लघुकथा - थांब!

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
15 Apr 2016 - 4:39 pm

ब्लॉग दुवा हा

नेहमीचीच गर्दीची वेळ होती.८:५२ ची बदलापूर यायला काही क्षण बाकी होते. महेश ब्रिजवरून धावत धावत येत होता, आपल्या नेहमीच्या डब्याशी पोचण्यासाठी गर्दीतून वाट काढत होता. तो नेहमीच्या जागी जाऊन पोचला आणि उभा राहिला. आज गर्दी जरा जास्तच होती. महेशने मोबाईल बघितला आणि खिशात टाकला. पाकिट, चावी चेक केलं आणि बॅग पुढे घेऊन तयार झाला. ८:५२ ची लोकल आली. चढण्यासाठी एकच झुंबड उडाली. ’अंदर जाओ’, ’अरे काय करतोयस यार माझा पाय आहे’, ’उतरू द्या उतरू द्या!’ सगळा कल्लोळ झाला. महेशला कुणीतरी धक्का देऊन मागे लोटलं. चढणं भयानक कठीण होतं, लटकायलाही जागा नव्हती. बरीच खटपट करून शेवटी पुढच्या गाडीने जाऊ म्हणत तो मागे झाला. इतक्यात गाडी सुटली. लोकं चढतच होती, लटकत होती. तेवढ्यात ’अरे माझं घड्याळ!!’ असं कुणीतरी ओरडलं. महेशने गाडीकडे बघितलं. डब्याबाहेर लटकलेल्या एका मुलाचं घड्याळ खाली पडलं होतं. तो मुलगा हात करत होता, पण गाडीने वेग घेतला होता. काही क्षणातच गाडी आणि तो मुलगाही नजरेच्या टप्प्याबाहेर गेला. एकदा त्या घड्याळाकडे, एकदा आजूबाजूच्या लोकांकडे काही क्षण बघत महेशने विचार केला. ’कशाला एवढी घाई करायची मी म्हणतो’, बाजूचे एक काका म्हणाले. ’आं? हो. हो ना! काय आता बोलणार...’, असं म्हणून त्याने अजून जरा विचार केला आणि घड्याळ आपल्या बॅगमधे ठेवलं.

महेशला त्या डब्यात लटकणा-या मुलाबद्दल खूप वाईट वाटायला लागलं. रात्री घरी गेल्यावर त्याने बॅगेतून ते घड्याळ काढलं. काळा पट्टा, सोनेरी बक्कल, घड्याळ सुरेख होतं. त्याचं लक्ष डायलकडे गेलं. पांढ-या डायलवर बदाम काढून त्यात महेश सुषमा अशी नावं लिहिलेली होती. महेश हसला. ’बघितलंस का? किती रोमॅंटिक गिफ़्ट्स देतात बायका प्रियकरांना किंवा नव-यांना?’, महेश त्याच्या बायकोला, मनिषाला म्हणाला. त्याने तिला आत जाऊन घड्याळ दाखवलं आणि तिला चिडवत म्हणाला, ’बघ! या महेशवर किती प्रेम असेल त्याच्या बायकोचं’. ’ए गप रे! पण खरंच, तिने मोठ्या प्रेमाने दिलं असेल ना हे घड्याळ?’, ’काय करणारयस तू आता याचं?’, ’बघतो पुन्हा दिसला तर तिथे उद्या. देईन त्याला परत.’ ’देच देच. त्याला पण वाईट वाटत असेल अत्ता खूप ना?’ ... दोघे बोलत होते.

दुस-या दिवशी त्याच वेळेच्या सुमारास महेश प्लॅटफ़ॉर्मवर पोचला. इकडे तिकडे बघत तो ’त्या’ महेशला शोधू लागला. चालत्या गाडीत, तेही लांबवरून बघितलेला चेहराही त्याला फार धूसर आठवत होता. काय करावं अशा विवंचनेत जात त्याने आजूबाजूच्या लोकांना विचारायला सुरुवात केली. ’हे घड्याळ तुमचं आहे?’ ’काल गाडीतून पडलं होतं’ ’भाईसाब, घडी आपका है?’ ’यहां महेश कौन है महेश?, उसका घडी मेरेपास है’. ८:५२ आली. तोच डबा, तशीच गर्दी. महेशने डब्यातही ओरडून विचारून बघितलं, ’अरे इथे महेश आहे का कुणी? त्याचं घड्याळ माझ्याकडे आहे’ इतक्या गर्दीत कुणाला काही ऐकूही येत नव्हतं, आणि त्या महेशला शोधण्यात रसही नव्हता. गाडी तशीच धडधडत नजरेआड गेली.

