मराठी अनुवादः सबसे खतरनाक होता है - कवी 'पाश'

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जे न देखे रवी...
31 Mar 2016 - 4:40 am

अवतार सिंह संधू बर्‍याच कारणांनी गाजलेले कवी. वयाच्या फक्त अडतिसाव्या वर्षी खलिस्तानी अतिरेक्यांनी ह्या माणसाला उडवलं. ह्याचा गुन्हाही साधा सुधा नाही. हा माणूस डाव्या विचारधारेतला. धारदार कविता करणारा. नक्षलवादी चळवळीतला, राजकारणात पुढे आलेला, नक्षलवाद्यांचा कवी म्हणवला जाणारा पण शिख उग्रवाद्यांच्या हिंसाचाराचा विरोध करणारा. त्याच्या कवितांमधून त्याचे डावे विचार स्पष्ट दिसतात. पण आहेत विचार करायला लावणार्‍या. अशीच एक कविता मला खूप आवडलेली. माझ्या अल्पबुद्धीने केलेला अनुवाद सादर करतो. उद्देश फक्त चांगले कवी, मला आवडलेल्या कवितांचा आनंद तुम्हा लोकांसोबत वाटून घेणे.

. . . .
. . . .
. . . .

सगळ्यात जास्त घातक असतं.

मेहनतीच्या कमाईवर दरोडा सगळ्यात जास्त घातक नसतो
पोलिसांचा मार सगळ्यात जास्त घातक नसतो
विश्वासघात आणि लोभ यांचा फास सगळ्यात जास्त घातक नसतो

बसल्या बसल्या पकडल्या जाणे, वाईट तर आहे
गारठलेल्या भीतीत अडकल्या जाणे, वाईट तर आहे
पण सगळ्यात जास्त घातक नसतं.

लबाडांच्या गदारोळात
सत्याचा आवाज दबून जाणे, वाईट तर आहे
काजव्यांच्या प्रकाशात वाचणे, वाईट तर आहे
मुठी आवळून फक्त काळ कंठत राहणे, वाईट तर आहे
सगळ्यात जास्त घातक नसतं.

सगळ्यात जास्त घातक असतं
मुर्दाड शांततेने भरुन राहणं
संवेदना नसणं सर्व सहन करत राहणं
घरातून निघायचं कामावर
आणि कामावरुन घरी परतून जाणं
सगळ्यात जास्त घातक असतं
आपल्या स्वप्नांचं मरुन जाणं.

सगळ्यात जास्त घातक ती वेळ असते
तुमच्या मनगटावर चालत असतांना
तुमच्या नजरेत थांबलेली असते.
सगळ्यात जास्त घातक ते डोळे असतात
जे सर्व काही बघूनही बर्फासारखे थंड असतात.
त्यांची दृष्टी जगाचे प्रेमाने चुंबन घ्यायला विसरुन जाते
जे वासनांच्या आंधळं करणार्‍या वाफेने तृप्त होतात
जे रोजच्याच दिनक्रमाला गिळत
एका ध्येयहीन पुनरावृत्तीच्या खेळात हरवून जातात.

सगळ्यात जास्त घातक ते चांदणं असतं
जे प्रत्येक हत्या, प्रत्येक दुर्घटनेनंतर
उद्ध्वस्त झालेल्या अंगणात बहरतं
पण तुमच्या डोळ्यांना मिर्चीसारखं झोंबत नाही.

सगळ्यात जास्त घातक ते गाणं असतं
जे तुमच्या कानांपर्यंत पोचवायला
शोकमग्न आक्रोशत असतात
घाबरलेल्या लोकांच्या दरवाज्यांवर
जे गुंडाप्रमाणे धडका देत असतं
सगळ्यात जास्त घातक ती रात्र असते
जी जीवंत आत्म्यांच्या आभाळावर आक्रंदते
तेव्हा फक्त घुबडं घुत्कारतात आणी चित्कारणारी गिधाडं
कायमच्या अंधार्‍या बंद असलेल्या दरवाजे-उंबरठ्यांवर चिकटून जातात.

