लाईफलोंग ब्याचलर

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in काथ्याकूट
1 May 2016 - 4:14 pm
गाभा: 

आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय.

"लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?"

काही दुवे:

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

1 May 2016 - 4:31 pm | उगा काहितरीच

शादीके लड्डु खाये तो पछताये । ना खाए तो भी पछताए।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2016 - 4:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>"लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय?

होय.

>>>>>अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?"

नाही.

दुव्यापेक्षा व्यक्तिपरत्वे अनुभव महत्वाचे. लग्न झालेलं नसतं तेव्हा कधी होईल कधी होईल असं होतं आणि एकदा सर्व हौस झाली की मग पोरं, त्या शाळा, बायको प्रेम, भांडण, गैरसमज, नात्यातील ओढ़ातान, वाढतं कुटुंब, जवाबदारी यात माणूस (निष्ठुर होऊन) रमुन जातो आणि नंतर मग अधुन् मधून किंवा नियमितही जिच्याबरोबर लग्न झालं नाही ती जर असती तर आत्तापेक्षा तिने माझा अधिक सुन्दर संसार केला असता का ? असे काही बाही विचार येत असतात, त्या विचारांना धूड़कावून संसार करायचा असतो, असे म्हणतात बाकी काही नाही. :)

-दिलीप बिरुटे

जव्हेरगंज's picture

1 May 2016 - 8:35 pm | जव्हेरगंज

हाहाहा!

बाबा योगीराज's picture

1 May 2016 - 8:48 pm | बाबा योगीराज

प्राडॉ. शी बाडीस.

रमेश आठवले's picture

1 May 2016 - 8:12 pm | रमेश आठवले

तो फिर क्यू न लड्डू खा के पछताये ?

बोका-ए-आझम's picture

2 May 2016 - 12:32 am | बोका-ए-आझम

ही सरसकट प्रत्येकाला लावता येणार नाहीत. प्रत्येकाने आपापल्या temperament प्रमाणे जे योग्य वाटेल ते करावे अाणि शक्यतो हा निर्णय स्वतःच घ्यावा.समाजाला लुडबूड करु देऊ नये.

कंजूस's picture

2 May 2016 - 8:27 am | कंजूस

बिरुटे +++

माझे मत
१) माया आहे याचे उत्तम उदाहरण.
२) लग्न न केल्यास एका तरुणपणानंतर सर्वजण टाळतात,केल्यास न पटल्यास एकजणच टाळेल.
३) करा आणि मोडा.
४) भांडायचेच आहे तर 'हक्काच्या' बायकोशी /नवय्राशी भांडा हक्काने.
५) कोणी सांगावे आपल्याबाबतीत चांगलेही होईल.

कंजूस's picture

2 May 2016 - 8:29 am | कंजूस

(Quora) वेबसाइट फक्त कंम्प्युटरवरच चालते का?मोबाइलचा अनुभव काय आहे?

निशांत_खाडे's picture

2 May 2016 - 2:09 pm | निशांत_खाडे

अंड्रोइड, आयओएस आणि विंडोजवरती एप डोउन लोड करू शकता.. एप नसतानाही मस्त चालते.
कोरा जिंदाबाद...
www.quora.com

मस्त चालतेय मोबाइलवर quora dot com website.अकाउंट घेतले ,सुरुवात केली.
धन्यवाद.
( फक्त इंग्रजीच आहे का?)

निशांत_खाडे's picture

2 May 2016 - 11:56 pm | निशांत_खाडे

तेवढाच एक प्रोब्लेम आहे बघा.. नाहीतर सध्या कोरा सारखी दर्जेदार वेबसाईट आंतरजालावर दुसरी कुठलीच नाही. काही दिवस वापरल्यानंतर कळेलच म्हणा तुम्हाला..

quora अकाउंट दुसय्रा दिवशी उघडलं तर " you are blocked from posting -----use real name----"मेसिज दिसला.युजरनेम नाही चालत.मग दुसरं उघडलं वेगळा इमेल टाकून ते चालू आहे.मज्जाच.

कंजूस's picture

4 May 2016 - 1:08 pm | कंजूस

फोनच्या wap native browserवरच अकाउंट ओपन होते ( https ?) web browser वर नाही चालत.( ओपरा,युसि )

असंका's picture

2 May 2016 - 8:39 am | असंका

लारा लप्पा जगजितसिंग-

चुल्ले आग ना घडे दे विच पाणी
ओ छडेया दी जू बुरी....

काम करकरके जधों वी घर आइदा,
मार मार फुंका चुल्ले विच थक जाइदा
रोटी पैंदीये कच्ची गिली खाणी
ओ छडीया दी जू बुरी..

छ्डा- सडा

विवेक ठाकुरांच्या प्रतिक्षेत

किंवा घेणं झेपणार नाही असं वाटतं ते बॅचलरहूडचा जोमात प्रचार करतात.

सहजीवन हा जीवनातला फार आनंदाचा आणि जवळजवळ अपरिहार्य भाग आहे. मुल, त्याचं संगोपन, त्याचाबरोबर पुन्हा उपभोगायला मिळणारं बालपण, मग उत्तररंग आणि शेवटी आप्तांच्या सहवासात देह सोडणं (याचा अनुभव नाही, अनुमान आहे) या गोष्टींपासून एकटं राहाणारा वंचित राहातो.

लग्न करायचं किंवा नाही हा ज्याचा त्याचा निर्णय असला तरी, एकदा करायचं म्हटलं की ते योग्य वयात केलं तरच मजा आहे. करु का नको, याचा अनुभव काय, तो काय म्हणतो असा विचार करण्यापेक्षा आपल्याला आणि तिलाही मजा येईल अशी अर्धांगिनी निवडण हे कौशल्याचं काम आहे. सहजीवनाशिवाय आयुष्य फार बेरंग आणि बोअर होईल.

डिबी म्हणतात तसं .....

अधुन् मधून किंवा नियमितही जिच्याबरोबर लग्न झालं नाही ती जर असती तर आत्तापेक्षा तिने माझा अधिक सुन्दर संसार केला असता का ? असे काही बाही विचार येत असतात, त्या विचारांना धूड़कावून संसार करायचा असतो, असे म्हणतात बाकी काही नाही

मला कधीही वाटलं नाही कारण आहे ते उपभोगायची आणि कायम वर्तमानात राहायची कला साधली आहे. तस्मात, इट इज अ ग्रेट थींग टू बी मॅरीड अँड हॅव अ कंपॅनियन.

स्पा's picture

2 May 2016 - 11:43 am | स्पा

थँक्स विठा

अता बायको शोधणे आले

मग त्या नात्यात रंग भरणं, त्याची मजा घेणं, आणि ते सांभाळणं आपसूक होतं.

अप्पा जोगळेकर's picture

2 May 2016 - 6:24 pm | अप्पा जोगळेकर

अरे ते सहजीवन वगैरे थोरामोठ्यांसाठी रे दादा. सामान्य मर्त्य मानवांसाठी ओझ्याचा बैल होणे किंवा गोर्ह्याचा बैल (शब्दश: नव्हे) होणे हेच खरे.

विवेक ठाकूर's picture

2 May 2016 - 8:52 pm | विवेक ठाकूर

थोर किंवा मोठं आणि सामान्य असा भेद नाही. लग्न अमिताभचं असो की आपलं, मूळ फॅक्टर्स तेच राहातात. ज्याला पत्नीबरोबर जगायची मजा कळली तो घरच्याघरी सुखी होतो. खरंतर दोघंही सुखी होतात. आणि एक मस्त कुटुंब तयार होतं, जिथे मुलाचं योग्य संगोपन होऊन सर्वांना मनाजोगतं जगता येतं.

दुसय्राच्या फुंकरीने आपल्या चुली पेटत नाहीत.

mugdhagode's picture

2 May 2016 - 11:35 am | mugdhagode

लग्नच न झालेले , संसार न करताच समाधिस्त झालेले , मांडवातून पळालेले , सन्यास घेउन पुन्हा संसारात आलेले , बायको सोडुन वनवासात गेलेले , बायको घेऊन वनवासी फिरलेले , साखरपुडा झालेली बायको सोडुन स्वयंसेवक झालेले , खोटा संसार करणार्‍आ संतिणी , पोरं नवरा टाकुन उधळलेल्या अप्सरा व नदीमैय्या .......

एकंदर असल्या लोकांचे या देशातील लोकाना भयाण आकर्षण आहे.

जौ दे !

( सकाळी सकाळी मोघले आजम , जोधा अकबर , ताजमहलची मुसलमानी व्हिडिओ गाणी बघितली की असले अभद्र हिंदु विचार दिवसभर येत नाहीत. )

विवेक ठाकूर's picture

2 May 2016 - 11:46 am | विवेक ठाकूर

तो जातीवादी नसतो. त्या अँगलनं पाहिलं तर जनानखाना ही कल्पना स्त्रीचा उपमर्द आणि प्रतारणेचा कळस आहे.

गामा पैलवान's picture

2 May 2016 - 12:19 pm | गामा पैलवान

असं म्हणता मुगोबाई? मग कोणते अभद्र विचार मनात येतात?
आ.न.,
-गा.पै.

viraj thale's picture

2 May 2016 - 12:21 pm | viraj thale

बघा पिसाळलेली घो/गोड़ी

इस्पिक राजा's picture

4 May 2016 - 1:15 pm | इस्पिक राजा

सकाळी सकाळी मोघले आजम , जोधा अकबर , ताजमहलची मुसलमानी व्हिडिओ गाणी बघितली की असले अभद्र हिंदु विचार दिवसभर येत नाहीत

मुग्धा तैंनी जनानखान्याचे लैच आकर्षण जणू.

अनेक बायकांशी संसार करुन , त्यांच्या पोटी १६ वर्षात १५ प्पोरे जन्माला घालून त्यांना मारुन मग त्यांच्या कबरी मिरवणार्‍या लोकांबद्दल जि व्हाळा असेल तुम्हाला नै?

कंजूस's picture

2 May 2016 - 11:48 am | कंजूस

"लग्नच न झालेले , .......
एकंदर असल्या लोकांचे या देशातील लोकाना भयाण आकर्षण आहे."


क्या बोला! प्याराबोला ( parabola )!

सुबोध खरे's picture

2 May 2016 - 11:58 am | सुबोध खरे

आपले दोन्ही दुवे आणि लेख नीट वाचले
यानंतर माझा अभिप्राय असा आहे.
मला लग्न न करता एकटा राहायला आवडलं असतं का ?-- नाही
लग्न करून मी सुखी झालो का? हो नक्कीच
परत निवड करण्याचा हक्क( choice) मिळाला तर मी एकटा राहेन पसंत करेन का? -- नाही
सद्य ( लग्न झालेलं आणि मुलं असताना) परिस्थितीत मी सुखात आहे का?-- होय
हा माझा वैयक्तिक अभिप्राय आहे.
ज्याला आयुष्यभर ब्रम्हचारी राहायचं आहे त्याने राहावे.
बस संपला विषय.

सुबोध खरे's picture

2 May 2016 - 12:00 pm | सुबोध खरे

काही जीव असे आहेत
कि खांब दिसला कि पाय वर "केलाच" पाहिजे.
स्वभावदोष म्हणायचं.
भद्रं ते भवतु

गामा पैलवान's picture

2 May 2016 - 12:22 pm | गामा पैलवान

सुबोध खरे,

माझ्या मते तो स्वभावदोष नसून ती एक स्वाभाविक क्रिया आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

2 May 2016 - 12:55 pm | सुबोध खरे

पैलवान साहेब
तो प्रतिसाद ब्रम्ह्चर्यावर नसून मोगा खान (मु गो) यांना होता.

