व्यंगचित्र:पुढचे पाऊल!

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in मिपा कलादालन
2 May 2016 - 1:50 pm

पुढचे पाऊल!

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

2 May 2016 - 1:52 pm | अभ्या..

मस्तच की.
थोडेसे फोटूशापात एडिट करुन लेव्हल्स अ‍ॅडजस्ट केल्या की एकदम प्रोफेशनल कार्टून झाले.
अजून येऊ द्यात. शुभेच्छा.

ए ए वाघमारे's picture

2 May 2016 - 1:54 pm | ए ए वाघमारे

धन्यवाद!

आता कुठूनतरी फोटोशॉप पैदा करावे लागेल. बाकी आमची ती हातकारागिरी आहे.

तेवढ्यासाठी थांबू नकात. आहे तसेच पाठवित जावा. स्कॅन करा किंवा फोटो काढा आणि ती फाइल अ‍ॅज ईट इज मला पाठवा. आपण एडीट करुन इथे पब्लिश करु. कार्टून्स ऑलवेज वेलकम आहेत.
तुमचा हात आर्टिस्टीक आहे एकदम. परस्पेक्टीव्हचे पण जजमेंट आहे. शुभेच्छा

ए ए वाघमारे's picture

3 May 2016 - 3:30 pm | ए ए वाघमारे

प्रोत्साहनाबद्दल आभार !
इंजिनीयरींग ड्रॉईंगचा एकच पेपर दोनवेळा देण्याचा अनुभव वगळता हे माझे पहिलेच चित्र आहे. वेळ मिळेल तसा सराव वाढवेन.

हर्शरन्ग's picture

8 May 2016 - 12:14 pm | हर्शरन्ग

फोटोशॉप नसेल तर online टूल्स पण आहेत
https://pixlr.com/editor/ हि site बरीचशी फोटोशॉप सारखी आहे

घाटी फ्लेमिंगो's picture

11 May 2016 - 8:17 pm | घाटी फ्लेमिंगो

ऑनलाईन आहे फोटोशॉप टूल. इनस्टॉल करायची गरज नाही. चित्रकला चांगली आहे तुमची.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2016 - 2:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण चित्र चांगली आली आहेत.

-दिलीप बिरुटे

शलभ's picture

2 May 2016 - 4:20 pm | शलभ

+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 May 2016 - 2:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाघमारे काका कशाला बाजार उठवताया? तेवढी एकच जागा शिल्लक आहे हक्काची ती तरी राहू दे ना.
प्लिज दया करा पण हे चित्र मागे घ्या पाशवी शक्तींच्या नजरेस पडले की संपले सगळे.
पैजारबुवा,

जव्हेरगंज's picture

2 May 2016 - 2:36 pm | जव्हेरगंज

b

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 2:47 pm | विजय पुरोहित

लोलवा...

नीलमोहर's picture

2 May 2016 - 2:21 pm | नीलमोहर

चित्रात बरेच छुपे, गहन अर्थ दडलेले दिसतायत, कोणी उकल केल्यास बरे पडेल.
इथे व्यंगचित्र पाहून आनंद झाला, येऊद्या अजून :)

चांदणे संदीप's picture

2 May 2016 - 2:29 pm | चांदणे संदीप

मीपण आजच मिपा कलादालनात माझे रिकामे उद्योग टाकतोय!

चित्र छान आहे!

("तेव्हा मला तू फार फार आवडतेस" या काव्यविषयास पूरक/प्रेरक खाद्य या चित्रात नक्कीच आहे! - कृ. ह. घ्या. सर्वांनी ;) )

Sandy

प्रचेतस's picture

2 May 2016 - 2:32 pm | प्रचेतस

=))

चौकटराजा's picture

2 May 2016 - 2:44 pm | चौकटराजा

मिपावर व्यंगचित्रकारांची वानवा दिसली सबब आपले जाहीर स्वागत ! ब्रश स्ट्रोकस जर अधिक सफाईदार हवे असतील तर अडोब फ्लॅश मधे चितारून जेपीजी फॉर्मॅट मधे एक्सपोर्ट करून पहा तिथे आर के लक्ष्मण किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे सारखे स्ट्रोक्स येण्याची सोय आहे.

