असा रेहमान परत होणे नाही!

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
6 Jan 2016 - 12:12 pm

साधारण १९९२ चा नोव्हेंबर-डिसेंबर असावा

छान थंडी, पुण्यातली...

मोडेल कॉलोनी मध्ये...
मित्राच्या घरी...
मोठ्या टेरेस वर सगळे जमलेले,
बर्थडे पार्टी...
धमाल मस्ती संगीतखुर्ची केक आवाज मित्र गर्दी
आणि मी हळूच एका कोपऱ्यात ह्या सर्व मोह मायेतुन ज़रा वेगळा...
तो संगीत खुर्चीचा 'चित्त थरारक' कार्यक्रम संपल्यावर गाण्यांकड़े दुर्लक्ष करत मुलं आणि त्यांचे पालक आपआपलं उदरम भरणम करण्यात मग्न होते,
पण मी वेगळा...
त्या छोट्या टेपरेकॉर्डर पाशी,
माझी छोटीशी

हो हो तोच तो दिवस!
दिल है छोटासा... छोटीसी आशा
रोजा जानेमन, भारत हमको...
रुक्मिणी रुक्मिणी... ये हसी वादियाँ...
A साइड संपली की B...
असा माझा कार्यक्रम चालू होता माझा 'साइड बाय साइड'
ती मेग्नासौन्डची कस्सेट.. अजुन ही आठवते!
तेव्ह्हा रहमान कोण वगैरे काही माहीत नव्हतं!
पण जी काय जादू...
जो काय 'साउंड' होता त्या रोजा मध्ये!
स्वर्गीय!!!

पुढे बॉम्बे, हम से है मुकाबला च्या वेळी रेहमानचा रेहमान साहेब झालेला, सुरभी वगैरे मध्ये त्याची मुलाखत वगैरे म्हणजे... जिंकलच हो!

आयुष्यात २ पुस्तकच मनापासून आणि पूर्ण वाचली आहेत..
सचिन आणि रेहमान,
सचिनला पाहून आणि रहमानला ऐकून शाळेत्ले नंतर कॉलेजचे दिवस...
आता अजूनही सचिन संपला पण रेहमान...
नाही तो अखंड असतो कानात,
डोक्यात, ह्रुदयात, नसानसात रेहमान!

त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल मला बोलणं, किव्वा एकणं कधीच आवडलं नाही... तो हिंदू होता मग मुस्लिम धर्मं का स्वीकारला, हाच विषय लोकं खरडून काढतात, मग त्याची एकच शैली आहे... तोच तोच पणा जाणवतो, इस बार मजा नहीं आया, क्या तेरा रेहमान... आजकल नहीं जमता उसको! असं ऐकलं की माझी सटकतेच!

माझा रेहमान हां माझ्या पुरता मर्यादीत आहे!
त्यानी काहीही केलं ते मला मनापासून आवडतं,
मी वेडा आहे म्हणलात तरी चालेल कारण मी आहेच रेहमान वेडा, आणि मी एकटाच नाहीये...
माझे खुप असे मित्र आहेत की त्यांचा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे रेहमान!

मंदार बिडकर आणि मी... मित्र झालो जीवाभावाचे! कारण फ़क्त रेहमान! गाणं होतं 'गोपाला गोपाला'...
तो गोपाला अजुनही तसाच कानात घुमतो!
आमच्या अनमोल भावेनी आपल्या मुलीचं नाव ठेवले अरमान...
आता का ते विचारलात तर मेलोडी खाओ खुद जान जाओ!
माझ्या एका मित्रानं स्वतःचं टोपणनांव अमितचंद्रन् केलं, कारण काय तर रेहमान साउथचा!
आमचा ग्रुप आहे रहमानिया नावाचा...
रेहमानची गाणी ती पण लाइव परफॉर्म करणं म्हणजे... म्हणजे...
नाही हो नाही, नाहीच उपमा देता येत!
महा कठीण पेक्षा ही पुढचं काही असतं असा प्रकार!