नाखु's picture

2 May 2016 - 2:15 pm | नाखु

साहेब ,

कचर्यातून कला म्हणजे निर्मीती

(अ)कलेचाच कचरा म्हणजे...वि मी सांगायला पाहिजे का,

गा.पै. कुठ नादी लागता "कुलंगी" च्या

सरळसोट नाखु

आनन्दा's picture

2 May 2016 - 2:33 pm | आनन्दा

त्यांचा प्रतिसाद पण मोगाखानांच होता. बाकी गापै<चा प्रतिसाद आवडला. या धाग्यावर खरे तर रणकंदन बघायला मिळेल या आशेने आलो होतो. थोडीशी निराशाच झाली हे खरे.

गामा पैलवान's picture

3 May 2016 - 1:50 am | गामा पैलवान

सुख, अहो मीही तेच म्हणतोय. खांब दिसला की तंगडी उभारणे हा स्वभावातला दोष नसून स्वभावाची रचनाच तशी आहे. :-D
आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 2:50 pm | मराठी कथालेखक

संम असे आयडी का चालवून घेत आहेत हा एक प्रश्नच आहे..

इस्पिक राजा's picture

4 May 2016 - 1:19 pm | इस्पिक राजा

ट्यार्पी मिळतो हो. नायतर फुटकळ कारणांवरुन इतरांची हकालपट्टी होते आणि अस्सले आयडी फार जुलाब होइस्तोवर टिकतात याचे दुसरे काय स्पष्टीकरण असु शकते?

अप्पा जोगळेकर's picture

2 May 2016 - 12:33 pm | अप्पा जोगळेकर

तुमची मर्जी. अविवाहित राहणे ठीक आहे. ब्रम्हचारी राहू नका.

पाहा :
लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय?

स्पा's picture

2 May 2016 - 2:18 pm | स्पा

=))

तुषार काळभोर's picture

2 May 2016 - 3:10 pm | तुषार काळभोर

:)

सूड's picture

2 May 2016 - 4:09 pm | सूड

=))

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 May 2016 - 2:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

लग्न न करता रानात जाउन बसला. झोपडे बांधले,उंदरांच्या त्रासामुळे मांजर पाळली, तिच्या दुधासाठी गाय पाळली,गायीसाठी शेत,शेतासाठी विहिर खणली आणि शेवटी हे सर्व कोण सांभाळेल याची चिंता करत करत मेला.
!
!
!
!
!
मग संसारानेच काय घोडे मारले होते?

लालगरूड's picture

2 May 2016 - 3:22 pm | लालगरूड

क्याबाहै

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 3:06 pm | मराठी कथालेखक

थोडे विषयाच्या जवळपासचे अवांतर :

लग्न करुनही कधीच मुलांना जन्म न देणे म्हणजे मुद्दाममहून तसा निर्णय घेणे , तसेच कोणत्याही प्रकारे पालक न बनणे (म्हणजे दत्तक वगैरेही नाही) ही देखील एक जीवनशैली होवू लागली आहे.

या जीवनशैलीला चाईल्डफ्री कपल, डिंक कपल (DINK - Double Income No KIds बहूधा अशी जीवनशैली स्वीकरणार्‍या जोडप्यात दोघेही नौकरी/व्यवसाय करणारे असतात म्हणून) ई नावे आहेत.

समविचारी व्यक्ती भेटणे हे ह्या जीवनशैलीचे मोठे आव्हान आहे आणि भेटल्यावरही आयुष्यभर त्या विचारांवर दोघांनी ठाम राहणे अत्यंत महत्वाचे. दोघांचे विचार बदलले तर फारशी अडचण नाही, पण एकाचे विचार बदलले मात्र दुसरा ठाम राहिल्यास संघर्ष होवू शकतो. बाकी सामाजिक आणि कौटुंबिक दबाव यांना तोंड द्यावे लागू शकते.

टीप : या विषयावर धागा काढावा का असा विचार मी करत होतो, पण इथे किती मिपाकर या विषयाबद्दल बोलण्यास उत्सुक आहे ते माहित नाही त्यामुळे विवाहबद्दलच्या या धाग्यात उपधागा काढला आहे.

निशांत_खाडे's picture

2 May 2016 - 3:13 pm | निशांत_खाडे

नवीन माहिती मिळाली.. धन्यवाद..

अप्पा जोगळेकर's picture

2 May 2016 - 6:18 pm | अप्पा जोगळेकर

प्रजनन हाच लग्नाचा मूळ हेतू असतो. अन्यथा बायको नवर्याची किंवा नवर्याने बायकोची कटकट का झेलावी हा प्रश्नच आहे. बाकी ज्याला त्याला आचार स्वातंत्र्य असतेच म्हणा.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 6:32 pm | मराठी कथालेखक

अन्यथा बायको नवर्याची किंवा नवर्याने बायकोची कटकट का झेलावी हा प्रश्नच आहे.

माफक कटकट झेलता येतेच...पण फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात.

मुलबाळ असले तर जोडीदाराची + मुलांची कटकट झेलावी लागतेच, झालेच तर मुलांची कटकट तरी का झेलावी हाही प्रश्न आहेच :)

विवेक ठाकूर's picture

2 May 2016 - 8:43 pm | विवेक ठाकूर

पण अर्धवट उडी मारली तर धड हे पण नाही आणि ते पण नाही असं होणार. एकदा लग्न म्हटलं की संसार सर्वतोपरी आलाच. चाईल्डफ्री कपलमधे बाँडच तयार होत नाही. दोघंही केवळ खडाखडी करत राहातात. आणि त्यामागे खरं तर हाच विचार असतो :

फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात.

लग्न करणं म्हणजे घटस्फोटाची रिस्क आलीच पण सुरुवातीपासून मॅचच्या बाहेर पडायचा मार्ग दोघांनी मोकळा ठेवला तर पारस्पारिक विश्वास निर्माण होत नाही. देअर इज नो कमीटमंट. मुल आणि प्रेम हेच तर लग्नसंबंधातले सेतू आहेत. नाही तरी लग्न ही निव्वळ पारस्पारिक मान्यताच आहे. माणसानं ती स्वतःच्या सोयी आणि जीवन सुखकर होण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्या पलिकडे लग्नाला काही अर्थ नाही. पण एकदा ती व्यवस्था स्वीकारायची म्हटली की एकतर पूर्णपणे मान्य करायची किंवा मग त्यात पडायचंच नाही. तिथे तिसरा पर्याय नाही.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 11:50 pm | मराठी कथालेखक

चाईल्डफ्री कपलमधे बाँडच तयार होत नाही. दोघंही केवळ खडाखडी करत राहातात

अनुभव आहे ? तुम्ही नेहमी अनुभवावर आधारित बोलत असता म्हणून विचारलं.

विचारामागचा हेतू कळणं अवघड नाही. अर्थात, तुम्हीच म्हटलंय :

फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात

यावरनंही ते स्पष्ट होतं. शिवाय अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं हा वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्‍यांचा अनुभव आहे. थोडक्यात, चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही.

लंबूटांग's picture

3 May 2016 - 12:33 am | लंबूटांग

शिवाय अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं हा वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्‍यांचा अनुभव आहे. थोडक्यात, चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही.

वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्‍यांचा अनुभव आणि जाणून बुजून मूल नं होऊ देणार्‍यांचा अनुभव सारखाच कसा असेल.

अशी कैक जोडपी बघितली आहेत ज्यांनी मूल नं होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जोडपं तर २० एक वर्ष सुखाने नांदत आहे. दीर्घकाळ टिकणारा पर्याय कसा नाही?

बाकी एरवी इतरांनी वाचलेले काही सांगितले की अनुभव घेतल्यामुळे आपल्याला वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे अशा तोर्‍यात बोलणार्‍याने स्वतःच्या सोयीप्रमाणे पुस्तके वाचून केलेला अभ्यास अनुभवापेक्षा सरस असल्याचे वाचून मौज वाटली.

वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्‍यांचा अनुभव आणि जाणून बुजून मूल नं होऊ देणार्‍यांचा अनुभव सारखाच कसा असेल.

अपत्यजन्म ही स्त्रीची नैसर्गिक इच्छा आहे कारण स्त्री देहाच्या निर्मितीमागे निसर्गाचा तो मूळ उद्देश आहे. तुम्ही ठरवा किंवा न ठरवा त्यानं काही फरक पडत नाही. स्रीची नैसर्गिक इच्छा कायम एकच राहाते. वंध्यत्वाचा सामना करणारं दांपत्य हे एक उदाहरण आहे.

अशी कैक जोडपी बघितली आहेत ज्यांनी मूल नं होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जोडपं तर २० एक वर्ष सुखाने नांदत आहे. दीर्घकाळ टिकणारा पर्याय कसा नाही?

माझ्या पाहाण्यात असं एकही जोडपं नाही. शिवाय अपत्य नसेल तर दोघात बाँड तयार होत नाही या उघड वस्तुस्थितीची तुम्हाला कल्पनाच दिसत नाही. अपत्यामुळे संसार टिकतात आणि घटस्फोटही सहजी होत नाहीत. असा निर्णय घेणार्‍या सदस्याचाही प्रतिसाद तेच सांगतो.

बाकी एरवी इतरांनी वाचलेले काही सांगितले ..... वगैरे

प्रतिसाद नीट वाचत जा म्हणजे असे शोचनीय प्रसंग वारंवार येणार नाहीत.

लंबूटांग's picture

3 May 2016 - 1:00 am | लंबूटांग

मी ठरवणारा कोण? आता मग मी इतकी जोडपी बघितली त्यातल्या स्त्रीयांच्या इच्छा काय अनैसर्गिक म्हणायच्या का?

तुमच्या पाहण्यात जोडपं नाही म्हणून मग तुम्ही म्हणताय तसा बाँड तयार होत नाही म्हणायचे? बरं मला प्रतिसाद नीट न वाचता वगैरे लिहीणार्‍या तुम्ही माझ्या वरील प्रतिसादात लिहीलेले २० वर्ष सुखाने संसार करणार्‍या दांपत्याचे उदाहरण दिलेले वाचलेले दिसत नाही. तुम्ही म्हणताय तशी वस्तुस्थितीच आहे. अपत्यामुळे संसार टिकतात असे काही नाहीये. घटस्फोटही सहजी होत नाहीत हे अंशतः बरोबर. कारण मग न्यायालयात मुलांचा ताबा आणि पोटगी वगैरे जास्ती गुंतागुंतीचे होते.

प्रतिसाद नीट काय वाचायचा. तुम्हीच सांगितले ना मानसशास्त्राचा अभ्यास वगैरे? तो पुस्तकं नं वाचता कसा केला?

निशांत_खाडे's picture

3 May 2016 - 1:16 am | निशांत_खाडे

अपत्यजन्म ही स्त्रीची नैसर्गिक इच्छा आहे पण एखाद्या स्त्रीने 'चायील्ड फ्री' राहण्याचा निश्चय केला असेल तर या नैसर्गिक इच्छेतून ओवरकम होता येत(च) नाही का?

अवांतर: समलिंगी स्त्रियांना अशी इच्छा होत नसेल काय?

एखाद्या स्त्रीने 'चायील्ड फ्री' राहण्याचा निश्चय केला असेल तर या नैसर्गिक इच्छेतून ओवरकम होता येत(च) नाही का?

निसर्गाचं सर्कल पूर्ण होत नाही त्यामुळे अशा स्त्रीला अपूर्णत्वाचं फिलींग राहातं. सामान्यतः असा निर्णय कुणी घेत नाही, तस्मात अपत्य असणार्‍या स्त्रीयांना अपत्यजन्म म्हणजे काही ग्रेट वाटत नाही. म्हणून वंध्यत्व असलेल्या स्त्रीचं उदाहरण दिलंय. शिवाय मूल हा दांपत्याला जवळ आणणारा फार मोठा घटक असतो.

उदा. भूक नैसर्गिक आहे, उपासाचा निश्चय करावा लागतो. असा निश्चय निसर्गापुढे किती काळ टिकाव धरतो ? अपत्य जन्म ही तर फार गुंतागुंतीची आणि सटल घटना आहे. वरकरणी मुलांची कटकट नको म्हणून असा निर्णय घेतला आणि स्त्रीचं वय उलटून गेलं तर मग फेरविचार अशक्य होतो. तस्मात एकदाच काय ते ठरवावं, आयदर फुल पॅकेज विथ ऑल प्रोज अँड कॉर्न्स ऑर नो पॅकेज अ‍ॅट ऑल.

