रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा ??

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
6 May 2016 - 8:17 am
गाभा: 

पोलिसांच्या राजेबद्द्ल ची हि बातमी वाचून एक सलत असलेला विषय मांडावासा वाटतोय.

आपल्या कडे एकूणच रजा घेणे हे काहीतरी चूक, पाप, अनैतिक किंबहुना अनावश्यक आहे ...नाईलाज म्हणून रजा हा प्रकार अस्तित्वात आहे अशी काहीशी मानसिकता आहे. रजा देणारा, स्वत:च्या खिशातून काहीतरी मेहेरबानी म्हणून दिल्यासारखी रजा देतो आणि घेणारा रजा मिळाली कि 'हुश्श' करतो असे सर्वसाधारणपणे दिसते. पुलंनी म्हटल्याप्रमाने (विनोदाने का होईना) "कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची १२०० सुलभ कारणे" वगैरे हे ह्याच मानसिकतेची अपरिहार्य परिणती आहे. आपल्याकडे आपण जनरली १ २ दिवस रजा घेतो पण ती घेतांना काहीशी चोरटे पणाची भावना असते... रजेवर गेलास तरी फोनवर उपलब्ध राहा अशी मूक आज्ञा बॉसच्या चेहेऱ्यावर स्वच्छ लिहिलेली असते ...आणि क्वचित वेळीप्रसंगी रजा रद्द करून परत यावे लागण्याची उदाहरणे पाहिलेली आहेत.

पाश्चात्य जगात लोक २ -२/ ३- ३ आठवडे रजा वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा अगदी सहज घेतांना दिसतात .. ...कामाची काही का आग लागेना रजा रद्द करून परत आलाय किंवा रजेवर गेलाच नाही ...असे मी कधीही पहिले नाही ...

जे हक्काच्या रजेचे तेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्ट्यांचे, आपल्याकडे कुणीही कधीही कुणालाही फोन करून कामाचे बोलू शकतो, पाश्चात्य जगात सुट्टी सोडा कामाचे तास सोडून कुणी फोनवर एरवी प्रतिसाद सुद्धा देणार नाहीत (ह्याला अपवाद म्हणजे खरोखरीचे काहीतरी जबरदस्त कारण असते).

ह्याच्यावर कडी म्हणजे रजा किती साठवता येते ह्यावर दिवसेंदिवस येणारी बंधने ...म्हणजे वरच्या रजांचे नं पैसे मिळणार नं त्या पुढे घेण्याची सुविधा मिळणार ...आणि त्या फक्त वाया जाणार म्हणजे पर्यायाने कर्मचार्याचे नुकसान ...

माझा अनुभव खाजगी क्षेत्रातला आहे पण सार्वजनिक क्षेत्रात फार बरी परिस्थिती असेल असे वाटत नाही ..

हे असे का ? बदलायला नको का ?काय करता येईल ?

जाता जाता : माझ्यापुरते बोलायचे तर मी माझ्या टीम्स मध्ये रजेला कधीही नाही म्हणत नाही, कारणांची उलटतपासणी नाही किंबहुना रजा घेण्यासाठी उद्युक्त करतो ... जेणेकरून टीम मध्ये एक तणावरहित वातावरण निर्माण होते .. लोक एकमेकांची जास्त काळजी घेतात आणि एकमेकांच्या रजांमध्ये कामाची खोटी होऊ देत नाहीत ...आणि त्यातून काही खोटी झालीच तर मी जबाबदारी घेऊन कुणाला झळ बसू देत नाही आणि ह्यामुळे खरे तर उरला सुरला तणाव सुद्धा नाहीसा होतो ...

प्रतिक्रिया

mugdhagode's picture

6 May 2016 - 8:26 am | mugdhagode

सहमत

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 May 2016 - 8:29 am | कैलासवासी सोन्याबापु

रजा म्हणजे ??

धन्यवाद! =))

तुमच्या टीम मध्ये जागा आहे काय ?

प्रीत-मोहर's picture

6 May 2016 - 9:28 am | प्रीत-मोहर

आमच हापिस एक सरकारी असल तरी ऑटोनॉमस बॉडी आहे. आम्हाला डायरेक्ट सांगतात रजा हा हक्क नाही म्हणुन .
विषय कट.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 May 2016 - 10:18 am | कैलासवासी सोन्याबापु

आम्हाला म्हणतात की सुटी हक्क आहे तरी देणार नाही! करायला काय नसले तर इथं पाखरं हुलत बसा घरी जाऊन कुठला कुळव धरायचाय तुम्हाला :P

प्रीत-मोहर's picture

6 May 2016 - 12:47 pm | प्रीत-मोहर

लोल. दुष्मन नाही सीमेवर मी जातो अस सैनिकाने म्हंटल तर कस व्हायच हो. (हलकेच घ्या बर का )

समीरसूर's picture

6 May 2016 - 9:30 am | समीरसूर

रजा हवीच. आपल्या मतांशी सहमत. एका वर्षात ७-८ दिवस सलग राजा घेऊन कामापासून दूर राहणे आवश्यक आहेच शिवाय मध्येच एखाद्या दिवसाची दांडी अत्यावश्यक आहे. अर्थात कामाविषयी खूप प्याशन असेल तर रजेचा मुद्दा गौण ठरतो. ब्रेक मिळाला की प्रोडक्टिविटी वाढते असे निरीक्षण आणि अनुभव आहे.

रायनची आई's picture

6 May 2016 - 9:44 am | रायनची आई

ह्या लेखातील शब्दाशब्दाशी सह्मत...

नाखु's picture

6 May 2016 - 9:49 am | नाखु

थोडेसे गुटखा/हातभट्टी दारू बाबत सरकारी धोरणासारखे आहे.

खोटे कारण सांगून रजा मिळवली तर कधी कधी खरोखर्च्या निकड/तातडीच्या प्रसंगी मिळत नाही. निरल्लजपणे महिन्यातून दांडी मारणारे बहाद्दर ( आणि सगळ्यांसमोर बॉसकडून अपमानही हसत हसत पचवतात) आणि मग आपणही मुर्दाड मन बनवावे असे वाटू लागते. आणि मग फुटकळ सबबीखाली (पुर्वनियोजीत न ठेवता) रजा घेण्याची सवय लागते.

गुटख्यावर बंदी आणल्यावर गुटखा सर्रास मिळतोय हे सगळ्य्यंना माहीती आहे पण मान्य करायचे नाही,आणि उत्पादनार बंदी नाही विक्रीवर आहे. तस्मात एकीकडून रजा शिल्लक ठेऊ नका सांगायचे आणि रजा द्यायचीही नाही असे असेल तर कर्मचारी काहीही कारणे देऊन (अकस्मीक रजा मोठ्या प्रमाणात घेतात) आणि शिल्लक रजा बुडीत (लॅपस) होण्याचा धोका पत्करत नाहीत.

काही आंतरराष्ट्रीय आणि इथे असलेल्या आस्थापनात काटेकोर नियम असतील तर मर्यादेवरील शिल्लक रजेचे दरवर्षी नियमीत पैसे मिळत असतील तरी कर्मचारी वर्गाची हरकत नसते. पण रजा शिल्लक असून न देता वाया गेल्या तर ते दु:ख जास्त बोचते हेच खरे.

पुर्वनियोजीत रजेचा पुरस्कर्ता नाखु

चिनार's picture

6 May 2016 - 9:58 am | चिनार

याविषयी मी म्हणेल.... निर्लज्जम सदा सुखी !!
घेणारे निर्लज्जपणे घेतात तेंव्हा देणारे देतात अगदी सहज...फोन बंद करून सुट्टीवर जातात..
पण एखाद्याने अगदी गरज म्हणून एक दिवस जरी सुट्टी मागितली किंवा घेतली तर तो गुन्हा असतो..वरून दर दहा मिनिटांनी फोन !

साधारणपणे गणवेषधारक दलांमध्ये (uniformed services) म्हणजे लष्करी निमलष्करी आणि पोलिस दले यात मनुष्य बळाची सतत कमतरता असते त्यामुळे तुम्हाला हवी तेंव्हा रजा देणे हे वरीष्ठाना नेहमीच शक्य होत नाही. पोलिसांचे उदाहरण घेतले तर सतत कोणताना कोणता बंदोबस्त, नाकेबंदी, हाय आलेर्ट चालू असतो त्यामुळे आधीच कमी असलेल्या संख्येवर कायमच ताण असतो त्यामुळे वरिष्ठ अधिकारी सहसा रजा देण्यास नाखूष असतात. यात त्यांना स्वतःला सुद्धा पाहिजे तेंव्हा आणि पाहिजे तितकी रजा मिळतच नाही. याला साधे सरळ उत्तर नाही.
माझ्या विभागातील लोकांना मी रजा "आपसातच" ठरवून घ्या असे सांगत असे. (भांडण केले तर कोणालाच रजा मिळणार नाही हे स्पष्ट केलेले असे.) रजेवर जाणार्या माणसाचे काम इतर लोकांवर पडत असे पण ते खुशीने करत कारण त्यांना माहित असे कि आपण हे काम केले तर आपल्याला हि पूर्ण रजा मिळू शकेल.काही वेळेस जेन्व्हा दोनच तंत्रज्ञ होते तेंव्हा तर माझ्या क्षकिरण तंत्रज्ञाला रोजच "कॉल" करावा लागे. परंतु त्याला इलाज नव्हता त=हे त्यानाही माहित होते. त्यामुळे माझ्या सरकारी नोकरीत मला असे प्रश्न फारसे आले नाहीत.
मी स्वतः मला असलेली अर्जित रजा व्यवस्थित पणे घेत असे. माझी मुले लहान असल्याने मी वर्षाच्या सुरुवातीलाच रजा मागत असे (कारण मुंबईत सुटीवर येण्यास जानेवारी फेब्रुवारी हा सर्वात चांगला काळ आहे शिवाय रेल्वेच्या आरक्षणासाठी सुद्धा अजिबात त्रास होत नसे) या वेळेस मला रजा नाकारणे वरिष्ठांना शक्य होत नसे.
नंतर नंतर तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच शुभेच्छा दिल्यावर माझे वरिष्ठ सर तुझा रजेचा अर्ज कुठे आहे हे हसत विचारत असत. याचे कारण त्यांना मुलांच्या सुटीच्या काळात ( एप्रिल मे मध्ये) मी हमखास उपलब्ध राहत असे हा मोठा आधार होता.
हे सर्व केवळ खात्यांतर्गतच चालत असल्याने शक्य होते हे मला माहीत आहे पण तरीही विचार विनिमय करून रजा घेणे हा एक नक्की पर्याय आहे.

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2016 - 10:13 am | अत्रन्गि पाउस

ह्याचे कारण एकंदर मनुष्यबळ गरज विरुद्ध पुरवठा ह्यात १००% रजा हि गृहीतच धरली जात नाही ...

अजुन एक मुद्दा म्हणजे रजेचे कंपनीगणिक वेगळे नियमः
सध्याची कंपनी सोडुन नविन कंपनीत जायचे तर पुन्हा शुन्यापासुन सुरुवात. त्यात पण अधीच्या कंपनीत नोटीस पिरेड मधे रजा नाही, नविन कंपनीत सुरुवतीला रजा नाही वगैरे कटकटी. माझ्या आधीच्या कंपनीतील्या परदेशी बॉसने सांगितले होते की त्यांच्या देशात (कदाचित बेल्जियम)सर्व कंपन्यात रजेचे दिवस आणि विभागणी सारखीच असते. एका कंपनीतुन दुसर्‍या कंपनीत जाताना राहिलेल्या सुट्ट्या नविन कंपनीत कॅरी फॉरवर्ड होतात.
आपले कामगार मंत्रालय असा निर्णय कधी घेईल देव जाणे..

मृत्युन्जय's picture

6 May 2016 - 10:48 am | मृत्युन्जय

एका कंपनीतुन दुसर्‍या कंपनीत जाताना राहिलेल्या सुट्ट्या नविन कंपनीत कॅरी फॉरवर्ड होतात.

परफेक्ट. असे असायला हवे असे नेहमीच वाटत होते.

