श्री.भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
22 Dec 2015 - 10:13 pm

प्रास्ताविकः
मराठी विकिपीडियावर एखादा लेख टिकुन राहण्यासाठी ज्ञानकोश म्हणून उल्लेखनीयतेचे निकष महत्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्ती बद्दल काही विशेषत्व दाखवल्या शिवाय ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही. हनुमाना सारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पुजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जिर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणार्‍या भक्तगणांची संख्य अगणीत असते काही जणांची एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशिय मजकुर उपलब्ध होणार असतो. हनुमानाकरीता स्वतंत्र लेख बनवणे समजण्या सारखे आहे. हनुमानाच्या मंदीरांची शृंखला बांधवून घेणार्‍या समर्थ रामदास इत्यादी भक्तगणाकरिता स्वतंत्र लेख होऊ शकतील एवढा मजकुर असतो. पण अशा देवतांच्या पायरीवर नाव कोरुन घेणार्‍या व्यक्तींची भक्तीही विशेष असू शकेल परंतु १) इतर चारचौघांपेक्षा काही वेगळी नोंद होणे २) सहसा इतर माध्यमातून त्याची दखल घेतलेली असून तसा संदर्भ उपलब्ध असणे या निकषांना सर्वच भक्त पार करून ज्ञानकोशात स्थान मिळवू शकतील असे नाही.

काही वेळा काही व्यक्ती विशेषही असू शकतात की ज्याची ज्ञानकोशीय लेखक संपादकांना कल्पना असेलच असे नाही. पण अशी उल्लेखनीयता सिद्ध करण्याचा जिम्मा सर्वसाधारणपणे असे लेख तयार करणार्‍या व्यक्तीवरच सोडून अनुल्लेखनीय वाटणारे लेख सहसा वगळले जातात. श्री. भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांच्या बद्दल असाच एक लेख मराठी विकिपीडियावर आला इतर राजकारणी मंडळींपेक्षा काही विशेष उल्लेखनीयतेची नोंद उपलब्ध झाली तर कदाचित पुन्हाही मराठी विकिपीडियावर येऊ शकेल परंतु सद्य खाली दिलेल्या माहितीच्या आधारावरतरी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही आहे म्हणून सदर लेख मराठी विकिपीडियातून वगळून त्यांचे बद्दल मराठी विकिपीडियावर प्रकाशित माहिती येथे स्थानांतरीत करीत आहे. ती मी स्वतः लिहिलेली नसल्या मुळे चु.भू.दे.घे.

स्थानांतरीत लेख: भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख

भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख Bhagwantrao Vamanrao Khopade-Deshmukh उर्फ नानासाहेब यांचा जन्म तत्कालिन(ब्रिटिश कालिन) मुंबई प्रांतातिल भोर तहसिलातील गांव नाझरे येथील वामनराव खोपडे-देशमुख यांच्या कुळामध्ये झाला.
कार्य

गावाकडे उपजिवीकेची साधने उपलब्ध नसल्याने ते त्यांचे वडील वामनकाका आणी लहान बंधु विठ्ठ्ल यांच्या बरोबर पुणे येथील खडक माळ आळी येथे स्थायिक झाले. पुणे येथे लाकुड वखार व्यवसाय ते करु लागले. भगवंतराव मुळचे देशमुख कुळातील असल्यामुळे राजकारणी गुणधर्म त्यांच्यामधे उपजतचं होते. आणी म्हणुन साधारण ६०-७० च्या दशकात त्यांनी पुणे येथुन तत्कालिन शेतकरी-कामगार पक्षातर्फेआमदारकी लढविली. तत्कालिन राजकारण्यांनी जातीपातिच राजकारण करत आणी मराठा समाजातील ९६ कुळी आणी ९२ कुळी या समाजरचनेचा आधार घेत भगवंतराव यांना पराभुत केल.जरी भगवंतराव पराभुत झाले होते तरी सामान्य जनमानसात त्यांचा आदरयुक्त दरारा कायम होता. आणी नंतर भगवंतरावांनी वयोमानानुसार राजकारणातुन निवृत्ती घेतली
उत्तरार्ध

भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांचे वृद्धापकाळाने सन १९७९ रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्यामागे 3 मुले, सुना, 5 मुली, जावई व नातवंडे असा परीवार आहे.

संदर्भःश्री.भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख. (२०१५, डिसेंबर २२). विकिपीडिया, एक मुक्त ज्ञानकोश. Retrieved १६:४१, डिसेंबर २२, २०१५ from https://mr.wikipedia.org/w/index.php?title=श्री.भगवंतराव_वामनराव_खोपडे-देशमुख (तुर्तास हा लेख मराठी विकिपीडियावरून वगळला जाईल)

राजकारणलेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

22 Dec 2015 - 11:07 pm | गॅरी ट्रुमन

माझ्याकडे महाराष्ट्रात २००९ पर्यंत झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणुक लढवलेले सर्व उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते याचा विदा आहे. त्यात कुठेही भगवंतराव खोपडे-देशमुख हे नाव आढळले नाही. त्यामुळे हा प्रकार म्हणजे विकिपीडियावर वाटेल ती माहिती लिहिण्याचा प्रकार दिसत आहे.

