बाईक ( ह्योसूंग अकिला )घेण्याबाबत सल्ला हवा आहे

देश's picture
देश in काथ्याकूट
19 Jan 2016 - 6:37 pm
गाभा: 

नमस्कार,

माझी सध्याची मोटार सायकल जुनी झाल्यामुळे नविन घेण्याचा विचार करतोय. बराच काळ पल्सर चालवल्यामुळे आता जरा हटके गाडी घेण्याचा विचार आहे.

क्रुझर ह्या प्रकारातली ह्योसूंग अकिला (२५०) घेण्याचा विचार करतोय. किंमत बघुन गाडी घ्यायला थोडा वेळ लागणार आहे हे तर नक्की.

तर सध्या कुणा मिपाकरांकडे/ओळखिच्यांकडे हि गाडी आहे का? असल्यास काहि चांगले / वाईट अनुभव ?

मी सेकंडहँड चा पण विचार करतोय. ह्याबाबत माहिती असल्यास क्रुपया सांगावे

देश

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jan 2016 - 7:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

भाऊ आम्ही सनातनी रॉयल एनफील्ड प्रेमी आहोत, तस्मात् आम्ही तुम्हाला पहिले रॉयल एनफील्ड घ्या असेच म्हणेन!!

तरीही जर तुम्हाला एकदम हटके अन वेगळा ब्रांड घ्यायचा असला तर रेनेगेड कमांडो चा सुद्धा विचार करावा

.

रेनेगेड कमांडो

देश's picture

19 Jan 2016 - 10:20 pm | देश

सोन्याबापु,

आपले बुलेट प्रेम जगजाहीर आहेच :-) . बुलेटचा विचार केला होता पण 'हटके' चा किडा डोक्यात बसल्यामुळे सध्या त्याचा विचार बाजुला सारला आहे

रेनेगेड अजुन भारतात आली नाही आणि अजुन त्यांच्या विक्रि आणि सेवेची कल्पना नसल्यामुळे जरा साशंक आहे

देश

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jan 2016 - 10:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

रॉयल एनफील्ड हिमालयन बद्दल विचार केलात का? मिड २०१६ मधे लॉन्च आहे एस्टिमटेड प्राइस एक लक्ष ऐंशी हजार असेल असे म्हणतात

देश's picture

19 Jan 2016 - 10:54 pm | देश

हिमालयन ही ' नेकेड बाइ़क ' प्रकारातली दिसते (केटीम ) आणि मला हवी आहे ती भारदस्त दिसणारी ..थंडरबर्ड सारखी (पण थंडरबर्ड नाही :-) )

देश

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 6:08 pm | मयुरMK

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 6:09 pm | मयुरMK

गणेश उमाजी पाजवे's picture

19 Jan 2016 - 7:32 pm | गणेश उमाजी पाजवे

hyosung

ह्या क्रुजर ला भारतात येऊन आता जवळपास दशक उलटून गेलंय. २००३ साली पहिल्यांदा हि क्रुजर भारतात लौन्च झाली. बाईकला पुढे डिस्क ब्रेक आहे पण मागे नाही आहे. गाडीच्या ऑन रोड किमतीच्या मानाने (३००००० रु) हि खटकणारी गोष्ट आहे. हीच एक गोष्ट सोडली तर ताकदीच्या मानाने (२४९ cc) गाडीची किमत अगदी योग्य आहे. माझ्या मित्राकडे हि गाडी आहे व मी हि स्वतः चालवून पहिली आहे. मित्राला हि गाडी हायवे ला ३० किलोमीटर व शहरी ट्राफिक मध्ये २० ते २५ किलोमीटर मायलेज देते. क्रुजर असल्याने लांबच्या प्रवासासाठी अगदी योग्य आहे पण पुणे किवा मुंबई सारख्या ठिकाणी गाडीच्या लांबी रुंदी मुळे ट्राफिक मधून गाडी काढताना त्रास होऊ शकतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्योसंग ची सर्विस सेन्टर्स खूप कमी आहेत त्यामुळे हा मुद्दा देखील विचारात घ्या.

renegade

UM Global Renegade Sport S

http://autos.maxabout.com/bikes/um-global/renegade/renegade-sport-s

जाता जाता हि गाडी देखील विचारात घ्या. किंमत फक्त २००००० आहे.

देश's picture

19 Jan 2016 - 10:36 pm | देश

प्रतीसादा बद्दल धन्यवाद

ह्योसंगचा विचार करतोय कारण त्या गाडीच्या रेंज मध्ये अजुन दुसरी गाडी दिसली नाही आणि गाडी भारतात येउन बरेच वर्षे झाली आहेत. वर सोन्याबापुंनी पण रेनेगेड सुचवीली आहे पण गाडीचा रिव्हीव्यु येइ पर्यंत वाट बघावि लागणार आहे.

