मराठी भाषा दिन २०१६

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
29 Jan 2016 - 12:20 pm

नमस्कार

अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मायमराठीच्या गौरवदिनानिमित्त आपण मराठी बोलीभाषा सप्ताह २१-२७ फेब्रुवारी दरम्यान साजरा करत आहोत.

दर दहा मैलावर भाषा बदलते म्हणतात. मराठी भाषा तर दर प्रांती वेगळ्या लहेजात बोलली जाते. ऐकायला गोड वाटणाऱ्या आणि शब्दकळेने समृद्ध असणाऱ्या या बोली मराठी साहित्याला नेहमीच आगळा साज चढवत आल्या आहेत. भरुभरुन साहित्याचं देणं देत आल्या आहेत.किंबहुना प्रत्येक विषयातील शब्दाला पर्यायी मराठी शब्द देणे हे बोलीभाषेच्या अभ्यासाने नक्कीच साध्य होऊ शकेल. आणि म्हणूनच बोलीभाषा बोलली गेली पाहिजे,लिहिली गेली पाहिजे आणि वाचलीही. याच उद्देशाने निरनिराळ्या बोलीभाषा अवगत असणाऱ्या मिपाकरांना आपल्या बोलीभाषेत उदा. अहिराणी, वर्‍हाडी, चित्पावनी, मालवणी, कोंकणी, पुणेरी, लातुरी, बेळगावी, तंजावुरी, कोल्हापुरी, मावळी, सोलापुरी इ. मध्ये कथा, कविता, लेख लिहुन पाठवायचे आवाहन करीत आहोत.

लेख साहित्य संपादक या आय डी ला १५ फेब्रुवारीपर्यंत व्यनि करायचे आहेत.

आपल्या भरघोस आणि उत्साहपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत...

-साहित्य संपादक

भाषा

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

29 Jan 2016 - 12:26 pm | संदीप डांगे

आमच्या वर्हाळीचं नाव नाय घेतलं, आमाला वेगळा विदर्भ पाय्जे. ;-)

जोक्स अपार्ट.

कवितेसाठी गावंडेसायेब हायेत. कथेसाठी बापूसाहेब आहेत. लेख भालेरावसायेब, होबासराव - येकांद इनोदी येउद्या. चिनार भौ, तुमीपन. आजून कोन हाय रे बावा इदर्बाचं, कमांड पाय्जे हां फुल्ल भाशेवर.

प्राची अश्विनी's picture

29 Jan 2016 - 1:52 pm | प्राची अश्विनी

त्या बबन तांबेना पण घ्या, होउन जाऊदे.:)

बोका-ए-आझम's picture

29 Jan 2016 - 2:05 pm | बोका-ए-आझम

बबन तांबे वेगळे हो ताई.

खरेच तो मी नाही हो ताई. ३५ वर्षे पुण्यात रहातोय म्हणजे मी आता पुणेकरच !!
हो, पण मी कथा देऊ शकेन :-)

महासंग्राम's picture

29 Jan 2016 - 2:40 pm | महासंग्राम

डांगे अन्ना नाव लिवलं तुमीन, त्त टकूर खाजवा लागन आता उल्सक

अजया's picture

29 Jan 2016 - 12:31 pm | अजया

आली व-हाडी!

संदीप डांगे's picture

29 Jan 2016 - 12:34 pm | संदीप डांगे

हे हे, ओ अजयातै, इतकं बी शिरेस नोते ते. आता संपादकांस विनंती आमचा परतिसाद एडिटवा. गैरसमज नको पब्लिकला.

साहित्य संपादक's picture

29 Jan 2016 - 12:39 pm | साहित्य संपादक

राहू द्या. तेवढीच नावं मिळाली व-हाडी भाषेतलं साहित्य मागण्यासाठी!
धन्यवाद!

चांगला उपक्रम. विषय, थीम असे काही नाही का?