टवाळ कार्टा's picture

6 May 2016 - 12:18 pm | टवाळ कार्टा

डेन्मार्कमध्ये माझ्या क्लाएंटच्या कंपनीत सुट्ट्या आरामात देतातच वर रोज कंपनीचे गेट ६ ला बंद होते...त्यानंतर थांबायचे नाही...वायफायचा पास्स्वर्ड एक्स्पायर होतो =))

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2016 - 9:32 pm | अत्रन्गि पाउस

आणि तरीही त्यांच्या सिस्टिम्स अतिशय व्यवस्थित चालतात ...लोक आनंदी वगैरे वगैरे ...
आपला साला बेसिक मधेच राडा

यशोधरा's picture

6 May 2016 - 11:36 am | यशोधरा

हायला, सुट्ट्या फॉरवर्ड?

नाखु's picture

6 May 2016 - 12:36 pm | नाखु

देव दयाळू आहे हे माहीत होते अता शिक्का मोर्तब झाले.

इथे सोडताना सुट्ट्या घेऊ देत नाहीत आणि तिकडे फॉरवर्ड !!!

हतबल नाखु

माहितगार's picture

6 May 2016 - 10:56 am | माहितगार

लेखाचे शीर्षक आणि मांडणी प्रथमदर्शनी लोकप्रीय होऊ शकली तरी शीर्षक फाल्स बायनरी ऑप्शन्स देते आणि मजकुर समतोलाची गरज न मांडता भावनीक भांडवल बनवताना दिसतो असे वाटते का ?

चांगल्या उत्पादकतेसाठी मनुष्यबळ तंदुरुस्त असणे, आस्थापनेचे अवलंबीत्व व्यक्तीकेंद्रीत न रहावे म्हणून तसेच अज्ञात भ्रष्टाचारी लागेबांधे कुठे असतील तर त्यातील सातत्य तुटून ते उघड व्हावेत म्हणून रजा देणे ही व्यवस्थापनाचीही तेवढीच गरज असावी याची जाणीव बर्‍याच व्यवस्थापक आणि आस्थापनांना नसते हेही खरे; अर्थात त्याच वेळी आस्थापनेच्या व्यवसायाचा प्रकार, व्यक्तिच्या कार्याचा प्रकार, ग्राहकांना केलेली सेवा वचने (सर्वीस कमीटमेंट्स), उत्पादकतेचा आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा ताळमेळ ह्याही महत्वाच्या बाबी असाव्यात असे वाटते. यात आस्थापनेच्या आणि व्यवस्थापकाच्या मनुष्यबळ नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्याचा कस लागतो हे पण खरे.

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2016 - 12:34 pm | अत्रन्गि पाउस

माहितगारसाहेब,
आस्थापनेच्या व्यवसायाचा प्रकार, व्यक्तिच्या कार्याचा प्रकार, ग्राहकांना केलेली सेवा वचने (सर्वीस कमीटमेंट्स), उत्पादकतेचा आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा ताळमेळ ह्याही महत्वाच्या बाबी असाव्यात असे वाटते. यात आस्थापनेच्या आणि व्यवस्थापकाच्या मनुष्यबळ नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्याचा कस लागतो हे पण खरे
ह्या सगळ्या बाबत विचार आणि नियोजन करतांना 'रजा' आणि त्यामुळे येणारी उपलब्धते मधील तूट हा भाग भारतीय मानसिकतेत विचारात घेतलीच जात नाही कि काय अशी परिस्थिती आहे ...

एका कर्मचार्याचे महिन्याचे किमान तास १७८ धरणे हेच मुळी चुकीचे आहे (२२ दिवस x ८ तास) त्यात येणारे सार्वजनिक सुट्ट्या / त्याच्या अंदाजे २ रजा ह्या जमेस धरून नियोजन केल्यास आयत्यावेळी धावाधाव करावी लागत नाही ...

कामाचे दिवस केवळ वीसच धरावेत, असेच तुमचे म्हणणे आहे ना ?

मज्जाच म्हणजे दोन दिवस काम केले की एक दिवस सुट्टी :), आणि टोटल सुट्टीचे दिवस भरतील तेवढ्या नव्या लोकांना कामावर घ्यायचे, आयडीया वाईट नाहीए, बेरोजगारी लौकर कमी करण्याचा साधा सोपा उपाय -बिनपगारी रजा चटचट दिल्याकी आर्थीक ताणही नाही आणि एकतृतीआंशानी अधिक रोजगार- हा उपाय यापुर्वी का बरे कुणाला सुचला नव्हता ;) (ह.घ्या)

हलकेच घेऊनही हा हिशोब कळत नाहीये !
एका महिन्यात २० कामाचे दिवस मोजावे असे म्हणतोय मी

माहितगार's picture

6 May 2016 - 4:40 pm | माहितगार

एका महिन्यात २० कामाचे दिवस मोजावे > म्हणजे २० दिवस काम १० दिवस सुट्टीचे >म्हणजेच २ दिवस काम केले की एक दिवस सुट्टी नाही का

सुट्टीतर मिळाली पाहीजे उत्पादन अथवा सेवा तर खंडीत व्हावयास नको म्हणजे तेवढ्या अधिक माणसांची भरती करणे आले > भ्ररती वाढवली की रोजगार आपसूकच वाढतो फक्त वाढवावयाच्या माणूसबळासाठी पैसा कुठून उभा करावा ? ज्यांना सुट्टी पाहीजे त्यांच्याच पगारी सुट्टीला बीनपगारी करुन असे नाण्याची दुसरी बाजू दाखवण्यासाठी गंमतीने म्हणालो.

माझ्या मते रजा ही दोन्ही बाजूने सुविधा आहे. असो.

बर्याच ठिकाणी
असो

माहितगार's picture

6 May 2016 - 6:28 pm | माहितगार

:) कदाचित एखाद्या गोष्टीची सवय झालेली असली की गृहीत धरल्यागत होते होत असावे. चालायचेच.

काळा पहाड's picture

6 May 2016 - 11:01 am | काळा पहाड

इस दुनिया मे सिर्फ तीन ही चीझोंकी कीमत है: स्किल, स्किल, स्किल. तुमच्या तुमच्याकडे स्किल असेल (आणि मार्केट मध्ये ते कुठेच सहजासहजी उपलब्ध नसेल) तर बॉसला "देतोस, की जाऊ दुसर्‍या कंपनीत" असं विचारता येतं.

तस्मात, तुमच्या कामावर प्रेम करा, स्किल वाढवा. कंपनी गेली खड्ड्यात.

तर्राट जोकर's picture

6 May 2016 - 11:07 am | तर्राट जोकर

लै वेळा सहमत.

सुबोध खरे's picture

6 May 2016 - 11:19 am | सुबोध खरे

काळा पहाड
बाडीस
यावर मी अजून म्हणेन
दर दहा वर्षांनी तुमचे कौशल्य/ कसब(skill) वाढवणे गरजेचे आहे कारण दहा वर्षात तुमच्यापेक्षा तरुण आणि उत्साही लोक त्याच कौशल्य पातळीचे (skillset) कमी पैशात उपलब्ध होतात. तेंव्हा आपल्याला स्पर्धेत दोन पावले पुढे राहण्यासाठी आले कौशल्य जपत आणि वाढवत राहणे आवश्यक आहे. अन्यथा नोकरी, रजा, पगारवाढ इ सर्व गोष्टीसाठी आपल्याला दुसर्याचे "मिंधे" व्हावे लागते. हि गोष्ट चाळीशी नंतर जास्त प्रकर्षाने जाणवू लागते.

अप्पा जोगळेकर's picture

6 May 2016 - 2:54 pm | अप्पा जोगळेकर

दहा वर्षे हा खूप जास्त काळ आहे. दर २ वर्षांनी नवीन तंत्रज्ञान शिकावेच लागते.

२ वर्षे हा खूप जास्त काळ आहे. रोज काहीतरी नवीन शिकवच लागतं. २ वर्षात सगळ्या मोबाईल/संगणक प्रणाली, लोकप्रिय सेवा, तंत्रज्ञानातील ट्रेंड्स बदलताहेत, एकदम किती नवीन शिकणार ?!

काळा पहाड's picture

6 May 2016 - 7:51 pm | काळा पहाड

सहमत. मी तर दररोज आढावा घेतो की मी आज काय नवीन शिकलो? त्यामुळेच मिपावर प्रतिसाद लिहिण्यापेक्षा एखाद्या वेबसाईट वर जावून फायनान्शियल टेक्नॉलॉजितले ट्रेंड्स पहाणे, नवीन अ‍ॅसेट क्लास शिकणे, एखादी श्वेत पत्रिका वाचणे, केस स्टडी वाचणे, सर्टिफिकेशन करणे, एखाद्या तज्ञाची मुलाखत पहाणे/वाचणे यावर माझा भर असतो. फायनान्शियल फिल्ड इतकं मोठं आहे की पुढची दोन वर्षे पुरेल इतकं मटेरियल माझ्याकडे सध्या तयार आहे. हे सगळं माझ्या नोकरीशी संबंधित असलं तरी ते करण्याची माझ्यावर सक्ती नाही. पण मी ते केलं नाही (आणि दररोज केलं नाही) तर मी औट डेटेड होईन हे नक्की. ऑफिसात काम करताना सुद्धा आमचा ग्रुप सतत चर्चा करत असतो आणि एखाद्या नवीन अ‍ॅसेट तयार करण्याच्या, श्वेत पत्रिका तयार करण्याच्या विष्यांचा शोध घेत असतो.

मग तुमच्या ज्ञानाचा आम्हालाही काही फायदा होऊ द्या की. लेख लिहा अशी विनंती आहे. --/\--

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

अजून एक...

फक्त आपल्या आणि आपल्याच विषयातले आपले ज्ञान आणि जाण वाढवणे ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे समजणे पुरेसे होणार. किंबहुना वरीष्ठ पदाच्या स्थानासाठी "एखाद्या विषयात तज्ञ असणे" ही पात्रता अट कमी महत्वाची होऊन "कंपनीसाठी सर्व आवश्यक विषयांची पुरेशी माहिती असणे आणि त्यापेक्षाही जास्त त्या विषयातील अनेक तज्ञ टाळक्यांच्या टीमचे यशस्वी नेतृत्व करून त्यांच्याकडून योग्य तो परिणाम (आऊटकम) साधण्याची पात्रता असणे" ही अट कळिची बनते.

म्हणजे, वरच्या पदावर जायचे असल्यास केवळ एका विषयाचा तज्ञ (सबजेक्ट मॅटर एक्सपर्ट) असणे पुरेसे नाही. बहुआयामी ज्ञान, व्यक्ती व्यवस्थापन (मॅन मॅनेजमेंट) कसब आणि कंपनी ज्या परिस्थितीत (एन्व्हिरॉनमेंट) काम करते आहे त्यात वाहणारे वारे ताडून त्यानुसार कंपनीचे/प्रोजेक्टचे शीड आणि रडार हलवण्याचे कसब आत्मसात असणे अनिवार्य आहे.

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2016 - 12:39 pm | अत्रन्गि पाउस

इथे माझा कोणताही प्रॉब्लेम नाहीये :-D

वरील बातमी वाचली आणि काही सहकारी टीम managers ची मानसिकता (विशेषत: भारतीय कंपन्यांमधून विदेशी बहुराष्ट्रीय कंपनीत आलेल्यांची) बघितल्यावर कित्येक दिवस जाणवत असलेली सल मांडली इतकेच ...

नीलमोहर's picture

6 May 2016 - 11:22 am | नीलमोहर

कंपन्या, तेथील कामकाज आणि मालक - (अतीच) जिव्हाळ्याचा विषय,
खाजगी कंपनीत सगळा मनामानी कारभार असतो, रजा मिळणे पूर्णपणे मालकाच्या मनावर अवलंबून असते. त्यातही मालकाची मर्जी, पार्शलिटी, फेव्हरिटीझम हे प्रकार असतातच. प्रामाणिकपणे अ‍ॅप्लीकेशन देऊनही अनेकदा रजा मिळत नाही, कामाचे कारण पुढे केले जाते. आपण इमानदारीत काही वैयक्तिक कारण सांगितले तर तुमचा पहिला प्रेफरंस परिवाराला, खाजगी आयुष्याला आहे, कामाला नाही असे फुटकळ आरोप केले जातात. अशावेळेस मग लोकांनाही बेशिस्त बनून आधी न सांगता अचानक सुट्टी घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. शेवटी सीधी उंगलीसे घी ना निकले तो...

