सद्गुरू २

विश्वव्यापी's picture
विश्वव्यापी in जनातलं, मनातलं
28 Nov 2015 - 11:53 pm

एकदा ब्राह्मदेवाचे मानस पुत्र नारद मुनी , दुखी: व कष्टी होवून गप्प बसले होते .
ब्रह्मदेवांनी त्यांना विचारले 'पुत्रा तू इतका कष्टी का दिसतोस ?'
नारद म्हणाले ' पिताश्री मी सद्गुरूंच्या शोधात आहे ,पण मी जाणत नाही कि सद्गुरु कसे असतात त्या मुले मी दुखी: व कष्टी झालो आहे . मी सर्व वेदांत , १८ पुराणांत , ६४ कलांत पारंगत असा आहे तरी हि मी सद्गुरु कसे असतात हे जाणत नाही !ब्रह्मदेव म्हणाले ' बस इतकेच न ? फार सोपे आहे ते . तू असे कर पृथ्वीतलावर जा . तिथे सहस्त्रगुण राजाच्या महालात एक कोळी आपे जाले विनात आहे .तो तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला देयील .
नारद मुनी आनंदानी त्या कोळ्या पाशी जाऊन पोचले . त्यांनी त्या कोळ्याला अत्यंत विनयाने विचारले 'ओ उर्नानाभा अष्टपादा , सद्गुरु कसे ओळखावे व ते कसे दिसतात हे मला समजावण्याची आपण कृपा करावी '. कोळ्याने नारद मुनींकडे एक कटाक्ष टाकला व बोलण्यासाठी मुख उघडण्याच्या आतच तो मृत झाला ! नारद मुनींना खूप वाईट वाटले व परतून त्यांनी सर्व वृतांत आपल्या पित्यास सांगितला. ब्रह्मदेव म्हणाले ' काही काळजी करू नकोस पुत्रा! सहस्त्रगुण राजाच्या गोशालेत नुकतीच एक गाय व्याणार आहे . तू तिथे जा व त्या नवजात पाडसाला तुझा प्रश्न विचार .ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देयील . नारद पुन्हा पृथ्वीतलावर सहस्त्रगुण राजाच्या गोशालेत आले . तिथे एक गाय एका पाडसाला जन्म देत होती . जन्मताच पाडस उठून उभे राहिले . नारद मुनींनी त्या पाडसाला पुन्हा तो प्रश्न हात जोडून विचारला , पाडसाने एक कटाक्ष नारद मुनींन टाकला व काही बोलण्यासाठी मुख उघडण्या आत ते मृत झाले !नारद मुनी काहीतरी शाप लागण्याच्या भीतीने घाबरून गेले व दुखी: मानाने पुन्हा परतले . त्यांनी सर्व वृतांत आपल्या पित्याला सांगितला . कोळी आणि पाडस माझे मुख पाहताच माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्या आगोदरच मृत झाले .मी इतका का वाईट आहे कि ती दोघे माझ्हे मुख पाहता क्षणीच मृत झाली ? ब्रह्मदेवांनी नारद मुनींना काळजी न करण्याचे आश्वासन दिले व म्हणाले ' नारदा सहस्त्रगुण राजाची राणी एका सुंदर मुलाला लवकरच जन्म देणार आहे तेव्हा तू तिथे जा , ते मुल तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला नक्की देयील '.नारद मुनी सहस्त्रगुण राजा कडे गेले . राजाने त्यांचा आदरसत्कार केला व म्हणाला ' मुनी मला नुकतीच पुत्र prapti झाली आहे तेव्हा तुम्ही त्याला येवून आशीर्वाद द्यावा ' व नारद मुनींना घेवून तो आपल्या महालात गेला . त्या नवजात बालकाला पाहताच जड अंतकरणाने त्याला आपला प्रश्न विचारला . ते नवजात बालक बोलू लागले ' ओ श्रेष्ट नारद मुनी ! आपण मला ओळखले नाही का ? मी तोच कोळी ! माझ्या आयुष्याच्या अन्त्क्षणी तुम्ही मला दर्शन दिले व मी कोळ्याच्या वोनीतून वरच्या योनीत जन्म घेतला व एका गायीच्या पोटी पाडस म्हणून जन्माला आलो ! माझे आहो भाग्य की जन्मताच मला तुमचे दर्शन झाले व तत्क्षणी मी त्या योनीतून मुक्त होवून एका राजकुळात मनुष्य रूपाने जन्म घेतला .तुमची परम कृपा की इथेही तुम्ही मला दर्शन दिलेत व आपल्या कृपेने आता मी मोक्ष पावून या जन्म मरणाच्या बंधनातून कायमचा मुक्त होत आहे '. असे म्हणून ते बालक तत्क्षणीच मृत झाले .

