आमिर आणि शाहरुख

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
25 Nov 2015 - 9:31 am

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..

नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!

http://chinarsjoshi.blogspot.in/

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

25 Nov 2015 - 9:37 am | प्रसाद१९७१

बोलून काही उपयोग आहे का चिनार.

हे सगळे होऊन ही, भारतीय लोक त्याच्या सिनेमाला गर्दी करतीलच.

जेंव्हा भारतीय ग्राहक त्याला लाथ मारेल तेंव्हा तो जमिनीवर येइल पण ते शक्य नाही.

कारगिल चे युद्ध चालू असताना भारत पाकीस्तान क्रिकेट मॅच टीव्ही वर जागुन बघणारा देश हा. पाकीस्तानी सिरीयल्स चा चॅनल आवडीने बघणार्‍यांना हे कळत नाही, की त्यातुन जो पैसा पाकीस्तानात जातोय त्याचा काही भाग शेवटी भारता विरुद्धच वापरला जातोय. इथे असेच चालणार.

जेंव्हा भारतीय ग्राहक त्याला लाथ मारेल तेंव्हा तो जमिनीवर येइल पण ते शक्य नाही.

काही प्रमाणात पब्लिककडून तातडीने प्रत्यक्ष कृतीमार्गे निषेध झालाय. म्हणजे तो ज्याचा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर आहे त्या अमेझॉनच्या अ‍ॅपला निषेधापोटी व्होटडाऊन करण्याची कृती मोठ्या संख्येने केली गेली आहे लोकांकडून.. असं वाचलं.

देश's picture

25 Nov 2015 - 11:30 am | देश

तुम्हाला Snapdeal म्हणायचे आहे बहुतेक

देश

परिकथेतील राजकुमार's picture

25 Nov 2015 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

स्नॅपडील आहे ते.

होय होय. स्नॅपडील. चुकीने मिष्टेक झाली.

sagarpdy's picture

25 Nov 2015 - 10:57 am | sagarpdy

popcorn

संदीप डांगे's picture

25 Nov 2015 - 1:41 pm | संदीप डांगे

बोले तो, शेअर करेगा क्या थोडा पापकार्न? नै, इदर अब पापकार्न छोडके अउर कुच शेअर नै करनेका माहौल बनता जा रा है.

फिर का करे, इतना टीव-टीव चल रा है लोग का.

ट्विटर देखाणु पापकार्न खावाणु,
मज्जा आणि लाईफ.

हम राह देख रै हे रेहमान साब कब आ रहे है धीस्काषण मे.

वेल्लाभट's picture

25 Nov 2015 - 11:14 am | वेल्लाभट

एकी नाही. हाच प्रॉब्लेम आहे आपल्या देशात. नाहीतर बरंच काही साध्य करता आलं असतं.

सागरकदम's picture

25 Nov 2015 - 11:24 am | सागरकदम

ह्याचा अर्थ एकाच

बायकोचे जास्त मनावर घेऊ नका

मी पळतो

त्याला किंवा त्याच्या पत्नीला तसं वाटलं असेल तर बोलण्याचा हक्क आहे. ते ऐकून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा इतर नागरिकांनाही हक्क आहे. पण देश सोडून चालते व्हा, पाकिस्तानात जा असं म्हणणं किंवा तीव्र द्वेषयुक्त प्रतिक्रिया देणं, दमदाटी, थेट गुंडागर्दीचे प्रयत्न वगैरे हे सर्व असहिष्णूच ठरेल, आणि त्यामुळे मूळ आरोपाला (?!) बळकटीच मिळेल.

अर्थात ज्याला भारतीय पब्लिकने इतकं वरचं स्थान दिलं त्याला "वैयक्तिक" असुरक्षित वाटणं, आणि तेही असहिष्णुतेच्या कारणाने, हे न पटण्यासारखं आहे. देशातल्या एकूण असहिष्णुतेच्या तथाकथित भीतीपेक्षा त्याच्या स्वतःच्या स्टारडम + अतिप्रसिद्धीमुळे कदाचित त्याच्या / कुटुंबियांच्या सुरक्षिततेला जास्त पोटेन्शियल धोका असू शकतो. त्याविषयी काय मत असेल त्याचं ?

आणि रोजचा पेपर उघडायला भीती वाटते, घटना वाढत आहेत आणि जणू रोजच्यारोज असंख्य असहिष्णु घटना गल्ल्यागल्ल्यांतून घडताहेत असा इफेक्ट निर्माण करणारं आमीरचं वक्तव्य अतिशयोक्त वाटतं.

संदीप डांगे's picture

25 Nov 2015 - 11:38 am | संदीप डांगे

पूर्णतः सहमत...

जातवेद's picture

25 Nov 2015 - 11:48 am | जातवेद

+१

प्रसाद१९७१'s picture

25 Nov 2015 - 1:31 pm | प्रसाद१९७१

त्याला किंवा त्याच्या पत्नीला तसं वाटलं असेल तर बोलण्याचा हक्क आहे. ते ऐकून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा इतर नागरिकांनाही हक्क आहे

गवि - हक्क आहे हे मान्य आहे, पण मिडीया मधे उघडपणे देशाची बदनामी होइल असे बोलायची काही गरज आहे का? घरी, मित्रात बोलावे ना.

तसे ही, हिंदू बहूसंख्येनी असलेल्या देशात खान माणसांना सुपरस्टार पद मिळते हे कीती मोठ्ठे आश्चर्य आहे. त्याचे कौतुक करायचे सोडुन शंका, भिती , बदनामी का करत बसायची.

जगातल्या कुठल्या देशात, मायनॉरीटी मधल्या लोकांना सुपरस्टार पद मिळाले आहे? आमिरने स्वताला नशिबवान समजायला पाहिजे.