असो... साहेबांचा मुळ प्रवास सुरु झाला रेडियो टीव्ही जिंगल्स, मग तमिळ चित्रपट..
नंतर हिंदी आता इंटरनेशनल...
म्हणतात ना संगीताला भाषा नसते! तसच...
तमीळ मधले .०१% शब्द माहीत असले तरी,
सर्व गाणी चाली आणि बारकाव्यासह ह्या मानवी ज्युक्बोक्स मध्ये कैद आहेत माझ्या!
अमुक अमुक गाण्यात ३ऱ्या मिनिटाला हा ठेका ऐक्लास का तू,
किव्वा सुरुवातीला अमुक अमुक जी ट्यून आहे तशीच त्याने अमुक अमुक गाण्यात वापरली आहे,
अश्या अखंड बारकाव्यांची देवाण घेवाण आमच्या रेहमान वेड्या जगात चालू असते!
त्याचा पुढील कार्यक्रम कधी आहे,
त्याचे नवीन चित्रपट कधी येणारे,
त्याच्याकड़े कुठलं नवीन वाद्य आलय...
अश्या विषयांची रेलचेल whtsapp ग्रुप वर अखंड चालू असते!
त्याच्या एफबी आणि ट्विटर पेजच्या अपडेट्स साठी सगळे आतुर असतात!

रेहमान बद्दलचा आदर अजुनच वाढतो जेव्हा त्याच्या शांत आणि मृदु व्यक्तिमात्वाचे किस्से जेव्हा वारंवार ऐकायला मिळतात...
कधीही कुठल्याही वादग्रस्त प्रकरणात त्याचा सहभाग नसतो! तो संगीतानी उत्तर देतो... जसा सचिन बैंटिंग करून द्यायचा!
त्याच्या संगीतानी तो आम्हाला घडवातो सावरतो आनंदीत करतो! दु:खात सुख दाखवतो...
तो देव आहे आमच्यासाठी!

पूर्वी पेक्षा सध्या कॉम्पिटीशन वाढल्ये...
शेवटी हे स्पर्धा जगच!
शंकर एहसान लोय, इलाय्यराजा, अमित त्रिवेदी,
सलीम सुलेमान, जातीन ललित, प्रीतम,
शांतनु मोइत्रा, विशाल शेखर
आणि अजुन काही संगीत दिग्दर्शक जबरदस्त काम करत आलेत...
काही अजुन करतायत,
पण रेहमान आणि इतर हे गणित आहे आपलं!

मला कोणी रेहमानच्या गाण्यांची तारीफ़ करताना ऐकलं की इतका आनंद होतो! की मग त्या माणसाला रेहमानची इतर गाणी कशी अजुन चांगली आहेत, मग ती ऐकवण्यात अणि स्वतः मंत्रमुग्ध होऊन ऐकण्यात जो काही परमानंद मिळतो त्याची स्वर्गाशीच तुलना!

त्याचं सर्वात आवडणारं गाणं विचारलत तर...
त्यासरखा खोल विषय माझासाठी अजुन कुठलाच नाही,
तरी त्यातल्या त्यात on loop वाले काही ट्रैक्स आहेत, उदाहणार्थ...
कभी ना कभी मधलं - तुम हो मेरी निगाहों पे छाए
न्यूयॉर्क नगरम / बोम्बे ट्यून / मौसम एंड इस्केप - स्लम डॉग मिल्लीनिअर / शब्बा शब्बा - दौड़ / मांगता है क्या - रंगीला / स्वदेस / देस की मिटटी - बोस / दो कदम और सही - मिनाक्षी / ये हसी वादिया - रोजा / तू बोले.. - जाने तू या जाने ना / ऐसे ना देखो - रांझणा / रेहना तू... - डेल्ही6
ही लिस्ट वाढतच जाइल... आता थांबतो!

मी थांबलो तरी चालेल...
पण हा माणूस नं थांबो त्याच्याकडून त्याच्या भक्तांना...
अखंड अमृतमयी संगीत-श्रीखंड लाभत राहो!

असा रेहमान परत होणे नाही,
आम्ही परख्ला...
आता तुमची बारी...
रेहमानजी!
तुम्हारी अदाओं पे मै वारी वारी... मै वारी वारी!
तुम्हारी अदाओं पे मै वारी वारी... मै वारी वारी!

