संमोहन आणि मानसोपचार

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
16 Mar 2016 - 3:19 pm

संमोहन किंवा मानासोपाचाराविषयी मी ह्या माझ्या " http://www.misalpav.com/node/32031 " मागील धाग्यात विचारणा केली होती.

मानसोपचारतज्ञ संमोहनाद्वारे माणसाच्या मागील आयुष्यातील काही गोष्टी ठराविक उपचार पद्धतीचा अवलंब करून जाणून घेतात आणि त्यावर उपचार ही करतात.
माझ्या जवळील व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचे उपचार घेणार आहे असे समजले आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी काही साईट्स देखील पहिल्या परंतू त्या साईट्स वरील माहिती परिपूर्ण असूनही तशी समाधानकारक नाही वाटली म्हणून मग धाग्याचा प्रपंच करावा लागला. धाग्यावारही समाधानकारक माहिती न मिळल्यामुळे आम्ही मानसोपचारतज्ञांशी सविस्तर चर्चा करून त्या भितीसाठी उपचार पद्धतीचा अवलंब करायचा ठरवला. त्याचा परिणाम म्हणून कि काय त्या व्यक्तीला वाटणारी भीती ७०% प्रमाणात कमी झाली. तसेच ती व्यक्ती २ ते ३ वर्षाची असताना तिला ती भीती कोणी दाखवली आणि का ते देखील समजले. झोपेतून किंचाळत जागे होणे किंवा झोपेत रडणे असे प्रकार जवळ जवळ थांबले आहेत.

मला त्या थेरपीचे नाव आठवत नाही परंतू कार्यपद्धती ही मात्र नार्को टेस्ट सारखी असते ( तलवार ह्या चित्रपटामुळे ती कशी असते ते समजले) ह्या थेरपीमध्ये रुग्ण आणि त्याच्या घरच्यांची परवानगी लागतेच त्याचबरोबर रुग्णाचे खूप सहकार्य असावे लागते. साधारणत: ही थेरपी घेण्यासाठी रुग्णाच्या काही बेसिक तपासण्या केल्या जातात. त्याचे वय आणि वजनानुसार भूल दिली जाते. हि भूल संपूर्णपणे दिली जात नाही कारण भूल दिलेल्या अवस्थेत सुद्धा रुग्णाचा आणि त्याच्या सुप्त मनाचा संबध राहील हे ह्या थेरपीचे मुख्य उद्दिष्ट असते. भूल देण्यापूर्वी ४ ते ६ तास निर्जळी उपास ( भूल द्यायची असल्यामुळे खाणे - पिणे अजिबात चालत नाही) करावा लागतो. ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधी रुग्णाचे बीपी, रक्तातील साखरेचे प्रमाण, नाडीचे ठोके तपासतात.
ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला सलाईन आणि ऑक्सिजन मास्क लावला जातो. मग भूलतज्ञ ठराविक प्रमाणात भूल देण्याचे औषध सलाईनद्वारे देतात. त्यानंतर ५ मिनिटातच रुग्ण पूर्ण जागा नाही किंवा पूर्ण झोपलेला देखील नाही अशा अवस्थेत पोचतो. त्याची ती अवस्था उपचारासाठी योग्य आहे असे वाटल्यावर मग मानसोपचारतज्ञ त्या घटनेशी संबधित प्रश्न विचारतात ज्या घटनेमुळे रुग्णाला त्रास होत असतो. अशा वेळी त्या रुग्णाचे सुप्त मन त्या काळात पोचलेले असते. त्याच्या जाणीव मनाचा किंवा मेंदूचा आणि त्याचा कोणत्याही भावनिक पातळीवर संबंध राहत नाही. सुप्त मनाच्या जाणीवेद्वारे सध्याचे शारीरिक आणि बौद्धिक वय विसरून रुग्ण त्या वयाचा होतो ज्या वयात त्याने तो त्रास भोगलेला असतो किंवा ती घटना घडलेली असते मग समोर दिसतील त्या सगळ्या घटना मगचा पुढचा विचार न करता रुग्ण सांगत असतो आणि मानसोपचारतज्ञ त्याची सुसंगती लावत त्या टिपून घेत असतात. कधी कधी एखादी भीती मनातून काढण्यासाठी आणि त्यात सुसंगती लावण्यासाठी त्या घटना वारंवार रुग्णाला विचाराव्या लागतात. ह्या परिस्थितीतसुद्धा रुग्ण रडतो किंवा ओरडतो, किंचाळतो अगदी पळण्यासाठी हात पाय पण झाडायचा प्रयत्न करतो पण औषधाच्या परिणामामुळे शारीरिक हालचाल विशेष करू शकत नाही . काही वेळा भीती एका गोष्टीची वाटत असते पण ती गोष्ट त्या वयात न समजल्यामुळे रुग्ण वेगळ्याच गोष्टीची भीती आपल्याला वाटत आहे असे मनात धरून वावरत असतो. ह्या थेरपीचे एक सेशन १५ ते २५ मिनिटांचे असते. औषधांचा परिणाम आणि रुग्णाचा प्रतिसाद ह्यावर सेशन किती वेळ चालते ते अवलंबून आहे. ह्या सेशनस मध्ये रुग्णाला नक्की कसली भीती वाटत आहे किंवा त्याला कसले दडपण आहे हे जाणून त्याच्या सुप्त मनाला काऊसिलिंग केले जाते. माणसाच्या बुद्धीला किंवा त्याह्या जाणीव मनाला केलेल्या काऊसिलिंग पेक्षा ह्या काऊसिलिंगचा परिणाम खूप लवकर आणि सकारात्मकपणे दिसून येतो. त्यानंतर मात्र रुग्णाला पूर्ण भूल दिली जाते आणि ३० ते ४५ मिनिटे शांत झोपवले जाते. जेव्हा पूर्ण भूल उतरते तेव्हा रुग्णाला त्या सेशन मध्ये काय झाले हे काहीही आठवत नसते.
जशी जशी सेशन होत जातात तसे तसे रुग्णाला स्वतः मधील बदल जाणवतो आणि ह्या बदलाची कबुली रुग्ण जागेपणी देतोच परंतू भूल दिलेल्या अवस्थेतही विचारल्यास देतो. त्या अवस्थेत रुग्णाचा आणि त्याचा जाणीव मनाचा आणि मेंदूचा संबध राहत नाही त्यामुळे त्या अवस्थेत कोणताही मनुष्य खोटे बोलत नाही.

