तथास्तु

दिवाकर कुलकर्णी's picture
दिवाकर कुलकर्णी in जनातलं, मनातलं
28 Nov 2015 - 4:26 pm

अनेक दिवस या ना हेतूनं रेंगाळलेलं आमचं रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल अखेर सर्व संमत झालं . शेवटच्या मीटिंगमध्ये
थोडसं तू मी झालंच .ओशा( विनय देसाई ओशोंचा कट्टर भक्त म्हणून कालनीतलं टोपण नांव "ओशा")थोबाड बंद
ठेवेल तर त्याच्या कीर्तिला बट्टाच लागेल जणू.त्याच्या पुढाकारानं प्रपोजलनं आकार घेतला होता हे खरं पण म्हणून
चेष्टेनं जरी असलं तरी कांहिंहि बोलायचं?
नव्वदीचे बापूसाहेब जेव्हां म्हणाले आणखी थोडे दिवस जाऊ दिले असते तर आमच्या हिनं जिथं शेवटचा श्वास
घेतला मीहि इथूनंच तिला सोबत करायला निघून गेलो असतो.
काका आहो ठणठणीत आहात तुम्ही,आम्हाला पोचवूनच जाणार तुम्ही,आमचा ओशा पचकलाच.
पुढच्याच आठवड्यात सगळे पांगले. मिळेल तिथं जागा घेतल्या प्रत्येकानं. बिल्डरनं सहा महिन्याच्या भाड्याचा चेक
ज्याचा त्याला दिला होताच.
मला जागा मिळवायला कांहीच कष्ट पडले नाहीत.बायकोच्या भावाचा एक छोटा बंगला पडूनच होता उपनगरात.
आमच्या जून्या जागेपासून जरा लांबवर होता पण सर्व सोईचा (एक मोबा. रेंजचा थोडा फार प्रॉब्लेम सोडला तर)होता.
सामान मी नवीन जागेत लगेच शिफ्ट केलं.जागेवर लावायला पण वेळा नव्हता कि सुटीत चार दिवस पोराबाळाना घेवून
हिल स्टेशनला आलो,कारण तसा माझा प्रोग्राम आधीच ठरला होता.
सोमवारी सकाळीच परत आलो तर ,शेजार्यानी तिकडूनच ओरडून सांगितलं,कि आमच्या जून्या सोसायटीतून कोणी
तरी येवून गेलं, तपशील माहित नाही पण कोणी तरी दगावलेलं आहे आणि डेड बॉडी अकरा वाजता स्मशान घाटावर
नेणार आहेत.
चला म्हणजे बापूसाहेब गेले तर.हा पावसाळा जाऊ दिला असता तर कांही बिघडलं नसतं. बिल्डरला लाख घाई
असेल. गेली तीस वर्ष सोबतीनं राहिलो होतो.........
ओशाला फोन लावला .आधी रेंजचा प्रॉब्लेम पुन: दोन तीन वेळा रिंग वाजल्या सारखी वाटली. मग प्रयत्न सोडून
दिला,सरळ बाइक चालू केली आणि आलो स्मशान घाटावर.
पण तिथं चित्र कांही वेगळंच दिसत होतं.-------
येव्हड्यात सेक्रेटरी जगदाळ्या पुढं आला. ओशा कुठं दिसत नाही ,मी त्याला म्हणालो.
तूला ठावूक नाही?
काय?
अरे ओशाच गेलाय!
काय? बापरे. माझ्या घशाला कोरड पडली . अंग लटलटा कापायला लागलं.तोंडातून शब्द फुटेना.
पहाटे पांच . सिव्हियर हार्ट अॅटॅक. नियतीनं उल्टं दान टाकलं होतं.
ओशो ५९व्या वर्षी गेले. त्यांचा अनुयायीहि ५९ व्या वर्षीच.
काका आम्हाला पोचवूनच जाणार तुम्ही,आमचा ओशा बोलला होता. ती थट्टा होती.
पण वास्तू तथास्‍तू म्हणाली होती?
" ओशो नेव्हर बॉर्न्ड् नेव्हर डाइड् ही व्हिजिटेड् द प्लानेट ड्युरिंग १९३१ टू १९९०"
ओशाचं आवडतं कोटेशन. मी मनोमन त्याचं स्मरण केलं. आणि अश्रू वाहू दिले.

कथा

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

28 Nov 2015 - 4:44 pm | प्रदीप

सहज सुंदर लिखाण, आपल्या इतर लिखाणासारखेच, पक्व अनुभवातून आलेले. असेच लिहीत रहा.

उगा काहितरीच's picture

28 Nov 2015 - 5:34 pm | उगा काहितरीच

मे बी मला कळालं नसेल! पण मला तरी इतकी काही विशेष वाटली नाही कथा/लेख.

जव्हेरगंज's picture

28 Nov 2015 - 6:28 pm | जव्हेरगंज

संवादांना "अवतरण चिन्हे" न टाकल्याने वाचायला त्रास होतोय.

मुक्त विहारि's picture

28 Nov 2015 - 7:12 pm | मुक्त विहारि

आवडली...

एक एकटा एकटाच's picture

28 Nov 2015 - 8:42 pm | एक एकटा एकटाच

ध्यानीमनी नसताना अस अचानक कुणाच जाणं खरच चटका लावून जातं
हे मात्र खर

रातराणी's picture

29 Nov 2015 - 1:34 pm | रातराणी

आवडली कथा.