सदस्यांतर्गत भेदभाव आणि धोरण

विवेक ठाकूर's picture
विवेक ठाकूर in काथ्याकूट
6 Feb 2016 - 2:17 pm
गाभा: 

या धाग्यात दोन व्यवसाय: मान अपमान बॅटमॅन नामक सदस्याचा हा प्रतिसाद आहे :

विठाकाका,

नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे? लोकमान्य टिळक म्हणायचे, "दिडकीची भांग घेतल्यावर वाटेल त्या कल्पना सुचतात." इन्फ्लेशन अ‍ॅडजस्ट करून कॅल्क्युलेट करून सांगू शकाल का की तेव्हाच्या दिडकीच्या भांगेशी कंप्यारेबल आज काय मिळतं ते? एक टकीला का काय असतं त्याचा शॉट की गेलाबाजार व्होडका बाटली?

या प्रतिसादाविषयी सं.मं.कडे तक्रार करुन योग्य मार्गानं निवाडा होईल अशी रास्त अपेक्षा होती पण अजूनही प्रतिसाद कायम आहे. तर प्रश्न असा पडतो की एखादा प्रतिसाद व्यक्तिगत आणि शिष्टाचाराचे नियम सोडून बेतालपणे दिला आहे किंवा कसे, याचा काय निकष आहे. इथे `व्यक्तिगत प्रतिसाद' या कारणाखाली आयडी बॅन होतात मग वरचा प्रतिसाद कशा प्रकारात मोडतो? आणि मग व्यक्तिगत प्रतिसाद देणार्‍यांना तंबी दिली जाते तर ज्यांच्या बाबतीत असे प्रतिसाद दिले जातात त्यांना उत्तर देण्याची किंवा काय निवाडा झाला ते सांगण्याची, शासकांची किमान जवाबदारी नाही काय?

आणि त्याही पुढे जाऊन जर इतक्या भिकार प्रतिसादाला, शासक काहीच करत नाहीत म्हटयावर, त्याच पातळीवर येऊन पुरतं वाजवलं, तर तो उत्तर देणार्‍याचा फाऊल का धरला जाईल का किंवा का धरला जातो?

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

6 Feb 2016 - 2:20 pm | तर्राट जोकर

धागा धागा अखंड विणुया. पॉर्न सर्वेचा धागा अखंड विणला जाणार आहे असे दिसते.

जय बोलो राम!

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 2:27 pm | सतिश गावडे

विठाकाका, उपरोल्लिखित प्रतिसादाचा दुवा द्या ना. त्या महाधाग्यात हा तीन ओळींचा प्रतिसाद कुठे शोधणार.

त्यामुळे प्रतिसाद आहे तसा पेस्ट केलायं. हा धागा तरी राहातो की नाही कल्पना नाही. पण मग डांग्याच्या, साध्या `प्रतिसाद संपादनावर' धोरणात्मक चर्चा आणि इथे उघड व्यक्तिगत प्रतिसाद असतांना धागा उडवणं म्हणजे पुन्हा
सदस्यांतर्गत भेदभाव होईल असं वाटतं .

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 2:57 pm | सतिश गावडे

तो धागा वाचनमात्र झाल्यानं लिंक देता येत नाही...

असं नाही. वाचनमात्र धाग्यावरील प्रतिसादाची लिन्क देता येते. मी तो प्रतिसाद शोधला आणी सापडला. ही त्या प्रतिसादाची लिन्क.

मला तुमचा हा धागा वाचून वेगळाच प्रश्न पडला आहे. श्री. यनावाला यांच्या धाग्यावर "अस्तित्वाविषयी" लोकांना समजवणारे विवेक ठाकूर नक्की आपणच आहात का?

ज्याला "अस्तित्व" कळले तो एका संकेतस्थळावरील तथाकथित आभासी अपमान सहन न होऊन चक्क व्यवस्थेकडे दाद मागत आहे हे बाब आश्चर्यकारक आहे.

असो. "अस्तित्व" कळलेली दहा वर्षांची मुक्ता ज्ञानदेवांना काय म्हणते बघा:

-- १ --
संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥
तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥
थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥
रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥
ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- २ --
योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥
विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥
विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ३ --
सुखसागरी वास झाला | उंच नीच काय त्याला ॥
अहो आपण जैंसे व्हावें | देवें तैसेंचि करावें ॥
ऐसा नटनाटय खेळ | स्थिर नाही एकवेळ ॥
एकापासुनी अनेक झाले | त्यासी पाहिजे सांभाळिले ॥
शून्य साक्षित्वें समजावें | वेद ओंकाराच्या नावें ॥
एकें उंचपण केले | एक अभिमानें गेलें ॥
इतकें टाकुनी शांती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ४ --
वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें ॥
त्याला म्हणूं नये साधू | जगीं विटंबना बाधू ॥
आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें ॥
आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ५ --
संत तेचि जाणा जगीं । दया क्षमा ज्यांचे अंगी ॥
लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥
इह परलोकीं सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥
मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ६ --
एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले? ॥
उठे विकार ब्रह्मी मूळ । अवघे मायेचें गबाळ ॥
माय समूळ नुरे जेव्हां । विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥
ऐसा उमज आदिअंतीं । मग सुखी व्हावे संती ॥
चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ७ --
ब्रह्म जैसें तैशा परी । आम्हा वडील भूतें सारी ॥
अहो क्रोधें यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥
जीभ दातांनी चाविली । कोणें बत्तीशी तोडीली? ॥
मन मारुनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ८ --
सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥
बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥
जीव जीवासी पैं दयावा । मग करुं नये हेवा ॥
तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ९ --
सांडी कल्पना उपाधी । तीच साधूला समाधी ॥
वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥
पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥
एक मन चेष्टा करी । भूतें बापुंडी शेजारी ॥
अवघी ईश्वराची करणी । काय तेथें केलें कोणीं ॥
पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- १० --
गिरीगव्हारे कशासाठीं । रागें पुरवीली पाठी ॥
ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो कां द्वेषी ॥
घर बांधिलें डोंगरीं । विषया हिंडे दारोदारीं ॥
काय केला योगधर्म । नाही अंतरी निष्काम ॥
गंगाजळ ह्रदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ११ --
अहो क्रोधे यावें कोठें । अवघे आपण निघोटे ॥
ऐसें कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥
ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥
वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥
ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- १२ --
अवघी साधन हातवटी । मोलें मिळत नाही हाटीं ॥
शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥
कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायीं ॥
तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

विवेक ठाकूर's picture

6 Feb 2016 - 3:24 pm | विवेक ठाकूर

आणि माझ्या वरील विधानाचा तुम्ही दिलेल्या दाखल्यांशी काहीएक संबंध नाही. ही धोरण विषयक चवकशी आहे.

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 3:26 pm | सतिश गावडे

:)

कपिलमुनी's picture

6 Feb 2016 - 2:52 pm | कपिलमुनी

धागा अल्पायुषी ठरणार नाही अशी आशा करतो.
आणि पॉपकॉर्न घेउन बसतो

हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तुम्ही किंवा इतर कोणीही प्रतिसादात उल्लेख केलेल्या मादक द्रव्यांचं सेवन करता असा कोणताही आरोप किंवा विधान त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे यात तुम्ही उगाचच हे स्वतःला लावून घेतलेलं आहे. अर्थात तो तुमचा हक्क आहे. या प्रतिसादात (वाल्गुदस्वामींच्या) आक्षेपार्ह मला तरी काही वाटलं नाही. संंमंलाही वाटलं नसावं.

तर्राट जोकर's picture

6 Feb 2016 - 3:04 pm | तर्राट जोकर

येस्स... त्यापेक्षा जास्त गंभीर प्रतिसाद त्यांनी वाचलेला दिसत नाही.

तुम्ही काय पद्धतीनं विचार करता असा प्रश्न पडतो.

नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे?

याचा अर्थ `मद्यप्राशनाशिवाय असं लिहीता येत नाही' असा होतो. उगीच वृथा समर्थनात काय हाशिल आहे ?

बोका-ए-आझम's picture

6 Feb 2016 - 3:58 pm | बोका-ए-आझम

नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे?

याचा अर्थ `मद्यप्राशनाशिवाय असं लिहीता येत नाही' असा होतो.

हे तुमचं मत आहे आणि ते तसं असण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण संपादक मंडळाचं मत तुमच्याप्रमाणेच असावं असं जरुरी नाही ना? त्यांना वेगळं मत असण्याचा अधिकार आहे, जो त्यांनी कारवाई न करुन बजावलेला आहे. झालंच तर सदस्यांतर्गत भेदभाव हे लेखाचं शीर्षक आहे त्यानुसार बॅटमॅन यांना संपादक मंडळाने झुकतं माप दिलं आहे असं आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे कारण इतके दिवस बॅटमॅन यांचा आयडी माझ्या माहितीप्रमाणे बॅन होता. आत्ताच तो परत सक्रीय केलेला आहे. त्यामुळे पक्षपाताचा आरोप हा (जर तुम्ही करत असलात तर) चुकीचा आहे.

महासंग्राम's picture

6 Feb 2016 - 4:01 pm | महासंग्राम

अगदी हेच्च म्हणतो कि ओ मी

--- गोथम गावचा पाटील

अर्थात, पण प्रतिसाद केंव्हा व्यक्तिगत होतो आणि केंव्हा नाही याचं निश्चिती करण व्ह्यायला हवं. अशा प्रतिसादाला जर मी तिथल्या तिथे वाजवलं तर `संकेतस्थळाचं वातावरण बिघडतं' असा आरोप झाला असता. थोडक्यात, एका साध्या संपादनाला, जर शासक धाग्यावर येऊन स्पष्टीकरण देतात, तर एखादी तक्रार आल्यावर, त्या सदस्याला किमान, प्रतिसाद धोरणात आहे असं, नियमाचा निर्देश करुन सांगता यायला हवं. म्हणजे दुसर्‍यालाही बरोबर त्याच नियमात राहून वाजवता येईल.

बोका-ए-आझम's picture

6 Feb 2016 - 4:09 pm | बोका-ए-आझम

आणि त्याही पुढे जाऊन जर इतक्या भिकार प्रतिसादाला

हे आपल्याला विसंगत नाही वाटत? जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे प्रतिसाद इतका भिकार आहे तर त्याच्यावर एक धागा काढून त्याला जरूरीपेक्षा जास्त महत्व का देताय? जर तुम्हाला विचलित करणे हा प्रतिसादकर्त्याचा हेतू असेल, तर I am sorry to say, but you have just played into his hands!