बाकी महिला वर्ग, पुणेकर हे विषय हाताळताना सावधान !

भीमाईचा पिपळ्या.'s picture

2 May 2016 - 4:41 pm | भीमाईचा पिपळ्या.

अरे हे तर माणूसमारे

.

अडोब फ्लॅश मधे ब्रश टूल वापरून माउसच्या साह्याने असे चित्र काढता येते. त्यात स्मूथनेस चा स्लायडर आले तो वापरून निरनिराळ्या सेटिंगला रेखन करून पहा . ब्रशची टीप बारीक मोठी करता येते व रंग ही बदलता येतो.

चौथा कोनाडा's picture

3 May 2016 - 10:45 am | चौथा कोनाडा

चौरा, तुमचं ही चित्र भारीय !

तुम्ही का नाही टाकत एखादं व्यंगचित्र ?

चौकटराजा's picture

3 May 2016 - 1:00 pm | चौकटराजा

मी फ्लॅशवर सराव करतो. मग टाकीन. मला खात्री आहे . आर के लक्ष्मण यांच्या ब्रशाचा वेग तिथे प्रोग्राम आणून देतो.

चौथा कोनाडा's picture

14 May 2016 - 1:06 pm | चौथा कोनाडा

चौरा, झाला का फ्लॅशवर सराव ?
कधी टाकताय इथं चित्र ?

ए ए वाघमारे's picture

3 May 2016 - 3:26 pm | ए ए वाघमारे

धन्यवाद!
बघतो.

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 9:21 pm | विजय पुरोहित

भारीच हो... अगदी मार्मिक चित्र...

सुरवंट's picture

2 May 2016 - 9:48 pm | सुरवंट

जगायचं सोडून हे ***चं कसलं आंदोलन ?

चौथा कोनाडा's picture

3 May 2016 - 7:37 am | चौथा कोनाडा

एएवा साहेब, मस्त कार्टून झक्कास !

हातात डबा घेवुन टॉयलेटच्या कुलुपबंद दरवाज्याकडे बघणारा माणुस भन्नाट आलाय :-)

व्यंगचित्रकार मोजकेच असतात. तुम्ही त्या मोजक्यांपैकी एक !

चौथा कोनाडा's picture

3 May 2016 - 7:40 am | चौथा कोनाडा

मिपावर व्यंगचित्र बरयाच दिवसानी पाहिलं !
आणखी व्यंगचित्रांच्या प्रतिक्षेत !

व्यन्ग्चीत्रा साठी स्वतन्त्र मालीका का सुरु करत नाही

खटपट्या's picture

3 May 2016 - 10:49 am | खटपट्या

वा वा वाघमारे ....

बबन ताम्बे's picture

3 May 2016 - 12:41 pm | बबन ताम्बे

समयोचित :-)

व्यंगचित्रे किंवा जास्त योग्य शब्दांत अर्कचित्रे (कॅरिकेचर्स) ही संबंधितांना हसतहसत मारलेली कोपरखळी वा काढलेला चिमटा असावा. त्याला त्या व्यक्तीनेही हसून दाद दिली पाहिजे. व्यंगचित्रांचा मुख्य उद्देश हा ताणतणाव कमी करण्याचा असतो. तुम्ही विचार करून पहा, ज्या आंदोलनकर्त्यांना हे व्यंगचित्र तुम्ही दाखवाल त्यांना हे पाहून हसू येईल की राग येईल, अपमान झाल्यासारखे वाटेल?

मला हे व्यंगचित्र कमरेच्या खाली भाष्य करणारे वाटले. असो, ज्याचीत्याची आवड.

चौकटराजा's picture

3 May 2016 - 3:10 pm | चौकटराजा

यस !

ए ए वाघमारे's picture

3 May 2016 - 3:22 pm | ए ए वाघमारे

आपल्या मताचा आदर आहे.
धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

3 May 2016 - 5:45 pm | चौथा कोनाडा

असहमत !
व्यंगचित्र आंदोलनकर्त्यांसाठी आहे ?
आम्ही तर हसलो बुवा, "पुढचे पाऊल" काय असेल हे पाहून गंमत वाटली.
एएवांचे हे चित्र लोकसत्तातल्या प्रशांत कुळकर्णींच्या बोचर्‍या व्यंगचित्राची आठवण करुन देते.

