शीद आलम खान (सलमान खुर्शीद यांचे वडील) यांच्यासारख्या प्रतिगामी आणि कट्टर नेत्यांना जवळ केलं आणि तलाकला पाठिंबा देणारा आणि शाह बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला पूर्णपणे रद्दबातल करणारा कायदा मंजूर केला. एकदा असं झाल्यावर काँग्रेसने पुरोगामी मुस्लिमांची मतं ब-यापैकी गमावली. नंतर मंडल आयोग लागू झाल्यावर ओबीसी नेते - मुलायमसिंग, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार - हे पुढे आले. भाजपनेही ब्राम्हण-बनियांचा पक्ष या प्रतिमेला छेद देण्यासाठी कल्याणसिंग, गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी यांना पुढे आणलं. काँग्रेस पक्ष मात्र गांधी-नेहरूंच्या पुण्याईवर आपला गाडा खेचत राहिला. मूळच्या काँग्रेसमधल्या ममता बॅनर्जी राज्याच्या राजकारणात डावलल्या गेल्यामुळे बाहेर पडल्या, स्वतःचा पक्ष काढला आणि आता परत काँग्रेसला धोबीपछाड देऊन बंगालमध्ये मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्या हे एक उदाहरण आहे. असे अनेक आहेत. आंध्रसारखं मोठं राज्य तेलंगणाचा प्रश्न नीट न हाताळून काँग्रेसने हातचं गमावलं.
आताही साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांचा मुद्दा काँग्रेसच्या अंगावर शेकणार आहे. भाजप नेत्यांचे हिंदू अतिरेक्यांशी संबंध आहेत असा बेछूट आरोप काँग्रेस नेत्यांनी चालू केलेला आहे. एकतर हिंदू दहशतवादी या शब्दप्रयोगाने आणि इस्लामी दहशतवादाबद्दलच्या दुटप्पी भूमिकेने (दहशतवादाला रंग आणि धर्म नसतो असं एकीकडे म्हणणे आणि दुसरीकडे भगवा दहशतवादी आणि हिंदू दहशतवाद वगैरे शब्दप्रयोग करणे) अनेक भाजपसमर्थक नसलेले हिंदूही दुखावले गेलेले आहेत. दुसरं म्हणजे पुरावे न देता फक्त आरोप करणं हे लोक कधीपर्यंत ऐकून घेतील? जर भाजप नेत्यांचे हिंदू दहशतवाद्यांशी संबंध आहेत तर त्यांना अटक करुन खटला भरून शिक्षा का दिली नाही हा प्रश्न लोक विचारणारच.
एकंदरीत काय, तर काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा मोदींच्या किंवा अमित शाह यांच्या डोक्यात येण्यापूर्वी काँग्रेसवाल्यांनी स्वतःच तो आपला अजेंडा असल्याप्रमाणे गोष्टी केलेल्या आहेत.

नाईकांचा बहिर्जी's picture

19 May 2016 - 12:48 pm | नाईकांचा बहिर्जी

प्रतिसाद आवडला सर!

एकदा असं झाल्यावर काँग्रेसने पुरोगामी मुस्लिमांची मतं ब-यापैकी गमावली.

तसंही कट्टर अन घट्ट एकेश्वरवादी एकपुस्तकवादी अन एकप्रेषितवादी धर्मात असं कोण हींग लावुन विचारतंय म्हणा ह्या पुरोगामी अल्पसंख्य बुद्धिवंतांना ?? चालायचेच!

एकंदरीत काय, तर काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा मोदींच्या किंवा अमित शाह यांच्या डोक्यात येण्यापूर्वी काँग्रेसवाल्यांनी स्वतःच तो आपला अजेंडा असल्याप्रमाणे गोष्टी केलेल्या आहेत.

ह्याला लय वेळा सहमत !!
उत्तम प्रतिसाद

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 2:07 pm | गॅरी ट्रुमन
एकंदरीत काय, तर काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा मोदींच्या किंवा अमित शाह यांच्या डोक्यात येण्यापूर्वी काँग्रेसवाल्यांनी स्वतःच तो आपला अजेंडा असल्याप्रमाणे गोष्टी केलेल्या आहेत.

मस्त. सहमत आहे

टाईम्स नाऊ वर चर्चा चालू आहे-- तामिळनाडूमध्ये द्रमुकने कॉंग्रेसबरोबर युती करून पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

अरणब गोस्वामी आणि इतरांनी आकडेवारी सादर केली आहे.त्यावरून लक्षात येते की द्रमुकने लढविलेल्या जागापैकी जवळपास ५०% जागा जिंकल्या आहेत. पण कॉंग्रेसने मात्र २२% जागाच जिंकल्या आहेत. आणि ज्या जागा कॉंग्रेसने जिंकल्या आहेत त्या जागांवरही द्रमुकचीच ताकद होती. कॉंग्रेसबरोबर युती करून बहुदा करूणानिधींनी चूक केली अशी चिन्हे आहेत.

टाईम्स नाऊवर तर आता असे म्हटले जात आहे की यापुढे कॉंग्रेसबरोबर युती करण्यापूर्वी इतर पक्ष दहावेळा विचार करतील. कारण ज्या काही थोड्याथोडक्या जागा कॉंग्रेस लढविते त्याही जिंकायची कॉंग्रेसची क्षमता नाही असे चित्र उभे राहायची शक्यता आहे.

१९९९-२००४ - रालोआ
२००४-२०१४ - संपुआ
आणि या १५ वर्षांतली ५ वर्षे - २००६-२०११ तामिळनाडूत सत्तेत. म्हणजे द्रमुकने केंद्रातली सत्ता तामिळनाडूपेक्षा जास्त उपभोगली, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी ही म्हण चुकीची ठरवली आणि परत २G सारखा घोटाळाही केला. कुठेतरी सुशिक्षित तामिळ मतदार याबद्दल विचार करत असणारच. त्यामुळे त्यांनी यावेळी कलैगनारना (एम. करुणानिधी) घरी बसवलं.

नाईकांचा बहिर्जी's picture

19 May 2016 - 5:08 pm | नाईकांचा बहिर्जी

सुशिक्षित तमिळ मतदार ह्या शब्दरचनेची अंमळ मौजच वाटली! कलर टीवी मोबाइल वॉशिंग मशीन इतकेच काय तर 3जी कनेक्शन सुद्धा जिथे "निवडणूक वादे" ह्या सदरात येते तिथली जनता सुशिक्षित कशी असा प्रश्न पडतो, आपण आपल्या आजुबाजुला पाहतो ते तमिळ वेगळे असतात खुद्द तमिलनाडु मधले वेगळे, असला मूर्खपणा करणाऱ्या लोकांना जनता निवडते ह्यातच सगळे आले अन हे असले प्रताप युपी बिहार मधे सुद्धा दिसतात खरे.

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 5:20 pm | बोका-ए-आझम

ते तर दोन्हीही पक्ष करतात हो तिथे. द्रमुक दोन रूपयांत किलोभर तांदूळ देतो तर अम्मा दोन रूपयांत इडली देते. शिवाय तामिळनाडूमधल्या लोकांनी राजकारण हा मुद्दा larger than life बनवलेला आहे. बाकी बाबतीत normal आणि down to earth असलेले तामिळ राजकारण म्हटलं की प्रचंड वेगळे असतात. पण तसे ते दोन्ही पक्षांच्याबाबतीत असतात.

तामिळनाडूमधल्या लोकांनी राजकारण हा मुद्दा larger than life बनवलेला आहे.

ह्याला लय बेक्कारीत सहमत !!
राजकारणच नव्हे तर तमिळ लोकांच्या कितीतरी गोष्टी larger than life असतात.

प्रदीप साळुंखे's picture

19 May 2016 - 6:12 pm | प्रदीप साळुंखे

साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांचा मुद्दा काँग्रेसच्या अंगावर शेकणार आहे. भाजप नेत्यांचे हिंदू अतिरेक्यांशी संबंध आहेत असा बेछूट आरोप काँग्रेस नेत्यांनी चालू केलेला आहे. एकतर हिंदू दहशतवादी या शब्दप्रयोगाने आणि इस्लामी दहशतवादाबद्दलच्या दुटप्पी भूमिकेने (दहशतवादाला रंग आणि धर्म नसतो असं एकीकडे म्हणणे आणि दुसरीकडे भगवा दहशतवादी आणि हिंदू दहशतवाद वगैरे शब्दप्रयोग करणे) अनेक भाजपसमर्थक नसलेले हिंदूही दुखावले गेलेले आहेत.

अगदी सही बोललात.
मी ही या एकाच मुद्यावर भाजपसमर्थक बनलो आहे.

काँग्रेसची मतांची टक्केवारी ही डाव्या पक्षांपेक्षा जास्त आहे. म्हणजे डाव्यांचा प्रभाव कमी होतोय असं म्हणता येईल का?

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 12:55 pm | गॅरी ट्रुमन

म्हणजे डाव्यांचा प्रभाव कमी होतोय असं म्हणता येईल का?

हो. असे म्हणता येईल.

NDTV वर म्हटले जात आहे की बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या सभांना तरूण आणि स्त्रिया हे दोन महत्वाचे घटक फारसे दिसत नव्हते. लोकांमध्ये असेच चित्र होते की डावे पक्ष म्हणजे मध्यमवयीन आणि वृध्दांचे पक्ष आहेत. त्याउलट ममता बॅनर्जींच्या सभांना या दोन घटकांची भरभरून हजेरी असे.

