भारतातील आफ्रीकन विद्यार्थ्यांचा प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Feb 2016 - 2:29 pm
गाभा: 

आफ्रीकेतील बर्‍याच देशातील विद्यार्थी कायदा पालन विषयक समस्यांसाठी ओळखले जातात (सर्वच तसे असतील असे नव्हे). अलिअडच्या काळात दिल्ली, गोवा, इथे काही घटना घडून गेल्या यावेळी बेंगलोरची वेळ आहे. या वेळच्या बेंगलोर केस मध्ये एका सुदानी विद्यार्थ्याच्या गाडीखाली येऊन एका बेंगलोरच्या स्त्रीस अपघात झाला. स्थानिक जमावाने चिडून अपघाताशी संबंध नसलेल्या तांझानीयन विद्यार्थ्यांची गाडी अडवून जाळली आणि कार मधील तांझानीयन विद्यार्थ्यांंचे हाल करून वड्याचे तेल वांग्यावर काढले. उर्वरीत आफ्रीकेच्या विरुद्ध तांझानीयन लोक सहसा सुसंस्कृत आणि कायदेपालनात बरे समजले जातात आणि या बेंगलोर केस मध्ये एका तांझानीयन विद्यार्थीनीला हकनाक जमावाच्या रोषास सामोरे जावे लागले. इतर आफ्रीकनांच्या बद्दल रोष असल्यामुळे स्थानिक पोलीस आणि प्रशासनानेही चटकन दखल घेतली नाही.

स्थानिक बेंगलोरी वि. आफ्रीकन विद्यार्थी समस्ये विषयीची हि तीन विश्लेषणे , ,

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Feb 2016 - 4:57 pm | पैसा

झाले ते वाईटच. मात्र गोव्यात तरी नायजेरियन्संनी उच्छाद आणला आहे.

विजय पुरोहित's picture

4 Feb 2016 - 4:59 pm | विजय पुरोहित

गोव्यात रशियनबाबत पण असेच ऐकले आहे.

ही समस्या बांगलादेशी घुसखोर वगैरे बरीच ताणता येईल.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2016 - 5:39 pm | मुक्त विहारि

नायजेरियन्संनी उच्छाद आणला आहे.

ठाण्याहून बदलापूरकडे निघालो असताना हा अनुभव आला होता. निगरगट्टासारखे पाय पसरुन निवांत बसला होता एक जण. एरवी चौथ्या सीटसाठी एकमेकांना खाऊ का गिळू करणारे लोक मुकाट उभे होते.

सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात असे नसावे पण भारत सरकारच्या पॉलीसीतच नायजेरीयनांना अधिक संधी का ह्याचा शोध घेतला जाण्याची गरज असावी. मला वाटते सर्वच परदेशी विद्यार्थ्यांसाठी भारताचा व्हिसा देण्यापुर्वी आमेरीके साठी जशा गेट जिआरई परिक्षा द्याव्या लागतात तशा स्कॉलरशीप साठी परीक्षा घ्यावयास हव्यात. आणि केवळ खर्‍या खुर्‍या स्कॉलर मुलांना येऊ द्यावे. सध्याचे भारत सरकारची स्कॉलरशीप मिळवण्याचे निकष तपासले जाण्याची गरज असू शकते. टांझानियन अधिक सभ्य असतात त्यांच्या पेक्षा अधिक स्कॉलरशीप नायजेरीयन विद्यार्थ्यांना देण्या मागे नेमके निकष कोणते ते तपासले जाण्याची गरज असु शकावी.

दुसरे म्हणजे प्रायव्हेट शैक्षणिक संस्थात प्रवेश घेतात त्यांना व्हीसा देण्या पुर्वी त्यांचे नायजेरीयातील उत्पन्न तपासले जाण्याची गरज असावी कारण भारतातील खर्च काही नायजेरीयन अवैध व्यवसायातून उभे करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संदीप डांगे's picture

4 Feb 2016 - 8:56 pm | संदीप डांगे

नायजेरियन्स इकडे ड्रग्स आणि मनी-फ्रॉड साठी येतात असा कयास आहे. बाकी विद्यार्थी वैगरे कवर आहे.