साहित्य संपादक's picture

29 Jan 2016 - 12:37 pm | साहित्य संपादक

थीम अशी नाही.बोलीभाषेतील कोणताही साहित्य प्रकार चालेल.किंवा भाषेवरील लेख पण चालेल.
यशोधरा,तुमच्याकडून कोंकणी/मालवणी भाषेतील काही छानसे लेखन हवेच आहे!

यशोधरा's picture

29 Jan 2016 - 12:43 pm | यशोधरा

नक्की प्रयत्न करेन.

माहितगार's picture

29 Jan 2016 - 12:53 pm | माहितगार

चांगला उपक्रम, शुभेच्छा !

बोका-ए-आझम's picture

29 Jan 2016 - 12:53 pm | बोका-ए-आझम

नसल्याबद्दल णिशेध!

संदीप डांगे's picture

29 Jan 2016 - 2:06 pm | संदीप डांगे

तुमी लिवा ना राजेहो. तुमचा उल्लेक रायला बावा आमच्या पर्तिसादात. तुमीबी लिवजा कैतरी.

असंका's picture

29 Jan 2016 - 2:10 pm | असंका

-))

म्हया बिलंदर's picture

29 Jan 2016 - 2:00 pm | म्हया बिलंदर

ले़खकांनी लेखातील बोलीभाषेतील टिपीकल शब्दांचे प्रमाण मराठीतील अर्थ सांगीतले तर आम्च्यासारख्यांसाठी जास्त सोयीचे होईल.

माहितगार's picture

29 Jan 2016 - 2:02 pm | माहितगार

+१

सूड's picture

29 Jan 2016 - 3:16 pm | सूड

प्रयत्न करतो.

सस्नेह's picture

29 Jan 2016 - 3:26 pm | सस्नेह

तुमची बोली कोंची म्हणं ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2016 - 10:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड्कोनी.

आँ अच्चं जाँलं तल. हे वाक्यं वाचलं नै का तुम्ही?

काय सांगतांव काय? तुमान्ला म्हायत नाय? त्या वयभव मांगल्यान् फ्येमस केल्याली भाषा बोलतांव आमी!! ;)

मुद्द्याचं राह्यलं...

बाणकोटी/संगमेश्वरी म्हणतात...वर रायगड जिल्ह्यात सुरु होऊन खाली राजापूरपर्यंत थोड्याफार फरकाने ब्राह्मणेतरांत ऐकायला मिळते.

पिलीयन रायडर's picture

29 Jan 2016 - 5:03 pm | पिलीयन रायडर

माझी कोणतीच अशी एक भाषा नाही. आई वडील मराठवाड्यातुन आलेले असल्याने त्या बोलीचा प्रभाव आहेच. पण मी पुण्यातच वाढले असल्याने अगदी पुणेरी नसलं तरी पुस्तकी बोलणं आहेच. इथे इतक्या लोकांचं वाचुन वाचुन भरपुर नवे शब्द आणि बोलण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उचलल्या आहेत. मधुनच त्याही डोकावतात. तसंही मी फार पटकन दुसर्‍याच्या भाषेचा लहेजा उचलते. मग मी काय लिहु? (जसं काय लिहीलंच पाहिजे असा आग्रह करतय कुणी =)) )

सस्नेह's picture

29 Jan 2016 - 5:07 pm | सस्नेह

..मीच करते की आग्रह तुला !
लिहीच्च बै तू कायतरी !

नीलमोहर's picture

30 Jan 2016 - 11:53 am | नीलमोहर

माझी पण कोणतीच अशी एक भाषा नाही. आम्ही मूळ खानदेशी पण पुण्यातच वाढले असल्याने अगदी पुणेरी नसलं तरी पुस्तकी बोलणं आहेच. अहिराणी आवडते पण एक वाक्यही येत नाही. त्यात आम्ही काही वर्षे इंदोर, लखनऊमध्ये राहिल्यामुळे इथे आल्यावर हिंदीतच बोलायचो, मग आमचे मामे-मावस भावंडं आम्हाला हसायचे :)
इथे इतक्या (मिपा)लोकांचं वाचून भरपूर नवे शब्द आणि बोलण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उचलल्या आहेत, मधूनच त्याही डोकावतात. मग मी काय लिहू ;)

