शनि ग्रह आणि पृथ्वीवरचे जीव

वैभव जाधव's picture
वैभव जाधव in काथ्याकूट
13 Apr 2016 - 10:17 pm
गाभा: 

पृथ्वी आणि चंद्र यांच्या रोजच्या फुगडीतून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा मुळे आठ तासा तून एकदा भरती आणि नंतर ओहोटी होते. 4 4 मीटर लाटा उसळतात. चंद्र जवळ आहे म्हणून असं होतं म्हणे. माणसाच्या शरीरात असलेल्या पाणी सदृश घटकांवर परिणाम होतो असं मानायला जागा आहे का? अशा मुळे माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं.

आता काथ्याकुटाचा मूळ विषय- म्हणजे शनि आणि पृथ्वी यांचं त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरताना काही आकर्षण प्रतिकर्षण होत असतं का? जर ते तसं होत असेल तर तो शनीचा माणसावर होणारा परिणाम मानावा का? शनि एका ठराविक काळात त्याच्या आणि पृथ्वीच्या गतीतील बदलामुळे तुलनात्मक एका च जागी असल्याने तो त्या राशीत आहे असं वाटून, त्यामुळे ठराविक लोकांना त्याच्या या आकर्षण बळामुळे त्रास होणं शक्य मानलं जावं का?

- विश्वातील एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो असं मानणारा पहिला काथ्या कुटणारा वै जा.

प्रतिक्रिया

गरम तव्यावर पोळी भाजुन घ्या साहेब.

वैभव जाधव's picture

13 Apr 2016 - 10:27 pm | वैभव जाधव

वेगळा धागा मुद्दाम काढला आहे. खरंच प्रश्न आहेत.

बाकी पोळी, ऑम्लेट वगैरे पाकृ विभागात भाजुया का?

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 10:23 pm | तर्राट जोकर

कोणत्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत नाही.

ज्योतिषातले ग्रह म्हणजे रेफरंस पॉइंट आहेत. कॅलेंडरमधे जुलै महिना आहे म्हणून पाऊस पडत नाही. किंवा पाऊस पडतो म्हणून कॅलेंडरमधे जुलै महिना नसतो.

वैभव जाधव's picture

13 Apr 2016 - 10:39 pm | वैभव जाधव

ग्रहाचा माणसावर परिणाम होत नाही हे च कशावरुन म्हणताय ? चंद्रामुळे पृथ्वीवर जर भरती ओहोटी होत असेल तर माणसाच्या शरीरावर- म्हणून मनावर- म्हणून वागण्यावर परिणाम होत नाही असं शक्य असेल का?

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 10:43 pm | तर्राट जोकर

तसे असेल तर पृथ्वीवर सजीव फक्त मनुष्य नाही. अमावस्या पौर्णिमेला विक्षिप्त वागतांना इतर सजीवांना बघितलेले आहे काय?

वैभव जाधव's picture

13 Apr 2016 - 11:01 pm | वैभव जाधव

प्राणी मूलभूत गोष्टींव्यतिरिक्त अधिकचा विचार करु शकत नाहीत ना? सध्या माणसाबाबत विचार करुया.

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 11:25 pm | तर्राट जोकर

आपण मूळ धाग्यात निर्जीवांचे (पाणी) वर्तनही निरिक्षणाखाली घेतले आहे. तेव्हा सजीवांचेही घेणे क्रमप्राप्त ठरते.

आपला प्रश्न आहे निर्जीव ग्रहांच्या परिवलनामुळे मनुष्यावर (पर्यायाने सजीवांवर) परिणाम होतो का? तर आपलाच प्रश्न पुढे थोडा वाढवत इतर सजीवांनाही त्यात घेतले. अमावस्या पौर्णिमेला जर मनुष्यवर्तन (वर्तन बरं, मन नाही) जर प्रभावित होऊ शकते तर इतर सजीवांचेही होण्यास हरकत नसावी. आकारमानाने मोठ्या असलेल्या व्हेल, हत्ती, इत्यादी प्राणी अमुक दिवशी काही विक्षिप्त वर्तन करतांना दिसल्याचे काही अभ्यास झालेले आहेत काय हा माझा प्रश्न.

भूकंप किंवा सुर्य्ग्रहण इत्यादी नैसर्गिक घटनांच्या वेळेस मनुष्य सोडून इतर प्राणी विक्षिप्त वर्तन करत असल्याचे आढळून आले आहे. तेव्हा सजीवांचे वर्तन प्रभावित होण्यास कोणत्या घटना कारणीभूत ठरतात ह्यावर मलाही उत्तर हवेच आहे.

चर्चेत पुढे मी एक एक मूलभूत मुद्दा स्पष्ट करत जाणार आहे. कृपया माझ्या प्रश्नांना फाटे फोडणे समजू नये ही विनंती.

वैभव जाधव's picture

13 Apr 2016 - 11:46 pm | वैभव जाधव

चर्चा संवादी झाली तर उपयोग होतो.
आपल्यासारख्या अभ्यासू आयडी कडून मुद्द्यांची उकल झालेली आवडेल. येऊ द्या!

वेगवेगळ्या दृष्टीकोणाचे असलेले प्रतिसाद आलेले आवडतील.

sagarpdy's picture

14 Apr 2016 - 11:08 am | sagarpdy

On busy nights throughout her career in emergency veterinary medicine, Dr. Raegan Wells would often hear staff members and colleagues wonder aloud, "It must be a full moon tonight."
Wells, currently the chief medical officer at Emergency Animal Clinic in Phoenix, was skeptical of the notion that they were busier during a full moon, so she decided to take matters into her own hands to see if there was a correlation.
In 2007, Wells co-authored a retrospective study at Colorado State University that examined whether the volume of animal emergency room visits increased on the days of the full moon. The data was compiled of nearly 12,000 case histories of small animals, specifically dogs and cats, from 1992-2002 at the university's veterinary medical center. Such emergency types include animal bites, epilepsy and trauma to name just a few.
The results of the study were surprising, she said.

अधिक ,

परंतु चंद्र व सुर्य हे उजेड व गुरुत्वीय बल या स्वरुपात जेवढा परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर करतील तेवढा (अथवा जाणवण्याइतपत) अन्य ग्रह-ताऱ्यांकडून होणे केवळ अशक्य आहे.

१.अमावस्या पौर्णिमेस कुत्री फारच भुँकतात
२. पौर्णिमेस कोल्हेकुई जरा जास्तच ऐकू येते

स्वतः शेतात राहिलो असल्याने प्राथमिक अनुभव!

वेल्लाभट's picture

14 Apr 2016 - 2:41 pm | वेल्लाभट

टीव्ही कार्टून्स मधेही हे साधारण असंच चित्र बघितलेलं आहे.
a

साहना's picture

16 Apr 2016 - 1:33 am | साहना

त्याचा संबंध गुरुत्वाकार्षानाशी नसून उजेडासाठी आहे. अनेक जनावरे, प्राणी आणि पक्षी सूर्य तार्यांच्या मदतीने दिशा समजू शकतात. अमावास्येच्या रात्री मासे पकडणे जास्त चांगले होते कारण विजेरीच्या उजेडांत मासे पृष्ठभागा कडे आकर्षित होतात.

बोका-ए-आझम's picture

14 Apr 2016 - 12:27 pm | बोका-ए-आझम

पण माणसांचा विक्षिप्तपणा आपण जेवढ्या गंभीरपणे घेतो तेवढा प्राण्यांचा घेत नाही. पण त्यांच्यातही असे प्रकार असणारच. त्यांचा मेंदू माणसाएवढा प्रगत नसल्यामुळे या भावना माणसासारख्या स्पष्ट नसतील पण त्या असणार एवढं नक्की. विनोदाचा मुद्दा सोडला तर - जेवढं भौतिकशास्त्र आठवतंय त्यानुसार दोन वस्तूंंमधलं गुरूत्वाकर्षण हे त्यांच्या वस्तुमानाच्या सम प्रमाणात आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. शनिचं वस्तुमान पृथ्वीच्या मानाने प्रचंड आहे पण पृथ्वीपासून असलेलं अंतरही अवाढव्य आहे. त्यामुळे त्याचा पृथ्वीवरील लोकांवर असा किती फरक पडत असेल? शिवाय फलज्योतिषातील एक अप्रतिम विसंगती ही आहे की ते शनि हा पापग्रह आणि लोकांची आयुष्यं होत्याची नव्हती करुन टाकणारा असं मानतात आणि गुरु हा शुभग्रह मानतात. गुरुचं वस्तुमान शनिपेक्षा जास्त आणि पृथ्वीपासून अंतरही कमी पण तरीही शनि जास्त पावरबाज. हे कसं काय? यावरूनच फलज्योतिष हे शास्त्र नाही, छद्मशास्त्र किंवा Psuedo-science आहे हे सिद्ध होतं.

तर्राट जोकर's picture

14 Apr 2016 - 12:41 pm | तर्राट जोकर

@सागर, दुव्यांसाठी धन्यवाद. रोचक प्रकरण आहे.

@ बोकाभाऊ, धन्यवाद. बाकी ग्रहांबद्दल खाली भागवत सरांनी जे स्पष्टीकरण दिलंय ते पुरेसं आहे. शनी पापग्रह, गुरु शुभग्रह हे अक्षरशः घ्यायचे नसते. ते रेफरंस पॉइंट आहेत.

बोका-ए-आझम's picture

14 Apr 2016 - 5:37 pm | बोका-ए-आझम

मी त्यांचा काही impact होतो हेच मानत नाही. ते उदाहरण फलज्योतिषातील तर्कदुष्टता समजावून देण्यासाठी आहे.

तर्राट जोकर's picture

14 Apr 2016 - 5:48 pm | तर्राट जोकर

ओके. असो.

उगा काहितरीच's picture

13 Apr 2016 - 11:53 pm | उगा काहितरीच

हम्ममम ! चर्चा वाचण्यास उत्सुक...

सुबोध खरे's picture

14 Apr 2016 - 9:30 am | सुबोध खरे

कोणत्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत नाही.
जोकर साहेब
आपले हे मूळ गृहीत चुकीचे आहे.
खगोलशास्त्री श्री दा कृ सोमण यांच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा मी येथे मांडतो आहे.
मानवी जीवनावर सर्वात खोलवर कुठल्या ग्रहाचा परिणाम होत असेल तो
"दुराग्रहाचा"

तर्राट जोकर's picture

14 Apr 2016 - 9:35 am | तर्राट जोकर

=))

पैसा's picture

14 Apr 2016 - 9:51 am | पैसा

=)) दशम ग्रह विसरलात! वेळोवेळी अख्ख्या भारतावर त्याचा परिणाम झालाय. =)) =))

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2016 - 11:08 am | टवाळ कार्टा

सिक्सर =))

चौकटराजा's picture

14 Apr 2016 - 11:31 am | चौकटराजा

भारतावर परिं॑णाम झाला सुनेचा !

वैभव जाधव's picture

14 Apr 2016 - 12:34 pm | वैभव जाधव

दुराग्रह-

खासच डॉक्टर साहेब!

हा पूर्वग्रह असू शकेल काय?

नाखु's picture

15 Apr 2016 - 9:15 am | नाखु

हट्टाग्रह

आणि जालावर शिव्याग्रहची चलती चालू आहे असे एक निरिक्षण आहे.

आप-परग्रह नसलेला नाखु

शनिची कडी एकेक अडीच वर्षांची असतात तिनातले एककडेही भारी पडते.काहीजणा्ंना तिनांचा जॅकपॅाट लागतो -साडेसात वर्षं.काहींना म्हणे डबल लागलेला आहे चौदा वर्षं.सहामहिने कापून.

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 12:01 pm | शाम भागवत

माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं.

ज्योतिष शास्त्रानुसार कोणताच ग्रह काही करत नाही तर फक्त तो परिस्थिती कशी असेल याचे दिशा दिग्दर्शन करतो. माणसाच्या जिवनातील घटना व त्यावेळची ग्रह स्थिती यांचा ताळमेळ शेकडो वर्षे निरिक्षणात घालवून हे ठोकताळे बनवले गेले आहेत.

मी पुण्याहून मुंबईला जात असेन तर वाटेत मैलाचे दगड लागतात व ते मुंबई जवळ येत असल्याचे किंवा माझा रस्ता चुकत नसल्याचे किंवा माझी ध्येयाकडे प्रगती होत असल्याचे सुचीत करत असतात. पण ते दगड मला मुंबईला पोहोचवतात असे म्हणणे योग्य होईल का? ते मैलांचे दगड मला मुंबईला पोचवायला मदत करतात असे जास्तीत जास्त म्हणता येईल.

किंवा वाटेत मध्येच ठाणे ३० किमी. असा दगड लागला तर तो दगड मी रस्ता चुकलो असल्याचे सूचीत करतो. पण त्या दगडाने मला चुकवले असे म्हणणे कितपत योग्य होईल?

अगदी त्याचप्रमाणे माणसाच्या मनावर होणारे परिणाम लक्षात घेता ते पोर्णिमा व अमावास्येला जास्त होतात हे लक्षात आले. व त्यानुसार चंद्राच्या स्थितीनुसार ते ठोकताळे बांधले गेले. बस्स. इतकेच. त्यानुसार पोर्णिमा अमावस्येला काळजी घेणे इतपतच ठिक आहे. पण चंद्र हे सगळे करतो असे मानणे योग्य वाटत नाही.

यातूनच मनाचा संबंध चंद्राशी असतो असे म्हणायला सुरवात झाली. खरे म्हणजे चंद्रावरून माणसाच्या मनाबद्दल काही ठोकताळे मांडता येतात इतपतच हे योग्य होय. पण हळू हळू चंद्र इथे आहे म्हणून असे झाले व तो तिथे गेला की मग
प्रश्न सुटेल वगैरे वाक्ये ऐकायला यायला लागलात व चंद्रच सगळे करतो असा गैरसमज पसरायला सुरवात होते.

