कृष्ण व गोपिकां (१ . कृष्ण व गोपिकांचे नाते)

विश्वव्यापी's picture
विश्वव्यापी in काथ्याकूट
26 Nov 2015 - 5:58 pm
गाभा: 

आज मिसळ पाव या ब्लॉग वरील एक लेख सहज वाचनात आला त्याच बरोबर त्या लेखावरील उत्तरा दाखल लिहिलेल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया वाचून खूप आश्चर्य युक्त दु:ख ही झाले . ही उत्तरे पाठवणारी पिढी साधारण पणे २५ ते ४० या वयोगटातील असावी असा माझा अंदाज ( अंदाजच ) आहे .ही पिढी उच्च विद्या विभूषित दिसते व सर्व गोष्ठी आजच्या भवतिक विज्ञानाच्या निकषांवर घासून पडताळू पहाते. हे चूक आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही , किंबहुना ही वृत्ती योग्यच आहे , पण प्रत्येक गोष्टीत " बाप दाखव नाही तर श्राद्ध कर " असे म्हणण्याची प्रवृत्ती जी अलीकडे फोफावत चालली आहे , ती योग्य नव्हे असे मला वाटते . वरील ब्लॉग वर "राधा - भक्त का प्रेयसी" (http://www.misalpav.com/node/16488 ) हा लेख सायली थत्ते यांनी लिहिला आहे .त्या या लेखातून जे सांगू इच्छितात ते खरोखर वाखंन्या जोगे आहे व पटण्या सारखे आहे . पण त्या लेखावर आलेल्या काही प्रतिक्रिया वाचता सुकृत दर्शनी तरी असे दिसते की सायली थत्ते यांनी काय म्हंटले आहे हेच मुळी प्रतिक्रिया देणार्यांना कळलेले नाही किंवा उगाच काहीतरी टिंगल व विषयांतर करण्या साठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.

मुळात ज्यांना त्या विषया बद्दल काही माहितीच नाही , किंवा ऐकीव माहिती आहे ज्याचे विद्रुपीकरण झाले आहे, अशा लोकांनी तिथे प्रतिक्रिया दिलेल्या आढळतात .श्री कृष्णाची जी ओळख त्यांना आहे ती सिनेमातली गाणी , टीवी सिरिअल्स , गोविंदा यातूनच जास्त झाली आहे असे दिसते . या पैकी कोणीही खरोखर श्री कृष्णाला जाणून घेण्याचा कधीही तिळमात्र प्रयत्न केल्याचे दिसत नाही . रस खान , सूर दास , श्री वाल्लाभाचार्यांचे मधुराष्टकम कधी त्यांच्या वाचनात आले असेल से वाटत नाही . भागवताचा तर प्रश्नच उद्भवत नाही .सायालीजींचे म्हणणे रस्ताच आहे . त्या म्हणतात -

" श्रीकृष्ण यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक निर्णय हे आपल्यासाठी आदर्शांचा मोठा ठेवा आहे. 'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. व आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही."

श्री कृष्ण जेंव्हा गोकुळातून मथुरेस गेले तेंव्हा त्यांचे वय साधारण ८ वर्षाचे होते .गोकुळातल्या त्यांच्या लीला या त्या वयातल्या होत्या .श्री कृष्ण म्हणजे गोकुळातल्या गोप गोपिकांचा श्वास , प्राण व आत्मा होते . कंसाच्या राज्यात पिचून गेलेल्या गोप गोपिकांना श्री कृष्ण म्हणजे रणरणत्या उन्हात सुकून गेलेल्या वसुंधरेवर पडलेला वर्षेचा शीतल शिडकाव .गोकुळातल्या गाइन पासून मिळालेले दुध , दही व तूप हे सर्व मथुरेस पाठवावे लागत असे .बिचार्या गोकुळ वासीयांच्या मुलांना काही मिळत नसे .श्री कृष्णाने त्या विरुद्ध बंड पुकारून हे बंद केले .श्री कृष्णा मुळे गोपिकांच्या मुलांना दुध दही मिळू लागले .त्या मुळे गोपिकांना श्रीकृष्णा बद्दल कृतज्ञता व वात्सल्य वाटले तर त्यात नवल कसले ? त्यात कोणती ही भिभत्स्य व शृंगारिक भावना असण्याचे करणाच काय ? श्री कृष्णाला पहिल्या बरोबर गोपिकांना पान्हा फुटत असे , त्यात तरुण लग्न न झालेल्या गोपिकां ही आहेत व जखड म्हातार्या ही आहेत . त्या श्री कृष्णाला आपले दुध पाजत .असा उल्लेख भागवतात आढळतो . असा पान्हा आईच्या वात्साल्यानेच फुटेल की यात काही भिभत्स्य व शृंगारिक पणा आहे ? श्री कृष्ण आणि गोपिकांच्या नात्या मध्ये पाश्चिमात्य लोकांनी हा शृंगारिक पण गुसावला.हिंदू सौंस्क्रूती त्यांच्या समजण्या पलीकडची आहे व होती. वेद आणि उपनिषदांचे ही त्यांनी ( Max Mueller व इतर ) केलेले विद्रुपीकरण असेच आहे .हिंदू सौंस्क्रूती ला जाणून बुजून खाली पडण्या साठी केलेला हा एका इंग्रजां करवी प्रायोजित कटाचा भागच आहे.

वर म्हटल्या प्रमाणे श्री कृष्ण म्हणजे गोकुळातल्या गोप गोपिकांचा श्वास , प्राण व आत्माच होते. त्यांच्या गोपिकां बरोबर वृंदावनात केलेल्या रास लीला या आई व तिच्या तान्हुल्याचे खेळच आहेत. आई नाही का आपल्या लहान बालका बरोबर लपाछपी सारखे इतर खेळ खेळत ? आईचे दुध पिताना बालकाचा हात आईच्या उरोजाबरोबर खेळण्याची चेष्टा करत असतो . यात आईला काही भिभत्स्य वाटते का ? यात कोणता शृंगार आहे की कोणती वासना ? दुध पाजणे ही तर आई साठी जिवाशिवाची भेटच असते .त्यात तिच्या मातृत्वाचा परमोच्च शिखर असतो व अमृत तुल्य तृप्ती असते .