मिपाबोली आहे ना आपण आत्मसात केलेली! कशी मिसलीस!
लिही मिपाबोलीत :)

चांदणे संदीप's picture

29 Jan 2016 - 6:58 pm | चांदणे संदीप

चांगला उपक्रम!
यानिमित्ताने वेगवेगळ्या बोलीभाषेतल्या कथा वाचायला मिळतील! :)

Sandy

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2016 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा !

-दिलीप बिरुटे

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2016 - 8:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

इदर्भातल्या साऱ्या अवकाली लेकराइच्या इकुन म्या संदीप भाऊ डांगे ह्याईले इनंती करू राहलो की त्याहीनं काही तरी अल्लग जिम्मक लिहाव!!!

उमरोतीचे शिरंग भाऊ ह्याइले बी इनंती हाय हे ख़ास बाकी बोक्या भाऊ , मंदार भाऊ, होबासराव कौन लिहू राहले अन कोन आमच्या संग प्रेक्षकाईत बसु राहले ते ते सांगजा हो! अन मनात आलं त सारे लिवसान लेको!! आपुन बी काई लिवतो!

बोका-ए-आझम's picture

29 Jan 2016 - 9:32 pm | बोका-ए-आझम

इसरून काउन रायले तुम्ही बाप्पा?

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Jan 2016 - 9:50 am | कैलासवासी सोन्याबापु

सॉरी व् ताई! तू बी लिहिजो!!

मधुरा देशपांडे's picture

1 Feb 2016 - 7:13 pm | मधुरा देशपांडे

सॉरी बिरी काय नाय हो सोन्याबापू आणि बोकाभाऊ. तसंबी सध्या इथं मिपावर साधं वाचाले वेळ भेटत नाई, त्यात बोलीभाषेत लेख लिहिण्याएवढी वर्हाडी येत नाही. तुमी लिवा समदे लोक, मले तेवढंच माहेरी आल्यासारखं वाटतं वाचून. वाट बघते.

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2016 - 1:29 am | श्रीरंग_जोशी

मायं नाव लिवल्याबद्दल धन्यवाद राजेहो. पर काय सांगू तुमाले, वऱ्हाडीमंधी लिवाले गेलो तं चार ओयींच्या पुढे लिवनं मुश्किल होते हो.

बाकी तुमच्यासंगं बाकी मंडयी हायेतच जे लिवतील वऱ्हाडीमधून. त्याचा आस्वाद घेनार हायेच.

अनन्त अवधुत's picture

30 Jan 2016 - 4:11 am | अनन्त अवधुत

तुमीबी लिवा

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 9:44 am | संदीप डांगे

लिवतो लिवतो. आपल्याजोळ किश्श्याईची काय कमी नायी लेक... =))

एस's picture

29 Jan 2016 - 8:49 pm | एस

पुणेरी? मराठीची बोलीभाषा?

पैसा's picture

29 Jan 2016 - 9:25 pm | पैसा

पुणेरी म्हंजे मराठी.

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 12:57 am | संदीप डांगे

आत्ता कसं, ब्यालंस झालं. :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2016 - 1:05 am | डॉ सुहास म्हात्रे

ह्याँ, छ्या छ्या. मराठी पुणेरीची एक बोलीभाषा आहे ! =))

एस's picture

30 Jan 2016 - 7:23 am | एस

एग्झॅक्टली!

अनन्त अवधुत's picture

30 Jan 2016 - 4:19 am | अनन्त अवधुत

बऱ्याच बोलीभाषा एकत्र वाचायला मिळणार

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Jan 2016 - 8:11 am | श्रीकृष्ण सामंत

मालवणी/कोकणी भाषेंचां भंडार आमच्याकडे आसां.कंटाळो येय पर्यंत लिहूची आमची तयारी आसां. आमचे लेख मिपावरच्या सगळ्यांक वाचूक समजूक लागले तर आम्ही तेच्या उपरांत आमच्या मालवणी भाषेतच कायमचे लेख,कविता मिपावर लिवत र्‍हंवू. काय समजल्यांत?