चंद्र प्रत्यक्ष काही करत नाही तर तो फक्त त्याला नेमून दिलेल्या पध्द्तीने व गतीने कोणताही भेदभाव न करता
कोणतीही अपेक्षा न बाळगता वाटचाल करत असतो. आणि म्हणूनच माणूस त्याच्या गतीचा उपयोग ठोकताळे
बांधण्यासाठी करू शकला आहे

तर्राट जोकर's picture

14 Apr 2016 - 12:37 pm | तर्राट जोकर

सहमत. हेच म्हणायचे होते.

ज्योतिषामध्ये ज्याप्रकारे टर्मिनोलॉजी वापरली जाते, जशी भाषा, संवाद केल्या जातात त्याच्या मुळाशी जायचे सोडून अंनिसवाले ह्या संज्ञावरुन स्वर्ग गाठून खिल्ली उडवतात.

मराठी कथालेखक's picture

14 Apr 2016 - 12:11 pm | मराठी कथालेखक

गुरुत्वाकर्षण बलाचे सूत्र पाहिल्यास
F=Gm1m2/(r^2)
G= Gravitational constant
m1= mass of object 1 (चंद्राचे वस्तूमान म्हणू या ठिकाणी)
m2 = mass of object 2 (केस १ = समुद्राचे पाण्याचे वस्तूमान, केस २ = माणसाच्या शरीरातील पाण्याचे/इतर द्रवाचे वस्तूमान)
r = distance between 2 objects (चंद्र आणि समुद्र वा माणूस यातील अंतर)

m1 स्थिर असताना :
m2 म्हणजे दुसर्‍या वस्तूचे वस्तूमान कमी असेल तर गुरुत्वीय बल कमी असणार.
समुद्राच्या पाण्याचे जे वस्तूमान आहे त्या तुलनेने माणसाच्या शरीरातील द्रवाचे वस्तूमान अगदीच नगण्य आहे. फार काय एखाद्या तलावाच्या पाण्यातही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने भरती ओहोटी होत नाही यानेच काय ते समजून येईल.

दुसरी गोष्टः
r चा वर्ग छेदात आहे म्हणजे अंतर वाढल्यास गुरुत्वीय बल कमी होणार. शनीचे वस्तूमान चंद्रापेक्षा निश्चीतच जास्त असणार (मी शोधले नाहीत , पण जालावर हे आकडे मिळू शकतील). पण शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर खूप जास्त असल्याने शनीपासून उत्पन्न होणारे गुरुत्वीय बल विशेष प्रभावी नसणार (निदान शनीमुळे सागराला भरती -ओहोटी आल्याचे मी कधी ऐकले नाही)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2016 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला असं कोणी गणितीय पद्धतीने काही समजून सांगायला लागलं की रोचक वाट्तं. आणि आवडतं.
प्रतिसाद आवडला. कोणतेही दगड्गोट्यांचा माणसावर परिणाम होत नाही, एवढेच मला कळते.

कितीतरी हजार किलोमिटर दूरवर असलेल्या शनिला, करोडो लोकांच्या भाऊगर्दीत मिपावर पडीक असलेले प्रा.डॉ. नेमके कसे सापडतील ?

लेखकासाठी काही दुवे :१) घाटपांडे साहेबांचा लेख
२) वरील प्रमाणे. दुवा.

- दिलीप बिरुटे

तर्राट जोकर's picture

20 Apr 2016 - 9:23 pm | तर्राट जोकर

एखाद्या आफ्रिकेतल्या घनघोर जंगलातल्या अनभिज्ञ आदिवाश्याला तुमच्या हातातल्या घड्याळाचा तुमच्या जीवनावर कसा दुरगामी परिणाम होतो हे सांगुनही पटणार नाही. म्हणजे ते खोटे असे समजावे काय?

मराठी कथालेखक's picture

21 Apr 2016 - 11:55 am | मराठी कथालेखक

धन्यवाद प्रा. डॉ साहेब

शरभ's picture

14 Apr 2016 - 1:05 pm | शरभ

फारच परिणाम होतो चंद्रामुळे. पोर्णिमा आणि विशेषतः कोजागिरीची असेल तर, आम्हाला मसाला दुध प्यायची (चारोळ्या वगैरे घालुन) फारच इछा होते. काही कळत नाही का ते. आणि अमावस्या असेल तर दुर्बीणि लाउन तासन्तास ग्रह, तारे, आकाशगंगा इ. पाहायची विछा पुर्ण केलेय.

--श

श्रीगुरुजी's picture

14 Apr 2016 - 2:59 pm | श्रीगुरुजी

"Autobiography of a Yogi" या शीर्षकाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद "योगीकथामृत" या नावाने प्रसिद्ध आहे. परमहंस श्री श्री योगानंद यांनी स्वतःच्या जीवनातील स्वानुभवांवर हे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात ज्योतिष व ग्रहतार्‍यांचा मानवी जीवनावर कसा परीणाम होतो या विषयावर एक मोठे प्रकरण आहे. जिज्ञासूंनी ते जरूर वाचावे. माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा अभ्यास आहे. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसारच माणसाचा स्वभाव बनतो. अनेक माणसांच्या स्वभावाच्या अभ्यासातून हे माझे मत बनलेले आहे. जन्मराशीवरून जसा स्वभाव ओळखता येतो तसाच स्वभावावरून जन्मरास ओळ्खता येते. ग्रहतार्‍यांच्या भ्रमणातून चांगलावाईट काळ नक्की ओळखता येतो.

यावर ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवावा, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करावे. ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही, ज्योतिष हे थोतांड आहे का या वादात मला पडायचे नाही.

मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे. मी सुधा थोडा अभ्यास केला आहे ज्योतिषविध्येचा आणी त्याचि अनुभुति सुद्धा घेतलि आहे.

उपयोजक's picture

17 Apr 2016 - 12:56 pm | उपयोजक

आपण म्हणता ते प्रकरण बहुधा हेच असावे.
Outwitting The Stars
"Mukunda, why don't you get an astrological armlet?" "Should I, Master? I don't believe in astrology." "It is never a question of belief ; the only scientific attitude one can take on any subject is whether it is true . The law of gravitation worked as efficiently before Newton as after him. The cosmos would be fairly chaotic if its laws could not operate without the sanction of human belief. "Charlatans have brought the stellar science to its present state of disrepute. Astrology is too vast, both mathematically 16-1 and philosophically, to be rightly grasped except by men of profound understanding. If ignoramuses misread the heavens, and see there a scrawl instead of a script, that is to be expected in this imperfect world. One should not dismiss the wisdom with the 'wise.' "All parts of creation are linked together and interchange their influences. The balanced rhythm of the universe is rooted in reciprocity," my guru continued. "Man, in his human aspect, has to combat two sets of forces-first, the tumults within his being, caused by the admixture of earth, water, fire, air, and ethereal elements; second, the outer disintegrating powers of nature. So long as man struggles with his mortality, he is affected by the myriad mutations of heaven and earth. "Astrology is the study of man's response to planetary stimuli. The stars have no conscious benevolence or animosity; they merely send forth positive and negative radiations. Of themselves, these do not help or harm humanity, but offer a lawful channel for the outward operation of cause-effect equilibriums which each man has set into motion in the past. "A child is born on that day and at that hour when the celestial rays are in mathematical harmony with his individual karma. His horoscope is a challenging portrait, revealing his unalterable past and its probable future results. But the natal chart can be rightly interpreted only by men of intuitive wisdom: these are few. "The message boldly blazoned across the heavens at the moment of birth is not meant to emphasize fate-the result of past good and evil-but to arouse man's will to escape from his universal thralldom. What he has done, he can undo. None other than himself was the instigator of the causes of whatever effects are now prevalent in his life. He can overcome any limitation, because he created it by his own actions in the first place, and because he has spiritual resources which are not subject to planetary pressure. "Superstitious awe of astrology makes one an automaton, slavishly dependent on mechanical guidance. The wise man defeats his planets- which is to say, his past-by transferring his allegiance from the creation to the Creator. The more he realizes his unity with Spirit, the less he can be dominated by matter. The soul is ever-free; it is deathless because birthless. It cannot be regimented by stars.
"Man is a soul, and has a body. When he properly places his sense of identity, he leaves behind all compulsive patterns. So long as he remains confused in his ordinary state of spiritual amnesia, he will know the subtle fetters of environmental law. "God is harmony; the devotee who attunes himself will never perform any action amiss. His activities will be correctly and naturally timed to accord with astrological law. After deep prayer and meditation he is in touch with his divine consciousness; there is no greater power than that inward protection." "Then, dear Master, why do you want me to wear an astrological bangle?" I ventured this question after a long silence, during which I had tried to assimilate Sri Yukteswar's noble exposition. "It is only when a traveler has reached his goal that he is justified in discarding his maps. During the journey, he takes advantage of any convenient short cut. The ancient rishis discovered many ways to curtail the period of man's exile in delusion. There are certain mechanical features in the law of karma which can be skillfully adjusted by the fingers of wisdom. "All human ills arise from some transgression of universal law. The scriptures point out that man must satisfy the laws of nature, while not discrediting the divine omnipotence. He should say: 'Lord, I trust in Thee, and know Thou canst help me, but I too will do my best to undo any wrong I have done.' By a number of means-by prayer, by will power, by yoga meditation, by consultation with saints, by use of astrological bangles-the adverse effects of past wrongs can be minimized or nullified. "Just as a house can be fitted with a copper rod to absorb the shock of lightning, so the bodily temple can be benefited by various protective measures. Ages ago our yogis discovered that pure metals emit an astral light which is powerfully counteractive to negative pulls of the planets. Subtle electrical and magnetic radiations are constantly circulating in the universe; when a man's body is being aided, he does not know it; when it is being disintegrated, he is still in ignorance. Can he do anything about it? "This problem received attention from our rishis; they found helpful not only a combination of metals, but also of plants and-most effective of all-faultless jewels of not less than two carats. The preventive uses of astrology have seldom been seriously studied outside of India. One littleknown fact is that the proper jewels, metals, or plant preparations are valueless unless the required weight is secured, and unless these remedial agents are worn next to the skin." "Sir, of course I shall take your advice and get a bangle. I am intrigued at the thought of outwitting a planet!" "For general purposes I counsel the use of an armlet made of gold, silver, and copper. But for a specific purpose I want you to get one of silver and lead." Sri Yukteswar added careful directions. "Guruji, what 'specific purpose' do you mean?"
"The stars are about to take an unfriendly interest in you, Mukunda. Fear not; you shall be protected. In about a month your liver will cause you much trouble. The illness is scheduled to last for six months, but your use of an astrological armlet will shorten the period to twenty-four days." I sought out a jeweler the next day, and was soon wearing the bangle. My health was excellent; Master's prediction slipped from my mind. He left Serampore to visit Benares. Thirty days after our conversation, I felt a sudden pain in the region of my liver. The following weeks were a nightmare of excruciating pain. Reluctant to disturb my guru, I thought I would bravely endure my trial alone. But twenty-three days of torture weakened my resolution; I entrained for Benares. There Sri Yukteswar greeted me with unusual warmth, but gave me no opportunity to tell him my woes in private. Many devotees visited Master that day, just for a darshan. 16-2 Ill and neglected, I sat in a corner. It was not until after the evening meal that all guests had departed. My guru summoned me to the octagonal balcony of the house. "You must have come about your liver disorder." Sri Yukteswar's gaze was averted; he walked to and fro, occasionally intercepting the moonlight. "Let me see; you have been ailing for twentyfour days, haven't you?" "Yes, sir." "Please do the stomach exercise I have taught you." "If you knew the extent of my suffering, Master, you would not ask me to exercise." Nevertheless I made a feeble attempt to obey him. "You say you have pain; I say you have none. How can such contradictions exist?" My guru looked at me inquiringly. I was dazed and then overcome with joyful relief. No longer could I feel the continuous torment that had kept me nearly sleepless for weeks; at Sri Yukteswar's words the agony vanished as though it had never been. I started to kneel at his feet in gratitude, but he quickly prevented me. "Don't be childish. Get up and enjoy the beauty of the moon over the Ganges." But Master's eyes were twinkling happily as I stood in silence beside him. I understood by his attitude that he wanted me to feel that not he, but God, had been the Healer. I wear even now the heavy silver and lead bangle, a memento of that day-long-past, evercherished-when I found anew that I was living with a personage indeed superhuman. On later occasions, when I brought my friends to Sri Yukteswar for healing, he invariably recommended
jewels or the bangle, extolling their use as an act of astrological wisdom. I had been prejudiced against astrology from my childhood, partly because I observed that many people are sequaciously attached to it, and partly because of a prediction made by our family astrologer: "You will marry three times, being twice a widower." I brooded over the matter, feeling like a goat awaiting sacrifice before the temple of triple matrimony. "You may as well be resigned to your fate," my brother Ananta had remarked. "Your written horoscope has correctly stated that you would fly from home toward the Himalayas during your early years, but would be forcibly returned. The forecast of your marriages is also bound to be true." A clear intuition came to me one night that the prophecy was wholly false. I set fire to the horoscope scroll, placing the ashes in a paper bag on which I wrote: "Seeds of past karma cannot germinate if they are roasted in the divine fires of wisdom." I put the bag in a conspicuous spot; Ananta immediately read my defiant comment. "You cannot destroy truth as easily as you have burnt this paper scroll." My brother laughed scornfully. It is a fact that on three occasions before I reached manhood, my family tried to arrange my betrothal. Each time I refused to fall in with the plans, 16-3 knowing that my love for God was more overwhelming than any astrological persuasion from the past. "The deeper the self-realization of a man, the more he influences the whole universe by his subtle spiritual vibrations, and the less he himself is affected by the phenomenal flux." These words of Master's often returned inspiringly to my mind. Occasionally I told astrologers to select my worst periods, according to planetary indications, and I would still accomplish whatever task I set myself. It is true that my success at such times has been accompanied by extraordinary difficulties. But my conviction has always been justified: faith in the divine protection, and the right use of man's God-given will, are forces formidable beyond any the "inverted bowl" can muster. The starry inscription at one's birth, I came to understand, is not that man is a puppet of his past. Its message is rather a prod to pride; the very heavens seek to arouse man's determination to be free from every limitation. God created each man as a soul, dowered with individuality, hence essential to the universal structure, whether in the temporary role of pillar or parasite. His freedom is final and immediate, if he so wills; it depends not on outer but inner victories.