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 4:13 pm | सतिश गावडे

जर तुम्हाला विचलित करणे हा प्रतिसादकर्त्याचा हेतू असेल, तर I am sorry to say, but you have just played into his hands!

=))

म्हणजे तो प्रतिसाद थोर आहे का? आणि ज्यामुळे आयडी बॅन होतो ते`व्यक्तिगत म्हणजे नक्की काय'? याविषयी सद्स्यांना नक्की कल्पना नको का?

याबद्दल मी काही म्हणतच नाहीये. ज्यामुळे आयडी बॅन होतो ते व्यक्तिगत म्हणजे बहुधा चारित्र्यावर टीका किंवा अश्लाघ्य शब्द वापरणं असावं. समजा बॅटमॅनच्या प्रतिसादाचा अर्थ तुम्ही मद्यपान करता असा जरी होत असला तरी ते (मद्यपान) पाप आहे का? एखाद्याच्या चारित्र्यावर तो मद्यपान करतो किंवा for that matter कुठल्याही मादक द्रव्याचं सेवन करतो या आणि फक्त या गोष्टीने शिंतोडे उडतात का?

बोका-ए-आझम's picture

6 Feb 2016 - 4:44 pm | बोका-ए-आझम

असे वाचावे.

कवितानागेश's picture

7 Feb 2016 - 12:18 pm | कवितानागेश

याचा अर्थ `मद्यप्राशनाशिवाय असं लिहीता येत नाही' असा होतो.-------म्हणजे तुमच्या प्रगाढ ज्ञानाचे श्रेय मद्याला दिल्याने तुम्ही त्रासले आहात का?
मग तिथेच स्पष्टसांगा कि तुम्हाला तुमचे ज्ञान व्यक्त करण्यासाठी मद्याची गरज नसते तुम्ही नेहमीच लाईट मूडमध्ये असता.... वगरे वगरे....
नवीन धागा काढूनभांडत कशाला बसता?

सुबोध खरे's picture

6 Feb 2016 - 3:09 pm | सुबोध खरे

ठाकूर साहेब तुमच्या भन्नाट कल्पना विलासामुळे त्यांनी असा प्रश्न विचारला आहे.तो व्यक्तीगत घ्यावा असे मला तरी वाटत नाही,
बाकी आपली मर्जी

विवेक ठाकूर's picture

6 Feb 2016 - 3:25 pm | विवेक ठाकूर

एखाद्याच्या मताविषयी, शिष्टाचाराला धरुन दुमत व्यक्त करणं आणि त्यावर ` नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे?`असं विचारणं यात फरक नाही का?

विवेक जी
तुम्ही परवानगी देत असाल तर
या धाग्याविषयी जो आक्षेप मला वाटतो तो नोंद्वु का ?
म्हणजे प्रतिकुल मत आहे ते मी मांडण्यास तुमची परवानगी आहे का ?

विवेक ठाकूर's picture

6 Feb 2016 - 3:28 pm | विवेक ठाकूर

प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, फक्त ते शिष्टाचाराला धरुन आहे का ? इतकाच प्रश्न आहे.

मारवा's picture

6 Feb 2016 - 4:58 pm | मारवा

माझा प्रतिसाद शिष्टाचाराला धरुनच असेल.
वरील परवानगी मागितली तो प्रतिसाद
आपल्य मते अशिष्ट तर नाही ना ?

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Feb 2016 - 3:32 pm | माम्लेदारचा पन्खा

घेणार्याला मात्र अभिमान वाटतो अशावेळी...कोणी तरी क्याप्यासिटीची चौकशी केली म्हणून....

एक नोंद !!

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 3:34 pm | सतिश गावडे

चला बसूया मग. एकमेकांचा अपमान न करता "अस्तित्वाची" चर्चा करू. :)

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Feb 2016 - 3:40 pm | माम्लेदारचा पन्खा

जे नाही त्यावर बोलूया......

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 3:45 pm | सतिश गावडे

जरा चुकीचे जरा बरोबर फेकू काही
चला दोस्तहो नाही त्यावर बोलू काही

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Feb 2016 - 3:49 pm | माम्लेदारचा पन्खा

हवापाणी काय म्हणतंय तिकडचं....इथं हवाही धड नाही आणी पाणीही....

महासंग्राम's picture

6 Feb 2016 - 3:39 pm | महासंग्राम

एकुणात विषय पाहून धाग्याची १०० भरणार हे निश्चित. एक चीज पोपकोर्ण आणा रे.

अद्द्या's picture

6 Feb 2016 - 4:19 pm | अद्द्या

आणि या प्रकारे . बॅटमॅन ने आल्या आल्या सिक्सर मारून कोणाला तरी दुखवलेलं आहे.

तरी त्यांचे एक टकीला शॉट देऊन स्वागत करावे अशी जेपी भाऊंकडे ईनंती करतो.

स्वगत: आजकाल कोणीही कुठेही कशानेही दुखावलं जातंय =]]

असहिष्णुता वाढली आहे हो.