अवांतर - रेनेगेड कमांडो/स्पोर्ट चा इंजीन ब्लॉक गाडीच्या मानाने फारच लहान वाटत नाही का?

देश

गणेश उमाजी पाजवे's picture

20 Jan 2016 - 6:32 pm | गणेश उमाजी पाजवे

रेनेगेड चा इंजिन ब्लॉक लहान वाटतो खरा. पण माझ्या मते ह्योसंग अकिला पेक्षा सोन्याबापू व मी तुम्हाला दाखवलेल्या रेनेगेड बाईक ची डिझाईन अधिक सरस वाटतात. शेवटी निर्णय तुमचा आहे. शुभेच्छा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jan 2016 - 8:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो तुम्ही ब्लॉक बघू नका सीसी बघू नका टेक्निकल comparison करा अन कुठले मॉडेल जास्त टॉर्क देईल ते पहा असे सुचवतो तुम्हाला!

देश's picture

21 Jan 2016 - 3:05 pm | देश

पॉईंट आहे . टॉर्कच्या बाबतीत अकिला बरीच पुढे आहे पण बाकिचे पॅरामिटर्स पण बघुन घेइन

देश

वेल्लाभट's picture

20 Jan 2016 - 7:19 am | वेल्लाभट

ह्योसंग एस टी ७ जबरा आहे. साडेचार लाख.
आय लाइक ह्योसंग बाइक्स. हटके. आणि गुड लुकिंग. बाकी अनुभव नाही.

देश's picture

20 Jan 2016 - 3:44 pm | देश

... तर एकदम झकास गाडी आहे ! ह्या गाडीची खरी मजा लाँग ड्राइवलाच !

देश

वेल्लाभट's picture

20 Jan 2016 - 3:53 pm | वेल्लाभट

सिरियसली!
जीव्ही २५० क्रूजर पण भारी

देश's picture

20 Jan 2016 - 6:33 pm | देश

म्हणुनच ..तीच बघतोय :-)

देश

मिनेश's picture

20 Jan 2016 - 8:20 am | मिनेश

हार्ले डेविडसन स्ट्रीट घ्या. मस्त आहे एकदम.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Jan 2016 - 11:56 am | अनिरुद्ध.वैद्य

बाईक मस्तय, पण सर्विसला प्रॉब्लेम्स खूप ऐकिवात आहे. अकिला पर्फोर्मंस उत्तम आहे. आपण सर्व्हिससेंटर्स बाबत विचारपूस करावी.

हार्लेची स्ट्रीटसुद्धा चांगली आहे. पण परत तेच, सर्विसला कुठ कुठ जाणार.

बाईक घेतांना मेजर प्रॉब्लेम्स नंतर चालवण्यात येतात त्यामुळे कुठे सर्व्हिस सेंटर, किती दूर आहे, किती वेटिंग असणार, स्पेअरपार्ट अव्हेलेबिलीटी हे सगळ तपासून घेणे.

जर हटकेच करायची असेल तर कस्टम बाईक्स ह्यापेक्षा अजून जबरी मिळतील, ह्याच रेंज मध्ये. बुलेट/ थंडरबर्ड घ्यायची, तिला एखाद दीड लाखात मोडीफाय करून फिरवायची. त्यात बुलेटवाले सगळी सर्व्हिसिंग करून देतील.

देश's picture

20 Jan 2016 - 6:42 pm | देश

पुण्यातले सर्विस सेंटर कंपनी संचालीत आहे. बहुदा हे भारतातले एकमेव कंपनी संचालीत असावे (चु.भु.दे.घे.) . त्यामुळे सर्विसची काळजी वाटत नाही (पुण्यात असे पर्यंत तरी )

देश

हेमन्त वाघे's picture

20 Jan 2016 - 5:37 pm | हेमन्त वाघे

भारतीय कायद्यानुसार कस्टम बाईक्स या बेकायदेशीर ठरतात.
पूर्वी पोलिस काही करायचे नाहीत पण आता ते कडक होत आहेत
तसेच अपघात झाल्यास बर्याच अडचणी येवू शकतात. आणि कंपनी ची warranty मोडीफाय केल्यावर कंपनी द्यायला बांधील नाही
http://www.team-bhp.com/forum/motorbikes/95530-custom-choppers-they-stre....हटमल

http://www.team-bhp.com/forum/motorbikes/120860-pics-ride-report-vardenc...

