कर्म आणि जन्म मृत्यूचे बंधन

विश्वव्यापी's picture
विश्वव्यापी in जनातलं, मनातलं
26 Nov 2015 - 5:19 pm

जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग , भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect or every effect has a cause ) मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा ?

पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि कर्म घडतात तरी कशी ? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे ? विचार केला कि लक्षात येते कि कर्माचे मूळ ' इच्छा ' हे आहे . इच्छाच कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. मग ‘ इच्छा ’ कुठून उत्पन्न होते ? तर ती मनातून उत्पन्न होते . म्हणजेच सर्व कर्मांचे मूळ हे आपले मन आहे . मनात इच्छा का उत्पन्न होतात ? मन हे अहं भावनेने भरलेले असते. ते सतत आपले अस्तित्व दाखवण्या साठी झघडत , धडपडत असते . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते सतत इच्छा निर्माण करत असते व कर्म घडवून आणत असते . मन हे इच्छे वरच जगते . कर्मांच्या फालावारच ते जगते व पोसले जाते . कर्म संपली की मनाचे अस्तित्वच संपले . वेदांत व संतांची उक्तीच आहे की ' मन ' मेले की ' अहं किंवा ' मी ' मारतो , ' मी ' मेला की कर्म कसे घडणार ? घडणारच नाही ! , आणि कर्माच जर संपले तर फळ कोठून येणार ? फळच नाही तर ते भोगायला जन्म कुठचा ?

आपण वर पहिले की कर्म कसे घडते . पण कर्म म्हणजे नेमके काय ? त्याची संज्ञा काय ? हे पडताळण्याचा प्रयत्न करू ? समजा की तुम्ही या जगात एकटेच आहात दुसरे कुणीच नाही ! मग तुम्ही खाता , पिता , झोपता ,चालता , फिरता , विश्रांती घेता तेव्हा कर्म घडते का ? नाही घडत ! हे कर्म जरी असले तरी ते वेदांतात अपेक्षित असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत नाहीत . तेव्हा ही कर्मे नव्हेत . आता समजा तुम्ही चालला आहात . चालता चालता तुम्हाला एक मुंगी दिसली व तुम्ही तिला ठेचलीत तर हे मात्र कर्म झाले . किंव्हा तुम्ही समुद्र किनार्यावर फिरत असताना एक व्यक्ती बुडताना पाहून तुम्ही त्या व्यक्तीला बुडण्यापासून वाचविलेत तर हे सुद्धा कर्म या संज्ञेस पात्र ठरते . तेव्हा विचार केल्या वर लक्षात येईल की कर्म घडण्या साठी त्या कर्माचे संस्कार एकापेक्षा अधिक जीवांवर घडले पाहिजेत . तेव्हाच कर्म घडते . हे असे आपले मला वाटते , तुम्हाला ते पटेलच किंव्हा पटलेच पाहिजे असे नाही . पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .

आता आपण पहिले की , मनातल्या ' मी ' ला मारले की मन मरते . मन मेले की कर्म घडत नाही . मग मनाला मारावे म्हणजे काय ? व ते कसे करावे ?

कठ उपनिषदांत सांगितल्या प्रमाणे कर्म ही दोन प्रकारची असतात . एक असते ' श्रेयस कर्म ' व दुसरे असते ' प्रेयस कर्म ' . जीवाने कोणत्या कर्माचा आचार करावा हे सर्वस्वी त्याच्या हातीच असते .मनाचा कल हा नेहमी प्रेयासाकडे असतो . तो प्रथम श्रेयासाकडे वळवायला हवा कारण प्रेयासामधून फक्त विषय सुखाची प्राप्ती होते व ' मी ' ची लालसा वाढते . मग मन श्रेयस कर्मा कडे कसे वाळवावे ? तर ते विवेकाने वाळवावे . विवेक बुद्धीत असतो पण बुद्धिलाच जर मानतील विषयांनी ग्रासले असेल तर विवेक कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे जे मनावर विजय मिळवून त्या ' मी ' ला मारण्यास समर्थ आहे . ते नसेल तर काही उपयोग नाही . मग हे शस्त्र मिळवावे कुठून ? संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहूनच ते मिळवता येते . ते एकदा मिळाले की श्रेयसचा प्रेयासावर विजय मिळवता येतो . तो विजय मिळवला की ' मी ' मेलाच म्हणून समजा . ' मी ' मेला की मनाचे अस्तित्व संपलेच की हो ! मन संपले की द्वैत संपते , द्वैत संपले की कर्मा नष्ट होतात . एकट्याने का कर्म होतात ? जिथे अद्वैत आहे , तिथे कोठला ' मी ' नी कसले कर्म ? , कसला जन्म आणि कसला मृत्यू ? कोठेच काहीच नाही !

संत सोहिरोबानाथ म्हणतात तसे .....

आलो नाही , गेलो नाही I मध्ये दिसणे हे भ्रांती I

जागृत होता स्वप्नची हरपे I कर्पूरन्याये जग हरले I

https://www.blogger.com/blogger.g?blogID=7651279905318854206#editor/targ...

धर्मविचार

प्रतिक्रिया

स्पा's picture

26 Nov 2015 - 5:21 pm | स्पा

बराच त्रोटक झालाय , आपल्याकडून विस्तृत विवेचन वाचयला आवडेल

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 6:07 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .

मांत्रिक's picture

26 Nov 2015 - 5:24 pm | मांत्रिक

सुंदर लिहिलंयत. पण थोडं त्रोटक वाटतंय. पण असो मांडणी व हेतू आवडला.

मूकवाचक's picture

26 Nov 2015 - 5:48 pm | मूकवाचक

"हे असे आपले मला वाटते , तुम्हाला ते पटेलच किंव्हा पटलेच पाहिजे असे नाही . पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या."
+१००

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 6:09 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 6:08 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 5:38 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद . आपल्या सूचना लक्ष्यात आल्या .

राही's picture

26 Nov 2015 - 6:24 pm | राही

गहना कर्मणः गति: |
(कर्मणोह्यपि बोद्धव्यं, बोद्धव्यं च विकर्मणः
अकर्मणश्च बोद्धव्यम, गहना कर्मणो गति:) भगवद्गीता. ४/१७
विषय गहन आणि व्याप्ति प्रचण्ड. महान साधुसंतांनी वेगवेगळ्या शब्दांत वर्णिलेला.
लिहावे तितके थोडे.

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 6:47 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 6:47 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

सतिश गावडे's picture

26 Nov 2015 - 6:33 pm | सतिश गावडे

छान आहे प्रवचन. आमचे एक मित्रही असेच रसाळ प्रवचन करतात.

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 6:52 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .

प्रचेतस's picture

26 Nov 2015 - 7:50 pm | प्रचेतस

गीता प्रेस स्टाईल का?

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 8:38 pm | विश्वव्यापी

धन्यवाद.

नाव आडनाव's picture

27 Nov 2015 - 10:03 am | नाव आडनाव

सर, अहो त्यांच्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे ना? म्हणजे ते प्रश्न विचारत आहेत ना? त्यांना धन्यवाद काय देताय :)

सतिश गावडे's picture

26 Nov 2015 - 8:58 pm | सतिश गावडे

होय.रसाळ भाषा ही त्यांची खासियत.

pacificready's picture

26 Nov 2015 - 9:21 pm | pacificready

धन्यवाद.
-उपद्व्यापी ;)

बा द वे विश्वव्यापी, विस्तृत लिहाच.

मलाही धन्यवाद पाह्यजे!!!!

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 8:35 pm | विश्वव्यापी

धन्यवाद.

जव्हेरगंज's picture

26 Nov 2015 - 11:25 pm | जव्हेरगंज

मला पण, मला पण!

(';')

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 10:19 pm | DEADPOOL

धन्यवाद रिटर्न्स!!!!!!

