"चक्रव्यूह"

भानिम's picture
भानिम in जे न देखे रवी...
25 Nov 2015 - 9:42 am

रुतलेला मी
खोल चक्रव्यूहात
"मी" पणाच्याच

खेचणारं आकर्षण
चक्रव्यूहाच्या केंद्रात

केलेली प्रत्येक कृती
उचललेलं प्रत्येक पाऊल
परिघात चक्रव्यूहाच्याच

सभोवती रिंगण नात्यांचं
हा, ही, हे, तो, ती, ते,

तेही जोडलेले एकमेकांशी
Covalent बॉन्डने
"मी" पणाच्याच

आहेत ही नाती निरर्थक
की तेच सत्य?

घडू पाहतो स्फोट
पण घडत नाही

कारण कवच घट्ट
"मी" पणाचंच

एक कळ तीव्र
छातीत, डाव्या हातात

समोर आहेस का तूच?
आहेस तू absolute?
म्हणतात तसा?

मी पाहतो अलिप्त
माझ्या कलेवराकडे

तरी पुन्हा मीच?

असशील तू सत्य
तर घडून जाऊ दे स्फोट

पसरून जाऊ दे
उन्मुक्त तत्व
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात!

पसरून जाऊ दे
उन्मुक्त तत्व
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात!

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

स्वप्नांची राणी's picture

25 Nov 2015 - 10:01 pm | स्वप्नांची राणी

बिग किंवा बँग थियरी सोप्या भाषेत समजावणारी चपखल कविता...!!!

(रच्याकने, सध्या मिपाचा सहिष्णुता qotient काय आहे...???)

Big bang or singularity? Was there any big bang? Did singularity exist? Did it exist before if big bang happened? Doses singularity exist after so called big bang? Fundamenral question is, is anything real? Is reality unreal or unreality real?