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 3:13 pm | शाम भागवत

शनि हा पापग्रह आणि लोकांची आयुष्यं होत्याची नव्हती करुन टाकणारा असं मानतात आणि गुरु हा शुभग्रह मानतात.

खरे म्हणजे असे काही नाहीय्ये. ग्रहांचे कारकत्व म्हणजे कोणत्या ग्रहावरून कोणते अंदाज बांधायचे हे लक्षात राहावे यासाठी ह्या संकल्पनांचा वापर केलाय. दोन ग्रहांचे कारकत्व विरोधी असेल तर त्यातला एक नायक म्हणून रंगवायचा व दुसरा खलनायक म्हणून रंगवायचा म्हणजे लक्षात ठेवावयाला किंवा अभ्यास करायला सोपे जाते. मित्रग्रहांच्या संकल्पना ही अशाच तयार झाल्या आहेत.

राशींना पण कारकत्व असते. ग्रह व व रास यांच्यातील संबंध लक्षात राहावे यासाठी ग्रहाची उच्चरास, निचरास वगैरे संकल्पना तयार झाल्या आहेत. तसेच या संकल्पना नीट लक्षात राहाव्या म्हणून गोष्टी तयार केल्या आहेत. जेणे करून हे सर्व पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्षे असे शेकडो वर्षे लक्षात राहू शकेल. गोष्टीरूपांनी हे सर्व मांडले तर हे संक्रमण खूपच सोपे सुलभ होते. पण ह्या गोष्टींच्या मागील हे तत्व लक्षात न घेता गोष्टीकडे पाहिले तर मात्र फारच विचित्र चमत्कारीक असे काहीतरी वाटायला लागते यात काही शंका नाही.

ज्योतिष शास्त्रावर अजून विवेचन वाचायला आवडेल शाम काका

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 3:26 pm | शाम भागवत

जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसारच माणसाचा स्वभाव बनतो

प्रत्यक्षात जे पेरावे तसे उगवते या सिध्दांतानुसार त्या माणसाचा जन्मजात स्वभाव कसा असेल ते ठरत असते. थोडक्यात त्याचे पूर्वकर्म हेच त्याच्या स्वभावाचे खरे कारण असते. ते नक्की काय असावे याचा अंदाज चंद्राची स्थिती पाहून घेता येतो. पण बोलीभाषेत आपण असे म्हणतो की, चंद्र अमूक ठिकाणी आहे म्हणून त्याचा स्वभाव असा आहे. या वाक्यातून चंद्रांमुळेच त्याचा स्वभाव असा बनला आहे अशी काहीतरी कल्पना होते. प्रत्यक्षात चंद्राने काहीही केलेले नसते तर तो फक्त दिशा दिग्दशन करत असतो.

श्रीगुरुजी's picture

14 Apr 2016 - 8:13 pm | श्रीगुरुजी

सहमत

पाश्चात्य ज्योतिषांत साडेसाती कल्पना नाही म्हणून त्यांना याची फार उत्सुकता असते.

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 8:36 pm | शाम भागवत

जे आपल्या हक्काचे नाही ते आपले आहे असे समजणे हा माणसातला दोष घालविण्याचे कार्य साडेसातीत होते असे म्हणतात. ही साडेसातीची साडेसात वर्षे शनीच्या भ्रमणावरून काढली जात असल्याने शनिदेव सर्व करतात असे मानले जाते. प्रत्यक्षात शनी हा ग्रह फक्त ही साडेसात वर्षे निर्देशीत करण्याव्यतिरिक्त काहीही करत नाही. वेगळ्या शब्दात सां गायचे झाल्यास माणसाला जमिनीवर आणण्याचे कार्य या काळात होते. मात्र जो मुळात जमीनीवरच असेल किंवा ज्याचे यश डोक्यात गेलेले नसेल त्याला साडेसाती जाणवणारही नाही. ही संकल्पना शब्दात मांडणे खरेच अवघड आहे.
तरीपण मी एका संस्थळावर टंकलेले परत इथे चिकटवतोय.

साधारणतः माणसाची स्वतःची एक प्रतिमा त्याने स्वतःच बनविलेली असते व बर्‍याच वेळेस ती थोडीफार तरी भ्रामक असते. उदा.

एखादी व्यक्ती चांगली असते, खरे बोलणारी असते. सहसा ती इतरांना दुखवत नाही त्यामुळे इतरांची आवडती असते. उच्च शिक्षण व त्या आधारे मिळणारी चांगली नोकरी व त्यामुळे आलेली सुबत्ता ह्या आणखी जमेच्या बाजू असू शकतात. अशा व्यक्तीचे आपण चांगले आहोत असे मत असते व इतरांचेही तसेच मत असते. जर अशा व्यक्तिला सौंदर्यही लाभले तर ही प्रक्रिया आणखी गतीमान होते. स्त्रियांच्या बाबतीत तर ही गती अनेकपटीने वाढते कारण स्त्रीचे सौंदर्य ही स्त्रीची शक्ति असते. आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी अशी व्यक्ती पुढेही चांगली वागत राहाते. इतपर्यंत सगळे ठीक असते. पण अशी व्यक्ती ह्या आपल्या चांगुलपणाचे सर्व श्रेय स्वतःकडे नकळत घेऊ लागते. ही सर्व प्रक्रिया हळूहळू होत असल्याने त्या व्यक्तिच्या हे लक्षातही येऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर हा चांगुलपणा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे अशी व्यक्ति दोषेकदृष्टीने पाहाते.

खरे म्हणजे अशी व्यक्ती चांगली निपजते कारण त्या व्यक्तिला मिळालेले चांगले आई-वडिल, चांगले शेजारी-पाजारी, चांगले मित्र, चांगल्या शैक्षणिक सुविधा वगैरे वगैरे. या सर्व गोष्टींना जर आवश्यक ते श्रेय प्रत्येक वेळेस दिले गेले (म्हणजेच याचे अखंड भान असेल) तर अशा व्यक्तिला आपण चांगले आहोत असे नक्की वाटेल पण त्याचा गर्व होणार नाही. इतकेच नव्हे जर अशा व्यक्तिचे त्याच्या यशाबाबत आपण कौतुक केले तर ती व्यक्ति (मनापासून) ते श्रेय १०० टक्के आपल्याकडे घेणार नाही. परिस्थिती, नशीब, आईवडील, शिक्षक किंवा असेच काहीसे कारण पुढे करेल. (विरोधाभास म्हणजे आपण सामान्यतः ही कारणे आपले अपयश झाकण्यासाठी किंवा लपविण्यासाठी उपयोगात आणतो. )
=))

हेच आणखी स्पष्ट व्हावे म्हणून असे म्हटता येईल की, जर अशी व्यक्ती झोपडपट्टीत जन्माला आली असती, वडिल दारूडे, आईच्या तोंडात शिव्या, भाऊ जुगारी व सवंगड्यात शाळेत जाणारे कोणीही नाही. आणि अशी सर्व परिस्थिती असताना देखील जर ती व्यक्ती कोणाचीही मदत न घेता चांगली निपजली असती तर मात्र ती व्यक्ती चांगली असण्याचे सर्व श्रेय त्या व्यक्तीकडेच गेले असते.

थोडक्यात, हे जे जास्तीचे श्रेय ती व्यक्ति तिच्या नकळत स्वतःकडे घेते ते त्या व्यक्तिकडून काढून घेणे हे कार्य या साडेसात वर्षात केले जाते.

ज्याचे श्रेय आहे ते त्यालाच देणे म्हणजे कृतद्यता होय. कृतद्यता ही नम्रता वाढवते व नकळत आपले हात जोडले जातात. ही नम्रता आपला अहंकार कमी करते. व ज्याचा अहंकार कमी त्याचे पाय जमिनीवर असल्याने त्याला साडेसातीत त्रास होत नाही.

मात्र हे सगळे समजून घेणे किंवा समजावणे सोपे जावे म्हणून एखादी गोष्ट रचली जाते. ती गोष्ट व त्याचा मतितार्थ वेळ झाला की टंकतो.

विजय पुरोहित's picture

15 Apr 2016 - 10:46 am | विजय पुरोहित

भागवत साहेब. फार सुंदर लिहिताय. या विषयावर आवर्जून्लेखन करा हे सुचवेन.

हे अगदी विषयाला धरून झाले.

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 9:23 pm | शाम भागवत

टाईमपाससाठी प्रश्न विचारला गेला आहे हे लक्षातच आले नाही. सॉरी.
=((
तेव्हा येथेच थांबतो.

वैभव जाधव's picture

14 Apr 2016 - 9:28 pm | वैभव जाधव

मी? नाही सरकार. खरंच प्रश्न पडले होते. काय राव!

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 9:38 pm | शाम भागवत

अहो तुम्हाला नाही हो ते उत्तर. साडेसातीबद्दल कंजूसराव बोलत होते. म्हणून जरा माझे विचार टायपत होतो. ते थांबवले इतकेच.

वैभव जाधव's picture

14 Apr 2016 - 9:44 pm | वैभव जाधव

आपले प्रतिसाद आवडले आहेत. कृपया लिहावे.

स्वतःच्या धाग्यावर स्वतः प्रतिसाद देऊ नयेत अशा मताचा असलेला पण..... पहिला धागा ना ;)

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 9:54 pm | शाम भागवत

निदान हा साडेसातीचा विषय तरी पूर्ण करतो.

सतिश गावडे's picture

14 Apr 2016 - 9:35 pm | सतिश गावडे

कोण काय हेतूने विचारतो याचा विचार न करता लिहा तुम्ही. फलज्योतिशाकडे पाहण्याचा खुप वेगळा दृष्टीकोन आहे तुमचा; जो खरच विचार करण्याजोगा आहे.

वर साडेसातीच्या अनुषंगाने तुम्ही मानवी स्वभावावर जे भाष्य केलंत ते खुपच योग्य आहे.

राजेश घासकडवी's picture

14 Apr 2016 - 9:55 pm | राजेश घासकडवी

शनिचं वस्तुमान - साधारण ६ वर २६ शून्यं इतके किलो.
शनिचं अंतर - १.२ बिलियन किलोमीटर म्हणजे साधारण १ वर १२ शून्य इतके मीटर.
शनिचा आपल्या शरीरावर होणारा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव बरोबर आपलं वस्तुमान गुणिले एक कॉंस्टंट गुणिले ६०० किलो/ मीटर स्क्वेअर. एक्झॅक्ट आकडा काढण्यापेक्षा दुसरं उदाहरण देतो. लोकल ट्रेनमध्ये चिकटून उभ्या असलेल्या ६० किलो वजनाच्या व्यक्तीचा तुमच्यावर जितका गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव होतो तितकाच.

किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचं जितकं बल तुमच्यावर कार्य करतं त्याच्या ~१/१००,०००,०००,००० पट कमी बल. म्हणजे साधारण एक भागिले मल्ल्या देणं लागत असलेले रुपये. तुमच्या शरीरातलं पाणीच काय, त्यातला एक नॅनोग्रॅम जरी त्याने हलला तरी नशीब.

एवढं गुरुत्वाकर्षण-गुरुत्वाकर्षण म्हणतात, तर आपण जीवर जन्मतो ती पृथ्वी का बरं नसते कुंडलीत?

बोका-ए-आझम's picture

14 Apr 2016 - 10:55 pm | बोका-ए-आझम

एवढं गुरुत्वाकर्षण-गुरुत्वाकर्षण म्हणतात, तर आपण जीवर जन्मतो ती पृथ्वी का बरं नसते कुंडलीत?

लोक जेव्हा मंगळावर राहायला जातील तेव्हा येईल की कुंडलीत पृथ्वी!

चौकटराजा's picture

15 Apr 2016 - 9:59 am | चौकटराजा

साप्तहिक स्वराज्य चे सम्पादक एस के कुलकर्णी यांचे बरोबर "ज्योतिष एक थोतांड" या विषयावर माझा पुणे ते मुंबई या प्रवासा दरम्यान दीर्घ वाद झाला होता. त्य्या वेळी त्यानी हे चंद्र व भरती ओहोटी चे उदाहरण दिले होते. त्यावेळी राजेश यांचे हे गणित मजबरोबर असावयास हवे होते. प्रत्येक वस्तूचा दुसर्‍यावर प्रभाव आहे. तो किती गण्य व किती नगण्य हे अति महत्वाचे आहे. पण हे ज्योतिष वाले विचारात घेतील तर शपथ. दुसरे असे की त्या प्रभावामुळे घडणारे उत्पात व्यक्ति नुसार बदलतील कसे ? दैवाने ( दैव याचा अर्थ अत्यंत व्यामिश्र प्रक्रिया असा घ्यावा ) बदलले तर ते इतके टोकाचे कसे बदलतील याचे उत्तर का कोणाकडे ?

मी या विश्वात कोणीतरी एक आहे मा॑झाही प्रभाव गुरू ,चंद्र शनि, सूर्य इ मंडळींवर आहे. त्याचा हिशेब ते लोक कुणा़कडे हात वा पत्रिका दाखवून पहात असतील का ?

राजेश घासकडवी's picture

15 Apr 2016 - 10:21 pm | राजेश घासकडवी

अहो गंमत अशी आहे की तुमच्या बिल्डिंगचं तुमच्यावर असणारं गुरुत्वाकर्षणाचं बल हे गुरुच्या बलापेक्षा किमान हजार पटीने जास्त असतं. कदाचित लाखपट असेल. काय फरक पडतो? तुम्ही लिफ्टने काही मजले वर गेलात तरी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण किंचित बदलतं. हा बदलही गुरुच्या एकूण गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा अनेक पटींचा आहे. आता तुम्ही कुठच्या बिल्डिंगीत राहाता हे तुमच्या कुंडलीत घ्यायचं का?

