तमाशाल्लाह!

Anonymous's picture
Anonymous in काथ्याकूट
29 Nov 2015 - 12:30 pm
गाभा: 

तमाशा

मुद्दामूनच लोकांची मतं नजरअंदाज करत चित्रपट पाहायला गेलो, इंटरवल पर्यंत चित्रपटातली तीन गाणी संपली, आता तीन उरलेली, आता इंटरवल का असतो हा नेहमीचा प्रश्न पडला, ठरल्या प्रमाणे इंटरवल नंतर पोटाच्या आकाराचे मोठे सॉल्टेड-पॉपकॉर्नचे डबडे घेऊन जागेवर येऊन बसलो... ह्यावेळी त्या डबड्यात मध्येच एक कैरेमलचा पॉपकॉर्न मिळाला, तसा होता 'तमाशा' एकदम हटके!

इम्तियाझ अली... मानला बुआ!

एक वेगळाच अनुभव, भारतीय सिनेमा आणि संगीत रंगभूमी ह्यांचा सुंदर मिलाप! आणि ह्यातून काय मस्त खुलावतो तो विचारांचे अंतरंग, विविध पेहलू, बारकावे... सध्या तरी कोणी दिग्दर्शक त्याला हात लाउ शकेल असे वाटत नाही, रॉकस्टार मग हायवे आणि आता तमाशा, सर्वांचा आत्मा एक! त्याचं म्हणणं एकच 'स्वतःला ओळखा!'

रहमान आणि इम्तियाझ यांची जोडी तर आता इतकी मस्त जमली आहे! 'दो जिस्म इक जान है हम' असा काहीसा प्रकार झालाय, तमाशामधून परत एकदा इम्तियाझचे डोळे आणि रेहमानचे कान उधार घेऊन चित्रपट पाहिल्याचे असीम सुख मिळते!

चित्रपटात गाणी अखंड न वापरण्याचा शाप आहे रहमानच्या गाण्यांना... मला त्याची नेहमी खंत वाटते, ह्या चित्रपटातही असाच प्रकार आहे पण तोच प्रकार इम्तियाझने अतिशय योग्य रीतीने मांडता आलाय ह्याबद्दल त्याचे कौतुक करावेसे वाटते, चित्रपटा साठी गाणी आहेत किंवा गाण्यांसाठी चित्रपट ह्याचा विचार करू न देता... go with the flow चा अचूक अनुभव मिळतो. जवळ जवळ सर्वच प्रसंग तर इतके छान जुळलेत संगीताशी की प्रत्यक्षात पार्श्वसंगीत असतं आयुष्यात तर असच असतं/असावं... ह्याचा मस्त नमुना आहे 'तमाशा'.

९२च्या रोजापासून आत्ताच्या तमाशापर्यंत, विषय काहीही असो... रहमानच्या प्रत्येक चित्रपटापुढे 'म्युझिकल' असा शिक्का सहाजिक असावाच असा प्रस्ताव मांडावासा वाटतोय.

अर्थात मी रहमान भक्त त्यामुळे त्याच्या संगीतासाठी जरी हा चित्रपट पाहिला असेन पण इम्तियाझचा आधीचा चित्रपट पण आवडलेला ज्यात 'जब वी मेट' आहे ज्यात रहमानच्या संगीताचा सहभाग नाही, म्हणजेच इम्तियाझ जो ठरलेला 'फॉर्म्युला' आहे... की नायक नाईका भेटतात, त्यांच्यात प्रेम होतं मग त्यांमधले संबंध बिघडतात मग कहाणी पुढे हलते... तमाशा ही त्याच साच्यातला पण तरीही वेगळा!

(Spoiler alert) रणबीर आणि दीपिका भोवती फिरणारा तमाशा... दोन भागात आहे. इंटरवल च्या आधीचा तमाशा आणि नंतरचा ह्यात जमीन आस्मानचा फरक आहे, इंटरवलनंतर वेदला (रणबीर सिंग) झालेली 'स्वओळख' आणि त्यामुळे झालेला सकारात्मक दिलखुलास आमूलाग्र बदल, तारा (दीपिका पादुकोण) ला भेटलेला वेद आणि प्रत्यक्षात असलेला वेद ह्यातला फरक, हे सर्व नव्या पिढीच्या दृष्टीने मांडले आहे. अभिनयात दोघे आपापली जवाबदारी उत्तम बजावतात. एकूणच तमाशा टीमला मन:पूर्वक अभिनंदन!

