मला वाटतं.....

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
6 Sep 2008 - 7:21 am
गाभा: 

बरेच लोक आग्रह करतात की प्रत्येकाने दुसऱ्याकडे चांगल्या दृष्टीने (पॉझीटीव्ह ऍटीट्युडने) पहावं,जरी संबंध वाकडे येऊ लागले तरी ही.
हाच मार्ग प्रत्येकाला सुखी,समृद्ध करतो आणि सौष्टव देतो.पण मुद्दा असा आहे की अशा परिस्थितीला सामोरं जाता आलं नाही की मनाला जरा धक्का बसतो.
प्रथम, पाडाव होत असल्याने थोडं वाईट वाटतंच,शिवाय हंसतमुख राहून जणू काहीच झालं नाही असा दृष्टीकोन ठेवायला जरा जड जातं किंवा मन कष्टी होतं.कदाचीत प्रत्येक वेळी काहीच झालं नाही असं होतही नसेल.
मला वाटतं, एकच मार्ग बरोबर असतो, असं पत्करून ह्या जीवनातले कठिण समस्या सोडवता येणार नाहीत.

प्रत्येकाची विचारपातळी वेगळी वेगळी असते,आणि आप-आपल्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्नास अटकाव आल्यास मग ते चांगल्या दृष्टीने अथवा वाईट दृष्टीने पाहीलं तरी योग्य होईल असं नाही.
बरेच वेळा अशा दुर्धर परिस्थितीत प्रत्येकाला थोडं दुःखी कष्टी वाटतं. पण असं वाटणं म्हणजे काही मानसिक आजार नव्हे. जीवनात अडचणी येतात आणि प्रत्येक वेळी सुखी होता आलं नाही तरी ठिक आहे.

असंच एकदा एकाला ह्याचा पडतळा आला.एकदा त्याला फ्लु झाला. डोकं खूपच दुखूं लागलं,बरेच आठवडे ते राहिलं.एका न्युरॉलाजीस्टने त्याला सांगितलं की त्या थंडीच्या दिवसात ह्या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच लोकाना मेंदुच्या रोगात झाला.पण त्याला त्याने विश्वासात घेऊन सांगितलं की,
"त्यातून तू बचणार आहेस".
परंतु त्या रुग्णाला बरेच आठवडे ह्यामुळे मानसिक कष्ट झाले.त्याला वाटलं की त्याला ब्रेन ट्युमर किंवा सिझोफ्रेनीया झाला. समजुतदार व्यक्ति असून सुद्धा त्याला जमलं नाही.तो भावनाभ्रष्ट झाला होता.

नशिबानं,त्याने एका सायक्याट्रीस्ट मित्राला विचारलं,की तो खराच सिझोफ्रेनीक आहे का?.
तो म्हणाला,
"नाही,तू फक्त गोंधळला आहेस,पण कसला मानसिक रुग्ण नाहीस. तू घाबरला आहेस एव्हडंच"
तो सायक्याट्रीस्टला म्हणाला,
" माझे दोन मित्र मला आनंदी राहण्याचा आग्रह करतात.मी एक आठवडा तसा राहण्याचा प्रयत्न केला.पण त्याने उलट मी जास्त दुःखी झालो."
तो त्यावर म्हणाला,
"तू तुझ्या मित्रांना सांग,मी जास्त आनंदी राहावं असं मला वाटतं, पण सध्या आनंदी राहायलाच मी घाबरलो आहे.माझं हे घाबरणं नाहीसं झालं की मी तुम्हाला सांगीन."

असा निरोप दिल्यावर त्याला जरा बरं वाटलं.त्याने त्याचाच मार्ग पत्करल्याने त्याला बरं वाटू लागलं.त्याचा गोंधळ त्याने त्याच्याच मार्गाने सोडवत गेल्याने त्याला असं दिसून आलं की नेहमीच माणसाने चांगला दृष्टीकोन ठेवून राहिलं पाहीजे, ह्या कल्पनेनेच तो घाबरला होता.
तात्पर्य काय तर ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या सारखं असावं.