" How does one obtain an RTO registration for such a bike? Given that there is a choice of engines, the engine number must match the one on the RC book. If there is an old bike that is customized, at the time of FC renewal, one needs Crash Guard, Pillion Rail and Saree Guard. These obviously not only are not present but cannot be installed given the type of design. Change of engine will also not tally.

One may not like the RTO rules but until the same is changed, one has to follow them.

It is not only illegal but also dangerous to ride an unregistered bike as there will be no insurance on such vehicles (as it is not registered) and by riding an uninsured vehicle (or one which had insurance before modification but where a claim will certainly be rejected on account of modification without insurer's approval) jeopardizes safety not only to himself but to third party road users and is contrary to road rules.
"

तसेच हार्ले नक्कीच चांगली पण किमतीत खूप आहे

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Jan 2016 - 8:53 pm | अनिरुद्ध.वैद्य

परत रजिस्टर करावी लागते. फिटनेस सर्टिफिकेट आणि इतर बाकीच्या गोष्टी, जे डीलर गाडी विकत घेतांना आपल्याला करून देतो.

तर कागदोपत्री, सगळे सर्टिफिकेट असल्यास कस्टमला प्रॉब्लेम नसावा.

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 6:00 pm | मयुरMK

हेमन्त वाघे's picture

20 Jan 2016 - 11:08 pm | हेमन्त वाघे

@ अनिरुद्ध.वैद्य - आपण हे कशावरून सांगत आहात ?

कोठलीही गाडी भारतात modify केल्यास तिचे पुनर्परीक्षण करावे लागते ... तेही आदिकृत सरकारी संस्थात ....
आपण कोठल्या कायद्याच्या आधारे हे विधान करीत आहात ?

Section 52 in The Motor Vehicles Act, 1988
1[52. Alteration in motor vehicle.—
(1) No owner of a motor vehicle shall so alter the vehicle that the particulars contained in the certificate of registration are at variance with those originally specified by the manufacturer:3[52. Alteration in motor vehicle.—(1) No owner of a motor vehicle shall so alter the vehicle that the particulars contained in the certificate of registration are at variance with those originally specified by the मानुफाक्टुरेर

कायद्यानुसार गाडीचा रंग बदलाने सुद्धा गुन्हा आहे माहित आहे का ?

ह्या बातम्या वाचा

http://archive.mid-day.com/news/2009/mar/200309-Mumbai-News-Car-makeover...

आता हि प्रश्नोत्तरे वाचा

http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/55383-own-modifi...

How to get modifications approved
> First, get the modification plans approved by the original car maker

How? Does the rule say who/what dept in the original car maker's office is qualified (or has the requisite powers as per statute) to approve a proposed modification?

> Modify the car according to the approved plan

When modifying a building structure, it is compulsory to submit a plan made by a qualified architect. In a car's case, what compulsory degree is required for the modifier before he is allowed to make a plan?

> Get the modified car approved by the original car maker

Again, does the rule say who/what dept in the original car maker's office is qualified (or has the requisite powers as per statute) to approve a modification? Secondly, what are the remediations in case deviation from a plan is found?

> If approved, the owner has to get the car certified at one of three government-approved certifying agencies

Homologation in India is an exhaustive process where the car is put through extensive testing and pounding around tracks. This is why manufacturers (when homologating a particular model) have to write off the particular car which is being used for homologation. What in an individual's case? Would I like to take back my precious baby after it has been ripped, stripped and tested by government agencies? Would you?

> Once cleared by them, an RTO certificate will enable the owner to drive around town without being pulled उप

असो Automobile Engineering शिकताना थोडा अभ्यास केला होता - नंतर भले हि कधी हि Automobile industry त काम केले नसो..

मागे पिझ्झा डिलीवरीच्या मोटरसायकल लायनीने जप्त केल्या होत्या मॉडिफिकेशन केले म्हणून. त्यांचा तो मागे पिझ्झा ठेवायचा बॉक्स अस्तो त्या मॉडिफिकेशन्ला परवानगी नव्हती असं काही तरी पेपरला आलेलं. मला वाटतं दहा बारा वर्षं तरी झाली आता त्याला.

आता परत त्या रस्त्यावर दिसतायत खरं..