श्रीकृष्णांनी आपल्या नाना लीला मधून गोकुलीतल्या सर्व गोपिकांना ही जिवाशिवाची भेट घडवून दिली . त्यामधूनच या कृष्ण गोपिकां च्या कहाण्या निर्माण झाल्या . गोपिकां ना श्री कृष्णा बद्दल वाटणारे वात्सल्य युक्त प्रेम , त्यांची श्री कृष्णांच्या चरणी असलेली निष्टा व भाव यातूनच काल्पनिक राधा निर्माण झाली असे मला वाटते . गोपिकां चे कृष्णा बद्दल असलेले सर्व भाव त्या राधे मध्ये एकवटले आहेत . राधा हे सर्व गोपिकां चे एकीकरणच आहे . त्यातूनच मग " राधा भाव " जो आज सर्व लोक प्रचलित आहे तो सिद्धांत वर आला . पण पुढे त्याचे नको ते भ्रष्ट वर्णन करण्यात आले . आज लोकां ना " राधा कृष्ण “ म्हंटले की काय अभिप्रेत आहे हे सायली थत्ते यांच्या अनुभावरून कळेल

“ आजच्या तरूण पिढीला 'राधा-कृष्ण' किंवा 'कृष्ण आणि गोपी' य नात्यांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी नंतर एक सर्वेक्षण केलं त्यावरून मी खात्रीनी सांगू शकते की आजच्या तरूण पिढीमध्ये या नात्यांबद्दल खूप गैरसमज पसरले आहेत. आजच्या तरूण-तरूणींकडून 'राधा-कृष्ण' या नात्याबद्दल हे विचार आले -
१. राधा गोकुळातील एक गोपी होती. राधा आणि कृष्ण हे 'प्रियकर-प्रेयसी' होते.
२. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.
३. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!
4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते !!
एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेवा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी –
The court said even Lord Krishna and Radha lived together according to mythology. '
http://timesofindia.indiatimes.com/india/Live-in-relationship-pre-marita... “

रस खान नावाचे एक मधूरा भक्तीत लीन असले ले मोठे कृष्ण भक्त मथुरेत होवून गेले . त्यांनी लिहिलेल्या एका गीतात गोपिकां चे श्री कृष्ण बद्दलचे प्रेम सुंदर रित्या शब्दांत प्रकट होते. वर्णन केलेला प्रसंग असा आहे की कृष्ण उद्धवाला गोकुळात गोपींना समजवण्यास पाठवतो की तुम्ही गोपिकां तर ज्ञानी आहात तेंव्हा तुम्ही असा माझ्या करता विलाप करणे शोभत नाही . तेंव्हा गोपिकां काय म्हणतात ते खाली दिले आहे .

ओ श्याम रे , मोरे श्याम रे , मोरे श्याम ही ........ रे
श्याम तोरी मूरत ह्रदय समानी (२)
अंग अंग व्यापी , रग रग राँची (२)
रोम रोम उरझानी (२)
के श्याम तोरी मूरत ह्रदय समानी
जिथ देखू तीथ तू ही दिखत (३)
दृष्टी कहाँ बौरानी (२)
श्रवण सुनत नित ही बंसी धुन (२)
देहि रही लिपटानी
रे श्याम तोरी मूरत ह्रदय समानी (२)
उधौ कहत सन्देश तिहारो ,
ऊधौ कहत.. ,उधौ कहत सन्देश तिहारो ,
हम ही बनावत ज्ञानि
कहो थल जहाँ ज्ञान को राखें
हरी जूठन रसखानि
रे श्याम तोरी मूरत ह्रदय समानी (२)

त्या गोपी शेवटी उद्धवाला म्हणतात , अरे तू ज्ञानी ज्ञानी म्हणून आम्हाला फसवू पाहतोस होयरे .अरे तू आम्हाला हे सांग कि तू जे ज्ञान ज्ञान म्हणतोस ते आम्ही ठेवू तरी कुठे व आहे तरी काय ती चीज ? .त्या श्री कृष्णाने आमचे अंग अंग व्यापले आहे . इतके की आमच्या धमन्यांतून ही तोच वाहतो रक्त नव्हे ! शरीरातला कण अन कण त्याच्यामुळेच उर्र्जीत आहे .अश्या ह्या कृष्णाला सोडून आम्ही तेतु जे ज्ञान ज्ञान म्हणत आहेस त्याचे आम्ही काय करू ते कुठे ठेवू ? सांग ना ? अशी कोणतीच जागा आमच्या कडे शिल्लकच नाही जी आमच्या कृष्ण कन्हैया ने व्यापली नाही. जिथे पाहतो तिथे कृष्णच दिसतो . त्याच्या वेळूची मधुर धून आम्ही सतत ऐकत व श्रवण करत असतो . त्या बसुरीचे सूर आमच्या शरीराला चिकटून असतात . त्या एका कृष्णा शिवाय आम्हाला काही दिसत नाही सुचत नाही . आमच्या ह्रिदयात त्याची मूर्ती सामावली आहे . तोच आमचा पंच प्राण व आत्मा आहे . तो इथे गोकुळात नाही तर आम्हाला प्राण शरीराला सोडून गेल्याच्या यातना होत आहेत ! उद्धवा आणि तू आम्हाला ज्ञानाचे डोस पाजतोस का ? हे होते गोपीं चे कृष्णा बद्दल चे प्रेम . ह्या गोपींच्या प्रेमाला भक्तीचा , वात्सल्याचा , अध्यात्माचा पाया आहे . वासनेचा व शृंगारीक्तेचा लवलेश ही याला शिवलेला नाही .

पुढे याच प्रसंगावर सूरदास जी काय लिहितात ते पहा ..

उधो, मन न भए दस बीस।
एक हुतो सो गयौ स्याम संग, को अवराधै ईस॥
सिथिल भईं सबहीं माधौ बिनु जथा देह बिनु सीस।
स्वासा अटकिरही आसा लगि, जीवहिं कोटि बरीस॥
तुम तौ सखा स्यामसुन्दर के, सकल जोग के ईस।
सूरदास, रसिकन की बतियां पुरवौ मन जगदीस॥

अरे उद्धवा मन तर आमच्या कडे एकच आहे रे , दहा वीस मने नाहीत की आपलं एक मन एका गोष्टीत रमवावे व दुसरे मन दुसऱ्या गोष्टीत . आता तर ते एक मनही आमच्या कडे उरले नाही रे , ते तर केह्वाच त्या कृष्णा बरोबर मथुरेस गेले . मग आम्ही कोणत्या मानाने तू जे निर्गुण निराकार ब्रम्ह म्हणत आहेस त्याची उपासना करू ?

त्या माधवा विन आमची गत शिरा विन असलेल्या शरीरा सारखी झाली आहे .आम्ही कृष्ण वियोगिनी आहोत . त्या माधवाच्या पुनर मिलनाच्या आशेवर आम्ही आमचे प्राण या बिन शिराच्या शरीरात कोटी वर्ष्ये सुद्धा ठेवून देवू . उद्धवा तू तर त्या कृष्णाचा परम सखा आणि शिष्य आहेस . तू तर परम योगी आहेस मग तुला हे कसे कळू नये ? तुला आमची झालेली दशा का दिसू नये ?