लेस्बियन्स अपवादात्मक उदाहरण आहेत. त्यांना पुरुषाबद्दल अनाकर्षण असल्यानं देहरचना आणि मानसिकताच भिन्न असते. अपत्याबद्दल त्यांच्या मनात विचारही येत नसावा. पण शेवटी एक्सेप्शन प्रूव्ज द रुल.

अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं >>>>>

हे एक थोर मिथ आहे.

माझ्याबरोबर एम डी झालेली आमची मैत्रीण हिला मुल नकोच होते. हा तिचा निर्णय पक्का होता. यामुळे अर्थात तिचा घटस्फोट झाला पण आजही आपल्याला मुल असायला हवे होते असे तिला वाटत नाही. ती एका प्रथितयश अशा केंद्र सरकारच्या रुग्णालयात रेडियोलॉजिची प्राध्यापक आहे आणि आजही मानसिक दृष्ट्या कुठेही असमतोल नाही.
आमच्या शेजारची मुलगी केवळ आईवडिलांच्या इच्छेला मान देऊन स्थळे पाहत असे पण तिला लग्नच करायचे नव्हते. ती स्वतः सुंदर असल्याने बर्याच स्थळांकडून होकारही आला होता. शेवटी आईवडिलांनी कंटाळून तिला स्पष्टपणे विचारले तेंव्हा तिने धीर करून लग्नच करायचे नाही असे सांगितले. आजही ती एका केंद्र सरकारी आस्थापनात अतिशय उच्च हुद्द्यावर काम करीत आहे आणि अतिशय शांत आणि उल्हासपूर्ण व्यक्तिमत्व असलेली हसतमुख स्त्री म्हणून आम्ही तिला कित्येक वर्षे पाहत आलो आहे.
अशी अनेक उदाहरणे आहेत. तेंव्हा "अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं" हे १०० टक्के सत्य नाही असे वाटते.

मन चंगा तो कठौती में गंगा.

विवेक ठाकूर's picture

3 May 2016 - 1:29 pm | विवेक ठाकूर

अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं >>>>>हे एक थोर मिथ आहे.

मग वंध्य स्त्रीचं दु:खं काय असतं? आणि निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचं तुमच्या मते प्रयोजन काय ?

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 1:36 pm | पिलीयन रायडर

वंध्य स्त्री म्हणजे समस्त स्त्री प्रजात असते का?

मुलं नसलेल्या बायका वंध्यच असतात का?

वंध्य बायका फक्त दु:खीच असतात का?

मुल असलेल्या बायका फक्त सुखीच असतात का?

वंध्य स्त्रीयांची दु:खं तुम्ही कशी अभ्यासली?
मूल नको वाटत असतानाही पिअर प्रेशर मुळे मुले होऊ दिलेल्या स्त्रीया कृतकृत्य जीवन जगत असतात असे असते का ?

मातृत्व आणि वात्सल्य वगेरेंना विनाकारण इतका फालतू थोरपणा दिला गेलेला आहे की या भावना नसणे किंवा कमी असणे = थोर महापातक किंवा वि़कृतीच !!!!

अर्थात उपरोक्त महोदयांचा मानसशास्त्राचा (सुद्धा) प्रगाढ (नेहमीप्रमाणेच) अभ्यास (यांचा तो अभ्यास आपलं ते..... जौ दे) असल्यामुळे वरील सर्व प्रश्नांची (इतरांना मूर्खात काढणारी) उत्तरे निश्चितच मिळतील हं पिरा ;)

विवेक ठाकूर's picture

3 May 2016 - 2:28 pm | विवेक ठाकूर

१) निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचा उद्देश काय ?
२) वंध्यत्व इतकं नॉर्मल असतं तर त्यावर संशोधनाची गरज काय ? (खरं तर हा प्रश्न सुबोधजींना विचारा म्हणजे तुम्हाला योग्य उत्तर मिळेल.)

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 2:34 pm | पिलीयन रायडर

वंध्यत्व आणि "बाय चॉईस" मुल न होऊ देणे ह्यात फरक आहे.

हा मुद्दा पटला तर पुढे बोलु.

चिगो's picture

4 May 2016 - 6:02 pm | चिगो

त्यातच बरंच लचांड आहे..

- व्यंधत्व असल्याने व मुल होण्याची इच्छा असल्याने आणि सामाजिक दबावाने कुढणारी स्त्री..
- व्यंधत्व असूनही ;नो बीग डील' मानणारी स्त्री..
- स्वतःला मुल नकोय, पण घरच्यांच्या दबावामुळे मुल होण्याचा त्रास सहन करणारी स्त्री..
- स्वतःला मुल नकोय, म्हणून नवर्‍याच्या आणि घरच्यांच्या दबावाला पुरुन उरणारी स्त्री..
- बाय चॉईस 'मुल नकोय' हे पटवून देणारी व त्याप्रमाणे वैवाहिक सहजीवन आनंदात जगणारी स्त्री..
- लग्न न करता, मुल हवंय, म्हणून आवडत्या पुरुषाकडून पुत्र/पुत्रीप्राप्ती करुन घेणारी स्त्री..
- लग्नाच्या लफड्यात न पडता आवडत्या पुरुष/पुरुषांचा सहभोग उपभोगणारी स्त्री..
- - लग्नाच्या लफड्यात न पडता आवडत्या स्त्री/पुरुषांचा सहभोग उपभोगणारी स्त्री..

लय कॅटॅगर्‍या आहेत.. पण 'सर्वां शहाणे करुन सोडावे' म्हणतांना आपल्या ज्ञाना/समजुतीबाहेरही लोक असतात आणि ते आनंदात जगतात, हेच मान्य नसेल तर..

मितान's picture

3 May 2016 - 2:52 pm | मितान

@ वि ठा
निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचं तुमच्या मते प्रयोजन काय ?>>>>

निसर्गात अनेक वृक्षवेली असतात. काहींना सुंदर फळे येतात, फुले येतात काहींना येत नाहीत. या फळं फुलं न येणार्‍या झाडांच्या निर्मितीमागेही निसर्गाचे निश्चितच काही प्रयोजन असणार. ती काही अपघाताने झालेली निर्मिती नाही.
स्त्री देह वंश वाढवण्यासाठी असतो हे कबूल. पण ती प्रेरणा नैसर्गिक आदिम वगेरे असते हे चूक आहे. फळे व फुले न येणार्‍या झाडाला जितका आणि जेवढा आनंदी जगण्याचा अधिकार आहे तितकाच वंध्य किंवा अपत्यविहीन किंवा बाय चॉइस मूल होऊ न देणार्‍या स्त्रीयांना ( आणि पुरुषांनाही) आहे. सर्व स्त्रीयांमध्ये ती प्रेरणा असतेच वगेरे ठामपणे सांगून तुम्ही नकळत अशा गटाला दोष आणि गिल्ट देताय.

वंध्य स्त्रीचे दु:ख काय असते ?
कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही बाबतीत वंचित असण्यामुळे असणार्या दु:खासारखेच हे ही दु:ख असते. त्या दु:खाची तीव्रता वा वेदनेची धार व्यक्तिपरत्वे बदलते एवढंच. एखाद्या व्यक्तीच्या जवळची व्यक्ती गेल्याने झालेल्या दु:खाची धार व मूल हवे असून होत नसलेल्या व्यक्तीच्या ( स्त्री आणि पुरूष ) दु:खाची धार, विश्वासू पार्टनरने विश्वासघात केल्याने झालेल्या दु:खाची धार, मौल्यवान वस्तू हरवल्याने झालेल्या दु:खाची धार सारखीच तीव्र किंवा कमी तीव्र असू शकते. कारणे वेगवेगळी आहेत.

मुद्दा बहुतांश स्त्रीयांना माता व्हावे वाटते याला विरोध करण्याचा नाही. ते मान्यच आहे. पण सरसकटीकरण ( जे तुम्ही मुलामुळेच कमिटमेंट वगेरे मुद्द्यतही केले आहे ) ते मत मान्य नाही.

अजून एक विरोधाभास - लग्न अमिथाभ बच्चनचे असो की सामान्याचे, बेसिक गोष्टी समान असे तुम्हीच म्हणताय आणि खाली पि रा आणि कथालेखकाला महान व्यक्तींच्या तुलनेत स्वतःला मोजायला सांगताय. गंमत आहे.

विवेक ठाकूर's picture

3 May 2016 - 3:52 pm | विवेक ठाकूर

>सर्व स्त्रीयांमध्ये ती प्रेरणा असतेच वगेरे ठामपणे सांगून तुम्ही नकळत अशा गटाला दोष आणि गिल्ट देताय.

गिल्ट देत नाही, ती वास्तविकता आहे. शिवाय वंध्यत्वाचं प्रमाण जननाक्षमतेपेक्षा कमी आहे याचा अर्थ निसर्गाचं प्रयोजन उघड आहे. वंध्यत्व असणार्‍यांनी आनंदात जगू नये असा त्याचा अर्थ नाही.

>कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही बाबतीत वंचित असण्यामुळे असणार्या दु:खासारखेच हे ही दु:ख असते.

चर्चेचा विषय निपुत्रिकता इतकाच आहे.

>मुद्दा बहुतांश स्त्रीयांना माता व्हावे वाटते याला विरोध करण्याचा नाही. ते मान्यच आहे. पण सरसकटीकरण ( जे तुम्ही मुलामुळेच कमिटमेंट वगेरे मुद्द्यतही केले आहे ) ते मत मान्य नाही.

म्हणजे मूळ मुद्दा तुम्हाला मान्य आहे. राहीला विषय कमिटमंटचा. तो मुद्दा `विभक्त व्हायला सोपं जातं' या अनुशंगानं आलायं.

गिल्ट देत नाही, ती वास्तविकता आहे. >>> म्हणजे मूल होऊ न देणे हा गुन्हा आहे ?

चर्चेचा विषय निपुत्रिकता इतकाच आहे. >>>> मी ही निपुत्रिकांच्या दु:खाबाबत ते विधान केलंय. 'निपुत्रिकांचे दु:ख' स्पेशल क्याटेगिरीतले नसते हे सांगितलंय.

म्हणजे मूळ मुद्दा तुम्हाला मान्य आहे.>>> हो. पण त्या मूळ मुद्द्याच्या आधारे तुम्ही उपस्थित केलेले उपमुद्दे मान्य नाहीत.

बाळ सप्रे's picture

3 May 2016 - 2:55 pm | बाळ सप्रे

१) निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचा उद्देश काय ?

निसर्गाच्या कुठल्याही निर्मितीचा उद्देश काय ??

सस्नेह's picture

3 May 2016 - 3:59 pm | सस्नेह

निसर्गाच्या पुरुष-देहनिर्मितीचा उद्देश काय हे तरी कुठे क्लिअर आहे ?

ते क्लिअर आहे स्नेहातै !

वर्तमानात जगणे, सहजीवनाचा आनंद घेणे, पूर्णत्वाचा साक्षात्कार होणे व इतरांना हा प्रकाशाचा मार्ग दाखवणे वगैरे =))

सस्नेह's picture

3 May 2016 - 4:14 pm | सस्नेह

=))

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 4:29 pm | मराठी कथालेखक

:)

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 4:31 pm | मराठी कथालेखक

आणि मध्ये कुठेतरी तस्मात शब्द टाकायला विसरल्यात की तुम्ही :)

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 4:28 pm | मराठी कथालेखक

निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचा उद्देश काय ?

निसर्गाने येवून कानात सांगितले का उद्देश काय आहे ते ? की निसर्गाचे कुठले proposal document हाती लागले तुमच्या ?
बाकी माणूस निसर्गाच्या उद्देशाचा विचार करत बसणार की स्वतःच्या उद्देशांचा विचार करणार ?