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Jan 2016 - 5:15 pm | अनिरुद्ध.वैद्य

कोठलीही गाडी भारतात modify केल्यास तिचे पुनर्परीक्षण करावे लागते ... तेही आदिकृत सरकारी संस्थात ....
>>

नाही माहिती हो डीटेल्स! म्हणूनच मी कागदोपत्री म्हणालो :)

जर मॉडीफाय केलेल्या गाडीचे एआरएआय कडून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन परत रजिस्टर केले तर चालत नाही का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2016 - 10:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चालते. पण ARAI बरोबर मुळ कंपनीकडुनही डिझाईन सेफ असल्याचं प्रमाणपत्रं मिळवावं लागतं. ते खुप डोकेदुखीचं काम आहे.

हेमन्त वाघे's picture

22 Jan 2016 - 10:21 pm | हेमन्त वाघे

Homologation in India is an exhaustive process where the car is put through extensive testing and pounding around tracks. This is why manufacturers (when homologating a particular model) have to write off the particular car which is being used for homologation. What in an individual's case? Would I like to take back my precious baby after it has been ripped, stripped and tested by government agencies? Would you?

कॅप्टन जॅक स्पॅरो - हे आदिकृतपणे कोणी केलेले आहे का?

ARAi च्या चाचण्या जवळजवळ distructive testing मध्ये येतात .. तर मग ती गाडी फिट कशी राहील ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Jan 2016 - 6:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गाडी मॉड करता तेव्हा ती किती प्रमाणात मॉड केलीये आणि त्या मॉडचा गाडीमधे काय उपयोग होतोय? ह्याप्रमाणे गाडीच्या चाचण्या ठरतात.
उदा: तुम्ही गाडीच्या इंजिनमधे मॉडीफिकेशन केलयं आणि गाडीला हाय स्पीड (इंजिन स्पीड गाडीचा नव्हे) टर्बो बसवलाय तर गाडीच्या इंजिनाची चाचणी घेतली जाईल. हाय आर.पी.एम. रेंजमधला टर्बो असेल तर साहजिक गाडी जास्ती आर.पी.एम. वर चेक होते. त्यामधे प्रत्यक्ष स्पीड टेस्ट आणि रँप टेस्ट अश्या दोन्ही चाचण्या होतात. गाडीचा पॉवर गेन किती आहे ते पाह्तात. इंजिन तेवढी ताकद सहन करु शकेल का ह्याचा अभ्यास केला जातो.

आता हेचं लो आर.पी.एम टर्बो असेल तर चाचण्या बदलतील. डायनामो टेस्टला दुय्यम महत्त्व प्राप्त होईल कारण टर्बो स्पुलिंग लो आर.पी.एम. ला होत असेल. इंजिनावर तुलनेने कमी ताण असतो.

ट्वीन टर्बो चार्जर लावलात तर वरच्या सर्व चाचण्या कराव्या लागतात.

आता तुम्ही फक्त एक्स्टेरिअयर मधे बदल केले असलेत तर.

तुमच्या गाडीच्या एक्स्टेरियर चेंजेस मधे कुठलेही धारदार भाग येत नाहीत ना? केलेल्या बदलांमुळे गाडीच्या ग्राउंड क्लिअरन्स मधे किती फरक पडलाय? जर खुप फरक असेल तर गाडी रोल ओव्हर नं होता किती वेगाने वळु शकेल ह्याची सपोर्ट व्हील लाउन चाचणी (भारतात ही होत नसावी.). गाडीच्या चासीचा क्रमांक.
गाडीच्या मुळ चासीमधे बदल करायला भारतामधे बंदी आहे. (अनलेस पुर्वपरवानगीचे सोपस्कार पार पाडलेत). तुम्ही चासीमधले भाग वाढवु शकता पण कमी करु शकत नाही.

बराचं मोठा भाग आहे हा.

दुचाकीच्या परवानग्या तुलनेनी पटकन मिळतात.

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 12:12 am | संदीप डांगे

कॅप्टन, इसीबातपेएकधागाहोजाय!

हे मग कश्या काय कस्टम बाइक बनवतात? त्या पण एवढ्या महाग :O

http://www.vardenchi.com/

हेमन्त वाघे's picture

22 Jan 2016 - 9:49 pm | हेमन्त वाघे

@अनिरुद्ध.वैद्य

आपला प्रश्न - जर मॉडीफाय केलेल्या गाडीचे एआरएआय कडून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन परत रजिस्टर केले तर चालत नाही का?
--
याचे उत्तर आधीच दिले आहे ..

Homologation in India is an exhaustive process where the car is put through extensive testing and pounding around tracks. This is why manufacturers (when homologating a particular model) have to write off the particular car which is being used for homologation. What in an individual's case? Would I like to take back my precious baby after it has been ripped, stripped and tested by government agencies? Would you?

आपण पूर्ण वाचलेले दिसत नाही . किंवा आपल्याला इंग्लिश समजले नाही - write ऑफ म्हणजे गाडी भंगारात काढणे .