कवितानागेश's picture

26 Nov 2015 - 8:23 pm | कवितानागेश

चांगला लेख. पण काही मुद्दे अजून विस्तृत हवेत असे वाटतंय.
ब्लॉग ची लिंक उघडत नाहीये.

विश्वव्यापी's picture

26 Nov 2015 - 8:34 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
http://spiritualityandus.blogspot.in

मोगा's picture

26 Nov 2015 - 9:09 pm | मोगा

सगळेच लोक कर्मफल शून्य करुन पॅवेलियनमध्ये जाउन बसले तर अंपायरला काय कर्म उरेल ?

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2015 - 9:20 pm | परिकथेतील राजकुमार

सर्वात आधी आपण सर्वांच्या प्रतिक्रियांवरती धन्यवाद दिलेत त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

मुख्य प्रश्न म्हणजे, ह्या लेखाचे सुलभ मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल?

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 2:23 pm | विश्वव्यापी

राजकुमार जी
आपली प्रतिक्रिया एकदम आवडली :-) . विशेष करून खाली दिलेली मिशखिल प्रतिक्रिया .

" मुख्य प्रश्न म्हणजे, ह्या लेखाचे सुलभ मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल?"

आता या लेखाचे आणखी सुलभ मराठी भाषांतर म्हणाल तर ते तुम्हाला कदाचित कोणीतरी इथे दिलेल्या प्रतिक्रियेत सापडण्याचीच जास्त शक्यता आहे .कारण अस्मादिकांना हा लेख आपल्या पर्यंत पोहोचवण्यातच इतकी दमछाक झाली . गुगल वर इंग्रजी तून मराठी टंक लेखन केल्या मुळे (marathi.changati.com) . दुसरे असे की माझा आतापार्यात आमचा असा समाज होता की अस्मादिकाच मराठीत कच्चे आहेत . पण आपण तो समाज खोटा ठरवला . ह्या बद्दल अस्मादिकांनी आपले आभार मानले तर ते आपल्याला कितपत रुचेल ह्या विवंचनेतच ते अजून आहेत .त्यातूनच हा प्रतिसाद देत आहोत तेव्हा चूक भूल द्यावी घ्यावी .
आपला पुनस्च आभारी आहे

कर्म श्रेष्ठ असते की ईश्वर श्रेष्ठ? आणि सर्व कर्मे तर ईश्वर करवून घेतो ना? मग ते पुण्य असो वा पाप, ईश्वर जर माझ्या हातून करवून घेतो तर फक्त पुण्यच का करवून घेत नाही? माझ्या कर्मांचे उत्तरदायित्व माझे असेल तर ईश्वर सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी कसा? मग उपासना ही ईश्वराची का करावी? आपल्या कर्मांची आणि त्याअनुषंगे स्वतःची का करू नये? आणि माझ्या आजच्या परिस्थितीला माझ्या गतजन्मातली कर्मे कारणीभूत असतील तर त्या मी न पाहिलेल्या आणि मला न आठवणार्‍या कर्मांचे फल हे योग्यच मिळते आहे की अयोग्य वा अन्यायकारक आहे हे मला समजणार कसे? आणि ह्या जन्मातल्या कर्मांचे फल पुढच्या जन्मात मिळणार तर मग ईश्वरोपासनेचा फायदा काय? त्याला काय अर्थ राहिला?

हे असले प्रश्न अनुत्तरितच राहतात कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे. असो.

सतिश गावडे's picture

26 Nov 2015 - 11:32 pm | सतिश गावडे

अगदी हेच प्रश्न मलाही पडतात. जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 3:11 am | संदीप डांगे

कर्म श्रेष्ठ असते की ईश्वर श्रेष्ठ?
कर्माचेच अस्तित्व आहे. ईश्वर ही एकसंघ सृष्टीची कल्पना आहे, इश्वराची महात्म्यांनी दिलेली कल्पना आणि जनमानसात रुजलेली कल्पना याचा संबंध नाही. खरे तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची तर इश्वर म्हणजे नेमकं काय यावरच एक लेखमाला होईल.

आणि सर्व कर्मे तर ईश्वर करवून घेतो ना?
कोणत्याही कर्माचा कर्ता इश्वर आहे ह्या संकल्पनेच्या मुळाशी मीपणाचे अस्तित्व मिथ्या असून आपल्याहातून जे काही घडते ते सृष्टीनियमाप्रमाणे घडते म्हणजेच इश्वरैच्छेप्रमाणे घडते असे मानणे आहे.

मग ते पुण्य असो वा पाप, ईश्वर जर माझ्या हातून करवून घेतो तर फक्त पुण्यच का करवून घेत नाही?
पाप-पुण्य आभासी कल्पना आहेत. एखादे कृत्य पाप की पुण्य असे सांगू शकत नाही.

माझ्या कर्मांचे उत्तरदायित्व माझे असेल तर ईश्वर सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी कसा?
कर्माचे उत्तरदायित्व आपल्यावर तेव्हाच येते जेव्हा आपण त्यात गुंतून पडतो. निष्काम कर्म ही संकल्पना त्याच साठी आहे. जी कर्मे होतात, केली जातात ती सृष्टीतच लीन होतात. तीच सर्वशक्तिमान व सर्वव्यापी आहे. सर्व जीवांचे कर्मरत असणे हीच सृष्टी आहे.

मग उपासना ही ईश्वराची का करावी? आपल्या कर्मांची आणि त्याअनुषंगे स्वतःची का करू नये?
इश्वरउपासना म्हणजे कर्मकांडे नव्हे. इश्वरउपासना म्हणजे निष्काम कर्मयोग.

आणि माझ्या आजच्या परिस्थितीला माझ्या गतजन्मातली कर्मे कारणीभूत असतील तर त्या मी न पाहिलेल्या आणि मला न आठवणार्‍या कर्मांचे फल हे योग्यच मिळते आहे की अयोग्य वा अन्यायकारक आहे हे मला समजणार कसे?

प्रत्येकदा गतजन्मातलीच कर्मे फल देत असतात असे नाही. कर्मफलास वेळेचे बंधन नाही. कारण वेळ ही इथे सापेक्ष आहे. काही कर्माची फळे दोन मिनिटात मिळतात, काहींना वीस वर्षे लागतात, काहींना हजारो वर्षे सुद्धा लागू शकतात. साधना करून पहिल्या, अगदी शिशू-वर्गातल्या साधनेत आपणास नीदान समजायला लागल्यापासूनची कर्मे व त्याची मिळालेली फळे दिसायला लागतात. आपल्याला न आठवणार्‍या घटना आठवतात. जीवनाचा चित्रपट उभा राहतो, सेकंदा-सेकंदासह. आता ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तेव्हा असो.

आणि ह्या जन्मातल्या कर्मांचे फल पुढच्या जन्मात मिळणार तर मग ईश्वरोपासनेचा फायदा काय? त्याला काय अर्थ राहिला?
इश्वरोपसना कर्मांचे फल टाळण्यासाठी आहे हे गृहितक चुकीचे आहे. कर्मफल अटळ आहे. ते काहीही केले तरी टळत नाही. कर्मफल भोगणे व त्यातून नवे कर्माचे कर्ज तयार होऊ न देणे म्हणजेच खरी इश्वरौपासना.

खरे तर ही थ्योरी अनुभवासोबत शिकायची गोष्ट आहे. समोर उंदिराचे डिसेक्शन करुनच त्याचे अंतर्गत अवयव कसे काम करतात ते दाखवून शिकवता येते. त्यामुळे बाकी काही नाही, जमलं तर एकदा विपश्यना शिबीर करून या. थेरी विथ प्रॅक्टीकलसहित अनुभव मिळेल. फ्री आहे.

