अंतर्यामी ओरीगामी

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
23 Nov 2015 - 9:44 am

अंतर्यामी ओरीगामी

गर्दीत त्याला पाहून मी जवळ जवळ त्याचा हात खेचीतच बाजूला घेऊन गेलो.

"तू इथे प्रदर्शनात कशाला आलास ?" मी रागाने
"तू म्हणालास ना सगळे येणार आहेत म्हणून" तो बिफीकीरीने
"मला नाही माहीत कोण कोण आलेय ते" मी खांदे उडवून म्हटलो नेहमीसारखा.

तो खटपणे म्हणाला " मला माहीत्येय कोण कोण आलेय ते !!!"
" कोण कोण ते सांग चटकन अन मोकळं कर मला " मी अधीरपणे .

"हो हो किंचीत पुरोगामी,किंचीत प्रतीगामी आणि बरेचशे ओरिगामी"

"क्का$$$$$य" मी शक्य तितक्या मह्तप्रतसायाने खालच्या आवाजात

ऐक चिडू नको..

"जे स्वतःच्या मताभोवतीच फिरतात आणी इतरांच्या मताचा कायम अनादर करतात, हे त्यांनाही माहीती आहे आणि हतबलता दाखवतात ते किंचीत प्रतीगामी,आपली गृहीतके अंदाज चुकू शकतात सुधारणा होऊ शकते हे माहीती आहे पण करीत नाहीत ते किंचीत पुरोगामी आणी..."

"अता ओरिगामी बद्दलही आपले ज्ञान पाजळा " मी चिडीवर नियंत्रण ठेवीत.

"हे बघ या कागदाचे काही कोपरे दुमडायचे कधी बाहेर कधी आत्,घडीवर नियंत्रण आणि अचूकता तर हवीच सगळं दिलेल्या प्रमाणात आणि न कापता न चिटकवता"

"ते मला माहीत्येय, मला घाई आहे लवकर संपव तुझं पुराण" मी त्रासून

"तीच कोपरे आणी कडा कधी जमलेतर आणि अगदी आवश्यक असेल तर कागदाचा आतला भागही दाखवावा लागतो,कागद तोच आकृती तीच तरी आप्ली अशी वेगळी छाप+ठसा उठलाच पाहिजे तुझा कलाकृतीवर्,बघ तुझे अहंकाराचे कोपरे नीट दुमड, सगळं जनरीतीनेच करं पण आस जिवंत राहू दे,एकदा का जमली ही जीवन-ओरिगामी, की फक्त अपूर्व समाधान अन शांतता गोळा होईल तुझ्या विश्वात .....

नाही तर चुकलेल्या(चुरगळलेल्या) घडी-कागदाचा फक्त बोळा होतो..

नेमके मला बॅट्याने बोलावले आणि हा गर्दीत गायब झाला पण डोक्यात गुंता सोडून..

मुक्तकसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचारप्रतिक्रियाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

23 Nov 2015 - 9:55 am | पगला गजोधर

गुर्जीना प्रदर्शनात जमावाकडून काव्यसंग्रहाबद्दल डीवच्ण्यात आले,
तेव्हा त्यांनी 'ओरिगामी आणि पुरोगामी' या विषयावर जिलेबी काव्य लिहिण्याचा प्रण केलेला !
;)

अगदी अगदी! काव्यसंग्रहाबद्दल पृच्छा करताच गुर्जींनी काढता पाय घेतला असे निरीक्षण आहे.

प्रचेतस's picture

23 Nov 2015 - 12:38 pm | प्रचेतस

कुठला काव्यसंग्रह म्हणे?

बॅटमॅन's picture

23 Nov 2015 - 12:42 pm | बॅटमॅन

अहं मम, परं "मम" कस्य? =))

प्रचेतस's picture

23 Nov 2015 - 12:45 pm | प्रचेतस

=))

तुम्हांला फोन केला तर तुम्ही उचलत का नाय हो? दर्पण सुंदरीला सांगू का नाव तुमचं?

प्रचेतस's picture

23 Nov 2015 - 1:55 pm | प्रचेतस

=))
इतक्या गर्दीत फोनची रिंग वाजलेली ऐकूच नै आली.

नाखु's picture

23 Nov 2015 - 2:11 pm | नाखु

सध्या फोनच्याच रिंग कडे लक्श्य देत नाहीत असे एक रोचक निरिक्षण...