जर समस्या खूपच गंभीर असेल तर माणूस कितीही वयाचा असला तरी ह्या थेरपीचा अवलंब त्याच्यावर करता येऊ शकतो परंतू ह्यासाठीचे सगळे अधिकार डॉक्टरांच्या हातात असतात जर त्यांना ह्या थेरपीची गरज वाटल्यास ह्या थेरपीचा अवलंब केला जातो.

ह्या थेरपीचे सेशन सुरु करायचे कि नाही ह्या विवंचनेत असताना मानसोपचारतज्ञानंनी ही वरील माहिती अतिशय विस्तृतपणे दिली त्यामुळे त्या थेरपीबद्दल आणि डॉक्टरांबद्दल विश्वास वाटला आणि केवळ त्यामुळेच ह्या थेरपीचा अवलंब केला.

औषधोपचारअनुभव

प्रतिक्रिया

माहितगार's picture

16 Mar 2016 - 3:42 pm | माहितगार

sandarbha hava

शि बि आय's picture

16 Mar 2016 - 3:48 pm | शि बि आय

संदर्भ म्हणजे कोणत्या स्वरुपात हवा आहे? रुग्णाचे नाव देणे येथे गरजेचे वाटत नाही म्हणून नाही दिले.
आपण कोणत्याही मानसोपचार डॉक्टरांना विचारून खात्री करून घेऊ शकता.

मराठी कथालेखक's picture

16 Mar 2016 - 4:00 pm | मराठी कथालेखक

थेरपीचे नाव द्यावे.

मराठी कथालेखक's picture

16 Mar 2016 - 3:59 pm | मराठी कथालेखक

माहिती रंजक आहे, पण 'काय घडते ? काय प्रक्रिया असते' अशी माहिती वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष एखाद्या केसबाबत नेमके काय घडले, थेरपी नेमकी कशी दिली गेली, डॉक्टरांनी काय प्रश्न विचारलीत, काय उत्तरे मिळालीत हे वाचायला अधिक आवडेल.
सदर व्यक्तीची ओळख लपवून तुम्ही हे अनुभवकरथन करु शकाल काय ?