उत्तराने समाधान झाले नाही. वर विचारलेले सर्व प्रश्न तरीही लागू पडतात. कर्म हे पापपुण्याच्या वर्गवारीत मांडायचे नाही असे म्हटले तरी त्याचे चांगले-वाईट असे वर्गीकरण करावेच लागते. तेव्हा, जी कर्मे 'गुन्हा' या सदराखाली मोडतात आणि कायदेशीरदृष्ट्या ज्याबद्दल शिक्षा होऊ शकते अशी कर्मे करण्याची प्रेरणा ईश्वर (किंवा सृष्टिनियम वगैरे जे असेल ते) कशी काय देऊ शकतो आणि देत असेल तर तो ईश्वर हा ईश्वर कसा, ही मेख आहे. आणि जर कर्मामध्ये गुंतून पडावयाचे नाही असे असेल तर कर्माची चिंता मानवाने का करायची किंवा त्याबद्दल जागरूक का रहायचे असा प्रश्न निर्माण होतो. कर्मविपाकसिद्धांत हा मुळात ईश्वरसिद्धांताचे तोकडेपण लपवण्यासाठी पुढे केली गेलेली अतिशय यशस्वी क्लृप्ती होती. हे सगळे अभ्यासायचे असेल तर भारतीय षड्दर्शनांचा इतिहास मुळापासून अभ्यासायला लागतो. पूर्वमीमांसेत कर्मकांडे करून इच्छित फलप्राप्तीची कामना करणे इथून ते उत्तरमीमांसेत अद्वैताच्या रूपाने अगदी स्वतःसकट सर्व सृष्टीला 'मिथ्या' ठरवून 'ब्रह्म' नामक भ्रामक काहीतरी मृगजळ शोधत राहणे इथपर्यंत भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रवास कसा झाला आणि त्यात आदिशंकराचार्यांचा कसा हात होता व तेव्हापासून मूलतः ईश्वर संकल्पनेला स्थान नसलेल्या दर्शनांमध्येही कोणत्या ना कोणत्या प्रकारे ईश्वर, आत्मा, परमात्मा वगैरे गोष्टी नंतर आणल्या गेल्या हे सर्व पाहणे आवश्यक ठरते. अन्यथा जीवनव्यवहार सोडून निरर्थक भ्रमामागे धावण्यात काही हशील नाही.

कर्मविपाक सिद्धांतामुळे भारतीय समाजातल्या स्थितिस्थापकत्त्वाला दुर्दैवाने इतके महत्त्व आले की अनेक अनिष्ठ रूढी ह्या सिद्धांताचा आधार घेत आपले बस्तान बसवत्या झाल्या. अधिक माहितीसाठी भारतीय समाजाच्या गेल्या साडेतीन हजार वर्षांच्या कालखंडातली स्थित्यंतरे येण्याचा प्रवास समजून घ्यावा. त्याशिवाय या स्थितिस्थापकत्त्वाच्या भयचकित करणार्‍या सखोलतेची व दुष्परिणामांची कल्पना येणार नाही.

विपश्यनेच्या सल्ल्याबद्दल आभार. हे सगळे करून झालेय. एरवी वैश्विक समजल्या जाणार्‍या संकल्पनांविषयीच्या प्रश्नांची उत्तरे ही वैयक्तिक अनुभवाची कशी ठरतात ही मोठी गंमतीची बाब वाटते. अर्थात कर्मविपाक व ईश्वरसिद्धांताच्या समर्थकांची ती नेहमीची पळवाट आहे हे इथे लक्षात घ्यावे लागते.

असो. प्रामाणिकपणे उत्तरे देण्याच्या प्रयत्नांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! धागाकर्त्याच्या उत्तरांच्या प्रतीक्षेत.

pacificready's picture

27 Nov 2015 - 10:28 am | pacificready

'एकोsहं बहुस्याम' ही आदिप्रेरणा मानली जाते. एकासाठी चांगलं ते दुसरयासाठी वाईट असा दृष्टीकोन असल्यानं एका मोठ्या पतलावर उत्पत्ति स्थिति लय उत्पत्ति स्थिति लय उत्पत्ति... असं चक्र सुरु राहण्यासाठी काही गोष्टी बाय डिफ़ॉल्ट आवश्यक असतात. कर्मविपाक हा जसा या तत्वज्ञानाचा भाग तसाच 'तू तुझे कर्म करच' हा आग्रह देखील. माणूस नेहमीच लबाड़ असल्यानं सोईस्कर ते घेत असेल तर त्याचा दोष तत्त्वज्ञानाला देता येत नाही.
माझ्या आजी आजोबांचा मृत्यु मला अप्रिय असला आणि माझ्या दृष्टीनं वाईट घटना असली तरी ती आवश्यक अशीच गोष्ट आहे. ते बहुतेक आपण मान्य कराल.
तुमचा रोख खुनी दरवडेखोर बलात्कारी अशा लोकांना मिळणाऱ्या प्रेरणे बाबत असल्यास (जसा तो आहे) ईश्वर ही व्यवस्था एक न्यूट्रल व्यवस्था आहे हे पककं लक्षात घ्यायला लागतं हेच उत्तर आहे. ईश्वर चांगल्यासाठी आणि वाईटासाठी सुद्धा काहीच करत नाही. क्रियमाण स्वातंत्र्याचा वापर करुन माणसाला असलेल्या बुद्धी च्या सहाय्यानं अंत:करणात आलेल्या कुठल्याही विचाराला स्ट्रीमलाइन करता येतं आणि अनुषंगानं त्यानुसार कर्म करता येतं हे आणि एवढंच सत्य आहे.

रच्याकने तो सद्विचार किंवा दुर्विचार हल्ली ईश्वर ठरवत नाही म्हणे. तुम्हाला 'जीन्स'ना विचारात घ्यावं लागतं असं आमचे अभ्यासू चादर हरवलेले मित्र सतीशजी गावडे सर सांगतात. त्यामुळे इथून पुढं जीन्स चा विचार होणं उत्तम. ;)

ईश्वर को बख्शो!

सतिश गावडे's picture

27 Nov 2015 - 7:33 pm | सतिश गावडे

आमची नाही हो, चादर तुमची हरवली आहे म्हणून घोंगडी घेऊन आला आहात. आता सांभाळा, नाही तर ही घोंगडीही हिसकावून घेतली जायची तुमची. :)

तुमची चादर चोरीला गेल्यानंतर तुमच्यासारख्या साधनामस्त ज्ञानी व्यक्तिमत्वाच्या मनाला वेदना होऊन जो हूंकार उठ(व)ला त्याने आमचे कवीमन हळहळले आणि आम्ही त्यावर भाष्य केले.

'जीन्स'चं म्हणाल तर आमच्यासारख्या "ऑन अवर टोज" असणार्‍या नास्तिकांसाठी आहे ते. आपल्यासारख्या साधनामस्त ज्ञानी व्यक्तिमत्वासाठी एखादा सत्यनारायण पुरेसा आहे. :)

हरवली कसली? काही सालस उठवळ लोकांनी ढापली.
त्यात कोण कोण चादरचोर (खरा शब्द माहिती आहेच तुम्हालाअ) आहेत त्यांना काय कमी पडतंय ते माहिती आहे.
आपण नका काळजी करु सर. स्वत:ची काय ती सांभाळा. राहता राहिला तुम्ही नास्तिक असण्याचा प्रश्न तर त्याबाबत सहानुभूति आहे. :)

सतिश गावडे's picture

27 Nov 2015 - 11:05 pm | सतिश गावडे

आमचीही सहानुभूती आहे. कसं आहे, साधना, ईश्वरी अधिष्ठान, समष्टी वगैरे मोठमोठया गोष्टी करणारी व्यक्ती जेव्हा चारचौघात फुल्यांच्या आडून अभद्र शब्द लिहिते तेव्हा बरं दिसत नाही.

pacificready's picture

27 Nov 2015 - 11:09 pm | pacificready

हा हा हा!
लातोंके भुत बातोंसे नही मानते बेटा. तिथे लाथाच.
बाकी आमच्या साधनेची काळजी तुम्ही करु नये.