मागे घरातील फंक्शनसाठी २-३ दिवस जोडून सुट्टीसाठी अर्ज दिला होता तर सध्या टीममध्ये इतर कोणी नाही, काम जास्त आहे म्हणून रजा नाकारली गेली, आणि पहायला गेलं तर त्याच सुमारास सार्वजनिक सुट्ट्या जोडून आल्यामुळे ऑफिसातील मॅक्झिमम लोकांनी सुट्ट्या घेतल्या होत्या, त्यांना मिळाल्याही होत्या, त्यामुळे विशेष कामही नव्हते पण बोलणार कुणाला.

यानंतर मात्र थोडं जशाला तसं करायचं ठरवलं. ४-५ दिवस गोव्याला जायचा प्लॅन ठरत होता, ३ दिवस सुट्टी + शनिवार रविवार, बुकिंग केले, पोहोचलो, तिथून ऑफिसात फोन केला, अचानक ठरलं, आलो.. शिस्तीत ओरडत बसा म्हटलं.
तिकडे त्यांची खाऊ की गिळू अवस्था झाली असेल, पण नाईलाज होता, ही वेळ त्यांनीच आणली होती.
सतत काम एके काम करूनही माणूस वैतागतो, त्यालाही थोडी सुटका, विरंगुळा हवा असू शकतो, शिवाय असा रिफ्रेश होऊन आलेला माणूस दुप्पट जोमात काम करेल यातही त्यांचाच फायदा असतो, पण तेवढे समजून घेतले तर ना.

परिस्थितीनुसार माणूस हुशार होत जातो आणि व्हायलाच पाहिजे त्याने. मालक लोक हमालासारखे लोकांना राबवून घेणार, त्यांच्या जीवावर लाखो कमावणार, एवढे करूनही त्यांच्या मेहनतीची किंमत अजिबातच नाही, आणि जरा कोणी सुट्टीचं नाव काढलं की लगेच यांचा जीव जळणार. माणसाला मशीन समजून नुसतेच कामाला जुंपणार्‍या मालकांबद्दल मग कामगारांच्या मनातही कुठलीच भावना राहत नाही, तेही निर्ढावत निर्विकार होत जातात, किंबहुना तसं व्हावं लागतं.

ऑफिसात अनेक वर्षे इमानदारीत राहून वागून पाहिलं पण त्याने नुकसान आणि मनस्तापाशिवाय हाती काही लागलं नाही, प्रामाणिकपणाचा जमाना तर अजिबातच राहिलेला नाही, त्यामुळे जैसे को तैसा, शराफत छोड दी मैने, ही सध्याची ब्रीद वाक्य बनली आहेत :)

पिलीयन रायडर's picture

6 May 2016 - 12:32 pm | पिलीयन रायडर

आपण इमानदारीत काही वैयक्तिक कारण सांगितले तर तुमचा पहिला प्रेफरंस परिवाराला, खाजगी आयुष्याला आहे, कामाला नाही असे फुटकळ आरोप केले जातात.

म्हणजे काय??? हो आहेच म्हणावं परिवाराला पहिला प्रेफरन्स.. हा काय बावळटपणा आहे? कुणी कुटूंबापेक्षा जास्त ऑफिसला महत्व देईल का? जे देतात तेच अडकतात. झुकती है दुनिया...

मी चालले असं "सांगायच".. विचारायचं नाही...

मला कळत नाही.. आपन काम करतो महिन्याला आणि मग पुढच्या महिन्यात त्याबद्दल रजा मिळतात. "Earned" Leaves.. मग तुमच्याकडे रजा असतील तर नाकारण्याचा काय संबंध? मोबाईल बंद करुन बसायचं जर घरी कॉल करत असतील तर.. किंवा जॉब बदला शक्य असेल तर.. असल्या फालतु ठिकाणी का काम करायचं? किंवा वर तक्रार करता येते का तुमच्याकडे? आमच्याकडे येते.. कुणी नडलं तर आम्ही लगेच वर जाउन बोंब मारतो.. म्हणुन कुणी रजेला नाही म्ह्णतच नाहीत.

टवाळ कार्टा's picture

6 May 2016 - 12:53 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११११

नीलमोहर's picture

6 May 2016 - 1:15 pm | नीलमोहर

'कुणी कुटूंबापेक्षा जास्त ऑफिसला महत्व देईल का?'
- त्यांच्या मते तुम्ही जिथे काम करता त्या ऑफिसप्रति तुमची बांधिलकी ही तुमच्या कुटुंबापेक्षा जास्त असली पाहिजे, अर्थात हे पटणारे लॉजिक नाहीच, पण सत्तेपुढे शहाणपण नसते. हम करे सो कायदा, पटत असेल तर थांबा नाहीतर निघा
असा मामला आहे. आधी एका mnc मध्ये होते तिथे पध्दतशीर काम होतं, सहसा काही प्रॉब्लेम येत नव्हते, आताची मात्र खाजगी कंपनी फर्म सारखी आहे, बरीच नाटकं आहेत, प्लॅनिंग मॅनेजमेंटच्या नावाने बोंबच आहे. इतर पर्याय शोधत आहेच.

'मी चालले असं "सांगायच".. विचारायचं नाही...'
- हो, यापुढे तेच, आता तर मोठी सुट्टी घ्यायचीय जी मागून मिळणे अशक्य आहे.

'वर तक्रार करता येते का तुमच्याकडे?'
- बॉसच्या वर कुणी असते का ;)

झुकती है दुनिया.. हे आत्ताशी कळतेय, अजून इतरांना झुकवायला लावणे जमले नाही.. इथून पुढे शिकणार :)

बोका-ए-आझम's picture

6 May 2016 - 3:05 pm | बोका-ए-आझम

कंपनीवर नव्हे. मी जर उद्या अतिकामाच्या अतिताणाने मरण पावलो तर कंपनी थोडीच बंद पडणार आहे? ती चालूच राहील. माझ्या जागी दुसरा माणूस येईल. त्यामुळे रजा ही घ्यायलाच पाहिजे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. आपल्याकडे दुर्दैवाने स्त्रियांना आॅफिसच्या रजेच्या दिवशी घरी काम करावं लागतं. अपवाद असतीलही पण बहुसंख्य स्त्रियांना पूर्णपणे रजा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे (maternity leave सोडल्यास).

नीलमोहर's picture

6 May 2016 - 4:13 pm | नीलमोहर

कामावरच्या प्रेमासाठीच एवढी वर्षे काढलीत, अगदी आज आत्ताही त्यांचे कामासाठी प्रेशराईज करणे सुरूच आहे, पण मी आता ताण घ्यायचे सोडून दिलेय. एक व्यक्ति आख्ख्या टीमचे काम सांभाळतीय तरी आपण तिला किती राबवून घ्यावे, किती ताण द्यावा याचा माणूसकी म्हणूनही विचार न करणारे बॉस आलेत वाट्याला.

'बहुसंख्य स्त्रियांना पूर्णपणे रजा मिळत नाही,'
- हा तर वेगळा काथ्याकूटाचा विषय होईल. घर आणि ऑफिसची दुहेरी कसरत करतांना स्त्रियांना सुपरवुमन बनावेच लागते, झेपत असो वा नसो.

मृत्युन्जय's picture

6 May 2016 - 11:24 am | मृत्युन्जय

वाक्यावाक्याशी सहमत.

दर वर्षी प्रत्येकाने किमान १० दिवस सलग रजा घ्यावी यासाठी व्यवस्थापनानेच कर्मचार्‍यांना उद्युक्त केले पाहिजे. पण दुर्दैवाने परिस्थिती वेगळी असते. सुट्टी मागायला गेल्यावर बॉसच्या चेहर्‍यांवर आठ्या दिसु शकतात.

बरेच बॉस तर विचित्रच असतात. सुट्टी देताना सरळपणे काही बोलु शकत नाहित त्यामुळे तो माणूस सुट्टीवर गेला की मुद्दाम त्याच्या कनिष्ठांना बोलावुन आडवे तिडवे प्रश्न विचारतात. कनिष्ठांकडे अर्थातच उत्तरे नसतात मग ते त्यांच्या बॉसला (म्हणजे सुट्टीवर गेलेल्या माणसाला) फोन लावतात आणि सुपर बॉसने कसे फायर केले याची तक्रार करतात. सुट्टीवर गेलेला माणूस आपला अजुन त्रास नको म्हणुन सुट्टी बाजुला ठेउन काम करतो आणि विचार करत बसतो की मधुनच हे काम कुठुन उद्भवले? शिवाय ही संधी साधुन सुपर बॉस सुट्टीवर गेलेल्या माणसावर तोंडसुख घेतो ते वेगळेच. हा बाब्या सुट्टीवरुन परत आला की झालेल्या गोष्टींचा काही मागमूसही नसतो. परत सुपर बॉस त्यालाच तूप लोणी लावुन सांगतो की तुच कसा रे सोन्या. तुझ्या टीममधल्या इतरांना काही येत नाही. शिकव त्यांना जरा वगैरे वगैरे. पुढच्या सुट्टीवर परत तीच कथा. सोन्याला कळते की सगळा त्याने सुट्टी घेतल्याचा परिणाम आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मग तो कमीत कमी सुट्ट्ञा घेतो.

बर्‍याचदा कंपन्यांमध्ये पीअर्स पण विचित्र असतात. ती दोन गाढवांची गोष्ट आहे ना की ज्यात एक गाढव दुसर्‍यापेक्षा स्वतःला वरचढ ठरवण्यासाठी मरमर काम करतो. असे लोक बर्‍याच कंपन्यांमध्ये असतात जे सुट्ट्या न घेण्यात धन्यता मानतात कारण मग ते त्यांच्या पीअर्स पेक्षा अधिक कामसू, सिन्सिअर आणि कामाच्या बाबतीत पॅशनेट असल्याचे सिद्ध करु शकतात. हा धोका ओळखुन मग इतर पीअर्स देखील् सुट्ट्ञा टाळु लागतात. बॉसला काय तेच हवे असते.

काही कंपन्यांमध्ये गोष्ती नेहमीच पेटलेल्या असतात, सुट्टी घ्यायची म्हणजे कर्मचारीच धास्तावतात की परत आल्यावर समोर काय वाढुन ठेवलेले असेल.

माझे रजांबद्दलचे काही अनुभव खुप भीषण आहेतः

१. एकदा शनिवार रविवारला जोडुन पुढे मागे १ - १ दिवस सुट्टी घेतली होती (शुक्रवार ते सोमवार). शनिवार वर्किंग होता आणि समोरचा बँकर काम करत होता. मी सुट्टीवर आहे हे माहिती असुनही वरुन ऑर्डर आली की काम अर्जंटली संपवा. माझ्या कनिष्ठांना जमण्यासारखे नव्हते त्यामुळे मग मी तारकर्लीच्या रम्य वातावरणात हॉटेलात बसुन ४ तास कॉनकॉलवर होतो. त्यात दोन वेगवेगळ्या फोनची बॅटारी संपली. सरतेशेवटी फोन चार्जिंगवर लावुन बोलुन काम संपवले. त्यात सुट्तीची एक पुर्ण संध्याकाळ वाया गेली. लगेच सोमवारी एका दुसर्‍या सिनीयरचा फोन आला आणि त्याला काही काम घोड्यावर बसुन करुन हवे होते. मी त्याला सांगितले की मी सुट्टीवर असल्याने आणि गाडीत असल्याने त्याचे काम करु शकत नाही त्यामुळे त्याने माझ्या बॉसशी संपर्क करावा पण काही अनाकलनीय कारणाने तो मलाच फोन करत राहिला. शेवटी कोकणात एके ठिकाणी मी संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेल्याने माझा फोन लागुच शकला नाही तेव्हा तो थांबला. नंतर कळाले की मी त्याचे काम केले नाही म्हणुन तो घुश्श्यात होता.