@निलापी
याचेही उत्तर दिले आहे .

http://www.team-bhp.com/forum/motorbikes/120860-pics-ride-report-vardenc...

These Bikes are not legal atall, although the builders say they make some sort of arrangement with rto, it is highly doubtful.

It is not only illegal but also dangerous to ride an unregistered bike as there will be no insurance on such vehicles (as it is not registered) and by riding an uninsured vehicle (or one which had insurance before modification but where a claim will certainly be rejected on account of modification without insurer's approval) jeopardizes safety not only to himself but to third party road users and is contrary to road rules.

त्याच धाग्यात

28th May 2012, 15:१६

I don't know much about other cities/states, but Mumbai traffic police are extremely strict on car/bike mods. If you drive a custom made vehicle with any kind of mods, especially during peak police checkup times (non-peak traffic), you will get caught at almost every signal. If not by traffic cops, it will be at naka bandi checkposts, and if not there - then during RTO drives. A sample link for your perusal : Too fast, too noisy: Fancy bikes on police radar now, News - Cover Story - Mumbai Mirror

In fact I remember last year a specific drive where Vardenchi bikes where targeted and if I am not mistaken, the owner (Mr Varde himself) was called in for questioning. I even remember a few city made stretched limo's made from cars like contessa, ambassador and skoda's were seized by the RTO in similar drives.

दिवसेंदिवस पोलिस अधिक अधिक कडक होत आहेत ...पूर्वी जे चालत होते ते आता चालत नाही . आणि अपघात आणि विम्या बद्दल हि विचार करावा लागेल.

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 4:04 pm | टवाळ कार्टा

क्रूझर घेणार तर खालील बाबी विचारात घ्या

एक बजाज सोडली तर बाकी सगळ्या कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर नेटवर्क फार कमी आहे (यात ह्योसंग्/रेनेगेड/हार्ले ई. सगळे आले)
बजाज अ‍ॅव्हेंजर सोडून बाकी सगळ्या ट्वीन सिलिंडर क्रूझर्स आहेत....त्यामुळे स्पेअरपार्ट्स कैच्याकै महाग असतात...आणि लोकल मेकॅनिकच्या हातात अश्या बाईक्स देउ नयेत
ह्योसंग्च्या बाइक्स आहेत चांगल्या पण इंजीन रिफाईनमेंटमध्ये मार खातात
बजाज अ‍ॅव्हेंजरचे सस्पेंशन फारच वाईट वाटले मला...आणि इंजीन पॉवर लवकर कमी होते (५+ वर्षे झाल्यावर)

बजाज अ‍ॅव्हेंजर सोडून घ्यायची असेल तर हार्ले डेव्हिडसन स्ट्रीटचा नक्की विचार करा...ह्योसंगपेक्शा त्या नक्कीच चांगल्या आहेत...माझ्या मित्राने नुकतीच दुसरी हार्ले घेतली आहे...आणि हार्लेचे कल्ट स्टेटस आपोआप बाईकबरोबर येते ;)

कधीपासून या धाग्यावर प्रतिसाद द्यायला हात शिवशिवत होते...आत्ता बरं वाटलं :)

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 4:53 pm | संदीप डांगे

पूर्णपणे सहमत...

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Jan 2016 - 7:11 pm | अनिरुद्ध.वैद्य

मग आता एन्फिल्डच उरलीय की राजे ;) सोपी सुटसुटीत !

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Jan 2016 - 5:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओनली एनफील्ड!! :D

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 6:11 pm | टवाळ कार्टा

बुलेटवाले आणि नॉन-बुलेटवाले असा काकू करायला दुसरा धागा काढा की...नैतर या धाग्याचे भरीत होईल :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Jan 2016 - 7:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

बेस्ट ऑप्शण!

काकासाहेब केंजळे's picture

26 Jan 2016 - 5:45 pm | काकासाहेब केंजळे

थंडरबर्ड घ्या, पण त्याला एक वर्षांच वेटींग आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Jan 2016 - 7:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

२ ३ महिन्याचं असत.