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 12:30 pm | संदीप डांगे

उत्तराने समाधान होणार नव्हतेच! कारण आपण एका खूप मोठा आवाका असणारा प्रश्न विचारला आहे. त्याला असे शंभर दोनशे शब्दांच्या स्वरूपात उत्तर देणे शक्य नाहीच. तरी मुळातला जुनाच झगडा जो आहे तो फक्त इश्वर व कर्म यातच आहे. जर प्रारब्ध अनिश्चल आहे तर उपासना करुन ते कसे बदलू शकते? ह्याच प्रश्नाचे विस्तृत स्वरूप म्हणून आपला प्रतिसाद होता. त्यात मूळ गृहितक 'इश्वर आहे' हे धरल्याने व त्याच बरोबर कर्मफलसिद्धांत मानल्याने गोंधळ होणे साहजिक आहे. एकदा 'इश्वर नाही' हे गृहितक मांडून बघा.

माझ्यामते तरी गीतेत वेगवेगळी मते, संज्ञा एकाच ठिकाणी मांडल्या गेल्याने हा गोंधळ आहे.

१. इश्वर नामक सर्वशक्तिमान, सर्वव्यापी अशी एक न्यायनिवाडा करणारी शक्ती आहे जी पुण्य करणार्‍यांना सुख व पाप करणार्‍यांना दु:ख देते. साहजिकच मानवी भावभावना ह्या संकल्पनेत उतरल्याच. भक्ती (दुसर्‍या शब्दात चापलूसी) केली की दु:ख न देता सुख मिळेल ही संकल्पना. त्यातून पुजा-अर्चा कर्मकांडे हे सगळे प्रसवले. पूजा-अर्चा-कर्मकांडे ह्यांचे स्वरूप पाहिले तर चापलूसी-भाटगिरीपेक्षा जास्त काही नाही. पण नैसर्गिक भावभावनांसोबत त्याचे इतके बेमालूम संयुग झाले आहे की सामान्य लोक ते स्विकारू शकत नाहीत.

२. पाप-पुण्य, त्यांचा संचय, त्यानुसार मिळणारे प्राक्तन हे खरे पाहता सहज वाटणारी, असणारी संकल्पना आहे. पण धर्ममार्तंडांनी त्याचे सोयिस्कर अर्थ लावून नैसर्गिक मानवी भावनांना स्वार्थासाठी वळवून भलतीकडेच नेले. उदा. चोरी करणे हे पाप आहे. ह्या वाक्यामागेच किती फोलपणा आहे हे कळून येईल. एखाद्याचे द्रव्य, वस्तू त्याच्या इच्छेशिवाय नकळत घेऊन जाणे म्हणजे चोरी. ही का करू नये तर ज्याची ती वस्तू आहे त्याला जे क्लेश होतील ते चोराला कधी न कधी त्याचे प्राक्तन म्हणून भोगावे लागतील. आता वस्तूमालकाने षडरिपूंचा त्याग केला असेल तर 'वस्तूची मालकी' ही कल्पना मिथ्या झाली. क्लेश होणारच नाहीत तर मग चोराला प्राक्तन मिळणारच नाही. असा सरळ हिशोब कर्मफलसिद्धांतांचा आहे. पण प्रत्यक्षात काय घडते, चोरी वा तत्सम गुन्हे होणे हे समाजव्यवस्थेस घातक आहे. फार 'माया-मोह छोड दो' चा जप केला तरी कुणी भरल्या घरातला एक दाणा चोरला तरी भयंकर त्रास होतो. चोरी हे पाप ठरवण्यामागे कर्मफलसिद्धांत नसून सामाजिक, वैयक्तिक स्वार्थ आहे. असेच व्यभिचार किंवा इतर कुकर्माबद्दलही म्हणता येईल. तर मुद्दा असा आहे की जी कर्मे वाईट म्हटली जातात ती खरंच वाईट आहेत की कुणाचेतरी हित दुखावू नये म्हणून वाईट ठरवली आहेत हे बघणे आवश्यक आहे. ह्या बाबतीत मला नेहमीच पडणारा एक प्रश्न असा की बोकड कापणार्‍याला पाप लागतं की तो खाणार्‍याला? कारण खाणार्‍याने जीव घेतला नाही, जीव घेणार्‍याने खाणार्‍याच्या इच्छेसाठी जीव घेतला. फार तात्विक झगडा आहे. पाप-पुण्याची भूतं कमजोर मनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाचवली जातात. बाकी त्यात तथ्य असे काहीच नाही.

३. कर्माबद्दल जागरूक राहण्याची गरज मानवाच्या दु:ख समुच्चयामधे आहे. काहीही केलं तरी शेवटी दु:खच का होतं ह्या प्रश्नाच्या शोधात सापडलेलं उत्तर म्हणजे कर्म व त्याचे परिणाम. आलिशान गाडी घेतली तर त्याच्या सुखासोबत अनेक दु:खही विकत घेतली जातात. ती दु:खे सुखावर कुरघोडी करतात. मन अशांत होतं, ह्या अशांतीपासून पळण्यासाठी आणखी कर्मे केली जातात, ती अशांतीत भरच टाकतात. ह्या चक्राला अंत नाही. यावर उत्तर म्हणून कर्माबद्दल जागरूक राहण्याची गरज निर्माण होते. डीटॅचमेंट हे कर्मजागृततेचं मोठं अंग आहे. डीटॅचमेंट चिरशांतता देते, पण डीटॅचमेंट येण्यासाठी कर्मात गुंतून न पडणे आवश्यक आहे. मानवी जीवनात मिळवण्यासारखी मनःशांतीपेक्षा अजून कोणती मोठी गोष्ट आहे काय?

३. मी ना षडदर्शनांचा अभ्यास केला, ना पुर्वमिमांसा ना उत्तरमिमांसा. पण असं जाणवतं की ज्यांना सिस्टीम कळली त्यांनी त्यावर प्रयोग करून सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या संकल्पाने विविध तंत्र शोधून काढले. पण सर्व इच्छा पूर्ण झाल्या तरी काहीतरी बाकी राहतेच म्हणून संपूर्ण समाधान शोधतांना अस्तित्वाच्या मूळाशी जाऊन अद्वैत सिद्धांत जन्माला आला. "जर सगळे करुनही सगळे फोलच आहे तर का उगा त्रास घ्या" ह्या मानसिकतेत भारतीय समाजातल्या स्थितिस्थापकत्त्वाचा उगम आहे हे लक्षात येईल. पण यात गोम अशी आहे की पोट भरल्यावरच आध्यात्माच्या गोष्टी कराव्यात हा नियम मोडल्या गेला. कर्म करणे आणि गुंतुन न पडता कर्म करणे ह्या दोन गोष्टीतला बदल प्रत्यक्ष जीवनात न आणता आल्याने व तो फक्त आडंबरांमधे राहिल्याने गडबड झाली. सगळे करावे मात्र फोल समजावे हा खरा जीवनमार्ग होता. पण झाले उलटेच. फोलच आहे तर करायचे कशाला, ठेविले अनंते तैसेचि राहावे हा समज बोकाळला म्हणून भारतीय जीवनात आतून इच्छांची वखवख आहे पण वरून त्यागाचा देखावा आहे. त्यात कुठलाही हेतू साध्य न होता फक्त दांभिकता वाढीस लागली. जगात भारताइतका दांभिक लोकांनी भरलेला देश दुसरा नाही असं ओशो म्हटले ते उगाच नाही. अनिष्ट चालिरीती व रुढींमागे कर्मविपाकसिद्धांत नसून त्याचा शाब्दिक अंगिकार आहे. मोक्षाचे गाजर दाखवून दु:खाने पिचलेल्या समाज नावाच्या गाढवाला पाहिजे तिकडे स्वार्थासाठी मूठभर लोकांनी नाचवले. ह्यात सिद्धांताचा काय दोष?