२. सलग ८+ दिवसाची सुट्टी तर मी माझ्या १२ वर्षाच्या नौकरीत फक्त ३ दा घेतली आहे. त्यापैकी एकदा जोधपुरच्या मेन मार्केट मध्ये एक पुर्ण संध्याकाळ मी सायबर कॅफे शोधुन मेल चेक करुन, अ‍ॅग्रीमेंट वाचुन त्यात बदल सुचवुन समोरच्या माणसाबरोबर को_ऑर्डिनेट करण्यात घालवला कारण काही करुन काम त्याच आठवड्यात संपवावे असा निरोप मिळाला होता.

३. दुसरी ८+ दिवसाची सुट्टी घेतली होती तेव्हा काश्मीरात होतो. तिथे ब्लॅकबेरी बंद होते (केवढे ते नशीब) तर किमान ३ -४ जणांनी "नाही पण तु मग मेल करु शकतोस का लगेच" हा प्रश्न विचारुन भंडावुन सोडले.

४. तिसरी ८ _ दिवसांची सुट्टी मधुचंद्राला गेलो होतो तेव्हाची. पहिले २-३ दिवस शांततेत गेले. शनिवार रविवार
आल्याने पण मग एका सिनीयर ने मागे काम लावले मी मधुचंद्राच्या सुट्टीवर आहे हे माहिती असुनही. मग जवळाजवळ तासभर माझी बायको भीमतालवर एकटीच बसुन होती आणि मी तिला बस अजुन ५ मिनिट्स म्हणुन कॉलवर होतो. नशीव तिने तिथल्या तिथेच घटस्फोट नाही घेतला.

एकुणात सुट्टी घेतली तरी कामे सुटत नाहित. वरिष्ठ तुम्ही सुट्टी घेतली आहे याचा काहिही मुलाहिजा न बाळगता कामे मागे लावतात. ही खरेच भीषण परिस्थिती आहे.

काही कंपन्यांमध्ये मॅनडेटरी लीव्हची संकल्पना आहे आणि प्रत्येक कर्मचार्‍याला १० दिवस सलग सुट्टी एकदा तरी घेणे बंधनकारक आहे. अर्थात यातुनही पळवाटा काढुन कर्मचार्‍यांना कधी कधी कामाला जुंपले जाते पण बर्‍याचदा सुट्टी मिळते. हे सगळीकडे कंपल्सरी केले पाहिजे

बेकार तरुण's picture

6 May 2016 - 11:47 am | बेकार तरुण

मृत्यो !! तु महान आहेस
असा एम्प्लॉयी आपल्या टीम मधे असावाच अशी सगळे बॉस प्रार्थना करत असतील !!

बहुधा बँकिंग क्षेत्रात सलग ५ वर्किंग डेज ब्लॉक लीव्ह ची संकल्पना असते, खासकरुन जे ट्रेडिंग अन ईन्व्हेस्टमेंट्स मधे वगैरे काम करतात त्यांना. भारतात एच डी एफ सी मधे आहे हे मित्राकडुन माहित आहे, आणी वार्षिक रजा त्यांना घ्यायलाच लावतात.

आदूबाळ's picture

6 May 2016 - 1:50 pm | आदूबाळ

मृत्यो !! तु महान आहेस
असा एम्प्लॉयी आपल्या टीम मधे असावाच अशी सगळे बॉस प्रार्थना करत असतील !!

खरंच खरंच. मी असलं काही केलं असतं तर माझ्या बॉसेसनी माझ्या नावचा एक ताबूत बनवून ढोलताशे लावून मिरवणूक काढली असती ;)

बहुधा बँकिंग क्षेत्रात सलग ५ वर्किंग डेज ब्लॉक लीव्ह ची संकल्पना असते

हो - इंटर्नल ऑडिट प्रोसीजर्सचा भाग असतो. त्या दिवसांत कोणत्याही प्रकारे कंपनीशी संपर्क साधता येत नाही.

ब़जरबट्टू's picture

6 May 2016 - 1:16 pm | ब़जरबट्टू

मला तरी यात तुमचीच चुका जास्त वाटते.. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही एकटेच कसे जबाबदार आहात ? तुमच्या प्रत्येक उदाहरणात तुमच्याशिवाय काम अडलेले दिसतेय. याचा अर्थ सुट्ट्या घेताना तुमचे गणित चुकतेय. माझ्या कनिष्ठांना जमण्यासारखे नव्हते हे वाक्य बरेच काही सांगुन जाते.
खुप लोकांना मीच काय तो एकटा शहाणा, माझ्याशिवाय सगळे अडले पाहिजे, बॉस व कनिष्ट माझ्या मागे फिरले पाहिजे हा दृष्टीकोन डुबवतो . उद्या माझ्याशिवाय काम चालायला लागले तर मला कोण विचारणार ही भीतीच आज प्रायवेट मध्ये जास्त आहे. मग अश्या सुट्या घेतल्या की काम अडणारच.. त्याचा बाऊ कशाला ?

मृत्युन्जय's picture

6 May 2016 - 1:32 pm | मृत्युन्जय

सुट्ट्याचे गणित वर्षभरात कधीही सुट्टी घेतली तरी बिघडलेलेच असते मालक. माझ्या कनिष्ठांना जमण्यासारखे नव्हते याचे कारण ते नविन होते. सगळेच फ्रेशर्स होते. त्यावेळेस जे काम अडले ते आता अडत नाही पण मग सुट्ट्या घ्यायच्याच नाहित की काय? प्रत्येक गोष्तीसाठी मी जबाबदार आहे असे मला वाटतच नाही पण वरिष्ठांची तशी इच्छा असेल की गोची होते.

अप्पा जोगळेकर's picture

6 May 2016 - 2:59 pm | अप्पा जोगळेकर

साहेब, तुम्ही कोल घेतला नाही तर तुमची नोकरी जाणार नाही.
बाकी अप्रेजल वगैरे मिथ्या आहे. पगारवाढ हवी तर नवीन मालकच शोधावा लागतो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 May 2016 - 2:54 pm | अनिरुद्ध.वैद्य

साष्टांग दंडवत! केवढी ती लॉयल्टी!!

मला तर माझ्या लग्नात सप्तपदी चालू असताना फोन आले होते काहीतरी प्राॅब्लेम झाला म्हणून. माझ्या बाॅसना पत्रिका देऊनही त्या विसरल्या होत्या. मी त्यांना आठवण करुन दिल्यावर साॅरी म्हणाल्या पण नंतर दीड-एक तासात परत फोन आला. तेव्हा आमची पंगत चालली होती.

sagarpdy's picture

6 May 2016 - 3:48 pm | sagarpdy

__/\__

पिलीयन रायडर's picture

6 May 2016 - 4:02 pm | पिलीयन रायडर

पण तुम्ही लोक मधुचंद्राला किंवा सप्तपदी / पंगत चालु असताना फोन घेऊन का फिरत होतात? आणि बरं फिरलात तरी उचलत का होतात???? होमात टाकुन द्यायचा आधी फोन आणि मग जीवन मरणाच्या शपथा घ्यायच्या गोल गोल फिरुन..

मृत्यंजय.. तुमची काळजी वाटली.. तुम्ही दोन दिवस ऑफ द ग्रिड होऊन पहा बरं.. तिसर्‍या दिवशी सुद्धा कंपनी बंद पडलेली नसेल.. खात्री देते मी..

आपण उद्या अचानक गचकलो तर बंद पडणारे का काही???? मग कशाला इतकं अवाजवी महत्व द्यायचं कामाला? ह्यात तुमचीही तेवढीच चुक आहे.. कधीतरी सगळं काम बंद करुन संपुर्ण शांतता आवश्यक असते हो.. इतकं काम करत जाऊ नका. अगदी मनापासुन सांगते..

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

होमात टाकुन द्यायचा आधी फोन आणि मग जीवन मरणाच्या शपथा घ्यायच्या गोल गोल फिरुन.

हा केवळ पिरा प्रतिसाद !!

इतर सर्व परखड सत्य !

बादवे, ते बोका-ए-आझम, मृत्यंजय नाहीत... की तुम्ही त्यांचे गुपित उघडे केले आहे ;) =))

पिलीयन रायडर's picture

6 May 2016 - 4:17 pm | पिलीयन रायडर

एकाच प्रतिसादात दोन चार लोकांना रेफर करायची सवय आहे मला. काय तुम्ही लोक्स!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 4:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

मग नावापुढे @ टाका. नाहीतर डुआयडीचा उगिचच आळ यायचा :)

पिलीयन रायडर's picture

6 May 2016 - 4:29 pm | पिलीयन रायडर

कुणीतरी टाका रे तो @!!!

किंवा सध्या समजुन घ्या...

मी सप्तपदीच्या वेळी फोन का बरोबर घेऊन फिरत होतो हे मलाही आठवत नाहीये आज. मला वाटतं तो बहुतेक कुणाकडे तरी द्यायचा राहिला असावा. होमात टाकून न देण्याचं कारण बायकोनेच gift दिला होता.

होमात टाकुन द्यायचा आधी फोन

पेटत्या होमात फोन टाकला तर ब्याट्रीचा स्फोट होऊ शकतो. अपारंपारिक प्रकारे लग्न करायचं म्हटलं तरी अशा घातक गोष्टी करू नैत ;)

पिलीयन रायडर's picture

6 May 2016 - 8:42 pm | पिलीयन रायडर

बायकोचा स्फोट होण्यापेक्शा बरं की ते!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 4:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

निदान :

याचा अर्थ बर्‍याच बाबतीत कंपनी तुमच्यावर अवलंबून आहे... पण त्याचबरोबर तुम्हाला "नाही" म्हणणे जमत नाही याचाही गैरफायदा घेतला जात आहे.

ही केवळ तुमचीच नाही तर अनेक हुशार लोकांची समस्या आहे... कारण, बॉस लोक, इतर बाबतीत कितीही बावळट (दिसत) असले तरी, महत्वाचे काम आग्रह करून बुद्दू माणसाच्या (तेही तो सुट्टीवर असताना) गळ्यात मारून आपल्या पायावर धोंडा पाडून न घेण्याइतके नक्कीच हुशार असतात.

उपाय :

"How-to-say-no-at-work" अशी विचारणा गुगल्यावर करा. नको नको होतील इतके संदर्भ मिळतील. (या विषयांवर एक इंडस्ट्री तयार झालेली आहे आणि अनेक सल्लागार मिलिओनेर झाले आहेत.)

त्यातून तुमच्या स्वभावाला आणि कंपनी कल्चरला साजेसे उपाय निवडा. एक एक करत टेस्ट डोज देऊन पहा. प्रयोगात उपयोगी ठरलेले सर्वात उपयोगी (एक/अनेक) उपाय जरूरीप्रमाणे वापरत जा.

काळा पहाड's picture

6 May 2016 - 7:08 pm | काळा पहाड

या सगळ्यात चूक तुमची आहे हे तुमच्या लक्षात आले का? एकदा गावाच्या बाहेर पडलं की ऑफिसमध्ये सांगितलेला मोबाईल (हा मुख्य मोबाईल पासून वेगळा ठेवावा) पाठिमागची बॅटरी काढून वेगळा केला तर पलिकडच्या माणसाला कायम औट ऑफ कव्हरेज एरियाचा मेसेज मिळतो. पण तसंही, मी मोबाईल नेणार नाहीये असं सांगता आलं असतं.

बोका-ए-आझम's picture

6 May 2016 - 7:28 pm | बोका-ए-आझम

आणि आता प्राॅब्लेम हा आहे की पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन असंही म्हणता येत नाही. ;)

नीलमोहर's picture

6 May 2016 - 11:27 am | नीलमोहर

भावनेच्या भरात लेखातील मुख्य प्रश्नाचे उतर राहिलेच, रजा घेणे हा अक्षम्य गुन्हा, कशानेही भरून न येणारे पाप
ज्याचे परिमार्जन दुप्पट-चौपट कामाचा बोजा उचलून, अशक्य डेडलाईन्स पार पाडून कामगारांनी करायचे.