मुद्दा असा आहे की ज्योतिषशास्त्र निर्माण झालं तेव्हा ग्रहांच्या स्थितींचा अभ्यास करून पाऊस कधी सुरू होणार, पेरणी कधी करायची यासारखे निर्णय घेण्यासाठीची भाकितं करता यायची. आणि ती तारीख गणित करून सांगणं शेतीप्रधान समाजात अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे 'ज्योतिष्याला भविष्य समजतं' असा समज रूढ होणं साहजिकच आहे. ग्रहांच्या आधारे तारखांचा अंदाज करणं हे शास्त्र झालं. ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो वगैरे कविकल्पना. त्या लढवण्याबद्दल जर ज्योतिष्यांना पैसे मिळणार असतील तर ते का नाही त्या लढवणार?

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 10:03 pm | शाम भागवत

एकदा नारदमुनींकडे शनिमहाराज गेले आणि म्हणाले की मी तुमच्या राशीला येतोय. शनिमहाराजांना त्यांच्या शक्तिचा गर्व झालाय हे नार॑दमुनिंच्या लक्षात आले. पण पूर्ण खात्री करण्यासाठी ते शनिमहाराजांना म्हणाले,
"अरे मी सामान्य संन्याशी माणूस. माझ्या राशीला कशाला येतो आहेस? जरा एखादा तुल्यबळ शोधून त्याच्या राशीला जा की."
आपल्याला कोणी तुल्यबळ असू शकतो असा विचार शनिदेवांच्या मनातसुध्दा कधी आला नव्हता. त्यामुळे त्यांनी नारदांना आतुरतेने प्रतिप्रश्न केला की, "असा तुल्यबळ कोण आहे?" त्यावर नारदांनी हनुमानाचा निर्देश केला.

ताबडतोब शनिदेव मारूतीरायाकडे गेले व म्हणाले की मी तुमच्या राशीला येतोय. त्याबरोबर मारूतीरायांनी आपल्या शेपटीत शनिदेवांना जे गुंडाळून ठेवले की बस्स्स. शनिदेवांचे काही चालेना. शेवटी ते मारूतीरायाला शरण गेले. मी तुझ्याच काय पण तुझ्या भक्ताच्या वाटेलाही कधी जाणार नाही असे वचन घेऊन मग मारूतीरायानी शनि महाराजांना सोडून दिले. तेव्हा पासून शनिच्या देवळात शेजारी मारूतीची पण स्थापना करतात व मारूतीची उपासना करणार्‍याला शनिदेव त्रास देत नाहीत.

गोष्ट छोटी आहे. लक्षात ठेवायला सोपी. सांगायला सोपी. अगदी लहान मुलांना सुध्दा फुलवून फुलवून सांगता येईल अशी. शिवाय या पध्दतीने गोष्टीतला मतितार्थ शेकडो वर्षे जपता येतो व तो सुध्दा विशेष परिश्रम अथवा अट्टाहास न करता. या पध्दतीचा वापर करणारा कधी इसाप असतो तर कधी खलील जिब्रान तर कधी असते पंचतंत्र.

मात्र या गडबडीत साडेसाती व शनि या ग्रहाचे एक अतुट नाते निर्माण होते. व एक ग्रह चक्क शनिदेव अथवा शनिमहाराज होतो.

यावर एकच उपाय असतो की आपल्या मुलांना जर ही गोष्ट कधी सांगितली असेल तर या गोष्टीचा मतितार्थ ही त्याला कळायला लागल्यावर सांगितला पाहिजे.

मी माझ्या मुलाला या गोष्टीचा जो मतितार्थ सांगितला तो वेळ मिळाल्यावर टंकतो.

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 10:23 pm | शाम भागवत

महाबली हनुमान हा अजिंक्य असा वीर आहे. त्याच्या कडे सर्व प्रकारच्या शक्ति आहेत. पण त्याला एक शाप आहे की त्या शक्तिंची आठवण त्याला असणार नाही. आपल्या मोठेपणाची आठवण नसल्यामुळेच तो विनम्र आहे. अहंकाररहित आहे. कायम हात जोडून रामापुढे बसून आहे.

शनि व हनुमान यांच्यात झालेल्या द्वंधात मारुती जिंकतो, कारण शनिचे काम आहे फुगलेला अहंकार किंवा वृथा अभिमान काढून टाकणे. पण ज्याचा अशुध्द अहंकारच शिल्लकच राहिलेला नाही जो स्वतःला रामरायाचे दास मानतो त्याला कसला आला आहे अभिमान. थोडक्यात अशा मारूतीरायासमोर शनिचे काय चालणार? शनि हरणार आणि हनुमान जिंकणार ही जणू काळ्या दगडावरची रेषच. हेच सांगण्यासाठी, लक्षात राहाण्यासाठी किंवा बिंबविण्यासाठी ही गोष्ट रचली गेली आहे.

आणखी एक म्हणजे हनुमानाचा जो भक्त त्याला शनिमहाराज त्रास देत नाहीत याचा अर्थच हा, की वीर हनुमानाप्रमाणे जो अहंकाररहित होण्याचा मार्ग चोखाळत आहे त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत.

थोडक्यात सर्व संताचे जे सांगणे आहे की, माणसाचा खोटा अहंकार किंवा अभिमान हेच सर्व दु:खाचे कारण आहे. असा हा खोटा अहंकार तसेच अभिमान नाहिसा करण्यासाठी साडेसातीचा काळ अनुकुल असतो. कारण आपले दोष याच काळात ऊघडकीस आल्याने आपल्या लक्षात येतात व ते जावेत यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. असा भाव ठेवून जो कुणी साडेसातीला सामोरा जाईल त्याला साडेसातीचा नक्की फायदा होईल व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले सोने जसे आणखी दैदिप्यमान भासते तसे त्याचे जीवन आणखी उजळेल.

शाम भागवत's picture

14 Apr 2016 - 10:24 pm | शाम भागवत

महाबली हनुमान हा अजिंक्य असा वीर आहे. त्याच्या कडे सर्व प्रकारच्या शक्ति आहेत. पण त्याला एक शाप आहे की त्या शक्तिंची आठवण त्याला असणार नाही. आपल्या मोठेपणाची आठवण नसल्यामुळेच तो विनम्र आहे. अहंकाररहित आहे. कायम हात जोडून रामापुढे बसून आहे.

शनि व हनुमान यांच्यात झालेल्या द्वंधात मारुती जिंकतो, कारण शनिचे काम आहे फुगलेला अहंकार किंवा वृथा अभिमान काढून टाकणे. पण ज्याचा अशुध्द अहंकारच शिल्लकच राहिलेला नाही जो स्वतःला रामरायाचे दास मानतो त्याला कसला आला आहे अभिमान. थोडक्यात अशा मारूतीरायासमोर शनिचे काय चालणार? शनि हरणार आणि हनुमान जिंकणार ही जणू काळ्या दगडावरची रेषच. हेच सांगण्यासाठी, लक्षात राहाण्यासाठी किंवा बिंबविण्यासाठी ही गोष्ट रचली गेली आहे.

आणखी एक म्हणजे हनुमानाचा जो भक्त त्याला शनिमहाराज त्रास देत नाहीत याचा अर्थच हा, की वीर हनुमानाप्रमाणे जो अहंकाररहित होण्याचा मार्ग चोखाळत आहे त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत.

थोडक्यात सर्व संताचे जे सांगणे आहे की, माणसाचा खोटा अहंकार किंवा अभिमान हेच सर्व दु:खाचे कारण आहे. असा हा खोटा अहंकार तसेच अभिमान नाहिसा करण्यासाठी साडेसातीचा काळ अनुकुल असतो. कारण आपले दोष याच काळात ऊघडकीस आल्याने आपल्या लक्षात येतात व ते जावेत यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. असा भाव ठेवून जो कुणी साडेसातीला सामोरा जाईल त्याला साडेसातीचा नक्की फायदा होईल व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले सोने जसे आणखी दैदिप्यमान भासते तसे त्याचे जीवन आणखी उजळेल.

ह्या प्रश्नावर अनेक वेळां अभ्यास झालेला आहे आणि जयंत नारळीकर ह्यांनी ह्या संशोधना बद्दल अनेकदा मराठीतून लिहिले सुद्धां आहे. बहुतेक ग्रहांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम जवळ जवळ शून्य आहे.

चंद्राचा परिणाम मानवी मनावर होत नाही हे सुद्धा अनेक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. Lunar Lunacy असे सर्च केल्यास तुम्हाला अधिक माहिती भेटेल.

अभ्या..'s picture

14 Apr 2016 - 11:07 pm | अभ्या..

बोगस काकू आहे एक नंबरचा.
काम ना धंदा, हर गोविंदा.

वैभव जाधव's picture

15 Apr 2016 - 7:52 pm | वैभव जाधव

वाचू आणि चावू नये. नै अवडत तर बघू नका.

शाम भागवत's picture

15 Apr 2016 - 8:52 pm | शाम भागवत

अहो पण तुम्ही का एवढे चिडताय?
तुम्हाला न आवडणारे कोणी लिहिले असेल तर तुम्ही बघू नका ना. इतरांना बघू नका असे का सांगताय? आणि हो तुम्ही धागा काढलाय म्हणून त्यात मालकी हक्काने गुंतु नका. या गुंतण्यातून तुम्ही जास्त चिडत जाल.

या धाग्यातून जेवढे आवडेल तेवढे घ्यायचे व जे नको असेल ते तिथे धाग्यावरच ठेवायचे हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही खूप मोठी कला मिळवली आहे अस म्हणता येईल. प्रत्यक्ष जिवनात याच कलेचा उपयोग सर्वात जास्त होतो. ही कला मिळविण्याची नेटप्रॅक्टिस इथे करतोय अस समजा हव तर.

एखाद्याने तुम्हाला चिडवले आणि तुम्ही चिडला तर चिडवणारा जिंकला हे लक्षात ठेवा. जोपर्यंत चिडवणारा अंगसटीस जात नाही किंवा आपले नुकसान करत नाही तोपर्यंत तिकडे दुर्लक्ष करायचे शिकता आले पाहिजे. कित्येक वेळेस तर चिडवणारा इतके सुंदर चिडवतो की राग येण्याऐवजी दाद द्यावीशी वाटते. उदा.

धागा भरकटवणे हे काही आयडीचे काम असल्याची इथे बरीच ओरड होते. पण मला तर कंजूषरावांनी विषयाला धरून
लिहिल्याबद्दलच टपली मारली होती. कमीत कमी शब्दात अगदी साळसूदपणे किती मस्त चिडवल होत त्यांनी. मला तर हसायलाच आले. मी माझ्याशीच हसून पुढे गेलो असतो पण साडेसातीचा विषय त्यांनीच काढल्यामुळे मी टंकायला लागलेलो असल्यामुळे दखल घ्यायला लागली इतकेच.
असो.

आपल्याला जे पटलेय अनुभवाला आलेय ते मांडत जायचे. मात्र दुस-याला आपले म्हणणे पटलेच पाहिजे हा आग्रह सोडता आला तर जालावर किंवा प्रत्यक्ष जिवनात त्रास होत नाही. मग आपल्या कुंडलीत कोणताही ग्रह कुठेही पडलेला असला तरी फरक पडत नाही. :=)

बघा पटतय का. नाहीतर त्या सोडून.

वैभव जाधव's picture

15 Apr 2016 - 9:00 pm | वैभव जाधव

ते अभ्या.. आमचं 'मित्र' हाय ओ खास... चालतं आमच्या आमच्यात तेव्हढं.

बाकी आपण कमी कालावधीत मोठे मोठे प्रतिसाद लह्यायला लागलाय हे पाहून कसंतरी च वाटायला लागलेलं आहे.

म्हणजे एकदम सविस्तर प्रतिसाद आवडतात बरंका! गैरसमज नको.

शाम भागवत's picture

15 Apr 2016 - 9:23 pm | शाम भागवत

दोन दिवसापूर्वी एक काम संपलय. सोमवारी नवीन काम सुरू होईल. तोपर्यंत हात व डोक मोकळ आहे म्हणून टंकतोय. एकदा का काम सुरू झाले की मग फक्त वाचनमोड. किंवा वाचनमोडही बंद करून नेट फक्त कामा पुरतेच. कित्येक वेळेस वर्तमान पत्रही वाचायचे बंद करतो. जगात काही सुध्दा फरक पडत नाही. =))

असो. प्रतिसाद मोठा असला तरी,
"आपल्या कुंडलीत कोणताही ग्रह कुठेही पडलेला असला तरी फरक पडत नाही." या वाक्याभोवती तो गुंफलाय बरका.

हा प्रतिसाद मिपा धोरणात अ‍ॅड करावा अशी संपादकांना विनंती करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो...

रामपुरी's picture

15 Apr 2016 - 1:54 am | रामपुरी

Gravity is the weakest force in nature.

जोपर्यंत मॅाडन आर्ट नावाची चित्रं कोटी कोटींत विकी जात आहेत तोपर्यंत आपला चहा तावातावाने बोलून आपल्याच शर्टावर कशाला सांडून घ्यायचा?

विवेकपटाईत's picture

15 Apr 2016 - 7:50 pm | विवेकपटाईत

माडर्न आर्ट आणि जोतिष दोघांमध्ये निश्चित काही तरी समानता असेल. जोतिष वाले हि कोट्याधीश आहेत आणि न समजणारे चित्र विकणारे हि.

मीपण कार्यकत्त्वाबद्दल दुपारी खफवर लिहिलं पण पुसलं गेलंय.
"कंजूषरावांनी विषयाला धरून
लिहिल्याबद्दलच टपली मारली होती."
एकूण रागरंग बघून मी लिहितो.मी वाचतो ज्योतिष,पुराणं,मॅाडर्न आर्ट,फिजिक्स,गणित,देवळं,पाककृती,शेती सर्व.
ज्योतिष थोतांड आहे त्याला शास्त्रिय आधार अजिबात नाही हे मिपावर बय्राच लेखांतून मिपाकरांनी सिद्ध केलंय त्यामुळे मी शक्यतो विनोदी प्रतिसाद देतो.पटवायला वगैरे जात नाही.

