बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
7 Nov 2015 - 5:48 pm
गाभा: 

बिहार विधानसभा निवडणुक-२०१५ ची मतमोजणी उद्या रविवार ८ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे.निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने चर्चा या धाग्यावर करावी ही विनंती. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. सव्वाआठपर्यंत पहिले कल हाती येतील अशी अपेक्षा आहे.

गॅरी ट्रुमन

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2015 - 8:56 pm | श्रीगुरुजी

संदर्भासाठी व तुलनेसाठी वेगवेगळ्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष -

(१) अ‍ॅक्सिस : भाजप+ ६४, संजद+ १७६
(२) न्यूज एक्स : भाजप+ ९३, संजद+ १३२
(३) सीएनक्स : भाजप+ ९५, संजद+ १३५
(४) एबीपी न्यूज-नेल्सन : भाजप+ १०८, संजद+ १३०
(५) इंडिया टीव्ही-सी व्होटर : भाजप+ १११, संजद+ १२२
(६) न्यूज नेशन : भाजप+ ११७, संजद+ १२२
(७) इंडिया टुडे-सिसेरो : भाजप+ ११९, संजद+ ११७
(८) एनडीटीव्ही : भाजप+ १२५, संजद+ ११०
(९) न्युज २४-चाणक्य : भाजप+ १५५, संजद+ ८३
(१०) इंडिअन एक्स्प्रेस ने जागांचा अंदाज न देता भाजप+ ला ३८% मते व संजद+ ला ४२% मते असा अंदाज दिला आहे.

वरील ९ सर्वेक्षणानुसार भाजप+ ला ६४ ते १५५ व संजद+ ला ८३ ते १७६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

भाजप+ साठी मेडिअन जागा १११ व संजद+ साठी १२२ आहेत.

भाजप+ चा सरासरी अंदाज १०९ ते ११० जागा आहेत, तर संजद+ ची सरासरी १२५ ते १२६ आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2015 - 8:51 pm | श्रीगुरुजी

७ तारखेला संध्याकाळी उशीरा झी न्यूज ने आपले आकडे जाहीर केले. त्यांच्या अंदाजानुसार भाजप+ १३८ व संजद+ १०२ अशी स्थिती असणार होती.

७ तारखेच्याच इंडिअन एक्स्प्रेस मध्ये सुरजित भल्लांनी लेख लिहून भाजप+ ६० व संजद+ १७५ असा अंदाज दिला होता.

७ तारखेपर्यंत एकूण १० एक्झिट पोल्स व १ व्यक्तिगत अंदाज प्रसिद्ध झाले होते. त्यापैकी फक्त अ‍ॅक्सिसचा एक्झिट पोल व सुरजित भल्लांचा व्यक्तिगत अंदाज अचूक ठरला. उर्वरीत ९ एक्झिट पोल्स पूर्ण चुकले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी असेच सर्व अंदाज चुकले होते.

यापुढील निवडणुकीत कोणत्याही ओपिनिअन व एक्झिट पोल्सवर विश्वास ठेवायचे नाही असे ठरविले आहे.

या पोल्स मुळे उत्सुकता राहिली नाहीय.
निकालाचे पुढे परिणाम काय होतात हे आता महत्वाचे!

भुमन्यु's picture

8 Nov 2015 - 6:11 am | भुमन्यु

परत जंगलराज न येवो हिच बिहार साठी सदिच्छा

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:01 am | गॅरी ट्रुमन

मतमोजणी सुरू झाली आहे. पहिले कल अजून १०-१५ मिनिटांमध्ये हाती येतील अशी अपेक्षा आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:11 am | गॅरी ट्रुमन

पहिला कल भागलपूरमधून आला आहे. भाजप आघाडीवर आहे. २०१० मध्येही भाजपने ही जागा जिंकली होती.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:12 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: २
भाजप आघाडी: २ (+१)
संजद आघाडी: ० (-१)
इतर: ०

पासवानांचे बंधू पशुपती कुमार पारस अलौलीमधून आघाडीवर. मागच्या वेळी ही जागा राजदकडे होती.