बाजीप्रभू's picture

26 Nov 2015 - 7:41 am | बाजीप्रभू

जगातल्या कुठल्या देशात, मायनॉरीटी मधल्या लोकांना सुपरस्टार पद मिळाले आहे? आमिरने स्वताला नशिबवान समजायला पाहिजे

सहमत

जिन्क्स's picture

26 Nov 2015 - 3:10 pm | जिन्क्स

जगातल्या कुठल्या देशात, मायनॉरीटी मधल्या लोकांना सुपरस्टार पद मिळाले आहे? आमिरने स्वताला नशिबवान समजायला पाहिजे.
सहिष्णू देशात सुपरस्टार होण्याचा आणि मायनॉरीटी (जातीचा) संबंध तो काय असं म्हणतो मी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Nov 2015 - 2:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

+१११११

मुळात त्याने दंगल हिट व्हावा म्हणुन हा तमाशा केला असल्याची एक शक्यता आहे बारीक़शी, त्यावर त्याला चालू लागा वगैरे म्हणले का तो आवशेच्या रात्री घुमणाऱ्या मसणजोग्या सारखा अजुन घुमणार, सांगितलंय कोणी? अन तसंही त्याला लॉजिकली पेचात पकडणारे खुप प्रश्न असू शकतात असे काम परेश रावल किंवा अनुपम खेर उत्तमरीत्या करीत आहेत ट्विटर वर त्याला एकच विचारा

'असहिष्णु देशाबद्दल अतुल्य भारत उर्फ़ इनक्रेडिबल इंडिया च्या झैराती करताना काय वाटले किंवा पेमेंट पोचली का इनक्रेडिबल इंडिया ची?'

P1
वरील दोन्ही चित्रपटांच्या गल्ल्यांचे आकडे येतील तेव्हा देशातल जनता किती सिरीयस आहे ते कळेलच ना !

जाता जाता :- आमिरने हिंदुस्थानात अवैध पद्धतीने राहणार्‍या बांग्लादेशी मुसलमानांची भेट घेतली पाहिजे आणि विचारले पाहिजे बाबा रे तुम्ही बांग्लादेशी, त्यात सुद्धा धर्मांने मुसलमान मग पाकिस्तानात जायचे सोडुन मोठ्या संख्येने घुसखोरी करुन इकडे हिंदुंस्थानातच का आलात ? असहिष्णुतेची भिती नाही वाटत ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बाहों में चले आओ, हमसे सनम क्या परदा... :- Ustad Imtiaz Ali Riaz Ali

पायरेटेड बघितले तर चालेल ना?

_मनश्री_'s picture

25 Nov 2015 - 11:52 am | _मनश्री_

आमिरचा नवीन सिनेमा येतोय 'दंगल ' त्याच्या प्रमोशनसाठी चाललय हे सगळ
बाकी काही नाही

पिलीयन रायडर's picture

25 Nov 2015 - 12:01 pm | पिलीयन रायडर

चर्चेच्या सोयीसाठी काही माहिती:-

आमिर नक्की काय म्हणाला:- http://stylewhack.com/readers-choice/the-intolerant-india-controversy-li...

“(Wife) Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me,”

“She fears for her child. She fears about what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers everyday. That does indicate that there is a sense of growing disquiet.”

दंगलची रिलिझ डेट - Dangal is scheduled to release on 23 December 2016

पिलीयन रायडर's picture

25 Nov 2015 - 12:03 pm | पिलीयन रायडर

मान्यवरांनी २०१६ कडे लक्ष द्यावे.

मी आमिरच्या म्हणण्याला सपोर्ट करत नाहीये. देश सोडुन जाणे हा काही पर्याय असु शकत नाही.
पण मी तो नक्की कोणत्या संदर्भात हे म्हणाला हे स्वतः ऐकलेले नाही. त्यामुळे त्यावर मत व्यक्त करणे चुक ठरेल.

माहितगार's picture

25 Nov 2015 - 12:36 pm | माहितगार

पण मी तो नक्की कोणत्या संदर्भात हे म्हणाला हे स्वतः ऐकलेले नाही. त्यामुळे त्यावर मत व्यक्त करणे चुक ठरेल.

:)

गॅरी ट्रुमन's picture

25 Nov 2015 - 8:48 pm | गॅरी ट्रुमन

“(Wife) Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me,”

हे वाचून मिसळपाववरील एका जुन्या (२०१० मधील) रोचक धाग्याची आठवण झाली. संबंधित लेखक मिसळपाव संस्थापकांना म्हणत होता-- (काही कारणामुळे) "....लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते...." आणि त्याच दमात तो हे पण म्हणाला होता "जे खरे नाही हे मला माहित आहे". म्हणजे एकतर दुसऱ्या माणसाला एकीकडे रिकामटेकडा, कामधंदा नसलेला म्हणायचे आणि वर उलटेही म्हणायचे---"हे खरे नाही हे मला माहित आहे"!! याला काय अर्थ आहे?

त्याचप्रमाणे किरणला कोट करून "should we move out of India?" असे म्हणायचे आणि वर "That’s a disastrous and big statement for Kiran to make to me" असेही म्हणायचे? हा प्रकार आणि मिपावरील त्या आय.डी धारकाने केलेला प्रकार यात नक्की काय फरक आहे?

आणि वर तोंडाने "गेल्या ६-८ महिन्यात असुरक्षितता, असहायता इत्यादी वाढली आहे. किरणला वर्तमानपत्र उघडून बघायलाही भिती वाटते" हे पण हाच गृहस्थ म्हणाला आहे. यातील गेल्या ६-८ महिन्यात या वाक्याच्या प्रयोगावरून आमीरच्या म्हणण्याचा रोख तथाकथित वाढलेल्या असहिष्णुतेकडेच आहे असे म्हटले तर काय चुकले?

अवांतर-- भारताबाहेर जाऊन राहता आले तर किती चांगले होईल हा विचार मीपण अनेकदा केलेला आहे. भारतातल्या वातावरणात* माझ्या मुलांना मी कसे वाढवू हे प्रश्न मलाही पडतात.अर्थातच त्यामागची माझी कारणे वेगळी आहेत आणि ती कारणे गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहेत. पण समजा एखादा माणूस गेल्या ६-८ महिन्यांपासून ही कारणे वाढली असे वक्तव्य करत असेल तर त्याचा रोख नक्कीच सरळ आहे.त्याने आणि त्याच्या समर्थकांनी उगीच वेड पांघरून पेडगावला जाऊ नये.

*: या वातावरणाविषयी माझी काही मते आहेत आणि त्याविषयी कोणतीही चर्चा करायची माझी इच्छा नाही.

गामा पैलवान's picture

26 Nov 2015 - 2:46 am | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

अगदी बरोब्बर उदाहरण दिलंत बघा. घरची धुणी चव्हाठ्यावर धुवायला काढायची खाज भारी आमीरला. लोकांनी नावं ठेवायला नकोत म्हणून मखलाशी करायची की ही आमची खाजगी बाब आहे! फार छान!

असो.

इथे अभिराम दीक्षितांचं विवेचन आहे. अमीरच्या वक्तव्याचा एक वेगळा पैलू प्रकाशात येतो. लेख रोचक आहे :
http://drabhiram.blogspot.co.uk/2015/11/blog-post_25.html

त्यावरचा माझा प्रतिसाद इथे आहे.