ब़जरबट्टू's picture

6 May 2016 - 11:58 am | ब़जरबट्टू

कोणत्या क्षेत्रात काम करताय यावरुन रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा हे ठरते.. बस्स... :)

काही हरामखोर ३६५ दिवस कामावर राहायला बघतात शिवाय संध्याकाळी सायबाच्या घरी जाऊन कसले घंट्याचे प्रश्न सोडवतात ते माहित नाही परंतू अशामुळे रजा मागणारे निमकहराम ठरतात उगाचच.अशा एकाला वर्षभरात एकही सिक लीव रजा न घेतल्याबद्दल एक प्लास्टिकचा टॅार्च मिळालेला तो त्याने घरी जाऊन "ओळखपाहू आज तुझ्यासाठी काय आणले?" म्हणत दाखवल्यावर तो टॅार्च बायकोने फेकला अन तुटला.ही श्टोरी "बायकांना कशी आणलेल्या गोष्टींची किंमत नसते" या मथळ्याखाली अरध्या कंपनीत सांगून स्वत:चे 'कौतुक' करून घेतले होते.

मराठी कथालेखक's picture

6 May 2016 - 12:45 pm | मराठी कथालेखक

हा हा हा

बायकोने तो टॉर्च त्याच्या डोक्यात कसा हाणला नाही याचं आश्चर्य वाटलं !!

आदूबाळ's picture

6 May 2016 - 1:52 pm | आदूबाळ

लौल - कहर किस्सा आहे.

तो टॅार्च बायकोने फेकला

याच्या ऐवजी तो टॉर्च बायकोने त्याच्या डोक्यात घातला आणि त्यानिमित्त सिक लीव्ह घ्यायला लागली, असा शेवट केला तर मस्त कथा बनेल.

नाखु's picture

6 May 2016 - 2:00 pm | नाखु

टॉर्च मागायला दुस्र्या दिवशी दाराबाहेर कंपनीतल्या कर्मचार्यांच्या बायकांची रांग लागली (फक्त माच मिनिटांसाठी क्ष रुपये या बोलीवर)....

कथा हातभार या धोरणाअंतर्गत नाखु अस्तरवाला

mugdhagode's picture

9 May 2016 - 7:02 am | mugdhagode

टॉर्च डोक्यात मारण्याआधी गाणे..

तेरा दो टकियों का टॉर्च और मेरा लाखों का सावन जाये

९७,९९ आणि २००० साली विआरएस आवाहन केले त्यात जे गेले त्यांना बाकी रजांचाही पूर्ण हिशोब दिला गेला.नंतर २)००२ साली अधिकृत रित्या कंपनी बंद करून कंपनीने फक्त एकमेकांना निरोप द्या सांगितले तेव्हा याचे पंधरा महिने पाण्यात गेले.

पुर्वी एलआइसी डेव ओफिसर आणि ओक्ट्रोय नाका कारकुन अजिबात रजा घ्यायचे नाहीत "धंधा" बुडेल म्हणून.
मुद्दा असा की रजा न देण्याचे मालकांचे /सायबांचे नकारात्मक धोरण होण्यास हे चिकटु लोकही कारण आहेत.मालकांची गोष्ट वेगळी असते.रोज येऊन गल्ल्याला कुरवाळायला त्यांना मजा वाटत असते.

मराठी कथालेखक's picture

6 May 2016 - 12:39 pm | मराठी कथालेखक

पोलिसांबद्दल मला बोलायचे तर माझ्या मते कामाच्या जुनाट पद्धती, अपुरी शस्त्रे व साधने (वाहने, GPS), अपुरे प्रशिक्षण तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे परिणामकारकरितीने काम न करता येणे यामुळे जास्त मनुष्यबळ लागते.
उदाहरण द्यायचे तर एखाद्या बंदोबस्तासाठी ३-४ शस्त्रधारी, चपळ, चलाख (योग्य ते प्रशिक्षण मिळाल्याने) पोलीस पुरे पडावेत पण तसे होत नसेल किंवा राजकीय दबावामुळे ७-८ पोलीस दिले जात असतील तर तो मनुष्यबळाचा अपव्यय आहे.

बाकी खासगी क्षेत्रात कामाच्या स्वरुपाप्रमाणे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असेल. माझ्या ऑनसाईट असलेल्या टीममेंबर्सना कधी कधी मोठ्या रजेसाठी (भारतात येण्याकरिता) क्लायंडकडून परवानगी नाकारली जाते. पण क्लायंटकडे वर्षातून तीन वेळा एका आठवड्याची सुटी असते त्यावेळी जर त्या सुटीला जोडून रजा घेतली सहज परवानगी मिळते.

वेल्लाभट's picture

6 May 2016 - 12:54 pm | वेल्लाभट

हक्क.

इतकी वाईट परिस्थिती असते हे खरंच माहिती नव्हते. :(

धाग्यातील आणि नीमो, मृत्युंजय इ. च्या प्रतिसादाशी १०० टक्के सहमत !
रजा ही केवळ कागदावरच हक्काची असते. प्रत्यक्षात ती बॉसची मेहेरबानी असते.
प्रामाणिकपणे (नुसतेच) काम करण्यार्‍यांना ती क्वचितच मिळते.
काम करून चलाखीने वागणाऱ्यांना ती दांड्या मारून मिळते.
आणि (काम न करता नुसती) चमचेगिरी करणाऱ्यांना ती विनासायास मिळते.

प्रीत-मोहर's picture

11 May 2016 - 12:13 pm | प्रीत-मोहर

+१००००

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 1:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर चर्चा चालली आहे.

@ काळा पहाड, सुबोध खरे, नीलमोहर आणि मृत्युन्जय यांच्या बहुतेक मुद्द्यांना सहमती.

याबाबतीत माझे म्हणणे थोडक्यात असे आहे...

नोकरी असो वा व्यवसाय, सेवा देणारा (कर्मचारी / व्यावसायिक) आणि सेवा घेणारा (कंपनी / ग्राहक) यांच्या संबंधामधे कोणाला गमावण्याची कोणाला जास्त भिती वाटते हा कळीचा मुद्दा असतो (Who is afraid of losing whom, is the key.) दुसर्‍याला गमावणे ज्या बाजूला गैरफायद्याचे वाटते ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते.

याचा सरळ अर्थ असा की, कर्मचारी किंवा व्यावसायिकाने आपली कामगिरी अशी ठेवली पाहिजे की तो सोडून गेला तर आपला सहजपणे न भरून काढता येण्याजोगा तोटा होईल असे कंपनी किंवा ग्राहकाला वाटले पाहिजे... हा तोटा जेवढा मोठा असण्याची शक्यता असेल व हे जितके सततपणे वाटत राहील, तितके जास्त चांगले.

हे वरचढपणाचे समीकरण कर्मचारी-कंपनी / व्यावसायिक-ग्राहक संबंध बनणे, संबंध टिकणे, मान मिळणे, बढती/प्रिमियम मिळणे, शब्दाला वजन असणे, सुट्टी हवी तेव्हा / हवी तशी मिळणे, इ, इ, इ, सर्वच बाबतीत खरे असते.

ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते.

हे वरचढपणाचे समीकरण कर्मचारी-कंपनी / व्यावसायिक-ग्राहक संबंध बनणे, संबंध टिकणे, मान मिळणे, बढती/प्रिमियम मिळणे, शब्दाला वजन असणे, सुट्टी हवी तेव्हा / हवी तशी मिळणे, इ, इ, इ, सर्वच बाबतीत खरे असते.

याचा सरळ अर्थ असा की, कर्मचारी किंवा व्यावसायिकाने आपली कामगिरी अशी ठेवली पाहिजे की
>>
हा टिपिकल भारतीय मानसीकतेचा अ‍ॅवरेज आहे.
त्यापेक्षा ताकदवान असलेल्याने, बॉसने, कंपनीने, अधिका-याने एथीकली वागुन माणूस म्हणुन जगावे व इतरांनाही माणूस म्हणुन बरोबरीची वागणुक द्यावी असे का नाही प्रत्येकजण म्हणत?
त्याएवजी (त्या त्या परिस्थितीत) कमकुवत असलेल्यानेच झुकावे व अपमान + नुकसान सहन करतच जगावे हेच सगळे का म्हणतात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 3:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझे म्हणणे जरा अजून स्पष्ट करून सांगतो...

१. तुमचे म्हणणे नीतीमत्ता व उद्दात्त धोरणे जमेस धरून बरोबर आहे. पण, दुर्दैवाने हे जग त्या तत्वांवर ना कधी चालले, आताही चालत नाही आणि मनुष्यस्वभाव पाहता भविष्यातही चालण्याची शक्यता नाही. जेथे कोठे ते तसे चालले आहे असे वाटते तेथेही कायद्याच्या बडगा धाक/आदर/सवय ठेवून आहे म्हणून तसे होते *. तेथेही अनेक माणसे कायदा धाब्यावर बसवून किंवा अगदी समोरच्याला दाबाखाली ठेऊन मनमानी करता आली तर करतातच, हे काही गुपित नाही. कोणत्याही बाह्यशक्तीच्या दबावाविना स्वतःहून नीतिमान असणार्‍या माणसांचा या जगात सर्व जागी व सर्वकालीन मोठा तुटवडाच राहीला आहे.

२. "मी सरळ आणि नीतिमान असले म्हणजे सर्व जग माझ्याशी तसेच वागेल." हे म्हणणे खरे असण्यापेक्षा नसण्याचीच जास्त उदाहरणे दिसतात. या वाक्यावर खरा विश्वास ठेवणार्‍या माणसाला आपण सज्जन आहोत असा सार्थ अभिमान वाटत असला तरी प्रत्यक्षात बहुतेक इतर त्याला बुळा समजून त्याचा फायदा घेतात, हे वस्तुस्थितीतले "विषारी सत्य" आहे. याला काही अपवाद असतीलही, पण अपवादांवर अवलंबून आपले जीवन आखले, तर यशही अपवादात्मक परिस्थितीतच मिळेल.

३. आपण काय करावे यावर आपला ताबा असतो.

४. इतरांनी काय करावे यावर आपला पूर्ण ताबा कधीच नसतो. मात्र,
४.अ) इतरांची कृती आपल्या विचारांप्रमाणे व्हावी यासाठी स्वयंप्रेरित (proactive) प्रयत्न करणे आपल्या हातात असते
आणि / किंवा
४.आ) इतरांची कृती झाल्यावर त्याचे परिणाम/दुष्परिणाम पाहून आपली प्रतिक्षिप्त (reactive) क्रिया करणे आपल्या हातात असते.

५. गेलेला वेळ आणि परिस्थिती परत आणणे शक्य होत नाही आणि केवळ मानवी चांगुलपणाच्या भरवश्यावर प्रतिक्षिप्त राहिल्याने नुकसान होण्याचीच जास्त शक्यता असते.

आता या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवरही, माझे इतकेच म्हणणे आहे की...

अ) सगळे प्रयत्न वैध असावे असाच माझा सतत आग्रह होता/आहे/असेल. कोणतीही गैर अथवा अनैतिक गोष्ट करावी असे मी कधीच म्हणणार नाही.

आ) दुसर्‍याने आपल्या बाबतीत कोणतीही अवैध अथवा अनैतिक गोष्ट करण्याअगोदर त्याला दहा वेळा विचार करायची गरज भासावी अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वयंप्रेरित (proactive) व वैध प्रयत्न करणे हे प्रत्येकाच्या १००% हातात असते, तसे करणे प्रत्येकाचा हक्क आहे, तो प्रत्येकाने केला पाहिजे आणि तसे करणे शहाणपणाचे आहे.

इ) यात दर वेळेस यश मिळेलच असे नाही. पण, यात निदान आपल्या मनासारखे यश मिळण्याची खूपच जास्त शक्यता आहे... आणि महत्वाचे म्हणजे, आपले जीवन दुसर्‍याच्या चांगुलपणाच्या भरवश्यावर (? भ्रमावर) अवलंबून ठेवण्यापेक्षा स्वयंप्रेरित (proactive) व वैध प्रयत्न करणे खचितच जास्त सन्मानाचे आहे.