जर एका स्त्रीनं अपत्याला जन्म दिला नसता तर तुम्ही वरचा प्रतिसाद देऊ शकला असता का ?

खरंय तुमचं!! एका स्त्रीने एका अपत्याला जन्म दिला म्हणून तर ह्या धाग्याचे २१२ प्रतिसाद झालेत.

निशांत_खाडे's picture

3 May 2016 - 10:46 pm | निशांत_खाडे

रोफललो..

मराठी कथालेखक's picture

4 May 2016 - 11:01 am | मराठी कथालेखक

काय बालिश प्रश्न आहे...
मी असं म्हंटलेलच नाही की जगातील प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा नसते.
माझ्या आईला आणि माझ्या वडीलांनाही अपत्यप्राप्तीची इच्छा होती म्हणून मी जन्माला आलो हे उघडंच आहे. पण म्हणून मलाही तशी इच्छा असावी किंवा जगातल्या प्रत्येक स्त्रीला वा पुरुषाला अशी इच्छा असायलाच हवी असा हट्ट धरण्यात काय अर्थ आहे.

तर्राट जोकर's picture

4 May 2016 - 11:13 am | तर्राट जोकर

ओ, ते सदैव शांत व समग्र असणार्‍या तुकारामाचे भक्त आहेत. तीक्ष्ण उत्तरे देतात, तुम्हीच पुढे बरे होत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे.

निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचा उद्देश काय ?

निसर्गाने येवून कानात सांगितले का उद्देश काय आहे ते ? की निसर्गाचे कुठले proposal document हाती लागले तुमच्या ?

याला मी उत्तर दिलंय.

पुढे तुम्ही म्हटलंय

बाकी माणूस निसर्गाच्या उद्देशाचा विचार करत बसणार की स्वतःच्या उद्देशांचा विचार करणार ?

तुमचा उद्देश काय ते तुम्ही ठरवा. मी निसर्गाच्या स्त्रीदेह निर्मितीचा उद्देश सांगितला.

निसर्ग पण तुम्हाला आधी विचारात घेतो बहुतेक. बरंय.स्त्री पण फक्त तुम्हाला कळली,स्त्रीच्या सर्व ऊर्मी तुम्हालाच कळतात.निसर्ग तुमच्या आज्ञेबाहेर नाही.
आप महापुरूष हो _/\_

अप्पा जोगळेकर's picture

4 May 2016 - 3:04 pm | अप्पा जोगळेकर

हो ना. तसंच काहि अपत्यांना त्यांच्या आयांनी जन्म दिलाच नसता तर बरे असेही वाटते.

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 12:06 pm | पिलीयन रायडर

पुन्हा तेच विठा? तुमच्या पहाण्यात नाही म्हणुन अस्तित्वात नाही?

मला १००% खात्री आहे की इथल्या कुणीही काहीही सांगितलं तरी तुम्ही तुमची मतं तपासुन सुद्धा बघण्याची तयारी दाखवणार नाहीत. पण तरीही एक स्त्री म्हणुन तुमच्या विधानांना किमान विरोध तरी नोंदवणं आवश्यक वाटतं.

बहुसंख्य स्त्रियांना मुल असावे असे वाटते हे खरेच आहे. पण त्यात त्यांच्या शाररिक जडणघडणीसोबतच त्यांच्या मानसिक जडणघडणीचाही पुष्कळ वाटा असतो. ज्या स्त्रिया ह्या एखाद्या ध्येयाने प्रेरित असतात, ज्यांना लग्न/नवरा/मुलं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता वाटत नाही त्यांना अपुर्ण वगैरेही काही वाटत नाही.

मागे एकदा तुम्ही हाच मुद्दा मांडत होतात की स्त्रीला आपल्या देहाविषयी अभिमान वाटायला ऑगॅझम आवश्यक असतो. आता म्हणताय की पुर्णत्व वाटायला मुल आवश्यक असते. लग्न टिकायला सुद्धा मुल आवश्यक असते. एकंदरित स्त्री देहाचे सार्थक व्हायला लग्न, उत्तम शरीरसंबंध, मग त्यातुन मुल हे सर्व आवश्यक असतेच, अन्यथा तिला एकंदरित स्त्री म्हणुन अपुर्णच वाटेल. असं असतं तर जगात अनेक स्त्रिया वरील पैकी एकही गोष्ट नसताना यशस्वी झाल्या नसत्या. उदा:- किशोरी आमोणकर, लता मंगेशकर (बॉलीवुड मध्ये तर कितीतरी नावं असतील..) हय बायकांना स्वतः विषयी अभिमान नाही असं तुम्हाला वाटतं का? कुण्या पुरुषाने येऊन ह्यांचे जीवन धन्य करणे आवश्यक आहे असं वाटतं का? ह्या व्यक्ति ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत असं वाटत नाही का?

एरवी बरेच पुढारलेले विचार असणारा तुमच्यासारखा शिकलेला, व्यासंग असलेला, विचारी माणुस, स्त्री देहाच्या बाबतीत अशी विधाने कशी करतो ह्याचे मला राहुन राहुन आश्चर्य वाटते.

लग्ना बाबतीतही तुम्ही अशीच होलसेल मध्ये विधाने केली आहेत. माझ्या ओळखीत एक शिक्षक जोडपे आहे. आता त्यांना रिटायर होऊनही १०-१५ वर्ष झाली असतील. त्यांना मुलबाळ झाले नाही. ह्याची खंत असेलही त्यांना. पण म्हणुन दोघांच्या वागण्या-बोलण्यात कधीही काही जाणवत नाही. इतकं परिपुर्ण आयुष्य जगते हे जोडपे. अगदी समरसुन.. तयंच्या मुल नसल्याने कोणताही दुरावा आला नाही, उलट एकमेकांविषयी जास्तच हळवेपणा आला. एकमेकांना खुपच जपण्याची वृत्ती आली. माझ्याही एका बहिणीला मुल नव्हते. तिला मुलाची ओढ होती. लग्नाची १० वर्ष अशीच गेली. पण आमच्या ताइ भावोजींनी एकमेकांना लावलेला जीव पहायला हवा तुम्ही. पुढे त्यांनी मुल दत्तक घेतले. पण १० वर्षात ते एकमेकांच्या अतिशय जवळ आले. मला वाटतं की एकमेकांवर निस्सीम प्रेम असेल तर उलट मुल नसल्याच्या दु:खात जोडपी फार जवळ येतात. कोणत्याही आनंदापेक्षा कोणतेही दु:ख, संघर्ष आपल्याला जास्त जवळ आणतो.

संसार टिकतात ते नवरा बायको मधल्या प्रेमाने. अतुट नात्याने. मुल हा बोनस आहे. घटस्फोट होतो तो हे नातंच नसतं म्हणुन. मुल असेल तर फक्त ते नातं ओढण्याचा खेळ चालु रहातो. त्याला संसार म्हणत नाहीत. मुअलंची फरफट नको म्हणुन घटस्फोट टाळला जातो अनेकदा.. खरंय हे.. पण म्हणुन नाते टिकवले जात नाही. ज्यांना त्यातही राम वाटत नाही ते वेगळे होतातच ना? एका घरात राहुनही, मुल बाळ असुनही आणि घटस्फोटापर्यंत गोष्टी गेलेल्या नसुनही लोक प्रचंड असमाधानी असु शकतात. तेव्हा लग्न, मुल ही काही आनंदाची गुरुकिल्ली नाही. त्याला नवरा बायकोत प्रेमच असावं लागतं. आणि प्रेम असेल तर मुल असो वा नसो, फरक पडत नाही.

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 12:16 pm | मराठी कथालेखक

पिराजी,
प्रतिसाद आवडला. खासकरुन शेवटचा परिच्छेद मस्तच.

तेव्हा लग्न, मुल ही काही आनंदाची गुरुकिल्ली नाही. त्याला नवरा बायकोत प्रेमच असावं लागतं. आणि प्रेम असेल तर मुल असो वा नसो, फरक पडत नाही.

प्रचंड सहमत

विवेक ठाकूर's picture

3 May 2016 - 1:25 pm | विवेक ठाकूर

पण आता दुसरी बाजू पाहा. प्रेम असेल तर मुलांची कटकट वाटत नाही आणि विभक्त होण्याची सोय म्हणून `चाइल्ड- फ्री मॅरेज' असा विचारसुद्धा मनाला शिवत नाही.

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 1:40 pm | पिलीयन रायडर

प्रेम नसेल पण बारा पोरं आहेत म्हणुन जोडपे सुखात आहे असे म्हणायचे का?

ज्यांनी चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय घेतला आहे त्यांच्यात प्रेम नसतेच का?

चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय हा फक्त "विभक्त होण्याची सोय" असतो का? एकमेकांवर प्रचंड प्रेम असले तरी मुल नकोच असणे हे कारण असण्याची शक्यताच नसते का?

ज्यांना मुलं असतात ते कधी विभक्तच होत नाहीत का?

ज्यांना मुलं आहेत त्यांच्यात प्रेमही आहे असे ठामपणे म्हणता येते का?

प्रेम नसेल पण बारा पोरं आहेत म्हणुन जोडपे सुखात आहे असे म्हणायचे का?

प्रेम असेल तर मुल नसेल तरी चालेल हे आधीच लिहीलंय ते वाचलं नाही का ?

ज्यांनी चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय घेतला आहे त्यांच्यात प्रेम नसतेच का?

मुल नसल्यास काय अडचणी येऊ शकतात असा विषय आहे. तुम्ही सारखं प्रेम-प्रेम काय लावून धरलंय ?

चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय हा फक्त "विभक्त होण्याची सोय" असतो का? एकमेकांवर प्रचंड प्रेम असले तरी मुल नकोच असणे हे कारण असण्याची शक्यताच नसते का?

प्रेम असेल तर मुल का नको असा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा.

ज्यांना मुलं असतात ते कधी विभक्तच होत नाहीत का?

तुम्ही विनोदी आहात का ? मुलामुळे जिव्हाळा वाढतो आणि किरकोळ पारस्पारिक मतभेदांपेक्षा मुलाचं भवितव्य महत्त्वाचं आहे हे कळू शकतं.

ज्यांना मुलं आहेत त्यांच्यात प्रेमही आहे असे ठामपणे म्हणता येते का?

उलट आहे. ज्यांच्यात प्रेम आहे त्यांना मुल ही कटकट वाटत नाही.

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 2:32 pm | पिलीयन रायडर

हा आपला मुळ प्रतिसाद.

यावरनंही ते स्पष्ट होतं. शिवाय अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं हा वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्‍यांचा अनुभव आहे. थोडक्यात, चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही.

मी दोन मुद्द्यांवर तुमच्याशी बोलत आहे.
१. स्त्री ला पुर्णत्व जाणवण्यासाठी अपत्याची गरज आहे की नाही (तुम्ही म्हणताय आहे.. मी म्हणतेय नाही)

२. मुल असल्यानेच जोडपी एकमेकांसोबत आनंदी असतात. जे जोडपी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतात ते लग्न टिकण्याची शक्यता कमी असते (हे तुम्ही म्हणताय, जे अर्थातच मला मान्य नाही.)

आता हा वरचा प्रतिसादः-

१. प्रेम नसेल पण बारा पोरं आहेत म्हणुन जोडपे सुखात आहे असे म्हणायचे का?

प्रेम असेल तर मुल नसेल तरी चालेल हे आधीच लिहीलंय ते वाचलं नाही का ?

कुठे लिहीलेय नक्की? कारण वर तर म्हणताय की "चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही". ह्या केस मध्ये मुल नसेल पण प्रेम असु शकतेच की? मग का नाही टिकणार हे लग्न?

२. ज्यांनी चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय घेतला आहे त्यांच्यात प्रेम नसतेच का?

मुल नसल्यास काय अडचणी येऊ शकतात असा विषय आहे. तुम्ही सारखं प्रेम-प्रेम काय लावून धरलंय ?