मोदक's picture

6 Feb 2016 - 4:25 pm | मोदक

स्मायली विसरली

:)

;)

:D

:P

अद्द्या's picture

6 Feb 2016 - 4:32 pm | अद्द्या

मोदींचा राजीनामा मागायला विसरलात राव.

सनी लिओन आणि केजरीवाल यांच्याबद्दल काही विधाने झाली. संदीप डांगेंचा प्रतिसाद संपादीत करण्यात आला . पण सर्व गोष्टी स्पष्ट मांडूनही श्रीगुरुजींचे प्रतिसाद संपादीत केले गेले नाहीत

यावरुन मला तरी स्पष्ट कळले आहे ,

हो , मिपावर सदस्यांतर्गत भेदभाव केला जातो.

अर्थात हे संपूर्ण खासगी संस्थळ आहे त्यामुळे पटल तर रहायचा नाहीतर चपला घालायच्या आणि निघायचा हा ऑप्शन आहे.

अभ्या..'s picture

6 Feb 2016 - 4:58 pm | अभ्या..

कम्मुला १०० वेळा सहमत.
इथे भेदभाव तर केला जातोच शिवाय त्या भेदभावाला धोरणे, तत्वे अन नियमांचा सालस मुलामा ही दिला जातो. त्या मुलाम्याची जमेल तितक्या हिरीरीने जाहिरात केली जाते.
खाजगी संस्थळ आहे हे माहित झाल्याने बूट घातलेलेच आहेत, लेस बांधली की निघायचे. ;)

तुषार काळभोर's picture

6 Feb 2016 - 5:19 pm | तुषार काळभोर

अभ्या..च्या शेवटच्या वाक्यात असं अ‍ॅडवतो: खाजगी संस्थळ आहे हे माहित झाल्याने बूट घातलेलेच आहेत, लेस बांधली की निघायचे. ;) नाहीतर लाथ बसली की पळायचे.

नाव आडनाव's picture

6 Feb 2016 - 7:14 pm | नाव आडनाव

अभिजीतला १०० वेळा +.
सालस पणा जरा जास्तंच होत चाललाय ...

बॅटमॅन's picture

6 Feb 2016 - 7:48 pm | बॅटमॅन

बूट घातलेलेच आहेत. लेस बांधली की निघायचेच!

आपण ऑलवेज बटूशास्त्रीला १०० परसेंट सहमत असतो. म्हण्जे कसय ते की बॅट्याला सहमत नाही व्हायचे म्हणजे काय...

पण.

पण.

मला संजयजींचे लिखाण पण खूप खूप आवडते. विवेक ठाकूरांत पण ती प्रतिभा आहे पण त्यांना संजयजीसारखे फॅन फॉलोविंग मिळणे जरा मुश्कील आहे. त्यांना चांगल्या निर्भेळ प्रोत्साहनाची गरज आहे. पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यांनी अशा वादात न पडता आपले लिखाण कंटीन्यु करावे ही नम्र इनंती.

बॅटमॅन's picture

6 Feb 2016 - 10:55 pm | बॅटमॅन

अभ्याशी आपणही बाडीस असतो. विवेक ठाकूर नीड्स टु अप हिज़ गेम.

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 10:56 pm | सतिश गावडे

विवेक ठाकूरांत पण ती प्रतिभा आहे पण त्यांना संजयजीसारखे फॅन फॉलोविंग मिळणे जरा मुश्कील आहे. त्यांना चांगल्या निर्भेळ प्रोत्साहनाची गरज आहे. पाठिंब्याची आवश्यकता आहे.

तुमच्याच क्षेत्रातील एक नामवंत मान्यवर त्यांना आवर्जून प्रोत्साहन देतात. संक्षीनाही द्यायचे, विठाकाकांनाही देतात. मात्र त्यांचे प्रोत्साहन निर्भेळ आहे की ते हरभर्‍याच्या झाडावर चढवून मजा बघणे आहे याबद्दल अजून आमच्या मनात गोंधळ आहे.

मला एक प्रश्न पडतो, विठाकाकांचा उल्लेख होताना नेहमी संक्षींचा उल्लेख का होतो बरे? किंबहूना स्वत विठाकाका "संक्षींनी यंव केलं असतं, संक्षींनी त्यंव केलं असतं" असं लिहित असतात. क्या ये राज आखिरतक राजही रह जायेगा?

अभ्या..'s picture

6 Feb 2016 - 11:13 pm | अभ्या..

येवुडू पाह्यला का. अल्लू अर्जुन आणि रामचरण हायेत. कळतील सगळे राज पाह्यल्यावर.

सतिश गावडे's picture

7 Feb 2016 - 12:19 am | सतिश गावडे

लेदू. नेनू अल्लू अर्जून योका आर्या मरीयू हॅप्पी विक्षींचारु. सरे इदी रामचरण येवुडू?

आदूबाळ's picture

6 Feb 2016 - 11:44 pm | आदूबाळ

...जिसे आप ने देखा, वो था लक्ष्मणप्रशाद दशरथप्रशाद शर्मा। मेरा जुडवा भाई।

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Feb 2016 - 6:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

++१००००

शिवाय केजरीवाल काळे का गोरे अन चांगले का वाईट ह्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही तरीही त्यांचे नाव अन अस्तित्व ही एक शिवी आहे असे संबंधित आयडी म्हणाला आहे .