===========================================

* : भारतात रस्ताभर कचरा करत फिरणारी माणसे सिंगापूरच्या चांगी विमानतळावर "उतरण्यापूर्वी" विमानातच आपल्या हातून काही कचरा नकळत खाली पडणार नाही ना याची खातरजमा करताना दिसतात. तीच माणसे भारतात परत आल्या आल्या आपल्या मूळ स्वभावावर उलटतात !

याबाबतीतली एक गम्मत अशी की, "सिंगापूरचा हा धसका माझ्याही मनात असतो" हे माझ्या एका जर्मन (ज्या लोकांचे शिस्त व स्वच्छतेच्या बाबतीत उदाहरण दिले जाते) दोस्तानेही बोलून दाखवले आहे !

अभिनव's picture

6 May 2016 - 3:41 pm | अभिनव

सहमत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 3:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता तुमच्या ध्यानात आले असेलच की मी म्हणतो तशी मानसिकता भारतियांमध्ये अजून नीट रुजली नाही. स्वतःच्या बळावर "सन्मानाने" आपले महत्व राखण्याऐवजी; काहीही करून "बॉसची मर्जी राखण्यावर व त्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या मर्जीने मिळालेल्या फायद्याला योग्य निर्णय म्हणण्यावर" लोकांचा भर दिसून येतो. हाच आपला सर्वात मोठा दुर्गुण आहे... आणि त्यामुळेच "हाजी हाजी करणे" व "माझी पात्रता वाढवणे यापेक्षा जास्त वरिष्ठांची मर्जी रखण्यावर भर देणे" अश्या वसाहतवादी / संरंजामशाहीवादी सवयी भारतियांच्या मधे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही दिसतात.

विकसित समाज / संस्था / देशाचे मूल्भूत लक्षण असे की ते वैध कायद्याप्रमाणे चालतात, एखाद्या माणसाच्या मेहेरबानीवर नाही. म्हणजेच, सर्वसामान्यपणे, योग्यता मिळवली की तिच्या स्तराचे योग्य ते वैध फायदे त्या व्यक्तीला मिळतात... बॉसच्या मर्जी अथवा गैरमर्जीवर नाही. यालाच कायद्याचे (rule based) राज्य म्हणतात.

अर्थातच, तशी योग्यता मिळवणे प्रत्येकाच्या हातात असते, मग ती शिक्षणाच्या बाबतीत असो की अनुभवाच्या की कामगिरीच्या (performance) बाबतीत.

माझा पहिला प्रतिसाद परत वाचलात तर असे दिसेल की, मी तर अजून एक पाऊल पुढे जाऊन तेथे म्हटले आहे की, उत्तम योग्यता आहे याच कारणानेच नाही तर आपल्या योग्यतेची दुसरी व्यक्ती शोधणेही कठीण आहे असा दबदबा निर्माण केल्यास त्या व्यक्तीचे स्थान बळकट झाले आहे असे समजावे (The person has arrived !). मग, त्या व्यक्तिला रजा, बढती, इत्यादी मर्त्य (mortal) गोष्टींची काळजी करावी लागणार नाही... त्या गोष्टी त्या व्यक्तीच्या मनात येण्याअगोदरच इतरेजन त्यांची पूर्तता करतील !

हुश्श्य ! जरा मोठा प्रतिसाद...खरे तर दोन प्रतिसाद... झाले. पण मूलभूत गैरसमज टाळण्यासाठी आवश्यक वाटले म्हणूनच हे लिहीले.

मराठी_माणूस's picture

6 May 2016 - 5:23 pm | मराठी_माणूस

स्वतःच्या बळावर "सन्मानाने" आपले महत्व राखण्याऐवजी; काहीही करून "बॉसची मर्जी राखण्यावर व त्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या मर्जीने मिळालेल्या फायद्याला योग्य निर्णय म्हणण्यावर" लोकांचा भर दिसून येतो.

एकदम पते की बात. अशा पध्दतीने मर्जी राखुन बाकीच्यावर अरेरावी करणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.स्वबळावर सन्मानाने जगणर्‍यांची अशा वेळी खुप परवड होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

अशा पध्दतीने मर्जी राखुन बाकीच्यावर अरेरावी करणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.स्वबळावर सन्मानाने जगणर्‍यांची अशा वेळी खुप परवड होते.

याबाबत असे म्हणता येईल की...

जशी कंपनी आपल्याला हव्या त्या चांगल्या कर्मचार्‍यांच्या शोधात असते, तसेच चांगले (पक्षी : आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास असणारे आणि सन्मानाने राहण्याची इच्छा व धमक असणारे) कर्मचारी आपल्याला हव्या त्या चांगल्या कंपनीच्या शोधात असतात. कमी जास्त वेळाने दोघे एकमेकाला सापडले तरच तोच संबंध "प्रेमाचा" होतो... अन्यथा किंवा तशी संधी मिळेपर्यंत "तडजोडीचा मामला" चालू ठेवणे ही खर्‍या जीवनातली तडजोड करावीच लागते :)

मात्र, वरच्या चांगल्या कर्मचार्‍यांच्या व्याख्येत न बसणार्‍यांना ती तडजोड बहुदा जीवनभर करावी लागते. :(

रेवती's picture

7 May 2016 - 6:11 pm | रेवती

भयंकर सहमत.

अप्पा जोगळेकर's picture

6 May 2016 - 5:37 pm | अप्पा जोगळेकर

छान प्रतिसाद. फक्त एक भर अशी की
आपल्या योग्यतेची दुसरी व्यक्ती शोधणेही कठीण आहे असा दबदबा निर्माण केल्यास त्या व्यक्तीचे स्थान बळकट झाले आहे असे समजावे
एखादी कंपनी एका विशिष्ट माणसावर इअतकी वलंबून राहत असेल तर ते त्या कंपनीचे व्यावसायिक अपयश आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

एखादी कंपनी एका विशिष्ट माणसावर इअतकी वलंबून राहत असेल तर ते त्या कंपनीचे व्यावसायिक अपयश आहे.
१००% खरे. म्हणूनच वर म्ह्टले आहे की...

नोकरी असो वा व्यवसाय, सेवा देणारा (कर्मचारी / व्यावसायिक) आणि सेवा घेणारा (कंपनी / ग्राहक) यांच्या संबंधामधे कोणाला गमावण्याची कोणाला जास्त भिती वाटते हा कळीचा मुद्दा असतो (Who is afraid of losing whom, is the key.) दुसर्‍याला गमावणे ज्या बाजूला गैरफायद्याचे वाटते ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते.

दोन्ही बाजूंना आपले स्थान उंचावण्याची समज, गरज आणि संधी असली तरच स्पर्धा निरोगी राहते आणि मगच एकमेकाला एकमेकाची किंमत "नीट" समजणे आणि राखणे शक्य होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून दोन तत्वे...

१. वैयक्तीक आयुष्य असो वा कामाची जागा; कोणालाही मान दिला जात नाही, तो आपल्या कृतीने आणि कामगिरीने (परफॉर्मन्स) मिळवायचा असतो.

(एखाद्या भोळ्या आईनस्टाईनला राबवून त्याच्या कामावर स्वतः नोबेल प्राईझ लाटणारे चलाख लोक जगभर सर्वत्र आहेत.)

२. जेव्हा कर्मचार्‍याला खरी किंमत दिली जात नाही तेव्हा खालीलपैकी एक किंवा जास्त कारणे असू शकतात...
......(अ) कर्मचार्‍याला स्वतःची किंमत माहीत नाही
......(आ) कर्मचार्‍यामध्ये आपली किंमत वसूल करण्याची धमक अथवा व्यवहातचातुर्य (tact) नाही
......(इ) कंपनीमध्ये (पक्षी : बॉसमध्ये) कर्मचार्‍याची किंमत जाणण्याची समज नाही
......(ई) कंपनीमध्ये कर्मचार्‍याची किंमत जाणून तिचा योग्य सन्मान ठेवण्याची नियत नाही

(अ) आणि (आ) कारणांमध्ये कर्मचार्‍याने स्वतःत योग्य ते बदल घडवून आणल्याशिवाय काही बदल होणे जवळ जवळ अशक्य आहे.

(इ) किंवा (ई) या कारणांमध्ये कर्मचार्‍याने त्या कंपनीत कायम चिकटून राहणे त्याच्या दीर्घकालीन भविष्याच्या आणि (मानसिक व शारीरीक) आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. तडजोड करत चिकटून रहा, नवीन कंपनीच्या शोधात रहा आणि पहिल्या योग्य संधीचा फायदा घेऊन बाहेर पडा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 May 2016 - 11:31 pm | अनिरुद्ध.वैद्य

प्रतिसादांशी सहमत! कॉर्पोरेट जगतात यशाची (किंवा सर्व्हायव्हलची) गुरुकिल्लीच आपण सांगितलीत!
धन्यवाद!

सुबोध खरे's picture

6 May 2016 - 5:59 pm | सुबोध खरे

एक्का साहेबांचे दोन्ही प्रतिसाद एकदम चपखल आहेत.
. "मी सरळ आणि नीतिमान असले म्हणजे सर्व जग माझ्याशी तसेच वागेल" हे म्हणणे म्हणजे "मी पूर्ण शाकाहारी आहे म्हणून सिंह मला खाणार नाही" असे म्हणण्यासारखे आहे.

समीरसूर's picture

6 May 2016 - 2:20 pm | समीरसूर

मी आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ६ दिवस सुटी घेतली होती. मागच्या वर्षीदेखील एप्रिलमध्ये सलग ५ दिवस सुटी घेतली होती. पण मी या वर्षीच्या एप्रिल महिन्यातली शेवटच्या आठवड्यातली ६ दिवस सुटी जानेवारी २०१६ च्या पहिल्या आठवड्यात सांगून ठेवली हो. एक आऊट ऑफ ऑफीसचा ईमेल सेट करून ठेवला की मग सहसा कुणी त्रास देत नाही.

इतक्या वर्षात आमच्या इथे मी एक गोष्ट शिकलो आहे. सुटी मागायची नाही; सरळ एक ईमेल टाकून द्यायची की मी या या दिवशी सुटीवर असणार आहे. सुटी घेऊ का असे आमच्या इथे कुणीच विचारत नाही. सरळ ईमेल टाकून द्यायची. अगदीच काही प्रोब्लेम असेल तर कुणीतरी विचारतं. मग अगदीच आवश्यक असेल तर सुटीचा प्लान थोडा बदलायचा; नाहीतर सरळ "माझे प्लान्स झालेले आहेत; सुटी रद्द करू शकत नाही" असे सुतकी चेहरा करून सांगायचे. बाकी दुसरे कुणी बिब्बा घालत नाही. आणि अप्रेजलवर वगैरे याचा काही परिणाम होत नाही. आणि झाला तरी मी विचार करत नाही. ;-) सुटी घ्यायची आहे तर घ्यायची आहे! कामाच्या वेळेला ऑफिसमधून आणि घरूनदेखील काम करावे लागते. तेव्हा तास मोजून नाही चालत. पण सुटीच्या वेळेला सुटीच! अगदीच अर्जंट असेल तर एखादा कॉल वगैरे....नाहीतर ऐश! :-)

गणामास्तर's picture

6 May 2016 - 2:23 pm | गणामास्तर

शनिवार रविवार सुट्टी असून सुद्धा बद्दल रजां बद्दल चाललेली वरील आयटी हमालांची (!) तक्रारीच्या सुरातील चर्चा वाचून अंमळ मौज वाटली.

अप्पा जोगळेकर's picture

6 May 2016 - 3:01 pm | अप्पा जोगळेकर

9.5*5 = 47.5 तास
8*6 = 48 तास
शनिवार-रविवार सुट्टीत आणि रविवार सुट्टीत काय फरक राहिला ?

sagarpdy's picture

6 May 2016 - 3:51 pm | sagarpdy

९.५ च ?