मुल नसतानाच्या अडचणी? असा विषय आहे? नक्की? की "मुल हीच एक अडचण" असा विषय आहे? तुम्ही गणित मांडतात ते "मुल आवश्यक" ह्या मुद्द्यावर. मी म्हणतेय "प्रेम आवश्यक". मग मी तेच लावुन धरणार ना?

३.चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय हा फक्त "विभक्त होण्याची सोय" असतो का? एकमेकांवर प्रचंड प्रेम असले तरी मुल नकोच असणे हे कारण असण्याची शक्यताच नसते का?

प्रेम असेल तर मुल का नको असा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा.

प्रेम आहे म्हणुन मुलही हवेच ही कोणती नवीन अट? मुल नको असण्याची अनेक कारणे असु शकतात.

४. ज्यांना मुलं असतात ते कधी विभक्तच होत नाहीत का?

तुम्ही विनोदी आहात का ? मुलामुळे जिव्हाळा वाढतो आणि किरकोळ पारस्पारिक मतभेदांपेक्षा मुलाचं भवितव्य महत्त्वाचं आहे हे कळू शकतं.

माझा प्रश्न तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही. प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही मध्ये अपेक्षित होते. जे लोक विभक्त होतात त्यांना मुलं नसतातच का? अर्थातच असतात. म्हणजेच मुल असणे विभक्त होण्यास थोडासा अडथळा निर्माण करु शकत असले तरी थांबवु शकेलच असे नाही.

आणि हो मी विनोदी आहे. तुम्ही आहात का?

५.ज्यांना मुलं आहेत त्यांच्यात प्रेमही आहे असे ठामपणे म्हणता येते का?

उलट आहे. ज्यांच्यात प्रेम आहे त्यांना मुल ही कटकट वाटत नाही.

पुन्हा एकदा.. नीट वाचा. ज्यांच्यात प्रेम नाही पण मुलं आहेत अशांविषयी प्रश्न आहे तो. मुद्दा एकच मांडायचा आहे की मुल असुनही प्रेम निर्माणच झाले नाही अशा अनेक केसेस असतात. इथेही हेच अधोरेखित होते की "प्रेम आवश्यक". मुल नाही. म्हणजेच "चाईल्ड फ्री मॅरेज कॅन वर्क व्हेरी वेल".

विवेक ठाकूर's picture

3 May 2016 - 4:12 pm | विवेक ठाकूर

१. स्त्री ला पुर्णत्व जाणवण्यासाठी अपत्याची गरज आहे की नाही

हो आहे. कारण ते स्त्री देहनिर्मिती मागचं निसर्गाचं मूळ प्रयोजन आहे. आणि प्रत्येक सजीव हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. तस्मात, निसर्गाविपरित जाऊन पूर्णत्व मिळणं असंभव. वरुन कुणी काहीही म्हणो.

२. मुल असल्यानेच जोडपी एकमेकांसोबत आनंदी असतात. जे जोडपी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतात ते लग्न टिकण्याची शक्यता कमी असते

विधानातला पहिला भाग तुम्ही जोडलायं. माझं म्हणणं इतकंच आहे की मुलामुळे जोडप्यात कमिटमंट येते.

दुसर्‍या भागाविषयी माझं म्हणणं असं की मूल हा दांपत्यातला सेतू आहे. त्याच्याकडे कुणी कटकट म्हणून पाहात असेल तर तो त्याचा प्रश्न. पण एकदा मूल झालं की आपापसातले मतभेद दूर सारुन सुजाण दांपत्य विभक्तीच्या निर्णयापासून दूर राहाण्याची, आणि तदुनाशंगानं लग्न टिकून राहाण्याची शक्यता जास्त आहे. मूलच नसेल तर किरकोळ मुद्दे सुद्धा उग्ररुप धारण करतात आणि विभक्ती आपसूक होते.

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 4:22 pm | पिलीयन रायडर

आपले विचार समजले.

माझ्याकडुन समरी :-

१. स्त्री देह किंवा पुरुष देह ह्यांच्या निर्मितीचे कारण वगैरे ठामपणे मी सांगु शकत नाही. पण स्त्रीया अपत्याशिवायही पुर्णत्व अनभवु शकतात. एकंदरित आपल्या देहाचा अभिमान वाटायला किंवा पुर्णत्व वगैरे वाटायला कोणत्याही बाह्य गोष्टीची गरज नसते.

(आठवा... पुर्णमदः पुर्णमिदं.... हो की नाही?

सगळं काही ज्या अवस्थेत आहे.. पुर्णच आहे. तेव्हा मुल असो वा नसो.. स्त्रीला तसे वाटो वा न वाटो.. ती स्त्री पुर्णच आहे... हे ज्यांना उमगतं त्या स्त्रिया मुल न होऊ देण्याचा निर्णय घेऊनही आनंदात राहु शकतात. त्यांना कोणतेही वैष्यम्य अथवा अपुर्णत्व जाणवत नाही. हरि ओम!)

२. मुल असणे हा सुद्धा केवळ एक मुद्दा आहे. लग्न / नाते टिकणे ह्याला केवळ त्या नात्यात प्रेम आवश्यक आहे. ते असेल तर किरकोळ मुद्दे किरकोळच रहातात. ते नसेल तर मुल असुनही किरकोळ मुद्द्यांमधुन दुरावा निर्माण होऊ शकतोच. मुलांसाठी सोबत रहाणे ही निव्वळ तडजोड असते. तस्मात एकत्र रहाणे हे "प्रेमावर" अवलंबुन आहे, मुल असण्यावर नाही.

तस्मात समरी अशी की मला आपले विचार मान्य नाहीत.
धन्यवाद!

अवांतर :- पुरुष देहाविषयीचे आपले विचार ऐकायला आवडतील.

विवेक ठाकूर's picture

3 May 2016 - 5:45 pm | विवेक ठाकूर

सगळं काही ज्या अवस्थेत आहे.. पुर्णच आहे. तेव्हा मुल असो वा नसो

हे कळलेल्यांना `विचारणेचा धागा' काढायची आवश्यकताच नसते. पण धागा काढलायं म्हणजे पूर्णत्व समजलेलं नाही. इतपत तरी समजायला हरकत नाही.

तस्मात एकत्र रहाणे हे "प्रेमावर" अवलंबुन आहे, मुल असण्यावर नाही.

प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो. हे बहुदा स्वानुभवानं कुणाच्याही लक्षात येईल. पण वादासाठी वाद घालून विषय भरकटवण्यात आपला हात कोण धरणार ?

तस्मात समरी अशी की मला आपले विचार मान्य नाहीत.

हे असं पाहिजे : तस्मात, भाषा कॉपी मारुन आकलन झालं असं समजणं फक्त अज्ञान दर्शवतं.

जे निर्णयावर ठाम आहेत त्यांना ; शिवाय ज्यांना पूर्णवाद समजला आहे त्यांना धागा काढायची गरज नसते हे मान्य. पण मग आपले मुद्दे सर्वांनी मान्य करेपर्यंत सांगत रहायची तळमळ का असते ब्रे ???

जर मुद्दे क्लिअर असतील आणि 'स्वत:ला' पटलेले असतील तर लोक किती का धागे काढेनात ! आपण आपलं त्यांना मंदस्मित देऊन आपल्याला समजलेला सत् चिद् आनंद लुटावा. हा व्यर्थ शब्दांचा गल्बला का ???

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 6:10 pm | पिलीयन रायडर

अगं पण मितान,

धाग्यात फक्त लग्न करावे की करु नये एवढाच मुद्दा आहे. मुल जन्माला घालण्याचा आणि पुर्णत्वाचा मुद्दा विठांनी इथे आणला आहे. असे असताना पुन्हा अजुन विठा धागाकर्त्यावर का घसरत आहेत. दुसर्‍या धाग्यात "सगळं काही पुर्ण आहे" असं म्हणायचं आणि इथे येऊन "मुल जन्माला घातल्याशिवाय स्त्रीला पुर्णत्व नाही" असंही म्हणायचं. म्हणजे वंध्यत्व असणार्‍या स्त्रिया, ज्यांना नवरा नसल्याने मुल होऊ शकत नाही अशा स्त्रिया, ज्यांना मुल नकोच आहे अशा स्त्रिया.. सर्व जणी अपुर्ण??

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 6:05 pm | पिलीयन रायडर

पुरे हं विठा...

मी सभ्यपणे बोलतेय तर तुम्ही सुद्धा तसंच बोलावं अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी नाही का?

मी तुम्हाला खालील एका प्रतिसादात व्यवस्थित विचारलं होतं की एकमेकांची अक्कल न काढता चर्चा करायची का म्हणुन. शिवाय मी एकदाही वैयक्तिक प्रतिसाद दिलेला नाही. असे असताना आपण "चर्चा भरकटवते" किंवा "अज्ञानी आहे" "भाषेची कॉपी मारते" इ. वैयक्तिक प्रतिसाद का देत आहात ते कळत नाही. तुम्हाला नाही समजलं तर ठिके.. तसं सांगा.. पण म्हणुन दुसर्‍यावर आरोप करणे चुक आहे.

बाकी तुम्ही "तस्मात" म्हणता का सारखं? कारण मी हा शब्द पु.लंच्या "असा मी असामी" मध्ये बेमट्याचे वडील वापरतात तशा अर्थाने इथे वापरते. तुमचा त्यावर कुठे कॉपीराईट रजिस्टर्ड असल्यास कळवावे. आणि एका शब्दाने भाषा कशी कॉपी होते हे ही सांगावे. अन्यथा हा आरोप मागे घ्यावा.

जाता जाता..

सगळं काही ज्या अवस्थेत आहे.. पुर्णच आहे. तेव्हा मुल असो वा नसो

हे कळलेल्यांना `विचारणेचा धागा' काढायची आवश्यकताच नसते. पण धागा काढलायं म्हणजे पूर्णत्व समजलेलं नाही. इतपत तरी समजायला हरकत नाही.

हे तुम्ही मला दिलेल्या आजवरच्या सर्व प्रतिसादांमधला सर्वात हुकलेला प्रतिवाद आहे. =)) मुद्दा काय.. तुम्ही बोलताय काय.. माय गॉड सो फन्नी!!!

अजया's picture

3 May 2016 - 6:44 pm | अजया

=))))))

गणामास्तर's picture

4 May 2016 - 9:38 am | गणामास्तर

प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो.

म्हणजे ज्यांना मुल अडचण वाटते त्यांचे एकमेकांवर प्रेम नसते असे म्हणायचे आहे का आपल्याला ?
कृपया माझ्या सारख्या अति सामान्य व्यक्तीला समजेल असे आणि एका शब्दात उत्तर दिले तर फार बरे होईल. धन्यवाद.

विवेक ठाकूर's picture

4 May 2016 - 11:47 am | विवेक ठाकूर

प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो.

इथे अनेक अपत्यप्राप्त विवाहित आहेत. सगळ्यांचा अनुभव काय आहे ? अपत्यप्राप्तीचं दु:ख झालेलं कुणी आहे का?

म्हणजे ज्यांना मुल अडचण वाटते त्यांचे एकमेकांवर प्रेम नसते असे म्हणायचे आहे का आपल्याला ?

मुल ही वैवाहिक जीवनाची आणि पारस्पारिक प्रेमाची सहज फलनिष्पत्ती आहे. मुल ही कटकट वाटणारं दांपत्य माझ्या तरी पाहाण्यात नाही.

चिगो's picture

4 May 2016 - 6:14 pm | चिगो

दुसर्‍यांना वाटत नसेल, आणि तरीही त्यांच्यामते ते सुखी असतील तर त्या सुखाला तुमची काही हरकत आहे का? असल्यास त्या हरकतीचा त्यांना फरक पडत नसेल, तर त्यालाही तुमची हरकत आहे का?

