अक्षय पावभाजी

घाटी फ्लेमिंगो's picture
घाटी फ्लेमिंगो in जनातलं, मनातलं
13 May 2016 - 11:42 am

ब्रेकफास्टला पावभाजी खाण्याची ही काही माझी पहिली वेळ नाही. आदल्या दिवशी घरात काही कार्यक्रम झाला आणि आलेल्या पाहूण्यांसाठी पावभाजीचा मेनु असेल तर पुढचे दोन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ राहिलेली पावभाजी संपवण्याचा अनुभव मला अगदी लहानपणापासूनचा आहे. फक्त माझी आई किंवा बायकोच नाही... तर इतरही काही माता-भगिनींच्या बाबतीत मी हे होताना पाहिलं आहे. एकदा केलेली पावभाजी केलेल्या दिवशी संपली अथवा कमी पडली हे माझ्या तरी ऐकीवात नाही.

ह्या भाजीबरोबर खायला आणलेले पाव संपतात... मग चौकोनी ब्रेडच्या स्लाईसवर ह्या भाजीला साथ देण्याची जबाबदारी येते..! तेही दम तोडतात... तरीही टेबलावर ठेवलेल्या अक्षयपात्रातुन भाजी आपल्या तोंडाकडे बघत आव्हान देतच असते...! मग सारखा-सारखा ब्रेड नको म्हणून अगदी पोळीबरोबरसुद्धा ही संपवण्याचा प्रयत्न होतो...! कधी कधी रात्रीच्या दहीभाताला चव म्हणून ही पुरते...! ह्या सगळ्या प्रयासानंतर कित्येकदा रात्री मी ह्या भाजीवर ’सुलतानढवा’ देखिल करुन बघितला आहे. ’सुलतानढवा’ म्हणजे पुर्वी युद्धामध्ये सगळे प्रयत्न करुन झाले की शेवटचा एक जोरदार हल्ला करायचा... अगदी निकराचा... आणि निकालाचा...! एक तर तु नाहीतर मी...!! पण ह्याचे पर्यवसन मी रात्री-अपरात्री उठून जेल्युसील आणि थंड दुध पिण्यातच झाले आहे...!

कितीही लोक येऊन जावोत... ते कितीही मिटक्या मारत खावोत... गृहीतदेखिल न धरलेले पाहूणे येवोत... भाजीची कढई आपली जैसे थे...! ह्या पावभाजीच्या पात्राला द्रौपदीच्या अक्षय पात्रासारखं काहीतरी वरदान असावं...! कधीच न संपण्याचं...! मला वाटतं दुर्वास ऋषी आपले सहस्त्रावधी शिष्यगण अचानक पांडवांच्या कुटीरावर घेऊन आले होते त्या दिवशी द्रौपदीने नेमकी पावभाजी केली असावी. एकाचवेळी अगदी मुबलक प्रमाणात चविष्ट समाधान देणारा हा पदार्थ कितीहीवेळा खाल्ला तरी पुढच्यावेळी अगदी तेवढाच इंटरेस्टींग वाटतो हे मात्र खरं...! ’आज जरा काहीतरी वेगळं करुया’ ह्या उत्साही प्रपोजलला... ’आज पावभाजी करुयात का’ हे अतिउत्साही उत्तर अगदी सहज येतं...!!!

असो... येवढ्यावेळात तिकडे कालची पावभाजी गरम झाल्याचा घमघमाट घरभर पसरला आहे. ब्रेकफास्ट... लंच की डिनर हा प्रश्नच ह्या त्रिकालव्यापी खाद्यव्यंजनानी कालातीत करुन टाकला आहे. कुठल्यातरी क्षुधाशांतीची वेळ झाली येवढंच भान सध्या उरलं आहे...!!!

घाटी फ्लेमिंगो

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

<मामोऑ>
मुरलेली पावभाजी जास्त चांगली लागते असं आमचे हे म्हणतात. मी तर करतानाच मुद्दाम दोन दिवस पुरेल अशी करते. वयानुसार बटर जरा कमी पडत एवढंच. लेख छान खमंग आहे हा पावभाजीसारखा.
<मामोऑ>

अर्र्र ते माई मोड ऑन ऑफ घालून दया कुणीतरी प्लीज :)

अस्वस्थामा's picture

13 May 2016 - 4:32 pm | अस्वस्थामा

अजून एक डु-आयडी उघडा पडला असं दिसतंय .. ;))

वैभव जाधव's picture

13 May 2016 - 5:11 pm | वैभव जाधव

एक?

माझे च पाच सात असतील. माईसाहेब तर देवानंतर लगेच म्हणजे विचार करा.