गणामास्तर's picture

6 May 2016 - 4:16 pm | गणामास्तर

१२*६ = ७२ तास
आणि तुमचा
९.५*५ = ४७.५ तास

बघा आता किती फरक राहिला.

टवाळ कार्टा's picture

6 May 2016 - 4:55 pm | टवाळ कार्टा

आयटीत

१२*५ = ६० आणि काम झाले नाही तर आणखि (२*१२)

गणामास्तर's picture

6 May 2016 - 5:04 pm | गणामास्तर

ते तर सगळीकडेच आहे.

टवाळ कार्टा's picture

6 May 2016 - 5:20 pm | टवाळ कार्टा

तुम्हीच तर म्हणत आहात कि आयटीमध्ये वेगळे असते

अप्पा जोगळेकर's picture

6 May 2016 - 5:30 pm | अप्पा जोगळेकर

साहेब. माफ करा
मगर आपको नही लगता के ये आपकी काबिलियत पर सवाल है.
१२*६=७२ तास काम जर एखादा व्यावसायिक करत असेल तर ठीक आहे.
पण जर एखादा कर्मचारी हे करतो आहे तर
१. तो कार्यक्षम नाही किंवा
२. त्याच्या साहेबाचे एफ़र्ट एस्टिमेट चुकीचे आहे.

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2016 - 5:33 pm | अत्रन्गि पाउस

साहेबाचे नाही विकणाऱ्याचे ....काहीही कमीट करून येतात आणि डिलिव्हरीची मातृभगिनी एक

मित्राच्या लग्नाला सुट्टी मिळत नसल्या कारणानं मोठ्या भावानं त्याच्या लहान भावाला ड्युटीवर पाठवलं त्याबद्दल आलेली ही म.टा. मधील बातमी. सुट्टी मिळाली नाही की मग लोकं असे बेकायदेशीर मार्गसुध्दा काढू शकतात ह्याचं हे उदाहरण.

लेखाबद्दल अतिशय सहमत...बाकी विचारलेल्या प्रश्नाचं माझं उत्तर आहे "रजा घेणं हा आपल्या वरीष्ठांचा हक्क असतो पण आपल्यासाठी पाप/गुन्हा असतो".

प्रकाश घाटपांडे's picture

6 May 2016 - 4:14 pm | प्रकाश घाटपांडे

पोलिस खात्यात स्वत:च्या लग्नासाठी रजा पाहिजे असल्यास लग्नपत्रिका जोडावी लागते. त्यामुळे पहिल्या पत्रिका छापायला टाकाव्या लागतात.
पुरुष पोलिसांनाही रजा ’पाळी’प्रमाणे मंजूर होते.पोलिस नोटीस मधे तसे प्रसिद्ध होते.पाळी मोजण्याचे अधिकार अर्थातच वरिष्ठांचे.
त्यासाठीही कारकुनांना चिरीमिरी द्यावी लागते.
माझ्या लग्नाच्या वेळी मी ’विनाविलंब’ रजा मागितली. ती मंजूर झाली नाही. मग मी ’त्वरीत’ रजा मागितली मग कुठे ती मंजूर झाली. सगळ्या अर्जात मे सो जा व्हावे हे लिहिणे क्रमप्राप्त असते.
अर्जित+ धनार्जित रजे ला ’शिलिंडर’ रजा म्हणतात. तुमच्या भाषेत सरेंडर्ड लिव्ह
१५ + ३० पाळी प्रमाणे मंजूर
३० + ३० "

पैशाची गरज असलेले लोक धनार्जित मिळण्यासाठी कागदावर अर्जित रजेवर पण प्रत्यक्षात कामावर येतात.( वरिष्ठांची समरी पॊवर) कारण सोडत नाही म्हटल्यावर पैशे पण गेले व रजा पण गेली.
शेवटी काहीच नसेल तर ’शिकात’ जाण्याचा पर्यात असतोच. दाक्तरला पैशे द्यावे लागत्यात.

कर्मचार्‍यांच्या बाजुचे प्रतिसाद वाचले ! बर्‍याच अंशी सहमत आहे.
मी देखील एका गावखात्यातल्या आयटी कंपनीमधे काम करत असतांना असेच अनुभव आले.
आता मी स्वतः देखील एका छोट्या कंपनीचा मालक आहे. कंपनी कसली, पाच सात डोकी एकत्र करुन काम करतो म्हणून कंपनी. नाहीतर गावखात्याचाच कारभार.

तर आमची कामाची पद्धत :
काम असेल तर २४ तास काम करा. रविवार असला, सार्वजनिक सुट्टीचा दिवस असला तरी सुटका नाही.
यात मी आणि माझे कर्मचारी सगळेच आले.

काम नसेल तर सोमवार ते रविवार कोणताही दिवस असो, घरी तंगड्या पसरुन आराम करा.
आमच्याकडे मेजॉरीटी कोकणी माणसं, तेव्हा चतुर्थीला आणि होळीला बोंबा मारत बसावं लागते पण एकमेकाच्या प्रेमापोटी सगळं अ‍ॅडजस्ट होते. आता एक सातारी, एक नगरी आणी बाकीचे कोकणी अशी भरती केलीये. त्यामुळे जास्त त्रास नाही. (कोणाला प्रादेशिक वादाचा वास येत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे)

८-१० दिवस सुट्टी हवी आहे, बिनधास्त घ्या. पण कमीतकमी १५ दिवस अगोदर कळवा म्हणजे पुढील नियोजन करणे सोप्पे होते. कालच एका कर्मचार्‍याने मला कळवले की मी ३१ ऑगस्ट २०१६ चे रेल्वे चे बुकींग केले आहे गणपतीसाठी. आता बोला !!

ऑफीसमधे लेट आले तरी आणि घरी जायला उशीर झाला तरी घड्याळावर डोळा ठेवला जात नाही.

बर्‍याच शेटजींनी तुम्ही युपी / बिहारी माणसं कामाला ठेवा. स्वस्तात काम होईल असे सांगीतले पण कंपनी पॉलीसी म्हणून यापासून कटाक्षाने दुर राहिलोय. अर्थात युपी / बिहारींबद्द्ल मला कोणताही आकस नाही.

परीणाम काय तर गेल्या पाच वर्षात एकही कर्मचारी काम सोडून गेलला नाही. खोटं बोलून सुट्टी घेतलेली नाही. फोन बंद करुन ठेवत नाहित. कोणाचेही नातेवाईक अचानक आणि पुन्हापुन्हा मरत नाहीत.

आय आणि माय कर्मचारी लव अवर कंपनी !

सतिश पाटील's picture

6 May 2016 - 5:10 pm | सतिश पाटील

३ वर्षांपूर्वी.माझ्या लग्नासाठी मी १५ दिवस सुट्टीसाठी विनंती केली तर मला, तू कंपनीसाठी किती महत्वाचा वेगैरे आहेस, त्यामुळे कंपनीच खूप नुकसान होईल वेगैरे थापा मारून १५ दिवसाची सुट्टी १२ दिवसांवर मंजूर करत होते.
मी १५ मिनिटांनी राजीनामा खरडून दिला. लगेच १५ दिवसांची सुट्टी मंजूर केली.
त्याचा बदला म्हणून लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत आणि लग्न झाल्याच्या दुसर्या दिवसापासून पुन्हा बॉसचे फोन चालू होते. (लग्नाच्या दिवशी मी फोन बंद ठेवला होता ).

ती बॉस अश्या कामासाठी फोन करायची जे जास्त महत्वाचे न्हवते, आणि मी ते काम ऑफिसमध्ये आल्यावर देखील करू शकत होतो.शेवटी वैतागून बॉसशी फोनवर बोलत असतानाच जोरात कचकचून शिवी घातली, तुझ्या आयची XX, समजत नाही का ग XX.निघ इथून साली XXX.
ती बॉस म्हणाली तू मला कसा काय शिव्या देऊ शकतोस.मी म्हटलं तुम्हाला नाही आमच्या इथल्या म्हशीला घालतोय.पिकात शिरली होती.ती काय समजायचे ते समजली. त्यानंतर बॉसचा फोन नाही आला.

१५ दिवसांची सुट्टी १७ दिवसात संपवून मी ऑफिसला आलो आणि पुन्हा राजीनामा खरडला. मंजूर करत न्हवते, शेवटी बिनडोक लोकांसोबत मला काम करायचे नाही असे मोठ्या साहेबाला सांगून नव्या कंपनीत रुजू झालो.आजतागायत इथेच आहे. परंतु इथे कधीच सुट्टी साठी कटकट झाली नाही. एखादे दिवशी शनिवार रविवार चुकून एखादे तासाभराचे काम येते, इतकेच. आधीची कंपनी फार मोठी होती, त्यामानाने सध्याची लहान आहे.पण पगार आणि समाधान जास्त आहे.

कुठेतरी वाचले होते, कि तुम्ही चांगली कंपनी निवडू नका, चांगला बॉस निवडा.
म्हणजे सुखी राहाल.

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2016 - 5:30 pm | अत्रन्गि पाउस

हहपुवा

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 May 2016 - 11:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

जबरी!

गामा पैलवान's picture

6 May 2016 - 5:36 pm | गामा पैलवान

लोकहो,

एक अनुभव सांगावासा वाटतो. माझ्या बाबतीत घडलेला नसून ऐकीव आहे.

मुंबईतल्या विक्रोळी येथील एका प्रसिद्ध आस्थापनातल्या एका कर्मशाळेतला (=कंपनीतल्या एका प्लांटमधला) एक महत्त्वाचा नळ फुटला. पाणी धोधो वाया जाऊ लागले. त्यामुळे पाणीपुरवठा तातडीने बंद केला. दुरुस्ती भीषण वेगाने पार पाडूनही चार दिवस लागले. पाणी नसल्याने हे चारही दिवस कर्मशाळा पूर्णपणे बंद होती.

तर हे चार दिवस कामगारांना आणि इतर कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. ही रजेची चोरी म्हणावी का? कायदा काय सांगतो?

आ.न.,
-गा.पै.

अर्थातच तुम्ही फोन स्विच ऑफ नाही करु शकत कारण मग समोर 'स्विच ऑफ केलेला आहे' असं कळतं
महागडे स्मार्ट फोन चालू ठेवून बॅटरी काढणंही धोक्याचं वाटतं
म्हणून
एक मोठा अ‍ॅल्युमिनियम फॉईल घ्या त्यात मोबाईल चांगला दोनदा गुंडाळा म्हणजे तुमचा फोन (आऊट ऑफ कवरेज असेल स्विच ऑफ नाही)

सुबोध खरे's picture

6 May 2016 - 8:11 pm | सुबोध खरे

एरो प्लेन मोड मध्ये टाका
हा का ना का

मराठी कथालेखक's picture

9 May 2016 - 6:56 pm | मराठी कथालेखक

मग समोरच्याला 'फोन स्विच्ड ऑफ आहे' अशा अर्थाचा संदेश ऐकू जातो. इथे आपण फोन मुद्दाम बंद ठेवत आहोत असे बॉसला भासू द्यायचे नसते. 'नेटवर्कच नव्हते, मी बिच्चारा काय करणार' हे चालू शकतं :)

मम्बाजी सर्वज्ञ's picture

6 May 2016 - 9:21 pm | मम्बाजी सर्वज्ञ

सध्या एका प्रोजेक्ट वर काम करतोय ज्यात भारतातल्या नामांकित एम एन सीज इंवोल्वड आहेत. २० वर्षांपूर्वी या समीकरणाच्या दुसर्या बाजूला होतो. इथून मागे वळून बघताना मला फोन लाईन च्या पलीकडे बसलेला 'मी' दिसतोय. रजा, ऑन साईट, पहाटे ४ पर्यंत काम करणे, शनिवार-रविवार काम करायला लागणे (बरेच आठवडे/महिने), मनस्ताप, घरच्यांना काळजी वाटणे, शाळेत आणि कोलेज मध्ये अभ्यास न केलेले दिवस आठवून पश्चात्ताप वाटणे, आपणच 'रीसिविंग एंड' ला का असतो असे सगळ्याच बाबतीत वाटणे, इत्यादि......अगदी पुस्तक नाही पण चार ओळी नक्की खरडणार आहे या विषयावर.

mugdhagode's picture

9 May 2016 - 6:56 am | mugdhagode

छान

रेवती's picture

7 May 2016 - 1:35 am | रेवती

बाकी सगळं जौ देत.............
कोणती कंपनी सुट्ट्या फॉर्वड करू देतिये जरा कळवता का? ;)
हा धागा शुक्रवारी काढण्याचे प्रयोजन काय? ;)
निमो, फ्यामिली सोडून कंपनीला महत्व देण्याइतके वाईट दिवस येऊ देऊ नका हे सुचवते, निर्णय तुम्हीच घ्या.

