ब्राह्मणी मटन मसाला

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
1 May 2016 - 6:16 am

ब्राह्मणी मटण मसाला.....
असे चमत्कारीक नाव असलेली एक रेसिपि वाचनात आली..ति शे‌अर करत आहे
.................
साहित्य...
मटण १/२ किलो
एक मोठा कांदा चिरलेला
तेल
दालचिनी ईलायची दगडफुल.खसख...तमालपत्र
लवंगा आदी खडा मसाला.
गोडा मसाला..आमटी साठी वापरतात तो
तिखट मिठ
मॅरिनेट साठी........
बचकभर कोथिंबीर
पुदीनी आल+लसुण +मिरची ..
वाटण...
एक चिरलेला कांदा
निम्म खोबरे..
२ वेलदोडे +२ लवंगा
आल+लसुण
कृति.......
१..बचकभर कोथिंबीर
पुदीना+ आल+लसुण+मिरची ..
च वाटण तयार करा मटनाला लावुन घ्या
२...कुकर मधे २ मोठे चमचे तेल घ्या तेल तापले कि ... खडा मसाला घाला त्या आल लसणाची पेस्ट टाका कांदा टाकुन मंद आचेवर खरपुस शिजु द्या
त्यात मॅरिनेट केकेल मटण टाकुन व्यवस्थित हलवुन घ्या.. तिखड मिठ ..गोडा मसाला चवि प्रमाणे घाला. व मिश्रण व्यवस्थित हलवुन घ्या...व मंद आचेवर शिजु द्या...
३..वाटण..एका कढ‌ईत चमचाभर तेल घ्या तेल तापल्यावर त्यात कांदा खोबरे आल+लसुण पेस्ट चमचाभर खसखस लवंग २ वेलदोडे २ लालसर गुलाबी रंगावर भाजुन घ्या...
मिश्रण गार झाले कि मिक्सरमधे त्यात थोडे पाणी घालुन पेस्ट करुन घ्या..
सदर वाटण कुकरमधे शिजत असलेल्या मटणात मिसळा ....एक चमचा गोडा मसाला घाला
चांगले हलवुन घ्या मिश्रण व रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी मिसळा....
कुकर ला झाकण लावा..
४-५ शिट्ट्या कुकरने मारल्या कि ८-१० मिनिटे मंद आचेवर एक उकळी कााढा
शिट्टी पडली कि मटण तयार....
मस्त चापा..

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

1 May 2016 - 8:04 am | लालगरूड

photo,????

त्यांनी वाचलेली चोप्य पस्ते मारली इथे.

स्पा's picture

1 May 2016 - 9:32 am | स्पा

लोल

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2016 - 9:45 am | अत्रुप्त आत्मा

बुळुक बुळुक बुळुक बुळुक!

अविनाशकुलकर्णी's picture

1 May 2016 - 3:04 pm | अविनाशकुलकर्णी

मीच फेबु वर लिहिली आहे...तिचीचोप्य पस्ते मारली इथे.

अविनाशकुलकर्णी's picture

1 May 2016 - 3:06 pm | अविनाशकुलकर्णी

मीच फे बु वर लिहिलि आहे.. तिच चोप्य पस्ते मारली इथे.

मितभाषी's picture

1 May 2016 - 10:06 am | मितभाषी

फुर्र्र्र्र्र्र्र्र्र

विजय पुरोहित's picture

1 May 2016 - 10:17 am | विजय पुरोहित

या पूर्वीच्या तुमच्या कथेतील आमसुले वाचून तुमचा साहित्यिक धसका घेतलेला होता. नशीब यात तसलं काही नाही.
बाकी वेलकम बॅक अकुकाका.

बोलघेवडा's picture

1 May 2016 - 10:54 am | बोलघेवडा

शीर्षक नुसत "मटण मसाला" असा लिहिलं असतं तरी चाललं असतं.

टवाळ कार्टा's picture

1 May 2016 - 11:18 am | टवाळ कार्टा

गूळ, तूप आणि चिंचेची चटणी नसल्याने पाकृ अपूर्ण आहे

धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि सवंग लोकप्रियता मिळवण्याचा छुपा उद्देश असल्याने पौड फाट्यावर मारणेत येत आहे ....

धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि सवंग लोकप्रियता मिळवण्याचा छुपा उद्देश असल्याने पौड फाट्यावर मारणेत येत आहे ....

धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि सवंग लोकप्रियता मिळवण्याचा छुपा उद्देश असल्याने पौड फाट्यावर मारणेत येत आहे ....

बाबा योगीराज's picture

1 May 2016 - 11:59 am | बाबा योगीराज

दमानी जरा,
किती येळा फाट्यावर मारताय? फाटा मोडलं त्यो.

