माझं प्रेम प्रकरण!!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 1:49 pm

आई:- मग काय ठरलं तुझं? इतक्या पाहिल्या आतापर्यंत... कुठली पसंत पडतेय का? तुझ्या मनात दुसरी कुठली असेल तर स्पष्ट सांग बाबा.
मी:- (मनाचा हिय्या करून) होय आई... ठरलंय माझं.
आई:- (सुस्कारा टाकत) वाटलंच मला... बोल कोणती? नाव काय तिचं? आणि कुठे भेटली तुला?
मी: "अंजली".. अगं मागे नाही का एका दुकानात गेलो होतो आपण? तिकडेच पाहिली होती तिला. तुही म्हणाली होतीस बरी वाटतेय नई!!
आई:- अरे माझ्या कर्मा!! ती अंजली!! त्या गुजरात्याची!! काय एव्हढ बघितलंस तिच्यात? ऐकलं आहे मी तिच्याबद्दल.. काही कामाची नाही ती!
मी:- अगं आई तू आता पूर्वीसारखी अढी मनात ठेवू नकोस. आता जमाना बदलला आहे. नव्या विचारांची आहे ती! माझं जमेल तिच्याबरोबर काळजी नको करूस.
आई:- अरे काळजी वाटते म्हणून तर बोलते ना मी!!.. मागे अशीच नव्या विचारांची की काय ती घेऊन आलास आणि केला ना तुझा विश्वासघात!! किती रडलास आठवतंय ना?
मी:- नाही आई!! ह्यावेळेस नाही होणार तसं. आणि तू कितीही विरोध केलास तरी मी आता अंजलीशिवाय राहू शकत नाही.. मी तिला घरी आणणार आणि माझ्याबरोबर फॉरेनलाही घेऊन जाणार.…आपण असं करूयात का? तु वाटल्यास थोडेदिवस तुझ्यासोबत ठेव.. बघ तुला नक्की आवडेल ती.
आई:- कसं जमणार माझं? तिची पद्धत वेगळी माझी पद्धत वेगळी. नको रे बाबा. आणि सगळ्यांना, तुझ्या त्या फेसबुक फ्रेंड्सना कधी सांगायचं ठरवलंयस?
मी:- आधी नको.. जरा रुळू देत तिला मग सांगतो सगळ्यांना.
आई:- बघ माझे अनुभवाचे बोल आहेत. नाद सोड त्या अंजलीचा.
मी :- नाही आई.
आई:- अरे राजा ऐक!!
मी:- नाही!! नाही म्हणजे नाही.
आई:- मग भोग आपल्या कर्माची फळे!! आणि रडत बस… म्हणतात ना "मिया बिवी राजी तो क्या करेगा काजी!!
.
.
.
.
.
.
.
.
.
तर मंडळी!! आम्ही मिया-बिवी ने म्हणजे मी आणि कीर्ती ने सगळ्यांचा विरोध मोडून काढत "आत्माराम पटेल" ग्रुपच्या "अंजली किचन वेअर" ब्रांडच्या कांदा चिरायच्या माशिनीला घरात आणलं आणि पहिल्या वापरातच आईची भविष्यवाणी खरी ठरली..
ह्या अंजलीने पहिल्या वापरताच रडवलं अक्षरशः!!
कांद्याचे मीडियम तुकडे केल्याशिवाय पठ्ठी कामच करत नाही! आणि साफ करण्यात एव्हढा वेळ जातो की त्या वेळात अजून 10 कांदे चिरून होतात... आणि पँप्लेटमधे चांगल्या वापरासाठीच्या धमक्याही बऱ्याच.
च्याआयला!! आपली सुरीच बरी!! आईचं ऐकलं असत तर हि ब्याद गळ्यात तरी पडली नसती.

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

बाजीप्रभू आयडी घेऊन कांदे कापायच्या सुर्‍याची चर्चा ??
असो.. ठिकठाक लिखाण

समीरसूर's picture

26 Aug 2016 - 3:19 pm | समीरसूर

प्रतिसाद आवडला.

