झाडीपट्टी चंबल लागते (मराठी भाषा दिन २०१६)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in लेखमाला
14 Feb 2016 - 9:28 pm

खेती करावले बी मन मोठा बख्खल लागते
मिरगात बी तऱ्याच्या पारीले सब्बल लागते

जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर
बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते

लोकाइच्या मनाले फुटते पाझर येती असा
मारा कुराड कोटी बी पानी भलभल लागते

स्ययरात ते कईचेे गेले वापस आले नहीं
तुमची जमीन बाप्पा आमाले दलदल लागते

आला घरी तई पोट्टा लडुलडु सांगे मायले
झोपावले मले वो चिमन्याइचि कलकल लागते

- संकेत

बख्खल = (शब्दशः) जाड़ेभरडे,
मिरगात= मृग नक्षत्रात
तऱ्याची पार= तळ्याचा बांध
सब्बल= पहार
कईचे= कधीचे
कोटी बी = कोठे पण
भलभल= धो-धो वाहणारे
लडुलडु= रडत रडत