महेशने कालसारखंच ते घड्याळ बॅगमधे टाकलं. आणि नेहमीप्रमाणे घरी गेला. रात्री जेवताना पेपर वाचता वाचता एका बातमीकडे महेशचं लक्ष गेलं. ’ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू’ महेशने बातमी वाचायला सुरुवात केली. तरूणाचं नाव होतं ’महेश मुकादम’. महेशचा घास हातातच थांबला. पटकन हात धुवत त्याने बॅगेतून ते घड्याळ काढलं. बदाम, महेश, सुषमा, घड्याळातली वेळ; ९. बातमीत पुढे लिहिलेली अपघाताची वेळही तीच; रात्री ९. घड्याळ बंद पडलं होतं. त्या रात्री दोनही वेळा थांबल्या, त्या एक घड्याळातली, आणि एक महेश मुकादमची. सगळ्या गोष्टींचा ताळमेळ लागला आणि महेश अतिशय सुन्न झाला. त्याने मनिषालाही ही गोष्ट सांगितली, तिलाही कसंनुसं झालं. ’त्याला लोकांनी आत जायला जागा दिली असती तर वाचला असता यार!’, महेश. ’अरे कशाला जिवाशी खेळायचं पण? एवढं काही होतं का चार मिनिटांनी’, मनिषा म्हणाली. महेश काहीच म्हणाला नाही, बराच वेळ तो हात करणारा मुलगा आणि ते घड्याळ त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं.

a

असाच एक दिवस महेश गाडीची वाट बघत उभा होता. ८:५२ आली. तोबा गर्दी. आज महेशला लवकर घरी जायचं होतं. मुलीचा वाढदिवस होता. तिला केक न्यायचा होता, कारने फिरायला न्यायचं होतं. महेश बॅग पुढे घेत गाडीच्या दिशेने सरसावला. आत शिरायला जागाच नव्हती. बरीच खटपट करून शेवटी महेश मागे सरला. गाडी निघून गेली. महेशने घड्याळाकडे बघितलं. इतक्यात त्याला बाजूला उभ्या असलेल्या एका प्रवाशाने विचारलं, ’भाऊ, एक विचारू का? नाही म्हणजे सहज विचारतो, ते तुम्ही हातावर दोन दोन घड्याळं का घातलीयत?’ महेश दोन सेकंद थांबला. आणि मग म्हणाला, ’हे जे चालू घड्याळ आहे ते मला सांगतं, ’धाव’, आणि हे जे बंद पडलेलं घड्याळ आहे ते मला सांगतं, ’थांब’.

दोनही घड्याळात त्या वेळी एकच वेळ होती, ९:००.

- अपूर्व ओक

कथालेख

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2016 - 4:53 pm | मराठी कथालेखक

चांगली आहे कथा.

थांबायला सांगणार घड्याळ घ्यायला हव प्रत्येकाने, असं वाटून गेलं.

Sandy

तर्राट जोकर's picture

15 Apr 2016 - 5:02 pm | तर्राट जोकर

खरंय राव. :(

असंका's picture

15 Apr 2016 - 5:09 pm | असंका

... दुर्दैव...

गोष्ट फारच सुंदर सांगितलीत!
धन्यवाद!!

विजय पुरोहित's picture

15 Apr 2016 - 6:34 pm | विजय पुरोहित

+111

नाखु's picture

15 Apr 2016 - 5:25 pm | नाखु

सगळे सांगतात थांबायचं का ते कथेतून सांगीतलं ते बरं झाल.

वक्तशीर पण (हक्नाक)जीव धोक्यात न घालणारा नाखु

जव्हेरगंज's picture

15 Apr 2016 - 6:22 pm | जव्हेरगंज

मस्त आहे !

अभ्या..'s picture

15 Apr 2016 - 6:28 pm | अभ्या..

वाईट वाटतं. :(

उगा काहितरीच's picture

15 Apr 2016 - 6:45 pm | उगा काहितरीच

वा ! छान कथा...

पैसा's picture

15 Apr 2016 - 6:49 pm | पैसा

कथा आवडली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2016 - 7:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कथा आवडेश.