सत्याचे प्रयोग's picture

28 Jan 2016 - 5:14 pm | सत्याचे प्रयोग

आमची धाव बजाज avenger पर्यंतच

भुमन्यु's picture

2 Feb 2016 - 2:17 pm | भुमन्यु

आर.ई. हिमालयन लाँच किंमत साधारणतः २ लाख. http://www.msn.com/en-in/autos/autoexpo2016/royal-enfield-himalayan-launched-at-around-rs2-lakh/ar-BBp0skH?li=AAggbRN

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2016 - 2:22 pm | टवाळ कार्टा

मस्तय....२ व्हेरिअंट आहेत

मम्बाजी सर्वज्ञ's picture

2 Feb 2016 - 5:10 pm | मम्बाजी सर्वज्ञ

२ आठवड्या पूर्वी इथल्या लोकल रायडर्स ग्रूप मधल्या मित्राला मदत हवी होती म्हणून गेलो होतो, तेवा ह्योसंग ची ६५० ची बाईक पहिल्यांदा चालवली. ६५० आणि २५० मध्ये फार फरक नाही असं ऐकून आहे. झकास आहे. रायडींग एक्स्पीरियंस फारच भारी आहे. ६५० ची पावर जाणवते.१३० bhp काही कमी नाहीत. क्रुझर म्हणून बरी वाटली. ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी आहे असं माझं मत आहे (त्याला वाटत नवते तसे). ह्या गाड्या ४-४ तास पळवल्या तरी थकायला होत नाही, रायडींग पोझिशन कम्फर्टेबल आहे एकदम. बेल्ट ड्रीवन शाफ्ट आहे त्या मुळे थोडा ल्याग असावा असे वाटते. एकूणच कृझर्स थोड्या धीम्या असतात पण जादूच्या सतरन्जीसारख्या असतात. आणखी एक विचित्र गोष्ट बघितली ती म्हणजे handle bar काढता येत नाही, पूर्ण चिमटा बाहेर काढून बदलावा लागतो. २५० अशीच आहे कि नाही मला माहित नाही पण चेक करून घ्या एकदा.

त्याला इंडिकेटर्स बदलायचे होते, १० मिनिटात एका बाजूचे दिवे बदलून झाले पण! माझ्या (स्पोर्ट्स) मोटारसायकल वर इंडिकेटर काढायला पूर्ण फ़ेअरिङ्ग काढायला लागते, त्यातच २०-१५ मिनिटे जातात, त्या नंतर बाकीचे उद्योग. नेकेड किवा क्रुझर बाईक्स वर मेंटेनन्स वर फार कष्ट करावे लागत नाहीत असे आता माझे मत झाले आहे.

http://cycle-ergo.com/
इथे पहा, क्रुझर आणि बाकीच्या रायडींग पोझिशन मधला फरक दिसेल.
बाय द वे तुम्ही मोटारसायकल कोणत्या कारणासाठी वापरणार आहात(!) त्यावर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर दूर पल्ल्याचे रायडींग असेल तर क्रुझर शिवाय पर्याय नाही, नाही तर नेकेड किवा स्पोर्ट्स बर्या आहेत.

तुम्हाला जर बायको ला किवा मैत्रिणीला फिरवायचे नसेल न तर क्रुझर पेक्षा सुसाट बुलेट३५० किवा ५०० घेऊन टाका. ६ महिने वाट बघण्याच्या लायकीची आहे ती. फक्त मोटारसायकल बरोबर क्लच वायरची भेंडोळी जवळ ठेवा म्हणजे झाले :-)

आता भारतात ट्रायाम्फ च्या बाईक्स मिळतात असं ऐकलय. एक्स्प्लोरर आणि टायगर भारी आहेत. संधी मिळत असेल तर टेस्ट राईड घेऊन पहा...

कपिलमुनी's picture

2 Feb 2016 - 5:30 pm | कपिलमुनी

वेबसाआइट भारी आहे.

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2016 - 7:26 pm | टवाळ कार्टा

६५० आणि २५० मध्ये फार फरक नाही असं ऐकून आहे.

लुक्स मध्ये फरक आहे

६५० ची पावर जाणवते.१३० bhp काही कमी नाहीत.

७४ bhp ....पण हे सुध्धा कैच्याकै भारी आहे :)

ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी आहे असं माझं मत आहे

क्रूझर बाइक्सना ग्राउंड क्लिअरन्स कमीच असतो

ह्या गाड्या ४-४ तास पळवल्या तरी थकायला होत नाही, रायडींग पोझिशन कम्फर्टेबल आहे एकदम.

पण रस्ता खड्डे नसलेला असेल तरच...नाहीतर पाठीवर गचके जास्त लागतात कारण गचक्यांचा प्रभाव पायांनी कमी नाही करता येत

आता भारतात ट्रायाम्फ च्या बाईक्स मिळतात असं ऐकलय. एक्स्प्लोरर आणि टायगर भारी आहेत.