सगळ्यात जास्त घातक ती दिशा असते
जिकडे आत्म्याचा सूर्य मावळून जातो
आणि त्याच्या मुर्दाड प्रकाशाचा एखादा तुकडा
तुमच्या शरिराच्या पुर्वेस टोचून जातो

मेहनतीच्या कमाईवर दरोडा सगळ्यात जास्त घातक नसतो
पोलिसांचा मार सगळ्यात जास्त घातक नसतो
विश्वासघात आणि लोभ यांचा फास सगळ्यात जास्त घातक नसतो

_______________________________________________________________________________________

मूळ काव्य

सबसे खतरनाक होता है

– अवतार सिंह संधू ‘पाश’

मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी और लोभ की मुट्ठी सबसे खतरनाक नहीं होती

बैठे-बिठाए पकड़े जाना, बुरा तो है
सहमी-सी चुप में जकड़े जाना, बुरा तो है
पर सबसे खतरनाक नहीं होता

कपट के शोर में
सही होते हुए भी दब जाना, बुरा तो है
जुगनुओं की लौ में पढ़ना, बुरा तो है
मुट्ठियां भींचकर बस वक्त निकाल लेना, बुरा तो है
सबसे खतरनाक नहीं होता

सबसे खतरनाक होता है
मुर्दा शांति से भर जाना
तड़प का न होना सब सहन कर जाना
घर से निकलना काम पर
और काम से लौटकर घर जाना
सबसे खतरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना

सबसे खतरनाक वो घड़ी होती है
आपकी कलाई पर चलती हुई भी जो
आपकी नजर में रुकी होती है
सबसे खतरनाक वो आंख होती है
जो सबकुछ देखती हुई जमी बर्फ होती है
जिसकी नजर दुनिया को मोहब्बत से चूमना भूल जाती है
जो चीजों से उठती अंधेपन की भाप पर ढुलक जाती है
जो रोजमर्रा के क्रम को पीती हुई
एक लक्ष्यहीन दोहराव के उलटफेर में खो जाती है

सबसे खतरनाक वो चांद होता है
जो हर क़त्ल, हर कांड के बाद
वीरान हुए आंगन में चढ़ता है
लेकिन आपकी आंखों में मिर्चों की तरह नहीं गड़ता है

सबसे खतरनाक वो गीत होता है
आपके कानों तक पहुंचने के लिए
जो मरसिए पढ़ता है
आतंकित लोगों के दरवाजों पर
जो गुंडों की तरह अकड़ता है
सबसे खतरनाक वह रात होती है
जो ज़िंदा रूह के आसमानों पर ढलती है
जिसमें सिर्फ उल्लू बोलते और हुआं हुआं करते गीदड़
हमेशा के अंधेरे बंद दरवाजों-चौखटों पर चिपक जाते हैं

सबसे खतरनाक वो दिशा होती है
जिसमें आत्मा का सूरज डूब जाए
और जिसकी मुर्दा धूप का कोई टुकड़ा
आपके जिस्म के पूरब में चुभ जाए

मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी और लोभ की मुट्ठी सबसे खतरनाक नहीं होती

वाङ्मयकवितामुक्तकभाषासाहित्यिक

प्रतिक्रिया

अगदी चपखल लागू.

बोका-ए-आझम's picture

31 Mar 2016 - 10:53 pm | बोका-ए-आझम

पाश यांच्या निवडक पंजाबी कवितांचा एका colleague च्या नव-याने हिंदीत अनुवाद केला होता तो वाचायचा योग आला होता. ही कविता मूळ हिंदीत आहे की अनुवाद आहे? वाचल्याचं आठवत नाहीये. अनुवाद छानच. फक्त ते शरीराच्या पूर्वेला ऐवजी पूर्वांगाला असं असतं तर अजून छान झाला असता!

तर्राट जोकर's picture

31 Mar 2016 - 11:23 pm | तर्राट जोकर

धन्यवाद. मूळ कविता हिंदीतच आहे. निदान मी तरी नेहमी हिंदीमधेच वाचल्याचे स्मरते. त्यांचे पंजाबी कवितांचेही वेगळे संग्रह आहेत. सुचवणीबद्दल धन्यवाद. चपखल शब्द सुचणे महाकठिण आहे. ह्या कवितेतल्या दोन तीन ओळींनी तर किमान दोन तास खाल्लेत काल. :)

एच्टूओ's picture

1 Apr 2016 - 11:03 am | एच्टूओ

चांगला जमलाय अनुवाद !
भावानुवादाच्या दृष्टीने प्रयोग केलात तर अजून मजा येईल.

निरंजन उजगरेंनी पाशच्या कवितांचा मराठीत अनुवाद केला आहे.
पुस्तकाचे नाव-पाशच्या निवडक कविता .अप्रतिम आहे.काही वर्षांपूर्वी वाचनात आले होते.

तर्राट जोकर's picture

1 Apr 2016 - 12:43 pm | तर्राट जोकर

धन्यवाद. भावानुवाद पेलवेल का ह्याबद्दल साशंक आहे.

निरंजन उजगरेंच्या अनुवादाचे सांगितल्याबद्दल धन्यवाद. शोधतो आणि वाचतो जरूर. :)