पैसा's picture

4 Feb 2016 - 9:07 pm | पैसा

गोव्यात ड्रग्ज तेच ऑपरेट करतात असे ऐकले. फक्त विद्यार्थी म्हणून नव्हे तर तिथले गुन्हेगार टुरिस्ट म्हणून येतात आणि मग विमानतळावरच सगळे पेपर्स हरवले म्हणून हात वर करतात. इंग्लिश कळत नाही म्हणून मख्ख रहातात. पोलिस लोक त्याना एंबसीकडे पाठवतात तिथून मग मांडवली करून त्याना डुप्लिकेट पेपर्स दिले जातात. त्याच्या जोरावर बेकायदा गोव्यात राहून ड्रग्जचा व्यापार करतात. मध्यंतरी अशा ड्र्ग्जच्या एक मोठ्या कॅप्चरनंतर एका नायजेरियनचा खून झाला होता. त्यानंतर हे लोक जमाव करून पर्वरी पोलीस स्टेशनवर चालून गेले आणि पोलिस स्टेशनची नासधूस करायचा प्रयत्न झाला. ते सगळे भयानक उंचनिंच आणि तब्बेतीने आडदांड असतात. पोलिसांच्या मारालाही ते पुरून उरतात. हा हल्ल्याचा प्रकार झाल्यानंतर पर्रीकरांनी सगळी पाळेमुळे खणून काढायचे आदेश दिले होते. नंतर काय झाले देवजाणे.

माहितगार's picture

4 Feb 2016 - 9:12 pm | माहितगार

आंतररष्ट्रीय राजकारणात आफ्रीकी देशांची मते लागतात, चीनशी आणि इतर देशांशी रिसोर्सेस आणि मार्केट साठी स्पर्धा असते त्यामुळे अंशतः बोटचेपेपणा होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नायजेरियनच्या हल्ल्यानंतर परवरी पोलीस घाबरून पळू लागले तेव्हा स्थानिक लोकांनी पोलिसांचे आणि चौकीचे संरक्षण केले. रस्त्यावर 15 एक मिनिटे नायजेरियन्स विरुद्ध स्थानिक अशी लढाई सुरु होती.

नंतर आंतरराष्ट्रीय राजकारण जसे व्हायचे तसे झालेच आणि मग याचा बदला म्हणून नायजेरियातील भारतीयांवर हल्ले झाले तर आम्ही काही करू शकणार नाही असे बहुधा नायजेरियन परराष्ट्र मंत्र्याने सांगितले. तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक आहेत ते काही काळ खूप तणावाच्या वातावरणात राहिले होते.

माहितगार's picture

6 Feb 2016 - 3:23 pm | माहितगार

तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक आहेत ते काही काळ खूप तणावाच्या वातावरणात राहिले होते.

सिंधी लोकांनी व्यापरीक-आर्थीक सिंधीगिरी करणे आणि नायजेरीयन लोकांनी पिवळी माणसे म्हणून वंशवादाची परतफेड आणि शिवाय केव्हाही लूटले जाण्याची शक्यता हि तिथली नित्याची बाब आहे, गोवा प्रकरण पुर्वीच तापलेल्या याच्यात तेल. ड्रग्सच्या बाबतीत सर्वसामान्य नायजेरीयन (काम त्यांची माणसे करतात तरीही भारताच्या मार्गे येत असल्यामुळे) भारतीयांनाच दोष देतो. 'भारतीयांवर हल्ले झाले तर आम्ही काही करू शकणार नाही" हा डायलोग बहुधा याही वेळी झाला आहे पण हा डायलॉग त्यांच्या बाजूनेही बरोबर नाही. अर्थात नायजेरीयापेक्षा टांझानीयात भारतीयांना मिळणारी वागणूक बरीच राजेशाही थाटाची असते आपलीच मंडळी तिथे जाऊन त्यांचे खाऊनही तिथे वंशवादी गप्पा करताना दिसतात. आफ्रीकेत गेल्यावर भारतीय सावळा (कृष्णवर्णीय भारतीय असेही वाचावयास हरकत नाही) आफ्रीकनांना रंगावरून कुत्सीत उल्लेख करताना दिसतो आणि आफ्रीकन लोकही भारतीय अगदी त्यांच्या स्वतःच्या रंगासारखे दिसत असूनही त्यांना नायजेरीयात पिवळे इतरत्र गोरे समजताना दिसतात. या विषयावरून क्वचित काही आफ्रीकनांशी वादलोही आहे.

माहितगार's picture

6 Feb 2016 - 3:28 pm | माहितगार

वादण्यासाठी मी माझ्या एक्सटेंडेड फॅमिलीमेंबर्सचे फोटोही त्यांना दाखवत असे.