शि बि आय's picture

16 Mar 2016 - 5:04 pm | शि बि आय

Intensive Short-Term Dynamic Psychotherapy (ISTDP) - हे त्या मूळ थेरपीचे शास्त्रीय नाव आहे. बाकी प्रश्नाची जमेल तितकी उघडपणे पण ओळख न सांगता नक्की उत्तरे देईन.

असंका's picture

17 Mar 2016 - 8:53 am | असंका

रिग्रेशन?

प्रकाश घाटपांडे's picture

17 Mar 2016 - 3:49 pm | प्रकाश घाटपांडे

अधिक माहिती वाचायला आवडेल. संमोहनाद्वारे व्यक्तिमत्व विकास वगैरे बाबीत भोंदुगिरी शिरली आहे.

माहितगार's picture

17 Mar 2016 - 4:10 pm | माहितगार

संमोहनाद्वारे व्यक्तिमत्व विकास वगैरे बाबीत भोंदुगिरी शिरली आहे त्यामुळेच धागालेखाच्या स्वरुपावरुन साशंकता वाटली होती. इंग्रजी विकिपीडियावर Intensive short-term dynamic psychotherapy लेख आत्ताच शोधला, मेडीकल फ्रॅटर्निटीने कितपत स्वकारले आहे माहित नाही, आपले डॉ.खरे काही प्रकाश टाकू शकल्यास बरे पडेल.

बेसिकली माहितीस तटस्थ दुजोर्‍यांची आवश्यकता असावी

शि बि आय's picture

18 Mar 2016 - 2:40 pm | शि बि आय

झालेल्या गोष्टी जर गोष्टी स्वरुपात कथन केल्या तर ह्या थेरपीचे साधारणत: उपचार पद्धती लक्षात येईल असे वाटत आहे. हे सांगण्याचा प्रपंच एवढ्या करताच कि जर एखादी व्यक्ती एखाद्या भीतीने ग्रासली असेल आणि सामान्य माणसाच्या हातातले सगळे उपाय करून झाले असतील तर ह्या उपचारामुळे त्या भीतीपासून काही प्रमाणात सुटका मिळू शकेल.