गोष्टीचे तात्पर्य :
सद्गुरु हे शुद्ध चैतन्य रूप असतात , त्यांच्या एका कृपाकटाक्षात सर्व पापांना व संस्कारांना जाळून मोक्ष देण्याची ताकद असते .

ध्यान मुलम गुरुर मूर्ती
पूजा मुलम गुरुर पदम
मंत्र मुलम गुरुर वाक्यं
मोक्ष मुलम गुरुर कृपा .
ॐ श्री सद्गुरुवे नमः
ॐ श्री चैतन्य सद्गुरु गिरीशनाथाय नमः

धर्मविचार

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

29 Nov 2015 - 12:11 am | अभ्या..

१००फिक्स
बोला पुण्डलिक वरदे हारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ माहाराज् की जय.

संदीप डांगे's picture

29 Nov 2015 - 12:46 am | संदीप डांगे

काय म्हणतो अभ्या, काय करू बोल...? मार दिया जाय या छोड दिया जाय?

अभ्या..'s picture

30 Nov 2015 - 5:05 pm | अभ्या..

merge all layers, save as tiff, delete all psd.

DEADPOOL's picture

30 Nov 2015 - 1:38 pm | DEADPOOL

Jai jai raghuveer samarth!
Jai sadguru!

मंथुनि नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु!

विश्वव्यापी's picture

30 Nov 2015 - 3:46 pm | विश्वव्यापी

भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे

बाजीगर's picture

1 Dec 2015 - 10:51 pm | बाजीगर

टिपीकल हरीदासी बंडलबाजी.इथं काय भोळसट अडाणी बसलेत काय काहिही ऐकून भक्तीभावाने डोलायला.किती दिवस स्वत:ला फसवाल?

बाजीगर's picture

1 Dec 2015 - 10:51 pm | बाजीगर

टिपीकल हरीदासी बंडलबाजी.इथं काय भोळसट अडाणी बसलेत काय काहिही ऐकून भक्तीभावाने डोलायला.किती दिवस स्वत:ला फसवाल?

विश्वव्यापी's picture

2 Dec 2015 - 8:17 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे .
तुमचा स्वभाव रोकठोक दिसतो
तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहा नेहमी असेच :-)
धन्यवाद

विलासराव's picture

1 Dec 2015 - 11:11 pm | विलासराव

सद्गुरु हे शुद्ध चैतन्य रूप असतात
सहमत.
त्यांच्या एका कृपाकटाक्षात सर्व पापांना व संस्कारांना जाळून मोक्ष देण्याची ताकद असते .
असहमत. सद्गुरु फक्त साधनामार्ग देऊ शकतो. कृपाकटाक्षाने मोक्ष असंभव गोष्ट आहे.
बाकी चालूद्या.

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 11:33 pm | संदीप डांगे

विलासराव, लै मनाला लावून नका घेऊ,

सद्गुरुंनी सन्मार्गदर्शनाची कृपा करावी म्हणून त्यांचे गुणगान करणे सुरु झाले ते काही चालाक राँगनंबर गुरूंनी आपल्या आरत्या ओवाळून घेण्याकडे वळवले. ते इतके ताणले की सद्गुरु हा परमेश्वर समकक्ष झाला. त्यातून हे असले दाखले, दृष्टांत, कथा, पोथ्या प्रसवायला सुरुवात झाली. एका ओवीवर तास-तासभर किर्तन करु शकणारे आपल्या कल्पनाशक्ती इतक्या ताणतात की भोळ्या भाविकांना सगळे खरेच वाटायला लागते.

वरील प्रकार तसलाच आहे. सो इग्नोर मारा.