A.R.Rahman

#सशुश्रीके

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

चिनार's picture

6 Jan 2016 - 12:30 pm | चिनार

मस्त लिखाण !!
तुमची रेहमान भक्ती दिसून येते आहे.

असा रेहमान परत होणे नाही!

अनुमोदन !!

सिरुसेरि's picture

6 Jan 2016 - 12:44 pm | सिरुसेरि

छान लेख . यावरुन "मुंबे वा अंबे वा" - सुल्लान ओरु कादल , "थोट्टा नी मलरुम" - न्यू ,"इन्न सुल्ल पोगिरा" - कुंडकोंडन कुंडकोंडन , "स्वासमे स्वासमे" - तेनाली , "मिल गये मिल गये दिलवर मेरे" - लव्हबर्डस अशा अनेक रेहमानच्या गाण्यांची आठवण झाली . अलिकडेच लिंगा या सिनेमामध्ये "मोना मोना गॅसोलीना" असा अचाट गाण्याचा प्रकार रहमानच करू जाणे.

मोगा's picture

6 Jan 2016 - 12:59 pm | मोगा

छान

तुषार काळभोर's picture

6 Jan 2016 - 1:00 pm | तुषार काळभोर

२ गाणी मी कितीही वेळा ऐकू शकतो.
ये हसी वादियां
अन्
ये जो देस है तेरा

बाकी भक्ती केली की ते श्रद्धास्थान होतं, मग त्याच्याकडून काही चुकूच शकत नाही, असं मत आपोआप बनतं.
मग ते श्रद्धास्थान रेहमान असो, वा आईवडील वा शिवाजी वा राम वा गांधी वा मोदी

विजुभाऊ's picture

6 Jan 2016 - 1:03 pm | विजुभाऊ

रहमान ने बाँबे चित्रपटात " हम्मा हम्मा " गाण्यात एकेठिकाणी स्केल चेंज केली आहे.
ती ऐकायला एकदं धमाल येते

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 1:23 pm | संदीप डांगे

संपूर्ण लेखाशी बाडीस...

ये हंसी वादीयाची सुरुवात माझ्या फोनची रिंगटोन होती तब्ब्ल पाच वर्ष अखंड. खास एडिट करून घेतली होती.

माझ्या कुठ्ल्याही वेळेच्या प्लेलिस्ट मधे ८०% रहमानच असतो. त्याच्यासारखी शांतता नाही.

एक रहमान दुसरा रफी...
सुकून पाने के लिये
बस ये दो ही है काफी!!!

बाबा योगिराज's picture

6 Jan 2016 - 4:15 pm | बाबा योगिराज

एक रहमान दुसरा रफी...
सुकून पाने के लिये
बस ये दो ही है काफी!!!

१००% खर आहे सैंडी.

रफ़ी वेडा बाबा.

दिल से सिनेमातली सगळीच्या सगळी गाणी संगीत बॉलीवुडमधला एक मेजर माईलस्टोन आहे!

- (रेहमानभक्त) सोकाजी

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 1:53 pm | संदीप डांगे

+१००

वपाडाव's picture

6 Jan 2016 - 3:56 pm | वपाडाव

सोत्रि, अगदी बाडीस. दिल से सिनेमामधलं प्रत्येक गाणं हे सोलो (कोरस सोदुन) आहे. हि स्पेश्ल्टी आहे त्याची.

अमित मुंबईचा's picture

6 Jan 2016 - 2:22 pm | अमित मुंबईचा

गेल्या २७ तारखेलाच आयुष्यात प्रथमच रहमान यांचे संगीत याची देही याची डोळा अनुभवता आले.

बाकी रंगीला या सिनेमाच्या गाण्यांचा उल्लेख आढळला नाही, हाय रामा हे गाण निव्वळ अप्रतिम

नितीनचंद्र's picture

6 Jan 2016 - 2:26 pm | नितीनचंद्र

फक्त " होणे नाही " यावरुन मी सगळ्या बातम्या वाचल्या. मग लक्षात आल की अस काहीही झाल नाही. माझा गैरसमज झाला.

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 2:30 pm | संदीप डांगे

माझंही असंच झालं अगदी सेम... मग जीव भांड्यात पडला.