खर तर जाईला लहानपणापासून उंचीची भीती वाटत होती. (पात्राचे नाव आणि वाटणार्या भीतीचे नाव हि बदलले आहे) त्यामुळे लहान असताना पाळणाघरात किंवा शाळेत गेल्यावर कुठेही बाहेर जायचे म्हणतले कि तिच्या अंगावर काटा उभा राहायचा. त्या भीतीमुळे लहानपणी भावडांमध्ये यथेच्छ खिल्ली देखील उडवली जायची. मनात बसलेली भीती त्यामुळे मनावर आलेले दडपण, भावंडे एकत्र जमली कि उडावली जाणारी खिल्ली किंवा क्वचित प्रसंगी मुद्दाम उंचीवर नेउन दाखवलेली भीती ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे लहान वयात सतत अंथरूण ऒले करणे किंवा नखे खाणे अश्या सवयी जडायला लागल्या. वय सरेल तशी भी कमी होईल ह्या आशेवर घरच्यांनी त्याकडे थोडे दुर्लक्ष केले पण वय प्रमाणे भीती वाढत जात होती. ४ - ५ मजल्यावर राहणाऱ्या नातेवाईकांकडे जाई जायला तयार होईना.. मग कुठे तरी सिरीयस प्रोब्लेम आहे असे जाणवले आणि वयाच्या १२ वर्षी गोड बोलून मानसोपचार तज्ञानांकडे नेले. त्यांनी प्राथमिक पायरीचे आपले काम चोख केले. तिला बोलत करून नक्की कसली भीती वाटत आहे हे जाणून घेतले पण का वाटत आहे हे जाणून घेण्यात मात्र ते अपयशी ठरले. ४ सेशन नंतर गाडी पुढे सरकायलाच तयार नव्हती. पण त्या सेशन्सचा कात्रीत परिणाम म्हणून भीती २०% कमी झाली. पण त्याचे मूळ कारण आणि उर्वरित भीती मात्र मनात कायम होती. आणि त्या गोष्टीवर जाईने मार्ग देखील शोधायला सुरुवात केली होती. जिथे उंच जागा किंवा तिला भीती वाटेल असे काही असेल तिथे पाठ फिरवणे. पण ह्या गोष्टीमुळे घरच्यांना वाटले कि आता ती सावरत आहे तिला वेळ द्यायला हवा.
दरम्यानच्या काळात तिचे शिक्षण पूर्ण झाले चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी मिळाली यथावकाश लग्नही झाले. लग्न नंतर च काही दिवस मजेत गेले. पण काही दिवसात तिच्या नवर्याला मितेशला प्रमोशनवर १ वर्षाकरिता सिंगापूरला जायची संधी मिळाली. त्याने त्या संधीचा स्वीकार केला आणि सिंगापूरला जाईसह गेला. जाईचा संपूर्ण विमानप्रवास म्हणजे मितेशला झालेली शिक्षा होती. तरी कसाबसा तो प्रवास उलट्या आणि डोकेदुखीच्या गोळ्या घेत घेत संपला.
लहानपणापासून ज्या गोष्टीपासून ती पळायचा प्रयत्न करत होती आणि "मी आता नाही घाबरणार" अशी स्वतःची समजूत काढून स्वतःला गाफील ठेवत होती त्या भीतीने पुन्हा डोके वर काढले. परत तेच लहानपणाचे चक्र सुरु झाले. ह्यावेळी विमान प्रवासाचा अनुभव घेतल्यामुळे झोपेत रडणे, किंचाळणे देखील सुरु झाले होते. त्यातूनच ऑफिसने राहायला दिलेली जागा १६ व्या मजल्यावर असल्यामुळे तर ह्या सगळ्यात भरच पडत होती. मितेश आणि जाई दोघेही हैराण झाले होते, पण १६ व्या मजल्यावर राहणे म्हणजे स्वतःचे आणि जाईचे मनस्वास्थ बिघडवून घ्ण्यासारखे होते म्हणून मग त्याने तळमजला ,पहिला किंवा दुसरा अश्या ठिकाणी घराचा शोध सुरु केला. सुदैवाने थोडे जास्त पैसे भरून का होईना पुढच्या १५ दिवसात त्यांना हवे घर मिळाले आणि ते दोघ तिथे शिफ्ट झाले. पण जाईची हि भीती आणि घाबारल्यावर होणारी अवस्था बघून त्याने भारतात आल्यावर ह्यावर उपचार घाय्याचे नक्की केले. सिंगापूरला येउन ६ महिने झाले तरी आठवड्यातून १ ते २ वेळा ह्या वेगाने रात्रीचे झोपेत रडणे, किंचाळणे प्रकार चालू होते. सव्वा वर्षानंतर मितेश आणि जाई भारतात परतले. भारतात येउन जर स्थिर-स्थावर झाल्यावर मितेशने जाईच्या आई- बाबांना सगळ्या प्रकाराबद्दल सांगितले. आई बाबा मितेश ह्या सगळ्याच्या सांगण्यावरून जाई परत मानसोपचार घेण्यास तयार झाली.
ह्यावेळी मितेश तिला नामांकित मानसोपचार तज्ञ डॉ. मारू ह्यांच्कडे घेऊन गेला. सगळी कथा ऐकल्यावर त्यांनी Intensive Short-Term Dynamic Psychotherapy (ISTDP) ह्याचा उपयोग होईल असे सांगितले. ती कशी केली जाते ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्या थेरपीचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही ह्याची खात्री दिली. जाई आणि मितेश त्या थेरपीसाठी तयार झाले. हि थेरपी कशी देतात ते सविस्तरपणे वर सांगितलेच आहे.