लेखावर चर्चा करायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

26 Nov 2015 - 7:52 pm | माहितगार

अमीरच्या ब्लॉगचा पत्ता काय आहे ?

आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला आत्ता असुरक्षित वाटतय
मग १९९३ बॉम्ब स्फोट ,२००६ ट्रेन बॉम्ब स्फोट , २६/११ , निर्भया प्रकरण एवढ सगळ घडत असताना हे कधीच वाटल नाही का ?

माहितगार's picture

25 Nov 2015 - 12:34 pm | माहितगार

इंग्रजी विकिपीडियावरील किरण रावांच प्रोफाईल सांगत त्या १९९२ मध्ये कलकत्त्याहून मुंबईला आल्या (१९७३ चा जन्म म्हणजे साधारनतः १९ वर्षांच्या असतील) आणि १९९५ पर्यंत ग्रॅज्युएशन मुंबईच्या सोफीयाकॉलेजातन केलं १९९२-९३ मध्ये अमिररावांचे सात चित्रपट आले. तर इतके व्यस्त असताना त्यांना कसे काही समजेल ? कमाल आहे लोकांची सुद्धा :) तेव्हा FTII च आंदोलन झाल नव्हत, सेंसॉर बोर्डाची धास्ती वाटली नव्हती आता मोदींच सरकार आहे म्हणल्यावर किरण रावांना तस वाटलच पाहीजेना !

आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला आत्ता असुरक्षित वाटतय
मग १९९३ बॉम्ब स्फोट ,२००६ ट्रेन बॉम्ब स्फोट , २६/११ , निर्भया प्रकरण एवढ सगळ घडत असताना हे कधीच वाटल नाही का ?१९९५ ते २०१३ ह्या कालावधीत भारतात ५७ अतिरेकी हल्ले झाले , तेव्हा भीती नाही वाटली का ?
हे सगळे अस बोलताहेत जणू काही २०१३ पूर्वी भारतात रामराज्य नांदत होत

इतरांनी पुरस्कार वापसकरून जे राजकीय भांडवल विरोधकांसाठी मिळवल ते अमिर-किरणने अतीरंजन करून घालवलं. :)

पद्माक्षी's picture

25 Nov 2015 - 12:27 pm | पद्माक्षी

packing ला काही मदत हवी का?

सागरकदम's picture

25 Nov 2015 - 1:04 pm | सागरकदम

pk

आमीर आणि शारुकचे कुठ्लेही सिनेमे /सिरिअल पाहणार नाही.

आमीर विरोधात देशद्रोहाची याचिका दाखल

अतिरेकी संगठना कुठलीही असो ... मुस्लिम अथवा हिंदू ... असहिष्णुता वाढत आहे हे मात्र खरे ... आणि संयोगाने भारतात हिंदू जास्त आहेत त्यामुळे साहजिकच अल्पसंख्यांकांना विश्वासात घेण्याची हिंदू नागरिकांवर येणारी जिम्मेदारी पण मोठीच असते. हि जिम्मेदारी आपण किती विश्वासाने आणि काळजीपूर्वक निभावतो त्यावरच आपण (हिंदू) किती सहिष्णू आहोत हे सिद्ध होते. प्रत्येक वेळी तुलनात्मक विचार करून स्वतःला कुणी फार मोठा तीसमारखान असल्याची समजूत करून घेणे म्हणजे आपण अजून किती अपरिपक्व आहोत हे जगाला दाखविण्या सारखे आहे ....

मदनबाण's picture

25 Nov 2015 - 1:21 pm | मदनबाण

यामुळे साहजिकच अल्पसंख्यांकांना विश्वासात घेण्याची हिंदू नागरिकांवर येणारी जिम्मेदारी पण मोठीच असते. हि जिम्मेदारी आपण किती विश्वासाने आणि काळजीपूर्वक निभावतो त्यावरच आपण (हिंदू) किती सहिष्णू आहोत हे सिद्ध होते.
हे कुठल्या सहिष्णूतेचे प्रतिक आहे ते जरा नीट सांगाल का ? :- अतिरेक्याच्या अंतयात्रेला अलोट गर्दी !
काश्मिरी पंडीतांना त्यांच्या राहत्या घरातुन / जागेतुन हकलुन त्यांच्याच देशात निर्वासिता सारखे जगण्यास भाग पाडण्यात आले तेव्हा कुठे गेली होती ही सहिष्णूता ? आमिर त्या काळात "गझनी" चे जिवन जगत होता काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बाहों में चले आओ, हमसे सनम क्या परदा... :- Ustad Imtiaz Ali Riaz Ali

गामा पैलवान's picture

25 Nov 2015 - 1:24 pm | गामा पैलवान

ओहोहो! बहुसंख्यांवर एव्हढी जबाबदारी असते का हो? मला माहीतंच नव्हतं. बरं झालं सांगितलंत ते. काश्मिरातल्या हिंदूंवर घरंदारं सोडून नेसत्या वस्त्रानिशी निर्वासित व्हायची वेळ आली तेव्हा तिथल्या बहुसंख मुस्लिमांनी उचलली का काही जबाबदारी?

-गा.पै.

वेल्लाभट's picture

25 Nov 2015 - 4:08 pm | वेल्लाभट

नाहीतर काय!

जबाबदारी कसली आलीय?

पुतिन चं स्पीच (जर ते खरंच पुतिनचं असेल तर) वाचा

IN AUGUST Russian President Vladimir Putin addressed the Duma and gave a speech about the tensions with minorities in Russia. This is part of what he said.

"In Russia, live like Russians. Any minority, from anywhere, if it wants to live in Russia, to work and eat in Russia, it should speak Russian, and should respect the Russian laws.

"If they prefer Sharia Law, and live the life of Muslims, then we advise them to go to those places where that's the state law. Russia does not need Muslim minorities. Minorities need Russia, and we will not grant them special privileges, or try to change our laws to fit their desires, no matter how loud they yell 'discrimination'.

"We will not tolerate disrespect of our Russian culture. We had better learn from the suicides of America, England, Holland and France, if we are to survive as a nation.

"The Muslims are taking over those countries and they will not take over Russia."

The politicians in the Duma gave Putin a five-minute standing ovation.

बाजीप्रभू's picture

26 Nov 2015 - 8:52 am | बाजीप्रभू

च्यामारी!! हाच मेसेज वॉट्स अॅपवर ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान जुलिया रॉबर्टच्या नावे फिरतोय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Nov 2015 - 8:58 am | कैलासवासी सोन्याबापु

जूलिया गिलार्ड म्हणायचे आहे का आपणाला?