पण जरा रेहमानसाहेबांनी आता सब्बाथ घेऊन नव्या संगीताच्या शोधात निघावे असे वाटते. आजकाल म्हणजे गेल्या दोनेक वर्षात खास टच नाही जाणवत, भिडत नाही हृदयाला पुर्वीच्या गाण्यांसारखे. ठिकठाक आहे. अपेक्षांचे ओझे जाणवत असेल कदाचित.

अजया's picture

6 Jan 2016 - 4:27 pm | अजया

सहमत.
मात्र लेख वाचून न राहवून दिवसभर रेहमानिया साजरा करत आहे!

संदीप डांगे's picture

8 Jan 2016 - 5:00 pm | संदीप डांगे

पूर्वी आणि आतामधे फरक आहेच.

पुर्वी पहिल्या फटक्यात गाणी मनाचा ठाव घ्यायची, आठवा छैय्या छय्याअ, जिया जले, ऐ अजनबी, दिलसे रे, रोजाची सगळी, मुकाबला ची सगळी. बॉम्बे, युवा, लगान, स्वदेस, पुकार, ती पहिल्या बीटपासून भीडायची.

आता वारंवार ऐकावी लागतात तरच भिडतात. हे साधारण जोधा-अकबरपासून सुरु झाले, गजिनि, रॉकस्टारमधे खूप जाणवले.
संगीत वाईट वा कमी प्रतीचे नाही तर भिडण्याची पद्धत बदलली आहे. अजूनही बरंच बदलंलं आहे. सवडी सवडीने लिहित जाईन. अर्थात बदल चांगला वा वाईट आहे अशातला भाग नाही. बदल फक्त बदल आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jan 2016 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

होना मीही टरकलो. :( (च्यायला आपल्याला कसं माहीत नाही इथपर्यन्त आलो होतो मी)

-दिलीप बिरुटे

-

स्मिता श्रीपाद's picture

6 Jan 2016 - 2:38 pm | स्मिता श्रीपाद

छान लेख...रेहेमान खरच एकमेव....
रोजा ची पारायणे केलीत...

बाकी
>>आता अजूनही सचिन संपला >>> यासाठी निषेध

खर आहे. ज्याला प्रतिभा किंवा नवनिर्मीती म्हणाव ते अस हुकमी नसत. मग बरेच वेळा पारंपारीक चाली पुनरुज्जीवीत केल्या जातात. काही वेळा काहीच नाही सापडल की मग लोकगीत त्याच्या मुळ चालीसकट येतात. सिनेमातर ठराविक वेळीच रिलीझ व्हावा लागतो ना. नाहीतर लाखाचे बारा हजार.

श्रीनिवास खळे किंवा बाबुजी सारखे आयुष्यभर नाविन्याने देणारे मोजकेच.

सगळ वाचलं पन लिष्ट मधी बक्कळ पैसं मोजुन बनवुन घेतलेल्या 'यारो इंडीया बुला लीया' का काय ते, त्या गाण्याचं काय नाव नाय दिसलं गड्या

माझ्याच भावना वाचल्यासारख्या वाटल्या....हायवे मधील सर्व गाणी खूपच सुरेख...माही वे ऐकताना आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाही. मणिरत्नम च्या नवीन मुव्हीतील मेन्ट्ल मनधील आणि कारा अटकारा अप्रतिम.

चे's picture

6 Jan 2016 - 7:55 pm | चे

त्याचा हिन्दी रिमेक येतोय.... गीतकार गुलझार आहेत

चांदणे संदीप's picture

6 Jan 2016 - 3:37 pm | चांदणे संदीप

लेख चांगला आहे!

फक्त....
आंधळ्याला आंधळा म्हणू नये किंवा पांगळ्याला पांगळा म्हणू नये त्या चालीवर....(अर्थात बाकी कोण आंधळे किंवा पांगळे नाहीत!)

रेहमानशिवाय इतर कोण आवडत असणार्यांना "फक्त रेहमान'च' चांगला, बाकी कोण नाही" असे म्हणू नये, एवढीच इच्छा!