मला वाटते की डाव्या पक्षांची दुसरी चूक झाली आणि ती म्हणजे कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करणे. डाव्या मतदारांची हयात कॉंग्रेसला विरोध करण्यात गेली. त्याच कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करणे या मतदारांना फारसे पसंत पडलेले दिसत नाही. अशा मतदारांना भाजपला मते देणे नक्कीच जड गेले असेल पण त्यापैकी काहींनी तरी ममतांना मते दिलेली दिसत आहेत. या युतीमुळे कॉंग्रेसचे मात्र नुकसान झालेले दिसत नाही. कॉंग्रेसचे मुर्शिदाबाद आणि मालदा भागात पूर्वीपासूनच स्थान आहे. कम्युनिस्टांचे ३४ वर्षे राज्य असतानाही जे काही यश कॉंग्रेसला मिळत असे ते याच भागातून.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 11:32 am | गॅरी ट्रुमन

तामिळनाडूमधील राजकारण मात्र आता रंगतदार होताना दिसत आहे. या राज्याविषयी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही मोठ्या राज्यात सर्वाधिक काळ सत्तेबाहेर कॉंग्रेस पक्ष राहिला असेल तर ते राज्य म्हणजे तामिळनाडू आहे. द्रमुकने कॉंग्रेसचा १९६७ मध्ये पराभव केला आणि त्यानंतर आजपर्यंत कॉंग्रेस पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकलेला नाही. १९९० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत कॉंग्रेसची स्वत:ची १५% मते होती तर द्रमुक आणि अण्णा द्रमुकची सुमारे ४०% मते होती. त्यामुळे कॉंग्रेस ज्या बाजूला जाईल त्या बाजूचा जोरदार विजय होत असे. पण नंतरच्या काळात कॉंग्रेसचे ते स्थानही गेले. एकेकाळी चक्रवर्ती राजगोपालाचारी, सी. सुब्रमण्यम, के. कामराज, आर. वेंकटरामन हे कॉंग्रेसचे मोठे नेते तामिळनाडूमध्ये होते. आणि आता पूर्वीच्या वैभवाच्या आठवणीही कोणाच्या मनात नसतील कारण बहुसंख्य लोकांचा जन्म कॉंग्रेसचे ते वैभव सरल्यानंतर झाला आहे.

तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकला ४२% तर द्रमुक आघाडीला ४१% मते मिळाली आहेत असा अंदाज आहे. तर पी.एम.के- डी.एम.डी.के यांना प्रत्येकी ६% मते आहेत असे दिसते. या पराभवानंतर करूणानिधी सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील अशी चिन्हे आहेत. स्टॅलिन यांच्याकडे करूणानिधींची लोकप्रियता नक्कीच नाही. तेव्हा भविष्यात द्रमुकलाही उतरती कळा लागेल अशी चिन्हे आहेत. अशावेळी ती पोकळी भरून काढायला आणि वाढीला पी.एम.के-डी.एम.डी.के यासारख्या पक्षांना अधिक वाव मिळेल. भाजपला मात्र तामिळनाडूमध्ये अजून आपला प्रभाव दाखवता आलेला दिसत नाही. २०१४ मध्ये कन्याकुमारीची लोकसभेची जागा पक्षाने स्वबळावर जिंकली होती. पण या क्षणी भाजपला मात्र दोन जागांपेक्षा जास्त जागा मिळताना दिसत नाहीत. तेव्हा भविष्यात पी.एम.के- डी.एम.डी.के हे पक्ष काँग्रेसची पूर्वीची जागा घेतील असे दिसते. वायकोंनी तसा धसमुसळेपणाच केला. अन्यथा या पक्षांच्या यादीत एम.डी.एम.के चे नावही आले असते.

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 11:46 am | बोका-ए-आझम

राष्ट्रीय पक्षांना स्वतःचा चेहरा नाही. तुम्ही पाहिलंत तर इतर दक्षिणी राज्यांत दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडे नेते आहेत. कर्नाटकात सिद्धरामय्या आणि अनंतकुमार आहेत. त्यामुळे तिथे देवेगौडांचा प्रभाव कमी झालाय. तसे strong चेहरे काँग्रेस आणि भाजपला द्यायला लागतील, कारण आता जर काँग्रेसला come back करायचा असेल तर दक्षिणेकडूनच करावा लागेल. इंदिरा गांधींनी जसा चिकमगळूरमधून केला होता तसा. भाजपलाही आपले footprints भारतभर पसरवायचे असतील तर दक्षिण एकडे जावंच लागेल. त्यातल्या कर्नाटक आणि गोव्यात भाजप आहे, आंध्रात तेलगू देसमचा सत्तेत भागीदार आहे, तेलंगणात अगदीच नगण्य अवस्थेत आहे आणि केरळात आत्ता आत्ता खातं खोलायला सुरूवात केलेली आहे.
तामिळनाडूमध्ये द्रमुकचा पराभव ही दोघाही राष्ट्रीय पक्षांना AIADMK ला पर्याय म्हणून उभं राहायची चांगली संधी आहे. पुढच्या पाच वर्षांत एखाद्या नेत्याला groom करुन विरोधक म्हणून २०२१ मध्ये विरोधी पक्ष म्हणून पुढे येणं अवघड आहे, पण अशक्य नाही.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 1:11 pm | गॅरी ट्रुमन

कारण आता जर काँग्रेसला come back करायचा असेल तर दक्षिणेकडूनच करावा लागेल. इंदिरा गांधींनी जसा चिकमगळूरमधून केला होता तसा.

१९७८ मध्ये इंदिरा गांधी चिकमागळूरमधून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेल्या आणि त्यांची पुनरागमनाची सुरवात केली. पण १९७७ मध्ये उत्तर भारतात पक्षाचा धुव्वा उडालेला असला तरी दक्षिण भारत मात्र कॉंग्रेसच्या मागे खंबीरपणे होता. कर्नाटकात २८ पैकी २६, आंध्र प्रदेशात ४२ पैकी ४१, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या साथीने ३९ पैकी ३१ तर केरळमध्ये उजव्या कम्युनिस्टांबरोबर २० पैकी १५ जागा कॉंग्रेसकडे होत्या. त्यामुळे पुनरागमन करायला मोठा बेस दक्षिण भारतात इंदिरा गांधींकडे होता. तो यावेळी पूर्ण भारतात कुठेच नाही. तेव्हा कॉंग्रेसला पुनरागमन करणे १९७८ पेक्षा अधिक कठिण जाईल हे नक्कीच.

भोळा भाबडा's picture

19 May 2016 - 12:04 pm | भोळा भाबडा

बोकाभाऊ,गॅरीभाऊ,

मी एक न्यूजचॅनेल सूरू करतोय, जाॅईन होणार का??
बक्कळ मानधन दिले जाईल

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 1:02 pm | गॅरी ट्रुमन

मी एक न्यूजचॅनेल सूरू करतोय, जाॅईन होणार का??

अरे वा. जॉईन व्हायला नक्कीच आवडेल :)

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 1:53 pm | गॅरी ट्रुमन

केरळ विधानसभेमध्ये भाजपने प्रवेश केला आहे. नेमम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते ओ.राजगोपाल यांनी विजय मिळवला आहे. ही एकच जागा भाजपने जिंकली आहे. मंजेश्वर आणि कासारगोड विधानसभा मतदारसंघांमधून अगदी १९८२ पासून भाजपला ३०-३२% मते मिळून दुसऱ्या क्रमांकावर पक्षाचे उमेदवार राहिले आहेत. ती परंपरा यावेळीही चालू राहिली. पण भाजपच्या उमेदवारांनी १०-१२% मते वाढवली आहेत. मंजेश्वरमधून पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते के.सुरेंद्रन यांचा ९९ मतांनी अगदी थोडक्यात पराभव झाला आहे. कासारगोडमध्ये भाजप उमेदवाराला पूर्वी ३०-३२% मते मिळत होती ती वाढून ४०% झाली आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. राजशेखरन यांचा वट्टियुरकावू मतदारसंघातून आणि माजी क्रिकेटपटू श्रीशांतचा तिरूवनंतपुरम मतदारसंघातून पराभव झाला आहे.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 2:28 pm | गॅरी ट्रुमन

एकूणच भाजपसाठी आजचा दिवस म्हणजे ’अच्छा दिन’ राहिला आहे.

आसामात मित्रपक्षांसह भाजपने दोन-तृतीयांश बहुमत मिळवले आहे (या क्षणी १२६ पैकी ८९ जागांवर आघाडी). केरळ आणि पश्चिम बंगाल विधानसभांमध्ये प्रथमच भाजपने प्रवेश केला आहे. तामिळनाडूमध्ये मात्र भाजपला विधानसभेची जागा जिंकणे शक्य झालेले नाही. तरीही त्यापूर्वीही भाजपने तामिळनाडूत स्वबळावर आतापर्यंत एकदाच (१९९६ मध्ये) जागा जिंकली आहे. त्यामुळे यश मिळाले नसले तरी तामिळनाडूमध्ये मुळात गमाविण्यासारखे भाजपकडे काहीच नव्हते. त्यामुळे हे अपयश नक्कीच म्हणता येणार नाही.

पोटनिवडणुकांमध्येही भाजपची स्थिती बरीच चांगली राहिली आहे. मेघालयमध्ये भाजपचा मित्रपक्ष NPP चे उमेदवार आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए.संगमा यांचा मुलगा पोटनिवडणुकीत तुरा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेला आहे. तर गुजरातमध्ये तलाला विधानसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे. २००७ आणि २०१२ मध्ये ही जागा कॉंग्रेसने जिंकली होती. उत्तर प्रदेशात दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक झाली-- बिलारी आणि जांगीपूर. या दोन्ही मतदारसंघातून भाजपला २०१२ मध्ये १०% पेक्षा कमी मते होती आणि भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते. या दोन्ही जागा समाजवादी पक्षाने राखल्या. पण भाजपने या मतदारसंघांमध्ये ४०%-४५% मते घेतली आहेत. झारखंडमध्येही दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक झाली. त्यापैकी मागच्या वेळी जिंकलेली गोड्डाची जागा भाजपने राखली आहे तर दुसरी पानकीची जागा कॉंग्रेसने राखली आहे.

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी

तलाला मतदारसंघ काँग्रेसने राखला असल्याचे सकाळी बातम्यात दाखवित होते. पोटनिवडणुकीच्या निकालांची लिंक आहे का? उत्तर प्रदेश मधील मुजफ्फरनगर येथेही विधानसभेची पोटनिवडणुक होती ना? त्याचा काय निकाल आहे?

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 2:53 pm | गॅरी ट्रुमन

निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर http://eciresults.nic.in/ConstituencywiseS0691.htm?ac=91 इथे तलालाचा निकाल बघता येईल.

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 3:04 pm | श्रीगुरुजी

ओह! तलालामध्ये भाजपने निसटता विजय मिळविलेला दिसतोय.