या वरून लक्ष्यात येते की गोपिकांचे आणि श्री कृष्णा चे नाते हे गुरु व शिष्यांचे जे नाते असते तेच होते . त्या गोपिकां श्री कृष्णाच्या मार्गदर्शना खाली उत्तम योगी झाल्या होत्या .कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला तेंव्हाच त्यांना श्री कृष्णाचे परमेश्वर स्वरूप लक्ष्यात आले होते .अश्या या गोपिकांच्या व श्री कृष्णाच्या लीलांना शृंगारिक म्हणणे किती चूक आहे?

कामदेवाला ही एकदा या लीला शृंगारिक वाटल्या व त्याचे कसे गर्व हरण झाले ते पुढच्या भाग २ (कृष्ण व गोपिकां (२. कामदेवाचे गर्व हरण )) मध्ये सांगण्यास जरूर आवडेल . तो पर्यंत इतकेच .

आवडल्यास व पटल्यास जरूर शेयर करा ही विनंती.

https://www.blogger.com/blogger.g?blogID=7651279905318854206#editor/targ...

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

26 Nov 2015 - 6:15 pm | मांत्रिक

कृपया मिपावर एका दिवशी एकापेक्षा अधिक लेख टाकू नयेत अशी प्रथा आहे. तिचे पालन करावे अशी अपेक्षा आहे. तुमचे लेख चांगलेच आहेत पण एकदम इतके लेख टाकल्यास लोक दुर्लक्ष करतात. नुकसान आपलेच होते.
बाकी एक आस्तिक म्हणून तुमचे लेखन तर आवडलेच आहे हेदेखील नमूद करतो.

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 6:55 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद . आपल्या सूचना लक्ष्यात आल्या .

ही घ्या एक तुम्हाला छानशी भेट

a

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 7:13 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये आणि सुंदर भेटी बद्दल धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2015 - 10:34 pm | परिकथेतील राजकुमार

गेली कित्येक वर्षे आम्ही 'एकूणात श्रीकृष्ण होते किती?' ह्या प्रश्नावरच अडलो आहोत.

तुमचा अभ्यास बघता, हा प्रश्न तुम्हाला नक्की कळला असणार आणि तुम्ही त्याचे काही एक समाधानकारक उत्तर देऊ शकाल अशी आशा करतो.

सतिश गावडे's picture

26 Nov 2015 - 10:52 pm | सतिश गावडे

लेख आवडला. तुमचा व्यासंग दांडगा आहे. लेखनशैली प्रवाही आणि रसवाही आहे. भक्तीरसाने ओथंबलेली आहे.
लेखाच्या शेवटी जी लिन्क दिली आहे, त्यावर क्लिक केले असता जिमेलचे लॉगिन पेज येते. ते काय आहे?

प्रचेतस's picture

26 Nov 2015 - 11:03 pm | प्रचेतस

अगदी खरंय.
विश्वव्यापी यांनी आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच घातलेय अगदी.
त्यांची ब्लॉगची लिंक चुकून गूगलला लॉग इन होत असावी.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Nov 2015 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा

तुमचा व्यासंग दांडगा आहे. लेखनशैली प्रवाही आणि रसवाही आहे. भक्तीरसाने ओथंबलेली आहे.
लेखाच्या शेवटी जी लिन्क दिली आहे, त्यावर क्लिक केले असता जिमेलचे लॉगिन पेज येते. ते काय आहे?

http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-020.gif

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 12:33 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

खाली दिलेल्या ह्या माझ्या ब्लॉगच्या लिंक :
http://spiritualityandus.blogspot.in/
http://meghvalli.blogspot.in/
http://rivuletofstars.blogspot.in/

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 12:28 pm | विश्वव्यापी

धन्यवाद सतिश गावडे जी ,
तुम्हाला लेख आवडल्याची प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला .
मी एक साधारण व्यक्ती आहे व तुम्ही समजता तेवढा माझा व्यासंग नाही .
पण जे थोरामोठ्यांच्या तोंडून ऐकले , वाचले ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो .
आपल्या सनातन संस्कृती बद्दल अभिमान बाळगणारा एक सर्व साधारण व्यक्ती असे म्हणा न .

खाली दिलेल्या ह्या माझ्या ब्लॉगच्या लिंक :
http://spiritualityandus.blogspot.in/
http://meghvalli.blogspot.in/
http://rivuletofstars.blogspot.in/

प्रचेतस's picture

26 Nov 2015 - 10:59 pm | प्रचेतस

बाकी भागवतातल्या कुठल्या स्कंधात उपरोक्त उल्लेख आहेत म्हणे?

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 3:20 am | संदीप डांगे

कचरा आहे सगळा... दिल को बहलाने के लिये गालिब...

(चला पळा आता, मांत्रिक करतो दंगा आता)

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 12:38 pm | विश्वव्यापी

संदीप डांगे जी ,

आपण लेख वाचल्या बद्दल व आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .

DEADPOOL's picture

28 Nov 2015 - 12:09 am | DEADPOOL

@ संदीप डांगे
कचरा? आणि आपल्या लेखनास कुणी असे म्हटले तर लगेच तांडव

दत्ता जोशी's picture

27 Nov 2015 - 9:00 am | दत्ता जोशी

गोपिकांची कृष्ण भक्ती किती उच्च श्रेणीची होती हे स्वतः कबीर सांगतात.-
" कबीर कबीर क्यों कहत हो जाओ जमना तीर, एक गोपी प्रेम में बह गये कोटी कबीर"।
बाकी विषय वासनेने बरबटलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया किती मनावर ग्याव्यात ते आपण ठरवावे.

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 12:40 pm | विश्वव्यापी

धन्यवाद श्री दत्ता जोशी जी ,
तुम्हाला लेख आवडल्याची प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला .

बायदवे गीतगोविंदातल्या चावट गोष्टींबद्दल आपले काय म्हणणे आहे लेखकरावजी?

चावट काय म्हणतोस रे जयदेवाने केलेल्या रसाळ शृंगारीक वर्णनाला. दू..दू...दू.

अहो ती रसाळ वर्णने आहेत तशी दिली तर भक्तमंडळी पाकिस्तानास पाठवतील आम्हांस. =))

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 12:49 pm | प्रचेतस

खी खी खी.
भक्तांना संस्कृत कळेल काय?

कळणार नाहीच मोस्टली, कळाले तरी वळणार नाही.

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 12:51 pm | संदीप डांगे

छ्या ,तुम्हाला त्यामागचे दिव्य आध्यात्मिक अर्थ नाहीच समजायचे, त्यासाठी व्यासंग लागतो. मनात इश्वरासाठी अनकण्डीशनल विश्वास लागतो. थोडक्यात कंडीशन्ड मेंदू लागतो.

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 2:18 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी.

(कलियुगी मलीन झालेला) बॅटमॅन.

दत्ता जोशी's picture

27 Nov 2015 - 1:22 pm | दत्ता जोशी

;-)

बौद्ध धर्माच्या निवृत्तीपर तत्वज्ञानाला उतारा म्हणून गीत गोविन्द आलं होतं काय रे? साधारण काळ एक सारखा आहे ना?