शाम भागवत's picture

15 Apr 2016 - 10:10 pm | शाम भागवत

_/\_

चंद्रावर ओरडणारा कोल्हा ( कोल्हेकुई ) हे चित्र आवडलं हे सांगायचं राहिलंच.

चौथा कोनाडा's picture

15 Apr 2016 - 11:10 pm | चौथा कोनाडा

सिक्सगन आर्मस्ट्रॉन्ग आणि नेफ्यु आर्मस्ट्रॉन्ग नासिकच्या पॅलेस कडुन कोठ्डी पर्यंत सरकत गेले व आता त्याच कक्षेत स्थीर झालेत हा शनिच्या बलाचा परिणाम असावा काय ?

असाच परिणाम नेफ्यु पॉवरच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता आहे असेbभाकित वर्तवले जात आहे.

शनिबलाच्या अभ्यासक / मिपा जाणकार काही प्रकाश टाकु शकतिल का?

आणि गुरुअंकल व देव-इंद्राचे चांगले सम्बंध आहेत. तस्मात त्यांना अजून तरी धोका नाही.

राही's picture

15 Apr 2016 - 11:20 pm | राही

बहुतेक सगळे ज्योतिषी श्याम भागवतांप्रमाणेच सांगतात. की कुंडलीत ग्रह अमुक ठिकाणी आहे म्हणून घटना घडत नाहीत. तर अशा घटना घडण्याची शक्यता आहे असे ते ग्रहचिह्न दर्शवते. जसे रस्त्यावर शाळा असेल तर सूचना म्हणून रस्त्याच्या कडेला मुलाचे चित्र असलेला फलक असतो. फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो.
कुंडलीची आणखी एक मनोज्ञ बाजू म्हणजे व्यक्ति आणि भवताल यांचे संबंध तपासणे. कुंडलीतले दुसरे, तिसरे, चौथे, सहावे, सातवे, दहावे, अकरावे स्थान (किंबहुना सर्वच स्थाने) हे त्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकणार्‍या व्यक्तींसाठी मानले आहे. उदा. चतुर्थ हे मातृस्थान, सप्तम हे ज्यायास्थान, दशम पितृस्थान, वगैरे. या प्रमाणे भावंडे, मातुलगृह, सासर, नोकर, बॉस, मित्र या सर्वांशी त्याचे संबंध कसे असतील हे अजमावता येते. या सर्व स्थानांत चांगलीच ग्रहचिह्ने असतील असे नाही किंबहुना नसणारच. म्हणजे एखादी व्यक्ती आईशी जितपत चांगली वागेल तितकी वडिलांशी वागत नसेल. किंवा पत्नीशी जुलमाने वागणारा माणूस मुलांवर अतिशय प्रेम करणारा असू शकेल. यामुळे माणसाची सकल किंवा सर्वंकष वागणूक अंतर्विरोधात्मक असू शकते हे सत्य कळते. मनुष्य एका कोनातून चांगला म्हणजे सर्वच चांगला असे नसते हे उमगते. चांगल्यावाईटाच्या कल्पना पुन्हा पुन्हा तावून सुलाखून निघतात. स्वतःच्या प्रगतीसाठी हे पृथक्करण साहाय्यभूत ठरू शकते.

साहना's picture

16 Apr 2016 - 2:01 am | साहना

इंग्रजींत ह्याला correlation आहे पण causation नाही असे म्हटले जावू शकते. पण त्याच वेळी अनेक अभ्यासांत correlation सुद्धा नाही असे सामोरे आले आहे. एकाच वेळी जन्म घेतलेली मुले त्यामुळे जवळ जवळ समान भविष्य घेवून जन्माला आली असती आणि तसे असते तर उत्क्रांतीच्या प्रवाहात ठराविक सीजन मध्ये जन्म घेणारी मुले जास्त वाचली असती आणि हळू हळू मानवांचा सुद्धा "मेटिङ्ग सीजन" निर्माण झाला असता. जनावरां मध्ये आपण त्या प्रकारची उत्क्रांती पाहतोच.

राजेश घासकडवी's picture

16 Apr 2016 - 4:41 pm | राजेश घासकडवी

फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो.

पण यात गृहितक असं आहे की फलकाचा शाळा जवळ असण्याशी काहीतरी संबंध आहे. वर साहना यांनी कोरिलेशन आणि कॉझेशन वगैरे म्हटलेलं आहे. पण ग्रहांच्या बाबतीत तेही नाही.

त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो. संकटात असलेल्या माणसाला धीर देऊन 'सुमारे तीन महिन्यांत परिस्थिती सुधरायला लागेल' अशी आशा देण्याचं काम करू शकतो. माझी पत्रिका ज्यांनी ज्यांनी कोणा ज्योतिष्याला दाखवली आहे त्यांना हाच सल्ला मिळालेला आहे.

बाळ सप्रे's picture

21 Apr 2016 - 11:48 am | बाळ सप्रे

ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो

एक्झॅक्टली..
ज्योतिषात चांगली बाजू पाहण्याच्या इच्छेने विचार झाल्यास हीच एक बाजू समोर येते..

पण मग समुपदेशनच करायचयं तर खरच ज्या घटकांचा परीणाम होतो ( उदा. आजूबाजूच्या व्यक्ति, त्यांच्याशी संबंध, सांपत्तिक स्थिती इ.) त्याच घटकांच्या आधारे का करु नये?? ग्रह तारे दशा वगैरे काल्पनिक आधार कशाला??

राजेश घासकडवी's picture

21 Apr 2016 - 7:59 pm | राजेश घासकडवी

मला वाटतं की काल्पनिकपणा हेच समुपदेशनाच्या बाबतीत ज्योतिष्याचं बलस्थान आहे. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे खरं असलं तरी संकटांनी गांजलेल्यांना, किंवा डिप्रेशनमध्ये अडकलेल्यांना आपली छिन्नी हातोडीच पेलवत नाही. मग पुतळा घडत नाही यामुळे मनोबल अजूनच खच्ची व्हायला होतं. अशांना 'काळजी करू नकोस. हे दोन महिने उलटले की भविष्य उज्ज्वल आहे. हा पुतळा आपोआप तयार होणार आहे.' असं अधिकारवाणीने सांगता आलं की त्या माणसाला किमान छिन्नी हातोडी उचलण्याचं बळ मिळतं. हे जर काल्पनिक घटकांवर आधारित नसेल तर 'चांगलं होणार आहे' यावर विश्वास बसणं कठीण पडेल.

पुतळाचैतन्याचा's picture

16 Apr 2016 - 11:17 am | पुतळाचैतन्याचा

अनेक लोक साधे गणित मांडत आहेत कि शनीचे आपल्या पासून अंतर एवढे आहे...चंद्राचे एवढे आहे...म्हणून गुरुत्वाकर्षण बल एवढे येईल...मग काहीच परिणाम होत नाही....यात एक गोष्ट विचारात घेतलेली नाही ती म्हणजे त्या-त्या ग्रहावरून पृथ्वीवर येणारी परावर्तीत प्रकाश उर्जा...म्हणजे...सूर्याचा प्रकाश त्या-त्या ग्रहांवर पडतो आणि तो परावर्तीत होऊन सगळीकडे जातो...त्यातील एक अंश जो पृथ्वीकडे येतो त्यात देखील प्रचंड उर्जा असते....साधे ग्रहण जेव्हा होते तेव्हा एक ग्रह मध्ये आल्याने अनेक बिलियन जुल्स उर्जा अडवली जाते...आणि खरा परिणाम हा या उर्जेतून होत असतो...म्हणून पौर्णिमेला आणि अमावास्येला चंद्राच्या पृथ्वी पासूनच्या अंतरात फार फरक नसतो पण परावर्तीत उर्जेत फार फरक असतो...चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो...या उलट मंगळावर लोह (लाल रंग) अधिक असल्याने तेथून आलेला प्रकाश हा उग्र आणि डोके फिरवणारा मानण्यात येतो...असो....आता ज्योतिष शास्त्र मध्ये ग्रहांचे अस्त आणि उदय असतात...म्हणजे जेव्हा एखाद्या ग्रहाचा पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नाही तेव्हा त्याचा अस्त झाला असे म्हणतात...लग्नाचे मुहूर्त पण गुरु-शुक्र यांच्या अस्त काळात नसतात....तेव्हा फक्त वजन आणि अंतर हे भौतिक शास्त्र (आणि भौतिक विचार??) झाले...अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये यावर चांगले संशोधन झाले आहे आणि ग्रहांचा हा खेळ आइन्स्ताइन ला देखील जाणवला होता हे त्याचे विचार वाचल्यावर समजते...तेव्हा ज्योतिष हे शास्त्र आहेच...आपल्याला समजत नाही किंवा जाणवत नाही किंवा सोयीस्कर वाटत नाही म्हणून एखादे शास्त्र नाही असे म्हणणे हेच अशास्त्रीय आहे...इथे नास्तिक, निधर्मी आणि सेकुलर वाद असे मुद्दे येतात...पण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ज्याने त्याने आपल्या विचाराने स्वीकार किंवा धिक्कार करावा ....वरील विचार स्वीकारण्याची कोणावर कसलीच सक्ती असू शकत नाही.

चौकटराजा's picture

16 Apr 2016 - 12:54 pm | चौकटराजा

आयो य्यो . किती मोठा शोध भाउ ? अर्र्र आमच्या गुर्जीनी चन्द्रावरचा प्रकाश म्हणजे परावर्तित म्हणजेच उर्जेच्या सन्दर्भात निकृष्ट ह्ये शिकिवलं हुतं ! चन्द्रावरचं पानी आनाया सुरेश प्रभू ना गाडी पाठवाया सांगायचं काय गड्यानो ?

पुतळाचैतन्याचा's picture

16 Apr 2016 - 1:04 pm | पुतळाचैतन्याचा

तुमचे गुरुजी चंद्रप्रकाशात कुठे डुलत असतात याचा शोध घ्या....शेवटच्या २ ओळी तुमच्यासाठीच होत्या

सतिश गावडे's picture

16 Apr 2016 - 1:46 pm | सतिश गावडे

>>चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो...

याचा उल्लेख असलेल्या एखाद्या शोधनिबंधाचा किंवा एखाद्या अवकाश संशोधन केंद्राचा दाखला मिळेल का?

पुतळाचैतन्याचा's picture

16 Apr 2016 - 4:02 pm | पुतळाचैतन्याचा

गावडे साहेब...चंद्र-प्रकाशाचे तापमान मोजणारे आणि त्याला थंड आहे असे जाहीर करणारे अनेक लेख आणि प्रयोग गुगल आणि यु-ट्यूब वर उपलब्ध आहेत. मुद्दाम खाली एक उलटी लिंक देतो:
http://www.nytimes.com/1995/03/10/us/surprising-scientists-full-moon-is-...
आता यात म्हटले आहे कि या प्रकाशानी पृथ्वी गरम होते (वरील उल्लेखाच्या विरुद्ध). याचा अर्थ पृथ्वीला उर्जा (केलोरीज ) मिळते....तरी पण थंड का म्हणतोय मी? तर जसे आयस्क्रीम थंड असते पण त्यात भरपूर केलोरीज (उर्जा) असते तशी उर्जा पृथ्वीला मिळते पण त्यात थंडावा असतो....मी मुद्दाम एक शब्द वापरला आहे कि...थंड "मानण्यात" आलेला आहे...हे मी पश्चिमी प्रयोगांच्या आधारे नव्हे तर भारतीय शास्त्रांमध्ये चंद्र प्रकाशाला शीतल आणि पोषक मानून त्या नुसार त्याचे कारकत्व देण्यात आले आहे....उदा. अनेक आयुर्वेदिक कंपन्या पौर्णिमेला औषध निर्माण करतात ते याच मुळे...आता फक्त नासा ने थंड सिद्ध केले तरच तो थंड आणि बाकी लोकांनी "मानले" तर थंड नाही असे इथे केलेले नाही.

सतिश गावडे's picture

16 Apr 2016 - 5:03 pm | सतिश गावडे

या बातमीत "चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे" याचा उल्लेख नाही.

mugdhagode's picture

19 Apr 2016 - 11:13 pm | mugdhagode

चंद्राचा परिवलन व परिभ्रमण वेग एकच असल्याने चंद्राची एकच बाजु आपल्याला दिसते. जिकडे बर्फ आहे ती बाजु आपल्याकडेच येत नाही.

चुभुदेघे

शाम भागवत's picture

16 Apr 2016 - 11:33 am | शाम भागवत

आवडला.

शाम भागवत's picture

16 Apr 2016 - 5:06 pm | शाम भागवत

पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय. ही माझी ट्रीप नेहमीच शनिवारी असायची. हल्ली प्रमाण खूपच कमी झालेय पण पूर्वी वारंवार जायला लागायचे. लाल डब्याने जायचे व यायचे. पण जर कधी स्कूटरने किंवा मोटरसाईकलने गेलो तर शनिशिंगणापूरला जरूर जायचो. तर त्यावेळची पहिली भेट मला आठवतीये त्याप्रमाणे मी मोटरसायकल चौथर्यापासून २-४ फुटावर लावली होती. आरामात चौथर्यावर जाऊन दर्शन घेतले होते. त्या चौथर्यावर बसून मित्राबरोबर गप्पा मारल्या होत्या. आजूबाजूला कोणिही नव्हते. जर मला एखादा रूपया दानधर्म करायची हुक्की आली असती तर तो रूपया दान करण्यासाठी एकही याचक मिळाला नसता. पाय धुवायला नळ नव्हता की ड्रेसकोड नव्हता. अंघोळ करून ओलेत्याने चौथर्यावर जायची सक्ति नव्हती.
पण..

१९८७-८८ साली अनिसने तिथे आंदोलन केले. महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रातून त्या आंदोलनाला अफाट प्रसिध्दी मिळाली आणि सगळे बदलूनच गेले. वर्षभरात मला माझी बाईक चक्क २५ फूटावर लावायला लागली. बर्याच बाईक लागल्या होत्या. दर्शनाला रांग नव्हती पण गर्दी होती.