जूलिया रॉबर्ट्स ही एक अभिनेत्री आहे

बाजीप्रभू's picture

26 Nov 2015 - 10:20 am | बाजीप्रभू

अरे हो!! लिहायच्या धांदलीत चूक झाली. जुलिया गिलार्डच लिहायचं होत मला…सॉरी!!

इरसाल's picture

26 Nov 2015 - 5:39 pm | इरसाल

राँबर्ट म्हणजे रॉमबर्ट अस लिहा नायतर मिपावर हा प्रतिसाद माफ नाय तुम्हाला.

बॅटमॅन's picture

26 Nov 2015 - 5:50 pm | बॅटमॅन

रॉमबर्ट कुठून काढलं? ते राँर्बट असं पाहिजे. काही म्हणून सांगायची सोय नै राहिली तुम्हांला!

इरसाल's picture

27 Nov 2015 - 10:19 am | इरसाल

अहो उच्चारबरहुकुम समजावा म्हणुन आधी राँबर्ट लिहुन कसा उच्चारावा हे समजण्यासाठी ते बोहोरीहीकहर सारखं केलय.

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 3:15 pm | बॅटमॅन

बरोबर, पण ते राँबर्ट नसून राँर्बट आहे. अंमळ दुरुस्ती तेवडीच.

इरसाल's picture

27 Nov 2015 - 3:19 pm | इरसाल

काय जी़वन्भौंची बरोबरी नाय करु शकत (इथे कानाच्या पाळीला हात लावला गेला आहे हे अध्यरुत हं).

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 3:23 pm | बॅटमॅन

त्ये बाकी खरंच म्हना. कोनीबी बराबरी नाय करु शकत तेंची.

माहितगार's picture

25 Nov 2015 - 1:34 pm | माहितगार

टोकाचे विचार करणार्‍यांना त्यांच्या जबाबदार्‍या समजणे अवघड असतेच पण तथाकथित सेक्युलरांना आपण बोलताना निष्पक्षता बाळगण्याची काळजी घ्यावयास हवी हि जबाबदारी समजण्याची अपेक्षा अधिक असते हे लक्षात घेतले जावयास नको काय ?

प्रसाद१९७१'s picture

25 Nov 2015 - 1:34 pm | प्रसाद१९७१

त्यामुळे साहजिकच अल्पसंख्यांकांना विश्वासात घेण्याची हिंदू नागरिकांवर येणारी जिम्मेदारी पण मोठीच असते

कारण काय?

हि जिम्मेदारी आपण किती विश्वासाने आणि काळजीपूर्वक निभावतो त्यावरच आपण (हिंदू) किती सहिष्णू आहोत हे सिद्ध होते.

कशाला सहिष्णु वगैरे सिद्ध करायचे? आमिर, शारुख वगैरे मंडळींना जे इथे मिळाले आहे ते जगात कुठल्याही मायनॉरीटी मधल्या माणसांना मिळणार नाही.

गॅरी ट्रुमन's picture

26 Nov 2015 - 10:19 am | गॅरी ट्रुमन

भारतात हिंदू जास्त आहेत त्यामुळे साहजिकच अल्पसंख्यांकांना विश्वासात घेण्याची हिंदू नागरिकांवर येणारी जिम्मेदारी पण मोठीच असते.

bell

कामा करो रे कुछ. क्या किसी के भी साथ भांडते बैठते तुम लोगा?
बैंगन की बाता करता उने, तुम काय को उसको भाव दे रे?

संदीप डांगे's picture

25 Nov 2015 - 1:39 pm | संदीप डांगे

हा ना इस्माइलभाइ,

छान लिहिले आहेस रे चिनार्‍या. पण आपल्या देशातली जन्ता मूर्ख आहे. कितीही श्या घातल्या तरी त्या आमिरचे शष्प वाकडे होणार नाही. त्यावर बहिष्कार तर घातलाच जाणार नाही लोकांकडून.

माहितगार's picture

25 Nov 2015 - 1:50 pm | माहितगार

अतीरंजीत बोलून अमीरने सुडोसेंना तोंडावर पाडण्याचच काम केल आहे. खर म्हणजे अतीरंजीत बोलून सोइस्कर मुद्दा दिल्याबाबत पडद्यामागून भाजपाने त्याचे धन्यवाद व्यक्त करावयास हरकत नसावी :)

बॅटमॅन's picture

25 Nov 2015 - 1:57 pm | बॅटमॅन

हा हा हा, अता हाही भाजपा-आरेसेसचाच डाव असल्याची नवीन कॉन्स्पिरसी थेरी काढावी काय? =))

नाखु's picture

25 Nov 2015 - 2:18 pm | नाखु

शकेल यात आरएस चा हात आहेका याबाबत विजूभाऊच जोडू सांगू शकतील. त्याच लोकांनी हा डाव टाकला असावा... थोडा धीर ठेवा...

दै "नस्ती उठाठेव" मधील बाटग्यांची पत्रे मधून साभार

माहितगार's picture

25 Nov 2015 - 3:11 pm | माहितगार

=)) मी विनोदानेच लिहिले ती पुर्ण चर्चा नंतर या दुव्यावर वाचली अमीरखानला संबंधीत प्रश्न टाकल्या जाण्याच्या आधी Arun Jaitley: भाऊ I’m quite okay with prominent people and achievers taking positions on issues. असे काहीसे म्हणताना दिसतात. (संदर्भ दुव्यात चुक असेलतर चुभूदेघे) अर्थात तरीही योगायोगांना कॉन्स्पिरसी थेरी लावण्याची आमची तुर्तास इच्छा नाही :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Nov 2015 - 2:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

फेबुवर पण लिहीले होते, इथेही देतो..

माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, ज्यांना ज्यांना हा असहिष्णू देश सोडून जायची इच्छा आहे त्यांना त्यांना हव्या त्या ठिकाणी पाठवण्याची सरकार खर्चाने सोय करुन देण्यात यावी. आणि तो खर्च 'स्वच्छ भारत अभियानाच्या' खात्यात जोडावा. शिवाय जे जातायत त्यांनी भारतात कमावलेला पैसाअडका, जमिनजुमला व इतर संपत्ती सरकारजमा करावी. त्यायोगे ह्या असहिष्णू देशाला सहिष्णू बनवण्यासाठी त्या संपत्तीचा उपयोग करता येईल.