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2015 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा

@ कुठला काव्यसंग्रह म्हणे?>> हे घ्या ... जाले सुरु नेहमीचे निरर्थक कुंथन!

पगला गजोधर's picture

23 Nov 2015 - 3:36 pm | पगला गजोधर

''ओरिगामी आणि पुरोगामी'',
लेखकः गुर्जी, प्रकाशक: आत्मुकुन्थिय भ्रम, ताम्बे-बोळ पुणे,
मुळ किम्मत : १२२ फक्त
प्रस्तावना: क्याप्टन चिमण

बॅटमॅन's picture

23 Nov 2015 - 3:41 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

तदुपरि १२२ रु. चा स्प्लिट = १०० रु. मूळ किंमत + २२ रु. पेट्रोलचे.

पैशाचं कै नै ओ, कवितासंग्रह मिळूदे तर खरी. एखाद्या ग्रंथाची पोथी कुणा खाष्ट पंडिताने कुण्णाकुण्णाच्या नजरेस पडू देऊ नये तशातली गत आहे ही.

नाखु's picture

23 Nov 2015 - 3:41 pm | नाखु

आगावू नोंंदणी ( आगावू माणसांनी नाही तर अ‍ॅडव्हान्स = अग्रीम या अर्थाने) केल्यास उपरोक्त कवीता संग्रह कवीच्या सहीने भेट दिला जाईल.

सदस्य चिमण हटेला गँग..
सदस्य भरती जानेवारीत चालू होईल चौकशी करू नै.

j

(फक्त अमेरिकेतील रसिकांसाठी उपलब्ध काव्यसंग्रह प्रत मुखपृष्ठ )

प्रमोद देर्देकर's picture

23 Nov 2015 - 12:38 pm | प्रमोद देर्देकर

आता वैजु विषयी विचारायचे सोडुन तुम्ही काव्या विषयी विचारले इथेच तुमचे चुकले, म्हणुन गुरुजी अंतर्धान पावले.
हम्म्म अता कशाने बरे ते प्रसन्न होणार?

बॅटमॅन's picture

23 Nov 2015 - 3:41 pm | बॅटमॅन

ही वैजू कोण अता?

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2015 - 3:55 pm | टवाळ कार्टा

तुम्ही भावविश्व वाच्लेले नै????

बॅटमॅन's picture

23 Nov 2015 - 4:04 pm | बॅटमॅन

भावविश्व

हे कय असतं? आम्ही भावंविश्व वाचलेले आहे. =))

नाखु's picture

23 Nov 2015 - 4:06 pm | नाखु

टक्कू मोक्कू निव्वळ विस्मरण रे... प्रतिक्षेमुळे (तब्बल ३ महिने झाले शेवटचा भाग प्रकाशीत होऊन)

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५०

द्रश्य(active tab) What links here
प्रेषक, अत्रुप्त, Mon, 03/08/2015 - 22:5

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2015 - 4:34 pm | टवाळ कार्टा

टक्कू मोक्कू

नाव वेवस्थित ल्हिणे...आमी लिवाय्चे का नादावलेला खुळा???? :)

नाखु's picture

23 Nov 2015 - 4:36 pm | नाखु

माफी, मक्कू असे वाचा..

गलतीसे मिष्टेक माफ करना..

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2015 - 4:39 pm | टवाळ कार्टा

खिक्क....फिकर नॉट :)

प्रमोद देर्देकर's picture

23 Nov 2015 - 4:02 pm | प्रमोद देर्देकर

भाबडा खीSSS क.

अस्सोच.

अमचे गुरुजी सगळं जाणतात.

एस's picture

23 Nov 2015 - 12:51 pm | एस

मुक्तक आवडले!

सस्नेह's picture

23 Nov 2015 - 12:54 pm | सस्नेह

जल्ला काय्बी कल्ला नाय !

यशोधरा's picture

23 Nov 2015 - 12:58 pm | यशोधरा

इतुकुसाच?

किसन शिंदे's picture

23 Nov 2015 - 12:59 pm | किसन शिंदे

नेमकं कोण भेटलं होतं म्हणे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2015 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे क्रिप्टिक मुक्तक आवडले !

पण, कोणीतरी वृतांत आणि फोटो टाकेल काय ???