प्रान्जल केलकर's picture

19 May 2016 - 2:38 pm | प्रान्जल केलकर

ह्या निवडणुकीमुळे राज्यसभेत असलेल कॉंग्रेसच्या किती सीट्स कमी होतील आणि भा ज पा च्या किती सीट्स वाढणार ????

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 3:06 pm | श्रीगुरुजी

राज्यसभेच्या संख्याबळात तातडीने फरक पडणार नाही. भविष्यात जेव्हा आसाममधून राज्यसभेचे खासदार निवडले जातील तेव्हा भाजपचे २ किंवा ३ खासदार निवडून येतील. आजपर्यंत आसाममध्ये काँग्रेसचे बहुमत असल्याने काँग्रेसचे खासदार निवडून जात होते. यापुढील काळात भाजपचे निवडून जातील. अर्थात २-३ खासदारांनी किरकोळ फरक पडेल.

श्रीगुरुजी's picture

20 May 2016 - 3:13 pm | श्रीगुरुजी

ह्या निवडणुकीमुळे राज्यसभेत असलेल कॉंग्रेसच्या किती सीट्स कमी होतील आणि भा ज पा च्या किती सीट्स वाढणार ????

हे वाचा.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/rajya-sabha-count-numbers-to-st...

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 2:44 pm | श्रीगुरुजी

मतमोजणी अजून पूर्ण झाली नसली तरी निकालाचा पूर्ण अंदाज आला आहे. तामिळनाडू वगळता इतर निकाल अपेक्षेप्रमाणेच लागले आहेत. तामिळनाडूत अनेक वर्षांनतर प्रथमच सताबदलाची परंपरा खंडीत झाली. आसाममध्ये प्रथमच भाजप सत्तेवर येत आहे. काँग्रेसचा केरळ व आसाममध्ये पराभव झाला तर तामिळनाडूत व बंगालमध्ये काँग्रेस व त्यांच्या साथीदारांचा पराभव झाला. 'कॉंग्रेसमुक्त भारत' या दिशेने अजून एक पाऊल पुढे पडले आहे. २०१५ हे वर्ष भाजपसाठी वाईट गेले होते. आधी दिल्ली व नंतर बिहारमध्ये भाजपचा दारूण पराभव झाला होता. देशात भाजपविरूद्ध वातावरण निर्माण झाले असून काँग्रेस पुनरूज्जीवनाच्या मार्गावर आहे असा प्रचार सुरू होता. अगदी महानगरपालिकेच्या काही वॉर्डातील पोटनिवडणुकांचे संदर्भ देऊन राहुल गांधींना श्रेय दिले जात होते. सुदैवाने भाजपने मागील वर्षींच्या चुकातून बोध घेतलेला दिसतो. आसाममध्ये योग्य त्या पक्षांशी युती करून स्थानिक उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करून भाजपने योग्य पावले टाकली. रोहीत वेमुला, जेएनयु इ. प्रकरणांवरून भाजपवर सडकून टीका झाली. मोदींची पदवी, स्मृती इराणी असे अस्तित्वात नसलेले वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर निर्माण केले गेले. केरळमधील मोदींच्या अर्भक मृत्युदराच्या विधानाचा दुष्प्रचाराकरिता भरपूर वापर केला गेला. अर्थात त्यामुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही. भाजपने केरळमध्ये प्रथमच खाते उघडले आहे, तर बंगालात निदान ४-५ जागा तरी मिळण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूत द्रमुक काँग्रेसशी युती न करता स्वतंत्र लढले असते तर कदाचित त्यांचा विजय झाला असता. पण काँग्रेसची दु:संगत भोवली. काँग्रेसबरोबर केलेली चुंबाचुंबी तामिळ मतदारांना आवडलेली दिसत नाही. बंगालमध्ये देखील काँग्रेसशी युती केली नसती तर डाव्या पक्षांच्या कामगिरीत सुधारणा झाली असती. परंतु बंगालमध्ये काँग्रेसशी केलेली शय्यासोबत डाव्या पक्षांना भोवली. जोपर्यंत कॉंग्रेस गांधी घराण्याचे जू मानेवर वागवित आहे तोपर्यंत भाजपला काळजी नाही. काँग्रेसला भविष्यात पुढे येण्यासाठी सर्वप्रथम गांधी घराण्याचे जोखड मानेवर फेकून द्यावे लागेल व नवीन नेतृत्व शोधावे लागेल. अर्थात सध्या कॉंग्रेसमध्ये असा नेता दिसत नाही. जुलै २०१७ मध्ये विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर जर काँग्रेसींनी नेतृत्व त्यांच्याकडे सोपविले व त्यांनी कॉंग्रेसमधील त्यातल्या त्याच चांगले नेते निवडून आपली टीम निवडली तर काँग्रेसचे पुनरूज्जीवन होण्याची शक्यता आहे. अन्यथा सोनिया, राहुल व प्रियांका या तिघांपलिकडे काँग्रेसने पाहिले नाही तर काँग्रेसची अधोगती थांबणार नाही.

या निकालांचे राष्ट्रीय राजकारणावर थोडेसे परीणाम होणे अटळ आहे. तिसर्‍या आघाडीचे अनेक नेते राष्ट्रीय राजकारणात येऊन भाजप व काँग्रेसविरोधी आघाडीचा नेता बनण्यास उत्सुक आहेत. नितीशकुमारांनी त्या दृष्टीने पावले टाकण्यास केव्हाच सुरूवात केली आहे. केजरीवालांच्या पक्षाचे दिल्लीबाहेर अस्तित्व नसले तरी सातत्याने राष्ट्रीय वृत्तपत्रात सर्व राज्यात स्वतःचा उदोउदो करणार्‍या जाहिराती प्रसिद्ध करून राष्ट्रीय नेता बनण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. या यादीत आता जयललिता व ममता बॅनर्जींची भर पडेल. लागोपाठ दोन निवडणुका जिंकल्याने राष्ट्रीय पातळीवर त्यांचा दावा इतरांच्या तुलनेत मजबूत झाला आहे. आपल्या विदूषकी चाळ्यामुळे व नौटंकीमुळे केजरीवाल राष्ट्रीय नेता बनणे अवघड आहे, तर लालूसारख्या महाभ्रष्टाचारी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीबरोबर शय्यासोबत केल्याने नितीशकुमारांनाही राष्ट्रीय नेता बनणे अवघड आहे. मुलायम, मायावती इ. ना उत्तर प्रदेशाबाहेर स्थान नाही. पण तेसुद्धा या शर्यतीत आहेत.

भाजपला आसाम हे एक नवीन राज्य मिळत आहे. भविष्यात भाजपला आसाममधून २-३ खासदार राज्यसभेवर निवडून आणता येतील. तसेच जुलै २०१७ मधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आसाममधील वाढलेले आमदार व बंगाल आणि केरळ मधून निवडून आलेले मूठभर आमदार यांच्या मतांचा फायदा होईल.

मी न्यूजचॅनेल बघुन वर्ष लोटलं त्यामुळॅ याबद्दल तिथे चर्चा काय चाललिये कल्पना नाही. पण यात एक गोष्ट कोणाच्या किती लक्षात आलीये कल्पना नाही की काँग्रेस जिंकणं/हरणं हा मुद्दाच नाहिये.
तिसरी आघाडी अधिक सक्षम झालीये.

ममताच्या जागा वाढल्या, केरळातही डावे जिंकले, तमिळनाडकोही काँग्रेस ज्याच्यासोबत होती त्याला नाकारतिसस्वतंत्र तिसर्‍या पक्षाला पहिल्यांदाच सलग दुसर्‍यांदा निवडून दिलंय

केवळ कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश हा भाग सोडला तर भाजपा व काँग्रेसला एकट्याच्या बळावर सत्ता मिळावता आलेली नाही. आसाम हिमाचल वगैरे लहान राज्य आहेत.

पैकी गोवा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल इथे आआप चंचुप्रवेश करू पाहते आहे.
पंजाब महाराष्ट्रात भाजपा तर बिहारात काँग्रेस स्वतःच्या जीवावर नाही.

जर हे नेते एक आणि नेमका नेता (पंतप्रधानपदाचा उमेदवार) निवडू शकले तर भाजपाला व काँग्रेसला पुढिल निवडणूक प्रचंड कठिण जाईल. नितीशकुमार विरुद्ध मोदी अशी २०१९ निवडणुक असेल हे या निकालांनी जवळजवळ नक्की केले आहे.

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 3:32 pm | श्रीगुरुजी

असहमत.

तिसरी आघाडी या नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. त्यामुळे तिसरी आघाडी बळकट झाली हा भ्रम आहे. काही प्रादेशिक पक्ष बळकट झालेले दिसतात. परंतु ते पूर्वीपासूनच बळकट होते.

भाजप गुजरात, म.प्र., छत्तीसगड, राजस्थान, गोवा आणि हरयाना या सहा राज्यात स्वबळावर सत्तेत आहे. महाराष्ट्र, आता आसाम आणि झारखंड या तीन राज्यांमध्ये मध्ये भाजप हा प्रमुख पक्ष आहे व शिवसेना, आसाम गण परीषद, बोडो पीपल्स फ्रंट व झारखंड स्टुडंट्स युनियन हे प्रादेशिक पक्ष भाजपच्या तुलनेत खूपच लहान आहेत. फक्त पंजाब, आंध्रप्रदेश व जम्मू-काश्मिर या तीन राज्यात भाजप कनिष्ठ सहकार्‍याच्या भूमिकेत आहे. म्हणजे सत्तेवर असलेल्या १२ राज्यांपैकी ६ राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत आहे, ३ राज्यात वरिष्ठ भागीदार आहे व फक्त ३ रा़ज्यात भाजप कनिष्ठ सहकारी आहे.

काँग्रेस कर्नाटक, हि.प्र. व उत्तराखंड मध्ये स्वबळावर सत्तेत आहे. केरळ व बिहार मध्ये अनेक प्रादेशिक पक्षांचे कडबोळे सत्तेवर आहे. तामिळनाडू, तेलंगण, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि उत्तर प्रदेश या ६ राज्यात वेगवेगळे प्रादेशिक पक्ष स्वबळावर सत्तेत आहेत.

