ती अमेरिकन मुलगी.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
19 Nov 2015 - 9:24 am

"भाऊसाहेब,ह्या तुमच्या म्हणण्यावर मी आणखी जास्त सहमत होऊच शकत नाही"--मी म्हणालो.

लेबरडेची सुट्टी संपली.आता उन्हाळा ओसरत जाणार.फ़ॉल चालू होणार.झाडांची पानं पिवळी होऊन पडायला सुरवात होणार.अंजीराच्या झाडाची पानं,हत्तिच्या कानाच्या आकाराची ही पानं, चांगलीच पिवळी होऊन पडायला लागली आहेत.सफरचंदाना लाल रंग चढत आहे.लालबुंद व्ह्यायला त्या फळांना आता थंडीची जरूरी आहे.सफरचंदाच्या झाडाची पानं अजून हिरवीच आहेत.ऑक्टोबरमधे चांगलीच थंडी पडायला लागली की ह्या झाडांची पानंसुद्धा पडायला सुरवात होईल.तोपर्यंत फळं पाडाला येणार.मलबेरीची पानं झपाट्याने पिवळी व्हायला लागली आहेत.हे झाड सर्वांत प्रथम काटकूळं होणार आहे.भरगच्च पानांच्या झाडाला अशावेळी बोडक्या फांद्यांचं झाड पाहून मन उदास होतं.पण काय करणार निसर्गाच्या शिस्तिपुढे कुणाची बिशाद आहे?.

प्रो.देसायांबरोबरच्या तळ्यावरच्या आमच्या भेटीसुद्धा आता कमी कमी होणार आहेत. आज त्यांना भेटल्यावर मला माझी एक जुनी आठवण सांगायला विषय मिळाला.

मी भाऊसाहेबाना म्हणालो,
"ते माझ्या शाळकरी जीवनातले दिवस होते.कोकण्यातल्या पावसाने मी नेहमीच भारावून जात असतो. आणि त्या वयातही तसंच होतं.मला आठवला तो श्रावण महिन्यातला दिवस.ह्या दिवसात पाऊस सरी घेऊन येतो.कधी कधी एखादा दिवस कोरडा जातो.पण खात्री नसते.
त्या दिवशी मी बंदराच्या दिशेला असलेल्या मांडवीवर फिरायला गेलो होतो.तसे बरेच लोक तिथे फिरायला आले होते.संध्याकाळ होता होता बराच काळोख झाला होता.त्याचं मुख्य कारण आकाश ढगानी व्यापलेलं होतं.एवढा काळोख झाला की जणू काही रात्र झाली होती.आणि एकदम जोराची सर आली. सर्वजण पावसापासून आडोसा घ्यायला पळत सुटले.मी पण एका गुलमोहराच्या झाडाच्या खाली जाऊन उभा राहिलो.सर सपाट्याने आली होती.
एक सुंदर चेहर्‍याची मुलगी,पूर्ण भिजलेली,माझ्याच जवळ आसर्‍याला येऊन उभी राहिली.जवळ जवळ मला बिलगी म्हटलं तरी चालेल. माझ्या जवळ आल्यावर मला ती "हाय!" म्हणाली.
मी हसून तिच्याजवळ पाहिलं.तेव्हड्यातच त्या सरीबरोबर एक मोठी पावसाची झड येऊन सोसाट्याने वारा सुटला.वीजाही चमकल्या. ती मुलगी मला आणखी बिलगली. आणि मला हळू आवाजात "सो सॉरी" म्हणाली.
मी पुन्हा हसून तिच्याजवळ पाहिलं.तिच्या अंगात चिटाचा रंगीबेरंगी लांब बाह्यांचा ब्लाऊझ होता.तिला तो अगदी गबाळ्यासारखा दिसत होता.ती आबोली रंगाची साडी नेसली होती.ती सुद्धा गबाळ्यासारखी दिसत होती.केसामधे तिने सुरंगीचा वळेसार,वेणी, माळली होती.त्या सुरंगीच्या फुलांचा सुवास त्या कुंद वातावरणात दरवळला होता.

जशी पावसाची सर सपाट्याने आली तशीच ती झपाट्याने निघून पण गेली.पाऊस उघडला असं पाहून सर्वजण आपआपल्या मार्गाने निघून गेले.मी पण तेच केलं.दुसर्‍या दिवशी मी त्या मुलीची चौकशी केली असताना मला कळलं की ती तिच्या आजीआजोबांकडे सुट्टीत कोकणातला पाऊस पहायला आणि त्याचा आनंद लुटायला आली होती.

ती तिच्या आईवडीलांबरोबर अमेरिकेत रहायची.तिथेच तिचा जन्म झाला होता.तिच्या आजोबांनी,तिच्या लहानपणापासून तिला कोकणातल्या पावसाच्या गम्मती जम्मती सांगीतल्या होत्या.त्या प्रत्यक्ष अनुभवायला आणि आनंद लुटायला ती आली होती.असं मला कळलं.तिने जो ब्लाऊझ आणि साडी परिधान केली होती ती तिच्या मावशीची होती.सहाजीकच तिच्या त्या तरूण वयात तिला ते कपडे गबाळ्यासारखे दिसत होते.

तो कोकणातला पाऊस,तो श्रावण महिना,त्या श्रावण महिन्यातल्या सरी,ह्यांची मला कधीही आठवण आली की ही घटना आठवायची.त्या वयातल्या त्या आठवणी रोमा़ंचकारक नसल्यातर नवलच.परवा दिवशी रेडीओवर मी एक हिंदी गाणं ऐकलं आणि त्या घटनेची प्रकर्षाने आठवण आली त्या गाण्याचा मी ताबडतोब मराठीत अनुवाद केला.तो असा,

कशी मी विसरू?