सनी लियॉन ला वेश्या म्हणणे जर वाईट असेल तर हे काय फार मोठे राष्ट्रकार्य आहे काय? "केजरीवाल" शिवी आहे म्हणणे हे नुसते राजकीय दृष्ट्या असहिष्णु असल्याचे द्योतक नाही का?

गॅरी ट्रुमन's picture

7 Feb 2016 - 8:18 pm | गॅरी ट्रुमन

सनी लियॉन ला वेश्या म्हणणे जर वाईट असेल...

बाकी सगळं सोडा हो. एक गोष्ट सांगा: सनी लियॉन की सनी लिऑनी? मला वाटते सनी लिऑनी :)

संदीप डांगे's picture

7 Feb 2016 - 9:20 pm | संदीप डांगे

ज्याने 'कायदेशीर' अडचण येणार नाही ते... ;-)

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Feb 2016 - 9:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

ठ्ठो!!!! :D :D :D :D

गॅरी भाऊ,

लियॉन ऐकले आहे बुआ! अमेरिकन काही वेगळा उच्चार करत असल्यास कल्पना नाही! अर्थात आता तुम्ही बाकी मुद्दे सोडले आहेत तर बाकी काही बोलण्यासारखे नाही म्हणा!
शुभेच्छा

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2016 - 2:26 pm | श्रीगुरुजी

उगी उगी मुनीवर्य. जरा शांत व्हा. इतके असहिष्णु होऊ नका. जरा सहिष्णु घ्या. माझ्याविरूद्ध तुम्ही तक्रार करीत असलेला हा तिसरा धागा आहे. आधी दोन धाग्यांवर तक्रार करून झाली. दुसरा धागा अचानक बंद झाल्याने मला तिथे काहीच उत्तर देता आले नाही. परंतु (निदान अजूनतरी) संमंला माझा प्रतिसाद संपादित करावा असे वाटलेले दिसत नाही. त्यावर तुम्ही लगेच "मिपावर सदस्यांतर्गत भेदभाव केला जातो." असा त्यांच्यावर आरोप करून मोकळे झालात. समजा त्यांनी माझ्यावर काही कारवाई केली असती तरी मी तो निर्णय मान्य करून अजिबात विरोध केला असता, कारण तसे करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्या धाग्यावर तुम्हाला योग्य उत्तर देता येत नव्हते, म्हणून लगेच "मला मूळव्याध झाली आहे" अशी व्यक्तिगत टिप्पणी करून मोकळे झालात. दुसर्‍या एका धाग्यावर तुम्ही माझ्यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिसादात व्यक्तिगत टिप्पणी केलीत. मी तुमच्याविरूद्ध एकाही प्रतिसादात व्यक्तिगत टिप्पणी केली नव्हती. परंतु तुम्ही तसे माझ्या बाबतीत वारंवार केलेत. माझा त्याबद्दल काहीच आक्षेप नाही. त्यामुळे मी कोठेही तक्रार केली नाही. परंतु माझ्याविरूद्ध तक्रार करायची ही तुमची तिसरी वेळ. संमंबद्दल भेदभाव करण्याचा आरोप करण्याऐवजी त्यांच्या निर्णयाचा आदर करायला शिका.

कपिलमुनी's picture

7 Feb 2016 - 4:34 pm | कपिलमुनी

मी काय शिकायचा ते तुम्ही शिकवू नका.
माझी तक्रार संमं विरूद्ध आहे ,आम्ही बघून घेऊ.
तुमचा शेवटचा प्रतिसादवाला खेळ चालू द्या.

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2016 - 8:42 pm | श्रीगुरुजी

तुमचा कसला खेळ सुरू आहे ते दिसतेच आहे. आतापर्यंत या खेळातले तुमच सगळे डाव फसलेले आहेत. फक्त माझे नाव वारंवार घेऊन व्यक्तिगत टिप्पणी करू नका.

अजया's picture

6 Feb 2016 - 4:38 pm | अजया

आॅर्डर अाॅर्डर
बॅटमॅन कहाँ है?उसको हाजिर किया जाय.
@ बोका -मुद्देसूद नहीं बोलनेका.धागा तुटतो मग.नीट विणला जात नाही.

बॅटमॅन दुपार की वामकुक्षी घे रहे है!
संध्याकाळ को आएंगे तंब्बी बोलो... :)

अजया's picture

6 Feb 2016 - 4:46 pm | अजया

कोणाची उद्वेगाने झोप उडवून स्वतः वामकुक्षी घेणे बरोबर नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2016 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सनी लियोन ही पोर्न स्टार आहे, असं जरी कोणी म्हटलं असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. असे वाटते.

बाकी, संस्थाळावर खुप भांडावं पण व्यक्तिगत आयडी किंवा असलेले नाव घेऊन संबधीतावर टिका करून हिशेब चुकते करू नये असे व्वाटते. बाकी, चालु द्या.

