तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सना पर्यायी आहार ?

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
1 Mar 2016 - 12:23 pm

तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक नसलेले पर्यायी आहार कोणते ? मिपावरील आणि इतरत्रच्या सुयोग्य पाककृतींचे दुवे देणे आणि तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक टाळून समतोल आहार कसा घ्यावा ? हे या धागा लेखाचे मुख्य प्रश्न आहेत.

तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक असले तर नुकसान काय असा कुणि तरी प्रश्न घेऊन येईलच तेव्हा त्याचेही उत्तर हवे आहे. तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्स, खोबरे, शेंगदाणे, तीळ, साबुदाणा, रताळे, बटाटे, इत्यादी पदार्थ भारतीयांच्या जिभेचे लाड पुरवतात त्यास जवाब नाही त्यामुळे त्यांच्या चविष्टतेच्या मुल्यावर या धाग्यावर बद्दल वाद करण्याची इच्छा नाही. पण आरोग्याच्या मुल्यावर जोखताना त्या बद्दल प्रश्नचिन्हे उपस्थित होतात का ? भारतातील काही सुशिक्षीत कुटूंबे त्यांचा आहार खरेच समतोल ठेवतात म्हणजे डाळी, कोशिंबीरी, उसळी, फळे यांचे आहारातील प्रमाण इतरांपेक्षा बरे असते. पण आपण अपवादावरुन नियम सिद्ध करु शकतो का ?

बर्‍याच घरांमध्ये आजही भाजी म्हणून (४० ते ७० टक्के वेळा हा माझा व्यक्तिगत कयास) बटाट्याची भाजी केली जाते पानात दुसर्‍या भाजीचे नामोनिशाणही नसते. बटाटा हे कार्बोहायड्रेड दुसर्‍या कार्बोहायड्रेड सोबत खाणार यांचीच नवीन पिढी वडापाव आणि बर्गर खाते कार्बोहायड्रेड पे कार्बोहायड्रेड. बर कुणि समतोल आहार प्रेमी बाहेर कुठेही खाण्यास गेला पाहुणे, समारंभ ते रेस्टॉरंट त्यांचे काही अंशीतरी हाल होतातच.

भारतीय नॉनव्हेजीटेरीअन जेवण हे तसे आपोआप प्रथीन युक्त आवश्यक एनर्जी मांसाहारी प्रथिनांमधून मिळू शकते एनर्जी मिळण्यासाठी या लोकांना तेलाच्या तवंगाची आवश्यकता नसावी पण .. वस्तुस्थिती ?

आपण मागच्या वेळी वेळ व्यवस्थापन बद्दल धागाचर्चा लावली होती, तुम्ही स्कुल, कॉलेज कार्यालयाच्या वेळा असताना मंडळींना रस्त्यावर त्यांच्या त्यांच्या गाड्या चालवताना पाहीले आहे का, त्यातील अनेक जण कसे शेवटच्या मिनीटाला जिव धोक्यात घालून धावत असतात ते ? -अगदी कच्च्या बच्च्यांसहीत सर्वांचे जीव डावावर लावले जातात- कारण काय सकाळी वेळेवर न उठणे- आणि मग सगळ्याच कामांना उशीर, कितीही आलाराम लावले तरीही या मंडळींना जाग येणे कठीण ! यावर सकाळी उठल्यावर प्रथिन यूक्त अल्पोपहार घेण्याची सवय करणे म्हणजे सकाळी आपोआपच भूक लागून वेळेवर जाग यावी हा एक उपाय असू शकतो ? आमचे कोण कोणते अल्पोपहार या निकषास पात्र होतात ?

अर्थात हे उशीर होण्यास काही अंशी वेळ व्यवस्थापन चुकणे किंवा किंचन व्यवस्थापन चुकणे अशाही समस्या असतात या समस्या रस्ते शाळा कॉलेज कार्यालयातील प्रबंधकीय वर्गाला जाणवत असतात फक्त आम्हाला आमच्या आपापल्या घरात जाणवत नाहीत.