४. 'ब्रह्म' संकल्पनेला भ्रामक मृगजळ म्हणणे सोपे आहे, त्यास फार काही विद्वत्ता वा व्यासंग वा साधनेची गरज नाही. प्रत्येक जीवाची ब्रहम जाणवण्याची एक रेंज आहे, त्या रेंजच्या क्षमतेनुसार ब्रह्म कळतं. तुम्ही त्याला आज भ्रामक म्हटलं तरी त्याचं जाणवणं अव्हेरू शकत नाही. ब्रह्म गवसणे ही चटकन होणारी बाब नाही. बटन ऑन केलं आणि गवसले ब्रह्म असा प्रकार नाही. त्याच्या वेगवेगळ्या स्थिती आहेत. एखाद्या गवयाला सुरांमधे सापडतं, तेंडुलकरला बॅटमधे सापडतं, शुमाकरला फेरारीमधे सापडतं, सुगरणीला स्वयंपाकात सापडतं. ब्रह्म गवसणे ठायीठायी आहे, सहज आहे. शब्दांचे पुटं चढवून काहीतरी महान दिव्य अनुभव असावा अशी ब्रहमाची संकल्पना मांडणार्‍यांनी समाजाला भ्रमित केले आहे खरे. त्यांचाच आधार घेउन टिकाकार 'ब्रह्म' संकल्पनेवर टिका करतात. खरे तर ब्रह्म हे पोथ्यापुस्तकांमधे, पुराणग्रंथांमधे, आदिशंकराचार्यांच्या विचारांमधे, मानवजातीच्या उपलब्ध पाच हजार वर्षांच्या इतिहासाच्या अभ्यासामधे, कुठेच नाही. माणूस आपलं अस्तित्व विसरतो त्या क्षणी त्याला ब्रह्म गवसलं असतं. कुणाला ते क्षणाच्या शंभराव्या भागाइतकंच मिळतं, कुणाला अनंत काळासाठी. पण त्यासाठी जागृत असणे आवश्यक आहे. कर्मांमधे गुंतून पडले तर ते अशक्य होते. ह्याबद्दल मी ड्रायविंगच्या धाग्यात विश्लेषण केले होते.

५. 'विपश्यना वा इतर काही साधना करुन झालीये' असे आपण म्हटलंय, त्यामागे कबूल केलेला व्यवहार फळला नाही असा एक सूर दिसतोय. कदाचित जे फळ आपण मनी धरून गेलात तेच चुकीचे असेल तर. तुम्हाला कुठल्यातरी एखाद्या विशिष्ट कृतीत, छंदात अपरिमित समाधान मिळत असेल, तंद्री लागत असेल. अशी एखादी गोष्ट असल्यास त्यावर अधिक जोर द्यावा असे माझे मत आहे. त्यात साधना करा. विपश्यना, इत्यादींची गरज आत्ता नाही. राहता राहिला वैश्विक संकल्पना व्यक्तिगत अनुभवांतून समजण्याचा प्रश्न, तर ह्याशिवाय दुसरा उपाय नाही. 'पिंडी ते ब्रह्मांडी' हे तर वैज्ञानिक सत्य आहे.

असो. मी तुम्हाला काही पटवून देण्यासाठी हे लिहिले नसून तुमच्या प्रतिसादाने लिहण्यास प्रवृत्त केले म्हणून लिहिले.

राही's picture

27 Nov 2015 - 4:18 pm | राही

प्रतिसाद अतिशय आवडला.
(जाता जाता: आपण स्थितिस्थापकत्व याचा अर्थ जैसे थे राहाणे असा घेतला आहे का? तसे असेल तर एक छोटी चूक झाली आहे. इलॅस्ट्सिटी या शब्दाला तो मराठी प्रतिशब्द आहे. पण ही बाकी प्रतिपादनाच्या मानाने अगदी किरकोळ बाब आहे.

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 4:31 pm | संदीप डांगे

अर्रर्र... असं होय का? शब्दाच्या सुचवणीबद्दल धन्यवाद. मी खरोखर तसाच जैसे थे राहाणे असा अर्थ घेतला होता. स्थितिस्थापकत्व अथवा इलॅस्टीसिटी म्हणजे काय हे सांगितले तर आभारी राहीन. कारण त्यामुळे एसभाऊंचा मुद्दा कळायला मदत होईल. एसभाऊंचा व्यासंग आणि अभ्यास दांडगा आहे. त्यांनी इतक्या थोड्या शब्दात इतके काही मांडले की ते सुटे करुन त्यावर प्रतिवाद करता करता माझे डोके भंजाळून गेले. ;-)

एस भौना बहुतेक जडत्व म्हणायचं होतं. मराठीत inertia.
स्थितप्रज्ञ कृपया वापरु नये. त्याचा अर्थ फार वेगळा आहे.
-स्थितिस्थापकत्वाचा अर्थ समजला तरी तो इथे कामास येईल का याबाबत साशंक प्यारे

राही's picture

27 Nov 2015 - 5:46 pm | राही

व्यवहारात किंवा सामान्य भाषेत लवचिकता म्हणता येईल. म्हणजे रबर बाह्य दाबामुळे ताणला जाऊ शकतो. रबरी चेंडू दाबला जाऊ शकतो. पण तो दाब नाहीसा झाला की वस्तू आपला मूळ आकार धारण करते. कायमची डीफॉर्म्ड होत नाही.
म्हणजे संकटकाळात थोडीफार तडजोड करून टिकून राहाणं, संकट संपलं की पुन्हा मूळपदावर येणं.
याची अनेक इंटरप्रिटेशन्स होऊ शकतील. उदा. हिंदुधर्म लवचीक आहे असे आपण म्हणतो तेव्हा तो रिजिड नाही असे आपल्याला म्हणायचे असते. म्हणजे थोडीफार इकडेतिकडे वळणं घेतली जाऊ शकतात तरी मूळ अणुरचना तीच राहाते. म्हणजे असे फिज़िकल बदल आत्मसात करता येणं शक्य असतं, त्यामुळे मूळ रासायनिक ढांचा बदलत नाही.
आणखी म्हणजे आपत्कालीन स्थितीत कोणतीही व्यवस्था जास्तीत जास्त क्षमतेने काम करते. पण आपत्कालीन स्थिती संपली की पुन्हा पूर्ववत होते. इत्यादि

धन्यवाद. मला 'स्थितिस्थापकत्व' हाच शब्द वापरायचा होता.

येथे लवचिकता अपेक्षित नाही. स्थितिस्थापकत्व हे भारतीय समाजात आंतरिक व बाह्य विद्रोहांना सहजपणे पचवण्याची वृत्ती अशा अर्थाने म्हटले आहे. 'रिजिडिटी' इथे अपेक्षित नाही. सनातन कर्मठ समज वा रूढीपरंपरा ह्या वरवर पाहता 'रिजिड' भासत असल्या तरी प्रत्येक प्रथेने स्वतःचे बाह्यांग काटेकोरपणे जपण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्त्व आणि तदानुषंगिक भलेबुरे फायदे टिकवून ठेवण्यासाठी स्वतःत वेळोवेळी बदल केले आहेत. हे उदाहरण झाले. तत्त्वज्ञानाच्या प्रवाहांमध्येही कर्मविपाक आणि अद्वैत सिद्धांतांमुळे अशाच स्वरूपाचे स्थितिस्थापकत्व निर्माण झाले. उदा. सांख्यांना वेदांतापुढे टिकाव धरण्यासाठी पुरुषाच्या मोक्षाची कल्पना पुढे आणावी लागली. बौद्धमतात नागार्जुनाने शून्यवाद आणला. आणि मूळ प्रतीत्यसमुत्पाद काहीसा दुय्यम ठरला. एक म्हणजे विरोधी मतांनाही आपलेसे करून घेऊन त्यांच्या विरोधातली आजच्या भाषेत हवा काढून घेणे, बुद्धिभ्रम करणे उदा. बुद्धाला दशावतारात स्थान देणे. दुसरे म्हणजे अशी स्थितिस्थापकता अंगिकारण्यास नकार देणार्‍या चार्वाकसारख्या तत्त्वज्ञानाला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणे; अशा दुहेरी डावपेचांनी उत्तरमीमांसकांनी इतर दर्शनांवर वर्चस्व प्रस्थापित केले.

