वेगानी पसार

सुजल's picture
सुजल in जनातलं, मनातलं
21 Apr 2016 - 1:05 am

"नारिता" एयरपोर्ट वर एजंट माझ्या नावाची पाटी घेऊनच उभा होता त्यामुळे त्याला ओळखण सोप्प गेल. मी त्याला माझी ओळख पटवून दिली आणि "तुडतुड्या" चालीने त्याने माझ्या ब्यागा उचलल्या आणि पूर्णपणे आम्ही एयरपोर्ट च्या बाहेर. ताबडतोब त्याने योकोहामा पोर्ट ला जायला ट्याक्सी बुक केली आणि पाच मिनिटात ट्याक्सी हजर. पटापटा त्याने ट्याक्सीत सामान ठेवलं आणि ट्याक्सीचा पुढचा दरवाजा उघडून माझ्या स्वागतार्थ वाकून वाकून त्यांच्या पद्धतीने नमस्कार केला.मला तर पूर्ण पणे गडबडायला झाल. तो इतका वाकून वाकून मला नमस्कार करत होता तर आता आपण पण त्याच्या समोर असाच वाकून वाकूनच नमस्कार करायचा का? असा विचार करण्यातच माझी दोन -पाच सेकंद गेली खरी पण कुठल्याही प्रकारे न वाकता मी भारतीय पद्धतीने नमस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि ट्याक्सीत ड्रायव्हर शेजारी बसले ( म्हणजे त्याचाच शेजारी) कारण ड्रायव्हिंग तोच करणार होता. रात्रीची बारा-साडे बारा वाजले होते.खर तर दिवसभराच्या दगदगीने झोप येत होती पण तरीही डोळे उघडे ठेऊन विस्फारून म्हणा हव तर ) टोकियो सिटीचे गुळगुळीत रस्ते न्याहाळत होते.

मध्येच त्याने मला विचारलं " नरिता" एयरपोर्ट ते "योकोहामा" पोर्ट चा अंतर किती आहे माहित आहे का तुला ? आत्ता मला कस माहित असणार? काहीतरीच प्रश्न :) त्याने अगदी मोठ्या तोर्यात सांगितलं खूप आहे अंतर आणि एवढ अंतर मी तुला ड्राइव्ह करून नेत आहे.म्हणजे काहीतरी खूप मोठ्ठ करत आहे असा त्याचा सूर वाटला. मनात म्हटलं मी काय करणार? ते तुझ कामच आहे.गाडीत त्याने मंद आवाजात मुझिक लावलं होत.ते कानाला प्रचंड सुखद वाटत होत. खर पेंग येत होती पण जागी राहण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता .

शेवटी शांतपणे २ ते ३ तासाचा प्रवास करून एकदाचे आम्ही योकोहामा पोर्ट वर पोचलो.पोर्ट चे सगळे सोपस्कार पार पाडून त्याने शिप च्या ग्यानग्वेवरून माझ्या दोन्ही ब्यागा दोन्ही हातात घेऊन जी काही पळायला सुरवात केली त्याला तोडच नाही. त्याला गाठता गाठता मला नाकी नऊ आली. अरे हळू हळू पण तो ऐकतोय कुठे ? मला तरी त्याच्या बरोबरीने अगदी एवढी धावायची आणि पळायची जरुरी होती का? पण नाही. मी पण मुर्खासारखी धावतेय त्याच्या बरोबरीने. आत्ता पर्यत माझी अशी फरफट कोणीच केली नसेल. ( हाहाहा ) . शेवटी एकदाचे पोचलो जहाजावर आणि मला क्याप्टन च्या केबिन मध्ये शिप वरच्या क्याप्टन च्या हाती सोपून कुठलीही उसंत न घेता उद्या सकाळी व्हिसाच्या कामाला जायचंय तयार राहा म्हणून सांगून हा ज्या वेगानी आला त्याच वेगानी पसार :)

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

टांगा पल्टी घोडं फरार!

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2016 - 1:43 am | श्रीरंग_जोशी

सुरुवात चांगली पण फारच थोडक्यात उरकलेलं दिसत आहे.

ही लेखमालिका असणार आहे असे समजून चालतोय.

पैसा's picture

21 Apr 2016 - 9:30 am | पैसा

मालिका आहे का? लिखाण आवडलं. अजून लिहा.

नूतन सावंत's picture

21 Apr 2016 - 9:45 am | नूतन सावंत

लिखाण आवडलं.अजून मोठा भाग येऊदे.क्रमशः लिहायचं राहिलंय का?

असंका's picture

21 Apr 2016 - 12:24 pm | असंका

काहीतरी कमी पडलंय यात...
पण लिहिलंय ते चांगलं लिहिलंय.

रच्याकने, पूर्णपणे आम्ही एअरपोर्टच्य बाहेर म्हणजे काय म्हणायचंय नक्की?

पूर्णपणे म्हणजे सगळ्या फोर्मलिटीज उरकून :)

उल्का's picture

21 Apr 2016 - 12:32 pm | उल्का

पुस्तक असते तर पान पलटुन बघितले असते. उत्कन्ठा वाढली आहे. पुभाप्र.

उगा काहितरीच's picture

21 Apr 2016 - 1:38 pm | उगा काहितरीच

वेगानी पसार झालात तुम्ही तर... ;-)

सुनील's picture

21 Apr 2016 - 1:48 pm | सुनील

असं आहे होय!

मला वाटलं बुलेट ट्रेन प्रवासासंबधी काही असेल!!

असो, ते क्रमशः दिसलं नाही शेवटी?

प्रदीप's picture

21 Apr 2016 - 2:05 pm | प्रदीप

एका जुन्या लेखानंतर सतत येत असलेल्या 'पुढे काय झाले?' ह्या प्रश्नाचा आता येथील लेखकांनी इतका धसका घेतलाय, की ते असे 'ओपन' ठेऊन जातात! उग्गाच थाटात 'क्रमशः; वगैरे लिहायचं आणि मग पुढे लिहीण्याचं सुचत नसलं (कारण तसे खरे तर 'पुढे' काही सांगण्यासारखे नव्हतेच!) तर उगाच उत्कंठा वगैरे नको. नो कमिट्मेंट्स!

नाखु's picture

21 Apr 2016 - 2:24 pm | नाखु

एखाद्याने या लेखांचे पुढे काय झाले. (पक्षी कथा पुढे अशी असेल असे विडंबन टाकले तर मूळ लेखक येऊन धागापुर्ती करेल) असे वाटते.

म्हणजे एखादा धाग्याचा पुढचा भाग एक महिन्यात नाही आला तर विडंबकाने/जोडकाम जुळ्यार्यांनी आपली कल्पनाशक्ती लावून दुसरा भाग खो-खो पद्धतीने लिहायचा.
बरेच अडलेले-तुंबलेले भाग मार्गी लागतील.

उदा :धमाली

परावलंबी

मृत्युन्जय's picture

21 Apr 2016 - 5:10 pm | मृत्युन्जय

हे काय होते?

जव्हेरगंज's picture

21 Apr 2016 - 9:44 pm | जव्हेरगंज

बरं मग ?

जव्हेरगंज मग काहीच नाही :)

मालिका नाहीये. अनुभव. असेच छोटे छोटे अनुभव लिहिले आहेत :)

चांदणे संदीप's picture

28 Apr 2016 - 1:13 pm | चांदणे संदीप

वाचायला घेतला लेख तर वेगानी पसार झाला. =))

असो, पुलेशु!

Sandy