श्री कृष्ण भक्ती

सत्य धर्म's picture
सत्य धर्म in जनातलं, मनातलं
29 Nov 2015 - 2:12 pm

हरे कृष्ण

भक्तीमार्ग हि आज खूपच गरजेचा आहे परंतु भक्ती कशी करावी आणि कोणाची करावी हे कळत नसल्यामुळे या मार्गावर लोकांची खूपच फसगत होते. संतानी ज्याच्या वर्णनाने ग्रंथसंपदा निर्माण केली त्या शिकवणीला सोडून आपण व्यक्तीपूजक बनत चाललो आहोत.
आपल्या सर्वांच्या मनात असणारा भक्तीभाव हा कोनाठाई असावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण संतांनी सांगितल्याप्रमाणे आपली भक्ती श्री कृष्णा प्रती असावी, केलेले प्रत्येक कर्म , आपल्याला मिळालेले चांगले वाईट फळ या सर्व गोष्टी फक्त श्री कृष्णा प्रती समर्प्रित असाव्यात.
संतश्रेष्ट ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी श्री विठ्ठलाची भक्ती केली.
श्री कृष्णानी गीतेमध्ये विश्वास दिला आहे कि
“ यान्ति देवव्रता देवान्पितृन्यांती पित्रुव्रता :।
भुतानि यान्ति भूतेज्या यान्ति माद्याजिनोपी माम ।। “
श्री कृष्ण इथे म्हणतात कि देवतांची पूजा करणारे देवतानां प्राप्त होतात ,
पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त होतात ,
भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात ,
आणि माझी भक्ती करणारे भक्त मलाच प्राप्त होतात. ।।२५।।
संतानी विठ्ठलाची भक्ती केली, त्याच्या रूपाचे गोडवे गायले,त्याच्यावर आईसारखा प्रेम केल, प्रसंगी त्याच्यावर रागवले एवढे होऊन सुद्धा तो फक्त भक्तासाठी धावून येत राहिला.
संतांची चरित्र वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे या सर्वांनी केलेली भक्ती हि श्री विठ्ठलाची होती. विठ्ठल रूपाच वर्णन केल तरी त्यांची समाधी लागत असे.विठ्ठल म्हणजे तरी कोण? विठ्ठल श्री विष्णूंचाच एक अंश म्हणा कि रूप होत.
आज हे सांगण्याच प्रयोजन काय आहे तर एवढे मुबलक साहित्य आणि ग्रंथसंपदा असताना पण आपण संतांची शिकवण विसरून अध्यात्ममार्गावर आपली अधोगती करून घेत आहोत. चमत्काराच्या मागे लागून आपण संतांची शिकवण विसरत आहोत.

- स्वागत.

धर्मविचार