बाकी, मलाही रेहमान आवडतो! तुमचा लेख वाचून लगेच "ये हसीन वादियां" लावलो बगा! :)

धन्यवाद,
Sandy

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 3:58 pm | संदीप डांगे

सँडीभाय, ऐसा कोन बोल्या रे!

"बाकी कोन नाय" चा नारा लावणारे अभागी बंधू अस्तात, त्यांजकडे दुर्लक्ष करणे...!

शान्तिप्रिय's picture

6 Jan 2016 - 4:19 pm | शान्तिप्रिय

सुंदर लेख.
रेहेमान एक अप्रतिम संगीतकार आहेत.
त्यान्ची लगान आणि स्वदेस मधील गाणी मला खूप खूप आवड्तात.
तसेच कून फाया कून हे रोकस्टार मधील गाणे हे एक पवित्र सूफीगीत आहे.

बाबा योगिराज's picture

6 Jan 2016 - 4:33 pm | बाबा योगिराज

रेहमानच्या गाण्या बद्दल एक गोष्ट मला फार आवडते. ती म्हणजे त्याच्या प्रत्येक गाण्यात एकदम छोटे छोटे आणि वेग-वेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला मिळतात. जे ऐकायला फ़ार फार मस्त वाटत.
रेहमान हां रेहमानच.

शंकर एहसान लोय, इलाय्यराजा, अमित त्रिवेदी,
सलीम सुलेमान, जातीन ललित, प्रीतम,
शांतनु मोइत्रा, विशाल शेखर
आणि अजुन काही संगीत दिग्दर्शक जबरदस्त काम करत आलेत...

ह्या यादीत विशाल शेखर आणि प्रीतम?
णीषेढ.

बाबा योगिराज's picture

21 Jan 2016 - 6:10 am | बाबा योगिराज

प्रीतमचा 'जब वी मेट' / 'बर्फी' मस्त होता ना

होता की, पन प्रीतम भौ गानेच्या गाने चोरतात, त्याला कसली तरी फ्रीडम म्हणतात. म्हणून णीषेढ.

तू णळी वर किंवा गूगल बाबाला विचारल्यास ह्या बाबतीत भरपूर माहिती मिळू शकेल

महासंग्राम's picture

6 Jan 2016 - 5:03 pm | महासंग्राम

रहमान च्या गाण्यात एक मात्र आढळते. शब्दांकडे फारच दुर्लक्श्य केले जाते.
कदाचित तो त्याचा दोष नसावा.
पण रहमानची गाणी ही फोर ट्रॅक साउंड वर ऐकायला मजा येते.
"मधुबन मे जो कन्हैया किसी गोपी से मिले" या गाण्यात ब्याक्ग्राउंडला कोकीळेचा आवाज दिलाय तो ऐकायला हेडफोन किंवा कार स्टीरीओच हवा. पण एकदा ऐकले की तृप्तीच्या पलीकडे पोहोचल्याचे फील येते

उदाहरण: छैय्या छैय्या गाणं...
गुलजार यांचं नितांत सुंदर गीत.

मोदक's picture

6 Jan 2016 - 5:37 pm | मोदक

सुंदर लेख..

रच्याकने.. ते दोन क्षण - भाग २ हा लेख कोणालाच कसा काय आठवला नाही?

पगला गजोधर's picture

6 Jan 2016 - 5:39 pm | पगला गजोधर

मला तर अजय-अतुल चे ''अप्सरा आली'' व ''माउली-माउली'''
एकताना, रहमानची कोपी केली की काय ? असे वाटलेल.

उपयोजक's picture

11 Jan 2016 - 9:00 pm | उपयोजक

मला तर अजय-अतुल चे ''अप्सरा आली'' व ''माउली-माउली'''
एकताना, रहमानची कोपी केली की काय ? असे वाटलेल.

खरचं!

प्राची अश्विनी's picture

6 Jan 2016 - 6:05 pm | प्राची अश्विनी

फारच सुंदर लेख!
रेहमानने मायकेल जॅक्सनच्या काही गाण्यांवर केलेले fusion तेदेखील raw , ऐकण्याचे परमभाग्य मला मिळाले आहे.तो अल्बम आला की नाही माहित नाही.