लेख छान. अजून खुलवला असता तर मजा वाढली असती.

पियुशा's picture

24 Nov 2015 - 2:00 pm | पियुशा

हूह ! कहानी मी ट्विस्ट बीस्ट असेल अस वाटलेल पहिला परिच्छेद वाचुन ये तो भलत्याच निकला ;)
असो छान लिवलय :)

बाजीप्रभू's picture

2 Jun 2016 - 12:14 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!

अजया's picture

24 Nov 2015 - 2:01 pm | अजया

:)

पद्मावति's picture

24 Nov 2015 - 2:20 pm | पद्मावति

:) मजेदार आहे.

च्यायला =)) कांदेखिंडीची लढाई =))

कपिलमुनी's picture

24 Nov 2015 - 3:17 pm | कपिलमुनी

हा हा हा

पगला गजोधर's picture

25 Nov 2015 - 9:06 am | पगला गजोधर

होना, लेखकाचे नाव वाचून माझ्या डोळ्यासमोरही क्षणभर, खीन्डीत दोन हातात दानपट्टे घेऊन, लढणारे वीर आलेले….

जातवेद's picture

24 Nov 2015 - 2:33 pm | जातवेद

वाजलेलं दिसतय.

शंभर टक्के खरी बात. अशा प्रकारची वरवर सोयीची दिसणारी अनेक उपकरणं डेमो पाहताना भारावून टाकतात पण प्रत्यक्ष घरी आणली की त्यात कापण्या-चिरण्या-सोलण्या-ज्यूसवण्यासाठीच्या पूर्वअटी आणि नंतरची साफसफाई निपटारा यात तिप्पट वेळ जातो. शिवाय सगळी सालं निघतीलच असं नाही, पूर्ण रस निघेल असं नाही, सर्व खोबरं निघेलच असं नाही. त्यामुळे शेवटी क्लासिक मेथडने शेवटचा हात मारावा लागतोच.

आणखी उदाहरणं:
- लसूण सोलणयंत्र
- हँडल फिरवून खोबरं खवणं
- बिनतेलाचे पदार्थ बनवणारं काहीतरी
- फळात फक्त नळी खुपसून ज्यूस काढण्याचं किट

अभ्या..'s picture

24 Nov 2015 - 2:38 pm | अभ्या..

सहमत
आमच्या इथल्या वस्तादाला कीतीही भारी सुर्‍या दिल्या तरी हॅक सॉची ब्लेड धार लावून त्याला हँड्ल करुन जी सुरी बनते त्यानेच अस्ला सफाईदार कांदा कापायचा की बस्स.

सस्नेह's picture

24 Nov 2015 - 2:42 pm | सस्नेह

आणखी अशीच मॅडचॅप डोक्याला शॉट यंत्रे
- पुरणयंत्र
- रोटीमेकर
- फूड प्रोसेसर
- पॉपकॉर्न मेकर

वैज्ञानिक खेळणी, ढेरी कमी करणारे उपकरण, कडधान्याला मोड आणणारी उपकरणं, सोलर चार्जर, हेड मसाजर, चुंबकजल पेला, बिजक लाकडी औषधी पात्र, अॅक्युप्रेशरचा लाकडी रुळ आणि सपाता..

असं बरंच कायकाय एका प्रदर्शनात मिळतं ते पाहिलंय का कोणी?

"विज्ञानाचा चमत्कार- अनोळखी प्रदर्शन" असा बोर्ड एनेच फोर वर सातार्‍यानजीक एका ढाब्यावर लावलेला पाहिला आहे. =))

सस्नेह's picture

24 Nov 2015 - 3:24 pm | सस्नेह

माझ्याकडे एक चारचाकी वैज्ञानिक मसाजमेकर आहे. गेली अकरा वर्षे ती गाडी सुखेनैव कपाटात बसली आहे. तिने शरीराच्या नेमका कोणत्या भागाला मसाज करता येईल ते अजूनही कळलेले नाही.