-दिलीप बिरुटे

जेपी's picture

6 Feb 2016 - 5:53 pm | जेपी

मिपाला एका 'प्र'भावी संपादकाची गरज आहे.हे मी वारंवार अधोरेखित (पक्षी:पिवळे)केले आहे..
एवढे बोलुन मी खाली बसतो.

-
अवांतर-बॅट्या ट्राय सिरीज पुर्ण करायच सोडुन दुसर्याचे पेग मोजतो..
हॅड..

मिपा वातावरणाला साजेशी वाटतेय प्रतिक्रिया (आणि धागाही ;-) ) बाकी चलु द्या!!!

बॅटमॅन's picture

6 Feb 2016 - 6:46 pm | बॅटमॅन

हेलो विठाकाका.

तुमचे प्रतिसाद आणि त्यातली मते पाहून मला सोमरसमदजनित कल्पनाविलासाशी अपार साम्य आढळले म्हणून पृच्छा केली. आता दारू पिण्याचा आणि चारित्र्याचा संबंध कुठे आला? तुम्ही दारू प्या वा ना प्या, झिंगा अथवा झिंगू नका. जे काही करता त्यात इतरांशी वर्तणूक कशी असते यावर तुमचे चारित्र्य ठरते , बसल्याजागी किती टकीला शॉट लावून काय तर्कटे लढवता याच्यावर नाही. तेव्हा या प्रश्नावर दुखावले जाणे म्हणजे कुठेतरी मनातच दारू = वाईट असे समीकरण लपलेले आहे याची पोचपावतीच आहे. तस्मात हा श्लोक पहावा असे सुचवतो.

किन्तु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम् |
अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथाऽमृतम् ||

"मद्य हे गुणधर्माने पाहता अन्नासारखेच आहे. विचार न करता ढोसले तर रोगास कारणीभूत होते आणि योग्य प्रमाणात इ. घेतले तर अमृताप्रमाणे परिणाम करते."

तेव्हा चीअर्स.

अशी शंका आलीय का तुम्हाला वाल्गुदस्वामी?

असं विचारल्यास चारित्र्य हनन होणार नाही, कसे? कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे `जे काही करता त्यात इतरांशी वर्तणूक कशी असते यावर तुमचे चारित्र्य ठरते'. तस्मात, अशा विचारणेत तुमच्या चारित्र्यावर हल्ला होत नाही.
तरीही मद्यप्राशनाचा आणि तर्कशुद्ध विचारसरणीचा संबंध आहे, याचा गोमूत्र प्राशनानंतर विसर पडत असावा असे प्रतिसादावरुन वाटते.

तुम्ही हा प्रतिसाद गोमूत्र पिऊन लिहीला आहे का?

नाही बा. आम्ही दूध, चहा, कॉफी, ग्रीन टी, अदरकवाली चाय, काहवा, फिल्टर कापी, ताक, सांबार, रसम वगैरे पितो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Feb 2016 - 7:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नीरा सोडली का हल्ली? आणि फ्रुट ज्युस?

श्श्श, अशी खाजगी माहिती उघड करणं शोभतं का तुला, दू दू दू

विवेक ठाकूर's picture

6 Feb 2016 - 7:56 pm | विवेक ठाकूर

मद्यप्राशनाचा आणि तर्कशुद्ध विचारसरणीचा संबंध आहे याचा विसर पडला म्हणजे आश्चर्य आहे. तस्मात, गोमूत्र पिऊन लिहीला असवा अशी रास्त शंका आहे.

मद्यप्राशनाचा आणि तर्कशुद्ध विचारसरणीचा संबंध आहे याचा विसर पडला म्हणजे आश्चर्य आहे.

अनुल्लेखाने मारले ओ त्याला. बाकी तुमचा विसर कसा पडू देऊ ? =))

त्यामुळे गोमूत्र पिणे सोडा.

उघडे पडल्यावर सारवासारव करुन उपयोग होत नाही

सारवासारव वगैरे साफसफाईची कामे तुम्ही स्वतः सांभाळता हे पाहून तुमच्याबद्दलचा आदर की काय तो वाढीस की काय लागला बरं का.

अर्थात, तुमच्याच प्रतिसादाप्रमाणे, स्व-मूत्रप्राशनाचा चारित्र्य हननाशी संबंध येत नाही. पण त्यानं नक्की कोण काय करतंय हे कळेनासं होतं. म्हणजे गोमूत्रामुळे, `मद्यप्राशन आणि तर्कशुद्ध विचारसरणी' यातला संबंध कळत नाही आणि स्वमूत्र प्राशनानं, सरवासारवी आपण करतोयं हे कळेनासं होतं.

बॅटमॅन's picture

6 Feb 2016 - 10:52 pm | बॅटमॅन

म्हणजे गोमूत्रामुळे, `मद्यप्राशन आणि तर्कशुद्ध विचारसरणी' यातला संबंध कळत नाही आणि स्वमूत्र प्राशनानं, सरवासारवी आपण करतोयं हे कळेनासं होतं.