माहितगार's picture

6 Feb 2016 - 3:26 pm | माहितगार

नायजेरियनच्या हल्ल्यानंतर परवरी पोलीस घाबरून पळू लागले तेव्हा स्थानिक लोकांनी पोलिसांचे आणि चौकीचे संरक्षण केले.

रोचक

संदीप डांगे's picture

6 Feb 2016 - 3:31 pm | संदीप डांगे

रोचक आहे तर खरं. संरक्षणासाठी उभे राहिलेल्या लोकांची संख्या दोन-तीन दंडुकेधारी पोलिसांपेक्षा जास्तच (५०-५००) असेल.

संदीप डांगे's picture

4 Feb 2016 - 9:22 pm | संदीप डांगे

हीच पार्श्वभूमी आठवून प्रतिसाद दिला.

मागे एकदा मुंबईहून नाशिकला जातांना नांदेडकडे जाणार्‍या ट्रेनमधे बसलो, तिथे दोघे नायजेरियन बसलेले, जरा इंग्रजी येत होते म्हणून मी त्यांना विचारले कुठे चाललात, तर म्हणे आमच्या कंपनीतर्फे जमिनीच्या सर्वे ला चाललोय, वैगरे वैगरे. नंतर एका भारतीय प्रवाशाने मला संभाषण संपल्यावर थोड्या वेळाने खरी गंमत सांगितली. म्हणे हे लोक कुठे पाणी नसलेल्या, रिसोर्स नसलेल्या भागात कंपनी टाकणार आहेत काय? नांदेडला चाललेत, ड्रग डिल करायला. तिकडून थेट पंजाबला माल जातो. नांदेडला ड्रग्स चं मोठं मार्केट आहे. नांदेड-शिख-पंजाब-ड्रग्स-इत्यादी इत्यादी.... ख.खो.दे.जा.

माहितगार's picture

4 Feb 2016 - 9:40 pm | माहितगार

बाकी ठिक फक्त 'पाणी नसलेल्या' सब्जेक्टिव्ह असावे.

माहितगार's picture

4 Feb 2016 - 9:08 pm | माहितगार

भारतीय परिक्षांच्या टक्के पात्रता वाढ्वल्या आणि नापासांना परत पाठवले की अवैध दरवाजे बंद होऊ शकतील

संदीप डांगे's picture

4 Feb 2016 - 9:22 pm | संदीप डांगे

ड्रग्सचा धंदा एवढा सोपा नाही सर.

माहितगार's picture

4 Feb 2016 - 9:38 pm | माहितगार

हम्म ते आहेच.

अहो इथल्या नेते लोकांना एकमेकांचे वाभाडे काढण्यातून वेळ मिळू देत, जनता काय वार्‍यावर असली तरी कुठे फरक पडतो.

गॅरी ट्रुमन's picture

5 Feb 2016 - 11:42 am | गॅरी ट्रुमन

सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात असे नसावे पण भारत सरकारच्या पॉलीसीतच नायजेरीयनांना अधिक संधी का ह्याचा शोध घेतला जाण्याची गरज असावी.

भारत सरकारच्या धोरणात नायजेरीयनना अधिक संधी असे काही असेल असे वाटत नाही. आफ्रिकन देशांमध्ये नायजेरीयाची लोकसंख्या सर्वात जास्त (१८ कोटी) आहे.त्यामुळे आपोआपच व्हिसाला अर्ज करणारे नायजेरीयन विद्यार्थी जास्त असल्यामुळे जास्त व्हिसा त्यांनाच दिले जात असावेत.अमेरिकेत चीनी आणि भारतीय विद्यार्थी जास्त का असतात त्याचेही हेच कारण असावे.आणि नायजेरीयन जास्त प्रमाणात असल्यामुळे "सर्व दाक्षिणात्य मद्रासी" या न्यायाने "सर्व आफ्रिकन नायजेरीयन" असेही म्हटले जात असावे :)

