इशकजादे – १

मांत्रिक's picture
मांत्रिक in जनातलं, मनातलं
20 Nov 2015 - 12:41 pm

जूनचा पहिला आठवडा. पावसाची अजून सुरुवात झालेली नव्हती. गुलमोहराचा बहर देखील ओसरत आलेला होता. तलवारीसारख्या लांब शेंगा कुठे कुठे लटकलेल्या दिसत होत्या. रस्त्यावर देखील ओसरत्या बहरातील लालभडक आणि पांढ-या पाकळ्यांचा सडा पडलेला होता. तो सर्व रस्ताच आता कॉलेजच्या मुलामुलींच्या घोळक्यांनी भरुन गेलेला होता. त्या जिल्ह्याच्या शहरातील हाच काय तो एकमेव हिरवळीचा रस्ता. मुख्य पेठेपासून शहराच्या बाहेरील कॉलेजला जोडणारा. दिवसभर तरुणाईचा उत्साही वावर या रस्त्यावर दिसून येई.

कॉलेज सुरु होण्याची वेळ झाली होती. मुलामुलींचे घोळके भराभर पाय उचलू लागले. याहीवेळेस काही तरुण तुर्क मंडळी रस्त्याच्या कडेला मोक्याच्या ठिकाणी उभी राहून टेहळणीचे काम पार पाडत होती. अशा टेहळणी नाक्यांच्या जवळून मुली भराभरा चालत असत. मग टोळकी फिदीफिदी हसत, काही कमेंटी मारत. एखाददुसरी चिडलेली खमकी मुलगी मग मुद्दामच बूट-चप्पल हातात घेतल्याचा अभिनय करे. त्यावर तर अशा टोळक्यांना हर्षवायूच होत असे. सततच्या तक्रारी झाल्यामुळे या रस्त्यावर पोलीस गाडी एक दोन दिवसांत हमखास चक्कर टाकत असे. अशा वेळीस मग ही मंडळी गायब होत.

आज पोलीस गाडी आलेली नव्हती. त्यामुळे बरीच मंडळी डोळे शेकायचे काम करीत अद्याप उभीच होती. त्याच एका टोळक्यात विवेक देखील उभा होता. त्याला स्वतःला अजिबात यायचं नव्हतं. पण त्याच्या हॉस्टेलवरच्या मित्रांनी त्याला ओढतच तिथे आणलेला. आणि आता भंकस करत ती चार पाच मंडळी तिथे उभी होती. समोरुन जरा उच्चभ्रू दिसणा-या मुलींचा एक ग्रुप त्यांच्या जवळून जाऊ लागला. त्यात एक गुलाबी ड्रेसवाली अगदीच सुंदर दिसत होती. तिला बघून विवेकच्या ग्रुपमधील एका नवीनच मित्राने मोठ्याने कमेंट मारली ‘ही कोण रे पिंक पिंक बेबी?’

अचानक तो घोळका थिजला. गुलाबी ड्रेसवालीने आपल्या मैत्रिणींकडे बघितले. तिच्या चेहे-यावर आश्चर्य, अपमान आणि भय यांच्या मिश्र भावना होत्या. विवेकला अर्थातच हे आवडलं नाही. त्यानं त्या मुलाची गचांडी धरली. ‘हे बघ तुला असले काही धंदे करायचे असतील तर ते दुसरीकडे जाऊन एकट्याने कर. तुझ्यामुळे आमचं नाव खराब करुन घ्यायचं नाही आम्हांला. चालता हो इथून.’ त्या पोराच्या चेहे-यावर आता अपराधी भाव दिसत होते. कशीबशी विवेकच्या हातातून सुटका करुन घेऊन तो जवळच्याच गल्लीत गायब झाला.

वातावरणात अचानक निर्माण झालेला तणाव निवळला. त्या मुलीदेखील आता रिलॅक्स होऊन आपल्या मार्गाला चालू पडल्या. गुलाबी ड्रेसवाली मात्र वळून वळून विवेककडे बघत होती. त्याचा सावळा रंग, पिळदार शरीरयष्टी, खुरटी वाढवलेली दाढी, नजरेतील शांत व आश्वासक भाव. नकळत आत कुठेतरी तिला तो आवडून गेला. ती आपल्याकडेच वळून बघतेय हे लक्षात आल्यावर विवेक थोडा लाजलाच. हा सर्व प्रकार बघून त्याचे दोस्त मात्र चेकाळलेच, ‘विव्या टाका भिडला रे तुझा. साल्या आज पार्टी पायजेच.’

सकाळचे बरोब्बर नऊ वाजले होते. विवेक आता शांतपणे कॉलेजकडे चालू लागला. बरोबरीने त्याचे दोस्त होतेच. आता त्यांची अखंड बडबड चाललेली होती. त्यांनी स्वयंघोषित प्रेमगुरुंची भूमिका पत्करलेली होती आणि विवेकला पुढचे पवित्रे कसे टाकायचे याबद्दल मार्गदर्शन चालू होतं. विवेकचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्या डोक्यात तिचाच विचार चालू होता. ‘कोण असेल ती? उद्या पुन्हा दिसेल का ती? माझ्यात एवढं काय आवडलं तिला? मी तर अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा. हे प्रेम वगैरे आपल्याला जमणार आहे का? माझ्याकडे बाईक नाही. पॉकेटमनी फारसा नसतो. मोबाईल पण अगदी साधा.’ शेवटी न राहवून त्यानं तो विचार मनातून झटकून टाकला. एक किरकोळ योगायोग. जाऊ देत साला.