यातील अनेक प्रादेशिक नेत्यांना राष्ट्रीय नेता बनण्याची महत्वाकांक्षा आहे. नितीशकुमार, केजरीवाल, ममता, मुलायम, जयललिता अनेक वर्षांपासून आपण तिसर्‍या आघाडीचा राष्ट्रीय नेता बनावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या आपापसात लाथाळ्या आहेत. ममताला डावे पक्ष पाठिंबा देणार नाहीत, जयललिताला द्रमुक पाठिंबा देणार नाही, नितीशकुमारांना लालू पाठिंबा देणार नाही, मुलायलला मायावती व अजितसिंग पाठिंबा देणार नाही. शरद पवार हेसुद्धा अधूनमधून यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु त्यांना महाराष्ट्रातूनच पाठिंबा मिळणे शक्य नाही. यातील सर्वात आदरणीय नाव म्हणजे नवीन पटनाईक. जर तिसरी आघाडी सत्तेवर येण्याची परिस्थिती निर्माण झाली तर डार्क हॉर्स म्हणून पटनाईकांचे नाव पुढे येऊ शकते.

२०१९ मधील निवडणुक नितीशकुमार विरूद्ध मोदी अशी असेल हा गैरसमज आहे. लालूशी युती करून नितीशकुमारांनी सत्ता टिकविली. परंतु त्यामुळे देशभर वाईट संदेश गेला आहे. लालूने बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळविले. लालूमुळे बिहारमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज सुरू झाले आहे असे वाहिन्यांवरून सांगितले जात आहे. लालूकडे स्वतःचे ८० व काँग्रेसचे २७ असे १०७ आमदार आहेत. बहुमतासाठी लालूला फक्त १५ आमदार हवे आहेत. लालू नितीशकुमारांचे सरकार पाडून स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री बनविण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. काही काळाने नितीशकुमारांना लालूचे जोखड फेकून द्यावे लागणार आहे. नितीशकुमार व भाजप पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केजरीवालांच्या पक्षाला दिल्लीबाहेर स्थान नाही. गोवा, उत्तराखंड इ. राज्यात आआप चंचुप्रवेश करू पाहत आहे म्हणजे नक्की काय करीत आहे? आआपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली वगळता एकाही रा़ज्यात विधानसभा अथवा स्थानिक निवडणुकीत सहभाग घेतलेला नाही. त्यांनी दिलेल्या भरमसाठ आश्वासनांचा दिल्लीकरांवर प्रभाव पडला. परंतु इतर राज्यात असा प्रभाव पडणे अशक्य आहे. त्यांची नौटंकी आणि विदूषकी चाळे यामुळे दिल्लीबाहेर त्यांच्याविरूद्ध अत्यंत नकारात्मक मत आहे. पुढील वर्षी होणार्‍या पंजाबमधील निवडणुकीत सुद्धा आआप काहीही करू शकणार नाही.

अनुप ढेरे's picture

19 May 2016 - 3:38 pm | अनुप ढेरे

पंजाबात आप जिंकायचे चांसेस खूप आहेत. गोव्यात देखील.

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 3:45 pm | श्रीगुरुजी

आआपला गोव्यात स्थानच नाही. गोव्यात आआपकडे नेते व कार्यकर्ते नाहीत व तिथे आआपची संघटना देखील नाही. केजरीवालांनी तिथे एखादी सभा घेतली म्हणजे संपूर्ण गोवा आआपमय होईल ही चुकीची समजूत आहे. दिल्लीतही आआपचा प्रभाव ओसरायला सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये तब्बल ५४% मते घेऊन ७० पैकी ६७ आमदार जिंकलेल्या आआपला नंतर फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. सप्टेंबर २०१५ मधील दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीसाठी सिसोदिया व केजरीवालांनी विद्यापीठात सभा घेतली होती. प्रत्यक्षात सर्व ४ जागा भाजपने जिंकल्या. आआपचे उमेदवार तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर राहिले. तरू़ण विद्यार्थ्यांमध्येच आआपचा पाठिंबा घटलेला दिसला. ३-४ दिवसांपूर्वी दिल्ली महापालिकेच्या १३ वॉर्डांच्या पोटनिवडणुकीत आआपने किमान ११-१२ जागा जिंकायला हव्या होत्या. प्रत्यक्षात आआपचे फक्त ५ नगरसेवक निवडून आले. पंजाबमध्ये सुद्धा आआप जिंकेल असे वाटत नाही. २०१४ च्या निवडणुकीत पंजाबमध्ये १४ खासदारांपैकी आआपचे ४ खासदार निवडून आले होते. परंतु आता २ वर्षानंतर आआपचा प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे. बघूया २०१७ मध्ये काय होतंय ते.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 5:52 pm | गॅरी ट्रुमन

३-४ दिवसांपूर्वी दिल्ली महापालिकेच्या १३ वॉर्डांच्या पोटनिवडणुकीत आआपने किमान ११-१२ जागा जिंकायला हव्या होत्या. प्रत्यक्षात आआपचे फक्त ५ नगरसेवक निवडून आले.

खरं तर ही पोटनिवडणुक आआपला खूपच सोपी जायला हवी होती. इतर कुठल्याही महापालिकेप्रमाणे दिल्ली महापालिकेचाही कारभार अत्यंत भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहे. आणि भरीस भर म्हणजे २००७ पासून भाजप दिल्ली महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे प्रस्थापितविरोधी मते खायची आआपला सुवर्णसंधी होती. आणि फेब्रुवारी २०१५ मधील कामगिरी लक्षात घेता ११-१२ काय १३ च्या १३ जागा आआपने जिंकायला हव्या होत्या. प्रत्यक्षात जिंकल्या केवळ ५. प्रस्थापितविरोधी मते कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणावर गेली.

आता लाभाचे पद या मुद्द्यावरून आआपच्या २१ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द व्हावे असे फार वाटते. असे व्हायची शक्यता आहे हे लक्षात घेऊन मध्यंतरी नेहमीप्रमाणे केजरीवालांनी मोदींच्या नावाने आदळआपट केली सुध्दा. म्हणजे मजा बघा-- हे कायद्यातील तरतुदींच्या विरोधात अशा २१ आमदारांची दिल्ली सरकारच्या लाभाच्या पदावर नियुक्ती करणार, त्यावर नोटिस निवडणुक आयोग बजावणार-- म्हणजे यांची आमदारकी रद्द झाली तर ती कायद्यातील तरतुदींमुळे होणार. आणि केजरीवाल थयथयाट करणार कोणाच्या नावाने? तर मोदींच्या नावाने!! असो. तर या २१ जागांवर पोटनिवडणुक झाल्यास ती मिनी दिल्ली विधानसभा निवडणुक असेल आणि त्यातून केजरीवालांनी किती समर्थन गमावले आहे आणि किती कायम ठेवले आहे हे स्पष्ट होईलच.

पंजाबमध्ये सुद्धा आआप जिंकेल असे वाटत नाही.

केजरीवालांनी वसंतपंचमी निमित्त पंजाबात सभा घेतल्या त्याला चांगलीच गर्दी झाली होती. काही ठिकाणी लोक कॉंग्रेस आणि अकाली दलाची वाहने वापरून केजरीवालांच्या सभांना गेले होते अशाही बातम्या आल्या होत्या. तसेच काही सर्वेक्षणांनुसार पंजाबमध्ये आआप स्वीप करेल असे आले आहे. २०१७ ची पंजाब विधानसभा निवडणुकही अकाली दल-भाजपसाठी हरायचीच निवडणुक आहे आणि ती निवडणुक आआप जिंकायची शक्यता नक्कीच जास्त आहे असे वाटते. आणि तसेच व्हावे असेही मला वाटते. कारण त्यातून पंजाबमधून केजरीवालांना आव्हान देणारे दुसरे सत्ताकेंद्र तयार होईल. आणि स्वत: केजरीवाल दिल्ली सोडून पंजाबचे मुख्यमंत्री व्हायला गेले तर हातचे सोडून पळत्याच्या मागे जाणारा हा टॅग केजरीवालांवर आणखी ठळक होईल आणि दिल्ली हातातून निसटत जाईल ही पण शक्यता आहेच. काहीही झाले तरी त्या माणसाचा आणि त्याच्या पक्षाचा शेवटी पूर्ण धुव्वा उडावा हीच माझी इच्छा.

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 6:19 pm | बोका-ए-आझम

२०१७ ची पंजाब विधानसभा निवडणुकही अकाली दल-भाजपसाठी हरायचीच निवडणुक आहे

का हो? Anti-incumbency व्यतिरिक्त काही ठोस कारणं आहेत? २००२-२००७ मध्ये पंजाबात काँग्रेस होती. मग २००७-१२ मध्ये आणि अाता २०१२-१७ परत त्यांचंच राज्य आहे. उत्सुकता म्हणून विचारतोय.

कॉग्रेस ला बहुमत मिळावे अशी मनोकामना करतो.... आप वाले जर आले तर....विचार हि करवत नाहि.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 6:46 pm | गॅरी ट्रुमन

Anti-incumbency व्यतिरिक्त काही ठोस कारणं आहेत?

हे कारण आहेच. आणि दुसरे म्हणजे अकाली दल-भाजप सरकारमध्ये प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थाशी संबंधित बेकायदा व्यवसायातील लोकांचे सत्ताधारी अकाली दलाच्या नेत्यांशी असलेले साटेलोटे ही महत्वाची कारणे आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये अकाली दलाच्या एका नेत्याच्या मालकीच्या बस कंपनीच्या बसमध्ये निर्भया-२ प्रकार घडला होता. अशा घटनांमुळेही अकाली दलाविरूध्द जोरदार नाराजीची भावना आहे अशा बातम्या आहेत.

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 6:58 pm | बोका-ए-आझम

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष प्रताप बाजवा आणि पंजाबमधल्या काँग्रेसचा चेहरा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातून विस्तवही जात नाही. मजा म्हणजे बाजवा गुरदासपूरमधून लोकसभा निवडणूक हरले (विनोद खन्ना यांच्या विरोधात) आणि अमरिंदर सिंग अमृतसरमधून अरुण जेटलींना हरवून जिंकले. त्यामुळे अमरिंदर सिंग यांचं पारडं जड आहे. पण त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं तर प्रताप बाजवा आणि पक्षसंघटनेचा सक्रीय पाठिंबा मिळणं हे कठीण आहे. पण मग पर्याय काय? अाआप? ते दिल्ली परवडली असला गोंधळ घालतील. एका सीमावर्ती, सामरिक दृष्ट्या महत्वाच्या राज्यात हे कितपत परवडण्यासारखे आहे? दिल्ली विधानसभा ही glorified municipality आहे आणि महत्वाच्या गोष्टी, उदाहरणार्थ पोलिस यंत्रणा केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. पण पंजाबमध्ये ही सगळी यंत्रणा आआपसारख्यांच्या, ज्यांचे प्रमुख शेवटी केजरीवाल असणार आहेत - अशांच्या हाती देणं ही फार मोठी चूक ठरणार नाही का?