संदीप डांगे's picture

25 Nov 2015 - 2:19 pm | संदीप डांगे

स्नॅपडीलने काय घोडं मारलं लोकांचं....?
पुरस्कारवापसी आणि अ‍ॅपवापसी एकसारखीच वाटत नै का आता?
लोक्स भंजाळलेत ब्वा देशातले... ('देशातले' वैगेरे शब्द वापरतोय पण खरंतर कुणालाच काय शष्प फरक पडलेला दिसत नै,)

काहीतरी परत केलं पायजे ना. काय काय लोकांनी COD आल्यावर घ्यायला नकार दिला. मजा कर रहे लोग!

गॅरी ट्रुमन's picture

25 Nov 2015 - 9:09 pm | गॅरी ट्रुमन

स्नॅपडीलने काय घोडं मारलं लोकांचं....?

याला म्हणतात नाक दाबले की तोंड उघडते.

२००५ मध्ये डेन्मार्कमधील कुठल्याशा व्यंगचित्रकाराने कुठलीकुठली व्यंगचित्रे काढली म्हणून इराणसारख्या देशाने डेन्मार्कवर व्यापारी बहिष्कार का टाकला? डेन्मार्क देशातले ते दोघे व्यंगचित्रकार सोडले तर इतर डॅनिश लोकांनी नक्की काय घोडं मारलं होतं? तरीही डेन्मार्कवर असा बहिष्कार का घातला? त्याचे जे काही उत्तर तुम्ही द्याल (दिलेच तर) तेच उत्तर स्नॅपडिलवरच्या प्रतिक्रियेलाही लागू पडेल.

तुम्ही तर चार्ली हेब्डो हत्याकांडही अशाच एका प्रकाराची प्रतिक्रिया असे काहीसे बोलला होतात बरोबर? बाय द वे, डेन्मार्कमधील ती व्यंगचित्रे चार्ली हेब्डोनेही पुर्नप्रकाशित केली होती. इथे भारतीय खरोखरच सहिष्णु असल्यामुळे आमीरसारख्यांनी असा कितीही आततायीपणा केला तरी अशी प्रतिक्रिया भारतात उमटायची शक्यता कमी. तेव्हा (निदान आमीरला) राहायला नक्की कोणता देश चांगला हे समजून येईल अशी अपेक्षा.

संदीप डांगे's picture

25 Nov 2015 - 11:01 pm | संदीप डांगे

अरे व्वा! स्नॅपडील ही १००% भारतीय कंपनी नसून एक स्वतंत्र देश आहे आणि आमिरखान हा त्यांचा नागरिक आहे हे पहिल्यांदाच कळले. धन्यवाद!

त्यासोबतच कोणाचे नाक आणि कोणाचे तोंड, कोणी दाबले, कोणी उघडले, त्यात भारतदेशाचा, देशाभिमानाचा नक्की काय फायदा झाला हेही सांगितले तर बरे होईल.

रच्याकने, भारतीय सैनिकांचे मुडके कापून नेणार्‍या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास भारतीय क्रिकेटसंघ उतावीळ असतो आणि ते बघण्यास बहुसंख्य भारतीयही उतावीळ असतात तेव्हा भारतीयांची ही दांभिक देशभक्ती कुठे जाते? पाकिस्तानाशी असलेले व्यापारी, नागरी संबंध बिनबोभाट चालू राहतात तेव्हाही भारतीयांची ही दांभिक देशभक्ती कुठे जाते?

स्नॅपडीलचा वा इतर कोणत्याही 'भारतीय' कंपनीचा धंदा बसवून, म्हणजे आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेणारे हे दांभिक भारतीय देशभक्त कुठल्या नशेत आहेत हेही कळावे.

बरे, मी स्पष्ट करतो "मी इथे आमिरच्या वक्तव्याला ना महत्त्व देत आहे, ना समर्थन, ना विरोध करत आहे." (आजकाल फार स्पष्ट स्पूनफीडींग करायला लागतं नायतर लोक 'तुम्ही असंच म्हटलं होतं' म्हणून अंगावर धावून येतात.)

बाकी भारत देशात काही घडले की लगेच मिडल-इस्ट, आयसिस, तालिबान, वैगेरे दाखल्यांचा कंटाळा आला आहे. ते एक असो.

भंकस बाबा's picture

25 Nov 2015 - 11:49 pm | भंकस बाबा

संदीप भौ, तुम्हाला काय म्हणायचे आहे हे जरा या अतिरेक्यांना समजावून सांगाल काय?
तुम्ही एकदा म्हणता कशाला एवढा गदारोळ उडवला आहे. आमिर ने फ़क्त आपले मत मांडले आहे. मग आपले मुर्ख देशभक्त स्नैपडील वर बहिष्कार टाकतात तर तो पण तुम्हाला खटकतो. मग मी काय करायचे?
शेपुट घालून बसायचे. अथिति देवो भवः म्हणुन जाहिरात करायची आणि हो वट्ट रोकड़ा मोजुन! त्याच अथितिना निरोप द्यायचा की काय आहे इथे? असहिष्णुता! कमीत कमी खाल्ल्या मिठाला तरी जागायचे.
सिनेमात मारे हिंदू देवदेवतांची खिल्ली उड़वायची व् मुस्लिम धर्मावर भाष्य दाखवायचे असल्यास शिया पंथियाचे कर्मकांड दाखवुन मुस्लिम विरोधांची धार कमी करायची. चिकित्सा तेव्हाच कैली पाहिजे होती आमिरच्या सिनेमाची.
ते मक्केला जाऊन सैतानावर दगड मारणारा तो आमिरच होता ना भौ?
स्वतःचे ठेवायचे झाकून व् दुसर्याचे पहायचे वाकुन. डांगे मिया तुम्हाला नाही हो त्या नमकहरामाला बोलों

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 12:05 am | संदीप डांगे

डांगे मिया
ह्याबद्दल सर्वात आधी तीव्र आक्षेप. तुम्हाला एखाद्याचे मत पटत नसेल तर त्याचा सभ्य भाषेत विरोधी मत मांडण्याचा अधिकार आहे. मला मिया म्हणून संबोधण्यामागची तुमची भूमिका स्पष्ट करावी अथवा दिलगीरी व्यक्त करावी. संपादकांनी इकडे लक्ष द्यावे.

बाकी, लोक सिलेक्टीवली शेपुट घालून बसतात आणि संबंध नसलेल्या निरपराध कंपन्यांवर सूड उगवतात हे मनोरंजक आहे.

माझ्या प्रतिसादावर आपली मळमळ ओकण्याआधी जरा विचार करून (शक्य असेल तर) घेत जा ही नम्र विनंती.