इतके करून आज उत्तरमीमांसा कुठे आहे असा प्रश्न कुणी विचारला तर उत्तर शोधायला लागेल, इतके गुंतागुंतीचे बदल खुद्द या दर्शनातही झाले. भगवद्गीता या सर्व तत्त्वज्ञान-दर्शनांची जी काही सरमिसळ करते ती पाहून थक्क व्हायला होते. या सर्व स्थित्यंतरात भारतीय समाज हा एक अर्धप्रवाही जिन्नस बनला जो सर्व बदल रिचवत होता आणि तरीही बदलत नव्हता.

राही's picture

29 Nov 2015 - 11:25 am | राही

लवचीक नाही आणि रिजिडही नाही अशी स्थिती आपणास अपेक्षित आहे असे वाटते. पण (पूर्व)स्थितीचे (पुन)र्स्थापन करण्याचा गुण म्हणजे स्थितिस्थापकत्व, या अर्थाने लवचीक आणि रिजिड हे विरुद्धार्थी शब्द ठरतात. पण अंशतः किंवा बाह्यतः रिजिड पण अन्ती लवचीक अशी किंवा उलट, म्हणजे बाहेरून लवचीक पण अंती रिजिड (पार्ट्ली वेव्ह, पार्ट्ली पार्टिकल धर्तीवर) व्यवस्था असू शकते हे पटते.
भगवद्गीता या सर्व तत्त्वज्ञान-दर्शनांची जी काही सरमिसळ करते ती पाहून थक्क व्हायला होते. याच्याशी सहमत. एरवीही, हिंदूंच्या धार्मिक साहित्यात अनेक परस्पर विरोधी मते उत्तम वादप्रतिवादानिशी सुस्थापित आहेत. त्यामुळे निर्णय घेणे हे शेवटी व्यक्तीवर अवलंबून राहाते, आणि मला वाटते हीच खरी गोम आहे. शेवटी आपल्याला काय योग्य अयोग्य हा निर्णय घेण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणे हेच वेत्त्यांचे अन ज्ञात्यांचे उद्दिष्ट राहिले असणार. या दृष्टीनेच सर्व कर्मे(कांडे), कर्म/ज्ञान/भक्ती/सांख्यादि मार्ग सुचवले गेले असणार. मला व्यक्तिशः असे वाटते की ही क्षमतानिर्मिती हेच ध्येय आहे, ते श्रेयस आणि प्रेयस दोन्ही असू शकते. अशा संस्कारित बुद्धीने युक्त अशी 'प्रबुद्धावस्था' प्राप्त झाली की इंद्रियांचे लगाम हाती येतात. अखंड सावधान, समाधान आणि शांतीची स्थिरावस्था येते. सभोवतालाशी एकरूपता येते, सजगता येते. निसर्गातले सूक्ष्म बदलही त्वरित समजतात. निसर्ग या संज्ञेत पशु-पक्षी-वनस्पती-मृद-जल वायु-मानव हे सगळे येतात. सभोवतालाचे वर्तन समजते. यात मानवाचेही वर्तन आलेच. या निरीक्षणांनिशी सज्जता येते अन जीवन अर्थपूर्ण बनते. निर्णयक्षमता कमालीची वाढते. आपली क्षमता, मर्यादा यांची जाणीव होते. व्यावहारिक पातळीवर 'मी कोण आहे' याची जाणीव/ज्ञान होते. 'माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार' हे या मितीतून सत्य ठरते. म्हणजे समष्टीपासून सुरू झालेला हा प्रवास व्यक्तीपाशी येऊन ठेपतो. 'काय जाणल्याने सर्व जाणल्यासारखे होईल' ही जिज्ञासा निमाली, सर्व संभ्रम निमाले, विकार निमाले, दृष्टी स्वच्छ, निकोप, समतोल झाली की जीवन आनंदमय होते. हा आनंद गवसणे हेच ब्रह्म-आत्मा-परमात्मा आदि सर्व डोलार्‍याचे मर्म आहे.
सोप्या व्यावहारिक आणि ऐहिक अर्थाने ही स्थितीच एकतानता, हीच विश्वाशी एकरूपता, द्वैताद्वैतादि द्वंदे मिटलेली अवस्था आणि कदाचित, बुद्धाला अभिप्रेत असलेली निर्वाणावस्था असू शकेल.
हे सर्व अर्थात माझे वैयक्तिक आकलन आहे. याला मर्यादा आणि उणीवा असणारच. या प्रतिसादाच्या मिषाने ते मांडण्याची संधी पुन्हा एकदा साधली इतकेच.

सतिश गावडे's picture

29 Nov 2015 - 11:35 am | सतिश गावडे

प्रतिसाद आवडला.

एस's picture

29 Nov 2015 - 1:09 pm | एस

बव्हंशी सहमत आहे. तुम्ही ज्या डोलार्‍याचा उल्लेख केला तो आधी दर्शनांमधील एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांतून जरी उदयास आला असला तरी नंतर त्याचे सरलीकरण, विस्तार आणि विकसन होऊन मूळ परिप्रेक्ष्य हे जनसामान्यांच्या आकलनात येऊ शकेल अशा हेतूने बदलत गेले. भक्तीमार्गासारख्या उपनिषदांमधील चिंतनमार्गामध्ये प्रेरणा असणार्‍या एका प्रकारे सामाजिक क्रांतीचा उदय जो मध्ययुगाच्या आरंभी झाला आणि विविध संप्रदायांच्या रूपाने बहुजनांमध्ये स्वीकारला गेला हे याचे ठळक उदाहरण म्हणता येईल.

मला व्यक्तिशः लोकायत दर्शन आवडते हे ह्या डोलार्‍याशिवायही व्यवहारधर्म सांभाळून तो जीवनानंद कसा मिळवता येऊ शकेल हे या दर्शनाने सांगितले.

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 2:30 pm | विश्वव्यापी

श्री संदीप डांगे जी ,
आपण प्रश्नांचे दिलेले संक्षिप्त स्पष्टीकरण सुंदर व उत्तम आहे .
आपला अनन्य आभारी आहे .

शरद's picture

27 Nov 2015 - 12:49 pm | शरद

कठोपनिषदात्रील दुस्रर्‍या वल्लीत यम सांगतो कीं "श्रेयस् आणि प्रेयस् असे आयुष्याचे दोन भिन्न मार्ग आहेत.त्यापैकी एक मनुष्याला स्विकारावा लागतो. "श्रेय" मार्गाने जाणार्‍याचे कल्य़ाण होते, तर "प्रेय" मार्गाने जाणारा ध्येयापासून दूर जातो. "श्रेयस्" आणि "प्रेयस्" दोन्ही मनुष्याकडे येतात. शहाणा माणुस त्यांची परिक्षा करून प्रेयस् पेक्षा श्रेयस् ची निवड करतो." श्री. विश्वव्यापी मार्गाला कर्म कां म्हणतात कळत नाही जरा मार्गदर्शन करावे ही विनंती.
@ एस आपण कर्म व ईश्वर यांच्या संबंधात जा शंका मांडल्या आहेत त्या बाबतीत http://www.misalpav.com/node/19221 य़ा लेखात काही उत्तरे मिळू शकतील.पूर्वासूरींनी ईश्वर सर्वेसर्वा मानला खरा पण संतांच्या प्रमाणे त्याला तुमच्या कर्माची फळे द्यावयाच्या कामाला जुंपला नाही. तो अलिप्त/उदासिन आहे. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कर्म करा व त्याची फळे भोगा. ईश्वराला सर्वथ: शरण न जातां, त्याला बाजूला ठेवून, तुम्ही मोक्ष मिळवू शकता. आता कर्माची फळे काय मिळणार हे तुम्हाला माहीत नसते हे खरे पण अधिकारी व्यक्तीचे जीवनच तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. तुकाराम महाराज " न लगे मुक्ती आणि संपदा ! , संतसंग देई सदा !! म्हणतात ते यांसाठीच.
शरद