विलासराव's picture

2 Dec 2015 - 12:02 am | विलासराव

येस सर.
मी कधीही असल्या गोष्टी मनावर घेत नाही.आणि प्रबोधनपर भाषण तर आपला प्रांतच नाही. शक्यतो प्रतिसाद पण काधितरिच देतो.
मला जो साधनामार्ग सदगुरुंनी दिलाय त्यावर मी चालतो आहे.
मला त्याचे लाभ झालेत त्यामुळे मी अनेकांना त्याबद्दल सांगतो. एकदा दोनदा सांगायचे आणि तिसऱ्या वेळेनंतर सोडून द्यायचे. पटो न पटो. काहीही करुन पटलेच पाहिजे असा आग्रह नसतो. ज्या व्यक्तिमधे काधिकाळी साधना केलेले बिज असते ती व्यक्ति १,२ वेळेत त्या मार्गाबद्दल ऐकेल तर लगेच आर्कषित होते.नाहीतर जी व्यक्ति प्रथमच बिज घ्यायला येते तिला साधनामार्गावर यायला वेळ लागू शकतो.असो.

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 10:38 am | संदीप डांगे

अगदी अगदी!!

मांत्रिक's picture

2 Dec 2015 - 8:22 pm | मांत्रिक

डांगे साहेब व विलासराव यांचेशी काहीअंशी सहमत!
काहीच अंशी का ते उद्या सांगेन. आता मोबल्यावर टैपणे कंटाळवाणे आहे.

Ram ram's picture

11 Dec 2015 - 9:49 pm | Ram ram

Kay faltupana ahe ha. Varcha majla rikama ahe ka. Potbharu kirtankaranni vatole kele. Asaramache chele distat.

सतिश गावडे's picture

11 Dec 2015 - 9:56 pm | सतिश गावडे

सुन्दर कथा. आवडली.

महर्षि नारदांसारख्या सदगुरुंची आता आवश्यकता आहे जगाला भवसागरातून तारण्यासाठी.

विवेक ठाकूर's picture

11 Dec 2015 - 10:56 pm | विवेक ठाकूर

मी तोच कोळी ! माझ्या आयुष्याच्या अन्त्क्षणी तुम्ही मला दर्शन दिले व मी कोळ्याच्या वोनीतून वरच्या योनीत जन्म घेतला व एका गायीच्या पोटी पाडस म्हणून जन्माला आलो !

ही वरची योनी कुठे असते?

माझे आहो भाग्य की जन्मताच मला तुमचे दर्शन झाले व तत्क्षणी मी त्या योनीतून मुक्त होवून एका राजकुळात मनुष्य रूपाने जन्म घेतला .

एका योनीतून दुसर्‍या योनीत आणि लगेच जन्म हा प्रवास इतका फास्ट कसा होतो?

तुमची परम कृपा की इथेही तुम्ही मला दर्शन दिलेत व आपल्या कृपेने आता मी मोक्ष पावून या जन्म मरणाच्या बंधनातून कायमचा मुक्त होत आहे '. असे म्हणून ते बालक तत्क्षणीच मृत झाले.

जन्म-मरणातून मुक्ती हवी होती तर तीन वेळा योनी बदलाची भानगड कशाला केली ? कृपाकटाक्षानं पहिल्या फटक्यातच ते का जमलं नाही ?

गोष्टीचे तात्पर्य :
सद्गुरु हे शुद्ध चैतन्य रूप असतात , त्यांच्या एका कृपाकटाक्षात सर्व पापांना व संस्कारांना जाळून मोक्ष देण्याची ताकद असते .

आता नारद मुक्त कसे होणार?

विश्वव्यापी's picture

24 Dec 2015 - 4:20 pm | विश्वव्यापी

विवेक ठाकूर जी ,
तुमचे प्रश्न उत्तमच व विवेकपूर्ण आहेत .
ह्या प्रांस्नांची उत्तरे जरूर द्यायला हवीत . कारण हेच प्रश्न खूप लोकांना पडले असतील , आहेत .
तुमच्या प्रश्नांची उत्तरे याच विषयावरच्या लेखांत लवकरच लिहिण्याचा मानस आहे .
तेव्हा लेख टाकल्यावर जरूर वाचा .
आपण विचारलेल्या प्रांश्णन बद्दल खूप आभारी आहे .
विश्वव्यापी