भंकस बाबा's picture

26 Nov 2015 - 6:39 am | भंकस बाबा

डांगे गुरूजी , तुमचे हेच प्रतिसाद मी वाचतो असे नाही, तर जवळजवळ तुम्ही टाकलेले सर्व प्रतिसाद मी नजरेआडून घालतो. तुमच्या लिखानावरुन तुम्ही सेक्युलर मेणबत्ति पंथातले वाटता. इथे परत गैरसमज नको. हा पंथ नेहमी अल्पसंख्यक लोकांची बाजु घेऊन बोलतो. त्यांना अल्पसंख्यक जमातीने केलेले कोणतेही अत्याचार समर्थनिय वाटतात. ( शर्ली अब्दो वरुन झालेले हत्याकांड तुम्हाला समर्थनीय वाटले होते). पाकिस्तान सारखे देश जेव्हा शांतीची वार्ता करतात तेव्हा त्यांच्या तोंडाला लागलेले रक्त देखिल पुसायची ते तसदि घेत नाहीत. आमचा आमिर मात्र बिनधास्त मेडियासमोर भारताचे वाभाडे काढतो. काय म्हणुन एका भारतियाने हे ऐकून घ्यावे. आकडेवारी काय सांगते, की झालेल्या हत्या ह्या गेल्या सात आठ महिन्यात झालेल्या आहेत. त्या आधी भारतात जातीय दंगे होतच नव्हते. मी वर भारतीय हां शब्द वापरला आहे हिंदू नाही यांची दखल घ्यावी.
मियां हे एक आदरणीय संबोधन आहे, कृपया भाषाकोश तपासावे. राव, भाऊ म्हटलेले तुम्हाला चालले पण मियां खटकले . कमाल आहे बुवा! (बुवा इथे मी मला संबोधत आहे). मियां मधे तुम्हाला जातीयतेचा वास आला काय? असे असेल तर सम्पादकानि मला समज द्यावी.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 10:49 am | संदीप डांगे

अच्छा, म्हणजे लोकांना हा या पंथातला, तो त्या पंथातला वैगेरे सर्टिफिकेटं द्यायची तुम्हाला खोडंच आहे तर. असो. सुखी राहा.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 12:08 am | संदीप डांगे

जमलेच तर हा परिच्छेद (चुकून वाचायचा राहून गेला असल्यास) वाचणे व विचार करून प्रतिसाद देणे:
रच्याकने, भारतीय सैनिकांचे मुडके कापून नेणार्‍या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास भारतीय क्रिकेटसंघ उतावीळ असतो आणि ते बघण्यास बहुसंख्य भारतीयही उतावीळ असतात तेव्हा भारतीयांची ही दांभिक देशभक्ती कुठे जाते? पाकिस्तानाशी असलेले व्यापारी, नागरी संबंध बिनबोभाट चालू राहतात तेव्हाही भारतीयांची ही दांभिक देशभक्ती कुठे जाते?

रामपुरी's picture

26 Nov 2015 - 2:32 am | रामपुरी

"पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास भारतीय क्रिकेटसंघ उतावीळ असतो आणि ते बघण्यास बहुसंख्य भारतीयही उतावीळ असतात "
जमल्यास दुवे द्यावेत, विदा वगैरे द्यावा.. बहुसंख्य भारतीयही उतावीळ आहेत हा निष्कर्श नक्की कुठून आला हे समजून घ्यायला आवडेल

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 2:41 am | संदीप डांगे

तुम्हाला क्रिकेट आवडते का, तुम्ही क्रिकेट बघता का, भारत-पाकिस्तान मॅच कितीवेळा बघितली आतापर्यंत?

ह्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग विदा-पुराव्याचे बघू. एवढा लंगडा प्रतिवाद करण्याआधी कशावर करतोय तेही बघून घ्यावं, कारण मी विदा देइन तेव्हा नक्की काय कराल ह्याचा विचार करतोय...

बाकी, 'बहुसंख्य' ह्या शब्दावर पिंगा घालायचं ठरवलं असेल तर आगावू धन्यवाद! चर्चेसाठी उत्सुक असला तर योग्य मुद्दा उचलावा.

रामपुरी's picture

2 Dec 2015 - 12:20 am | रामपुरी

तुम्हाला क्रिकेट आवडते का
नाही
तुम्ही क्रिकेट बघता का
नाही
भारत-पाकिस्तान मॅच कितीवेळा बघितली आतापर्यंत?
नाही

दिली उत्तरे. आता द्या विदा. जेंव्हा एखादे विधान आपण करतो तेंव्हा त्याला काही अर्थ असावा लागतो. पिंगा तुम्ही घालताय आणि तुम्हा मुद्देसुद चर्चेत रस नाही हे वरील प्रतिसादावरून स्पष्ट आहे. तेंव्हा चालू द्या तुमचे निरर्थक आत्मकुंथन. धन्यवाद
लोल

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 11:19 am | संदीप डांगे

भारत पाकिस्तान २०१५ वर्ल्डकप मॅचसाठीची दर्शकसंख्या : २८.८ कोटी.

http://www.aidem.in/downloads/Indian%20Media%20Scenario.pdf

Television in India has a total viewership of 650 million as of 2011

भारताची टीवी बघणार्‍यांची संख्या ६५ कोटी, त्यात ५० टक्के स्त्रिया वगळल्या तर उरते ३०-३५ कोटी. भारत-पाकिस्तान मॅचसाठीची दर्शकसंख्या २८.८ कोटी. यात रेडीओ, न्युजपेपर, इन्टरनेटवरून ह्या मॅचचा आनंद घेणारे धरले नाहीत.

आता म्हणा लोल...

अहो स्नॅपडिल प्रकरण (निगेटिव फिडबॅक) हि रिॲक्शन आहे त्या निषेध करणार्या लोकांची. बर्याचदा ब्रॅंड ॲंबॅसेडर्स जबाबदारीने वागतात, पब्लिकली वादग्रस्त स्टेटमेंट वगैरे देत नाहित. आणि ते तसे वागलेच तर कंपन्याच पुढचा रोष, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अशा वाचाळविरांना नारळ देतात. बात खतम.

स्नॅपडिलला सरतेशेवटी धंदा करायचाय, आणि ग्राहक हा राजा आहे. या प्रकरणात स्नॅपडिलला आर्थिक नुकसानीचे संकेत दिसत असुनहि त्यांनी योग्य ती कारवाई वेळेवर केली नाहि तर त्याची जबाबदारी त्यांचीच असणार आहे, निषेध नोंदवणार्यांची नाहि... :)

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 10:51 am | संदीप डांगे

भारी लॉजिक आहे, याच लॉजिक ने आपण पाकिस्तानसोबतचा प्रत्येक व्यवहार, क्रिकेटपासून व्यापारापर्यंत, का थांबवत नाही याचे मला अजुनही कुतूहल आहे.