मध्यंतरी मराठी विकिपीडियावर त्रिंबक तेहरानवाला नावाचा एक लेख आढळला होता. असे कोणी लेखक आहेत का? त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी बघितली तर त्यातील ’केरळी रांगोळी’ आणि ’कालभारत’ ही नावे तर भडकमकर मास्तर यांच्या जालिंदर जलालाबादी या लेखातील दिसली. विकिपीडीयावर वाटेल त्या थापा पोस्ट केल्या तरी त्या चालून जातात का?

माहितगार's picture

22 Dec 2015 - 11:42 pm | माहितगार

तातडीने माहिती देण्या बद्दल आभारी आहे. बहुतांशवेळा नवागत लोकांच्या लेखन शैलीतून अंदाजा येतो सहसा {{उल्लेखनीयता}} हा साचा उल्लेखनीयता विषयक चर्चेसाठी लावून ठेवला जातो-इतर प्रचालक बर्‍याचदा माहित नसलेले लेख सरळ सरळ उडवतात पण त्या पॉलीसीत आपल्याला माहित नाही पण विषय उल्लेखनीय आहे असे होऊ शकते त्या पेक्षा माहिती उडवण्यापुर्वी मी मिपासारख्या संस्थळावर शेअर करणे प्रीफरकरतो म्हणजे आपण खातर जमा करण्यात मदत केलीत तसे साहाय्य मिळू शकते,

माहिती घुसवण्याचे काही प्रकार चटकन लक्षात येत नाहीत हे खरे आहे उदाहरणार्थ 'केदार जोशी' नावाने कुणाला फारसे परिचीत नसलेल्या व्यक्तीचा लेख फार मोठे तत्त्वज्ञ म्हणून मराठी आणि सर्वभाषी विकिपीडियातून बरीच वर्षे टिकुन होता अर्थात कुठे न कुठे केव्हा ना केव्हा कुणा न कुणाच्या लक्षात ते येतेच. आपल्या सारख्या कोणत्याही वाचकास केव्हाही शंका वाटली की {{उल्लेखनीयता}} किंवा किमान पक्षी {{संदर्भ हवा}} हे साचे लावले जाणे साहाय्यभूत होते.

कानीकपाळी ओरडून सुद्धा मराठी विकिपीडियावर संदर्भ देण्याबद्दल बों*च आहे, त्यामुळे मी मिपा आणि इतर मराठी संस्थळांवर येऊन संदर्भ मागत असतो, याचा उद्देश पब्लिकला उचकवून ठेवले म्हणजे त्यातले काहीजण मराठी विकिपीडीयावर येऊन संदर्भ मागू लागतील त्या शिवाय विश्वासार्हतेची काळजी घेतली जाणे अवघड.

आता त्रिंबक तेहरानवालांचा शोध घेणे क्रमप्राप्त झाले माहितीसाठी धन्यवाद

अशोक पतिल's picture

22 Dec 2015 - 11:25 pm | अशोक पतिल

लेख वाचला !

राजकीय संदर्भ दिलेले आहेत विकिपीडीयावर तपासुन पहा. राजकीय संदर्भ - त्यांचे कार्य साधारणपणे ६०-६५ वर्षांपुर्वीचे असल्याने आणी तो ग्रामीण भाग असल्याने माहीती मिळण्यास अडचण येत आहे , पण म्हणुन लगेच वाटेल ते न बोलता धीर धरावा गॅरी ट्रुमन . आणी मिपासाठी आपण काम करता आपण पुर्ण माहीती न जाणता लेखांचे मोजमाप करता असे दिसते आहे, संशोधन चालु आहे आपल्याला लवकरच सर्व पुरावे देऊ. आणी राजकीय माहीती कोणत्या स्वरुपात हवीये ते जरा कळवा म्हणजे आपणांस तशी माहीति देता येऊ शकते. स्वातंत्रोत्तर काळातील भोर आणी वेल्हा या परिसरातील ते प्रथम राजकीय नेतृत्व होते. त्यामुळे आपण थोडा धीर धरा आपणांस आवश्यक साहीत्य लवकर उपलब्ध करुन देऊ. मिपावरुन हा लेख हटवावा ही विनंती

माहितगार's picture

25 Mar 2016 - 3:33 pm | माहितगार

गब्बरसेठ,

मराठी विकिपीडियावरील चर्चा पानाचा हा संदर्भ बघा. त्या वेळच्या माहितीतील उणीवांमुळे सदर लेख वगळण्याची शिफारस २७ डिसेंबर २०१४ च्या आधी झाली. लेखातील माहितीत काहीही सुधारणा झालेली नसताना २२ डिसेंबर २०१५ पर्यंत काहीही कार्यवाही केली नाही, तब्बल एक वर्ष थांबणे याला धीर म्हणत नाहीत तर काय म्हणतात ? २७ डिसेंबर २०१४ ते २२ डिसेंबर २०१५ या काळात मराठी विकिपीडियातील संबंधीत लेखात जी माहितीची (संदर्भांच्या अभावाची) स्थिती होती त्याच स्थितीतील लेख आपण इंग्रजीत अनुवादीत करुन इंग्रजी विकिपीडियावर टाकून अनुभव घ्या पाच मिनीटात उडवला नाही गेला तर माझ नाव बदलतो. त्या शिवाय लेख वगळताना माहितीचे इतरत्र स्थानांतर करणे अजून इतर चार चौघांना विचारण्यासाठी असा धागा काढणे असे जे काही बरेच कष्ट उपसतो तसे करताना कुणीही घेताना दिसणार नाही. हे स्वतः बद्दल बढाई मारण्याच्या दृष्टीने किंवा बघा मी इतरांना कसा उपकृत करतो हे दर्शवण्याच्या दृष्टीने लिहित नाही.