उगा काहितरीच's picture

6 Jan 2016 - 9:29 pm | उगा काहितरीच

मस्त !

अविनाशकुलकर्णी's picture

6 Jan 2016 - 11:15 pm | अविनाशकुलकर्णी

हा कट्टर बाटगा आहे..गिता म्हणण्यास त्याने नकार दिल्याचे वाचले.......

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 11:27 pm | संदीप डांगे

ही कट्टर काडी आहे.. संदर्भ न देता ठोकून दिल्याचे दिसते......

चिगो's picture

8 Jan 2016 - 12:53 pm | चिगो

हा कट्टर बाटगा आहे..गिता म्हणण्यास त्याने नकार दिल्याचे वाचले.......

बरं मग? तुम्ही 'कुराण' वाचता का रोज? त्यानी एकदा हिंदू धर्म सोडल्यावर त्यानी गीता वाचावी ही अपेक्षा का?

हे चित्रपट रेहमानच्या संगीताशिवाय अपुर्णच, बरेच सिनेमांची तर ओळखच रेहमानचे संगीत आहे एक वेळ चित्रपट विस्मरणात जाईल पण रेहमानचे संगीत नाही.

१ ऱोजा *****
२ बॉम्बे *****
३ रंगिला *****
४ दिल से *****
५ ताल *****
६ लगान *****
७ साथिया *****
८ स्वदेस *****
९ रंग दे बसंती****
१० दिल्ली ६ *****
११ जोधा अकबर *****
१२ रॉकस्टार *****

किसन शिंदे's picture

8 Jan 2016 - 9:08 am | किसन शिंदे

रेहमानशी निगडीत बर्याच आठवणी आहेत माझ्याही. त्याने संगीत दिलेले ताल, लगान, साथिया माझ्या यादीत सर्वात वर आहेत.

विशाल कुलकर्णी's picture

8 Jan 2016 - 9:34 am | विशाल कुलकर्णी

मस्त लेख..
रहमानचे संगीत मलासुद्धा खुप आवडते. नवीन रॉकस्टारची गाणी फक्त रहमानसाठी आवडली होती.

रेहमान सरांचं ''नेन्जुकुल्ले'' व जरिया हे सोंग ऐका

इरसाल's picture

8 Jan 2016 - 11:08 am | इरसाल

वंदे मातरम कसं आठवत नाही कुणाला, आपल्याला तर फार्फार आवडतं बुवा !

एस.योगी's picture

8 Jan 2016 - 11:48 am | एस.योगी

निषेध १. - "सचिन संपला ?"
निषेध २. - "हाय रामा यह क्या हुआ" - वगळून पुढे लिहिणे आपणास कसे शक्य झाले ?

संदीप डांगे's picture

8 Jan 2016 - 12:10 pm | संदीप डांगे

हरि अनंत हरिकथा अनंता...

एकविरा's picture

8 Jan 2016 - 12:41 pm | एकविरा

मस्त लिखाण. पिक्चर पहाताना लगान मधले पहिल्यांदा झनन झनन ऐकले तेव्हाची समाधि अवस्था अजून आठवते .

एस। योगी .अगदी बरोबर .
दोन्ही निषेध .

किसन शिंदे's picture

11 Jan 2016 - 11:50 pm | किसन शिंदे

ते 'घनन घनन' असं आहे.

प्रसाद१९७१'s picture

8 Jan 2016 - 2:15 pm | प्रसाद१९७१

सशुश्रीके - एक छोटी सुचना आहे. तुमचा लेख चांगला आहे पण त्याचे टायटल हे एखाद्या मृत्युलेखासारखे वाटते ( मला तरी ). कोणी मोठा माणुस गेल्यावर असे वाक्य वापरलेले दिसते. पटत असले तर बदला.

रेहमानच्या गाण्याबद्दल मला एक मोठा आक्षेप आहे की त्याला हिंदीचा वा उर्दूचा गंधही नाही. त्यामुळे आपल्या गाण्यात कुठले शब्द वापरले जात आहेत ह्याबद्दल त्याला काहीही सोयरसुतक नाही. मारून, ठोकून जे मिळतील ते शब्द बसवून बनवलेले संगीत हे आत्मा हरवलेल्या माणसाप्रमाणे वाटते. जुरासिक पार्क काय, टेक्सस काय, स्ट्रॉबेरीजैसी आखे काय, पिकासोकी पेंटिंग काय. कशाचा कशाला पत्ता नाही!