नाही, बौद्ध धर्माचा अन त्याचा कै संबंध नाही कारण काळ तितका जुळत नाही. १२ व्या शतकात जयदेव होऊन गेला तेव्हा भारतभर बौद्ध धर्माचा प्रभाव नगण्य होता.

बाकी तसं असेल असं मानलं तरी त्यातले एकेक उल्लेख पहा अन मग बोला. ;) हा घ्या नमुन्यादाखलः

धीरसमीरे तटिनी तीरे वसति वने वनमाली
गोपीपीनपयोधरमर्दन चंचलकरयुगशाली

pacificready's picture

27 Nov 2015 - 3:43 pm | pacificready

हे संचाक झालं की!

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 3:59 pm | बॅटमॅन

अशा अनेक संचाक आपल्याला महाभारत, भागवत, इ. ग्रंथांमध्ये दिसतील. त्यातल्या प्रत्येक वर्णनाला रूपकात्मक म्हटले की भक्ती कारणी लागली असे मानणारे अनेक लोक आहेत. त्यांची विचारपद्धती मोठी रोचक असते.

१. एक तर असे काही वर्णन ग्रंथांत आहे हेच नाकारायचे.
२. वर्णनाचे दाखले दिले की चुकीची व्हर्जन, नेटवरून घेतलेले स्वकपोलकल्पित बुलशिट अशी संभावना करायची.
३. अगदी सर्वमान्य ग्रंथातले फटू दाखवले की मग लिटरल-रूपकात्मक, पाश्चात्य-देशी असे वाद उकरून काढायचे.

यावरून दिसते की सेक्स वगैरे गोष्टींबद्दल यांना मनापासून तिटकारा आहे. धार्मिक ग्रंथांत सेक्सची वर्णने आल्यामुळे धर्माची अपकीर्ती होते असे यांना मनोमन वाटत असते म्हणून त्यावर एकदम दिलोजानसे पांघरूण घालू पाहतात. यातली मजा अशी आहे की हा दृष्टिकोन ब्रिटिशांनीच भारतात रुजवला. अशी वर्णने असलेले विकृत ग्रंथ वाचणारे हे किळसवाणे लोक पहा कसे हीन दर्जाचे आहेत वगैरे वगैरे बोंबाबोंब करायला त्यांनी सुरुवात केली, आणि काय आश्चर्य! पाहता पाहता हिंदू लोकही त्याला अलगद बळी पडले. आपल्या धर्माचे परकीयांच्या चुकीच्या मूल्यमापनापासून रक्षण करण्याच्या भरात "नाही, आमच्याकडे असलं काही नव्हतं, हे सगळं फक्त आध्यात्मिक होतं" चा ओरडा सुरू झाला. या सर्व भानगडीत निकोप दृष्टी कुठल्याकुठे लोपून गेली.

अशा काही वर्णनांमुळे हिंदू धर्माची बदनामी होते असे मानल्यामुळेच त्यांच्याकडे दुर्लक्ष किंवा निषेध या दोनच प्रतिक्रिया दिल्या जातात. घोर अज्ञान हेच त्याच्यामागचे कारण आहे. खरेतर अज्ञानापेक्षाही आडमुठी वृत्ती. अज्ञानाचे काय, प्रत्येकजण कशाबाबतीत तरी कमीअधिक प्रमाणात अज्ञानीच असतो. पण आडमुठेपणा म्हणजे सूर्य दिसूनही त्याला नाकारण्याची वृत्ती. तिला कै औषध नाही. खर्‍या हिंदू विचारांची जागोजागी भ्रूणहत्या करणारे असले लोक आजकाल फार बोकाळले आहेत. असल्या गोष्टींमुळे लांछन लागण्याइतका हिंदू धर्म स्वस्त आहे का? हे कुणीतरी सांगावे. परकीयांच्या संकल्पना आपणच उराशी कवटाळून बसतो आणि आपल्या धर्माला, देशाला सरसकट हास्यास्पदपणे त्यांच्यापासून डिफेंड करू पाहतो. हे अतिशय केविलवाणे आहे. तो मेकॉले त्याच्या थडग्यात हसत असेल हे असलं सगळं पाहून.

लैंगिकता नाकारण्याची पद्धत चर्चने सुरु केली ना आधी?

आश्रम व्यवस्थेमध्ये असं बंधन कुठेही आढळत नाही. फक्त ओरबाडु नका तर योग्य रीतीने काय ते करा हे सांगितलं गेलं होतं ना?

चर्चमध्ये तर ही पद्धत होतीच- त्याआधीही बौद्ध-जैन तत्त्वज्ञानात असावीसे वाटते पण त्याबद्दल नक्की माहिती नाही, पाहिले पाहिजे.

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 4:47 pm | संदीप डांगे

जैन बौद्ध तत्त्वज्ञानात वैषयिक वासना टाळण्याकडे भर आहे. त्यांचे पाच नियम समान आहेत. आता हे पाच नियम कोण पाळू शकते हे पाहिले तर हे तत्त्वज्ञान कोणासाठी निर्माण झाले आणि कोणी त्याचे पालन करणे प्रत्यक्ष व्यवहारात शक्य आहे हे कळू शकेल. हे दोन्ही तत्त्वज्ञाने राजपुत्रांनी तयार केले आहे. साहजिकच मानवी आयुष्यात मिळवता येण्यासारखी ती सर्व सुखे मिळूनही मनःशांती काही लाभत नाही यातून दोघांनी जे विचारमंथन सूरु केले त्यातून त्यांचे तत्त्वज्ञान प्रसवले. हे तत्त्वज्ञान सर्व अर्थाने पोट भरलेल्या लोकांसाठीच आहेत. त्यामुळे "तुम्हाला सहज उपलब्ध असलेल्या वैषयिक वासना तुम्हास खर्‍या मनशांतीपासून दूर नेत असल्याने कशा खोट्या आहेत" हे आपल्या प्रवचनांमधून त्यांनी लोकांना सांगितले असेल. त्यातूनच संभोगादि क्रिया ह्या मानवाला त्याच्या ध्येयापासून परावृत्त करायला सहाय्यभूत ठरतात म्हणून त्या टाळाव्या याकडे कल होता. पण झाले उलटेच. मानव ध्येय काय असावे ते राहिले दूर, आधी वासनाच टाळाव्यात ह्याचाच आटापिटा. कारण हे आडंबर करणे, दिखावा करणे अनुयायांसाठी तुलनेने सोपे आहे. साधना केल्यावर जे मिळते त्याचे प्रदर्शन करता येत नाही. प्रदर्शन करता येण्यासारखे काहीतरी मिळवण्याची इर्ष्या बहुसंख्य अनुयायांमधे असतेच. त्यातूनच असली मते प्रसवतात. लोकांचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे निर्माण होतात. समाज अधिकाधिक दांभिक होत जातो.