बाकी काही असो, पण या वाक्यामुळे आपण तुमचा फ्यान झालो. धर्माभिमानी हिंदू असूनही गोमूत्र कधी प्राशिले नाही आणि शिवांबुचिकित्सा तर नाहीच नाही. पण आपण या दोन्हीही द्रवांचे सेवन करता हे पाहून आपल्याबद्दलचा आदर दुणावला. अजून स्व किंवा गो यांच्याशी निगडित कशाकशाचे सेवन करता याचा विदा जर मिपाकर पामरांशी शेअर कराल तर बाकीचे मिपाकरही त्याला प्रोत्साहन देतील यात शंका नाही.

ते दोन्ही प्राशन केल्यामुळेच तर तुम्हाला, मद्यप्राशन आणि तर्कशुद्धता यातला संबंध आणि स्वतः केलेली सारवासारवी समजू शकत नाही. आता काहीही न घेता पुन्हा स्वतःचे प्रतिसाद वाचा म्हणजे समजेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोघांनी आता एकमेकांना तिरपे प्रतिसाद लिहिणं थांबवावं असं एक मिपाकर म्हणुन वाटतं. वादात शेवटचा प्रतिसाद ज्याचा कोणाचा असला म्हणजे तो प्रतिवादात जिंकला असा अर्थ होत नाही. एकमेकांवर आपण दोघं जितकी चिखलफेक कराल तितकी आमची वाचक प्रेक्षक म्हणुन करमणुक होईल. आपण दोघंही चांगलेही चांगले पहिलवान आहात कोणाचीही पाठ लवकर लागणार नाही, तेव्हा दोघांनीही हा सामना आता थांबवावा. धन्यवाद. ह्याव अ गुड डे.

-दिलीप बिरुटे
(पंच)

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Feb 2016 - 10:28 am | कैलासवासी सोन्याबापु

वादात शेवटचा प्रतिसाद ज्याचा कोणाचा असला म्हणजे तो प्रतिवादात जिंकला असा अर्थ होत नाही.

असं फ़क्त तर्क गुंडाळून सरकार पक्षा संबंधी प्रचारकी लेख लिहिणाऱ्या अन विरोधकांप्रती विखारी घाण ओकणाऱ्या एका आयडीला वाटते सर!!

कवितानागेश's picture

7 Feb 2016 - 12:02 pm | कवितानागेश

या वरच्या वादात बिरुटे सर जिंकलेत! ;)
-बघ्यांच्या गर्दीतली एक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ताशी जिंकलो मग. :)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

7 Feb 2016 - 12:30 pm | पैसा

तुम्ही पंच ना ओ सर! मला वाटले तुम्ही दोन राउंड्स च्या मधली विश्रांती दिलीय. पुन्हा शिट्टी वाजली की म्याच सुरू होईल. =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता पुरे हं. मला जिंकु द्या. एक आवडलेल्या कवितेच्या ओळी टाकतो. उपप्रतिसाद देऊन दाद द्यायची नाही.
खरडवहीत दाद द्यायची. काल (काल्पनिक) मैत्रीणीची धावती भेट झाली. तो आनंद असा -

सांग कसा होऊ मी ताजवरती फिदा
त्यास येईल का तिच्या लाजण्याची अदा
पत्थराची पूजा मी कशाला करु
चालता बोलता काल मी ताज पाहिला.

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

7 Feb 2016 - 1:02 pm | कवितानागेश

आता त्या कवितेखालील प्रश्न सोडवा.
ताज का चालतो?
वरील कवितेत नक्की कुणाला लाज वाटत आहे आणि का?
पत्थराची पूजा का करू नये स्पष्ट करा.
ताज काय बोलत आहे?
पु ना ओक यांच्या दृष्टीने ताजची १० वाक्यात माहिती लिहा.
फिदा आणि अदा यास मराठी संस्कृत प्रतिशब्द लिहा.
--( पहिली ते बारावीचे उट्टे काढणारी) माऊ ;)

अद्द्या's picture

6 Feb 2016 - 7:45 pm | अद्द्या

"किन्तु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम् |
अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथाऽमृतम् ||"

फक्त या गोष्टींसाठी हा माणूस इथे हवा ..
बाकी

या प्रश्नावर दुखावले जाणे म्हणजे कुठेतरी मनातच दारू = वाईट असे समीकरण लपलेले आहे याची पोचपावतीच आहे.

यासाठी +१

स्पा's picture

6 Feb 2016 - 6:50 pm | स्पा

छे विठा,

इतक्याशा इशु मुळे हललात

कवितानागेश's picture

7 Feb 2016 - 12:03 pm | कवितानागेश

अच्रत बव्लत हल्कत!

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Feb 2016 - 6:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

तर असं आहे बुआ हे प्रकरण नाही !!

(ओ आय सी असा सगळा प्रकार झाला तर च्या चालीवर)

धागाच अज्ञानोत्भव दिसतोय ! एकंदरित श्लोक भूमिका पाहता बॅटमॅन ह्यांनी एक स्पष्टीकरण दिलेले आहे!