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

रेवती's picture

6 Sep 2008 - 7:56 am | रेवती

आपण वयाच्या पंचाहत्तरीत देखील उत्साहाने लिहीत असता व आपल्या अनुभवाचा फायदा नव्या पिढीला करून देत असता. प्रत्येकवेळी सकारात्मकच प्रतिसाद येत असतील असे नाही पण आपण लिहीणे सोडले नाहीत. आपले आभार.
आपण आपल्यासारखेच असले म्हणजे किती ताण कमी होतात हे माहीत होतेच पण पुन्हा वाचून बरे वाटले.
रेवती

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Sep 2008 - 1:47 am | श्रीकृष्ण सामंत

रेवतीजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
" आपण वयाच्या पंचाहत्तरीत देखील उत्साहाने लिहीत असता "
हे आपलं म्हणणं वाचून आनंद होतो.खरं सांगायचं झालं तर,वय वाढत जाणं हे कुणाचाही कंन्ट्रोल मधे नसतं पण मन मात्र बदलत्या जमान्याच्या लहरीवर (इथं मी "लहर" दोन अर्थाने म्हणत आहे एक "एकाच वेव्हलेन्थवर " म्हणून आणि दुसरं जमान्याच्या "मुड" वर म्हणून) ठेवणं हे मात्र ज्याच्या त्याच्या कंन्ट्रोल मधे नक्कीच असतं.
मिसळपावावर वीस बावीस पासून पन्नास पंचावन्न वयाचे वाचक अनेक आहेत.माझ्या सारखं एखादंच "केवड्याचं फूल" पंचाहत्तर वयाचं अपवादाने दिसेल.
पण ह्या सर्वांबरोबर हातात हात घालून चालायचं असेल तर मला त्यांच्या सारखं "मनाने " रहाणं जरूरीचं आहे नव्हे काय?.आणि असं रहाणं मला खूप आवडतं.
आपण अभ्यासू वृत्तीने केलेल्य़ा ह्या आकलना बद्दल -comprehension- बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

उद्वेग's picture

9 Sep 2008 - 11:51 pm | उद्वेग

सामंतजी,
आपल्याला रेवतीजीं ची प्रतिक्रिया आवडली हे वाचुन आनंद वाटला.

उद्वेग.

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 8:44 am | विसोबा खेचर

श्रीकृष्णराव,

प्रकटन, विचारमंथन आवडले!

तात्पर्य काय तर ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या सारखं असावं.

हे मात्र अगदी खरं! :)

आपला,
(मी माझ्याचसारखा!) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Sep 2008 - 1:50 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्या प्ररिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

उद्वेग's picture

9 Sep 2008 - 11:53 pm | उद्वेग

सामंतजी,
आपण तात्यांचे आभार मानलेत त्याबद्दल आम्हि आपले आभारी आहोत.

उद्वेग.

पांथस्थ's picture

6 Sep 2008 - 1:54 pm | पांथस्थ

थोडक्यात काय तर माणसाने 'सहज' असावे. वर म्हटल्या प्रमाणे अनेक प्रसंगी माणसाला दुःख होणे स्वाभाविक असते...अश्या प्रसंगी मी दुःखी नाही किंवा मला दुःख होउच शकत नाहि असा विचार करणे अथवा वागणे म्हणजे स्वत:ला भ्रमात ठेवण्यासारखे आहे....ह्यात मनाची व्दिधा अवस्था होते...समोर तर दु:ख्/प्राप्य परिस्थिती आ वासुन उभी आहे आणि मालक म्हणतात असे काहि नाहि...नेमके काय करावे बुवा?

त्यापेक्षा समोर आलेल्या परिस्थितीचा स्वीकार केला तर मनाची तयारी होते...त्यातुन बाहेर येण्यासाठी प्रयन्त करणे सोपे जाते...बाहेर पडणे शक्य नसेल तर सहन करण्याची शक्ति मिळु शकते...

मिपाकर काय म्हणता?