बाकी घाटी फ्लेमिंगो हे छान लिहीत आहेत.

ओ कायपण काय माई कुठे मी कुठे ;)

मी-सौरभ's picture

27 May 2016 - 4:43 pm | मी-सौरभ

आज काल माई नसल्याने 'मोड'क जास्त आहेत.

घाटी फ्लेमिंगो's picture

15 May 2016 - 5:52 pm | घाटी फ्लेमिंगो

सत्यवचन

अपरिचित मी's picture

13 May 2016 - 12:25 pm | अपरिचित मी

अगदी सहमत.. आमच्या घरीही हीच परिस्थिती...
नंतर च्या पूर्ण दिवस मिळणाऱ्या आरामा समोर... नवरा रुपी नारदाचे " अच्छा म्हणजे पुढचे दोन दिवस हाच मेनू तर " असे टोमणेही आम्ही सहन करतो.... खी खी खी ....

नीलमोहर's picture

13 May 2016 - 12:39 pm | नीलमोहर

घाटी फ्लेमिंगो कोणत्या रंगाचे असतात ?

बोका-ए-आझम's picture

13 May 2016 - 1:35 pm | बोका-ए-आझम

आणि बटरवर भाजलेल्या पावाचा पिवळाधमक.

घाटी फ्लेमिंगो's picture

15 May 2016 - 5:54 pm | घाटी फ्लेमिंगो

परिस्थितीनुसार बदलत्या रंगाचे...!! ;)

चला ह्या रविवारच्या मेन्युचा प्रश्न सुटाला....

तुमच्या पैल्याच लेखाच्या वेळी आमच्या आप्पूताईची(स्पंदना) आठवण झालेली. आता अक्षय पावभाजी नाव आणि प्री रेसेपी वातावरण निर्मीतीची स्टैल वाचून तर जास्तच आली.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 May 2016 - 2:00 pm | llपुण्याचे पेशवेll

एक नंबर. आमच्याकडे आमच्या बालपणापासून अशीच रग्गड भाजी केली जाते. जेणेकरून पुढे २ दिवस पुरेल. :)
झक्कासच.

वेल्लाभट's picture

13 May 2016 - 2:01 pm | वेल्लाभट

कड्डक ! आवडलं विचाररंजन

अजया's picture

13 May 2016 - 2:02 pm | अजया

:)
आम्ही पावभाजी करतानाच आजचे जेवण आणि लेकाच्या उद्याच्या दुपारच्या खाण्याची सोय असे करतो!मग करावीच लागते ढिगभर!

बोका-ए-आझम's picture

13 May 2016 - 2:17 pm | बोका-ए-आझम

त्यात टॅबॅस्को साॅस घालून छान लागते.

मुक्त विहारि's picture

13 May 2016 - 4:27 pm | मुक्त विहारि

मी चुकून "टोबॅको सॉस" असे वाचले.

घाटी फ्लेमिंगो's picture

15 May 2016 - 5:57 pm | घाटी फ्लेमिंगो

ट्राय करायला पायजे एकदा..!!

रात्री केलेली पावभाजी दुसऱ्या दिवशी सकाळी जास्त छान लागते. पावभाजी ची कढई अशी दुसऱ्या दिवशी चाटून पुसून लख्ख करण्याची मजा काही औरच!
बाकी लेख सुद्धा तसाच खमंग जमलाय.

सविता००१'s picture

13 May 2016 - 4:09 pm | सविता००१

पावभाजी अशीच करायची असते.
अक्षय पावभाजी नाव फार आवडलं.

मुक्त विहारि's picture

13 May 2016 - 4:26 pm | मुक्त विहारि

एकदा केलेली, पावभाजी २-३ दिवस खाणारा मी एकटाच नाही तर.

mugdhagode's picture

13 May 2016 - 5:17 pm | mugdhagode

हो, असेच होते.

अफ्रिकेचा मुम्बैकर's picture

13 May 2016 - 6:12 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर

खमन्ग

रेवती's picture

14 May 2016 - 2:33 am | रेवती

छान लिहिलय.

सस्नेह's picture

14 May 2016 - 11:26 am | सस्नेह

मस्त लिहिलय !
अगदी अश्शीच पावभाजी घरोघरी असते हे पटलंच !

भिंगरी's picture

14 May 2016 - 12:01 pm | भिंगरी


मी तर करतानाच मुद्दाम दोन दिवस पुरेल अशी करते.

अगदी हेच म्हणायचं आहे.

प्रीत-मोहर's picture

14 May 2016 - 2:22 pm | प्रीत-मोहर

सही!!