नुस्त्या भारी नाही...भारीच्च आहेत :)

मम्बाजी सर्वज्ञ's picture

2 Feb 2016 - 8:04 pm | मम्बाजी सर्वज्ञ

ह्म्म्म्म....माझी लक्षात ठेवण्यात चूक झाली. हि गाडी 79bhp आहे. तरी पण छानच आहे. कृझर्स ना क्लेअरन्स कमी असतो हे खरे आहे पण हिच क्लेअरन्स जास्तच खाली वाटतो. मी गाडीच्या उंची बद्दल किवा गाडीवर बसल्यावर जी उंची जाणवते त्याबद्दल बोलत नाही आहे. चालवताना २-३ वेळा ग्यारेज च्या दारात, स्पीड ब्रेकर वर, असमान सरफेस वर exhaust चा काही भाग टेकल्याचे जाणवत होते. आधी आम्हाला वाटत होते कि सस्पेन्शन जास्तच सेन्सिटीव आहे (जे कि कृझर्स मध्ये असते) पण नंतर जाणवले हा प्रकार गाडीच्या क्लेअरन्स मुले होतोय. होंडा गोल्डविंग आणि रॉकेट रोडस्टर चालवून पहिली आहे या अगोदर तेवा काही असले प्रकार जाणवले नाहीत एवढं नक्की.

खड्ड्यांचा विषय काढला तर कुठलीच दुचाकी उपयोगाची नाही. आणि हा मुद्दा माझ्या पण डोक्यात आला होता. म्हणूनच मला त्रायाम्फ च्या गाड्या आठवल्या. शहरात फिरताना काय किवा कुठे आड वळणाच्या रस्त्याला ट्रेक ला गेल्यावर काय (कित्येक वेळा शहरातले रस्तेच 'आड वळणाचे' असतात), या गाड्या एकदम दणकट आणि उंच आहेत. टाटांनी ट्रक कापून सुमो बनवली आणि यांनी सुमो कापून ट्रायाम्फ...फक्त जर रोज जवळचा प्रवास करायचा असेल तर या गाड्या योग्य नाहीत. कोथरूड डेपो पासून जंगली महाराज रोड ला जायला त्रायाम्फ टायगर पेक्षा बुलेट बरी. पण १ तासात मुळशीला पोहोचायचे असेल कुठेही ट्राफिक मध्ये ना अडकता तर .... [:-)]

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2016 - 9:11 pm | टवाळ कार्टा

दण्डवत....एक्दा तरी अश्या बाईक्स वापरायच्या आहेत :(

मम्बाजी सर्वज्ञ's picture

2 Feb 2016 - 10:16 pm | मम्बाजी सर्वज्ञ

रॉकेट रोडस्टर = बुलेट आणि तत्सम गाड्यांना शेळ्या मेंढ्यान सारखा चिरडणारा रणगाडा.
प्रोब्लेम फक्त हा आहे कि मी माईक टायसन नाही - खिशाने आणि पर्सनालिटी ने पण.

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Feb 2016 - 5:27 pm | अनिरुद्ध.वैद्य

ट्रायम्फच शोरूम बघतांना नेहमीच वाटत ह्यानंतर बर्ड नंतर बॉनी! बर्ड नंतर बॉनी!
बाकीच्या गाड्या प्रचंड अवाढव्य वाटल्या. हाईट आणि पॉवर जबरी!

बुलेटनी सिंगल सिलेंडर काढून ट्विन सिलेंडर द्यायला हवे. व्हायब्रेशन असह्य प्रकार होतो त्यांच्यात आजकाल ९०च्या पुढे.
(बहुधा नव्या कारच्या स्मूथनेसमुळे बिचार्या एन्फिल्डचे व्हायब्रेशन्स फार फार जाणवायला लागलेत)

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपुर्वक आभार.

ह्योसुंग बाबत एका गाड्यांची पुनर्र्विक्री करण्यार्याकडे विचारपूस केली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे अकिला शहरात वापरणे अतिशय खर्चिक होइल कारण सिग्नल टु सिग्नल वाहतुकीमध्ये गाडीच्या स्पेअर पार्ट्स् ची खुप झीज होते. हि गाडी लांब पल्ल्याच्या प्रवासाकरीता बनलेली आहे. त्यामुळे मग बराच विचार करुन शेवटी खालीलपैकी एक घेणार आहे-

१. रेनेगेड स्पोर्ट्स एस - ह्या गाडीची विक्री आणि सेवा पुण्यात कधि सुरु होणार ह्यावर अवलंबुन आहे

नाहि तर

२. क्लासिक ३५० - कॉलिंग सोन्या बापु :-)

देश

टवाळ कार्टा's picture

5 Feb 2016 - 1:17 pm | टवाळ कार्टा

रेनेगेड लवकरच काही महिन्यांत येते आहे...क्लासिकचा विचार करत असाल तर ५०० ची डेझर्ट स्टॉर्म नाहीतर बॅटल ग्रीन घ्या :)

देश's picture

22 Apr 2016 - 6:04 pm | देश

नमस्कार,

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपुर्वक आभार. माझा बाईकचा शोध अखेर Honda CBR250R वर येउन संपला :-)

बाईकचा फोटो डकवतो आहे

देश

.