विवेकपटाईत's picture

15 Apr 2016 - 7:31 pm | विवेकपटाईत

????विचार करायला लावणारी कथा.

रातराणी's picture

15 Apr 2016 - 10:18 pm | रातराणी

कथा आवडली.

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 10:39 pm | mugdhagode

छान

कथा आवडली. फार छान सांगितलंय.

बोका-ए-आझम's picture

15 Apr 2016 - 11:18 pm | बोका-ए-आझम

आवडली.

जव्हेरगंज's picture

16 Apr 2016 - 1:36 pm | जव्हेरगंज

दोनही घड्याळात त्या वेळी एकच वेळ होती, ९:००.

यामधुन तुम्हल काय सुचवायच आहे? हे समजल नाही.

चांदणे संदीप's picture

16 Apr 2016 - 2:17 pm | चांदणे संदीप

धोक्याचीच वेळ होती.... आणि टळली.
रूपकर्थाने विचार केला तर थांबलेल्या घड्याळाकडे अशाच धोक्याच्या प्रसंगी बघता ते थांबायलाच सांगेल. तेव्हा त्याचे ऐकणे न ऐकणे तुमच्या हातात असेल.

Sandy

सुधांशुनूलकर's picture

16 Apr 2016 - 2:22 pm | सुधांशुनूलकर

’हे जे चालू घड्याळ आहे ते मला सांगतं, ’धाव’, आणि हे जे बंद पडलेलं घड्याळ आहे ते मला सांगतं, ’थांब’.
हे वाक्य म्हणजे कथेचं सार आहे.

चांदणे संदीप यांचा प्रतिसाद आवडला, सहमत.

अत्रे's picture

16 Apr 2016 - 2:38 pm | अत्रे

गोष्ट आवडली! +१

पद्मावति's picture

16 Apr 2016 - 3:29 pm | पद्मावति

गोष्ट आवडली.

कथा आवडली.असंच डोंबिवली स्थानकावरचं एक दृश्य डोळ्यासमोर आलं.पर्स पडली म्हणून गाडी सुरु झाल्यावर बाहेर यायला बघणारी स्त्री.तिला अक्षरशः धरुन मागे ओढली होती इतर जणींनी.

नूतन's picture

16 Apr 2016 - 11:37 pm | नूतन

छान!कथा आवडली

शित्रेउमेश's picture

18 Apr 2016 - 1:37 pm | शित्रेउमेश

सकारात्मक शेवट...

म्हणून जरा जास्त आवडली....

स्पा's picture

18 Apr 2016 - 1:52 pm | स्पा

जाहिरात

http://www.misalpav.com/node/22394

;)

सविता००१'s picture

18 Apr 2016 - 4:38 pm | सविता००१

कथा. मुंबईच वास्तव. ख्ररंच कधीकधी वाटतं एखाद्या मिनिटाने काय होतंय थांबलं तर........... :(

राघवेंद्र's picture

18 Apr 2016 - 7:54 pm | राघवेंद्र

कथा आवडली

वेल्लाभट's picture

2 May 2016 - 12:55 pm | वेल्लाभट

कौतुकाबद्दल सगळ्यांचे अनेक आभार.

जवळजवळ याच प्रकारे लोकलखाली सापडलेला माझा एक मामा आठवला...

परिणामकारक कथा.

चाणक्य's picture

6 May 2016 - 7:46 pm | चाणक्य

आवडली. मी काॅलेजला असताना असं लोकलच्या दारात लटकून वगैरे जायचो. आता मूर्खपणा वाटतो तो सगळा. पण तेव्हा फार मर्दानगी वाटायची.

एक एकटा एकटाच's picture

7 May 2016 - 12:22 am | एक एकटा एकटाच

सुरेख लिहिलय

हेमंत लाटकर's picture

7 May 2016 - 4:33 pm | हेमंत लाटकर

आपल्या कडील लोकलला गाडी चालू झाली की बंद व थांबली उघडणारे दरवाजे पाहिजेत. थांबण्याचा वेळ किंचित वाढवला तर अपघात कमी होतील. सर्व रेल्वे स्टेशनवर सरकते जिने केले पाहिजेत. बुलेट ट्रेन पेक्षा या सुविधा झाल्या पाहिजेत. याआधी मुंबईत नौकरी-धंद्या निमित्त्याने येणार्या लोकांवर चाप बसविला पाहिजे.