ओपी नय्यर एकदा म्हणाला की गीताचे बोल हे माणसाच्या आत्म्यासारखे आहेत, संगीत हे त्याच्या शरीरासारखे आणि आवाज हे कपड्यासारखे. चांगला माणूस निव्वऴ कपडे वा निव्वळ शरीराने बनत नाही तर आत्मा शरीर आणि कपडे तिन्ही आवश्यक आहेत. एक यशस्वी संगीतकार भाषेला, शब्दाला इतके महत्त्व देतो हे लक्षात घेण्याजोगे आहे.
https://www.youtube.com/watch?v=6POHWxS1_Wk

श्रीरंग's picture

9 Jan 2016 - 12:30 am | श्रीरंग

रेहमानचं "वंदे मातरम" मात्र प्रचंड cacophonic वाटतं.

तुषार काळभोर's picture

11 Jan 2016 - 5:44 pm | तुषार काळभोर

जुरासिक पार्क काय, टेक्सस काय, स्ट्रॉबेरीजैसी आखे काय, पिकासोकी पेंटिंग काय. कशाचा कशाला पत्ता नाही!
>>> हे शब्द रेहमानने लिहिले आहेत काय? त्याने तमिळ चित्रपटातील तमीळ गाण्याला संगीत दिलंय (जे खरंच भारीये, तुमच्या हिन्दी-उर्दूचा गंध असणार्‍या अन्नू मलिकने या चालीची चोरी केली आहे... दोनदा!!). कोणीतरी त्याचं तद्दन भ्रष्ट व छपरी हिन्दी रुपांतर केलंय, मग त्यात रेहमान चु़कीचा?

(सिनेमात भौतेकवेळा चाल आधी बांधली जाते व नंतर त्याला अनुसरून शब्द रचले जातात, हेसुद्धा दुर्लक्षित केले तरी चालेल)

एनी वे.. हिन्दी-उर्दू भाषेचा सुरेख उपयोग केलेली काही गाणी पटकन डोळ्यांसमोर आली.

मधुबनमें जो कन्हैय्या किसी गोपीसे मिले, राधा कैसे न जले..
छैय्या छैय्या / दिल से रे
ये जो देस है तेरा/पल पल है भारी/सांवरिया सांवरिया
रुत आ गयी रे
मुझे रंग दे/बुंदोंसे बातें
खामोशियां गुनगुनाने लगी
लुक्का छुपी बहुत हुई
जश्न-ए-बहारा
.
..
...
असो !

हुप्प्या's picture

11 Jan 2016 - 8:48 pm | हुप्प्या

आपल्या गाण्यात काय शब्द वापरले जात आहेत ह्याचे सोयरसुतक रेहमानला नसते. उत्तम संगीतकाराला ते असते. अन्नु मलिक हा उत्तम संगीतकार माझ्या लेखी तरी नाही. त्यामुळे त्याच्याशी तुलना अप्रस्तुत आहे.
ओ पी नय्यर सारखा संगीतकार असता तर त्याने असले शब्द खपवून घेतले नसते ह्याची खात्री आहे.

बाबा योगिराज's picture

21 Jan 2016 - 6:22 am | बाबा योगिराज

पैलवान भौं षी सहमत.