अलिप्त ईश्वर ही संकल्पना सांख्य तत्त्वज्ञानात 'पुरुष' नामक संकल्पनेच्या 'इंट्रोडक्शन' नंतर आली. तोवर ईश्वर नामक मानवातीत व अमूर्त संकल्पना भारतीय तत्त्वज्ञानात नव्हती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ईश्वराच्या अलिप्ततेबद्दल पुन्हा असे प्रश्न निर्माण होतात की ईश्वर अलिप्त आहे तर त्याचे प्रयोजन काय? आणि अलिप्त असला तर हे परमतत्त्व सृष्टिनियमांचे संयोजन, मार्गदर्शन आणि समापन कसे करू शकते? जर ते करू शकते तर ते अलिप्त नाही. जर अलिप्त नाही तर त्याला विकार आहेत. जर विकार आहे तर त्याला अंत निश्चित आहे. आणि जर अंत आहे तर आदि म्हणजे सुरुवातही आहे. एकूणच ईश्वराची जी प्रचलित संकल्पना आहे ती स्वतःमध्येच अपूर्ण अशी आहे.

(टीप - इथे माझा कोणाच्याही वैयक्तिक श्रद्धांना दुखावण्याचा हेतू नाही. तत्त्वज्ञानाच्या सर्वसामान्यांना सहसा अपरिचित असणार्‍या पैलूंबाबत चर्चा व्हावी आणि त्यातून जवळजवळ सर्वांनाच कधी ना कधी पडणार्‍या प्रश्नांची उकल व्हायला ज्याच्यात्याच्या प्रकृतीप्रमाणे मदत व्हावी हा आहे.)

pacificready's picture

27 Nov 2015 - 1:13 pm | pacificready

know the system, use the system, get the results, leave the system as it is for further use.
If the system is not used then it is useless. If used and you get the results then also its use is over.

हे खुद्द आदि शंकराचार्य वेदांताबाबत म्हणतात (संस्कृतमध्ये. वेदान्ता बाबत)

प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर आणि ब्रह्म असे वेगवेगळे वर्ग केले गेले आहेत. ईश्वर देखील सृष्टि संपते तेव्हा 'मरतो'. शेवटी जे शिल्लक असायचं ते ब्रह्म म्हणून आपण म्हणतो.

याचे संदर्भ मला सापडले नाहीत. ब्रह्म ही संकल्पना आदिशंकराचार्यांनी मांडेपर्यंत ती तुम्ही म्हणता त्या स्वरूपात अस्तित्त्वात होती की नाही याबाबत मला शंका आहे. ब्रह्म या संकल्पनेनंतर ईश्वराच्या मूळ हेतूला धक्का लागतो असे माझे मत आहे. अन्यथा ईश्वर आणि ब्रह्म (त्यातही परब्रह्म) या गोष्टी परस्परांपासून वेगळ्या होण्याचे काही कारण दिसत नाही. तसे वर्गीकरण केले गेले आणि सगुण-निर्गुणाचा युक्तिवाद पुढे आणला गेला त्यामागे ईश्वर या संकल्पनेवर इतर दर्शनांनी घेतलेले आक्षेप कारणीभूत होते.

ब्रह्म या संकल्पनेची आपणांस माहीत असलेली व्याख्या किंवा स्वरूप जर मांडलेत तर त्याच्या सत्यासत्यतेबद्दल काही चर्चा करता येईल.

वरील वर्गीकरण दासबोधात आहे.
ब्रह्माची सत्य असत्यता करता येत नाही कारण ब्रह्म हेच सत्य आहे. जे आहे आणि असतं त्याला ब्रह्म म्हणतात. त्रिकालाबाधित काही असू शकतं का अशी शंका येऊ शकते पण ते तसं असतं.

एस's picture

29 Nov 2015 - 2:29 am | एस

अच्छा. वरील संकल्पनांचे तसे स्वरूप हे मध्ययुगात प्रचलित झालेल्या संतसाहित्यातच असणार हा कयास बरोबर ठरला. संतसाहित्य हे त्याआधी उदयास आलेल्या भागवतधर्मीय भक्ती संप्रदायांच्याच मार्गावरून पुढे आलेले दिसते. त्यामुळे एक म्हणजे संतसाहित्य वा चळवळीचा उद्देश हा तत्त्वज्ञानाप्रमाणे काटेकोर मीमांसा करण्याचा नसून भक्ती ह्या सामान्यजनांसाठी सोप्या उपासनामार्गाचा पुरस्कार करण्याचा होता असे म्हणता येईल. आणि दुसरे म्हणजे भगवद्गीतेप्रमाणे संतसाहित्यातही मूळ तत्वज्ञानी संकल्पनांचा कल्पनाविस्तार झाल्याचे दिसते. त्यामुळे, प्रत्यक्षात वादविवादांत परस्परविरोधी मते म्हणून मांडल्या गेलेल्या अनेक संकल्पना किंवा गृहितके ही संतसाहित्यात एकमेकांसोबत हातांत हात गुंफून असलेली दिसतात. इथे प्रकृतीसोबत मिथ्यावादही येतो, मायाही येते, सगुण ईश्वरही येतो, निर्गुण ब्रह्मही येते.

म्हणून संतसाहित्यातले संदर्भ घेऊन तत्वज्ञानासंबंधी काटेकोर चर्चा करण्यात फारसा अर्थ मला वाटत नाही. संतसाहित्याचा उद्देश वेगळा होता. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसा 'ब्रह्म', 'सत्य' किंवा 'मिथ्या', 'माया' अशा संकल्पनांचा अर्थ कधीतरी वेगळ्या धाग्यात पाहणे इष्ट ठरेल.

नक्की कशाला होकार, कशाला नकार आणि कशाबाबत न्यूट्रिलिटी आहे? प्रवाहित्व असलेल्या संतसाहित्यानं एक छानसा निर्णय दिलाय. तो तर्कसंगत आहे, बुद्धीला पटणारा आहे.... तरीही चर्चा झाल्यावर निरूपयोगी आहे असं काही आहे ????निव्वळ चर्चा असली तर आपल्या समान व्यसनेषु मित्रजनांबरोबर करावी ही विनंती. धन्यवाद.

प्यारेंनी आम्हांस त्यांच्या मित्रजनांमधून स्थानभ्रष्ट केल्याबद्दल त्यांचा तीव्र निशेद याठिकाणी केला जात आहे ह्याची आमच्या मित्रवर्यांनी नोंद घ्यावी.

निव्वळ चर्चा असली तर आपल्या समान व्यसनेषु मित्रजनांबरोबर करावी ही विनंती. धन्यवाद.

मिपावर तुम्ही निव्वळ प्रतिसाद देणे हे साधनेच्या तोडीचे असल्याचा साक्षात्कार आजच आम्हांला झाला.

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 3:42 pm | विश्वव्यापी

वा शरद जी
सुंदर
धन्यवाद

धन्यवाद ही तुमची सही आहे काय?

विश्वव्यापी's picture

29 Nov 2015 - 10:09 am | विश्वव्यापी

धन्यवाद ही माझी सही नव्हे.
तुमचा ताे गैरसमज आहे.