राजाभाऊ's picture

26 Nov 2015 - 10:08 pm | राजाभाऊ

लाॅजीक कसलं त्यात डोंबलाचं, ती वस्तुस्थिती आहे. पाॅला डिन गुगल करा, संदर्भ हवा असेल तर...

आणि पाकिस्तानचा उल्लेख म्हणजे काय च्या काय! पाकिस्तान तुमच्यावर अवलंबुन आहे का कुठल्याहि बाबतीत कि भारत हा एक मोठ्ठा ग्राहक आहे पाकिस्तानचा?..

बाकी सगळ्यापेक्षा आत्ता स्नॅपडील महत्वाची. तुम्ही नेहमीच अशी भूमिका घेता याचं आम्हाला भारी कौतुक वाटतं. ही जनसामान्यांनी घेतलेली उस्फुर्त भूमिका आहे हे तर मान्य कराल? सध्या लगेच करता येणारी गोष्ट लोकांनी केली. यात स्नॅपडीलच्या कर्मचार्यांचं नुकसान करायचं म्हणून नाही. प्रत्येक क्रियेचे परिणाम हे तर असणारच, जसे अमीरच्या वक्तव्याचे झाले. हे करणारे सगळे कोण तर तुमच्या आमच्यासारखेच लोक. का यात पण काही षडयंत्र दिसतंय?

आपण एखाद्याला विरोध करताना कोणाचं समर्थन करतोय हे महत्वाचं आहे.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 10:56 am | संदीप डांगे

बरं बरं, क्रियेचे परिणाम काय... ठिक आहे. पण ज्याने केलं त्याला सोडून निरपराधांना का म्हणून शिक्षा? संजय दत्तवर देशद्रोहाचा, ऐकलं का, 'देशद्रोहा'चा खटला न्यायालयात चालवला गेला. त्याचे आरोप सिद्ध झाले तेव्हा हे सगळे सुडो-देश-भक्त कुठे झोपले होते कुणास ठावूक... त्याच्या चित्रपटांवर कुणाला बहिष्कार टाकायला सुचलं नाही.

एखाद्याला विरोध म्हणजे कुणाचे तरी समर्थनच असा ग्रह बनवून घेतलेल्यांना आता काय समजवणार... असो.

म्हणजे साधारणपणे सारख्या घटनेला १०-१५ वर्षांपूर्वी येणारी प्रतिक्रिया आणि आत्ता येणारी प्रतिक्रिया सारखी असावी? अनुभवावरून समाजाची विचारपद्धती बदलते आणि ती त्या त्या वेळेच्या सुसंगत होते. तुम्ही म्हणताय त्या न्यायाने तुमचे तुमच्या लहानपणी असलेले विचार आत्ता पण आणि या नंतर पण कायम राहतील का? आणि त्या वेळेला संजयवर पण आगपाखड झालीच होती. आरोप सिद्ध झाल्यावर लोकांनी त्याचे सिनेमा बघणार नाही असं म्हणलं होतं आणि नाना पाटेकरने पण त्याच्या बरोबर यापुढे काम करणार नाही असं जाहीर केलं होतं. दुर्दैवाने त्यावेळेला स्नॅपडील अस्तित्वात नव्हती त्यामुळे जनतेला तो पर्याय नव्हता.

तुम्हाला असं म्हणायचंय का की केवळ संजय दत्त हिंदू आहे म्हणून त्याला अश्या प्रकाराला सामोरं जायला लागलं नाही आणि आमिर मुस्लिम आहे म्हणून त्याला विरोध होतोय?

हे वाचा.

त्याच्यावर TADA (Terrorist and Disruptive Activities [Prevention] Act) या कायद्याखाली AK ४७ बाळगणे आणि नंतर बेकायदेशीररीत्या ती नष्ट करायचा प्रयत्न करणे हा आरोप होता. देशद्रोहाचा किंवा देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला नव्हता. तसं असतं तर तो जामिनावर बाहेर राहून चित्रपटांमध्ये कामं आणि परदेशप्रवास करूच शकला नसता. त्याच्यावर गुन्हा सिद्ध झालाय तो हा - बेकायदा शस्त्र बाळगून ते नष्ट करायचा प्रयत्न केल्याबद्दल. आणि त्याला त्याच्यासाठी असलेली शिक्षा झालेली आहे, जी तो भोगतोय.

त्याला त्याच्यासाठी असलेली शिक्षा झालेली आहे, जी तो भोगतोय.
हॅहॅहॅ... मला वाटलं की त्याच्या पॅरोल मधुन त्याला वेळ मिळालाच की तो आत बाकींच्या दर्शन देण्यासाठी जातो. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

नाव आडनाव's picture

27 Nov 2015 - 11:13 am | नाव आडनाव

त्याला त्याच्यासाठी असलेली शिक्षा झालेली आहे, जी तो त्याच्या सोयीप्रमाणे (सुट्टी घेत घेत) भोगतोय. :)

बोका-ए-आझम's picture

27 Nov 2015 - 3:04 pm | बोका-ए-आझम

त्याला देशद्रोहाच्या गुन्ह्यावरुन शिक्षा झालेली नाही हे सिद्ध होतं. देशद्रोह हा मोठा गुन्हा आहे जो संजय दत्तवर कधी दाखल झालाच नाही (आता का ते उज्ज्वलला विचारा.)शिवाय महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यावर त्याच्या सुट्ट्यांवर चाप बसलेला आहेच.

बोका-ए-आझम's picture

27 Nov 2015 - 3:12 pm | बोका-ए-आझम

त्याला Furlough असं म्हणतात. पॅरोल हा मला वाटतं १० वर्षांपेक्षा जास्त वर्षांची शिक्षा असेल तर असतो. चूभूद्याघ्या.