म्हणजे बेसिकली त्यांनी आधी जे काही शक्य होतं ते सगळं उपभोगलं.

आणि मग लोकांना सांगितलं हे करू नका ते करू नका . बरोबर ?

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 5:23 pm | संदीप डांगे

अगदी अगदी.

खरे तर, कोण कुठे उभे राहुन काय सांगतो हे फार महत्त्वाचे. उद्या बिल गेटस म्हणाला की "लोकहो, बक्कळ पैसा कमावूनही परमसुख मिळत नाही हे मला कळले." तर लोक हे बघणार नाहीत की आपणांस तेवढे पैसे न कमावता, तो जे म्हणतो, ते कळण्यासारखे नाही. तो म्हणतोय ना मग खरेच असेल असे म्हणून ते पैसे कमावणंच सोडून देतात. इथेच चुकतं. आयुष्यात सर्वोत्तम ती सर्व सुखे मिळवणे हे प्रथम ध्येय असावे, ते ध्येय गाठले की आपोआप पुढचा मार्ग दिसायला लागतो. पण लोक हे काही लक्षात घेत नाहीत. राधासामी सत्संग ह्या पंथाचे असे सूत्र वाचल्याचे आठवते की सम्यक मार्गाने धन कमवावे, सर्व सुख कमवावे त्यातून अध्यात्माची प्रगती करावी.

पोट भरल्याशिवाय आध्यात्म उपयोगाचे नाही हेच सत्य आहे. पहिली पायरी चढल्याशिवाय दुसरी चढताच येत नाही. डायरेक्ट दुसरीवर उडी मारायला गेले की तोंडावर आपटतात. काही गरिब लोक, तोंडदेखले, 'आम्ही तर बुवा तृप्त आहोत' चा दिखावा करतात. डीप डाउन त्यांनाही भौतिक सुखाची अपेक्षा असतेच, ते या जन्मात शक्य नाही हे बघून फक्त थकलेले असतात. त्यांनी वासना सोडून दिल्यात असे होत नाही.

एक फकिराची गोष्ट आहे. तो बादशाहाला म्हणतो की असेल तुझे तखत जगात प्रसिद्ध, पण खरे सुख तर माझ्या फाटक्या झोळीत आहे. त्या फकिराला म्हणावेसे वाटते, अरे बाबा, तुझ्या झोळीची तख्ताशी तुलना करून तुला अजूनही तख्ताची आशा आहे हेच दाखवून देतोय. ते मिळू शकत नाही म्हणून 'द्राक्षे आंबट' नावाचा प्रकार चाललाय.

पोट भरल्याशिवाय आध्यात्म उपयोगाचे नाही हेच सत्य आहे. पहिली पायरी चढल्याशिवाय दुसरी चढताच येत नाही. डायरेक्ट दुसरीवर उडी मारायला गेले की तोंडावर आपटतात. काही गरिब लोक, तोंडदेखले, 'आम्ही तर बुवा तृप्त आहोत' चा दिखावा करतात. डीप डाउन त्यांनाही भौतिक सुखाची अपेक्षा असतेच, ते या जन्मात शक्य नाही हे बघून फक्त थकलेले असतात. त्यांनी वासना सोडून दिल्यात असे होत नाही.

एक फकिराची गोष्ट आहे. तो बादशाहाला म्हणतो की असेल तुझे तखत जगात प्रसिद्ध, पण खरे सुख तर माझ्या फाटक्या झोळीत आहे. त्या फकिराला म्हणावेसे वाटते, अरे बाबा, तुझ्या झोळीची तख्ताशी तुलना करून तुला अजूनही तख्ताची आशा आहे हेच दाखवून देतोय. ते मिळू शकत नाही म्हणून 'द्राक्षे आंबट' नावाचा प्रकार चाललाय.

ते "धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती" हा प्रकारबी त्यातलाच बगा. लै डोक्यात जातो याचा उद्घोष. जणू पैसा कमावणे वगैरे काहीतरी पापच आहे.

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 6:03 pm | संदीप डांगे

हो ना. त्याचे कारण, पुढे आलेला एक दुसरीच पद्धत, की जर मनावरच प्रयोग करायचे तर सर्व सुख मिळालेच पाहिजे असे नाही. त्या वैषयिक इच्छांना प्रयत्नपूर्वक उचलून फेकता येते. जसे जप, तप, शरीरप्रताडन. यातून डायरेक्ट दुसर्‍या पायरीवर उडी मारता येते. ही गरिबांसाठी आहे. एक विसरल्या जाते की प्रचंड कष्ट इथेही चुकत नाहीत. पण पैसे कमावण्याच्या, संसार करण्याच्या कष्टापेक्षा ते (कष्ट घेत आहोत हे दाखवणे) जास्त सोपे, दिखावू आहे. त्यामुळे गरीब आहोत ही कमतरताही लपवता येते आणि अध्यात्मिक म्हणून मानही मिळतो. श्रीमंतांनाही जे सहज शक्य नाही ते 'आत्मसुख' आम्ही गरिबीत मिळवले असे आडंबर मांडता येते. त्यातूनच पुढे धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती हा प्रकार उगवला. श्रीमंतांनीही त्यांना स्पर्धा कमी म्हणुन हा समज कायम राहू दिला असेल. ;-)

मोक्षापर्यंत जायचे महात्म्यांनी वेगवेगळे असंख्य मार्ग सिद्ध केलेत. लोकांपर्यंत येतायेता, लोकांच्या सोयिस्करपणे बदलून घेण्यामुळे, सगळी घाण झाली. त्यामुळे आता भारतीय समाजात अनेक मतप्रवाह दिसतात जे अजिबात शुद्ध नाहीत.

अद्द्या's picture

27 Nov 2015 - 6:07 pm | अद्द्या

एवढं सगळं करण्यापेक्षा
जमेल तेवढ्या सन्मार्गाने जमेल तेवढा पैसा कमवा . आणि कुठल्या NGO ला दान देण्या पेक्षा रविवारची सुट्टी कुठे तरी खरोखर गरज असलेल्या लोकांच्यात घालवा. त्यांना खरोखर काही मदत करता येते का पहा . शाळेची फ़ी , हॉस्पिटल चा खर्च , कुठल्या शाळेच पडलेलं छप्पर परत बांधून देणे वगेरे . आणि आपल्या बायका मुलांना सुखात ठेऊन स्वतः सुखी राहा .

बाकी कृष्णाने हजारो वर्षापूर्वी कोण्या गोपीके बरोबर (जर हे सगळंच काल्पनिक नसेल तर ) काय केलं होतं याने आजच्या जगात काय घंटा फरक पडतो . आणि वर हेच करा तेच करा आणि हेच खाऊ नका त्याला हात लाऊ नका कशाला पाहिजे .