(परिस्थितीचा स्वीकार करायचा प्रयत्न करणारा) पांथस्थ...

(तळटिपः स्विकार करणे म्हणजे शरण जाणे नव्हे हे इथे स्पष्ट करु इच्छितो...)

राघव's picture

9 Sep 2008 - 12:54 pm | राघव

छान लिहिलेत आबा!
तुम्ही म्हणता ते खरंय. प्रत्येकाची विचारपद्धती वेगवेगळी असते. त्यामुळे जे एखादा सहज करेल ते दुसर्‍यास सहजपणे जमेलच असे नाही.
ज्याने त्याने स्वत:सारखे असावे याचे आणखी विश्लेषण करायचे झाले तर -
माझ्यामते जेव्हा आपल्याला मनापासून एखादी भूमिका पटते तेव्हाच तिची अंमलबजावणी शक्य होते. आता हे पटवून घेण्याचे काम प्रत्येकजण स्वत:च्या मनाच्या लवचिकतेनुसार करत असतो, स्वत:शिवाय दुसरा कुणीही त्याला पटवून देवू शकत नाही. प्रत्येकाच्या मनाची जडण-घडण कशी त्यावर त्याची-त्याची लवचिकता अवलंबून असते. ज्याला लवकर पटते तो ती भूमिका लवकर आत्मसात करण्याचा प्रयत्न करू शकतो. येथे जबरदस्ती झाली, विचार थोपवणे झाले की मनाचा गोंधळ उडतो अन् व्यक्ती ते आत्मसात करू शकत नाही. त्यातूनच पुढे न्यूनगंड, नैराश्य अशा अवस्था येतात.
म्हणून तुम्ही म्हणता ते योग्यच "ज्याने त्याने स्वत:सारखे असावे". :)

(समजून घेणारा) मुमुक्षू

श्रीकृष्ण सामंत's picture

9 Sep 2008 - 7:34 pm | श्रीकृष्ण सामंत

मुमुक्षूजी,
आपली प्रतिक्रिया आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

उद्वेग's picture

9 Sep 2008 - 11:55 pm | उद्वेग

सामंतजी,
आपणास मुमुक्षु ह्यांची प्रतिक्रिया आवडली हे वाचुन आनंद झाला.

उद्वेग.

शिवा जमदाडे's picture

9 Sep 2008 - 3:26 pm | शिवा जमदाडे

लेखन आवडले.
वाहत्या पाण्याला उगाचच अडविण्याच्या भानगडीत पडू नये.

- शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

श्रीकृष्ण सामंत's picture

9 Sep 2008 - 7:35 pm | श्रीकृष्ण सामंत

शिवा जमदाडेजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

उद्वेग's picture

9 Sep 2008 - 11:57 pm | उद्वेग

सामंतजी,
आपण जमदाडे ह्यांचे आभार मानलेले पाहुन आम्ही आपले आभारी आहोत.

उद्वेग.

प्राजु's picture

9 Sep 2008 - 10:43 pm | प्राजु

सहज वागावे.. ओढून ताणून मन आनंदी किंवा दु:खी ठेवण्याच्या प्रयत्नात आपण आपले जगणेच गमावून बसतो.संदेश छान दिला आहे काका.
लेखन आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

9 Sep 2008 - 10:53 pm | श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

उद्वेग's picture

9 Sep 2008 - 11:59 pm | उद्वेग

सामंतजी,
आपण प्राजु ह्यांचे आभार मानलेले पाहुन आम्ही आपले आभारी आहोत.

उद्वेग.

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Sep 2008 - 10:24 pm | श्रीकृष्ण सामंत

उद्वेगजी,
जमदाडे,प्राजु,मुमुक्षु यांच्या प्रतिक्रिये बद्दल मी त्यांचे आभार मानले या बद्दल आपण माझे आभार पुनरपी का मानता.
खरंच मी आभार मानतो याचा आपल्याला "उद्वेग" येतो का? आणि तसं असेल तर तो का?
थोडं कुतुहल वाटतं म्हणून विचारतो एव्हडंच
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com