असो. माझा एक मित्र आहे. त्यानी व त्याच्या बायकोनी 'मुल नकोय' असं ठरवलंय.. ते त्यांचं आयुष्य सुखात जगताहेत. आम्हाला मुलगी आहे. बायकोची इच्छा आणि सहमती असल्यास पुढेपण बघू. आम्हीही सुखी आहोत (असं मला वाटतं.) मग ह्या दोन परीवारांत कमी-जास्त करायचं का? आणि कशाला?

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 5:58 pm | मराठी कथालेखक

प्रेम असेल तर मुल का नको असा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा.

बाकी या प्रश्नाने पुरती करमणूक झाली.
धन्यवाद :)

करमणूक झाली म्हणणं ही पळवाट आता फार जुनी झाली .

खरंय ! तुम्हीच रुळवली आहे ती पायवाट ;)

ह्या सगळ्यावर संक्षींच्या एखाद्या धाग्याचा संदर्भ दिला असतात तर आणि बहार आली असती.

इतके धागे आहेत की भर्जरी दैदिप्यमान वस्त्र तयार होईल. पण वस्त्र विणने इज जस्ट नॉट माय कप ऑफ टी यु नो :(

याच धाग्यात सरांना दोन तीन प्रतिसादात 'ज्योक' सापडलेत !!

सरांनाच सांगतोय संदर्भ द्यायला. संक्षिप्त सांगण्यात संक्षींचे धागे त्यांना फार उपयोगी होतात म्हणे. ;)

मितान's picture

3 May 2016 - 7:27 pm | मितान

=)) =))

मराठी कथालेखक's picture

4 May 2016 - 11:02 am | मराठी कथालेखक

आता प्रश्न हास्यास्पद असल्यावर करमणूक होणारच.
असो. पुन्हा एकदा धन्यवाद

अप्पा जोगळेकर's picture

3 May 2016 - 12:15 pm | अप्पा जोगळेकर

साहेब, प्रजनन ही सजीवांची नैसर्गिक प्रेरणा आहे असे म्हणायचे आहे का ?

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 4:32 pm | मराठी कथालेखक

मला तरी नाही वाटत

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 2:04 pm | मराठी कथालेखक

अशी कैक जोडपी बघितली आहेत ज्यांनी मूल नं होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जोडपं तर २० एक वर्ष सुखाने नांदत आहे.

या जोडप्यांबद्दल अधिक काही शेअर करु शकाल का ?
खास करुन २० वर्षे नांदणार्‍या जोडप्याबद्दल - त्यांनी हा निर्णय कसा घेतल ? सुरवातीपासूनच एकमत होते की एकाने दुसर्‍याचे मतपरिवर्तन घडवले ? काय अडचणी आल्यात ? घरच्यांना , समाजाला , विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना कसे तोंड दिले ?
काही ठिकाणी निपुत्रिक स्त्रियांना सन्मानाने वागवले जात नाहि , या स्त्रीला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागले का ?

म्हणजे असे बोलताना तरी त्यांनी "We don't want kids" असे सांगितले.

सर्व काही जवळचे मित्र मैत्रिणी नाहीयेत पण ज्यांना बर्‍यापैकी ओळखतो त्यांच्याबद्दल सांगतो.

खाली कोणीतरी करिअरचे उदाहरण दिले आहे तर तो मुद्दा यापैकी कोणाचाच नव्हता. एकीने सांगितले की माझ्यात ते मदरली इन्स्टिंक्ट्सच नाहीयेत. तर कशाला मुलं होऊ देऊन वाढवू? मी तर सुखी होणारच नाही पण उगाच एक नवीन जीव जन्माला घालून त्याचे आयुष्यही मुलं नं आवडणार्‍या आईबरोबर जाईल. दुसरीचेही साधारण तसेच काहीसे. मुलं आवडतात पण काहीतास खेळायला वगैरे ठीक आहे. वाढवणे वगैरे शक्य नाही.

माझ्या माहितीतली सर्व उदाहरणे अमेरिकेतली आहेत. इथे फारच कमी प्रमाणात इतरांच्या आयुष्यात लुडबुड केली जाते. त्यामुळे निपुत्रिक स्त्रियांना सन्मानाने वागवले जात नाही वगैरे प्रश्न आले नसावेत. एकीने सांगितले होते की घरचे अधून मधून विचारतात आणि अजून तरी त्यांना सांगितलेले नाहीये की आम्ही मूल होऊ देणारच नाहीये. माझ्या भावंडांना मुले आहेत त्यामुळे माझ्या आई वडलांना नातवंडांचे सुख मिळाले आहे, मिळते आहे.

२० वर्षे नांदणारे जोडपे तसे वयाने फार मोठे नाहीये. लवकर लग्न केल्याने आत्ता चाळीशीत प्रवेश करतायत. त्यांना दोघांनाही जबाबदारी नको होती. आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे ते करता यायला हवे आणि मुलांची आवडही इतकी नाही की स्वतःचे हवे.

बाकी एक दोन अविवाहीत मैत्रिणींनी लहानपणी child abuse वगैरे पाहिल्यामुळे त्यांना मूल नको आहे वगैरे सांगितले होते पण तो अजूनच वेगळा विषय आहे.

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 6:23 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.

एकीने सांगितले की माझ्यात ते मदरली इन्स्टिंक्ट्सच नाहीयेत. तर कशाला मुलं होऊ देऊन वाढवू? मी तर सुखी होणारच नाही पण उगाच एक नवीन जीव जन्माला घालून त्याचे आयुष्यही मुलं नं आवडणार्‍या आईबरोबर जाईल. दुसरीचेही साधारण तसेच काहीसे. मुलं आवडतात पण काहीतास खेळायला वगैरे ठीक आहे. वाढवणे वगैरे शक्य नाही.

त्यांना दोघांनाही जबाबदारी नको होती. आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे ते करता यायला हवे आणि मुलांची आवडही इतकी नाही की स्वतःचे हवे.

म्हणजे अपुर्णत्व वगैरे काही नाही तर !!

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 6:26 pm | पिलीयन रायडर

ओ नाही हो.. तुम्हाला जेन्युईनली ह्या मुद्द्यात रस आहे म्हणुन सांगते..
अशा अनेक बायका असतात ज्यांना खरंच आई होण्यात रस नसतो. आणि त्यांना अजिबात अपुर्ण वाटत नाही. मज्जेत असतात त्या.

बादवे, कुणी मला खरंच सांगेल का की पुरूषांना अशी वडील होण्याची ओढ असते का? पुरूष हा टिपीकली जबाबदारी झटकणारा रंगवला जातो. पण आजकाल बाप म्हणुन पोरांमध्ये अगदी रंगुन गेलेले पुरूष खुप दिसतात.

कपिलमुनी's picture

3 May 2016 - 6:33 pm | कपिलमुनी

नक्कीच असते !
आजकल कितीतरी पुरुष आनंदाने मुलाचे लाड करतात. शी शू काढण्यापासून ते डायपर बदलण्यापर्यंत , रात्रीची जागरण अँजॉय करतात.

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 6:36 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद पिरा...
मला नाहीये, पण अनेक पुरुषांना वडील होण्याची ओढ असते. माझे अनेक मित्र पोरांमध्ये बराच वेळ व्यस्त असतात. पण तरी करिअर वा इतर काही कारणांमुळे मुलांपासून काही महिने वगैरे दूर रहावे लागले तर राहतातही. त्यामुळे आईची आणि वडिलांची मुलांशी असलेली बांधिलकी यात अजूनही फरक आहे असेच वाटते.

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 11:01 am | मराठी कथालेखक

विचारामागचा हेतू कळणं अवघड नाही. अर्थात, तुम्हीच म्हटलंय :

फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात

मी जे म्हंटलं (फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात) हा चाईल्डफ्रीचा हेतू आहे असा तुम्ही गैरसमज करुन घेतला आहे. तो चाईल्डफ्री वैवाहिक जीवनाचा हेतू नसून एक अतिरिक्त परिणाम /काही अंशी फायदा आहे.
बाकी ज्यांना सहजी विभक्त होण्याचा प्रयाय खूला हवा आहे म्हणून मूल नकोय (जसा अर्थ तुम्ही काढताय त्याप्रमाणे) ते लग्न न करता लिव-इन रिलेशन, ओपन रिलेशन हे पर्याय सहज अवलंबू शकतात. लग्नाची त्यांना गरजच नाही.
शिवाय

अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे , तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं

हे ९९.९९ % खरंही असेल पण १००% नाही.
तुम्ही अमोल पालेकर यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावर बनविलेला ध्यासपर्व हा चरित्रपट पाहिला अहे का ? (पालेकरांवर तुमचा विश्वास असेल असे गृहीत धरतो, तसेहि कर्वेंच्या कुणा नातेवाईकाने चित्रपटाचा प्रतिवाद केल्याचे ऐकिवात नाही). यात असे अगदी स्पष्ट दाखवले आहे की रधोंच्या पत्नी मालती यांनाही अपत्य जन्माला घालण्याची मुळातूनच इच्छा नव्हती (म्हणजे रधोंनी भरीस घातलेय असे वगैरे नक्कीच नाही)
बाकी चित्रपट उत्कृष्ट आहेच. युट्युबवर पाहू शकता.

दोनच कारणं आहेत :

एक, मुलांची कटकट वाटणं किंवा दोन, विभक्त व्हायला सोपं जाणं.

स्त्रीला अपूर्णत्व वाटणं नैसर्गिक आहे कारण निसर्गाचा हेतू स्वतःचं निरंतरत्व टिकवणं आहे, मग एखाद्याचा व्यक्तिगत हेतू भले यूएस प्रेसिडेंट व्हायचा असो. अर्थात, मुलं ही कटकट वाटावी का सहजीवनाचा आनंददायी भाग वाटावीत हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. शिवाय मुलं शाळेत जायला लागल्यावर पालकांना बरीच मोकळीक मिळते.

विभक्त व्हायला सोपं जाणं हा चाईल्ड-फ्री चा अनुशंगिक फायदा दिसला तरी मुलाशिवाय एकमेकात कमीटमंट निर्माण होत नाही हे नक्की.

रघुनाथ धोंडो कर्वे टाईप तुमचा काही उदात्त प्लान असला तर एखादे वेळी संसारच कटकट होऊ शकेल. पण इट प्री सपोझेस अ ग्रेट प्लान. मग इतक्या उदात्त गोष्टीपुढे मुलांची कटकट किंवा विभक्तीची सोय असली तकलादू कारणं पुढे करावी लागत नाहीत.

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 1:41 pm | मराठी कथालेखक

वर एका प्रतिसादात तुम्ही म्हणता

माझ्या पाहाण्यात असं एकही जोडपं नाही.

आणि मग असंही म्हणता

मुलाशिवाय एकमेकात कमीटमंट निर्माण होत नाही हे नक्की.

अनुभव नसताना तुम्ही ठामपणे कसं म्हणू शकता ?

दोनच कारणं आहेत :
एक, मुलांची कटकट वाटणं किंवा दोन, विभक्त व्हायला सोपं जाणं.

यापैकी "विभक्त व्हायला सोपं जाणं" हा चाईल्डफ्रीचा हेतू असत नाही (कुणी अपवाद असेलही) हे वर मी म्हंटलेही आहे तरी तो मुद्द तुम्ही रेटत आहात मुळात विभक्त होण्याबद्दलचा मुद्दा अप्पांना प्रतिसाद होता तो 'चाईल्डफ्री'चा विषय ज्या प्रतिसादातून चालू झाला त्यात तो मुद्दा अजिबात नव्हता, तरी तुम्ही त्या विभक्त होण्यालाच अजून धरुन बसला आहात. असो.

रघुनाथ धोंडो कर्वे टाईप तुमचा काही उदात्त प्लान असला तर एखादे वेळी संसारच कटकट होऊ शकेल.