त्या थेरपीच्या २ सेशन नंतर सत्य समोर यायाला लागले. (हा घटनाक्रम जाईने ज्या प्रकारे डॉक्टरांना सांगितला त्याच क्रमाने तो आम्हालाही ऐकायला मिळाला. ह्या घटना क्रमात बर्याच गोष्टीच्या का? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळता नाहीत कारण डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ज्या वयात हे सगळे झाले त्या वयाप्रमाणे ती सगळ्या गोष्टी बघते आणि सांगते असते. तेव्हा तिला कदाचित हे प्रश्न पडत असावेत किंवा नसावेत) लहानपणी न कळत्या वयात जाई त्याच्या मजल्यावरच्या काकांकडे खेळायला जायची तेव्हा तिने मस्ती करू नये म्हणून काका तिला मागच्या ग्यालारीच्या कठड्यावर उभे करून ठेवत असत आणि जाई रडायला लागली कि मग तिला कडेवर घेत पण तिला ते चिमटे काढत आणि रडायला लागली कि परत कठड्यावर उभे करून ठेवत. हे सगळे मागच्या ग्यालरीत होत असल्यामुळे कोणालाही ते दिसत नसे. जाईच्या म्हण्यानुसार कुसुआजी आली की काका खूप खेळत असे. जाईला आवडणारे खुपसे खेळ काकाकडे होते. आणि कुसुआजी तिला गोड लाडू देत असे म्हणून ती त्यांच्याकडे जायची. हे साधारण वयाच्या ४ ते ५ वर्षापर्यंत हा प्रकार होत असावा कारण नंतरच्या आयुष्यात त्या काका आणि कुसूआजीचा रेफ़रेन्स आला नाही.
जाईच्या म्हण्यानुसार तिने आईला हि गोष्ट सांगायच्या प्रयत्नात असताना काकांनी पाहिले आणि दुसरे दिवशी एक नवा क्रूर खेळ सुरु केला. ग्यालारीच्या कठड्यावर उभे करून उघड्या पायावर जोरात टिचकी किंवा चपाट मारणे जेणेकरून तिचा तोल जाईल पण अशा वेळी मात्र ती पडू नये म्हणू तिला पकडून पण ठेवायचे. त्यानंतर ती घरात लपून राहायला लागली. पण आई बाबा ऑफिसला जायचे त्यामुळे घरात तिला सांभाळणार कोण म्हणून परत तिची रवानगी कुसुआज्जी कडे होत. पण साधारत: वयाच्या ४ किंवा ५व्या वर्षी माईआजी घरी आली. आणि जाईचे कुसू आजी कडे जाणे बंद झाले. कुसुआजी देवाघरी गेली आणि काका कुठेतरी निघून गेला.
जाई दुसरीत असताना निलेशने म्हणजे तिच्या चुलत भावाने तिला अंधळी कोशिंबीर खेळत असताना तिला डोळ्याला पट्टी बांधलेली असताना दुसर्या मजल्यावरून खाली ढकलण्याची भीती / धमकी दिली होती. आणि त्याचा बदला म्हणून तिने घरी आल्यावर निलेशला कडकडून चावा घेतला. पण घेतलेल्या चाव्याबाबतचे स्पष्टीकरण घरच्यांना न देऊ शकल्यामुळे तिच्याच बाबांनी तिला गच्चीवर नेले आणि मुद्दाम खालचे दृश्य दाखवले.
५ वीत गेल्यावर तिचा वर्ग ४थ्या मजल्यावर होता. काही दिवस ती शाळेत जायला तयार नसायची कारण ४था मजला. पण तिच्याच वर्गातील मानसीला तिच्या आईने तिच्या भीतीची थोडी कल्पना दिली आणि तिला काही दिवस स्वतःबरोबर शाळेत न्यायला सांगितले. मानसीच्या मदतीने जाई शाळेत जाऊ लागली. पण परत महिन्याभरात दोघींमध्ये भांडण झाले आणि मानसीने तिच्या भीतीचे गुपित वर्गातील मुलींना सांगितले. मग येता-जाता तिला चिडवणे, घाबरवपा, टोमणे मारणे प्रकार सुरु झाले. पण पांडवबाईनी सगळ्या मुलीना रागावल्या आणि समज दिली.
वरील प्रसंग सांगताना बर्याच अवांतर गोष्टी जाईने डॉक्टरांना सांगितल्या. जसे की - तिची आवडती बाहुली, गोड लाडूचा डबा, आईची साडी इ. पण तिचे सगळे ऐकून घेतल्यावर तिच्या भीतीची सुरुवात त्या काकामुळे झाली असून बाकी सगळ्यांकडून खत-पाणी घातले गेल्यासारखे आहे. आपले बाबा आपल्यावर विश्वास न ठेवता निलेशच्या सांगण्यावरून आपल्याला शिक्षा करतात हे पाहिल्यावर तिला जास्त धक्का बसला आहे. त्यामुळे तेव्हा पासून ती बाबाशी नीट बोलानाशी झाली असावी असा डॉक्टरांचा अंदाज खरा ठरला. गम्मत म्हणजे सुप्तावस्थेत तिने सांगितलेल्या बर्याच गोष्टी जाईला जागेपणी अजिबात आठवत नव्हत्या.
जाईची भीती कमी करण्यासाठी डॉक्टरांनी तिच्या सुप्त मनाला सतत सूचना दिल्या. तिची भीती कमी झाली आहे असे तिच्याद्वारे तिच्या मनाला देखील सूचना दिल्या. सेशनचा शेवटचा भाग हा ह्यासाठीच राखून ठेवला जातो असे ते म्हणाले. आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे तिची ७०% भीती कमी झाली आहे.

