एकरूप

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
14 Apr 2016 - 11:51 am

घाटमाथ्यावर पसरले, उन लाल कोवळे
पानाफुलात जागले, एक चैतन्य आगळे
साज मोत्याचा लेवुन, चराचर नटले
निरखून स्वरूप देखणे, साजिरे लाजले

घाटमाथ्यावर घंटानाद, शांत जळात घुमला
ओल्या पायरीचा गंध, आकाशी दरवळला
किलबिल पाखरांची, फांदीफांदीशी लगबग
भरदार त्या तरुदेही, सुखी घरट्याचे तरंग

घाटमाथ्यावर लागती, तप्त ऊन्हाच्या झळा
गाभाऱ्यास देइ थंडावा,रंग कातळाचा काळा
उष्मा शोषून आकंठ, येती सावल्या मंडपात
ओव्याअभंगांची गोडी,येई साखरफुटान्यात

घाटमाथ्यावर विसावले, ऊन सोनेरी सावळे
एकांती रमल्या मनोमनी, सावल्यांचे सोहळे
कधी गुंफती हात हाती,कधी टिपत पाणी
पारावर पाखरे गाती, उन्हापावसाची गाणी

घाटमाथ्यावर पांघरला, शीतल चांदवा चंद्राचा
काळ्याशार डोहाशी, एकरूप रंग कातळाचा
गाभाऱ्यातून येती बाहेर, दोन सावल्या थकून
शांत नीरव तो काळोख, घेती श्वासात भरून

शांतरसकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

14 Apr 2016 - 12:01 pm | चांदणे संदीप

घाटमाथ्यावरला एक दिवस...

प्रचेतस's picture

14 Apr 2016 - 12:07 pm | प्रचेतस

वाह...!
घाटमाथ्यावर उभं राहून पाताळेवेरी गेलेली दरी निरखण्याचा आनंद आगळाच.

उन्हाळ्यात अगदी राकट धाकट पुरुषी दिसणारा घाटमाथा पावसकाळात मात्र नव्या नवरीसारखा हिरवाकंच शालू नेसून येतो.

नीलमोहर's picture

14 Apr 2016 - 12:20 pm | नीलमोहर

सुरेख..

अभ्या..'s picture

14 Apr 2016 - 12:21 pm | अभ्या..

आह्ह्ह.
अप्रतिम

एस's picture

14 Apr 2016 - 5:08 pm | एस

वा! क्या बात है!

रातराणी's picture

14 Apr 2016 - 10:39 pm | रातराणी

धन्यवाद :)

पैसा's picture

14 Apr 2016 - 10:43 pm | पैसा

सुरेख!

शिव कन्या's picture

15 Apr 2016 - 7:53 pm | शिव कन्या

गाभाऱ्यातून येती बाहेर, दोन सावल्या थकून..... ताकद इथे आहे.
आणखी लिही.
चित्रमय वर्णन आवडले.

स्रुजा's picture

16 Apr 2016 - 2:06 am | स्रुजा

फार च छान !

विजय पुरोहित's picture

16 Apr 2016 - 6:30 am | विजय पुरोहित

खूप
खूप
खूप
खूप
सुंदर काव्य...

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Apr 2016 - 4:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख अतिशय सुरेख. डोळ्यासमोर घाटमाथ्याचे चित्र उभे राहिले
आवडली कविता.

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2016 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा

सल्लाम!

भरत्_पलुसकर's picture

16 Apr 2016 - 5:07 pm | भरत्_पलुसकर

खतरा लिहिता ओ तै!

डोळ्यासमोर सगळे येत होते. कविता आवडली.

बोका-ए-आझम's picture

16 Apr 2016 - 10:30 pm | बोका-ए-आझम

शेवट प्रचंड आवडला!

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद :)

इडली डोसा's picture

17 Apr 2016 - 10:28 am | इडली डोसा

सगळीचं कडवी अप्रतिम आणि चित्रदर्शी!

इडली डोसा's picture

17 Apr 2016 - 10:28 am | इडली डोसा

सगळीचं कडवी अप्रतिम आणि चित्रदर्शी!

इडली डोसा's picture

17 Apr 2016 - 10:28 am | इडली डोसा

सगळीचं कडवी अप्रतिम आणि चित्रदर्शी!

सस्नेह's picture

17 Apr 2016 - 2:28 pm | सस्नेह

पोचले मी घाटमाथ्यावर !
ते पायरीचा गंध फारच आवडले.
अतिशय आवडली अलवार कविता.

टवाळ कार्टा's picture

17 Apr 2016 - 2:37 pm | टवाळ कार्टा

खत्रा
तांबीय काव्यासाठी कच्चा माल ठासून भरलेला आहे =))

लयबद्ध अप्रतिम काव्य! मस्तच...