आपल्या प्रमाणे अनेक नविन लोक विकिपीडियावर रोज येतात, जसे आपणास विकिपीडियाच्या सर्व लेखन संकेतांची कल्पना नसेल मी समजू शकतो आणि क्वचित नवे लोकही अनवधानाने मदत करणार्‍यावरच पलटवार करतात याचा एक नेहमी मदत करणारी व्यक्ति म्हणून बर्‍या पैकी अनुभव घेऊन सवय आहे माझ्या स्थितप्रज्ञ स्वभावामुळे मी अशा गोष्टी फारशा मनावर न घेता माझे काम चालू ठेवतो. पण आपल्याला मदत केली जाती आहे हे न लक्षात घेता पलटवार करण्याने माझ्या शिवाय इतर सर्वसाधारण मदत करण्यास उत्सुक व्यक्तींचा हिरमोड होऊ शकतो आणि त्या मदत करण्यापासून परावृत होऊ शकतात हे लक्षात घेणे जरुरी असावे किंवा कसे ?

साधारणपणे ६०-६५ वर्षांपुर्वीचे असल्याने आणी तो ग्रामीण भाग असल्याने माहीती मिळण्यास अडचण येत आहे

होय अशा अडचणींची कल्पना आहे म्हणूनच ग्रामीण भागातून येणार्‍या अथवा आपण म्हणता तशा जुन्या माहिती बाबत मराठी विकिपीडियावर होता होईतो धीर धरण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हि लवचिकता बाळगण्याच्या आग्रहातही मी पुढे असतो त्या शिवाय सर्वच माहिती तुम्हाला एकट्याला उपलब्ध होऊ शकेलच असे नाही म्हणूनच मिसळपाव सारख्या संकेतस्थळावरुन अधिक माहितीचे आवाहन केल्या नंतर आपन जसे या धागा लेखावर जसे शोधत पोहोचला तसे इतरही लोक पोहोचू शकतील आणि काही माहिती उपलब्ध करु शकतील अशी शक्यता राहतेच.

आपण विकिपीडियावर जे काही लेखन करता ते कॉपीराईट फ्री होत असते आणि सहसा कुणालाही कुठेही केव्हाही वापरण्याची मुक्त परवानगी असते त्यामुळे आपण विकिपीडियावर दिलेल्या माहितीचा या लेखातील उपयोग रास्त ठरतो. आणि नव्या माहितीच्या आदान प्रदानाची शक्यता असल्यामुळे मिसळपाव संकेतस्थळावरील वापरही रास्त ठरतो.

आता शेवटी बाब उरते ती टिकेची, तुम्ही आम्ही कठोर टिका करु धजणार्‍या तुकाराम महाराजांच्या संत भूमीत जन्मास आलेले लोक आहोत कठोर टिका हा मराठी माणसाचा स्थायीभाव आहे. मराठी विकिपीडिया हा ज्ञानकोश आहे आणि मिसळपाव हे मनमोकळ्या चर्चा घडवण्याचा मंच आहे, व्यक्तिपुजा करणार्‍यांचा आम्ही आदर करतो पण टिका करण्यासारखे कारण झाल्यास कठोर टिका करण्यास एक मराठी माणूस म्हणून तुम्ही जसे मागे पुढे पहात नाही तसे आम्हीही मागे पुढे पहात नाही कारण तुम्ही आम्ही सर्वांनीच मराठी संस्कृतीचे बाळकडू घेतलेले आहे. मनाच्या खुलेपणाने होणार्‍या टिकांना स्विकारले व्यक्तिश: न घेता मुद्देसुद ससंदर्भ मुद्दे खोडले तर चर्चांना एक मोठी उंची मिळू शकते किंवा कसे. असो. कितीही मत मतांतरे झाली तरी मराठी विकिपीडियावर सकारात्मक ज्ञानकोशीय योगदानाचा प्रयत्न चालू ठेवावा. मराठी विकिपीडियावर काम करताना नवागतांकडून विकिपीडियाचे सर्व संकेतांमधली पिएचडी असावी अशी आम्ही आपल्या कडून अपेक्षा बाळगत नाही. आम्हीही चुका करतच शिकतो आणि आमच्या नंतर आलेल्यांनी चुका केल्या तर आम्हाला त्यात फारसे वावगे वाटत नाही.

आपल्या संशोधन कामास आणि पुढील लेखन प्रयत्नास मनःपुर्वक शुभेच्छा.