यशोधरा's picture

30 Jan 2016 - 9:14 am | यशोधरा

लिहा हो काका नक्की. वाचूक आसवच आम्ही.

आगरी बोलीत लिहु शकणारं कोणी आहे का इथे ?

स्पा बोलतो कधीकधी आगरीत, त्याला विचारा!! =))

पिशी अबोली's picture

30 Jan 2016 - 11:38 am | पिशी अबोली

मज येते त्या 'पद्ये' बोलीत मज लिहवयाचे हायच. कशें जमेल तशें लिहेन. पण हा तुमचा उपक्रम म्हणटात तो सामका उत्कृष्ट म्हणू येतो हां. बरें दिसले मनास सामके.

प्रीत-मोहर's picture

30 Jan 2016 - 6:23 pm | प्रीत-मोहर

Majaybi lihavyache hate. Tu bhati bhadhet lihi mi चhitpavanit lihte n koknitay prayatna karas harkat nay navhe?

पैसा's picture

30 Jan 2016 - 6:34 pm | पैसा

बरयात!!

बॅटमॅन's picture

1 Feb 2016 - 4:48 pm | बॅटमॅन

सामका/के = ?

प्रीत-मोहर's picture

1 Feb 2016 - 5:06 pm | प्रीत-मोहर

के.

प्रीत-मोहर's picture

1 Feb 2016 - 5:07 pm | प्रीत-मोहर

का किंवा के हे context प्रमाणे बदलते

बॅटमॅन's picture

12 Feb 2016 - 2:51 pm | बॅटमॅन

कुठला विभक्तीप्रत्यय बरोबर हे विचारत नव्हतो, तर त्या एकूण शब्दाचाच अर्थ विचारत होतो.

प्रीत-मोहर's picture

12 Feb 2016 - 3:27 pm | प्रीत-मोहर

सामका=अगदी

बॅटमॅन's picture

15 Feb 2016 - 12:18 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

नीलमोहर's picture

30 Jan 2016 - 11:59 am | नीलमोहर

वेगवेगळ्या बोलीभाषा एकत्र वाचायची संधी मिळेल यानिमित्ताने,
मिपाच्या सगळ्याच लेखमाला उत्कृष्ट होत आहेत, तसाच हा उपक्रमही खास होणार.
अशा विविध उपक्रमांमुळेच मिपा खूप आवडतं :)

अरे वा. मस्त उपक्रम. छान छान कथा, विषेषतः दर्जेदार लघुकथा वाचायल्या मिळाव्यात ह्या अपेक्षेत. लेख किंवा साहित्याच्या संख्या अमर्यादित असल्याने साहित्याचा मोठा खजिना वाचायला मिळेल.

प्रचेतस's picture

31 Jan 2016 - 12:14 am | प्रचेतस

सोलापुरीमध्ये लेख पायजेल दादूस.

एखाद्या प्रांतपरिसरातील कलेची ओळख करुन देणारे लेखन या नियमात बसते का ?

त्या प्रांताच्या बोलीत असेल तर काहीही चालेल.पण तिथल्या बोलीचे वैशिष्ट्य त्या लिखाणात हवे.

जेपी's picture

31 Jan 2016 - 11:26 am | जेपी

ओके

कपिलमुनी's picture

1 Feb 2016 - 5:16 pm | कपिलमुनी

टिंग्या मध्ये मावळी भाषेचा लहेजा खूप सुंदर पकडला आहे.
मावळामधले स्थानिक कातकरी किंवा शेतकरी ही भाषा बोलतात.
मप्ल , तुप्ल , किंवा गप वले ( गप रे , गप ग !) ढाळं म्हणजे उतार असे बरेच शब्द वेगळे आहेत.