एफ.वाय.बी.एस.सी.च्या वर्गाकडे विवेकचा ग्रुप वळला. त्या चौघांनी नव्यानंच या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. आज फक्त दुसराच दिवस त्यांचा कॉलेजमध्ये. तालुक्याच्या ठिकाणी बारावी पूर्ण केल्यावर त्या चौघांनी श्रीरामपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा ठरवला. या कॉलेजला नॅकचा A+ दर्जा मिळालेला होता, हे तर कारण होतंच. पण थोडा शहरी जीवनाचा देखील आनंद घ्यावा अशी मनात सुप्त इच्छा होती.

तास सुरु होण्याची बेल वाजली. विवेक मागच्याच बाजूच्या एका बाकावर बसला. त्याच्याबरोबर कुणाल बसलेला होता. अजून लेक्चरर यायचे होते. बरीचशी मंडळी आत्ता कुठे येत होती वर्गात. विवेक सहज दरवाजाकडे पहात होता. आणि एकदम त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. ‘ती’ येत होती आत. गुलाबी ड्रेस. एखाद्या अबोलीच्या फुलासारखी नाजूक, साधी. किती सुंदर दिसावं माणसानं? किती कातिल असावं? अचानक तिनेही त्याच्याकडे पाहिलं. दोघांनी पटकन नजरा चोरल्या. विवेकच्या शेजारच्याच पण जरा पुढच्या बाकावर ती बसली. विवेक अजून तिच्याकडेच बघत होता. त्याच्या मनातील घालमेल कुणालच्या लक्षात येत होती. आणि त्याला आतल्या आत हसू फुटत होतं…

(क्रमशः)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

20 Nov 2015 - 12:42 pm | कविता१९७८

पु. ले. प्र.

एक एकटा एकटाच's picture

20 Nov 2015 - 12:57 pm | एक एकटा एकटाच

लयभारी

मस्त गुलाबी गुलाबी वाटतय.

बोका-ए-आझम's picture

20 Nov 2015 - 12:59 pm | बोका-ए-आझम

त्या अवधूतचं काय झालं? अशी एकदम पारलौकिकातून ऐहिकात उडी मारलीत ते? अशी रिव्हर्स रजनीशगिरी काऊन करुन रायले बाप्पा? ;)

नीलमोहर's picture

20 Nov 2015 - 1:07 pm | नीलमोहर

अगदी !!

चांदणे संदीप's picture

20 Nov 2015 - 1:53 pm | चांदणे संदीप

डिट्टो

प्रचेतस's picture

20 Nov 2015 - 2:55 pm | प्रचेतस

शेम टू शेम.

आदूबाळ's picture

20 Nov 2015 - 4:16 pm | आदूबाळ

रिव्हर्स रजनीशगिरी

लोल!

--

कथा झक्कास सुरू झाली आहे मांत्रिकभौ. लौकर येऊंद्या पुढचा भाग.

स्रुजा's picture

21 Nov 2015 - 12:14 am | स्रुजा

लोल..

आणि सहमत :)

रातराणी's picture

20 Nov 2015 - 2:25 pm | रातराणी

पुभाप्र. अवधूत आणि इशकजादे दोन्हीच्या. :)

नाखु's picture

20 Nov 2015 - 2:35 pm | नाखु

गरज होती अश्या कथांची !!!
पु भा ल टा

आस्तीक-नास्तीक-स्वास्तीक-कास्तीक-जास्तीक धाग्यांने पीडीत अस्सल मिपाकर वाचक महासंघाच्या "मी मिपाचा,मिपा माझा" या दैनिकातून साभार.

मांत्रिक's picture

20 Nov 2015 - 2:44 pm | मांत्रिक

धन्यवाद काका. म्हणून तर लिहिली खास. खूप दिवसांपूर्वीच सुचलेली कथा. पण या वातावरणामुळे लगेच टंकायला घेतली.

कातिल आठवणी जाग्या झाल्या :)
पुभाप्र.

बाबा पाटील's picture

20 Nov 2015 - 2:51 pm | बाबा पाटील

गुलाबी गुलाबी हो गया यार

अमृत's picture

20 Nov 2015 - 2:57 pm | अमृत

हलकं फुलकं लिखाण आलय. पु भा प्र

वाचतेय, पटापट येउ द्या पु भा प्र :)

मांत्रिक's picture

20 Nov 2015 - 9:04 pm | मांत्रिक

धन्यवाद पिवशेताई!!!

असंका's picture

20 Nov 2015 - 9:30 pm | असंका

चांगलंय...

पण अवधुतने मनात घर केलंय..??

मांत्रिक's picture

20 Nov 2015 - 9:42 pm | मांत्रिक

धन्यवाद साहेब! अवधूत नक्कीच येईल.

:)पुभाप्र. बर्याच दिवसांनी चाॅकलेट खायला मिळणार! !

मांत्रिक's picture

20 Nov 2015 - 9:43 pm | मांत्रिक

धन्यवाद ताई! पुढील भाग तर येऊ देत. नक्कीच आवडेल ही कथा तुम्हाला!!!

नक्की आवडेल मांत्रिक भाऊ:)

शिव कन्या's picture

20 Nov 2015 - 11:52 pm | शिव कन्या

अरेच्या ! आमचे भाऊ इतके रसिक !
पुढचा भाग टाका लौकर !

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2015 - 12:00 am | श्रीरंग_जोशी

शीर्षकावरून वाटलं होतं इशकजादे या हिंदी चित्रपटाचे रसग्रहण वगैरे असेल (त्यातही पहिला भाग ;-) ).
शेवटी धागा उघडला अन एका रोचक कथामालिकेचा पहिला भाग वाचायला मिळाला.

पुभाप्र.