१९९३ साली बजाजने FE नावाची स्कूटर काढली होती. मला पहिल्या लॉट मधली स्कूटर मिळाली होती. ती घेऊन गेलो होतो. मात्र यावेळेस स्कूटर बरीच लांब लावायला लागली. आता ड्रेसकोड आला होता. अंघोळ मस्ट होती. मी चौथर्यावर न जाता लांबूनच नमस्कार केला. रांगेत ओलेत्याने काही पुरूष उभे होते.

नेहमीच्या चहावाल्याचे दुकान चांगलेच भरभराटीला आले होते. त्याने ओळख दाखवली पण आता त्याला बोलायला फुरसत नव्हती. आता दानधर्म करायची हुक्की आली तर ती भागवायला काही याचक मदत करायला तयार होते. बराच बदल झाला होता.

२००४ साली बजाजची पल्सर घेतली. आता मात्र अर्धा किमी. लांब बाईक लावायला लागली. सिमेंट क्रॉक्रिट टाकून दोन पार्किग लॉट केले होते. गच्च भरले होते. जत्रा फुलली होती. अंघोळ करायला लावलेल्या नळांची संख्याच मुळी ५० च्या वर गेली होती. ओलेत्याने दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागलेली. दुरूनच दर्शन घेतले व निघालो.
काम संपवून रात्री ८ वाजता सोनईहून निघालो. अजूनही जीपगाड्या भरून भक्त येतच होते. रस्ता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस उभे होते.

हम्म. सगळेच बदलले होते. आंदोलनाद्वारे अनिसनी जनजागृती केली होती आणि तेव्हापासून अनिसचे कार्यकर्ते गणितीश्रेणीने तर भक्तगण भूमिती श्रेणीने वाढत चालल्याची जाणीव आणखीनच घट्ट झाली होती.

पूर्वी बोलेरो, टेंम्पो ट्रॅक्स मधून फक्त बापयेच यायचे. आतातर बायामाणसेही येणार आहेत दर्शनाला. बापेलोग कच्चीबच्ची व बायकोला घरी ठेऊन ट्रीपला जातात. पण बाई माणूस मुले बाळे घरी ठेऊन एकवेळ कामाला जातील पण ट्रीपला नाही जाणार. थोडक्यात आता सहकुटुंब सहपरिवार दर्शन सुरू होईल. घरटी एक मुलगा व एक मुलगी धरल्यास आता भक्त गणांची संख्या चौपट व्ह्यायला काहीच हरकत नाही. शिवाय अगदी लहान असल्यापासून शनिदेवांची भक्ति कशी करायची याचे बाळकडू मिळालेली एकदम तरूण पिढी २०३० सालापर्यंत तयार झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार असे दिसतेय.

मग विचार करायला लागल्यावर प्रश्न पडतो.
१) अनिस कुठे कमी पडतीय?
२) प्रत्येक शनिच्या देवळा समोरची रांग कायम मोठीच का होत राहिली आहे.
३) गेल्या ३० वर्षात लोकसंख्या फक्त ३५% वाढलेली असली तरी ही भक्तांची रांग हजारपटींनी का वाढतेय
४) शनिदेव वगैरे काही नसते असे मिपाकर सतत सिध्द करत असूनही असे का होतेय. नुसतेच मिपाकर नव्हेत. मायबोली मनोगत वगैरे सर्वठिकाणी प्रयत्न करूनही काहीच कसा बदल घडत नाहीय्ये.
५) जयंत नारळीकर सारखा शास्त्रज्ञाचाही प्रभाव का पडत नाहिय्ये?

किंवा .......

१) या भक्तांना खरोखरच काही पडताळे येताहेत का?
२) अगोदर त्रास असा नव्हता. सगळे काही ठीक चालले होते. थोड्या कुरबुरी असायच्या पण त्या कोणाच्या संसारात नसतात? पण साडेसाती सुरू झाली व जो एकामागोमाग त्रास सुरू झाला की जीव नकोसा झाला. शेवटी शनिदेवांची आराधना सुरू केली व त्रास थांबला अस काही खरेच होतय का? खरोखरच हे तपासले पाहिजे.
३) शनिशिंगणापूरला अमावास्येला येणारी ही लाखो भक्तमंडळी खरच येडी आहेत? अनाडी आहेत? न शिकलेली आहेत? निष्कर्ष काढणे खरेच इतके सोपे असते? त्यांच्यात वकिल, डॉक्टर, बी.एस्सी, इंजिनिअर झालेल कुणीच नसेल?

मला वाटते शनिदेवांची टिंगल टवाळी करून प्रश्न सुटणार नाहीय्ये. भक्तगणांची अडाणी, मूर्ख अशी हेटाळणी करून हे थांबवता आलेले नाहीय्ये, किंवा थांबवता येणार नाहीय्ये. कोणता तरी वेगळा उपाय योजला पाहिजे यावर तरी निदान सहमती होणे आवश्यक आहे. त्यानंतरच कदाचित मार्ग सापडू शकेल.
मग..
१) ज्योतिषांची एक भाषा असते. त्याचे शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही किंवा
२) फलज्योतिष हे ज्योतिषशास्त्राचे एक छोटे अंग किंवा बाय प्रॉडक्ट आहे. या फलज्योतिष सांगणार्याच्या चुकांचे खापर मूळ ज्योतिषशास्त्रावर फोडून चालणार नाही ह्याचेही भान ठेऊन मग उपाययोजना सुचायला लागतील.
३) निदान टिका करण्याअगोदर फलज्योतिषा बरोबरच मूळ ज्योतिष शास्त्रातील मूलभूत संकल्पना ही समजावून घेणे आवश्यक असल्याचे मान्य झाले पाहिजे.

असे जेव्हा काही होईल तेव्हा मात्र खर्या अर्थाने परिणाम दिसू लागेल.

पैसा's picture

16 Apr 2016 - 5:12 pm | पैसा

चांगले लिहीत आहात.

सहज मनात आले की एवढे हजारो लाखो लोक आंघोळी पुन्हा तिथे करत असतील तर किती पाणी फुकट जात आहे तिथे.

विजय पुरोहित's picture

16 Apr 2016 - 7:28 pm | विजय पुरोहित

अतिशय उत्तम प्रतिसाद भागवत साहेब!

सतिश गावडे's picture

16 Apr 2016 - 7:58 pm | सतिश गावडे

शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही.

आता लोक शिर्डीला का जातात हा वेगळा मुद्दा आहे. साईबाबांवर लोकांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी लोक जातात.

शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही.

आता शनीची मूर्ती म्हणून ज्या पाषाण शीळेची पुजा केली जाते त्याचीही अशीच एक कथा आहे. तिथल्या एका गावकर्‍याच्या स्वप्नात शनीदेव आले आणि कुठल्याशा ओढ्यात (किंवा शेतात) मी पडून आहे, मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर असे म्हणाले. त्याप्रमाणे त्या गावकर्‍याने ती शीळा शोधून काढली आणि तीची स्थापना केली.

मंदिरासमोर वाढणार्‍या रांगेबद्दल म्हणाल तर ते फक्त शनीमंदिरांच्या बाबतीत होत नसून सर्वच मंदिरांच्या बाबतीत होत आहे. दिवसेंदिवस माणसाचं आयुष्य अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. पावलापावलावर माणसाला अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागत आहे. हे सारं आयुष्याचा भाग म्हणून स्विकार करण्याईतकी जाण सार्‍यांनाच नाही. ज्यांना नाही ते आपल्या समस्या दूर करण्यासाठी "देव" नावाच्या शक्तीला शरण जात आहेत. त्यातून देवळांसमोरच्या रांगा वाढत आहेत.

काही सुखी समाधानीही आहेत. आपलं हे सुख समाधान ही देवाची कृपा आहे अशी त्यांची भावना आहे. असेही लोक देवाप्रती कृतज्ञता म्हणून देवदर्शनाला जातात.

"शनी महात्म्य" हे एखाद्या भयकथेला लाजवेल असे कथानक आहे. माझा ज्योतिषाचा विशेष असा अभ्यास नाही मात्र एकंदरीत साडेसाती या संकल्पनेचा विचार करता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा साडेसाती येणारच. या काळात जर कुणाच्या आयुष्यात कठीण प्रसंग आला तर काही जण त्याला धीराने सामोरे जातात. काहींना ओळखीपाळखीतील, शेजारी-पाजारी ज्योतिषाला पत्रिका दाखवून बघा असे म्हणतात. हल्ली तर ज्योतिशी लोकही ऑनलाईन कन्सल्टींग देतात. वाकडवरून हिंजवडीला जाताना अशा ज्योतिषांच्या लक्ष वेधून घेणार्‍या भल्या-मोठया जाहीराती दिसतात. असो. कठीण प्रसंगी "हा ही उपाय करून पाहू" असे म्हणून पत्रिका दाखवली जाते. आणि मग त्यातून पुढे "दैवी" उपाय सुरु होतात.

ज्योतिषी धीर देतो, तोडग्याने समस्या नक्की दूर होईल असे आश्वासन देतो. चिंताग्रस्त मनाला थोडासा दिलासा मिळतो. वृत्तीत सकारात्मकता येते आणि माणूस समस्येला भीडतो. कधी समस्या दूर होते, कधी नाही होत. जेव्हा समस्या दूर होते तेव्हा त्या ज्योतिषाचा, त्याने दिलेल्या तोडग्याचा बोलबाला होतो. जेव्हा समस्या दूर होत नाही तेव्हा माणूस नाईलाजाने ती परिस्थिती नशिबाचा भाग म्हणून स्विकारतो.

माणसाने जेव्हा अज्ञाताचा शोध घ्यायला सुरुवात केली, आपल्या आयुष्यातील सुख-दुखांचा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न सुरु केला तेव्हा कधीतरी फलज्योतिष या कलेचा शोध लागला असावा. माणसाच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा त्याच्या जन्मवेळी आकाशातील "ज्योतींंच्या" स्थानाशी संबंध असावा असे त्याला वाटले असावे. आणि मग नवीन जीव जन्माला आला की त्यावेळची आकाशातील ग्रहांच्या स्थितीची नोंद केली जात असावी. आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा संबंध जोडला गेला असावा. यातूनच ज्योतिष विकसीत झाले असावे. हे "कोरीलेशन" पुढे काळाच्या ओघात "कॉजेशन" बनले असावे. अर्थात हे जेव्हा कधी झाले तेव्हा माणूस विश्वाचे आकलन करण्यात चाचपडतच असावा. म्हणून तर तारा असणारा सूर्य कुंडलीमध्ये नवग्रहांपै़की एक आहे आणि पृथ्वीचा उपग्रह असणारा चंद्र कुंडलीत एक स्वतंत्र ग्रह मानला जातो. नव्हे, मनाचा कारक म्हणून त्याला कुंडलीत विशेष स्थान आहे. राहू आणि केतूचा तर अतापताच नाही. सध्याचे ज्योतिशी त्यांना उत्तर आणि दक्षिण छेदन बिंदू (north and south lunar nodes) मानतात. दुसरे काय स्पष्टीकरण देणार ते तरी.

सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. सौरमालेचा अभ्यास फक्त शाळेतील परीक्षेत उत्तिर्ण होण्यासाठी केला जातो. पुढे आयुष्यात कधी साडेसाती आली की पृथ्वीपासून लाखो-करोडो किलोमीटर दूर असणारा शनी हा ग्रह "देव" बनून आपल्याला शहाणपणा शिकवायला कसा येईल हा प्रश्न त्याला पडत नाही. तो निमुटपणे शनी महात्म्य वाचतो, ज्योतिषाने सांगितलेले तोडगे करतो.

मानवी जीवनातील ताण-तणावांना, समस्यांना सामोरं जायचा अजून एक उपाय आहे. तो म्हणजे मानसोपचारांचा. मात्र मानसोपचार प्रचंड खर्चिक आहेत. सर्वसामान्यांना परवडण्यापलिकडचे आहेत. हे उपाय दिर्घकाळ चालू ठेवावे लागतात. इतके करूनही समस्या दूर होईलच याची खात्री नसते. आपल्याकडे मानसोपचारतज्ञाकडे जायचा कुणी विषय काढला की "मला काय वेड लागले आहे काय?" असा प्रतिप्रश्न केला जातो. शरीराचे जसे तात्कालिक छोटे छोटे आजार असतात तसेच मनाचेही (खरे तर मेंदूचे) आजार असतात या गोष्टीचा स्विकार अजूनही समाजाने केलेला नाही. मानसोपचारतज्ञाकडे जाणे म्हणजे वेड लागणे असे एक सरधोपट समिकरण बनले आहे. (वेड लागणे ही schizophrenia या मनोरोगाची टोकाची अवस्था आहे.) डॉक्टरकडे कशाला जातो, तो तुला अँडीप्रेसंटच देईल असे भयानक सरसकटीकरण केले जाते.

या सार्‍या कारणांमुळे सर्वसामान्य माणूस मानसोपचारांपासून दूर राहतो आणि देव आणि कुंडलीला जवळ करतो. ते स्वस्तही पडते आणि बरेच वेळा प्रभावीही ठरते. नाहीच काही मार्ग निघाला तर खापर फोडायला नशीब असतेच.

किती संयमित प्रतिसाद देता येतो याचे उत्तम उदाहरण.अगोदर राजेश घासकडवी यांनीही गुरुत्त्वाकर्षणाचा मुद्दा सोप्या रीतीने समजावून दिलाय.