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 6:49 pm | संदीप डांगे

बाकी कृष्णाने हजारो वर्षापूर्वी कोण्या गोपीके बरोबर (जर हे सगळंच काल्पनिक नसेल तर ) काय केलं होतं याने आजच्या जगात काय घंटा फरक पडतो . आणि वर हेच करा तेच करा आणि हेच खाऊ नका त्याला हात लाऊ नका कशाला पाहिजे

पुर्णपणे सहमत.

पण होतं कसं की आपल्या मान्यतांना लोकमान्यता मिळवल्याशिवाय काही लोकांना स्वस्थ बसवत नाही. मग आम्ही मानतो ते कसे हुच्च, म्हणजे आम्हीच कसे हुच्च, श्रेष्ठ असा अहंकार मिरवायचा असतो. आपला एक कल्ट, घेट्टो, कळप पाहिजे असतो. त्यात सुरक्षित वाटत असते. आता कळप सांभाळायचे तर त्याचे नियम पाहिजेत, नाहीतर कळप 'कळप' कसा दिसेल? फुटबॉलच्या मॅचमधे एकाच टीममधले सगळे वेगवेगळे टीशर्ट घालून आले तर कसे चालेल. म्हणून हेच करा, ते करू नका. नियम पाळले नाही तर कळप फुटेल ना? पुढे हे नियम तोडणार्‍यांचेही कळप होतात. त्यांना आपण पंथ म्हणतो. त्यांच्यातही नियम तोडणे हा एक नियम बनतो. हिप्पी हे त्याचे चांगले उदाहरण. कुठेही जा, काहीही करा. जिथे कल्ट मधे सामिल व्हाल तिथे हे फेस करणं आलंच. लोक फेस करतात कारण कळपात राहण्याची, सुरक्षित राहण्याची मूळ नैसर्गिक भावना. ती ज्याला तोडता आली तो मुक्त झाला. ती अजिबात सोपी नाही हेही खरेच.

सगळे धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, उपउपपंथ यांची जंत्री बघितली तर माणसाला आतही राहायचं असतं आणि वेगळंही हेच निदर्शनास येते.

माहितगार's picture

27 Nov 2015 - 7:00 pm | माहितगार

बाकी कृष्णाने हजारो वर्षापूर्वी कोण्या गोपीके बरोबर (जर हे सगळंच काल्पनिक नसेल तर ) काय केलं होतं याने आजच्या जगात काय घंटा फरक पडतो .

गोप-गोपिका-राधा असो अथवा कव्वाल्यांमधील इश्वर भक्तीचे प्रेममय रंगवणे असो, अभिव्यक्ती स्वांतत्र्य कमी असलेल्या काळात या मिथकांनी आणि काव्यांनी अभिव्यक्तीस्वांतत्र्याला त्या काळात किमान पक्षी बुडत्याला काडीचा आधार न्यायाने काहीना काही आधार दिला असणार आहे हे लक्षात घ्यावयास हवे, आजच्याही काळात "बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही" अशा प्रकारची वाक्यरचना कुणालाही थांगपत्ता न लागू देता कवि(यत्रीला) स्वतःचे मन मोकळे करण्याची संधी उपलब्धकरत राहते.

" अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी "

हे कधीपासून सुरु झालं म्हणे ? कि आपलं न्यूज वर दाखवलं आणि तुम्ही ते इथे चिकटवताय ?
कशाचा हि संबंध कुठेही जोडायचा आपला . .

इथे मी जर कोणाचा "देव" काल्पनिक आहे असं म्हणून हि बिनधास्त फिरू शकतोय . . या पेक्षा जास्त स्वातंत्र्य काय हवं ?

माहितगार's picture

27 Nov 2015 - 7:47 pm | माहितगार

मी व्यक्ती स्वांतंत्र्याचा अभाव असलेल्या बर्‍याच जुन्या काळाचा उल्लेख करतो आहे. हल्लीच्या काळाचा नव्हे. असो.

सतिश गावडे's picture

27 Nov 2015 - 7:48 pm | सतिश गावडे

आजच्याही काळात "बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही" अशा प्रकारची वाक्यरचना कुणालाही थांगपत्ता न लागू देता कवि(यत्रीला) स्वतःचे मन मोकळे करण्याची संधी उपलब्धकरत राहते.

केव्हढं ते रिडींग बिटवीन दी लाईन्स म्हणायचं. =))

डांगे सरांचे आम्ही फ्यान झालो आहोत

सतिश गावडे's picture

27 Nov 2015 - 7:49 pm | सतिश गावडे

स्पा सरांशी सहमत.

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 4:56 pm | बॅटमॅन

अनेक धन्यवाद. एक नंबर प्रतिसाद.

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 1:46 pm | विश्वव्यापी

श्री बॅटमॅन जी ,
माझा लेख या व असल्या चावट कल्पना किती चुकीच्या आहेत यावरच आहे हे आपल्याला माहित आहेच . त्यामुळे गीत गोविंदम बद्दल वेगळा असा अभिप्राय देण्याची गरज नाही .तरीही आपल्या विनंतीस मान देवून मत व्यक्त करत आहे .
गीत गोविंदम हे बाराव्या शतकात ओडीशी कविवर्य जयदेव यांनी रचलेले काव्य आहे .
ते काव्य रूपकात्मक आहे . १८ व्या शतकात विलियम जोन्स यांनी गीत गोविंदम याचे इंग्रजीत पहिले भाषांतर केले व त्यानंतर ते जगातील बर्याच भाषां मध्ये अनुवादित केले गेले जे विलियम जोन्स यांच्या पहिल्या इंगजी भाषांतरावर आधारित आहेत . ज्या चुका विलियम जोन्स यांनी केल्या ( गाभा लक्ष्यात न घेता फक्त भाषांतरावर भर दिला ) त्याच चुका पुढे सर्व भाषांतरात ( भाषेत अंतर असल्या मुळे असे मी म्हणेन ) झाल्या. पुढे आपल्या सारखे लोक हाच भास अंतराचा (भाषांतराचा ) सत्य मानू व म्हणू लागले . जसे आपण लिहित आहात की गीत गोविंदम मध्ये जो चावट पणा आहे त्या बद्दल माझे मत काय आहे ?
वस्तुतः मी एक सर्व साधारण व्यक्ती आहे, कोणी पंडित वा विशारद नव्हे ! पण आपल्या सनातन संस्कृती बद्दल अभिमान बाळगणारा एक भारतीय असे मी जरूर मला समजतो . तेव्हा माझ्या अल्पमतीने जे काही समजते त्यावर लिहितो . विचार मांडणे हेच फक्त माझ्या हातात आहे . ते सर्वांना पटावे हा माझा हट्ट नाही . आपण भारतीय आहोत व आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या साहित्याचा चुकीचा अर्थ जगाने लावावा व आपण तोच खरा असे मानावे हे मला पटत नाही .असो .
आपण लेखावर प्रतिक्रिया दिल्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे .तेव्हा मनापासून धन्यवाद .