तरीही,

चियर्स

(सोमवेत्ता) बाप्या

राजेश घासकडवी's picture

6 Feb 2016 - 7:11 pm | राजेश घासकडवी

बॅटमॅन, तुम्ही 'किती दारू प्यायल्यावर असे प्रतिसाद सुचतात' असा प्रश्न विचारून प्रचंड चूक केली आहे याबाबत विठांशी सहमत. मी खात्रीने सांगू शकतो की १९२० साली जी दिडकी होती, तिची किंमत आत्ता फारतर शंभर रुपये असेल, त्यापेक्षा जास्त नाही. मी तेवढ्या किंमतीची दारू अनेक वेळा, वेगवेगळ्या परिस्थितीत प्यायलेली आहे. पण असा प्रतिसाद मला कध्धीही सुचला नाही. बॅटमॅन, तुम्हाला एवढं कळत नाही का, 'नशा शराब मे होता तो नाचती बोतल' असं एक थोर हिंदी कवी म्हणून गेला आहे.

अहो बॅटमॅन, हा असला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही किती ताक पिऊन बसला होतात? (आता याबद्दल बॅटमॅन माझ्याविरुद्ध धागा काढणार...)

बाकी तो मूळ प्रतिसाद वाचला. कॅन्सरपासून बचाव करणं इतकं सोपं असेल तर अनेक स्त्रियांना त्यासाठी मदत करायला मी उत्सुक आहे. फेसबुकावर कायम ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस वगैरे खुळं चालू असतात. मला वाटतं आपण त्यापुढे जायला हवं. मिपाकरांनी एकत्र येऊन 'ब्रेस्ट कॅन्सर एलिमिनेशन ग्रुप' काढायला हवा. त्यासाठी गरजवंत स्त्रियांना हा मुद्दा पटवून देऊन त्यांच्यावर उपचार करण्याची मोहीम सुरू करावी. हे भयंकर कष्टाचं काम असेल, पण ब्रेस्ट कॅन्सर निवारणासाठी आपण तेवढा त्याग करायला तयार झालं पाहिजे.

बॅटमॅन's picture

6 Feb 2016 - 7:48 pm | बॅटमॅन

सहमत, बाकी वेगळा विदर्भही झालाच पाहिजे.

बोका-ए-आझम's picture

6 Feb 2016 - 7:53 pm | बोका-ए-आझम

की जय हो!

नाव आडनाव's picture

6 Feb 2016 - 7:51 pm | नाव आडनाव

मोहीम :):):)
इच्छुक कार्यकर्त्यांनी नावनोंदणी कुठे करायची? प्रा.डाँ. चा कोनाडा वाला धागा? :)

मला विदा गोळा करायचा होता की किती एमेल आणि कुठल्या प्रकारची (बियर व्हिस्की इ.) व कुठल्या ब्रँडची दारू पिल्यावर कशी क्रिएटिव्हिटी बहरते ते. त्या उदात्त उद्देशाकरिता विचारत होतो ओ.

जेपी's picture

6 Feb 2016 - 7:39 pm | जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.विठाकाका,बॅटमॅन आणी घासकडवी यांचा सत्कार एक एक क्वार्टर देऊन करण्यात येत आहे.

-शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

*आजपासुन राज्यात लिकरचे भाव कमी झालेत ;)

सुहास झेले's picture

6 Feb 2016 - 11:15 pm | सुहास झेले

आणखी स्टॉक रेडी ठेवा... नक्कीच गरज पडेल ;-)

तर्राट जोकर's picture

6 Feb 2016 - 8:26 pm | तर्राट जोकर

कोय ते बी बोला इदर फ्री में दारू मिल रया करके,

वो लेकिन फ्री के दारू में भेदभाव नै चलेगा. अपन पुरा खंबा पियेगा हे अपना दोरण रैताय. पैले बोलके रखताय... जिनको पिने का नै, अपना अपना गिलास उठाके घर जावो...

विनायक प्रभू's picture

7 Feb 2016 - 9:18 am | विनायक प्रभू

ये ग ये ग विठाभाइ

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Feb 2016 - 9:39 am | कैलासवासी सोन्याबापु

धाग्याला म्हणावा तसा उठाव नाही!! श्या बायस्ड एटिट्यूड

पैसा's picture

7 Feb 2016 - 10:18 am | पैसा

झाडावर बसून पॉपकॉर्न खाणारी मंडळी फिरकली नाहीत ना!

पैसा's picture

7 Feb 2016 - 10:21 am | पैसा

मिपाच्या इतिहासात हाणामारीचा पहिला प्रकट धागा म्हणून नोंदला जाईल हा धागा!! सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन आणि मिपाला मनापासून शुभेच्छा!!

संदीप डांगे's picture

7 Feb 2016 - 10:53 am | संदीप डांगे

आमचे प्रत्येक विषयावर हटकून मत असतेच. तेव्हा ह्या विषयावरही देऊन टाकतो.

सदस्याने अशा पद्धतीच्या वादात पडू नये, उघड द्वंद्व असल्याने कोण किती पाण्यात आहेत हे लगेच कळतं, विचारसरणीचे कपडे फाडले जातात. वादात कोणीच जिंकत नाही, वादात फक्त कोणाचा 'स्व' कसा आहे एवढंच कळतं. हसं होतं.

अत्रन्गि पाउस's picture

7 Feb 2016 - 12:03 pm | अत्रन्गि पाउस

विम्बल्डन फायनल च्या प्रेक्षकात बसल्यावणी वाटतय ...

संदीप डांगे's picture

7 Feb 2016 - 12:36 pm | संदीप डांगे

नळावरची भांडणं झालीत हो दादा आता ती...! ;-)