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 7:01 pm | गॅरी ट्रुमन

पण पंजाबमध्ये ही सगळी यंत्रणा आआपसारख्यांच्या, ज्यांचे प्रमुख शेवटी केजरीवाल असणार आहेत - अशांच्या हाती देणं ही फार मोठी चूक ठरणार नाही का?

होईलच ना. पण देशात लोकशाही असल्याची ही किंमत आपल्याला मोजायला हवी.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

19 May 2016 - 7:04 pm | ईश्वरसर्वसाक्षी

पण मग पर्याय काय? अाआप? ते दिल्ली परवडली असला गोंधळ घालतील. एका सीमावर्ती, सामरिक दृष्ट्या महत्वाच्या राज्यात हे कितपत परवडण्यासारखे आहे? दिल्ली विधानसभा ही glorified municipality आहे

अतितिव्र सहमती

प्रादेशिक पक्षांना जोवर फायदा दिसतोय तोवर ते एकत्रच रहातील. काँग्रेस किंवा भाजपाशिवाय अशी आघाडी भारतात मुळात कधीच उभीच राहिलेली नाही. काँग्रेस दुर्बळ झाल्यावर ती जागा भाजपाने घेतली असती तर तिचरी आघाडी तुम्ही म्हणता तशी उभीच राहिली नसती. पघा आता ते सत्तेसाठी का होईना एकत्र येतील असे वाटते.

जिथे काँग्रेस आकुंचन पावते आहे आहे ती जागा तिसरेच पक्ष घेताहेत. तेव्हा काँग्रेस व भाजपा शिवायची तिसरी आघाडी उभी रहाण्याची शक्यता पहिल्यांदा उभी रहातेय (आजवर तिसर्‍यांची सरकारे जेव्हा बनली तेव्हा ती या दोन राष्ट्रीय पक्षांनी पाडली आहेत, प्रादेशिक पक्षांच्या अंतर्गत कलहातून नाही हे फक्त नोंदवतो)

तिसरी आघाडी टिकेल किती माहित नाही पण आता ती बनणार हे ऑलमोस्ट नक्की झालेय. काँग्रेस जोवर मजबूत होता तेव्हा ही आघाडी स्वबळावर उभी रहाण्या इतकी शक्यता नव्हती

ऑलमोस्ट यासाठी म्हणालो (त्यापैकी एक कारण तुम्हीच वर नाकारले आहे ते असे की) पंजाबात जर आआपने करिश्मा केला आणि युपीत भाजपाला जिंकता आले नाही की)तिसर्‍या आघाडीवर शिक्कामोर्तब होईल!

ही तिसरी आघाडी भाजपा/एन्डीएला हरवू शकेल का माहित नाही. मात्र काँग्रेस इतकी दुर्बळ झाल्यावर मोदींसमोर उभी राहु शकेल अशी तिच एक आघाडी शिल्लक रहाते इतके तर आता प्रत्येक पक्षाने जाणले आहे. (शिवसेना, तेलुगू देसम हे ही वेळ आली तर लगेच भाजपाकडे पाठ फिरवपाठ)

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 3:55 pm | श्रीगुरुजी

फक्त तॄणमूल काँग्रेस, बिजद, तेरास व तेदे हे ४ प्रादेशिक पक्ष हे त्या त्या राज्यातले एकमेव प्रादेशिक पक्ष आहेत. इतर रा़ज्यात एकापेक्षा जास्त प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आहे व ते एकमेकांचे विरोधक आहेत. त्यामुळे ते एकत्र येणे खूप अवघड आहे. जरी ते एकत्र आले तरी त्यांची आघाडी फार काळ टिकत नाही असे इतिहास सांगतो. आजवरची तिसर्‍यांची सरकारे कार्यकाल पूर्ण करू शकली नाहीत कारण ती सरकारे स्वबळावर सत्तेत आली नव्हती. ती सर्व सरकारे राष्ट्रीय पक्षांच्या पाठिंब्याने सत्तेवर आली होती. त्यामुळे ती सरकारे कार्यकाल पूर्ण करणे शक्यच नव्हते.

दुसरे म्हणजे जिथे जिथे भाजपने स्थान निर्माण केले तिथे बर्‍याच ठिकाणी प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपले आहे (उदा. गोव्यात मगोपा, महाराष्ट्रात देखील मनसे संपुष्टात आली असून शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, आसाममध्ये दोन वेळा पूर्ण १० वर्षे सत्तेवर असलेली आगप आता भाजपच्या दुय्यम भागीदाराच्या भूमिकेत आहे). त्यामुळे तिसरी आघाडी जर निर्माण झाली तर त्यात अगदी थोडेच प्रादेशिक पक्ष असतील व त्यांना शेवटी एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या पाठिंब्यावरच उभे रहावे लागेल. त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेमुळे अशी आघाडी प्रत्यक्षात येणे खूपच अवघड आहे.

राष्ट्रवादी, देवेगौडांचा जनता दल, अण्णा द्रमुक, केरळातले डावे (बंगालातले वायले), समाजवादी किंवा बसपा यापैकी एक, नितीश कुमारांचा जद+राजद (नजीकच्या भविष्यात तरी ते दूर जातीलशी स्वप्ने बघणे मुंगेरीलालची ठरावीत) हे अधिकचे आपापल्या राज्यातील मजबूत पक्ष

माझ्या मते तिसरी (किंवा विकास म्हणतात तसे दुसरी ;) ) आघाडी हा दुर्लक्षिण्याचा विषय राहिलेला नाही. पंजाब व युपी या दोन राज्यांत जर भाजपा व काँग्रेस एकहाती काही करू शकल्या नाहीत तर ही आघाडी नक्की एकत्र येईल.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 4:11 pm | गॅरी ट्रुमन

त्यामुळे तिसरी आघाडी जर निर्माण झाली तर त्यात अगदी थोडेच प्रादेशिक पक्ष असतील व त्यांना शेवटी एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या पाठिंब्यावरच उभे रहावे लागेल.

याच दृष्टीने मला तामिळनाडूमध्ये जयललिता जिंकायला हव्या होत्या. ते मी काही दिवसांपूर्वी खरडफळ्यावर लिहिलेही होते. त्या दृष्टीने आजचे निकाल खूपच चांगले लागले आहेत. जर जयललितांनी स्वीप केला असता तर २०१९ मध्ये तिसऱ्या आघाडीला द्रमुकला न घेता अण्णा द्रमुकला घेण्यात काहीच अडचण नव्हती. पण आता द्रमुकलाही थोड्याच जागा आणि थोडीच मते कमी आहेत. आणि एखाद टक्का मते इकडची तिकडे झाली तर निकाल पूर्ण उलट होऊ शकतो. त्यामुळे आता द्रमुक-अण्णा द्रमुक एकमेकांना तुल्यबळ पक्ष म्हणून सामोरे आले आहेत. आणि ते mutually incomptabile आहेत. डाव्यांचा बंगालमध्ये धुव्वा उडाला असला तरी केरळमध्ये मात्र चांगलेच यश मिळाले आहे. ममता आणि डावे एकाच आघाडीत असणे फारच कठिण. तीच गोष्ट सपा आणि बसपाची. हे दोन पक्ष mutually incompatible आहेत. इतके दिवस लालू आणि नितीशही असेच परस्परविरोधी आहेत असे वाटत होते पण ते एकत्र आले. तरीही लालू-नितीश आणि सपा-बसपा किंवा ममता-डावे यांच्यात तुलना करता येणार नाही. लालू-नितीश अगदी जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनापासून एकमेकांचे सहकारी होते ते अगदी १९९४ पर्यंत. म्हणजे सुरवातीची २० वर्षे हे एकमेकांचे सहकारी होते. पण सपा-बसपा किंवा ममता-डावे यांच्यात तसे सख्य कधीच नव्हते.

आणि त्यातून बंगालमध्ये यश मिळाल्यामुळे ममता आणि तामिळनाडूत यश मिळाल्यामुळे जयललितांचा नेतेपदावरचा दावा अधिक प्रबळ झाला आहे (त्यातल्या त्यात ममतांचा अधिक). नितीशकुमार कितीही काहीही झाले तरी बिहारमध्ये अर्धे तर त्याच आकाराच्या राज्यांमध्ये ममता आणि जयललिता पूर्ण. तेव्हा नितीशकुमारांपेक्षा त्यांचा दावा अधिक प्रबळ असेल. तसेच २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात यश मिळाल्यास मायावतीही त्याच कॅटेगिरीमध्ये येतील. त्यामुळे नितीशकुमार कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी त्यांची वाट तितकी सोपी नाही.

तिसरी आघाडी २०१९ मध्ये अस्तित्वात येणारच नाही असे मी नक्कीच म्हणत नाही. तृणमूल, बिजद, अण्णा द्रमुक/ द्रमुक, सपा/बसपा, जदयु, राजद, आआप, जदस अशी तिसरी आघाडी येऊपण शकेल. पण या आघाडीलाही स्वबळावर बहुमत मिळणे शक्य नाही. शेवटी राष्ट्रीय पक्षावर अवलंबून राहणे आलेच.

कपिलमुनी's picture

19 May 2016 - 5:50 pm | कपिलमुनी

तिसरी आघाडी अस्तित्वात आली तरी राज्यापातळीवरचे यश राष्ट्रीय निवडणूकीत मिळणे अवघड आहे. वाजपेयींच्या वेळी आणि पूर्वीदेखील कडबोळे सरकारने काम पाहिले असल्याने मतदार कधीच आघाडी च्या मागे उभा राहणार नाही.

सध्या महाराष्ट्रात जाणवण्यालायक अस्तित्व फक्त शिवसेनेचं आहे. सेना संपणं फार लांब राहिलं, भाजपाला सेनेच्या नाकदुर्‍या काढाव्या लागतील येत्या काळात.