नया है वह's picture

18 Jan 2016 - 3:56 pm | नया है वह

बेस्ट लिरिक्स फिल्म्फेअर अ‍ॅवॉर्डस

Gulzar -Chaiyya Chaiyya" 1999 ,Music A R Rahman
Anand Bakshi – "Ishq Bina 2000 ,Music A R Rahman
Javed Akhtar – "Radha Kaise Naa Jale 2002 ,Music A R Rahman
Gulzar – "Saathiya" from Saathiya 2003 ,Music A R Rahman
Javed Akhtar – "Jashn-E-Bahara 2009,Music A R Rahman
Irshad Kamil – "Nadaan Parindey" 2012 ,Music A R Rahman
Gulzar – "Challa" 2013,Music A R Rahman
Irshad Kamil – "Agar Tum Saath Ho" 2016,Music A R Rahman

बाबा योगिराज's picture

21 Jan 2016 - 6:21 am | बाबा योगिराज

कै च्या कै.
रेहमान भौ च्या कुठल्या गाण्यात हे शब्द आलेत हे जरा बघनार काय. माझ्या मते ही गाणी सौथींडियन सलिमाचे हिंदीतले रूपांतर असावे. ज्याची ताल जशीच्या तशी ठेवायचा प्रयत्न केला जातो.
बाकी रेहमान सहेबांचे संगीत ऐकावे. बस.

रफ़ी साब और रेहमान साहब का पंखा
बाबा योगीराज.

तिमा's picture

9 Jan 2016 - 12:06 pm | तिमा

रेहमानचे संगीत मला कळत नाही, याचे फार दु:ख वाटले. आमची धाव फक्त, हुस्नलाल-भगतराम, अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, सी. रामचंद्र, मदनमोहन, रोशन, जयदेव, बर्मन पितापुत्र, रविंद्र जैन, सोनिक-ओमी, नौशाद, नाशाद, सज्जाद इ. पुढे कधी गेलीच नाही!
रेहमान म्हटले की आम्हाला फक्त केसांचा कोंबडा राखणारा नट आणि आमची आवडती वहिदाच डोळ्यांसमोर येते.

दिवाकर कुलकर्णी's picture

12 Jan 2016 - 1:03 am | दिवाकर कुलकर्णी

प्रसाद १९७१ यांची सूचना एकदम रास्त .सशुश्रीके
शीर्षक तेव्हडं बदला बुवा.अर्थाऐवजी अनर्थ ध्वनीत होतोय हो.

दिवाकर कुलकर्णी's picture

12 Jan 2016 - 1:40 am | दिवाकर कुलकर्णी

तिमा जी
नौषाद ला तुमच्या लिष्टात सोम्या गोम्यानंतर शेवटाकडनं तिसर्या लंबराला ठिवलंत हे बरं नव्हं.
हे तर काईच नव्हं,ओपीला अन सलील चौधरी, हेंमतदाना आमी इ.मध्धे पकडायचं व्हय तुमची
लिष्ट सुदरव्हावी ही इनंती

तिमा's picture

12 Jan 2016 - 1:04 pm | तिमा

आमच्या लिस्टीत जे जुने संगीतकार न्हाईत ते आम्हाला आवडत नाहीत असं आमी म्हनलं नै. रहिमानी संगीत समजत न्हाई हीच व्यथा हाय.

काविया थलायवन मधली गाणि ऐकाच.. https://www.youtube.com/results?search_query=kaviya+thaliavan+songs+

रेहमान च्या काळातली खुप जास्त आवड्लेली गाणी..

सिरुसेरि's picture

12 Jan 2016 - 12:27 pm | सिरुसेरि

रहमान सारखा रहमानच. एक रोमेश कालुविथरना सोडला तर रहमानसारखा कोणी नाही .

वपाडाव's picture

13 Jan 2016 - 10:16 am | वपाडाव

झुबैदा य सिनेमाचा उल्लेख अजुनहि आला नाही.

उपयोजक's picture

17 Jan 2016 - 7:25 pm | उपयोजक

स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट चं पार्श्वसंगीत?

शंतनु _०३१'s picture

18 Jan 2016 - 3:36 pm | शंतनु _०३१

रेहमान यांनी इलियाराजा यांच्याकडे संगित क्षेत्राची सुरूवात केली आहे, बाकी युवा चित्रपटापासुन कर्णमधुर संगीतापासुन थोडा दर्जा बदलला आहे. नहीं सामने, किंवा डोली सजाके रखना,सपने चा फिल येत नाही, गुलज़ार यांच्यापेक्षा इरषाद कामील यांची रचना क्लिष्ट आहे समजायला.

* कुन फाया कुन, ख्वाजा मेरे ख्वाजा , बोल सजनी श्रवणीय आहेत