काही खूप शुल्लक वाटणाऱ्या घटना मनावर खूप खोलवर परिणाम करतात त्यापैकी एक म्हणजे शिक्षेची पद्धत, लहान मुलांबरोबर आपली असलेली वागणूक, त्याच्यावर आपला असलेला विश्वास इ.
आता जाई खूप स्टेबल असून रात्त्रीचे ओरडत उठणे किंवा किंचाळणे साफ बंद झाले आहे. फक्त फार उंचीवर आधाराला काही नसल्यास अजूनही घाबरायला होते. बाबांनी किंवा निलेशने केलेली चूक रिपीट होऊ नये म्हणून मितेश आणि त्याच्या घराचे सावध असतात.

पद्मावति's picture

18 Mar 2016 - 3:04 pm | पद्मावति

अगदी नुकतच मी याच विषयावर डॉ. ब्रायन वेस यांचं Many Lives, Many Masters: The True Story of a Prominent Psychiatrist, His Young Patient, and the Past-Life Therapy That Changed Both Their Lives हे पुस्तक वाचलं. खूप इण्टरेस्टिंग आहे.

सतिश गावडे's picture

21 Mar 2016 - 12:37 am | सतिश गावडे

त्या पुस्तकातील "सब्जेक्ट"ला मागचे शहाऐंशी जन्म आठवतात. त्यातल्या कुठल्याशा जन्मात त्या सब्जेक्टला वृत्तपत्रावरील तारीख दिसते. सगळी जमाडी जम्मत आहे बघा त्या पुस्तकात.

जोक्स अपार्ट, पुनर्जन्मावर काही वाचायचे असेल तर डॉ. इयान स्टीव्हन्सन यांच्या संशोधनावर वाचा. त्यांचा कनिष्ठ सहकारी असलेल्या डॉ. जीम टकर यांनी लिहीलेली पुस्तके वाचा.

स्वदेशी वाचायचे असेल तर सुक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आलेल्या ब्रम्हर्षी प वि वर्तकांचे "पुनर्जन्म" वाचा. ;)

खरचं भयंकर आहे सगळं, लहान पणि मन हे अतिशय संवेदनशील असते. आणि एखादि व्यक्ति भित्रि असेल
तर किंवा पालंकांशि संवाद नसेल तर बालपण अतिशय दडपणाखालि जाउ शकते. पुर्वि तर पालकांना वेळ्च
नसायचा आणि आता नोकरि मुळे मुलं दुसर्यांच्या ताब्यात द्यावि लागतात. खरचं मुलांना वाढ्वावे कसे याचे
शिक्शण देण्याचि वेळ आलि आहे.

पुण्यात असे कोणी डॉक्टर आहेत का?

नाही. पण मुंबईमधील डॉक्टरांचा फोन देऊ का ?

किरण नाथ's picture

2 May 2016 - 12:05 pm | किरण नाथ

चालेल. तिकडे गेलो तर जाउन येइन.

पुण्याचे डॉक्टर माझ्या महितीत नाहि.