बोका-ए-आझम's picture

20 May 2016 - 10:57 am | बोका-ए-आझम

शिवसेनेने कितीही आवाज केला तरी त्यांना स्वबळावर भाजपच्या निम्म्याच जागा निवडून आणता आल्या. मुंबई महापालिका जर शिवसेनेला राखता आली तर शिवसेनेत थोडीफार धुगधुगी राहील, आणि हेच ओळखून भाजपने त्याविरूद्ध मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. केंद्रात सेनेला फक्त एक मंत्रिपद आहे. राज्यात महत्वाची सगळी पदं भाजपकडे आहेत. पण १५ वर्षांनंतर सत्ता उपभोगायला मिळत असल्यामुळे सेना गप्प बसली आहे. ते जर सरकारमधून बाहेर पडले तर सहानुभूती भाजपला मिळेल आणि परत जर निवडणूक झाली तर सेनेच्या आत्ता आल्या आहेत तेवढ्याही जागा येणार नाहीत. शिवाय सत्तेत सहभागी होता येणार नाही. हा सगळा व्यावहारिक विचार करूनच सेना सरकारमध्ये गप्प बसलेली आहे. अधूनमधून ते डरकाळी फोडतात, मग त्यांना भाजपबरोबर एका व्यासपीठावर जागा दिली, मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी आमचे मार्गदर्शक वगैरे साखरपेरणी केली, की ते शांत होतात. त्यांच्या नाकदु-या काढणं दूर, त्यांच्यातल्या काहींना फोडून भाजपने महाराष्ट्रात १४४ चा आकडा पार करायचा प्रयत्न केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. मुंबई महापालिकेत सेना काय करते त्यावर भाजप हे कधी करायचं ते ठरवेल असं माझं मत आहे. It's not a question of if, it's a question of when.

अर्धवटराव's picture

20 May 2016 - 11:23 am | अर्धवटराव

पण सेना संपण्याच्या मार्गावर अजीबात नाहि. सेना तिच्या मर्यादीत बालेकिल्ल्यात अगदी सुरक्षीत आहे. सेनेच्या आमदारांची फोडाफोडी केल्यास लोकांची सर्व सहानुभूती सेनेकडे जाते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत उ.प्र. कितीही मदतीला आला (किंवा नाहि आला) तरी महाराष्ट्रातल्या खासदार संख्येचं महत्व कमि होत नाहि. इथे परत सेनाच कामाला येते. राज्य भाजपा लिडरशीप आणि स्वतः मुख्यमंत्री पवारकाकांच्या नादाला लागण्यास तयार नाहित. त्यांना सेनाच हाताशी हवी आहे. उधोजी कितीही वटवट करत असले तरी तो माणुस राजकारणात ममता-जयललीता इतका हडेलहप्पी नाहि. त्यांच्याशी एका विशिष्ट पद्धतीने वाटाघाटी करता येतात. मुख्य म्हणजे कट्टर भाजपा विरोधी लोकमत सावकाश पण निश्चीतपणे हात आणि घड्याळ सोडुन सेनेकडेच पर्याय म्हणुन बघायला लागतील.
या सर्व भांडवलावर सेना टिकुन राहिल, थोडीफार +/- होईल पण सेना संपणार वगैरे अजीबात नाहि. किंबहुना त्यांची गरज ओळखुन दादा-बाबा करत भाजपा त्यांच्याशी वेळप्रसंगी निभावुन न्यायला एक पाऊल स्वतः पुढे टाकेल.

बोका-ए-आझम's picture

20 May 2016 - 1:43 pm | बोका-ए-आझम

सेना हे सगळं करु शकेल. पण करेल का हा प्रश्न आहे. सेनेत आता सध्या दोन सरळसरळ गट आहेत. एक, ज्याला सेनेने एखाद्या सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाप्रमाणे नेमस्तपणे वागावं असं वाटतं आणि दुसरा म्हणजे ज्याला सत्ता ही अधिकृत गुंडगिरीसाठी आणि खळ्ळ खटॅक साठी हवी आहे. जोपर्यंत उधोजींपाशी या दुस-या गटाचं कडं आहे - तोपर्यंत सेना स्वतःचा विस्तार करणं कठीण आहे. हे लोक सेनेकडे स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचं एक साधन म्हणून बघताहेत.उद्या ते दुसरीकडेही जाऊ शकतील. हात आणि घड्याळ यांना पर्याय म्हणून उभं राहायला सेनेला पहिल्यांदा शांत राहणं आणि वेळप्रसंगी दूरगामी फायद्यांसाठी अपमान गिळणं शिकावं लागेल. ते त्यांना सध्या कितपत जमतं हे महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात लोकांना दिसलं आहेच. युती तुटल्यावर ज्या भाषेत शिवसेनेने त्याचा निषेध केला ते पाहून अगदी कट्टर शिवसैनिकही हबकले होते. संजय राऊतांचे सामना मधले अग्रलेख वाचून confuse झालेले शिवसैनिक मी स्वतः पाहिलेले आहेत. त्यातल्या बहुसंख्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला मोदी लाटेमुळे जागा मिळाल्या आणि त्यामुळे भाजप विधानसभेत जास्त जागा मागणार यात काहीही चुकीचं वाटत नव्हतं. पण सेना नेतृत्वाने या समंजस लोकांचं न ऐकता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि मराठवाडा आणि मुंबई अशा दोन ठिकाणी एम.आय.एम. ला चंचुप्रवेश करु दिला.

अर्धवटराव's picture

20 May 2016 - 10:31 pm | अर्धवटराव

जोपर्यंत उधोजींपाशी या दुस-या गटाचं कडं आहे - तोपर्यंत सेना स्वतःचा विस्तार करणं कठीण आहे.

सेनेची हि मर्यादा आहेच. पुढे देखील त्यात फार ड्रास्टीक बदल होईल असं वाटत नाहि. पण स्वतः उधोजींना देखील त्याची जाणीव नक्कीच आहे. सेना महाराष्ट्राच्या राजकारणातुन हद्दपार होईल असं दिसत नाहि.

श्रीगुरुजी's picture

21 May 2016 - 3:41 pm | श्रीगुरुजी

एकदा किंवा अनेकदा सत्ता मिळविलेले अनेक प्रादेशिक पक्ष आज जवळपास संपल्यात जमा आहेत किंवा अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. गोव्यात मगोप पक्षाकडे अनेक वर्षे मुख्यमंत्रीपद होते, आता हा पक्ष जवळपास संपल्यात जमा आहे. कर्नाटकातील देवेगौडाचा पक्ष त्याच अवस्थेत आहे. आसाममध्ये १० वर्षे सत्ताधारी असलेला आसाम गण परीषद हा पक्ष आता भाजपचा दुय्यम भागीदार आहे. महाराष्ट्रात शेकाप कधीच सत्तेवर नव्हता. परंतु प्रत्येक निवडणुकीत शेकापला बर्‍यापैकी जागा मिळत असत (१९८५ मध्ये शेकापचे १२ आमदार होते). आज या पक्षाचे महाराष्ट्रातील अस्तित्व नगण्य आहे. या सर्वांचा र्‍हास होण्याचे मुख्य कारण म्हणजे ते काळानुसार बदलले नाहीत व त्यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न केला नाही.

भाजपशी युती होण्यापूर्वी सेना महाराष्ट्रात नगण्य होती. जोपर्यंत भाजप बरोबर होता तोपर्यंत सेना माज करीत होती. २०१४ मध्ये भाजपने साथ सोडून स्वतःला बरेच मोठे केले. सेनेला हे सहन न झाल्यामुळे सेनेने अत्यंत नकारात्मक भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेने एकतर विरोधी पक्षाची भूमिका घ्यायला हवी होती किंवा नंतर सत्तेत भागीदारी मिळाल्यावर सत्ताधार्‍यांप्रमाणे वागून हातात असलेल्या मंत्रीपदांचा फायदा घ्यायला हवा होता. ते न करता सेना सत्ताधारी पक्षात राहून विरोधाकरीता विरोध ही विचित्र भूमिका घेत आहे. सेना नेते रोज एका नवीन कारणावरून भाजप व मोदींवर हास्यास्पद स्वरूपाची टीका करतात. या विचित्र भूमिकेचा भविष्यात सेनेला तोटा होणार आहे. जर सध्याच्या सरकारचे काम चांगले झाले तर श्रेय भाजपला जाईल व जर सरकारने निराशा केली तर जनमत पुन्हा काँग्रेसकडे वळेल. काहीही झाले तरी सेनेला तोटाच आहे व सेनेचा र्‍हास नजीकच्याच भविष्यात दिसेल.

या कारणावरून हे पक्ष एकत्र आले असतील तर पुढची ८ वर्षे त्यांची एकी राहिली पाहिजे. शिवाय विरोधाचा मुद्दा पाहिजे. २००४ मध्ये गोध्रा आणि इंडिया शायनिंग असे दोन मुद्दे घेऊन काँग्रेसने भाजपला पराभूत केलं होतं. आता हे मुद्दे उरलेले नाहीत. दुसरी गोष्ट एका राष्ट्रीय पक्षाविरुद्ध राष्ट्रीय मुद्द्यांवर लढायला राष्ट्रीय प्रतिमा असलेला नेता पाहिजे. नितीशकुमार विकास या मुद्द्याऐवजी राजद आणि जदयु यांच्यातली मतविभागणी टाळल्यामुळे जिंकले आहेत. जर विकास हा मुद्दा बिहारमध्ये एवढा महत्वाचा असता तर जदयुच्या राजदपेक्षा जास्त जागा आल्या असत्या. शिवाय केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असणं (भाजप) हे कधीही विकासासाठी चांगलं असतं. पण तसा विचार बिहारमधल्या मतदारांनी केला नाही.
शिवाय या तिसऱ्या आघाडीत सध्यातरी उत्तर प्रदेशातील एकही मोठा पक्ष नाही. काँग्रेस उत्तर प्रदेशात नगण्य आहे. मायावती आणि नितीश एकत्र येणं कठीण आहे, कारण दोघेही पंतप्रधानपदासाठी उत्सुक आहेत आणि दोघांनाही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवल्यावर दुय्यम स्थान स्वीकारणं कठीण जाईल. दोघांकडेही ते केंद्रात गेल्यावर राज्य संभाळू शकेल असा दुस-या फळीचा नेता नाही. शिवाय ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असतानाही त्यांचं निम्मं लक्ष बंगालमध्ये असायचं - तसंच नितीश किंवा मायावती यांचं होणार.
शिवाय पुढचं कोणी पाहिलंय? लालूने आपले रंग दाखवले (आणि ते होणारच. चोर चोरीसे जाय, हेराफेरीसे न जाय) तर कदाचित जदयु आणि भाजप परत एकत्र येऊ शकतील. मायावती आणि नितीश एकत्र येण्यापेक्षा याची शक्यता जास्त आहे. मग सगळी समीकरणं बदलून जातील.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 6:06 pm | गॅरी ट्रुमन

जर विकास हा मुद्दा बिहारमध्ये एवढा महत्वाचा असता तर जदयुच्या राजदपेक्षा जास्त जागा आल्या असत्या.