Tamasha is not just a movie to be watched, it is a feeling which has to be experienced. The story telling 'SAFARNAMA' with 'Tu koi aur hai' message Well done team Tamasha! 4stars from me

सशुश्रीके । २८ नोव्हेम्बर २०१५

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

29 Nov 2015 - 12:39 pm | DEADPOOL

कपूरनिर्मित बालक आहे तो!

पद्मावति's picture

29 Nov 2015 - 2:06 pm | पद्मावति

छान खुसखुशीत परीक्षण.

मोठे सॉल्टेड-पॉपकॉर्नचे डबडे घेऊन जागेवर येऊन बसलो... ह्यावेळी त्या डबड्यात मध्येच एक कैरेमलचा पॉपकॉर्न मिळाला, तसा होता 'तमाशा' एकदम हटके!

....मस्तं!
दीपिका आणि रणबीर कपूर दोघेही आवडतात. चित्रपट नक्की पाहणार.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

30 Nov 2015 - 10:48 pm | मम्बाजी सर्वज्ञ

हे तुमचं...

नक्की पहा! :) = "मग मी काय केलं... माझ्या घरी सार्वजनिक सात्यानाराय्नासाठी वर्गणी मागायला आलेल्या इसमाला त्यांचा पत्ता दिला. आणि सांगितलं, ते फार दानशूर आहेत, जा!"

...असं तर नाही न?
:-)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2015 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

'Rockstar' actor Ranbir Kapoor recently opened up on how his upcoming movie 'Tamasha' resembles immortal love story of Radha-Krishna. In an interview he says, "Imtiaz has bought roped in the time of Radha-Krishna but in a more modern way.
हे वाचनात आल्यापासून मी जो धसका घेतलाय तो अजून उतरला नाहीये.

संदीप डांगे's picture

30 Nov 2015 - 5:57 pm | संदीप डांगे

बाब्बौ. काय अभ्यास.. काय अभ्यास... !!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Nov 2015 - 8:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नुकताच पाहिला रे सशुश्रीक्या.रहमान संगीतकार म्हणून चांगला आहे ह्यात वाद नाही पण ह्या चित्रपटात जास्तच कोलाहल वाटतो.सुश्राव्य असे एकही गाणे वाटले नाही.कथाही जेमतेम.सुरुवातीला रणवीरला काहीतरी मानसिक समस्या असेल असे वाटते व चित्रपट त्या अंगाने जाईल असे वाटले होते. पण शेवट अगदी सामन्य चित्रपटासारखा.

सतिश गावडे's picture

30 Nov 2015 - 9:16 pm | सतिश गावडे

अतिशय विस्कळीत आणि भरकटलेला सिनेमा.

"स्व"चा शोध नावालाच आहे.

जर तुम्ही नियमित सिनेमा पाहणारे असाल तर कदाचित आवडेलही. मात्र तसे नसाल आणि इकडची तिकडची परिक्षनं वाचून "स्व"चा शोध पाहण्यासाठी आवर्जुन हा सिनेमा पाहायला गेलात तर निराशा पदरी पडण्याची शक्यता आहे.

निवांत पोपट's picture

30 Nov 2015 - 9:31 pm | निवांत पोपट

रॉकस्टार माझा अतिशय आवडता चित्रपट .. रॉकस्टार,हायवेची बरीचशी टीम रिपीट असल्यामुळे 'तमाशा' पहायला गेलो.रॉकस्टार ची intensity हायवे मध्ये नव्हती. आणि तमाशा मध्ये तर ती अजिबात आढळत नाही.. निराशा केली . अर्थात रेहमान साहेब आपले काम चोख बजावतात. तुम साथ हो आणि तू कोई ओर है ही विशेष श्रवणीय वाटली .. बाकी काहीच नाही

अन्नू's picture

6 Feb 2016 - 5:01 pm | अन्नू

मला तर अजुनही- 'मी तो सिनेमा का पाहिला?' असा प्रश्न पडतो. :(

पहिल्यांदा वाटलं तो मानसिक रोगी आहे कि काय?
सिनेमा निम्मा झाल्यानंतर वाटलं दीपिका मानसिक रोगी आहे कि काय?
आणि सिनेमा संपला तेव्हा वाटलं
कदाचित मीच मानसिक रोगी झालोय कि काय?!!! :( :(