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 2:06 pm | बॅटमॅन

आपल्याला संस्कृत येते का? येत नसेल तर अगोदर शिका मग पुढे बोलू.

गीतगोविंद रूपक आहे हे कशावरून?

विलियम जोन्स सोडून कोणी भाषांतर केलेच नाही का? मी माझे मत फक्त पाश्चात्यांच्या मतावर आधारलेले मांडतोय हा जावईशोध तुम्ही कशाच्या आधारावर लावला?

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 3:27 pm | विश्वव्यापी

श्री बॅटमॅन जी ,
आपण माझ्या प्रतिसादावर रागावलात का ? तर मी आपला क्षमस्व आहे .
माझा हेतू आपल्याला दुखावण्याचा अजिबात न्हवता .आपले मत पाश्चात्यांच्या मतावर आधारलेले असे आहे मी कुठेच नमूद केले नाही .मी जनरल लिहिले आपल्याला उद्देशून नाही तेव्हा हा जावईशोध आपणच लावला आहे . तो माझ्या माथी कृपा करून मारू नका हि विनंती .
" पुढे आपल्या सारखे लोक हाच भास अंतराचा (भाषांतराचा ) सत्य मानू व म्हणू लागले . जसे आपण लिहित आहात की गीत गोविंदम मध्ये जो चावट पणा आहे त्या बद्दल माझे मत काय आहे ?"
इथे ' आपल्या ' म्हणजे तुमच्या माझ्या सारखे लोक असे ध्वनित करायचे होते .

बाकी गीत गोविंदम मध्ये आपल्याला चावट पणाच दिसतो या वरून रूपकात्मक (Symbolism) काय व Literal काय घ्यावे यात तुमची काही गफलत होत असावी असे वाटते ( कदाचित तसे नसेल ?) त्या साठी संस्कृत आलेच पाहिजे असे नाही . कारण भाषा जरी कळत असली तरी अर्थाचा अनर्थ व्हायचा तो होतोच . आता तुमचा माझ्या प्रतिसादावर झाला तसा .

चूक भूल द्यावी घ्यावी . आणि हो ! मी संस्कृत विशारद नाही हे सांगायचे राहूनच गेले .

आपला आभारी

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 3:38 pm | बॅटमॅन

मी आपला क्षमस्व आहे .

हे वाचून मी आपला बेशुद्ध आहे.

गीतगोविंदामध्ये चावटपणा आहे किंवा नाही इतके सांगा. इतक्या साध्या प्रश्नाचा तुम्ही

१. गीतगोविंदात फक्त चावटपणाच आहे,
२. ते चूक असल्याने लोक त्याला सत्य मानू लागल्यास मोठीच हानी होईल,

वगैरे विपर्यास करून विपर्यस्त प्रश्नाचे उत्तर देत आहात. तेव्हा मुद्दा भरकटवू नका.

गीतगोविंदात चावट म्हणता येण्यासारखी वर्णने आहेत किंवा नाही? हा साधा प्रश्न आहे. त्यावरून मला काय दिसते वगैरे वैयक्तिक शेरेबाजी नको. ज्याला हो/नाही असे सरळ उत्तर देता येते तिथे इतकी पळापळ कशासाठी?

एकदा या प्रश्नाचे उत्तर मिळाले की पाहू पुढे काय ते.

सत्य धर्म's picture

27 Nov 2015 - 2:53 pm | सत्य धर्म

जय श्री कृष्ण| खूपच ओघवती भाषाशैली आणि अभ्यासपूर्ण लेख आहे . अप्रतिम.

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 7:46 pm | विश्वव्यापी

सत्य धर्म जी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

अद्द्या's picture

27 Nov 2015 - 4:12 pm | अद्द्या

इतकं हि down to earth नसावं राव . पुढे काही बोलताच येत नाही . .

मला नाय . ब्यट्याला .

जाऊदे . अध्यात्म आणि हिब्रू लिपी दोन्ही आमच्या साठी सारखीच . " न समजणारी " .

त्यामुळे . फक्त एकाच सूचना . तेवढं ते २-४ दिवस मध्ये सोडून लेख टाका . म्हणजे बरोब्बर मार्च महिन्यात पाहते पाहते माइक वर जोरात पारायण ऐकल्यावर जे होतं ते होणार नाही . शांतपणे वाचू समजू शकू

अद्द्या's picture

27 Nov 2015 - 4:13 pm | अद्द्या

पहाटे पहाटे *

माहितगार's picture

27 Nov 2015 - 4:28 pm | माहितगार

@ विश्वव्यापी

मी सुद्धा आवडीने रुपकार्थ काढतो नाही असे नाही पण म्हणून रुपकार्थ हे सरळार्थाची जागा घेऊ शकत नाहीत. मिपा वरील याच विषयावरील अलिकडील एक उदाहरण म्हणजे प्राची अश्विनी यांचे बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही .. हे काव्य. या काव्याचे मी आणि अजून एक सदस्य मांत्रीक दोघांनी मिळून रुपकार्थही लावले. ते वाचण्यास तुम्हालाही आवडतील पण आम्ही लावलेले रुपकार्थ त्या कवितेचा अधिकृत अर्थ होऊ शकत नाही.

सरळ अर्थ आणि रुपकार्थ या दोन गोष्टी निराळ्या आहेत. स्वतः लेखकाने रुपकाचा अर्थ स्पष्ट केला नसेल तर सरळ अर्थ हाच अधिकृत अर्थ ठरतो. रुपकार्थ प्रत्येक वाचकासाठी निरनिराळा तो स्वतः काढेल तसा असतो, रुपकार्थास अधिकृत अर्थाची जागा मिळू शकत नाही, हे रुपकार्थ काढण्याच्या / रसग्रहणाच्या वाचकाच्या स्वांतंत्र्याचा आदर करूनही नमुद करावेसे वाटते.

प्राची अश्विनींच्या कवितेच्याच बाबतीत त्यांनी रुपकार्थ स्पष्ट नसता केला तर सरलार्थच अधिकृत अर्थ ठरतो. योगा योगाने प्राची अश्विनींनी त्यांच्या प्रतिसादातून रुपकार्थ स्पष्ट केला तेव्हा त्यांनी स्पष्ट केलेले रुपक अधिकृत ठरते. मी किंवा इतरांनी कितीही चांगले अर्थ त्या कवितेतून काढले तरी ही ते अधिकृत ठरत नाहीत हे लक्षात घेणे आवश्यक ठरते हे आदरपूर्वक नमूद करतो.