मी रधोंचे उदाहरण याकरिता दिले की अशा प्रकारे मुल असण्याची आस नसलेल्या मुली/स्त्रिया होत्या आणि आहेत. मी फेसबुकवर 'childfree indians' या ग्रुपमध्ये आहे. हा ग्रुप एका स्त्रीने बनविलेला आहे, या ग्रुपवर अनेक मुली /स्त्रियाही आहेत.
मालती कर्वेंचा स्वतःचा उदात्त प्लॅन नव्हता, तसेच ज्यावेळी रधोंशी त्यांचे याबाबत बोलणे झाले त्यावेळी रधोंचाही काही प्लॅन बनला नव्हता.
माझा असा काही उदात्त वगैरे प्लॅन नाही. मी सर्वसामान्य नोकरदार आहे, कमवावे, खावे, प्यावे , आवडिच्या गोष्टींत (चित्रपट बघणे, संगीत ऐकणे , फिरणे, मित्रमंडळींच्या भेटी घेणे ई ) वेळ घालवणे , माझ्या आणि पत्नीच्या आवडीच्या गोष्टी विकत घेवू शकू इतकी संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे इतकाच माझा प्लॅन आहे.

बाकी "मुलांची कटकट वाटणं" ...हे मी "मुलांची फार जास्त आवड नसणं" असं म्हणेन किंवा मुल मोठं करतानाच्या जबाबदार्‍यांची नीट जाण असल्याने व तितक्या जबाबदार्‍या पार पाडण्याची इच्छा नसल्याने मी असा निर्णय घेतला आहे.

माझा असा काही उदात्त वगैरे प्लॅन नाही. मी सर्वसामान्य नोकरदार आहे, कमवावे, खावे, प्यावे , आवडिच्या गोष्टींत (चित्रपट बघणे, संगीत ऐकणे , फिरणे, मित्रमंडळींच्या भेटी घेणे ई ) वेळ घालवणे , माझ्या आणि पत्नीच्या आवडीच्या गोष्टी विकत घेवू शकू इतकी संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे इतकाच माझा प्लॅन आहे.

हे मुलं असतांना सुद्धा होत नाही का ? सर्वसामान्य लोक हेच तर करतांना दिसतात. तुम्ही उगीच कर्व्यांना मधे आणलत त्यामुळे ध्येयाचा प्रश्न उपस्थित झाला.

बाकी "मुलांची कटकट वाटणं" ...हे मी "मुलांची फार जास्त आवड नसणं" असं म्हणेन किंवा मुल मोठं करतानाच्या जबाबदार्‍यांची नीट जाण असल्याने व तितक्या जबाबदार्‍या पार पाडण्याची इच्छा नसल्याने मी असा निर्णय घेतला आहे.

मला त्याबद्दल इतकंच म्हणायचंय की एकदा वेळ निघून गेल्यावर अपत्यहीनतेवर दत्तक घेण्यापलिकडे पर्याय राहात नाही. एकतर ते काँप्लीकेटेड आहे आणि त्यातनं पुन्हा नव्या भानगडी निर्माण होण्याची शक्यता जास्त.

अप्पा जोगळेकर's picture

3 May 2016 - 12:14 am | अप्पा जोगळेकर

मुलेबाळे स्वनिर्मित असतात. बायको स्वनिर्मित नसते. जीवावरचा प्रसंग आलाच तर अपत्य वाचवण्यालाच आई-वडील प्राधान्य देतात, जोडीदाराला नव्हे.
याचा अर्थ जोडीदार तुच्छ असा नव्हे.
मुलांची कटकट वाटणारे फारच विरळ असतील. त्या तुलनेत जोडीदार कटकट आहे असे म्हणणारे ढीगाने सापडतील.
कित्येकदा मुलांच्यामुळे लग्ने टिकून राहतात. आणि कित्येकदा घटस्फोट होताना अपत्य ताबा मिळवण्यासाठी भांडणे, कोर्ट कचेर्या होतात.
लग्नसंस्थेची निर्मिती ही अपत्य संगोपनासाठी आहे.
कारण अन्य कोणत्याही प्राण्याचे बालपण हे इतके लांबलेले नाही (elongated childhood).
आणि हे माणसाच्या आश्चर्यकारक प्रगतीचे एक महत्वाचे कारण आहे.

शिव कन्या's picture

14 May 2016 - 12:26 pm | शिव कन्या

Childfree Family म्हणजे आमच्याच कुटुंबावर वर काढेन धागा लवकरच! :-)

पिलीयन रायडर's picture

2 May 2016 - 3:16 pm | पिलीयन रायडर

आयुष्य घालवायला लग्न हा एक छान टाईमपास आहे. पण प्रेमापेक्षा मोठं किंवा उदात्त दुसरं काही काम सापडलं असेल वेळ घालवायला तर लग्नाची काही आवश्यकत नसावी.

मला व्यक्तिशः लग्न न करणारे लोक आयुष्यात कंटाळत नाहीत का असं वाटतं. म्हणजे त्यांचे मैलाचे दगड कोणते असतात? आम्ही कसं घर घेणे, गाडी घेणे, पोरांच्या शाळा, मग लिस्ट मधुन एक एक ठिकाणी फिरायला जाऊन येणे, अधुन मधुन जंगी भांडणं काढणे इ इ कामात बिझी असतो. दिवस कसा जातो कळत नाही. बॅचलर लोक काय करतात?

सस्नेह's picture

2 May 2016 - 3:37 pm | सस्नेह

आयुष्य घालवायला लग्न हा एक छान टाईमपास आहे.

दणकून सहमत ! लग्न या गोष्टीचा इतका महान उपयोग असताना लोक्स लग्न करायचे का टाळतात आश्चर्य आहे !!

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 3:44 pm | मराठी कथालेखक

घर घेणे,, गाडी घेणे ई बॅचलर्सच्या आयुष्यात पण असू शकते.
मी तिशी ओलांडल्यावर लग्न केलं ; तोपर्यंत घर, गाडी यांसोबत पार्टटाईम 'डिग्री घेणं' हाही टाईमपास चालायचा :)

पिलीयन रायडर's picture

2 May 2016 - 4:50 pm | पिलीयन रायडर

होय हो.. मी ज्यांना कधी ना कधी लग्न करायचेच आहे अश्यांबद्द्दल बोलत नाहीये.

ज्यांना लग्नच करायचं नाही त्यांना विचारतेय. घर नि गाडी वगैरे होऊन जातं तीशी पस्तीशी पर्यंत.. मग पुढे काय? रोजच्या रोज काय नवा टाईमपास करतात हे लोक्स?

स्पा's picture

2 May 2016 - 3:20 pm | स्पा

बॅचलर लोक काय करतात?

=))

पिलीयन रायडर's picture

2 May 2016 - 4:49 pm | पिलीयन रायडर

उगाच विषयाला वेगळेच वळण देऊ नकात स्पा काका!

भीमाईचा पिपळ्या.'s picture

2 May 2016 - 4:56 pm | भीमाईचा पिपळ्या.

बॅचलर सर्व करतात. आपला हात , जगन्नाथ.

सुबोध खरे's picture

2 May 2016 - 6:55 pm | सुबोध खरे

मी विक्रांतवर असतानाचा एक अनुभव सांगत आहे.( काही लोकांना लगेच याबद्दल बोटीवर असताना, मी, मी, याचा भास होईल पण त्याला नाईलाज आहे. त्यांनी पुढे नाही वाचले तरी चालेल )
माझे वय तेंव्हा २५ होते. आम्ही सारे (बॅचलर आणि लग्न झालेले) एक महिना समुद्रावर फिरून आलो कि कंटाळलेले असायचो बॅचलर लोकांना केंव्हा एकदा बोटीवरून बाहेर पडून माणसात( मुलींमध्ये) जाऊ असे होत असे. लग्न झालेल्याना केंव्हा एकदा घरी बायको/ मुलांना भेटू असे होत असे. आमच्या मध्ये दोन अधिकारी लग्न न झालेले जुने बॅचलर होते (३७ आणि ३८ वयाचे). त्यांचे वर्गमित्र जरी जहाजावर होते तरी त्यांना एक महिना यांच्या बरोबर वेळ काढल्यावर या बॅचलरना घरी नेण्याची इच्छा नसे. आम्हा तरुण अधिकार्यांना(२२-२६ वयोगटातील) त्यांना बरोबर नेण्याची इच्छा नसे कारण शिंगे मोडून वासरात जमा करण्याचा फायदा नसे. म्हणून मग हे दोघे संध्याकाळी मेस च्या बार मध्ये बसून दारू पीत बसत. म्हणजे समुद्रावर असतानाही संध्याकाळी दारूच पिणे आणि परत आल्यावरही तोच कार्यक्रम. त्यांचे आयुष्य फार नीरस आणि कंटाळवाणे भासत असे
आणि त्यांच्याच एका वर्ग मित्राच्या भाषेत एक महिना यांच्या बरोबर काढल्यावर परत या "बैला" ना घरी नेउन कुठे खायला घालायचे? एक महिन्यानंतर नवरा आणि बाप घरी येतो आहे तर बायको आणि मुलांना कोणीही तिसरा माणूस नको असे.
शेवटी एका विशिष्ट वयानंतर बॅचलर लोक एकटे पडत जातात आणि ज्यांना छंद नाही किंवा नोकरी धन्द्याव्यातिरिक्त दुसरे काही करण्याची आवड नसेल तर आयुष्य फार एकसुरी होते. सुरुवातीचा "स्वातंत्र्य" म्हणून मिळणारा मोकळेपणा नंतर पोकळी बनून खायला उठतो असे मी बर्याच बाबतीत पाहीले आहे.

उगा काहितरीच's picture

2 May 2016 - 7:18 pm | उगा काहितरीच

चांगला धागा व सुरस प्रतिसाद... आम्हा ब्याचलर लोकांचे मस्त प्रबोधन चालू आहे.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 7:25 pm | मराठी कथालेखक

मी तुमच्या मित्रांना पाहिलं नाही तरी साधारणपणे म्हणू शकतो की ह्या बॅचलर्सनी लग्न करुन संसार करण्याचा प्रयत्न केला असता तरी फार काही चांगला आनंददायी संसार झाला असता असं नाही.
काही लोकांची स्वभावप्रकृती एकूणातच संसारास योग्य नसते. त्यांचा कल एकटेपणाकडे जास्त असतो. अशावेळी मारुन मुटकून संसार रेटण्यापेक्षा एकटे राहणे आणि शारिरिकगरजेप्रमाणे अधूनमधून (विकतच्या वा क्षणिक प्रेमातून मिळालेल्या) सुखाचा आनंद घेणे हे त्यांच्याकरिता ठीक असू शकते. सगळेच लोक एकाच प्रकृतीचे नसतात हे समजून घेणे महत्वाचे.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 7:27 pm | मराठी कथालेखक

व्यक्तिगतः मी लग्न केले आहे, पण "चाईल्डफ्री"ची वेगळी वाट चोखाळली आहे, काहींना हे चुकीचे वाटेल माझे चाळिशी नंतरचे आयुष्य भकास, नीरस असेल असे भविष्य कुणी वर्तवेल. पण माझ्यासाठी तेच ठीक असेल.

सुबोध खरे's picture

2 May 2016 - 7:29 pm | सुबोध खरे

प्रत्यक्षात तशी परिस्थिती नव्हती.
दोन्ही अधिकार्यांना मी चांगला ओळखत होतो. एकाचा प्रेमभंग झाल्याने त्याने लग्न केले नव्हते आणी दुसर्याच्या घरच्या परिस्थिती मुळे त्याला करता आले नव्हते. अन्यथा दोघेही कुटुंब वत्सल म्हणत येतील असे सज्जन आणी सालस होते. त्यातील एकाचे( [पहिल्याचे) नंतर लग्न झाले आणी आता तो सुखात आहे. दुसर्याशी संपर्क तुटल्यामुळे काय झाले ते माहित नाही.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 7:41 pm | मराठी कथालेखक

प्रेमभंग झाल्याने लग्न केलेल्यांचा विषय पुर्ण वेगळाच म्हणावा लागेल. त्यांनी त्या प्रेमभंगाच्या भावनेतून आणि निराशेतून बाहेर पडल्याशिवाय (आणि शक्यतो पुन्हा उत्कटतेने प्रेमात पडल्याशिवाय) लग्न करु नये असं मला वाटतं
बाकी परिस्थितीपेक्षा 'by choice' म्हणजे बॅचलर लाईफ आवडतं किंवा लग्न आणि त्यातून येणार्‍या जबाबदार्‍या नकोशा वाटतात म्हणून लग्न न केलेल्यांच आयुष्य भकास असेल असं वाटत नाही.