मदनबाण's picture

27 Nov 2015 - 3:25 pm | मदनबाण

बरोबर आहे तुमचं...Furlough आहे ते.ऑगस्ट मधे मुन्ना भाय पॅरोलवर बाहेर आले होते, तर मला वाटतं आधी डिसेंबर मधे १४ दिवस रजा घेउन सुद्धा भाई आत परतले नव्हते म्हणुन गोंधळ झाला होता.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

sagarpdy's picture

26 Nov 2015 - 10:06 am | sagarpdy

snapdeal या कंपनीचे या प्रकरणात "थोडे" नुकसान झाले हे मान्य आहे. पण भारतीय समाज एवढा mature आहे असा समज करून घ्यायचे करणाच नाही.
उदा. हल्लीच झालेले शारापोवा-सचिन प्रकरण, परवाचेच सचिन-ब्रिटीश एअरवेज प्रकरण
मैगी वर बंदी आली तेव्हा अमिताभ व अन्य जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर काहीशी टीका झालीच.
किंबहुना अशा अथवा अन्य कोणत्यातरी बाबतीत बहुतकरून सगळेच समाज immature असतात. उदा. गे फोबिया, इस्लामोफोबिया हे प्रकार अमेरिकेसारख्या सुधारित समाजात आहेत. अशा immaturity बाबत थोडी सहिष्णुता दाखवावी अशा मताचा मी आहे.

त्यामुळे कंपन्यांनी brand ambassador शी करार करताना सार्वजनिक वक्तव्ये करताना काय काळजी घ्यावी व न घेतल्यास व त्यामुळे कंपनीचे नुकसान झाल्यास काय आर्थिक दंड असतील यासंबंधीचे मुद्दे समाविष्ट करावेत वा अन्य कायदेशीर तरतुदी कराव्या, ज्याने आर्थिक झळ कमी बसेल व अशा बेजबाबदार वक्तव्यांनाही लगाम बसेल.
जर भविष्यातील करार अशा प्रकारचे होण्यासाठी जर कंपन्या एखादे पाऊल टाकणार असतील तर "होतं ते भल्यासाठी" म्हणून पुढे सरकायला हरकत नाही.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 10:59 am | संदीप डांगे

सेन्सिबल प्रतिसाद, धन्यवाद! याच उत्तराची अपेक्षा होती. पण आपण कुठेच चुकत नाही याचा अहंकार आलेल्यांना समजवणे कठीण असते.

गॅरी ट्रुमन's picture

26 Nov 2015 - 10:27 am | गॅरी ट्रुमन

एक गोष्ट तुम्हाला समजलेलीच दिसत नाही की समजून घ्यायची तुमची इच्छा दिसत नाही. स्नॅपडीलविषयी कोणालाही राग नाही. राग आहे आमीरखानच्या त्या वक्तव्याविषयी.आणि आमीरखानसारख्या सेलेब्रिटींचा हा माज त्यांना मिळत असलेल्या पैशामुळे आणि प्रसिध्दीमुळे असतो.या माजाचा स्त्रोतच बंद केला तर ते सुतासारखे सरळ येतील अशी अपेक्षा*. त्यामुळे अशा माजोरड्यांच्या चित्रपटावर आणि ते जे जे ब्रॅन्ड एन्डोर्स करतात त्यावर लोकांनी आपण होऊन बहिष्कार टाकला की मग त्यांना नवे चित्रपट मिळणे कमी होईल आणि नव्या जाहिरातीही मिळायच्या नाहीत.

उद्या स्नॅपडीलने आमीरला ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर पदावरून हाकलले तर मी स्वतः स्नॅपडीलवरून काही गोष्टी मुद्दामून ऑर्डर करायला तयार आहे.

*: माझे हे दिवास्वप्न राहणार आहे हे मला माहित आहे. कारण भारतातील बहुसंख्य लोक तुमच्यासारखे आहेत. त्यामुळे हे असले टिनपाट नट दाऊदच्या पैशावर माज करणार, वाटेल ते बोलणार आणि इथले आपलेच लोक त्यांना डोक्यावर घेणार. काय करणार?

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 11:09 am | संदीप डांगे

तुम्हाला "ब्रँड वॅल्यू मॅनेजमेंट" ह्या व्यवसायाच्या प्रकाराबद्दल ठावूक असेल अशी अपेक्षा करतो. कारण तसे असते तर आपण वरील प्रतिसाद दिला नसता.

बोका-ए-आझम's picture

26 Nov 2015 - 10:46 am | बोका-ए-आझम

वड्याचं तेल वांग्यावर याचं इतकं भारी उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद! पाकिस्तानबरोबर खेळायला आपले खेळाडू उत्सुक असतात आणि प्रेक्षकही उत्सुक असतात. पण का त्याचं उत्तर दिलंच नाहीत. कुठल्याही भारतीय प्रेक्षकांना भारताने पाकिस्तान ला हरवलेलं आवडतं. पाकिस्तानी खेळाडूंचे पडलेले खांदे आणि उतरलेले चेहरे बघायला आवडतं. एकच उदाहरण देतो. २००७ मध्ये आपण दक्षिण आफ्रिकेत झालेला २०-२० विश्चचषक जिंकला. तेव्हा आपल्या खेळाडूंची मरीन ड्राईव्हवरुन मिरवणूक निघाली होती. २०११ मध्ये आपण ५० षटकांचा विश्वचषक जिंकलो, तोही मुंबईत. पण असं काही झालं नव्हतं. एकच कारण होतं त्याच्यामागे - पाकिस्तान. २०११ चा विश्वचषक बहुसंख्य भारतीयांसाठी मोहालीतच संपला होता.
राहता राहिली स्नॅपडीलची गोष्ट. मोबाईल फोन मागवणा-यांना साबण पॅक करुन देणारी कंपनी म्हणून ती आधीच बदनाम आहे. त्यांनी आमीरला ब्रँड अँबेसॅडर म्हणून घेण्याचं एकमेव कारण म्हणजे २००३ च्या कीटकनाशक प्रकरणानंतर कोकाकोलानेही त्याला ब्रँड अँबेसॅडर नेमलं होतं आपली इमेज सुधरवण्यासाठी आणि तेच आता स्नॅपडील करतंय. बाकी १००% भारतीय कंपनी आहे म्हणून कितीजण स्नॅपडीलवर खरेदी करत असतील त्याबद्दल शंकाच आहे.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 11:13 am | संदीप डांगे

ओके ओके. म्हणजे आता मी 'निरपराध' म्हणत आहे ती स्नॅपडीलच कशी 'बदमाश' आहे हे सिद्ध करायचा घाट घातला जात आहे काय? चांगलंय. चालु द्या...

अजिबात रचून सांगत नाहीये. जालावर धुंडाळा. लिंक मिळेल. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा हर्षा भोगले आणि आलोक नाथ हे स्नॅपडीलचे BA होते. नंतर एकदम आमीरला घेऊन - ये दिवाळी दिल की डीलवाली वगैरे जाहिराती सुरु झाल्या. तुमच्यासारख्या जाहिरातींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाने हा परस्परसंबंध लक्षात घेऊ नये याचं मला उलटं आश्चर्य वाटतंय.