बॅटमॅन's picture

24 Nov 2015 - 3:31 pm | बॅटमॅन

मसाजमेकर वाचूनच फुटलो =))

त्या गाडीला तो एकच शब्द योग्य आहे =))

मी पाहीलेलं हाय असलं प्रदर्शन. अगदी हौसेने. :)
सुईत दोरा ओवायचं यंत्र पण पाहिलेलं आहे.
ह्या प्रदर्शन वाल्यांचं प्रिंटिंग माझ्याकडे आलं असता मिळवलेली माहीती अशी की हे प्रोडक्टस तयार होतात कॉपी करुन. एखाद्याने हुडकून काढलेले असते त्याची कोपी स्वस्तात तयार होते. पॅकेजिंग अन अ‍ॅडव्हर्टाइझिंग साठी पुरेसा पैसा नसतो. तेवढी त्या प्रॉडक्टची पात्रता पण नसते. मग असे प्रोडक्टस किरकोळ किमतीत घेऊन हे विक्रेते प्रदर्शन मांडत गावोगावी हिंडतात. एकाच जागी अशी प्रॉडक्टस मिळाल्याने एकदा वापरुन घरी टाकून देणार्‍यांची पण कमी नसते. कमी किमतीमुळे परत भांडायला कोणी येत नाही. होतो चांगला धंदा. आजकाल त्याच्या सोबत हे विक्रेते हॅण्डलूमचे कपडे पण सर्रास खादी ग्रामोद्योगचा लोगो अन खादी/हॅन्डीक्राफ्ट्/कला प्रदर्शन अशी नावे वापरुन विकतात.
काही प्रॉडक्ट्स मात्र स्वस्तात चांगले मिळतात.
(हे. संजय क्षीरसागर सरांनी डोक्याला मसाज अन आराम देणारे एक बोकोमो नावाचे यंत्र सुचवलेले. ते पण अशा प्रदर्शनात २० रु ला होते)

शिव कन्या's picture

27 Nov 2015 - 5:52 pm | शिव कन्या

लिहिलंत, बरे झाले. पैसे वाया. घरात गबाळ. उपयोग काहीच नाही.
पण अभ्या भौ, त्या मागचे गणित सांगितलेस, परमज्ञान प्राप्त झाले बघ.

बाजीप्रभू's picture

25 Nov 2015 - 6:33 am | बाजीप्रभू

आमच्या कड बी एक पार्किंग स्लॉट अडून बसलाय असल्या गाडी पाई.

हो हो. हायवे ढाब्यांवर खूप वाढायला लागलेत असे स्टॉल. शिवाय पाठीवर बि-हाड टाईप प्रदर्शनांत. म्हणजे उपकरणाचा फोलपणा लक्षात येईस्तो गि-हाईक शेकडो मैल आपल्या गावी पोचलेला असणार किंवा प्रदर्शन पुढील मुक्कामी पोचलेलं असणार.

बाकी ते एक सुईत दोरा ओवणेयंत्र राहून गेलं मगाशी..

पॉपकॉर्न मेकर? यासाठी यंत्र कशाला लागते, बुट्टीतपण छान होतात की.

बाजीप्रभू's picture

25 Nov 2015 - 6:38 am | बाजीप्रभू

बायकोपुढे शायनिंग मारण्यासाठी असली बरीचं आणलीयत... मग पुढे काय झालं हे सुज्ञास सांगणे न लगे.

जेपी's picture

24 Nov 2015 - 3:12 pm | जेपी

रोटीमेकर...
फसव प्रकरण..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Aug 2016 - 3:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

या यंत्राची किंमत तेव्हा कळते जेव्हा अश्या एखाद्या ठिकाणी तुम्ही आहात जिथे पोळपाट-लाटणं, तयार पोळ्या, अथवा पोळ्या करुन देणारा/री मिळू शकत नाही आणि पोळ्या खाण्यासाठी तुम्ही तरसत असता (मुख्यतः परदेशी). मला तर फार म्हणजे फारच उपयोग झालाय या यंत्राचा.

