वाचन का करावे?

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
31 Mar 2016 - 3:19 pm

"पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही"
"इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!"
"पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!"
"मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते. समजा तुला अनुभवातून शिकत शिकत एखादी गोष्ट समजली पण तोपर्यंत त्या अनुभवाचा उपयोग करण्याचे वय आणि वेळ निघून गेली असेल तर? आणि तुझ्या अनुभवातून आणि चुकांतून तू जो निष्कर्ष काढला तो जसाच्या तसा जर का या आधीच कुणी महान लेखकाने व्यवस्थित पुस्तकरूपात लिहून ठेवलेला असेल तर? तेवढा आपला वेळ नाही का वाचणार? एखादी चूक होण्यापूर्वीच आपण ती टाळू शकणार!"
"पण लेखकाची आणि आपली पार्श्वभूमी, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. लेखकाचे सगळे अनुभव आपल्याला कसे लागू होतील? सांग बरे?"
"अरे! सगळे अनुभव नाही लागू होणार पण काही टक्के तर नक्कीच होईल! पुस्तकातून आपल्याला प्रेरणा मिळते. शेवटी, लेखक हाही एक आपल्यासारखाच माणूसच असतो ना! त्याच्या भावना आणि आयुष्याच्या अवस्था- उदाहरणार्थ - प्रेम, लोभ, मत्सर, सुख, दु:ख, तारुण्य, बालपण वगैरे या आपल्या सारख्याच असतात की! सगळ्या माणसांच्या भावना शेवटी सारख्याच! त्यासंदर्भातील त्याचे अनुभव बऱ्याच प्रमाणात सगळ्या माणसांना लागू होणार नाहीत का? लेखक एलियन थोडेच असतो? माणूसच असतो. आपल्यासारखाच! आलं का लक्षात? आणि पुस्तकातून विचारांना चालना मिळते, आपण विशिष्ट प्रकारच्या संकुचित विचारांतून बाहेर पडून नवनवीन विचार स्वीकारायला शिकतो! आपल्या विचार कक्षा रुंदावतात!
"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटतंय बरं का!"
"आहे ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?"

- निमिष सोनार (एक पुस्तक प्रेमी आणि वाचन समर्थक!)

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

"आहे ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?

"
हे

अमृता_जोशी's picture

31 Mar 2016 - 3:52 pm | अमृता_जोशी

"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटतंय बरं का!"
"आहे ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?"

का कोणास ठाऊक, मला तुमचे दोन्ही लेख शासकीय जाहिरातींसारखे वाट आहेत.

निमिष सोनार's picture

31 Mar 2016 - 4:51 pm | निमिष सोनार

काय मग, वाचणार ना या जाहिरातीने प्रभावित होऊन पुस्तके उद्यापासून?

अमृता_जोशी's picture

31 Mar 2016 - 5:46 pm | अमृता_जोशी

तुम्ही खूपच आशावादी आहात हो! :-)

पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही

प्रत्येक गोष्टीत असा फायदा बघितलाच पाहिजे का? नसेल काही फायदा तर मग ती गोष्ट करूच नये का?

पुस्तके "फक्त" मनोरंजनासाठी सुद्धा वाचता येऊ शकतात!

अत्रे's picture

31 Mar 2016 - 5:41 pm | अत्रे

हो ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?"

सिरुसेरि's picture

1 Apr 2016 - 10:18 am | सिरुसेरि

तर वाचाल .

तर्राट जोकर's picture

1 Apr 2016 - 4:59 pm | तर्राट जोकर

वाचन का करावे?
>> तुम्ही कधीतरी लिहाल तेव्हा प्रेक्टीस असायला पाहिजे म्हणून... (ह. घ्या)

होबासराव's picture

1 Apr 2016 - 5:15 pm | होबासराव

आम्हाला तरी आपले सगळे लेख एलियन ने लिहिल्यसारखेच वाटतात ;)
पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे.
खलच ?
हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे
अले बाप ले शाला! पला मुलानो पला
चुका करत करत शिकणे मला आवडते!
अले काका पन किति चुका आणखि कलनाल आहेस.
माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार!
काका हे काय असत, तु माझ ऐकतोस का एक छान तज्ञ आहेत पुण्यात चलतोस का.

आता
होबासराव जोमात अन लेखक कोमात ;)

जव्हेरगंज's picture

1 Apr 2016 - 5:31 pm | जव्हेरगंज

s

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2016 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif

होबासराव's picture

1 Apr 2016 - 5:16 pm | होबासराव

मानसोपचार तज्ञ

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2016 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा

.. का करावी?

विवेकपटाईत's picture

1 Apr 2016 - 9:06 pm | विवेकपटाईत

मला पुस्तके वाचायचा छंद बालपणा पासून आहे. कारण घरात पंखा नव्हता. दिल्ली पब्लिक पुस्तकालयात पंखा होता आणि कुलरचे थंड पाणी हि. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात सकाळी ९ वाजता जेवण करून थेट पुस्तकालयात जात होतो आणि दुपारी ३-४ च्या सुमारास परत (भूक लागल्यावर). रोज ३-४ पुस्तके तिथेच बसून वाचायचो. काही कळत नसले तरी.

गेल्या १७-१८ वर्षांत पुस्तके वाचणे कमी झाले पण विशेषज्ञ लोकांच्या विभिन्न सरकारी धोरणांवर बर्याच रिपोर्ट्स वाचल्या आहेत. काहींची चिरफाड होताना हि पाहिली आहे.
टीप: रिपोर्ट्स ७व्या माल्या वर लिहिल्या जातात, जमिनीशी त्यांचे काही नाते नसते. अश्या रिपोर्ट्स लिहिणारे ग्यानी लोक असतात. आमच्या सारख्या जमिनीवर राहणार्या सामान्य माणसांचे विचार फडतूस असतात.

तुमचे संवाद लेखन बघून ब्राडपिटच्या फाईट क्लब ची आठवण होउ लागली आहे...! आता लेखनी थांबवू नका