कानडाऊ योगेशु's picture

1 May 2016 - 12:04 pm | कानडाऊ योगेशु

माझ्यामते ब्राम्हणी ह्याचा उल्लेख इथे कमी तिखट ह्या अर्थाने आला असावा.
बाकी ब्राम्हणी घार नावाची एक घार असते असे ऐकुन आहे त्याबद्दल कुणी लिहिले म्हणजे समजा फोटो टाकले तर तिथे ही धार्मिक तेढ निर्माण करायला तसा उल्लेख केला असे समजायचे का?

वैभव जाधव's picture

1 May 2016 - 12:04 pm | वैभव जाधव

अकु काका यात नेमकं काय ब्राह्मणी आहे असं वाचनात आल्यावर जाणवलं ? की खाणारा ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मणी?

- fandry वैभ्या!

म्हणून ब्राम्हणी मटण. फक्त शेंगदाणे खाणा-या बकरीच्या मटणाची कृती उपवास मटण म्हणून टाकावी काब्रे?

बॅटमॅन's picture

1 May 2016 - 12:17 pm | बॅटमॅन

वाटलंच मला यावर खडाजंगी होणारच. एकूणच ट्यार्पी निर्माण करण्यात ब्राह्मणांचा हात कुणीच धरू शकत नाही हेच खरे. =))

टवाळ कार्टा's picture

1 May 2016 - 12:19 pm | टवाळ कार्टा

आहे आहे...एक कंपू आहे

कोण हो कुठला हा कंपू म्हणायचा?

(सालस) बॅटमॅन.

टवाळ कार्टा's picture

1 May 2016 - 12:35 pm | टवाळ कार्टा

batman

बॅटमॅन's picture

1 May 2016 - 12:47 pm | बॅटमॅन

लोलबंध

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2016 - 2:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्राह्मणी गोडा मसाला मिळतो हे माहिती आहे, तसेच ब्राह्मणी मटन मसाला असू शकतो, रेसेपी असू शकते, काका फोटो प्लीज.

बाकी चालू द्या.

-दिलीप बिरुटे

चलत मुसाफिर's picture

1 May 2016 - 2:44 pm | चलत मुसाफिर

दलित पुरणपोळी, मराठा श्रीखंड, जैन सागुती, धनगरी साबुदाणा खिचडी इ. पाककृती वाचण्यास उत्सुक आहे. स्वतः शाकाहारी असल्यामुळे स्वाद घेण्यावर मात्र मर्यादा असू शकतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2016 - 2:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान हं, लय भारी हं, आवडलं हं, अजुन येऊ दे हं !

- दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

1 May 2016 - 2:58 pm | कानडाऊ योगेशु

दलित पु.पो दलित साहित्यातुन मिळु शकते. (ह.घ्यके)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2016 - 3:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्यांची खाण्याची मारामार होती ते काय पुरण पोळी खाणार, आता काहींची परिस्थिती बदलली असेल, पण अजुनही भटके दलित यांची खाण्याची मारामार आहे, त्यांच्याही आयुष्यात पूरण पोळी, सुखाचं जगणं वाट्याला यावं, अशी अपेक्षा आज महाराष्ट्र दिनी करायला हरकत नाही.

-दिलीप बिरुटे

विजय पुरोहित's picture

1 May 2016 - 3:06 pm | विजय पुरोहित

+111

कानडाऊ योगेशु's picture

1 May 2016 - 3:14 pm | कानडाऊ योगेशु

सहमत हय!

टवाळ कार्टा's picture

1 May 2016 - 3:06 pm | टवाळ कार्टा

कोल्हापुरी चिंचगुळाची चटणी पण अ‍ॅडवा त्यात

ब्राह्मणी मसाल्यातील मटण असे लिहायचे होते का?

नाखु's picture

2 May 2016 - 8:35 am | नाखु

अकुनी वाढून जिलबी,

सुंबडीत पसार !

लोकांची हलगी,

नावात पिसार

फोटो नाही भेटत
बसा मसाला कुटत

रडतखडत कूट काव्य मधून साभार

आनंदी गोपाळ's picture

6 May 2016 - 5:31 pm | आनंदी गोपाळ

गोडाची चव न घातलेली रेसिपी अन ब्राह्मणी? नो चान्स.

हेमंत लाटकर's picture

7 May 2016 - 2:07 pm | हेमंत लाटकर

प्रत्येक जातीचे मटन वेगळे असते का?

मन्याटण्या's picture

8 May 2016 - 3:32 am | मन्याटण्या

मटन बोकड़ाचे असते