मित्रहो's picture

24 Nov 2015 - 3:43 pm | मित्रहो

आमची आजी म्हणत होती मला तुमची सुरी अजिबात जमत नाही. माझी आपली विळीच बरी. आता त्या अंजलीने कांदे कापायला त्याच पिढीतले कोणी यायले पाहीजे. आमचे काम नाही.
रोटीमेकरच्या बाबतीत सहमत, तसेच साध्या मिक्सरची किंमत वाढवून त्याचा फुड प्रोसेसर करतात आणि अगदी टाकाऊ गोष्टी देतात.

रातराणी's picture

25 Nov 2015 - 4:48 am | रातराणी

:)

योगी९००'s picture

25 Nov 2015 - 8:39 am | योगी९००

लेख आवडला...लिखाणाची पद्दत आवडली.

कोठेतरी हुरोम कंपनीचा स्लो ज्युसरची अ‍ॅड पाहिली. युट्युबवर त्ट्युबवर त्याचे व्हीडीओ सुद्दा पाहिले आणि विकत घेण्याची ईच्छा झालई. पण किंमत ऐकल्यावर दोन वर्षे बाहेर रोज बाहेर ज्युस पिला तरी चालेल असे वाटले.

बाजीप्रभू's picture

25 Nov 2015 - 9:01 am | बाजीप्रभू

हा! हा! हा!

स्लो ज्यूसर? आँ?!! स्लो कुकर ऐकला होता. हळूहळू ज्यूस काढणारा ज्यूसर ? आता त्याचे फायदे आणि गुण शोधणे आले.

बाकी या निमित्ताने होमशॉप१८ आणि तत्सम दहाबारा चॅनल्सची आठवण झाली. श्वासही घ्यायला न थांबता ते तरुणतरुणी उच्चारवाने सतत स्क्रीनवर दाखवलेल्या वस्तूचं गुणगान आणि स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर फोन करण्याची घाई करत असतात. तासनतास न दमता.

अनेकदा ती वस्तू अत्यंत लिमिटेड स्टॉकमधे आहे असं त्यांचं उच्चारवात सांगणं असतं.

सतत कॉल्स येत आहेत. पाच मिनिटात १०० पीसेस संपले.. त्वरित कॉल करा..

एका ठिकाणी तर असं सांगत होते की "तुमचा कॉल घेण्यासाठी कदाचित वेळ लागेल आणि मिनिटभर वेटिंग पडेल, तेव्हा प्रयत्न सोडू नका. कॉलवरच रहा आणि सतत कॉल लावत रहा. कारण लिमिटेड क्वांटिटी झपाट्याने संपत आहे"

त्यांचा उत्साह पाहून डोळे पाणावतात. वस्तू लिमिटेड आहेत. ऑर्डर्स प्रचंड येताहेत. इतके कॉल्स हँडल करताना कठीण जातंय. क्यू लागलेत. क्वांटिटी जवळजवळ संपतच आली आहे. तरीही अशा वेळी नवीन गिर्‍हाईकांना
ताबडतोब आणि अधिकाधिक प्रचंड संख्येने कॉल करण्याचं आवाहन करण्यामागची कळकळ काळजाला भिडते.

.....................

तरुण: "ये देखिये, इस मोबाईलफोनमें आपको ५ मेगापिक्सेल कॅमेरा भी हम दे रहे है..!!"
तरुणी: ५ मेगापिक्सेल.. व्वॉव..
तरुणः और ये देखिये, इसमें आप किसी भी जगह से टीव्ही भी देख सकते है. अपना फेवरिट चॅनेल अब देखिये कहीं भी बैठकर.. (स्क्रीनवर टीव्हीचॅनल स्ट्रीम करणारं फुकट अ‍ॅप. डेटा यांचे तीर्थरुप देणारेत.)
और ये सब सिर्फ आज अभ्भी ऑर्डर करने पर एक अनबिलीव्हेबल प्राईसमें. सिर्र्फ्फ छे हजार नौ सो निन्न्यानवे रुप्पये में.. इजन्ट दॅट अनबिलीव्हेबल.

तरुणी: वॉव.. तो आप क्या सोच रहे है.. अभ्भी फोन उठाईये और..