आज माझ्याच घरात एक व्यक्ति ज्यांची तब्येत ऑदरवाई़ज बिघडली नसती अशी आहाराचा समतोल न राखल्यामुळे बेडरीडन आहे, आणि आहारा बद्दल सहकार्य केल्यास त्यात आजही सुधारणा होऊ शकते. थोडी कडक टिका केली आहे पण आत्मपरिक्षण केल्या शिवाय सुधारणाही होत नाहीत (मी टिकाकार म्हणून खूप कठोर आहे पण तरीही टिका ह. घ्या हि वि.) म्हणून या धागा चर्चेच्या निमीत्ताने मनमोकळ्या आत्मपरिक्षणाचे आवाहन आणि तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक नसलेले पर्यायी आहार कोणते ? मिपावरील आणि इतरत्रच्या सुयोग्य पाककृतींचे दुवे देणे आणि तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक टाळून समतोल आहार कसा घ्यावा ? हे या धागा लेखाचे मुख्य प्रश्न आहेत त्या बद्दल चर्चा करुयात. मनमोकळे प्रतिसाद आणि चर्चा सहभागासाठी आभार.

.

प्रतिक्रिया

एक पदार्थ म्हणजे उसळ-पाव.हे अधिककरून सिंधी समाज खातो.पाक्कृती देण्याची गरज नाही. मुगाची उसळ पावात घालून देतात.सोबत कांदा,लिंबू,कोथिंबिर.समतोल आहार आहे.

वा उपमा करतो त्यात थोडा उडदाचा रवा घालायचा.गाजर,फ
रसबी,वटाणे,कोथिंबीर,फ्लॅावर,कोबी घाला.

थालिपीठ करतो तेच पिठ थोडे सैलसर करून ढोकळ्यासारखे उकडायचे ताकाबरोबर चांगले लागते.

प्रसाद१९७१'s picture

1 Mar 2016 - 5:16 pm | प्रसाद१९७१

आरोग्याच्या मुल्यावर जोखताना त्या बद्दल प्रश्नचिन्हे उपस्थित होतात का

अजिबात प्रश्नचिन्हे निर्माण होत नाहीत.

ओटस् चिवडा , अोट्स ची भेळ,ओटस् उपमा ,ओटस् उत्तपा इ.

अनुमित's picture

2 Mar 2016 - 3:11 pm | अनुमित

1.सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा (use brown sugar)
३. सकाळी ९ वाजता : १ सफरचंद + १ वाटी ओट्स
४. दुपारी १२ वाजता : २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली चटणी
६. रात्री ८.30 वाजता : २ फुलके + १ भाजी + सॅलड्

Refined goshti talvyat.
Replace sugar with brown sugar and rice with brown rice

उगा काहितरीच's picture

2 Mar 2016 - 4:14 pm | उगा काहितरीच

ठीक आहे मानलं ! पण ब्याचलर, नोकरीनिमीत्त घराबाहेर , गावाबाहेर रहात असलेल्या लोकांनी कसं करावं? जे आणि जसं समोर उपलब्ध असेल तेच खावं लागते ना भाऊ!

किचेन's picture

2 Mar 2016 - 5:22 pm | किचेन

इडली - तांदूळ.

मन१'s picture

2 Mar 2016 - 4:46 pm | मन१

चित्रगुप्त ह्यांचा हा धागा सपडला --
http://www.misalpav.com/node/33321
.
.
आणि हे माझं स्वतःचं लिखाण :-
http://www.misalpav.com/node/32875

सप्तरंगी's picture

7 Mar 2016 - 8:55 pm | सप्तरंगी

१. ३ पांढरे पदार्थ : मैदा , साखर आणि butter हे combination घातक मानले जाते.
२. Direct sugar खाण्यापेक्षा complex carbs वापरावेत. sugar फळे, पोळी, भात यातुन गेलेली उत्तम.
३. Oils सतत बदलत रहावीत.
४. सगळ्या डाळीबरोबर मोड आलेली कडधान्ये वापरावीत, कदाचित आठवड्यातून एकच कडधान्य मोड आणुन सलाड मधुन , भाजी मधून थोडे थोडे खाता येईल.