एस's picture

3 May 2016 - 6:54 pm | एस

मेबी!

हे चित्र जर घरच्या स्त्रीला दाखवून म्हटलं की 'अगं बघ, काय भारी व्यंगचित्र आहे!' तर तिची प्रतिक्रिया काय असेल हा विचार केल्यास कदाचित आपले मत बदलू शकेल.

चौथा कोनाडा's picture

4 May 2016 - 11:56 am | चौथा कोनाडा

खिलाडु रसिक वृत्तीने पाहिल्यास पुरूष काय स्त्री काय कोणालाही वरील चित्रातले "अतिशोयोक्ती" अलंकारातील व्यंग नक्कीच समजू शकेल.
(अवांतरः चित्रात प्रसाधनगृह दाखवल्यामुळे फार नाक मुरडायची गरज नाही असे वाटते. हे म्हंजे सैराटच्या विरोधात उगाच सैराटपणा केल्या सारखे वाटतेय. कायप्पावर याच विषयावरचे विनोद व चित्रे फिरत आहेत)

बबन ताम्बे's picture

4 May 2016 - 12:51 pm | बबन ताम्बे

विनोद म्हणून हसायचे आणि सोडून दयायचे. अगदी वास्तवाशी सांगड घालायची म्हटले तर मग "व्यंग" काय दाखवायचे.

अभ्या..'s picture

4 May 2016 - 6:15 pm | अभ्या..

चौकोंना सहमत.
व्यंगचित्र आहे हे. कुठेही वर म्हणल्याप्रमाणे कमरेखालचा विनोद वगैरे नाही. घरच्या स्त्रियांना दाखवा वगैरे अति होतय.

हरकत नाही. व्यंगचित्रांमधलं मला जितकं समजतं असा माझा ग्रह आहे, त्यानुसार मी माझा दृष्टिकोन मांडला.

बिल क्लींटन आणि मोनिका लेवेन्स्कीचे लफडे बाहेर आले होते तेंव्हा मा. रा़ज ठाकरेंनी मोनिका लेवेन्स्कीचे व्यंगचित्र काढले होते आणि तिच्या तोंडावर दोन चिकटपट्ट्या दाखवल्या होत्या. आता? :-)

चौथा कोनाडा's picture

5 May 2016 - 12:41 pm | चौथा कोनाडा

:-)))

बबन ताम्बे साहेब, एका "हळव्या" कालावधीची आठवण करुन दिलीत !
बिल-मोनिकाच्या जोक्स व कार्टूननी कल्ला केला होता त्यावेळी :-) अन त्यात राज ठाकरे म्हण्जे काय सुपर्बच !

बबन ताम्बे's picture

5 May 2016 - 12:48 pm | बबन ताम्बे

मोनिकाच्या आठवणीने हळवे झालात !! बघा इमेल वगैरे मिळतो का ते. मध्यंतरी काहीतरी बातमी होती बॉ .

अनुभवांवर पुस्तक लिहिले तर त्या पुस्तकाचे नाव काय असेल?

How To Get A Head in politics!

चौथा कोनाडा's picture

5 May 2016 - 8:46 pm | चौथा कोनाडा

:-))

हा... हा... हा.... खिक्क !

ए ए वाघमारे's picture

3 May 2016 - 3:18 pm | ए ए वाघमारे

सगळ्या प्रतिसादकांचे आभार!

उगा काहितरीच's picture

4 May 2016 - 7:17 pm | उगा काहितरीच

चित्र म्हणून छान आहे...विनोद थोडा कमरेखालीच आहे. असो येऊद्या नवीन व्यंगचित्रे...

चौथा कोनाडा's picture

5 May 2016 - 1:01 pm | चौथा कोनाडा

आज ०५ मे ! जागतिक व्यंगचित्रकार दिन ! त्या निमित्त शुभेच्छा व सर्व व्यंगचित्र कलाकारांना मानाचा मुजरा !