बुबुडाविपुमावि मोड ऑन--

बिहारमध्ये लालूजी आणि सुशासन बाबूंचा नेत्रदीपक विजय म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदींच्या जातीयवादी, फॅसिस्ट सरकारला धर्मनिरपेक्ष तत्वांनी दिलेली जोरदार चपराक होती. आणि शेवटी बिहारमध्ये निवडणुका नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवून लढविल्या होत्या. स्वत: लालूजींने ते मान्यही केले होते.

बुबुडाविपुमावि मोड ऑफ

अर्थातच बोकोबांच्या या म्हणण्याला पूर्ण सहमती.

श्रीगुरुजी's picture

21 May 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

शिवाय या तिसऱ्या आघाडीत सध्यातरी उत्तर प्रदेशातील एकही मोठा पक्ष नाही. काँग्रेस उत्तर प्रदेशात नगण्य आहे. मायावती आणि नितीश एकत्र येणं कठीण आहे, कारण दोघेही पंतप्रधानपदासाठी उत्सुक आहेत आणि दोघांनाही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवल्यावर दुय्यम स्थान स्वीकारणं कठीण जाईल. दोघांकडेही ते केंद्रात गेल्यावर राज्य संभाळू शकेल असा दुस-या फळीचा नेता नाही. शिवाय ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असतानाही त्यांचं निम्मं लक्ष बंगालमध्ये असायचं - तसंच नितीश किंवा मायावती यांचं होणार.

नितीशकुमार व इतर प्रादेशिक नेते (मुलायम, मायावती, ममता, जयललिता, नायडू, पटनाईक) यांच्यात खूप फरक आहे. इतर सर्व प्रादेशिक नेते आपापल्या राज्यात खूप बळकट आहेत. यातील प्रत्येकाने आपापल्या राज्यात किमान एकदा स्वबळावर संपूर्ण बहुमत मिळवून दाखविले आहे. नितीशकुमार आजवर दुसर्‍या पक्षांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत. १९९६ ते २०१३ भाजपबरोबर व २०१५ पासून लालू व काँग्रेसबरोबर युती केल्याने ते सत्तेवर आहेत. त्यांनी फक्त एकदाच (२०१४ ची लोकसभा निवडणुक) स्वबळावर लढविली होती व त्यात त्यांच्या पक्षाला ४० पैकी फक्त २ जागा मिळाल्या होत्या. इतर पक्ष मदतीला नसतील तर त्यांचे काही चालू शकत नाही. त्यामुळे आपापल्या राज्यात प्रचंड जनाधार असलेले इतर प्रादेशिक नेते त्यांना आपला नेता कधीही मानणार नाहीत.

याबाबतीत नितीशकुमारांचे शरद पवारांशी साम्य आहे. शरद पवारांना महाराष्ट्राच्या काही भागातच पाठिंबा आहे. काही भागांचा अपवाद वगळता महाराष्ट्राने त्यांना आपला नेता कधीच मानले नाही. आपण राष्ट्रीय नेता आहोत व भविष्यातील तिसर्‍या आघाडीचा नेता आपणच अशी त्यांनी कितीही बतावणी केली तरी त्यांना महाराष्ट्रात किती कमी जनाधार आहे हे इतर सर्वजण जाणून आहेत. त्यामुळे पवार हे इतरांना नेता म्हणून कधीही मान्य होणार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 3:09 pm | श्रीगुरुजी

निकालांचा भांडवली बाजारात नकारात्मक परीणाम झाला आहे. मुंबई भांडवल बाजाराचा निर्देशांक आज २७० अंकांनी म्हणजेच जवळपास १% ने उतरला आहे. डावे अजून पूर्ण नेस्तनाबूत झाले नाहीत हे यामागचे कारण असावे का?

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 3:19 pm | गॅरी ट्रुमन

निकालांचा भांडवली बाजारात नकारात्मक परीणाम झाला आहे. मुंबई भांडवल बाजाराचा निर्देशांक आज २७० अंकांनी म्हणजेच जवळपास १% ने उतरला आहे. डावे अजून पूर्ण नेस्तनाबूत झाले नाहीत हे यामागचे कारण असावे का?

वाटत नाही. जूनमध्ये अमेरिकन फेडच्या चेअरपर्सन जॅनेट येलन व्याजाचे दर वाढवतील ही शक्यता अधिक ठळक झाली आहे असे आजचे मार्केटमधले चित्र आहे. त्यामुळे बाजार आज खाली आहे.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 3:12 pm | गॅरी ट्रुमन

जुलै २०१७ मध्ये विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर जर काँग्रेसींनी नेतृत्व त्यांच्याकडे सोपविले

तसे करण्यास घटनात्मक अडचण कुठलीच नाही. पण तसे करणे प्रशस्त होणार नाही. राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीने परत पक्षीय राजकारणात पडणे प्रशस्त होणार नाही. आजपर्यंत तसे कधीच झालेले नाही. दुसरे म्हणजे २०१७ मध्ये स्वत: प्रणव मुखर्जी जवळपास ८२ वर्षांचे होतील. म्हणजे ते ही फार तरूण आणि energetic असतील असे नाही. तिसरे म्हणजे प्रणव मुखर्जी अत्यंत कुशल प्रशासक असले तरी त्यांना लोकांमध्ये लोकप्रियता आहे असेही नाही. ते संसदीय राजकारणात अगदी १९७० पासून आहेत पण त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणुक लढवली २००४ मध्ये. राजीव गांधींनी मतभेद झाल्यानंतर त्यांची सुरवातीला मंत्रीपदावरून आणि १९८६ मध्ये कॉंग्रेस पक्षातून उचलबांगडी झाली. त्यावेळी त्यांनी स्वत:चा National Socialist Congress नावाचा पक्ष स्थापन केला होता. १९८७ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकाही या पक्षाने लढविल्या. आणि सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले हे वेगळे सांगायलाच नको.तेव्हा प्रणवदा परत पक्षीय राजकारणात सक्रीय झाले तरी त्याचा कितपत उपयोग होईल?

बाकी कॉंग्रेसमधल्या इतर कुठल्याच नेत्याला जनाधार नाही. त्यामुळे यापुढील काळात नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिल हे नक्कीच. इतकी वर्षे एकाच कुटुंबावर अवलंबून राहणे आणि प्रभावी दुसरी फळी निर्माण होऊ न देण्याचे परिणाम आहेत हे.

कॉंग्रेज पक्षाला मत देणे तर सोडाच.
पण आजकाल कॉंग्रेज पक्षाच्या कोणत्याही नेत्याला नुसते पाहिल्यावर देखिल 'जोड्या'ने हाणावेसे वाटते.

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 3:38 pm | श्रीगुरुजी

तसे करण्यास घटनात्मक अडचण कुठलीच नाही. पण तसे करणे प्रशस्त होणार नाही. राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीने परत पक्षीय राजकारणात पडणे प्रशस्त होणार नाही. आजपर्यंत तसे कधीच झालेले नाही.

भाजपचे भैरवसिंह शेखावत २००२ ते २००७ या काळात उपराष्ट्रपती पदावर होते. २००७ मध्ये त्यांनी प्रतिभा पाटलांविरूद्ध राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढविली. परंतु त्यात त्यांना अपयश आले. २००७ मध्ये उपराष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी निवृत्तीचे जीवन जगणे अपेक्षित होते. परंतु रालोआने त्यांना जॉर्ज फर्नांडिसांच्या जागी रालोआचा कोऑर्डिनेटर म्हणून नेमले. रालोआतील घटक पक्षांशी सुसंवाद साधणे, समान कार्यक्रम बनविणे, एकत्रित निवडणुक लढविले इ. कामे आघाडीचा निमंत्रक या नात्याने करणे अपेक्षित होते. म्हणजे उपराष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर ते पुन्हा एकदा पक्षीय राजकारणात पडले होते.

त्यांचे काही कालानंतर निधन झाल्याने त्यांना फारसे काम करता आले नव्हते व नंतर त्यांच्या जागी शरद यादवांची नेमणूक झाली होती.

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 3:52 pm | गॅरी ट्रुमन

२००७ मध्ये उपराष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी निवृत्तीचे जीवन जगणे अपेक्षित होते. परंतु रालोआने त्यांना जॉर्ज फर्नांडिसांच्या जागी रालोआचा कोऑर्डिनेटर म्हणून नेमले.

नाही.

डिसेंबर २००८ मध्येच जॉर्ज फर्नांडिस आजारी असल्याच्या कारणामुळे त्यांच्या जागी शरद यादव यांची NDA Convenor म्हणून नियुक्ती झाली होती . मधल्या काळात भैरोसिंग शेखावत त्या पदावर नव्हते.

शेखावतांनी निवृत्तीनंतर पक्षीय राजकारणावर एकच वक्तव्य केले होते. २००९ मध्ये अडवाणी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. खरे तर वाजपेयी, अडवाणी आणि शेखावत (आणि १९७३ पर्यंत बलराज मधोक) हे अगदी वरीष्ठ फळीतले नेते होते. अशावेळी आपणही पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतो असे शेखावत २००९ च्या निवडणुकांपूर्वी म्हणाले होते.