भाजीप्रभु, चांगलय आसच चालु राहुद्या

नीलमोहर's picture

25 Nov 2015 - 11:25 am | नीलमोहर

प्रवासादरम्यान जेवणासाठी कुठल्याही हॉटेलजवळ थांबलं की बाहेर या वैज्ञानिक वस्तूंचं प्रदर्शन असतंच.

@ स्नेहाताई,

फूड प्रोसेसरला बिनकामाचे म्हणू नका हो, स्वयंपाकघरात त्याचा खूप उपयोग होतो.
हे एक यंत्र प्रोसेसिंग, मिक्सींग, ग्राइंडिंग अशी अनेक कामं करतं.
उदा: नारळ खवणे, कुठंलंही पीठ(पापडाचंही) मळणे, लोणी काढणे, दाण्याचा कूट करणे,
डाळी, तांदूळ, पुरण, मसाले वाटणे, भाज्या कापणे किसणे, ज्यूस करणे,
श्रीखंड करणे (एक नंबर होतं), अजूनही बरंच काही.
शिवाय व्यवस्थित वापरलं तर ते अनेक वर्षं चालतं, किंमत वाजवी असते आणि लगेच वसूलही होते.

बाजीप्रभू's picture

25 Nov 2015 - 12:33 pm | बाजीप्रभू

पाहिलं प्रेम
तुनळीच्या व्हिडिओत काय तो बाप्या सटा-सट कांदा चिरतो आणि च्यामारी आम्ही एक फटका मारला अनं ब्लेडच हातात आलं अनं बुबुळं बाहेर.

दुसरं प्रेम
हे आमचं दुसरं प्रेम... जे पहिलीच्या वाटेने गेलं.

खि खि खि.. रोटी मेकर ने अशीच पस्तावले होते पण बाकी बर्‍याच गोष्टींचा फायदा होतो. फुड प्रोसेसर आहे, चॉपर आहे. मला असं वाटतं की ज्याला ज्या कामाची सवय आहे त्याला त्या साठी यंत्र वापरणे अडचणीचे वाटते. मी चॉपर मध्ये कांदा भराभरा चिरते आणि ना त्याची पेस्ट होते ना त्याचे खुप मोठे तुकडे राहतात. पण आई आली होती तेंव्हा तिला तो चॉपर फारसा नाही पटला कारण तिला मुळात च कांदे चिरायला वेळ ही लागत नाही आणि कंटाळा ही येत नाही ( मला दोन्ही होतं ;))

चतुरंग's picture

26 Nov 2015 - 6:44 am | चतुरंग

छान लिवलंय. बाकी असली मशीन्स मोडल्याने वैताग येतो तसा मशीन्स सुखेनैव चालत असतील आणि सांगितलेले सगळे करत असतील तरीही ती कामे करत राहायला लागतात आणि शिवाय त्या मशीन्सवरती चिडताही येत नाही. उदा. ब्रेडमेकर व्यवस्थित चालतो, त्यात सगळ्याप्रकारचे जामही होतात, पिझ्झा पीठ होते, इडलीचा रगडा आहे त्यात व्यवस्थित पीठ होते. आता ते करत राहणे आले ना? ;)

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 10:51 pm | DEADPOOL

मस्तानी किधर हय?

बाजीप्रभू's picture

27 Nov 2015 - 7:56 am | बाजीप्रभू

आताची मस्तानी(अंजली) आणि अगोदरची काशी बाई(स्लॅप चॉप) दोन्ही कचऱ्याच्या डब्यात गेल्यात आता.

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 10:52 pm | DEADPOOL

बाजी नावाची किमया!!!

स्वाती दिनेश's picture

27 Nov 2015 - 4:53 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत लिहिले आहे.
स्वाती

बाजीप्रभू's picture

26 Aug 2016 - 2:47 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!

इशा१२३'s picture

2 Jun 2016 - 2:56 pm | इशा१२३

हा हा!छान !

बाजीप्रभू's picture

26 Aug 2016 - 2:47 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!

दिनु गवळी's picture

2 Jun 2016 - 5:26 pm | दिनु गवळी

मशीनरी प्रेम हाय वाटत