विकिमिडीया कॉमन्सवरील छायाचित्रे

माहितगार's picture
माहितगार in मिपा कलादालन
6 Feb 2016 - 8:12 am

विकिमिडीया कॉमन्स हा सर्व भाषातील विवीध विकिप्रकल्पांसाठी मिळून वापरता येण्या जोगा आणि मुख्य म्हणजे कॉपीराईट मुक्त असलेल्या छायाचित्राच्या आंतरजालावरील मोठ्या संग्रहांपैकी एक आहे. आंतरजालावरील इतर छायाचित्र संग्रहाच्या वेबसाईट्सपे़क्षा उपलब्ध छायाचित्रे कॉपीराईट मुक्त आहेत का हे बघण्याची स्वयंसेवकांची जागरुकता विकिमिडीया कॉमन्सवर त्या मानाने बरी आहे. त्यासही काही मर्यादा पडत असव्यात नाही असे नाही त्याबद्दल पुन्हा केव्हातरी या धाग्याचा मुख्य उद्देश विकिमिडीया कॉमन्सवरची आवडलेली छायाचित्रे अधून मधून मिपाकरांसोबत शेअर करणे हा आहे. -अर्थात मी ती वेळोवेळी बदलत राहीन.

खालील बहुतेक चित्रे कॉपीराईट मुक्त असणे अभिप्रेत आहे तसे नसेल तर विकिमिडीया कॉमन्सवर ती वगळली जाण्याबाबत सुचीत करण्यात सहकार्याचे स्वात आहे. असो.

पूर्वबालीतील एक सुर्योदय
श्रेय

bali

माथेरानची एक सकाळ श्रेय
matheran

आमेरीकन ओकमुलगी पार्कातील एक सकाळ

okmulgee

आणि आता निसर्ग विरुद्ध विकास या फ्रान्समधील एका जलसिंचन प्रकल्पाला विरोधकरणार्‍या मागच्या वर्षीच्या आंदोलनात एका फ्रेंच आंदोलकाचा मृत्यूच्या घटनेबद्द्ल एक क्लिप श्रेय

sinchan?

हा क्लिप फॉर्मॅट का दिसत नाही या बद्दल जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

श्रेय विषयक दुवे निट दिसत नाहीत पुढच्या प्रयत्नात अद्ययावत करेन.

आपण स्वतः क्लिक करुन काढलेली छायाचित्रे विकिमिडिया कॉमन्सला कॉपीराईट मुक्त स्वरुपात दान करून विकिप्रकल्पांना अप्रत्यक्षपणे साहाय्यभूत होऊ शकता. छायाचित्र चढवण्यासाठी मराठी साहाय्य दुवा

आणि एका समुद्र किनार्‍यावरील एक सकाळ

sakal

श्रेय By Rossana Ferreira from Viana do Castelo, Portugal (Good Morning) [CC BY 2.0 (http://creativecommons.org/licenses/by/2.0)], via Wikimedia Commons

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Feb 2016 - 8:35 am | प्रचेतस

माफ करा पण धाग्याचा उद्देश पटला नाही. विकीपेक्षा तुम्ही स्वतः काढलेली छायाचित्रे डकवली असतीत तर ते सयुक्तिक झाले असते.

प्रचेतस,धाग्याचा उद्देश विकिपिडिया समृद्ध करण्याविषयी आहे.उदा० तुमचा भुलेश्वर शिल्पकला धाग्यात जे फोटो आहेत ते तुम्ही गुगल/ फ्लिकर वर चढवून शेअरिंग लिंक्स वापरून इथे लेख लिहिला आहे.जर तेच फोटो विकिमिडिया कॅामन्सच्या साइटवर अपलोड करून त्यांच्या लिंक्स वापरल्या तर तो लेख विकिपिडिया मराठीवर येऊ शकतो.फक्त तुम्हाला फोटो कॅापिराइटमुक्त करावे लागतात.अथवा दुसरा कोणीही ते फोटो लेखासाठी वापरू शकतो.प्रत्येक फोटोला तीन लिंक्स असतात.त्यातली फाइल लिंक तुमच्या नावासह( विकि युझरनेम) exif data दाखवते.मी तीन फोटो अपलोड केलेत.

माहितगार's picture

6 Feb 2016 - 11:14 am | माहितगार

धाग्याचा उद्देश विकिपिडिया समृद्ध करण्याविषयी आहे.

एकदम बरोबर. आणि माझ्या स्वभावाने मी बर्‍याचदा नुसती जाहिरात करतो त्या पेक्षा या निमित्ताने विकिमिडीयावरील येणारी नवीनतम अथवा रोचक छायाचित्रे कदाचित शेअर करता येतील हा हेतु.

@ प्रचेतस,
स्थिर कॅमेरा माझ्या हातात कधी स्थिर रहात नाही ह्या माझ्या मर्यादेमुळेही स्वतःकाढलेली छायाचित्रे खुपशी उपलब्ध होऊ शकत नाहीत.

विकिमिडीया कॉमन्सची ओळ्ख धागा काढण्याचे निमीत्त आज सकाळी सकाळी " [[File:Animated-Flag-India.gif|150px|centre|thumb|'''मी [[धर्मनिरपेक्ष]] [[भारत|भारतीय]] आहे.''']] " हे वाक्य डझनभर मराठी विकिसदस्यांच्या पानावरून उडवले गेले कारण Animated-Flag-India.gif हे कॉपीराईट मुक्त नसावे. अशी कॉपीराईट समस्या असलेली अनेक चित्रे आम्ही लोक ऊडवत असतो त्यात कुठे पोळ्याच्या सणाचे चित्र असते कुठे पु.ल. देशपांड्याम्चे छायाचित्र असते. त्याचवेळी कॉपीराईट मुक्त छायाचित्रांची मोठीच गरज असते.

माहितगार's picture

6 Feb 2016 - 11:18 am | माहितगार

'पु.ल. देशपांड्यांचे छायाचित्र असते.' असे वाचावे. सध्या संगणकाची एक शीफ्ट कळ काम करत नसल्याने टंकन दोष अजूनच वाढले आहेत. क्षमस्व