चौकटराजा's picture

16 Apr 2016 - 9:48 pm | चौकटराजा

सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. हे जवळ जवळ १००टक्के सत्य .आमचे फॅमिली डो म्हणतात साय अति खाण्याची सवय १५ वर्षापर्यन्त लागते व माणूस एम डी २२ ते २५ व्या वर्षी होतो.सबब साय खाउ नका असे लोकाना सांगतो पण स्वतः......?
तसेच हे श्रद्धेचे प्रकरण असते. माझ्या नातेवाईकात हा नियम तर १०००१ टक्के लागू होतो. पुढे कार्यकारण भावाचे कितीही ज्ञान झाले तरी भान येत नाही. प्लासिबो मुळे काही बाबतीत फरक पडतो पण अम्तर्मनातील समजूतीलाव ताकदीला फार मोठे स्थान बाह्य गोष्टीपेक्षा महत्व आहे भले माणसाचे कायिक जीवन परिसरावर अवलंबून असेल तरीही. मी तरी माझ्या जीवनात शुभेच्छा देतो घेतो आशिर्वाद देतो व घेतो पण त्यामुळे मी घडलो किंवा कुणी घडला असे मी मानत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2016 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

आदूबाळ's picture

17 Apr 2016 - 12:12 pm | आदूबाळ

व्वा वा शामराव! एक नंबर प्रतिसाद.

अ‍ॅडव्हर्स सिलेक्शनचं उत्तम उदाहरण.

तर्राट जोकर's picture

17 Apr 2016 - 12:48 pm | तर्राट जोकर

अ‍ॅडव्हर्स सिलेक्शन म्हणजे?

आम्हाला इन्वर्स सिलेक्शन म्हैते. फोटोशॉपमध्ये असतय.
जेवढे सिलेक्ट केलेले तेवढे सोडून उरलेले सिलेक्ट होते. Alt+S+I

स्पा's picture

21 Apr 2016 - 12:26 pm | स्पा

लोउल

शाम भागवत's picture

16 Apr 2016 - 5:23 pm | शाम भागवत

खरे आहे हे.

""पुण्याहून औरंगाबादला जाताना
शाम भागवत - Sat, 16/04/2016 - 17:06 नवीन
पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय.--------"

हा संपुर्ण प्रतिसाद काय दर्शवतो? जे विश्वास ठेवत नाहीत ते १) विश्वास ठेवणाय्रांना पटवू शकत नाहीत तर ते गुरुत्वाकर्षणाचे नियम इथे थिटे पडतातहेत.२) ज्यांना धाग्याविषयाला धरून चर्चा करायची हे ती चालू द्या.

शाम भागवत's picture

16 Apr 2016 - 9:43 pm | शाम भागवत

वैभव जाधव साहेब या अगोदरची पोस्ट गेल्या ३० वर्षांच्या लढाईच्या मूल्यमापनासाठी स्वअनुभवावर टाकली होती. पण आता माझा सहभाग नसणारेय. अजून एक दोन पोस्टी टाकणार होतो. उद्याचा दिवस त्यासाठी मोकळा असेल असे गृहित धरले होते. पण उद्या तातडीने दुसर्या गावी जावे लागतय त्यामुळे आता जमेल असे वाटत नाही. पण काही असो
तुमचा पहिलाच धागा शंभरी पार करणार असे दिसतेय.

कंजूष साहेब गावडे साहेब नमस्कार.
शुभं भवतु.

विजय पुरोहित's picture

16 Apr 2016 - 9:51 pm | विजय पुरोहित

भागवत सर कृपया प्रतिसाद देत रहा.
वाचायला आवडेल.

शाम भागवत's picture

19 Apr 2016 - 7:36 pm | शाम भागवत

शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही.

तुम्ही जो संशय व्यक्त केलाय तो मुद्दा मान्य. शनिवार, अमावास्या व शनि अमावास्या हे दिवस सोडून तुम्ही म्हणता तसे घडणे शक्य आहे पण तरीही.....

५२ शनिवार, १२ अमावास्या व शनि अमावास्या यादिवशी होणारी अभूतपूर्व गर्दी सुध्दा शिर्डीचीच असते पण "शिर्डीला आलोच आहोत तर शनि शिंगणापूरला जाऊन ४-५ तास रांगेत उभे राहून दर्शन घेऊ." अशा विचारातच सर्व भक्त मंडळी आलेली असतात अशी मनाची समजूत घालणे मला जरा जड जातेय.
माझ्या लेखात मी नेहमी शनिवारीच सोनईला जायचो असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि माझे अनुभव हे फक्त शनिवारचेच आहेत. असो.

शाम भागवत's picture

19 Apr 2016 - 8:35 pm | शाम भागवत

शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही.

मी गेल्या ३० वर्षांच्या कालखंडाबद्दल बोलतोय. त्यात मी १९८५, १९८७-८८, १९९३, २००४ या टप्यां वर मला आलेले अनुभव मांडले आहेत व त्या आधारे काही निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला आहे.

गुलशन कुमारांनी फिल्म काढली त्यामुळे शनिशिंगणापूरची प्रसिध्दी वाढली असे तुम्ही म्हणताय. तुमचे म्हणणे संयुक्तिक असल्याने तसे झाले असणे शक्य आहे. पण..

गुलशन कुमार तेथे कधी गेले होते व त्यांनी ती फिल्म कधी बनवली होती हे तुम्ही लिहिले असते तर बरे झाले असते. माझ्या माहिती प्रमाणे १९९४ सालापर्यंत तरी तशी काही फिल्म बनलेली नव्हती.

म्हणजे गुलशन कुमारांनी फिल्म बनवली, त्यामुळे अनिस वाल्यांना शनिशिंगणापूरची महिती मिळाली व मग त्यांनी आंदोलन केले असे काही घडले नसून, ८७-८८ मधे आंदोलन झाले व त्या आंदोलनामुळेच शनिशिंगणापूर प्रसिध्दी पावून १९९४ नंतर गुलशन कुमार तेथे आकर्षित झाले असे घडले असण्याची शक्यता मला जास्त वाटते.

मी या आंदोलनाला इतके म हत्व देतोय कारण;
एखादे चोरी अथवा दरोडा पडला तरी ती बातमी होते.
मग एखाद्या गावात गेल्या ५० वर्षात एखादी छोटीशी सुध्दा चोरी झाली नाही ह्या बातमीचे मूल्य किती असेल?
कुठे बाहेर जायचे असले तरी ह्या गावातील लोक घराला कडी कुलपेही लावत नाहीत ह्या वाक्याने या बातमीचे मूल्य किती वाढेल?
कडी कुलपांचे जाऊ दे, त्या गावातील एकाही घराला दाराच्या चौकटी असल्या तरी त्या चौकटींना दारेच नसतात तरीही तिथे चोरी होत नाही. ह्या बातमीचे मूल्य काय असेल ?
आणि शेवटचे, या गावाचे रक्षण शनिमहाराज स्वतः करतात त्यामुळे तेथे चोरी होत नाही ही अंधश्रध्दा असून आम्ही त्याला आव्हान देत आहोत (म्हणजे त्या गावात जाऊन चोरी करून दाखवणार आहोत.) असे अनिस ने जाहीर केल्यामुळे या गावाची प्रसिध्दी किती वाढली असेल याचा ज्याने त्याने आपल्या कुवती प्रमाणे विचार करावा. असो.

गुलशन कुमारांनी निव्वळ धंदा म्हणून ती फिल्म काढली, का त्यांनाच काही अनुभव आला म्हणून त्या अनुभवापोटी त्यांनी ती फिल्म काढली याबाबत मलाही माहिती नाही. शिवाय तुमच्या मुद्याचा प्रतिवाद करण्याच्या हेतूने ती माहिती मिळवून इथे टंकण्यात मला रसही नाही.

ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.

विजय पुरोहित's picture

19 Apr 2016 - 9:00 pm | विजय पुरोहित

सुंदर प्रतिसाद भागवत साहेब...

सतिश गावडे's picture

19 Apr 2016 - 9:05 pm | सतिश गावडे

ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.

यावर जरुर लिहा. आज ज्योतिष हे "फलज्योतिष" म्हणून माहीती आहे. कित्येक हवशे नवशे आणि गवसे ज्योतिषी लोकांच्या विपत्तीचा गैरफायदा घेऊन आपले खिसे भरत आहेत.

विजय पुरोहित's picture

19 Apr 2016 - 9:16 pm | विजय पुरोहित

खिसे तर प्रत्येकजणच भरत आहे. मग ते राजकारणी, कंत्राटदार, प्रशासक, उच्चाधिकारी, डाॅक्टर, मेडिकल स्टोअर्स, एम.आर., खाजगी कंपन्या, जाहीरात करणारे, टीव्ही चॅनल, नगरसेवक हे सर्व यात येत नाहीत का? हे सर्व लोक पण कुठली तरी भीति दाखवूनच स्वतःचे खिसे भरतात ना?
नाही मी काय म्हणतो? असल्या भोंदू ज्योतिषी व महाराजांची पोलखोल व्हावीच पण सोबत वरच्या वर्गांसोबत पण तशीच चर्चा व्हावी ना?

सतिश गावडे's picture

19 Apr 2016 - 10:58 pm | सतिश गावडे

होय. करायलाच हवी. मात्र आता विषय ज्योतिष्याचा चालू आहे तर सुरुवातीला ज्योतिष्यांबद्दल चर्चा करूया. :)

वैभव जाधव's picture

19 Apr 2016 - 11:56 pm | वैभव जाधव

अरे भांडू नका रे मुलांनो! काय ते असं करताय?

तर्राट जोकर's picture

20 Apr 2016 - 12:04 am | तर्राट जोकर

कोण भांडतंय त्याची साडेसाती चालु असेल.

असो. शंभर प्रतिसादानिमित्त जेपीसंचालित, अध्यक्षित अखिलमिपासत्कारसमितीतर्फे आपले घोड्याची लोखंडी नाल, जहाजाचा जुना खिळा, लोहाराची ऐरण ह्यांच्या संयुक्तवितळमाने बनवलेली शनीची अंगठी देण्यात येत आहे.

(वर्गणीचे तेवढे दोनशीक्कावन जमा करुन टाका, तेवढंच पुन्न...)

रमेश भिडे's picture

20 Apr 2016 - 4:58 am | रमेश भिडे

अरे कसले धागे काढतात रे हे लोक! श्या....

कंजूस's picture

20 Apr 2016 - 7:39 am | कंजूस

प्रश्न घेऊन इच्छुक ज्योतिषाकडे गेला की त्या प्रश्नाच्या प्रकाराने ठराविक ग्रहाकडेच बघितलं जातं.गुरू हा चांगला ग्रह असा गैरसमज पसरलेला असतो आणि बय्राचदा तुम्हाला शनि/मंगळाची पीडा आहे हे ऐकवलं जातं तसं सर्वात वाइट्ट ग्रह गुरूबद्दल कोणी बोलत नाही.
मंगळ- तडकाफडकी वाट लावतो पण अडीच वर्षाच्या आत ठीक होतं.
शनि - हळहळू वाट लावतो आणि हळूहळू पुर्ववत करतो.
गुरू: कायमची वाट लावतो सुटका नाही.एवढा मोठा ग्रह वजनदार ग्रह बसला की सर्व चेंगरूनच जातं.

विजय पुरोहित's picture

20 Apr 2016 - 8:01 am | विजय पुरोहित

गुरु आणि वाईट? हे कसं काय?

चौकटराजा's picture

20 Apr 2016 - 8:23 am | चौकटराजा

गुरू वाईटच . अलिकडे शाळांच्या फ्या किती झाल्यात पहा ! सगळे ज्ञान नेटवर ८०० रूपयाच्या पॅक मधे मिळते. परत बस चा खर्च नाही. ह्या ह्या !

नाखु's picture

20 Apr 2016 - 8:50 am | नाखु

सहमत आहे गुरुजी वाईटच ! इतक्या विनंत्यानंतरही पिंपरीकट्ट्याला येईनात ते...

अति अवांतर :टक्या गुरुशीच गुरगुर हे पुस्तकाचे कुठवर आलय लिखाण..
अभ्याला मुखपृष्ठ बनवायला सांगायचं आहे छपाई बद्दल बोलणी करायची आहेत

मूळ अवांतर : गावडे मास्तरांचा दीर्घ प्रतिसाद आवडला. ज्योतीषाचा तिटकारा द्वेष करण्यापेक्षा अभ्यास करून नीर-क्षीर करणे जास्त रास्त.

त.जों.च्या सत्कार यादीत काळी बाहुली राहिली आहे ती सत्कार प्त्र दाखवून घेऊन जाणे.

सेवा तत्पर नाखु

मुलांविशयी काहीही प्रश्न आला- न होणे,मंदबुद्धी,वैरी,अपंग,वेडसर इत्यादी की गुरूच पाहावा लागतो.अतिहुशार लोक वृद्धापकाळी भ्रमिष्ट, अपमान वगैरे गुरू.शनिची पीडा जाते तशी याची जात नाही.भोग.त्यामुळे भोग नसलेला मनुष्य म्हणजे सुखी मनुष्य.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2016 - 9:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही उपाय सांगा गुरुदेव. ;)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2016 - 9:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही निर्णय झाला की खरडा करुन कळवा प्लीज. :)
अशा धाग्यांनी बर्‍याचद पब्लिक गोंधळुन जाते. ग्रहांचा परिणाम होतो की नै म्हैती. पण चर्चेचा परिणाम हळव्या जिवांवर होऊ शकतो आणि असे काठावर असलेले बंधु पटापट शनिला हात जोडायल लागतात. =))

ग्रहाचं टेन्शन नका घेऊ मित्रहो . चांगलं खात पित जा. आयुष्य इंजॉय करा.

बाकी चालु द्या.

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

20 Apr 2016 - 10:12 pm | संदीप डांगे

नमस्कार बिरुटेसर,

रोचक चर्चा आणि माहितीपुर्ण प्रतिसाद. शाम भागवत यांनी पुरेसे स्पष्टीकरण दिलेच आहे. तुमच्या काळजी निमित्त थोडा माझा अनुभव इथे द्यावासा वाटला.