.

श्रीरंग_जोशी's picture

22 Apr 2016 - 10:16 pm | श्रीरंग_जोशी

नवी गाडी खरेदी केल्याबद्द्ल अभिनंदन अन या गाडीद्वारे होणार्‍या भटकंतीसाठी शुभेच्छा!!

शौक मोठी गोष्ट आहे :-) .

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2016 - 3:00 pm | टवाळ कार्टा

नवीन बाईकबद्दल अभिनंदन...दुसरा फोटो लैच आवडल्या गेल्या आहे
बाईकला "गाडी" न म्हणता बाईक म्हणून तुम्ही पुण्याबाहेरचे आहात हे दाखवून दिलेत ;)

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2016 - 3:01 pm | टवाळ कार्टा

बुलेट न घेउन शहाणपणा केलात*

*अज्जून एक काडी

देश's picture

25 Apr 2016 - 2:52 pm | देश

धन्यवाद टका आणि श्रीरंग_जोशी

टका, तुमचा अंदाज बरोबर आहे. मि जन्माने नसलो तरी कर्माने पुणेकरच आहे :-) ..गेली १६ वर्षे पुण्यात राहतोय

देश

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2016 - 4:32 pm | टवाळ कार्टा

तुम्ही कर्माने पुणेकर असे तुम्हाला वाट्टे हो...पुणेकरांना तसे वाटले पाहिजे ना...बाईकला गाडी न म्हणता बाईक म्हणून आधीच फाउल केलात तुम्ही...अस्सल पुणेकर सायकललासुध्धा गाडी म्हणतो =))

नमकिन's picture

28 Apr 2016 - 8:08 am | नमकिन

होंडा CBR250 चे नाव कुणीच सुचवले नाहीं ते अन्यथा ही पण बाद करावी लागली असती.;P
आलाबाजार नवीन? डुकाटी, बेनेली यांच्या अभ्यासात काय सापडले?
रंग पाहुन उगीचंच लहानपणी VCR वर पाहिलेला "रोबोकॅाप" आठवला.

देश's picture

29 Apr 2016 - 1:13 pm | देश

डुकाटी बघितली नाही. बेनेली आणि केटीम बघितल्या पण जो लुक होंडा CBR250 ला आहे तो मला ह्या गाड्यांमध्ये दिसला नाही.

देश

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2016 - 1:15 pm | टवाळ कार्टा

त्या नेकेड टाईपच्या आहेत...सीबर हि फेअर्ड टाईपची आहे

मी बजाज अवेंजर घेवून पस्तावलो आहे, 150 काहीच दम नाही या गाडीमध्ये.

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2016 - 12:40 pm | टवाळ कार्टा

गाडीत दम असणे याबद्दल तुमची व्याख्या काय आहे?

अभ्या..'s picture

29 Apr 2016 - 2:27 pm | अभ्या..

पल्सरची १३५, १५०, १८०, २००, २२० ही सगळी रेंज चालवली असेलच. फरक तुला म्हैतेच आहे की.
अ‍ॅव्हेंजर १५० घेण्यापेक्षा व्ही १५ घ्यावी. मस्त कॅफे रेसर आणि क्रुझरचा हायब्रीड लुक आहे. कमी किंमतीत मायलेजसह दणकटपण आहे.

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2016 - 2:48 pm | टवाळ कार्टा

दम गाडी मे नही...चलानेवाले मे होता है ;)

साभार - जॉनराव खळीवाले

शेजार्‍याकडे लुना विंग्ज हाय ३५ सीसी ची. पाह्य्जेल का? दमादमाने चलीव

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2016 - 2:59 pm | टवाळ कार्टा

=))
ते ज्याने विचारले त्याला विचार की

अभ्या..'s picture

29 Apr 2016 - 3:05 pm | अभ्या..

तुझा बैक्सचा धागा वर आण. पुढचा भाग लिव्हतो. ऑटोग्राफीक्सवर. मटेरैल रेडीय.

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2016 - 3:27 pm | टवाळ कार्टा

यापुढे मिपावर लिहावेसे वाटत नैये