श्रीगुरुजी's picture

19 May 2016 - 4:00 pm | श्रीगुरुजी

माहिती पुन्हा एकदा चेक करतो. शेखावतांना रालोआचा संयोजक म्हणून नेमण्याचे वृत्त वृत्तपत्रात वाचले होते. त्याची लिंक शोधतो.

चौकटराजा's picture

19 May 2016 - 3:42 pm | चौकटराजा

दलितामधे एकी नसल्याने त्यात काशीराम मायवती पासून दलितांची तर मुलायम पासून मुस्लिमांची गळती कॉन्ग्रेस मधून होउ लागली आता तर एम आय एम आली व भाजपने भटजी व शेटजी इमेज बर्‍यापैकी पुसल्याने हे चित्र असे दिसत आहे. पण शिवसेना, द्रमुक, त्रुणमूल असे प्रादेशिक पक्ष निर्माण होणे फारसे बरे नाही. आता गांधी घराण्याची इतकी
चटक कॉन्ग्रेस ला लागली आहे की ती सुटणे अशक्य सबब त्यांचा नाश अटळ. बाकी मोदी विरूद्ध नीतिशकुमार ? काय राव चेष्टा करता की काय ...? मोदी शंभर अपराध करण्याचे पातक करतील असे वाटत नाही.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

19 May 2016 - 5:55 pm | ईश्वरसर्वसाक्षी

क्लिंटन भाउ तुम्हि बरोबर बोललात....हे बघा आयबिएन ला काय बातमि आहे.
"प्रादेशिक पक्षांच्या या यशामुळे आता तिसर्‍या आघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बिहार हा आमचा शेजारी आहे असं सांगत ममतादीदींनी तसं बोलूनही दाखवलंय. त्यामुळे भव्यिष्यात तिसरी आघाडी उदयास आली तर राजकारणात हा एक नवा आध्याय असेल."
मला तरी वाटतय कि आता काँग्रेस पक्षाने गांधि परिवाराला थोडे बाजुला सारून पक्षबांधणि करावि. असल्या तिसर्‍या - चौथ्या आघाड्यांपेक्षा आणि नौटंकि युगपुरुषांपे़क्षा मजबुत काँग्रेस कधिहि चांगलि. पण हे वाटणे झाले आता युवराजांनि महात्माजींच स्वप्न तेच ते काँग्रेस विसर्जित करण्याचे इतके मनावर घेतले असेल तर आपण वाटुन तरि काय करु शकतो.
कन्हैय्या और उसके चाहने वाले कहा है ?

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2016 - 6:41 pm | गॅरी ट्रुमन

भव्यिष्यात तिसरी आघाडी उदयास आली तर राजकारणात हा एक नवा आध्याय असेल.

असे किती नवे अध्याय भारताच्या इतिहासात झाले याची टाईमलाईन रोचक आहे.

१९४८ -- जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी पक्ष स्थापन केला.

१९५१-- पहिल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी आचार्य कृपलानींनी काँग्रेसमधून बाहेर पडून किसान मजदूर प्रजा पक्ष या आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

१९५२-- पहिल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्ष आणि आचार्य कृपलानी यांच्या किसान मजदूर प्रजा पक्ष यांचे विलीनीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना

१९५५-- प्रजा समाजवादी पक्षातून राम मनोहर लोहिया बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा समाजवादी पक्ष स्थापन केला

१९६४--प्रजा समाजवादी पक्षातून जॉर्ज फर्नांडिस बाहेर पडले आणि संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना

१९६७--चरणसिंग कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा भारतीय क्रांती दल हा पक्ष स्थापन केला

१९६९--बिजू पटनाईक कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा उत्कल कॉंग्रेस पक्ष स्थापन केला

१९६९--कॉंग्रेस पक्षात फूट. इंदिरा गांधींचा गट आणि मोरारजी देसाईंचा कॉंग्रेस (संघटना) असे दोन पक्ष झाले.

१९७२--प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांचे विलीनीकरण होऊन परत एकदा समाजवादी पक्ष या नावाने पुनर्जन्म

१९७४--चरणसिंगांचा भारतीय क्रांती दल, बिजू पटनाईकांचा उत्कल कॉंग्रेस, १९७२ मध्ये प्रजा आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांच्या विलीनीकरणातून पुनर्जन्म झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला स्वतंत्र पक्ष, भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला पक्ष (नाव नक्की लक्षात नाही) आणि अन्य एक-दोन लहान पक्ष यांचे विलीनीकरण होऊन भारतीय लोकदल हा पक्ष स्थापन झाला

१९७७ -- जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा, नंदिनी सत्पथी, नारायणदत्त तिवारी कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांच्या कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी या पक्षाची स्थापना. त्यांचा कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी, १९६९ च्या फुटीतील इंदिराविरोधी गट-- संघटना कॉंग्रेस (कॉंग्रेस-ओ), चरणसिंगांचा भारतीय लोकदल आणि भारतीय जनसंघ या पक्षांनी विलीन होऊन त्यातून जनता पक्ष स्थापन झाला.

१९७८ --- शरद पवार, वायलार रवी, के.पी.उन्नीकृष्णन आणि अंबिका सोनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी समाजवादी कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली.

१९७९-- जनता पक्षातून चरणसिंग, जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये इत्यादी बाहेर पडले आणि त्यांचा जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) हा पक्ष स्थापन झाला.

१९८० -- जनता पक्षातून पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांची हकालपट्टी. त्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. चरणसिंग यांनी जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) सोडून भारतीय लोकदल पक्षाची पुनर्स्थापना केली. जगजीवनराम यांनी जनता पक्षातून बाहेर पडून कॉंग्रेस (जे) या पक्षाची स्थापना केली.

१९८७-- कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर वि.प्र.सिंगांनी जनमोर्चा या गटाची स्थापना केली. शरद पवार, वायलार रवी आणि अंबिका सोनी समाजवादी कॉंग्रेस सोडून कॉंग्रेस पक्षात परतल्या. समाजवादी कॉंग्रेसमध्ये केवळ के.पी.उन्नीकृष्णन राहिले.

१९८८-- चरणसिंगांचा (आणि त्यांचे निधन झाल्यानंतर अजित सिंगांचा) भारतीय लोकदल, के.पी. उन्नीकृष्णन यांचा समाजवादी कॉंग्रेस आणि वि.प्र.सिंगांचा जनमोर्चा या तीन पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल हा पक्ष स्थापन झाला.

१९९०-- चंद्रशेखर आणि देवीलाल जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:च्या समाजवादी जनता दलाची स्थापना केली. मुलायमसिंग यादव, चिमणभाई पटेल हे सुध्दा समाजवादी जनता दलात सामील झाले. राजस्थानात दिग्विजय सिंग (कॉंग्रेसमधील वाचाळवीर दिग्विजयसिंग आणि हे वेगळे) जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा वेगळा गट स्थापन केला. त्यांनी राजस्थानचे भाजपचे मुख्यमंत्री भैरोसिंग शेखावत यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदही पटकावले.

१९९१-- कॉंग्रेसचे चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलाशी फाटल्यावर गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी समाजवादी जनता दलातून बाहेर पडून जनता दल (गुजरात) या पक्षाची स्थापना केली. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर चिमणभाई पटेल मुख्यमंत्रीपदी कायम राहिले.

१९९२-- जनता दल (गुजरात) पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन झाला. अजित सिंग यांनी जनता दलातून बाहेर पडून स्वत:चा जनता दल (अजित) या पक्षाची स्थापना केली. मुलायमसिंग यादव यांनी समाजवादी जनत दलातून बाहेर पडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.

१९९३-- उत्तर प्रदेशातील महत्वाच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनता दल, जनता दल (अजित) आणि समाजवादी जनता दल या तीन पक्षांनी एकत्र येऊन एकाच पक्षाची स्थापना करायची घोषणा केली. पण उत्तर प्रदेशात पराभव झाल्यानंतर प्रत्यक्ष विलीनीकरण झालेच नाही. त्यानंतर जनता दल (अजित) पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन झाला आणि नरसिंह राव सरकारमध्ये अजितसिंग मंत्री झाले.

१९९४-- जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि रबी रे यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली.

१९९५--हरियाणात देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समाजवादी जनता दल सोडून समता पक्षात प्रवेश केला.

१९९६-- चंद्रशेखर १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये समता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. देवेगौडा पंतप्रधान झाल्यानंतर जनता दलातून रामकृष्ण हेगडेंची हकालपट्टी. त्यांनी स्वत:चा लोकशक्ती हा पक्ष काढला. हरियाणात देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा हरियाणा लोक दल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला.

१९९७-- लालू यादव यांनी जनता दलातून बाहेर पडून स्वत:च्या राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. अकरावी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर चंद्रशेखर यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) या पक्षाची स्थापना केली. तसेच ओरिसामध्ये नवीन पटनायक आणि दिलीप रे यांनी जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दल या वेगळ्या पक्षाची स्थापना केली.

१९९९-- उरल्यासुरल्या जनता दलाचे आणखी दोन तुकडे पडले-- जनता दल (संयुक्त) आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष). देवेगौडा जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षात गेले तर रामविलास पासवान जनता दल (संयुक्त) पक्षात गेले. जॉर्ज फर्नांडिस-नितीशकुमारचा समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडेंचा लोकशक्ती हे पक्ष जनता दल (संयुक्त) पक्षात विलीन झाले.

२००२-- रामविलास पासवानांनी जनता दल (संयुक्त) पक्ष सोडून स्वत:चा लोकजनशक्ती या पक्षाची स्थापना केली.

२०१४-- मोदीलाटेत वाहून गेल्यानंतर सर्व जनता दलांनी एकत्र यायची गोष्ट सुरू झाली.

२०१५-- प्रस्तावित एकीकरणास मुलायमसिंग यादव यांनी मोडता घातला.

माझी खात्री आहे की यापैकी मधल्या अनेक पायर्‍या मी विसरलेलो आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात असे किती नवे अध्याय लिहिले गेले आणि जनता दल, जनता पक्ष या नावाचे किती वेगवेगळे पक्ष स्थापन झाले याची गणतीच नाही.

विकास's picture

19 May 2016 - 8:01 pm | विकास

चार ओंडक्यांची होते निवडणुकीत भेट
एक लाट तोडी, तरीही बांधतात मोट.