शाम भागवतांनी सांगितल्याप्रमाणेच ज्योतिष हे आध्यात्मिक उन्नतीचे साहाय्यक आहे. ह्यात कोणतीही ऐहिक, भौतिक सुख, समाधानाची अपेक्षा करु नये असा दंडक मी तरी मानतो. माझा गेल्या बर्‍याच वर्षांचा अंकशास्त्राचा अभ्यास आहे. आजकाल नाशिकमधे माझ्याकडे काही जिज्ञासू यायला लागले आहेत. पण माझे एक तत्त्व आहे जे मी शंभर टक्के पाळतो आणि त्यामुळे मला काही विशिष्ट गोष्टी कळल्यात. मी माझ्याकडे येणार्‍या कुठल्याच जातकाला कोणतेही उपाय सांगत नाही. रत्न, यंत्र, शांती इत्यादी खर्चिक उपाय तर सोडाच, अगदी मंत्र म्हणा, जप करा इतकेही नाही. जे आहे जसे आहे ते तसे त्यांच्यासमोर मांडतो. त्यांचे मागचे आयुष्य कसे गेले, पुढे कसे जाणार, काय आव्हाने असतील, काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात, काय काळजी घ्यावी असे सर्व सांगतो. कठिण काळासाठी तयार राहायला सांगतो. थोडक्यात समुपदेशनाचेच काम. पण होतं काय की हे इच्छुक त्यासाठी येतच नसतात. त्यांना ताबडतोब रामबाण उपाय हवा असतो. गंडा, दोरा, खडा, यंत्र, यज्ञ काहीतरी नाही काय ज्याने आमची सुटका होईल, काम नीट होउ शकेल असे उपाय मागतात. आयुष्याकडे उघड्या डोळ्याने पाहायची तयारीच नसते. जे आहे ते कबुल करण्याची मानसिकता नसते. मी बघतो ते ९० टक्के समस्या ह्या मनोकायिक असतात. मनोबल वापरले, वाढवले तर ह्यातल्या किमान ६०-७० टक्के तरी समस्या निपटून जातात. पण सगळेच लोक मनाचे धैर्यवान नसतात. शस्त्रे असुन गळपाटतात. त्यांना कोणी दुसर्‍याने त्यांचे काम करावे असे वाटत असते. खडा, दोरा, मंत्र, यंत्र हे सगळे दुसर्‍याच्या खांद्यावर आपली जबाबदारी टाकण्याचे प्रकार आहेत. ह्यातुनच ज्योतिषी, भोंदु ऑफकोर्स, अशांना याची दशा, त्याची साडेसाती, अमका भारी तमका वक्री करुन भंडावून सोडतात. मी कधीही फसवणार्‍यांना दोष देत नाही. दोष नेहमी फसले जाणार्‍यांचाच. अहो, तुम्हीच संधी देताय ना, मग जो हुशार असेल तो कशाला सोडेल?

तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त. एक नातेवाईक आहेत, स्वत:चे स्टोनक्रशर, ट्रक्सने बिल्डिंग मटेरियल सप्लाय च्या धंद्यात बराच पैसा कमावला. टोलेजंग इमारत बांधली, दोन-तीन ट्र्क्स होते. नंतर अचानक उतरती कळा लागली. बराच पैसा अडकला. कोणीतरी सांगितले नारायण नागबळी करा. केला. ज्यादिवशी त्र्यंबक सोडले त्याच दिवशी एक मोठी अमाऊंट घेउन जा म्हणुन क्लायंटचा फोन आला. साहेब खुश. पण दोन वर्षांनी त्यांना बघितले तर चाळीवजा दोन कौलारु खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहत होते. सगळी संपत्ती समाप्त. हे भविष्य कोणताही सामान्य ज्योतिषी सांगु शकणार नाही. असे अनेक किस्से आहेत.

ग्रहांचा परिणाम होत नाही. ते फक्त सुचक आहेत. पण ते काय सुचना करत आहेत हे गिफ्टेड -मार्क माय वर्ड्स- 'गिफ्टेड' ज्योतिषालाच कळते. असे गिफ्टेड ज्योतिषी मिळणे ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतात. त्या विशिष्ट क्षणी त्याला पुढचा मार्ग दर्शवतात. गंडा घालणारे फक्त गंडा घालतात. अशांपासून खरंच दूर राहणे.

माझ्या अभ्यासात असेही लक्षात आले आहे की काही विशिष्ट अंक असणारे लोक अजिबात ज्योतिषात विश्वास ठेवत नाहीत काहीही झाले तरी. त्यांची कुंडलीच तशी असते. अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती.

धन्यवाद!

सतिश गावडे's picture

20 Apr 2016 - 10:40 pm | सतिश गावडे

मला अंकशास्त्र पद्धतीने माझे भविष्य/प्राक्तन/ज्योतिष पाहायचे आहे.
तुमचा जातक व्हायला काय करावे लागेल? त्याचा मोबदला किती द्यावा लागेल?

हरकत नसेल तर प्रकट मुलाखत मी घेईन अर्थात साथीला चिंचवडचे चिक्त्सक काकाश्री असतील्च.

वाचक नाखु

विजय पुरोहित's picture

21 Apr 2016 - 11:13 am | विजय पुरोहित

भारीच प्रतिसाद डांगे अण्णा...

अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती. +111

vikramaditya's picture

21 Apr 2016 - 12:14 pm | vikramaditya

+1111111

चौकटराजा's picture

21 Apr 2016 - 7:35 pm | चौकटराजा

तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त.

हे १००१ एक टक्के आहे त्यामुळे मी भयानक दु:खे वाट्याला येऊन आनंदी राहिलो काही अवचित चांगले घडले त्यालाही योगायोग॑ मानतो. एक माणसाची मजबुरी हे दुसर्‍याची संधी एक माणसाचे दुरदैव हे दुसर्‍याचे सुदैव हे सार आहे आपल्या जीवनाचे.

होकाका's picture

21 Apr 2016 - 7:51 pm | होकाका

या धाग्याचा टिआरपी चांगला असल्यामुळे हा सगळ्यांनी बघावा असा एक मेसेज इथे टाकत आहे. (हा मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला आहे, त्यामुळे काही लोकांनी तो आधीच पाहिलेला असू शकतो.) याचा विषयाशी संबंध नाही याबद्द्ल चूभूमाअ.

"We need help from India to free us. Why is India silent?" — Baloch woman

What Nazis did to Jews, Pakistan is doing to our people, says a Baloch woman with tears in her eyes.
Demanding help from India to free her country from Pakistan's actrocious occupation, she urges India not to remain a silent spectator when her neighbors, the Balochs, are suffering.

गामा पैलवान's picture

21 Apr 2016 - 9:40 pm | गामा पैलवान

राजेश घासकडवी,

तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत फलज्योतिष बसवू पाहताहात. मात्र हा नियम (ज्याला न्यूटनचा नियम म्हणतात तो) कितपत परिपूर्ण आहे? या नियमानुसार शनीच्या कड्यांचं स्पष्टीकरण करता येत नाही. मग त्याच्या कसोटीवर फलज्योतिष घासून बघावे का?

आ.न.,
-गा.पै.

राजेश घासकडवी's picture

22 Apr 2016 - 9:19 am | राजेश घासकडवी

अरेरे, अशी चूक झाली का माझी? न्यूटनचे फडतूस, सिद्ध न झालेले नियम वापरून मी ज्योतिषासारख्या महान शास्त्रावर शंका घेण्याचा प्रयत्न केला तर... कुठे फेडू मी हे पाप?!

शाम भागवत's picture

22 Apr 2016 - 10:45 am | शाम भागवत

_/\_

सतिश गावडे's picture

22 Apr 2016 - 11:06 am | सतिश गावडे

कुठे फेडू मी हे पाप?!

सुधारीत सत्यनारायण घाला. पाच नास्तिकांना जेवायला बोलवा. ;)

तर्राट जोकर's picture

22 Apr 2016 - 11:11 am | तर्राट जोकर

तीर्थ+प्रसाद असेल तर आम्हाला पहिले बोलवा. नाहीतर कोप होईल बगा. =))

सतिश गावडे's picture

22 Apr 2016 - 11:28 am | सतिश गावडे

आमची द्रव्याने भरलेली नौका श्रीवर्धन बंदरात आम्ही घट्ट बांधून ठेवली आहे. त्यामुळे टेन्शन इल्ले.

तर्राट जोकर's picture

22 Apr 2016 - 11:50 am | तर्राट जोकर

नौकेचे नाव कळवा, द्रव्याने भरलेली आहे म्हणता ना? =))

सतिश गावडे's picture

22 Apr 2016 - 12:28 pm | सतिश गावडे

द्रव्य म्हणजे मुलद्रव्य हो. ;)

न्यटनचे नियम घासून ज्योतिषाचे पीठ होणार नाही.

सतिश गावडे's picture

22 Apr 2016 - 11:26 am | सतिश गावडे

लोक न्युटनच्या नियमांचा उगाच बाऊ करतात.

न्युटनने सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहण्याआधी सफरचंदं काय वर जात होती काय आत्मा जसा देह सोडून वर जातो तसे?

वैभव जाधव's picture

22 Apr 2016 - 11:33 am | वैभव जाधव

आत्मा वर जातो? कोण बोललं?

सतिश गावडे's picture

22 Apr 2016 - 11:34 am | सतिश गावडे

चित्रगुप्ताकडे हिशोब द्यायला आत्म्याला वरच जावे लागनार ना.

सुनील's picture

22 Apr 2016 - 11:35 am | सुनील

कोकणात सफरचंदे होत नाहीत म्हणून. नैतर गुरुत्वाकर्षणाचा शोध एखाद्या कोंकण्यानेच लावला असता!

तर्राट जोकर's picture

22 Apr 2016 - 11:45 am | तर्राट जोकर

बरोबर. नारळ डोक्यात पडून 'आत्मेच वर जातात' हा शोध कोकणातच लागला असावा. =))

सतिश गावडे's picture

22 Apr 2016 - 12:27 pm | सतिश गावडे

नारळ माडावरून पडताना कधीही माणसाच्या डोक्यात पडत नाही असा एक समज आहे. खरे खोटे कोणास ठाऊक.

mugdhagode's picture

23 Apr 2016 - 7:34 pm | mugdhagode

सजातीय धृव प्रतिकर्षण करतात.

त्यामुळे वरुन पडणारा नारळ डोक्याजवळ आला की प्रतिकर्षित होउनन्नारळ दूर जाउन डोके शाबूत रहाते.

हॅरी पॉटरच्या जुडव्या छड्याप्रमाणे नारळ व डोस्के जुडवा असल्याने एकमेकाना मारु शकत नाहीत.

वैभव जाधव's picture

22 Apr 2016 - 11:50 am | वैभव जाधव

धागा शनिची कक्षा सोडून धूमकेतू सदृश भरकटला आहे असं धागा करत्याचं म्हणजे माझंच मत झालेलं आहे. पृथ्वीवर पक्षी माणसावर त्याच्या पक्षी धुमकेतूच्या गुरुत्वाकर्षणाचा काही परिणाम होतो का?

शाम भागवत's picture

22 Apr 2016 - 11:58 am | शाम भागवत

नवग्रहांच्या मदतीला धूमकेतूला कशाला आणले हो वैभव साहेब.
आता नक्की काय होणार बरे?
:-)

तर्राट जोकर's picture

22 Apr 2016 - 12:08 pm | तर्राट जोकर

धूमकेतूंचा पृथ्वीवरच्या काही माणसांवर भयंकर मानसिक परिणाम होतो. ते दिवसंरात्र दुर्बीणी आणि नोटपॅड घेऊन त्याच्याकडे टक लावून बघत नोंदी घेतात आणि एकमेकांत शेअर करत बसतात. अशा वर्तणुकीचा नक्की काय उपयोग होतो हे अजून समजलेले नाही. विज्ञानश्रद्ध समाजात मात्र अशा पिसाट लोकांना फार मान आहे. ऐकावे ते नवलच!

सतिश गावडे's picture

22 Apr 2016 - 12:25 pm | सतिश गावडे

रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशाकडे पाहणे हा खुप मोठा विरंगुळा. अशा वेळी उच्च क्षमतेची दुर्बिण मिळाली तर तो दुग्ध शर्करा योग.

हे करत असताना ज्यांनी आपली निरिक्षणं नोटपॅडवर लिहून काढली त्यांनीच जगाला सांगितले की पृथ्वी सपाट नसून गोल आहे. ती स्थिर नसून सूर्याभोवती फिरते. ती विश्वाचा केंद्रबिंदू नसून विश्वाच्या अफाट पसार्‍यातील एक पिटुकला गोल आहे. ग्रहणं ही राहू केतूंची करामत नसून तो अवकाशातील गोलांचे भ्रमणमार्ग एकमेकांना छेदत असताना सुर्यप्रकाश अडल्याने झालेली करामत आहे.

अशांना पिसाट का बरे म्हणावे?

शाम भागवत's picture

22 Apr 2016 - 12:16 pm | शाम भागवत

व्वा काय शब्द आहे. तुमची परवानगी असेल तर पुढे मागे कधितरी वापरीन म्हणतो.

तर्राट जोकर's picture

22 Apr 2016 - 12:31 pm | तर्राट जोकर

गावडेसर, उपरोध आहे हो. कसं ना कळे तुम्हास्नी? ;)

भागवतसाहेब, आमचे सर्व शब्द प्रताधिकारमुक्त आहेत. कभीभी वापरो. =))

विटेकर's picture

22 Apr 2016 - 5:46 pm | विटेकर

सर , नमस्कार , तुमचे या धाग्यावरील (आणि इतरत्र ही)प्रतिसाद अतिशय सुरेख आहेत , लिहिते व्हावे

राजेश घासकडवी,

>> न्यूटनचे फडतूस, सिद्ध न झालेले नियम वापरून मी ज्योतिषासारख्या महान शास्त्रावर शंका घेण्याचा प्रयत्न केला तर...

बरोबर बोललात. तुमची चूक झाली आहे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वत्र लागू पडंत नाही. साधी गोष्ट आहे. जर समुद्राला भाती येते, तर तळ्याला का येत नाही?

आ.न.,
-गा.पै.

चौकटराजा's picture

22 Apr 2016 - 7:05 pm | चौकटराजा

तळ्यालाही भरती येत असेल. त्याच्या नगण्यते मुळे ती " प्रकाशात" आली नाही इतकेच.

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2016 - 12:41 am | टवाळ कार्टा

मोदी मोदी मोदी*

*घ्या आणखी ट्यार्पी ;)