हो.ऐकायला मस्तच वाटतं ते.
आहे का कोणी इथे? बर्याच दिवसापूर्वी ऐसीवर याबद्दल चर्चा वाचलेली आठवते.कोणीतरी मिपाकरानीच मावळी भाषेचा नमुना लिहिला होता.धागा शोधायला हवा.

महाराष्ट्र राज्याबाहेरील मराठीच्या बोलीभाषांचाही विचार व्हावा. उदा. तंजावुरी मराठी, बंगळूरी मराठी, इंदूर ग्वाल्हेर इत्यादी भागांतील माळवा प्रांतातील मराठी, बडोद्याची मराठी इत्यादी. तंजावुरी मराठीसाठी सिरुसेरिसाहेब, दिल्लीकर मराठीसाठी विवेक पटाईतसाहेब इत्यादींना आग्रह केला जावा.

काय म्हणता?

इस्राएलमध्येही मराठीभाषिक बरेच आहेत. तसेच मॉरिशसमध्येही. तिथूनही त्या-त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य असलेल्या मराठीत लेख येणे ही पर्वणीच ठरेल!

पैसा's picture

7 Feb 2016 - 7:43 am | पैसा

सहमत आहे!

पैसा's picture

11 Feb 2016 - 12:21 pm | पैसा

खंय गेले मरे सगले? वर्‍हाडी, बाणकोटी, मालवणी, कोंकणी, बेळगावी लोक खंय गेले सगले?

सगळीं मनशा हांगाच आसत, पुण बरोवक टाईम मे़ळना! =))

प्रीत-मोहर's picture

12 Feb 2016 - 3:42 pm | प्रीत-मोहर

तू बरो बरयता. बरय मरे कितेंय!!!

खटपट्या's picture

15 Feb 2016 - 9:10 am | खटपट्या

जल्ला १५ दीवस होवन गेले तरी अजुन कायवच नाआआय?

सूड's picture

15 Feb 2016 - 2:42 pm | सूड

कायंवच नाय तं तू लि!!

पैसा's picture

15 Feb 2016 - 2:46 pm | पैसा

कायतरी लिवलास नाय काय?

साहित्य संपादकांना विनंती: कृपया आपला इमेल आयडी देता येईल का? जेणेकरुन इथे खाते नसणारे पण लोक त्यांच्या बोलीभाषेतील लेख-कविता पाठवू शकतील.

सुनील's picture

15 Feb 2016 - 11:30 am | सुनील

हे योग्य वाटत नाही. त्यांना इथे खाते उघडण्यात काय अडचण आहे? संस्थळाचे सदस्य नसलेल्यांनी संस्थळाच्या स्पर्धेत भाग घेणे चुकीचे आहे.

पैसा's picture

15 Feb 2016 - 11:41 am | पैसा

स्पर्धा नाहीये सुनील. दिवाळी अंक वगैरे विशेष उपक्रमांसाठी आपण अपवाद म्हणून असे लिखाण स्वीकारतो. मात्र त्या लिखाणावर लेखक मिपा सदस्य नसेल तर त्याला चर्चेला काही उत्तरे देता येणार नाहीत, किंवा कोणाला काही शंका असतील तरी त्याचे समाधान करता येणार नाही. तेवढ्यासाठी तरी त्यांना सदस्यत्व घ्यायची विनंती केली तर बरे. अशांचे सदस्यत्व प्रशांतला सांगून लवकर मंजूर करून घेता येईल.

सूड's picture

15 Feb 2016 - 12:10 pm | सूड

ओके

अजया's picture

18 Feb 2016 - 12:38 pm | अजया

साहित्य संपादक इमेल आय डी
sahityasampadak.mipa@gmail.com

व-हाडी खान्देशी लोक कुठं राह्यले? एक पण एंट्री नाही.कुठे गेले सगळे?
अजून तीन दिवस आहेत.येऊ द्या लेख कविता.