२००१ मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मी मॉडेल युनायटेड नेशन्स असेंब्ली या उपक्रमात सहभाग घेतला होता. शिवाजी विद्यापीठात शिकणारे काही आफ्रिकन विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले होते.माझ्या आठवणीप्रमाणे ते झिंबाब्वे देशातील विद्यार्थी होते.त्यावेळी एकाही भारतीय विद्यार्थ्याकडे भ्रमणध्वनी नव्हता पण या विद्यार्थ्यांपैकी अनेकांकडे मात्र होता.म्हणजे हे विद्यार्थी त्या मानाने श्रीमंत असावेत असा तर्क लढवून जर पैसे असतील तर मग शिकायला जायला भारत (आणि त्यातही आमचे छत्रपतींचे विद्यापीठ) सोडून इतर अनेक चांगली ठिकाणे सोडून ते भारतात का आले असावेत हा प्रश्न मला पडलाच.अमेरिका किंवा युरोपचा स्टुडंट व्हिसाबद्दल मला थोडीफार माहिती तेव्हा होती. पण भारताच्या स्टुडंट व्हिसाविषयी काहीच माहिती नव्हती.तेव्हा "युरोप किंवा अमेरिकेत जायचे सोडून भारतात का बरे आलास" हा प्रश्न मी थोडा आडवळणाने "भारताचा स्टुडंट व्हिसा मिळविणे युरोप किंवा अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळविण्यापेक्षा सोपे वाटले का" असा प्रश्न विचारला. त्यावर त्यानेही मला थोडे आडवळणानेच उत्तर दिले --"भारताचा व्हिसा पैसे देऊन होऊन शकला".आता हे पैसे अंडर द टेबल होते की रीतसर भरून होते हे तो विद्यार्थी जाणे किंवा भारतीय वकिलातील लोक जाणोत.

माहितगार's picture

5 Feb 2016 - 11:53 am | माहितगार

भारत सरकारच्या धोरणात नायजेरीयनना अधिक संधी असे काही असेल असे वाटत नाही.

मी सरकारी डाटा चेक करून बरीच वर्षे झाली पण जेव्हा चेक केला होता तेव्हा तरी भारतसरकारच्या सर्वाधिक स्कॉलरशीप क्वोटा नायजेरीयन्सना होता. तुम्ही म्हणता तसे लोकसंख्येचे कारण असू शकेल हे शक्य आहे अथवा ड्रग बिझनेस तिकडून चालणे आणि दोन्ही देशातील टेबलखालील देवाणघेवाण संस्कृती कारणीभूत असल्यास सांगणे कठीण.

माहितगार's picture

5 Feb 2016 - 11:59 am | माहितगार

भारताचा स्टुडंट व्हिसा मिळविणे युरोप किंवा अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळविण्यापेक्षा सोपे

युरोमेरीकन या बाबत व्हीसांबाबत एक सजगता बाळगतात ती म्हणजे येणार्‍याची स्थावर जंगम प्रॉपर्टी किती हे तपासून पहातात, हे म्हणजे इंडायरेक्टली आर्थीक स्थैर्य असलेल्यांनाच संधी देणे झाले. भारत अशा व्हीसाच्या अटी टाकत नसण्याची शक्यता आहे, युरोमेरीकन टोक गाठतात पण अल्प प्रमाणात भारतानेही अशा अटी टाकावयास हरकत नसावी.

माहितगार's picture

5 Feb 2016 - 11:30 am | माहितगार

बेंगलोरचा आफ्रीकन विद्यार्थ्यांवरचा हल्ला रेसीस्ट आहे की नाही या वरून वाद रंगतो आहे. कर्नाट्कच्या गृहमंत्र्यांनी ती अपघातातील एका स्त्रीच्या मृत्यू नंतरची दुर्दैवी चेन रिअ‍ॅक्शन होती असे म्हटले आहे. त्यावरून या फर्स्ट्पोस्टच्या लेखात हल्ला रेसिस्टच कसा आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात अंशतः तथ्य असे आहे की ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर त्यांचा रंग पाहिला गेला दुर्दैवाने वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचि भारतीय मॉब मेंटॅलिटीत या वेळी रंगाचा क्रम होता पण इतर वेळी जात,पंथ,धर्म,भाषा,प्रांत बाबत भारतीय मॉब सेम पद्धतीने वागतो म्हणजे चुकीचे वागण्यातील इक्वालिटी भारतीय मॉब व्यवस्थीत पाळतो. (भारतातील गुन्हेगारीतही बहुतांशवेळा वेगवेगळ्या जाती धर्म एकत्र नांदताना दिसतात तसे या वेळच्या बेंगलोर मॉब मध्ये हिंदू मुस्लीम एकत्र होते असे दिसते चुभूदेघे) अर्थात नित्या प्रमाणे माध्यमांनी एकाच बाजूचे रंगवणे चालू ठेवले आहे -बाहेरच्या विद्यार्थ्यांवर स्थानिकांचा रोष का आहे हे समजून घेण्यारे वृत्त्तांकनही समयोचीत असावे पण त्याचा अभाव दिसतोच. दैनिक हिंदू सारख्या दाक्षिणात्य वृत्त्पत्राच्या अग्रलेखाने हल्ल्याला रेसिस्ट ठरवताना वेगळेच टोक गाठले आहे. हिंदूच्या अग्रलेखातील खालील त्यांचा रंगवाद भारतीय रक्तात कसा मुरला आहे याबद्दल त्यांच्या अग्रलेखाचा खालील भाग पहा