मितान's picture

3 May 2016 - 10:57 am | मितान

परिस्थितीपेक्षा 'by choice' म्हणजे बॅचलर लाईफ आवडतं किंवा लग्न आणि त्यातून येणार्‍या जबाबदार्‍या नकोशा वाटतात म्हणून लग्न न केलेल्यांच आयुष्य भकास असेल असं वाटत नाही. >>> सहमत !

अप्पा जोगळेकर's picture

3 May 2016 - 12:23 am | अप्पा जोगळेकर

मी एक अपवादात्मक केस पाहिलेली आहे. माझ्या वडिलांचा एक मित्र जो ६७ वर्षांचा आहे आणि माझाही मित्र आहे. हा माणूस आयुष्यभर
ब्रम्हचारी आहे. केवळ अविवाहित नव्हे, ब्रम्हचारी. हा माणूस काहीसा विक्षिप्त आहे, पण लग्न न झालेल्या माणसांमधे उतारवयात जो कडवटपणा येतो तो याच्यात लेशभरही नाही. सतत हसतमुख . त्याला ब्रम्हचारी राहण्याचा जराही पश्चात्ताप नाही. and this is by choice.

सुबोध खरे's picture

2 May 2016 - 7:44 pm | सुबोध खरे

लग्न करावे कि नाही किंवा आपल्याला मुले असावीत का आणी असल्यास एक असावे कि दोन असावीत किंवा भरपूर असावीत हा "पूर्णपणे वैयक्तिक" प्रश्न आहे. त्यामुळे एकाच साच्यात प्रत्येकाला बसविणे शक्य नाही.
माझा एक जवळचा मित्र १० पासून मी अविवाहित राहणार या विचारावर ठाम होता. "मी आत्मकेंद्रित आणी अतिशय स्वतंत्र माणूस आहे आहे आणी एका स्त्रीशी जुळवून घेणे मला जमणार नाही" असे तो तेंव्हापासून म्हणत असे.
आजही पन्नाशी नंतरहि त्याच्या कडे पाहिले तर त्याचा निर्णय बरोबर होता असेच वाटते.पण त्याची विचारांची बैठक ठाम होती.
सर्वांची विचारांची बैठक ठाम असतेच असे नाही. वर म्हटल्याप्रमाणे काही जणांना परिस्थितीमुळे लग्न करणे जमत नाही तर काही जण प्रेमभंगामुळे अशा नकारात्मक परिस्थितीत जातात.
आजकाल जोडीदाराबद्दल "अवास्तव" अपेक्षा असल्याने रखडलेले कितीतरी बॅचलर तरुण आणी तरुणी दिसून येतात. आणी मग ते आम्हाला "लग्न"च करायचे नाही असे सांगत फिरताना दिसतात.
हा निर्णय DENIAL ( नकारात्मक/ नाकबूल करणे) या मनोवृत्ती तून आलेला असतो. https://en.wikipedia.org/wiki/Denial
उदा. मला पैसे मिळत नसले कि सर्व श्रीमंत लोक गैरमार्गानेच पैसे मिळवतात असे मी म्हणू लागलो तर ते "डीनायल" होईल. कारण जेंव्हा मला पैसे मिळू लागतात तेंव्हा सर्वच श्रीमंत काही गैरमार्गाने पैसे मिळवत नाहीत असे मखलाशी करावे लागते.
असे असू नये एवढेच म्हणायचे आहे.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 11:49 pm | मराठी कथालेखक

स्वतःची वैचारिक बैठक, मानसिक जडणघडण लक्षात घेवून योग्य तो निर्णय घेण महत्वाचे. योग्य दिशा सापडत नसेल, मनाचा गोंधळ होत असेल तर काही काळ वाट बघणे योग्य. उगाच घाईगडबडित लग्नाचा निर्णय घेवू नये तसेच अविवाहित राहण्याची भीष्मप्रतिज्ञाही करु नये.

कानडाऊ योगेशु's picture

2 May 2016 - 8:34 pm | कानडाऊ योगेशु

लग्न योग्य व्यक्तीशी झाले तर ते सुखी सहजीवन होते नाहीतर फरपट.
मॅचिंग जोडीदार मिळणे फार महत्वाचे आहे.
बाकी तद्दन बॉलिवुडी मूवी मध्ये पाहील्याप्रमाणे अशा अविवाहीत्/विधुर तत्सम कॅरेक्टर्सच्या तोंडी एक वाक्य नेहेमी असते.
दिन तो ऐसे वैसे गुजर जाता है पर रात खाने को उठती है!
मुळात जर छंद/ध्येये उच्चप्रतीचे असतील व त्यात खरोखरच आनंद मिळत असेल तर अश्या लोकांना लग्न केल्याने काही फारसा फायदा तोटा होत नसावा. पण उगाच अश्या लोकांचा आदर्श घेऊन जर असा काही निर्णय घेतला आणि नंतर त्यातली स्वतःची गती/फोलपणा समजला तर मग वैफल्य येऊ शकते.ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ शकते.

मितान's picture

3 May 2016 - 10:58 am | मितान

मुळात जर छंद/ध्येये उच्चप्रतीचे असतील व त्यात खरोखरच आनंद मिळत असेल तर अश्या लोकांना लग्न केल्याने काही फारसा फायदा तोटा होत नसावा. >>>> अगदी बरोबर. असे अनेक लोक पाहण्यात आहेत.

कंजूस's picture

2 May 2016 - 9:09 pm | कंजूस

अहो ते प्राण्यांचे basic instinct नैसर्गिक इच्छाशक्ती आहे आणि ती मारण्याचा खटाटोप काहीप्राणी करतात.उदा० कुणा एकाची भ्रमणगाथात दिले आहे.पेन्गविन पक्षी जोडीदारच मिळाला नाही तर पिले पळवतात, मावशांना पिन्हे फुटतात,काकालोक भाच्यापुतण्यांचे कौतुक करण्यात रमतात सर्कसला नेतात.
संसारींना सन्याशांची गरज नसते तर सन्याशांना संसाय्रांची गरज असते.रानात बसून मिळवलेले ज्ञान वाटणार कुणाला घंटा?

# बाकी *** भाव विचारत गिह्राइक येतंय तोपर्यंतच भाव करून विकून टाकावेत अन्यथा ***** ( ग्राम्य म्हण )

सतिश गावडे's picture

2 May 2016 - 9:16 pm | सतिश गावडे

रानात बसून मिळवलेले ज्ञान वाटणार कुणाला घंटा?

घंटा हा शब्द एका मान्यवर आयडीचा ट्रेडमार्क आहे. तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ;)

विवेक ठाकूर's picture

2 May 2016 - 9:34 pm | विवेक ठाकूर

संसारींना सन्याशांची गरज नसते तर सन्याशांना संसाय्रांची गरज असते.रानात बसून मिळवलेले ज्ञान वाटणार कुणाला घंटा?

बरोबर! पण संसारात राहूनही काही घंटा फरक पडत नाही हे कळायला झाडाखालीच बसायला लागतं.

भाव विचारत गिह्राइक येतंय तोपर्यंतच भाव करून विकून टाकावेत अन्यथा...

संपूर्ण सहमत.

mugdhagode's picture

2 May 2016 - 10:38 pm | mugdhagode

अगदी सहमत !

एक तर घरात सुखात रहावे किंवा बाहेर उंडारत फिरावे.

उंबर्‍यावर बसुन नरसोबा मात्र होऊ नये.

तर्राट जोकर's picture

3 May 2016 - 2:27 am | तर्राट जोकर

काय दंगा घालतेत बे लोक?

प्रॉफिट फुल्ल आणि इन्वेस्टमेंट झिरो असल्या स्किम्स शेवटी गोत्यात आणतात हे लक्षात असू द्यावे.

रेवती's picture

3 May 2016 - 6:12 am | रेवती

हा हा, काय चर्चा झाली! हा धागा पाहिला नव्हता.
बिपाशा बासूनं एवढ्यात लग्न केलं म्हणे!
मला वाटलं की त्या जॉनशी जमलं नाही म्हणून ही काही आता संसारात पडायची नाही पण पडलीच!
विठा, एरवी मुलेबाळे असणे वगैरे ठीक आहे पण हवीत की नकोत हा चॉईस असतो. म्हणजे असायलाच हवा. कित्येकजण नवरा, बायको म्हणून राहतात व लाईफ पार्टनर म्हणून त्या व्यक्तिकडे पाहतात. आपापल्या व्यावसायिक आयुष्यात बिझी असलेले लोक्स जेम्व्हा मूल नको असण्याचा निर्णय घेतात तेंव्हा मूल असणे ही जबाबदारी आहे हे त्यांना कळले असण्याची शक्यता जास्त आहे. अगदी साठी पासष्ठीपर्यंत यथेच्छ व्यवसाय करतात. आणि संसार मुलाबाळांनी भरलेला असो की फक्त लाईफ पार्टनरसचा, कितीही आवडीचा व्य्वसाय असो किंवा नावडीचा, एका मर्यादेनंतर कंटाळा येणे कोणाला चुकलेय? हां, खूपच आवडीचा व्यवसाय असेल तर मनुष्य जास्त वर्षे आनंदाने करेल एवढेच. तसेही साठी जवळ आली की मुलेबाळे आपापल्या संसारात रमल्यावर म्हातारा म्हातारीला एकटेपणा असतोच. एकाच घरात सगळे रहात असले तरी म्हातारपणचा एकटेपणा सगळ्यांना असतो. त्यातल्यात्यात मुला नातवंडात मन रमवणारे जास्त लोक्स असतात. याचे कारण काय? संसार करून थकले भागलेले असतानाही म्हातारपणी वेळ कसा घालवावा हा प्रश्न असतो. आता त्यावर प्रत्येक जण आपल्या शारिरिक, मानसिक, आर्थिक ऐपतीनुसार उपाय करतो. पण तुम्ही जे म्हणाताय की असे मोकळेच राहणे यात कमिटमेंट नसते ते अजिबात पटत नाही. यशस्विरित्या असे रहायला जास्त कमिटमेंट लागत असावी कारण मुले, त्याच्यामुळे संसार वाढत जाणे हा मोठ्ठा प्रकारच आयुष्यात नसतो त्या जोडप्यांपुढे आदर्श, पाऊलवाट तयार होणे हे खूप कमी प्रमाणावर असणार.
बाकी प्राडाँचा प्रतिसाद वाचून मजा वाटली. पिराशी तर फारच सहमत. ;)

मराठी कथालेखक's picture

3 May 2016 - 10:46 am | मराठी कथालेखक

रेवतीजी, प्रतिसाद आवडला

mugdhagode's picture

3 May 2016 - 6:52 am | mugdhagode

ब्याचलर म्हणजे नेमकं काय ?

अविवाहीत ?

की

ब्रह्मचारी ?

अविवाहीत / ब्रह्मचारी / अ-मूल विवाहीत .... या तीन भिन्न क्याट्यागरीज आहेत.

( शंकेस हसु नये. विंग्रजी कच्चे आहे. )

नमकिन's picture

3 May 2016 - 7:17 am | नमकिन

असे हवे.
नक्की प्रश्न कळत नाहीं, प्रश्नात सुस्पष्टता नाहीं.
देवर्षि /देवॠषी/भक्त/साधू-संत हे देखील "ब्रह्मचारी" असतात.
अवांतर - बाळाचे बाप ब्रह्मचारी, मर्फी आठवला

इस्पिक राजा's picture

4 May 2016 - 1:36 pm | इस्पिक राजा

ब्याचलर म्हणजे अविवाहित
सेलिबेट म्हणजे ब्रह्मचारी