किसन शिंदे's picture

14 May 2016 - 2:28 pm | किसन शिंदे

पावभाजी चुकून हाॅटेलातही कधी खात नाही, त्यामुळे घरी करण्याचा प्रश्नच येत नाही. बाकी लेख वाचून खरंच अपर्णा ताईंची आठवण झाली.

घाटी फ्लेमिंगो's picture

15 May 2016 - 5:59 pm | घाटी फ्लेमिंगो

अपर्णा ताईंच्या प्रोफाईलची लिंक आहे का? वरती पण एका ठिकाणी उल्लेख आला आहे.

रुपी's picture

28 May 2016 - 1:01 am | रुपी

ही घ्या लिंक

उगा काहितरीच's picture

14 May 2016 - 2:57 pm | उगा काहितरीच

पावभाजीवर सुलतानढव्हा करायचं तर पाव , ब्रेड , चपाती असं सैन्य असून चालत नाही. मस्त भात पाहिजे त्यात भाजी टाकायची व्यवस्थित कालवायची अन् हाणायची! कशी संपत नाही भाजी ?

घाटी फ्लेमिंगो's picture

15 May 2016 - 6:01 pm | घाटी फ्लेमिंगो

आणि रात्री अपरात्री छातीत जळजळ झाली की उठायचं...!! ;)

झालंय करून हे पण..!!

उगा काहितरीच's picture

15 May 2016 - 6:35 pm | उगा काहितरीच

पावभाजी खानेवाले जळजळ से नही डरते !

Rahul D's picture

27 May 2016 - 10:49 pm | Rahul D

प्रचंड अनुमोदन..

घाटी फ्लेमिंगो's picture

28 May 2016 - 1:01 pm | घाटी फ्लेमिंगो

फसफसतं इनो की गारेगार दुध ते तुम्ही ठरवा...!!! ;)

पावभाजीचा पुलाव नामक एक पदार्थ भात वापरुन करता येतो.
पुलाव+तडका= खल्लास पदार्थ..

घाटी फ्लेमिंगो's picture

15 May 2016 - 6:02 pm | घाटी फ्लेमिंगो

खुसखुशीत कॉमेंट्ससाठी धन्यवाद मिपाकरांनो...!!

पैसा's picture

15 May 2016 - 6:22 pm | पैसा

खमंग लेख

नूतन सावंत's picture

15 May 2016 - 7:16 pm | नूतन सावंत

पावभाजी फारशी आवडत नाही.पण लेख आवडला.

एक एकटा एकटाच's picture

15 May 2016 - 7:35 pm | एक एकटा एकटाच

मस्त लेख

आवडेश

घाटी फ्लेमिंगो's picture

27 May 2016 - 12:12 pm | घाटी फ्लेमिंगो

प्रतिक्रियांसाठी आभारी आहे मिपाकरांनो..!!

मृत्युन्जय's picture

27 May 2016 - 2:51 pm | मृत्युन्जय

सहमत आहे. पावभाजी ही अशीच खायची असते आणी अशीही दुसर्‍या दिवशी मुरलेली भाजी जास्त चांगली लागते. दिवसागणीक चव बहरणारा दूसरा पदार्थ म्हणजे पुरणपोळी

मी उरवून ठेवतो… तीच गत साध्या किंवा फोडणीच्या खिचडीची… दुसऱ्या दिवशी या तिघांना जादाची फोडणी द्यायची आणि मग अन्नपूर्णेला आशीर्वाद देत देत त्या अन्न ब्रम्हाच्या स्वाद समाधीत गर्क व्हायचे.

घाटी फ्लेमिंगो's picture

28 May 2016 - 1:03 pm | घाटी फ्लेमिंगो

भारीच आयडीयाय की तुमची...!!

रात्री मधेच दचकून जागा होऊन, माजघरातल्या फडताळातील चोरकप्प्यात सगळे व्यवस्थित आहे याची खात्री करून आलो तरी रात्रभर काळीज धडधडत असते माझे. शेवटी एकदा सकाळी नाष्ट्याला माझा खजिना मिळाला की मगच मी शांत होतो.

मी-सौरभ's picture

27 May 2016 - 4:46 pm | मी-सौरभ

आमच्या सारख्या पुणेरी चित्पावनांकडे असले घोळ होत नाहीत. आम्ही पुरेसेच जेवण बनवतो ;)

घाटी फ्लेमिंगो's picture

28 May 2016 - 1:05 pm | घाटी फ्लेमिंगो

चुकून कोण अर्धपोटी राहिलं तरी चालल... जेवण संपलं म्हन्जे झालं...!!