....Indians’ cultural preference for fair skin is well known, and amply attested by the vast market for fairness creams. It is quite common to find people remark admiringly on how ‘fair’ a newborn baby is. And matrimonial advertisements are notorious for seeking ‘fair’ brides. ....

आफ्रीकन लोक रंगा बद्दल जेव्हा मला विचारत तेव्हा त्यांना भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने आफ्रीकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक डार्क रंगाचे कदाचित असू शकतील सावळ्या रंगाची संख्या जोडली तर अजूनच मोठी होईल बहुतांश कुटूंबात रंगाच्या विवीध छटा सहसा असतातच. आमची राम-कृष्ण ही महत्वाची दैवते गोरी नव्हती. गोर्‍या रंगाच भारतीय अ‍ॅप्रीसीएशन हे सहसा कौतुकाचा भाग म्हणून आहे गौरवर्ण नसलेल्यांच्या मग रंग कसाही असो सावळ्या रंगाचेही कौतुक होते नाही असे नाही. फर्स्टपोस्ट लेखामध्ये गोर्‍या मुली हव्या असलेल्या जाहीरातींचा उल्लेख आला आहे पण भारतात सावळ्या रंगाची मुले मुली सुद्धा भावी जोडीदार गोरा हवा असल्याची अट घालताना दिसून येतात. फेअरनेसक्रीम्स आणि कॉस्मेटीक्सचा आफ्रीकन मार्केट/खप भारतापेक्षा अधिक असावा. एक गोष्ट खरीकी रंग रुपावरून फारच कॅज्युअली कॉमेंट टाकूनजाणे हे भारतीय लोकांच्या आणि संस्कृतीच्या फारच अंगवळणी पडले आहे, स्वतः सावळे अथवा रूप स्वतःच्याच विशेषणास पात्र ठरत असलेतरीही विशेषणांचा वापर सर्रास आणि अनाठायी वापर होतो मिपावरही अकबराबद्दल कोणतेसे नाटक मागे लिहिले गेले होते त्यातही रंगाचा उल्लेख आला मी सांशंकता व्यक्त केली तर त्याला डिफेंडही केले गेले. मी एकदा एका युरोपीय व्यक्तिच्या गोर्‍या रंगावरून उल्लेख सकाळच्या वाचक प्रतिसादात मंकी असा आला मी तो युरोपियन माझ्या नात्याचा ना गोत्याचा पण सकाळचे आंतरजाल आवृत्ती पहाणारी व्यक्ती मला परिचीत होती मी रेसिस्ट कॉमेंट उडवण्यासाठी सुचवले पण त्यांनी त्यावेळी गांभीर्याने घेतले असे वाटले नाही. आपल्या संस्कृतीत आपण काय आपापसात सरावाने काही गोष्टी बोलून जातो पण इतरांची मने त्याने दुखावू शकतात हे आपण लोक लक्षात घेण्यास विसरतो का ?

माहितगार's picture

5 Feb 2016 - 11:33 am | माहितगार

दैनिक हिंदूच्या अग्रलेखाचा दूवा

या बेंगलोर प्रकारात आफ्रीकमुलीचा टिशर्ट फाटला/फाडला गेला यात तथ्य असावे असे या बातमीतील आय विटनेस अकाउंटवरून वाटते. -तिथे कुणि पोलीस सुद्धा उपस्थित असावा- हे दुर्दैवी आहे, त्याही पेक्षा अधिक म्हणजे तिने चालत्या बसमध्ये संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला असता तिला तशाच स्थितीत हुसकावून लावले गेले हे त्याही पेक्षा वाईट, बस मधील लोक असे का वागले असतील ?