मटाची आजच्या नामपट्टी मधील "महाराष्ट्र टाईम्स" ही अक्षरे व्यंगचित्रांनी सजवुन व्यंगहाचित्र कलाकारांना सलाम केलाय. जरूर बघा.

माहितगार's picture

5 May 2016 - 2:56 pm | माहितगार

जागतिक व्यंगचित्रकार दिन निमित्त शुभेच्छा ! अर्थात उपरोक्त धागालेखातील व्यंगचित्रातून नेमके कुणाचे व्यंग व्यक्त होत आहे? नेमके न्यायत्ता योग्यायोग्यता यांचे तारतम्य नेमके कुणाचे हरवले आहे ? असा प्रश्न पडला. हि फँटसी आहे, कोंडलेले आकर्षण की मानसिक असुरक्षीतता आहे ? असेही प्रश्न सदर व्यंगचित्र पाहून पडले

चौथा कोनाडा's picture

9 May 2016 - 9:55 pm | चौथा कोनाडा

>> व्यंगचित्रातून नेमके कुणाचे व्यंग व्यक्त होत आहे >>
चौथरा प्रवेश आंदोलनकर्ते यांचे.
चौथरा प्रवेश आंदोलनानंतर हुरळुन जाऊन पुढचे कुठले आंदोलन असु शकेल ही याची अतिशोयोक्ति करुन व्यंगचित्रकाराने कल्पना चित्रांकित केलीय.

>> नेमके न्यायत्ता योग्यायोग्यता यांचे तारतम्य नेमके कुणाचे हरवले आहे ? >>
तारतम्य हरवण्याचा प्रश्नच कुठे येतो. हे अतिशोयोक्ति प्रकारातील व्यंगचित्र आहे. हां... आता आंदोलनकर्त्यांनी तारतम्य बाळगले नाही तर चित्रात दाखवलेली परिस्थिती येवु शकते .... :-)) चित्रात अजुन एक शक्यता दाखवलीय. आंदोलनकर्त्या नेतृत्वाने तारतम्य बाळगले नाही तर सर्व सहकारी सोडुन जाऊ शकतात.

>>> फँटसी आहे, कोंडलेले आकर्षण की मानसिक असुरक्षीतता आहे >>>
भारी प्रश्न पडलाय.... अगदी मानसशास्त्राच्या पातळीवरचा ! पण आम्हाला स्वतःला असले काही जाणवले नाही !
चित्र पाहुन आम्हास हसु आले. त्या मुळे "चिकित्सेत" पडलो नाही.

आणखी एकः व्यंगचित्र कमरेच्या खाली भाष्य करणारे वाटले >>> व्यंगचित्र कमरे खालचे म्हंजेच अश्लील अजिबात नाही. हां ... आता साधारणपणे त्याज्य विषया वरचे आहे असे म्हणता येईल (आपल्याकडे स्वच्छतागृह, त्यातल्या त्यात महिला स्वच्छतागृह हा विषय त्याज्य समजला जातो) पण याच विषयावर पाश्चिमात्य व्यंगचित्रकारांनी बरीच चित्रे रेखाटलीत.

जे जाणवले ते लिहिले.

तुमची पण व्यंगचित्रे येऊ द्या की. एकदा तुम्ही पंढरपूरचे आहात असा प्रतिसादात उल्लेख केल्याचे आठवतेय. पंढरपूरला तर कलावंतांची देण आहे, एम.एफ. हुसेन, व्यंगचित्रकार खलील खान वगैरे.
येऊ द्या तुमची खुसखुसीत शैलीतील व्यंगचित्रे.

चौथा कोनाडा's picture

12 May 2016 - 5:17 pm | चौथा कोनाडा

जाणकार म्हणुन हरब-याच्या झाडावर चढवल्या बद्द्ल धन्यु ताम्बेसाहेब :-)

व्यंचि काढण्याचे शिवधनुष्य पेलवले नाही म्हणुन नाईलाजास्तव सोडुन द्यावे लागले.
:-(

मग त्यावरच एक व्यंगचित्र होऊन जाऊ दया.
:-)