मलापण ह्या कंपनीचे नाव सांगा प्लीज. आधीच्या कंपनीमधल्या साठलेल्या सुट्ट्या घेऊन यायला देईल का ही कंपनी?

अत्रन्गि पाउस's picture

7 May 2016 - 7:58 am | अत्रन्गि पाउस

बातमी शुक्रवारी आली म्हणून धागा शुक्रवारी :) (धाग्याची पहिली ओळ)

प्रणवजोशी's picture

7 May 2016 - 6:52 am | प्रणवजोशी

माझ्या अॉफिसमधे माझा साहेब रजा द्यायला कटकट करतो पण हाफ-डे मात्र सहज देतो.

सत्याचे प्रयोग's picture

7 May 2016 - 7:53 am | सत्याचे प्रयोग

पोलीस खात्यात रजा घेणे दिव्य काम आहे. एक वेळ उसने पैसे देईल वरीष्ठ पण रजा नाही. इथे साप्ताहिक सुट्टी मिळत नाही रजा तर खुप दूरची गोष्ट. माझ्या बरोबरच्या सहकाऱ्याचा १ किस्सा आठवला आम्ही २ महिने घरापासून दूर डोंगरावर (पोलीसी भाषेत ट्याप) कर्तव्यासाठी
होतो हा गडी नवविवाहित १५-२० दिवसांनी आठवण यायला लागली आणि सुट्टी तर शक्यच नाही. त्याने वरिष्ठांना विचारले सुट्टीचे साहजिकच सुट्टी मिळाली नाही. परत गप्पगार. ४ दिवसांनी परत एकदा वरिष्ठांकडे सुट्टीसाठी गयावया. वरिष्ठ खवळले कशाला पायजे सुट्टी. हा गडी वैतागलेला. ह्यांनी सरळ सांगितले साहेब बायकोची लय आठवण येतेय सुट्टी नसेल मिळत तुम्ही करता का काय सोय. यावर वरिष्ठांनी तात्काळ सोडले त्याला.
चांगला विषय काढलाय रजेच्या हक्काविषयी चर्चा चाललीय अहो इथे पोलिसांना दसरा दिवाळीला रजा मिळत नाही हो.

mugdhagode's picture

9 May 2016 - 6:54 am | mugdhagode

दसरा दिवाळी डॉक्टर व सिस्टर लोकानाही कित्येकदा मिळत नाही.

लोकम डॉक्टर अरेंज केल्याशिवाय सुट्टी मिळत नाही.

नेत्रेश's picture

7 May 2016 - 12:03 pm | नेत्रेश

अमेरीकन कंपन्यांमध्ये खुपच उलट परीस्थीती आहे. सुट्टी न धेणार्‍या कर्मचार्‍याला HR कडुन सुट्टी ख्प साठल्याचे रीमाईंडर येते. त्याच्या बॉसला कॉपी जाते. आणी तरीही तो सुट्टीवर गेल नाही तर HR बॉसकडे स्पष्टीकरण मागतो.

आमच्या कंपनीत दर दीड दोन वर्षांनी भारतात यायला ४ ते ५ आठेवड्यांची सुट्टी आरामात मीळते, कंपनीतील सर्व भारतीयांना. सुट्टीवरच्या कर्मचार्‍याला फोन करणे म्हणजे मॅनेजरने स्वतःचा कमीपणा दाखवणे समजले जाते. गेल्या १५ वर्षांत मला कधीही सुट्टीवर असताना फोन आलेला नाही.

ईथे लोकांचे भयानक अनुभव वाचुन खरच वाईट वाटले.

नाखु's picture

7 May 2016 - 12:58 pm | नाखु

प्रतिसाद अगदी "नेत्रांजन" आहे इथल्या बॉसेस्,कंपनी मालक्,चालक यांच्या साठी.

देव सर्वांना अशी कंपनी देवो यापेक्षा अशी धोरणे भारतीय कंपन्यांमध्ये येवो हीच ईच्छा !!!

अस्सल गावठी एम एण सी कंपनीतला नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2016 - 1:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुट्टीवरच्या कर्मचार्‍याला फोन करणे म्हणजे मॅनेजरने स्वतःचा कमीपणा दाखवणे समजले जाते.

+१०००

एखादा अतिशय विरळा अज्ञात अज्ञात (unknown unknown) प्रसंग सोडला तर सुट्टीवरच्या कर्मचार्‍याला कामाच्या निमित्ताने फोन करणे म्हणजे व्यवस्थापकिय भोंगळपणाचेच उदाहरण म्हणावे लागेल.

सुट्टीवरच्या कर्मचार्‍याला फोन करणे म्हणजे मॅनेजरने स्वतःचा कमीपणा दाखवणे समजले जाते

प्रचंड आवडेश !!

काश, हा धागा बाॅसला दाखवता अाला असता :)

भाते's picture

7 May 2016 - 2:40 pm | भाते

याआधी नोकरी करत असलेल्या ठिकाणी नोकरी सोडल्यावर बाकी २५ रजांचे पैसे देताना फक्त त्याचा महागाई भत्ता दिला होता. नोकरी सोडताना बहुदा शिल्लक रजांचे पुर्ण पैसे मिळतात असा माझा अंदाज होता. मला यातले नियम माहित नसल्याने भांडणाच्या भानगडीत न पडता मिळालेले पैसे घेतले. तेव्हापासुन कानाला खडा लावला. न विसरता आणि न चुकता दरवर्षी आजारपणातल्या सुट्टया सोडुन इतर सुट्टया संपवून टाकतो. रजा वाया जायला नकोत आणि त्याचे पैसेसुध्दा नकोत.

कोंबडी प्रेमी's picture

8 May 2016 - 8:17 am | कोंबडी प्रेमी

ह्यांना मे महिन्यात सुट्टी असते हे ह्या निमित्ताने आठवले.

बोका-ए-आझम's picture

8 May 2016 - 1:20 pm | बोका-ए-आझम

क्रिमिनल कोर्ट चालूच असतं.

अभिजीत अवलिया's picture

8 May 2016 - 5:53 pm | अभिजीत अवलिया

एकंदरीत फार भयानक परिस्थिती दिसतेय सुट्ट्यांच्या बाबतीत. मी सध्या ज्या I.T कंपनीत आहे तिथे वर्षातून एकदा तरी सलग ५ दिवस सुट्टी घेणे बंधनकारक आहे. मी तर वर्षातून ४-५ वेळा तरी सलग ५ दिवस सोमवार ते शुक्रवार सुट्टी घेतो. शनिवार रविवार पकडून सलग ९ दिवस होतात. :)
पण पूर्वीच्या 'powered by intellect driven by values ' कंपनीत खूप त्रास झाला सुट्ट्या घेताना. अगदी हनिमून ला असताना पण लोकांनी फोन केला होता शंका विचारण्यासाठी.

अत्रन्गि पाउस's picture

8 May 2016 - 6:56 pm | अत्रन्गि पाउस

कोणती हि कंपनी म्हणे ??
जमल्यास व्यनी करा

अभिजीत अवलिया's picture

9 May 2016 - 7:22 pm | अभिजीत अवलिया

व्यनी केलेला आहे.

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 8:10 pm | टवाळ कार्टा

मला पण कळवा

आनंदी गोपाळ's picture

9 May 2016 - 8:51 pm | आनंदी गोपाळ

च्याय्ला, गुगलून समजतंय की चट्कन. इन्फोसिसची टॅगलाईन आहे ती.

नाय वो.. गल्ली चुकली तुमची.

मराठी कथालेखक's picture

10 May 2016 - 1:16 pm | मराठी कथालेखक

इन्फोसिस बरोबर आहे की ओ..
अगदीच बेकार कंपनी.

मराठी कथालेखक's picture

10 May 2016 - 1:18 pm | मराठी कथालेखक

म्हणजे 'powerd by , driven by ' वाली... :)

टवाळ कार्टा's picture

10 May 2016 - 1:55 pm | टवाळ कार्टा

मी सध्या ज्या I.T कंपनीत आहे तिथे वर्षातून एकदा तरी सलग ५ दिवस सुट्टी घेणे बंधनकारक आहे. मी तर वर्षातून ४-५ वेळा तरी सलग ५ दिवस सोमवार ते शुक्रवार सुट्टी घेतो. शनिवार रविवार पकडून सलग ९ दिवस होतात. :)

आम्ही या कंपनीबद्दल विचारत होतो...जी वाईट आहे त्याबद्दल का विचारावे??

इतके सगळे विस्कटून सांगायचा कंटाळा आला होता. धन्यवाद.

अभिजीत अवलिया's picture

11 May 2016 - 7:22 pm | अभिजीत अवलिया

व्यनि केलेला आहे.

विवेक ठाकूर's picture

10 May 2016 - 10:54 am | विवेक ठाकूर

अधूनमधून रजा घेऊन पापा घेण्याचा हक्क बजावायचा आणि ...... तसं न केल्यास गुन्हा होतो.

अद्द्या's picture

10 May 2016 - 12:24 pm | अद्द्या

महिनोंमहिने सुट्टी न घेत , रविवारी सुद्धा काम करण्याची वाईट सवय होती .

पण गेल्या वर्षापासून एक नियम स्वतः ला लाऊन घेतलाय, तो म्हणजे महिन्यातून कमीत कमीत एकदा दांडी मारायची. अगदी ऐन वेळी मेसेज / मेल करून किंवा कधी कधी न सांगता सुद्धा , आणि गरज असेल तेव्हा सुद्धा सुट्टी "घ्यायची " .

मागायची नाही.
काही नियम हे आपण लावावे लागतात कंपनीला ,
जसं कि एकदा ऑफिसच्या आवारातून बाहेर पडल्यावर फोन उचलणार नाही . किंवा सुट्टी वर असताना तर अजिबात उचलणार नाही. मग सर्वर जाळून राख होवो किंवा राउटर मधून धूर येउदेत .

नाहीतर च्यायला डोक्यावर चढून बसतात, रात्री हि फोन करून "पटकन उचलता येत नाही का" हे म्हणण्याची हिम्मत होते साल्यांची. अश्यावेळी येतील तेवढ्या भाषेत शक्य तेवढे मंत्रोच्चार म्हणून घ्यावेत. नोकरी दुसरी मिळते

मराठी कथालेखक's picture

10 May 2016 - 1:19 pm | मराठी कथालेखक

मी सध्या ज्या आयटी कंपनीत काम करतो तिथे रजा Auto Approve होतात. मॅनेजरला approve कराव्या लागतच नाहीत :)

वर्षाभरात कांही फरक पडला का..?

जेम्स वांड's picture

4 Aug 2017 - 10:12 am | जेम्स वांड

महिना येणार पगार हेच सनातन सत्य, बाकी नोकरी वगैरे सगळ्या अंधश्रद्धा होत.

धन्यवाद

(आळशी तरी कामाचा) वांडो

खरंतर व्यवस्थापनाने रजे कडे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सच्या दृष्टीने बघितले पाहिजे. रोबोला देखील PM & BM असतो तेथे माणसाची काय कथा !

रजा घेऊन ताजेतवाने होऊन लोक्स जोमाने काम करतात त्यासाठी बऱ्याच ठिकाणी रजा घेणे अनिवार्य असते.

या संदर्भात "आय रिक्रूटेड टू वर्किंग हॅन्ड्स हाऊएव्हर अ हयूमन बीइंग वॉक्ड इन" अशा आशयाची एक म्हण आठवते.