अवघ्या आयुष्यात कशी मी विसरू?
ती श्रावणातली रात्र
अशाच एका अनभिज्ञ लावण्यवतिशी
झालेल्या नजरानजरीची ती रात्र
कशी मी विसरू?

अरेरे! मऊ केशपाशातून ते
ओघळणारे पाणी
फ़ुलावरून लाल गालावर ते
ओघळणारे पाणी
अंतरी करूनी झंझावात
विदारक करणारी ती रात्र
कशी मी विसरू?

विद्युलता पाहूनी भयभीत होऊनी
ते तिचे बिलगणे
आणि लज्जेने चूर होऊनी
ते सहजच चिपकणे
न पाहिली ना ऐकीली अशी
ती विक्षिप्त रात्र
कशी मी विसरू?

चिंब झालेला पदर तिने
जो लिपटलेला होता
जळजळीतसा नजरेचा बाण
जो तिने फेकला होत्ता
पेटलेल्या पाण्याला लागलेली
ती मनोभावनेची रात्र
कशी मी विसरू?

माझ्या गीतात चप्प बसणारी
ती एक तस्वीर होती
यौवनातल्या सुंदर स्वपनाची
ती एक परिणति होती
गगनातून उतरलेल्या रात्रीची
ती एक रात्र
कशी मी विसरू?

कविता सांगून झाल्यावर,प्रो.देसाई मला म्हणाले,
"तुमची कविता मला खूपच आवडली.पण तुम्हाला एक गंमत सांगतो.हे अमेरिकन्स, आनंद मनमुराद लुटतात.कोण काय म्हणतं,कोण कोण काय म्हणतं ह्याची अजिबात पर्वा करीत नाहीत.आणि त्याचं मुख्य कारण ते स्वतःवर प्रेम करतात."

मी म्हणालो,
"भाऊसाहेब,ह्या तुमच्या म्हणण्यावर मी आणखी जास्त सहमत होऊच शकत नाही"

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

प्रेमकाव्यलेख

प्रतिक्रिया

वा! साहिरच्या त्या गाण्याची आठवण आली...
'जिंदगीभर नहीं भूलेगी वो बरसात की रात...'

उगा काहितरीच's picture

19 Nov 2015 - 10:12 am | उगा काहितरीच

काही व्यक्ती , वस्तू , जागा विसरून जाणे खरंच का इतकं अवघड असते का ?
- (आठवणीत रमलेला)उगा
.
.
.
.
.
लेख आवडला हेवेसांनलगे .

भाऊंचे भाऊ's picture

19 Nov 2015 - 11:27 am | भाऊंचे भाऊ

फार लवकर लिखाण आटोपता तुम्ही. सुरेख रोमँटीक लिहता आपण.

आनंद कांबीकर's picture

19 Nov 2015 - 8:30 pm | आनंद कांबीकर

कसा मी विसरु?
असे म्हणायचे काय आपल्याला?
छान लिहिता.

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Nov 2015 - 6:59 am | श्रीकृष्ण सामंत

आभार,
(ती रात्र) कशी मी विसरू? असंच मला म्हणायचं आहे

जयन्त बा शिम्पि's picture

20 Nov 2015 - 1:56 am | जयन्त बा शिम्पि

मुळ हिंदी गाण्यात ' फुलसे गालोंपे रुकनेको , तरसता पानी ' असे शब्द आहेत, त्यामुळे भाषांतर करतांना ' फुलावरून ते लाल गालावर , ओघळणारे पाणी ' असे भरकटत गेले. ' लाल ' गाल कधी ऐकले नव्हते वा वाचले नव्हते ! ! ' गुलाबी ' गाल ऐकले होते.
काही काही वेळा , मुळचे ते मुळचे ऐकण्यातच मजा असते , उगाचच ' तोडके मोडके भाषांतर ' करुन रसिकतेला बट्टा लावू नये असे वाटते
अर्थात वाचायची सक्ती नाही असे म्हणणारे म्हणतीलही !

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Nov 2015 - 8:20 am | श्रीकृष्ण सामंत

इथे वाचा

laal laal gaal
Movie: Mr. X
Singer(s): Mohammad Rafi, Chorus
Music Director: N Dutta
Lyricist: Majrooh Sultanpuri
Actors/Actresses: Johnny Walker, Nalini Jaywant, Pran, Ashok Kumar, Leela Mishra, Nishi
Year/Decade: 1957, 1950s
Back to: main index
View: Plain Text, हिंदी Unicode, image

लाल लाल गाल, जान के हैं लागु
हो, देख देख देख, दिल पे रहे काबु
होइ, चोर चोर चोर, भाग परदेसी बाबू

चोर चोर चोर, ये नहीं हैं मालो धर के (???)
के मोड़ मोड़ मोड़ ये तो हैं दिल-ओ-जिगर के
हो, पीले पीले पीले इनके बाल हैं निराले
के नीले नीले नीले, इनके अखियों के प्याले

अजनबी पे बेधड़क खुली सड़क चलते हैं ये
चलते हैं ये जादू लाल लाल गाल
लाल लाल गाल ...

हाय हाय हाय, ये निगाहों का निशाना
वाय वाय वाय, कोई तीर खा न जाना
मान मान मान, मेरी जान मेरा कहना
इनके चाल-ढाल के खयाल में न रहना
अजनबी पे ...

फारएन्ड's picture

20 Nov 2015 - 6:40 am | फारएन्ड

ते शेवटच्या कडव्यात 'आसमानों से उतर आयी थी, जो रात की रात' आहे त्यात ते 'रात की रात' म्हणजे एक फ्रेज आहे हिन्दीतील - त्या एका रात्रीमधल्या काळातच आलेली अशा अर्थाने.