पश्चात्ताप का पश्चात बुद्धी?

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
28 Nov 2015 - 11:44 pm
गाभा: 

सध्या सहिष्णूपणाचे वारे वेगात वहात आहेत. तेव्हा त्या वार्‍याच्या झोत्यात आल्यामुळे म्हणा किंवा राजकीय सोय म्हणा पण माजी गृहमंत्री चिदंबरम म्हणाले की सलमान रश्दीच्या सॅटॅनिक व्हर्सेसवर आम्ही बंदी घातली ती एक चूक होती.
१९८८ साली सलमान रश्दीने लिहिलेल्या पुस्तकावर जगात प्रथम बंदी घालून आपल्या परमसेक्युलरतेचे आणि सहिष्णूतेचे भारताच्या तात्कालिन काँंग्रेस सरकारने अनोखे प्रदर्शन केले होते.
पण २७ वर्षे उलटल्यावर चिदंबरम अचानक पलटी मारते झाले आणि आपल्या चुकीची कबुली देते झाले. कदाचित तसे केल्याने आपल्याला सद्य भारतात उसळलेल्या असहिष्णूतेच्या तथाकथित ज्वालामुखीवर आपली पोळी शेकून घेण्याचा नैतिक अधिकार आपल्याल मिळेल ह्या दृष्टीने हा प्रयत्न असावा.
पण मला तरी हा प्रकार हास्यास्पद वाटतो. सत्ता असताना, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा अधिकार असताना शेपूट घालणे आणि वेळ गेल्यावर चूक झाली म्हणणे हा दुटप्पीपणा आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/chidambaram-ban-on-rushdie...

ता.क.: ही चिकटवलेली बातमी आहे आणि चिकटवलेल्या बातम्यांचा तिटकारा असणार्‍यांनी ह्या चर्चेत सहभागी न होणे उत्तम!

प्रतिक्रिया

अरे वा ! पेपर टाकायला पुन्हा चालु केल का ??
चांगलय चांगलय ;-)

जयन्त बा शिम्पि's picture

29 Nov 2015 - 10:29 am | जयन्त बा शिम्पि

चूक झाल्याची कबूली २७ वर्षानंतर दिली कारण लोकसत्ते मध्ये किती लेख लिहिणार ? ( अर्थमंत्री असतांना ह्यात सुचविलेले उपाय अमंलात आणू शकले नाही ) ते संपले आणि आता पेप्रात नाव कसे येईल ? एकतर " पप्पु आणि कंपनी " सल्ला घ्यावयास तयार नाही , अशी उपेक्शा किती दिवस सहन करायची ? शेवटी काय " येन केन प्रकारेण , प्रसिद्धी पुरुषः भवेत "

DEADPOOL's picture

29 Nov 2015 - 1:49 pm | DEADPOOL

खीक्क्क्क्क्क्क!!!!!