धन्यवाद. :)

फिरुन फिरुन त्याच चौकात गाडी येत आहे. असो सिटा नवीन असल्यावर काय काळजी? ;)

फिरुन फिरुन त्याच चौकात गाडी येत आहे. असो सिटा नवीन असल्यावर काय काळजी? ;)

फिरुन फिरुन त्याच चौकात गाडी येत आहे. असो सिटा नवीन असल्यावर काय काळजी? ;)

योगी९००'s picture

27 Nov 2015 - 12:10 pm | योगी९००

फिरुन फिरुन त्याच चौकात गाडी येत आहे. असो सिटा नवीन असल्यावर काय काळजी? ;)
तुमचा हा प्रतिसाद फिरून फिरून याच चौकात येत आहे. सिटा संपून जातील हीच भिती..

@विश्वव्यापी
बाकी लेख आवडला. थोडा त्रोटक वाटला. अजून मोठा लेख या विषयावर नक्कीच आवडेल. कधी कोठे भेट झाली तर चर्चा करायला सुद्दा आवडेल.

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 4:11 pm | विश्वव्यापी

श्री योगी जी ,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .
आपल्या कडून जाणून घ्यायला व आपल्याला भेटावयास जरूर आवडेल .
मी मुंबईत राहतो . आपण कुठे असता ?
आभारी आहे .

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 7:48 am | अत्रुप्त आत्मा

अनेकदा,कर्म फल वगरे ची अश्या पद्धतीची सगळी मांडणी मानवी नितिला आणि म्हणूनच संत सहित्याला धरून होत असते..जी मूळ कर्म सिद्धांताला सोडून आहे.. मूळ सिद्धांतानुसार कर्म हा शद्ब "मला हवा तसा" रहात नाही..त्याला मूळ टनाटनी धर्मातील चारही वर्णाचि कर्तव्ये काय आहेत? याचा अनुषंग येतो. म्हणजे चोरी हे एक वाइट कर्म आहे.. पण त्याची फळ आणि शिक्षा ही प्रत्येक वर्णानुसार वेगळी आहे..ती विषमता मूलकहि आहे.. इथेच या कर्म सिद्धांताची टनाटनी खेळी उघड़ी पड़ते.

तो याचाच प्रतिवाद आहे का? शंका म्हणून विचारतोय. चार्वाकानुसार पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे कोणीही पाहिलेलं नसल्यामुळे मिथ्या आहे. जे काही आहे ते याच जन्मात आहे.
त्यामुळे प्रत्येकाने त्याला जसा शक्य असेल तसा आयुष्याचा उपभोग घेणे हेच बरोबर आहे.

दत्ता जोशी's picture

27 Nov 2015 - 9:07 am | दत्ता जोशी

बरोबर. आणि भारतीय संस्कृतीत चार्वाक तत्वज्ञान हि जतन केले गेले आहे. आधुनिक समाजसुधारक आणि विचारवंतांच्या कंठ्शोशाप्रमाणे खरे असते तर असे तत्वज्ञान आज उपलब्ध असते काय?

चूक. यावर मी लिहिलेला प्रतिसाद प्रकाशित झाला नाही असे वाटते. पण चार्वाक तत्त्वज्ञानाची सर्व लिखित साधने नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला हे सत्य आहे. उदा. कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ उपलब्ध नव्हता कारण त्यात लोकायताला आन्विक्षिकी विद्येत स्थान देऊन गौरवले गेले होते.

दत्ता जोशी's picture

27 Nov 2015 - 9:05 am | दत्ता जोशी

ते खेळ्या वगैरे तुमच्यासारख्या विचारवंतांचे काम आहे हो. कर्म आणि धर्म ( कर्म - कर्तव्ये) यांचा विवक्षित संबंध जोडू नका.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 9:20 am | अत्रुप्त आत्मा

तो संबंध वैदिक धर्मानीच जोडलेला आहे त्याला कोण काय करणार?

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 9:21 am | प्रचेतस

ते कसे काय?
माझ्या अल्प माहितीनुसार हा संबंध स्मृतींमध्ये येतो. वेदांत कुठे असला तर त्याचे दाखले द्यावेत.

सत्यनारायणातील साधुवाण्याची कथा अशाच टनाटनी लोकांच्या खेळ्यांचा परिपाक आहे का यावर आपले मत अपेक्षित.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 9:14 am | अत्रुप्त आत्मा

हो...आहे

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 9:17 am | प्रचेतस

मग आपण त्या कथेचा प्रसार करणार्‍यांना उघडे का पाडत नाहीत?

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 9:21 am | अत्रुप्त आत्मा

हे सगळ तुम्हाला माहीत असल्यामुळे याची काहिहि उत्तर मी देणार नाही

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 9:22 am | प्रचेतस

=))

कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट्स.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 9:46 am | अत्रुप्त आत्मा

चालु द्या टयार्पिक आत्मकुंथन

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 9:49 am | प्रचेतस

प्रतिवादातून पळवाट. :)

'प्रतिवादापासून' असे वाचावे.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 10:04 am | अत्रुप्त आत्मा

मस्सस्सस्त! येऊ द्या अज्जुन! कुंथा आता दिवसभर!

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 10:16 am | प्रचेतस

खी खी खी =))

दत्ता जोशी's picture

27 Nov 2015 - 9:20 am | दत्ता जोशी

असा तुमचं तत्वज्ञान सांगतं. मला गम्मत वाटते आज तुमच्या सारख्या समाजसुधारकांपुढे सत्यनारायण कथेशिवाय कोणताही मुद्दा नाही. अर्थात विशिस्त विचार सरणीने प्रभवित झालेल्या तथाकथित समाजसुधारक आणि धर्म सुधारकांची बुद्धी हे कुंपण ओलांडून पुढे धाव घेवू शकेल हि सुतराम शक्यता नाही.

दत्ता जोशी's picture

27 Nov 2015 - 1:24 pm | दत्ता जोशी

तुम्हाला काय वाटत ते सरळ सरळ लि९ह कि राव. उगीच याला असं वाटत, तो असं म्हणतो असं कशाला हो प्रचेतस भाऊ?

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 1:37 pm | प्रचेतस

श्री. अत्रुप्त यांच्या उपरोक्त विधानाला उद्देशूनच आम्ही त्यांना ह्याबाबत काय वाटतं म्हणून प्रश्न केला होता.

मग तुम्ही खाता , पिता , झोपता ,चालता , फिरता , विश्रांती घेता तेव्हा कर्म घडते का ? नाही घडत ! हे कर्म जरी असले तरी ते वेदांतात अपेक्षित असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत नाहीत .

न ही कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत...
गीता अध्याय तिसरा, पाचवा श्लोक..

हे पण तर कृष्णानेच सांगितलंय ना? कर्म तर सततच होत असतं ?

आदूबाळ's picture

27 Nov 2015 - 11:52 am | आदूबाळ

धन्यवाद.

(बऱ्याच वेळात आलं नाही म्हणून. कमी नको पडायला.)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 12:08 pm | अत्रुप्त आत्मा

मस्सस्सस्त! येऊ द्या अज्जुन! कुंथा आता दिवसभर!

pacificready's picture

27 Nov 2015 - 12:34 pm | pacificready

खिक्क्क!
आटपाट नगरात एक संधीसाधु ब्राह्मण भिक्षुकी करुन राहत होता.

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 2:38 pm | विश्वव्यापी

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला .
आपल्या सर्वांना आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .
इथले " धन्य" " वाद " . याच साठी केला होता अट्टाहास .
लोभ असावा !

सस्नेह's picture

27 Nov 2015 - 3:06 pm | सस्नेह

जन्म-कर्माचे बंधन सुटले वाट्टं ?

विश्वव्यापी's picture

27 Nov 2015 - 4:30 pm | विश्वव्यापी

स्नेहांकिता जी ,
सुटावे असे वाटते व त्या मार्गाच्या शोधतच आहे .
आज ना उद्या , ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी किंव्हा त्यानंतर जन्म-कर्माचे बंधन सुत्नांरच आहे .
त्याच आनंदात मी राहत असतो . उस मंझील की गाडी तो हमने पकडली है कभी ना कभी तो पाहूच ही जायेंगे इसी में आनंदित हाय .
आपला आभारी आहे .