आणि बॅटमनराव म्हणतात तसे संस्कृत वाङमयात बर्‍याच वेळा मोकळी ढाकळी शृंगार वर्णने आलेली आहेत त्या बद्दल केवळ संकोचाने म्हणून रुपकार्थ काढलेच पाहीजेत असे नाही, श्रीकृष्ण राधा यांच्या बद्दल आहे तर रुपकार्थ काढणे सोपे जाते, पण इतर प्रत्येकवेळी रुपकार्थ काढता येतोच असे नाही. रामायणात हनुमान श्रीलंकेत पोहोचतो तेव्हा रावणाच्या रंगमहालातील हनुमानास दिसणारे वर्णन येऊन जाते त्या सर्गाचा उद्देश हनुमानाचे मन किती वैराग्यपूर्ण आहे हे दाखवण्यासाठी आहे. त्यात रावणाच्या रंगमहालाच्या वर्णनावरून कुणी रावण आणि रावणिकांचे अद्वैत शोधू लागेल तर अनर्थ होतीलच बहुधा ते तुमच्याही मनाला पटणार नाही. असो.

(केवळ उदाहरण म्हणून नमूद केले आहे. कुणास रावण-रावणिकात अद्वैत शोधायचे असेल तर आमची व्यक्तीशः हरकत नाही अशा लोकांनी आमचा प्रतिसाद ह.घ्या. आणि चुभूदेघे)

धन्यवाद आणि शुभेच्छा.

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 4:30 pm | बॅटमॅन

मस्त प्रतिसाद, १००% अग्री.

कविता सुंदरच आहे . मी आताच वाचली .ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या वीराणीची आठवण झाली ." पांडुरंग कांती " . सुरवातीला ज्ञानेश्वर पांडुरंगाच्या रूपावर लिहितात व त्याचे वर्णन करतात . त्याच रूपाचा ध्यास त्यांना असतो .ते पांडुरंगाच्या त्याच रूपाशी समरस होतात . पण मग त्यांना खाली दिल्या प्रमाणे वेगळेच अनुभव येतात .

पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे ।
उभाची स्वयंभु असे ।
समोर की पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिले कैसे ॥ ४ ॥

क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनी स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली ।
आसवाला जीव राहो ॥ ५ ॥

बाप रखुमदेविवरू ह्रीदयीचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळा पाहो गेले तव ।
भीतरी पालटू झाला ॥ ६ ॥

बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ही आधुनिक आताच्या काळातील विराणी आहे असे मला वाटते . त्यात कावियेत्री म्हणतात की मी राधा बनले असते पण कृष्ण भेटला नाही .कारण त्या राधे ला व कृष्णाला त्यांना वाटत असलेल्या रुपात पाहत आहेत ( ते रूप जे समाजाने घडवले आहे ). त्यांना स्वानुभवावरून नंतर लक्ष्यात येते की

बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही

मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही .

वाह प्राची अश्विनी ची सुंदरच रचना आहे ही .

धन्यवाद

माहितगार's picture

30 Nov 2015 - 2:20 pm | माहितगार

@ विश्वव्यापी

प्रेषक शिवकन्या यांची अलिकडील एक कविता लंगोटनगरी पोपटराजा..... आणि त्याच काव्य धाग्यावरील शिवकन्या यांनी त्यांच्या प्रतिसादातून दिलेला किस्सा 'मानवी डोकी नको तिथे रुपक कसे लावतात आणि लावण्याची जरुरी आहे तिथे ते चटकन लक्षात येईलच असे नाही', याचे उदाहरण म्हणून अचानक माझ्या समोर आले.

आधी शिवकन्या यांनी ऐसि अक्षरेवरील सतिश तांबे यांच्या मुलाखतीतील एक किस्सा (उतारा) उधृत केला आहे तो असा.

'एका पार्टीत एका नटीने तिथं जमलेल्या सर्व पुरुषांना उद्देशून "सर्वांनी आपले पोपट दाखवा" असं मोठ्याने सांगितले.ते वाक्य जेव्हा मला कळले, तेव्हा मला वाटले की एका स्त्रीच्या तोंडी असलेलं हे वाक्य जगातल्या अत्यंत श्लील वाक्यांपैकी आहे. आणि बीमार पुरुषी मानसिकतेला ते झेपणं शक्य नव्हे.'
~ सतिश तांबे यांच्या मुलाखतीतील एक किस्सा (संस्थळऐसि अक्षरे)

"....सर्व पुरुषांना उद्देशून "सर्वांनी आपले पोपट दाखवा" " ह्या वाक्या सरशी नको ते रुपक डोक्यात येते, पण प्रत्यक्षात ते सतिश तांबे नमुद करतात तसे एक केवळ श्लील वाक्य आहे. सरलार्थात रुपक योजण्याची घाई केली कि गडबड होऊ शकते (हे वाक्य श्लील कसे असू शकते हे कुणाला न समजल्यास मोकळेपणाने विचारावे)

त्याच वेळी लंगोट आणि पोपट या नवीन प्रतिमा घेऊन येणारी शिवकन्या यांची लंगोटनगरी पोपटराजा..... कविता रुपक लक्षात आले नाही तर अश्लीलही वाटू शकेल. जो पर्यंत लंगोटनगरी पोपटराजा..... चा कवि(/यत्री) रुपक स्पष्ट करत नाही/स्विकारत नाही, तो पर्यंत इतराना रुपक लक्षात आले तरीही सरलार्थ तो कुठे कुठे अश्लील वाटला तरीही तोच अधिकृत राहतो. अर्थात लंगोटनगरी पोपटराजा..... चे रुपक लक्षात येणेही गरजेचे आहे नाहीतर त्यातील खोलवर दडलेला अर्थ वाचक बाजूला सारतील-असे रुपक लक्षात घेण्यासाठी सरलार्थ आणि रुपक यांची गल्लत न करता निष्कर्ष घाई न करता तारतम्याने काव्य अभ्यासावे लागते.

कवि(/यत्री) रुपक स्वतः स्पष्ट केलेले नसल्यास आपले अंदाज सपशेल चुकीचे असू शकतात, लंगोटनगरी पोपटराजा..... मी वाचक म्हणून पहिल्यांदा कल्पना केलेले रुपक मूळ कविस अभिप्रेत नसावे त्यामुळे माझा पहिला अंदाज चुकला, पण वेगळ्या प्रतिसादातून मीच केलेली वेगळी रुपक कल्पना अचूक असल्याचे कविने स्विकारले, सांगण्याचा मतितार्थ आपण म्हणजे वाचकांनी केलेल्या रुपकांबद्दलच्या कल्पना पूर्णतया चुकीच्या गृहीतकावर आधारीत असू शकतात, अधिकृत स्पष्टीकरणा अभावी सरलार्थच अधिकृत राहतो, पण प्रसंगी एका पेक्षा अधिक रुपकांबद्दल विचार करून पहावा लागू शकतो.