योगी९००'s picture

8 Nov 2015 - 8:16 am | योगी९००

चला..सुरुवात तर चांगली झाली..!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Nov 2015 - 9:18 am | कैलासवासी सोन्याबापु

मागच्या वेळेस ही जागा राजद नाही तर जदयू कड़े होती अन माजी आमदार श्री रामचंद्र सदा हे होते अशी एक दुरुस्ती सुचवतो

(इलेक्शन ड्यूटी इकडे अलौली मधे लागल्यामुळे हे कन्फर्म आहे)

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:18 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: ५
भाजप आघाडी: ३ (+२)
संजद आघाडी: २ (-२)
इतर: ०

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

तारापूर मतदारसंघातून जितनराम मांझींच्या पक्षाचे (हामचे) शकुनी चौधरी आघाडीवर. मागच्यावेळी ही जागा संजदने जिंकली होती.
रफिगंजमधून आणि दिनारामधून संजद आघाडीवर. २०१० मध्ये या जागा संजदनेच जिंकल्या होत्या.

बोका-ए-आझम's picture

8 Nov 2015 - 8:18 am | बोका-ए-आझम

पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार हे पोस्टल बॅलट आहे आणि ते बहुतेक करुन उच्च जातींच्या लोकांनी दिलेल्या मतांवर अवलंबून असतं.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:20 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: १०
भाजप आघाडी: ६ (+२)
संजद आघाडी: ४ (-२)
इतर: ०

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

नोखामधून, गया शहरमधून भाजप आघाडीवर. मखदुमपूरमधून हाम आघाडीवर.
हरनौतमधून संजद आघाडीवर. इथून १९९५ मध्ये नितीशकुमार विजयी झाले होते.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:26 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: १५
भाजप आघाडी: ९ (+१)
संजद आघाडी: ६ (-१)
इतर: ०

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

जितनराम मांझी मखदुमपूरमधून आघाडीवर. लालूपुत्र तेजस्वी यादव राघोपूरमधून आघाडीवर.

गोपालगंजमध्ये भाजप आघाडीवर. हे जरा अनपेक्षित आहे. गोपालगंजमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्यांक मतदार आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:30 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: २१
भाजप आघाडी: १३ (+३)
संजद आघाडी: ८ (-३)
इतर: ०

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

पटना साहिबमधून भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव आघाडीवर. दरभंगामधून भाजप आघाडीवर. बचाहामधून संजदचे ज्येष्ठ नेते रमाई राम आघाडीवर.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:33 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: २५
भाजप आघाडी: १५ (+२)
संजद आघाडी: १० (-२)
इतर: ०

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

पटना साहिबमधून भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव आघाडीवर. दरभंगामधून भाजप आघाडीवर. बचाहामधून संजदचे ज्येष्ठ नेते रमाई राम आघाडीवर. कहलगावमधून कॉंग्रेस नेते सदानंदसिंग आघाडीवर.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:45 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: ४०
भाजप आघाडी: २७ (+७)
संजद आघाडी: १३ (-६)
इतर: ० (-१)

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक
भाजपने असेच मोमेन्टम ठेवले तर चांगले होईल.

बांकीपूरमधून भाजप आघाडीवर. या जागेवर कॉंग्रेसचा उमेदवार आहे आणि या जागेवर कॉंग्रेसचा उमेदवार असल्याबद्दलचे मी आश्चर्य मिपावरच व्यक्त केले होते.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:50 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: ६७
भाजप आघाडी: ४३ (+१४)
संजद आघाडी: २३ (-१४)
इतर: १ (०)

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

भाजपने आता चांगलीच आघाडी घेतलेली दिसत आहे. पहिल्या आणि पाचव्या फेजमधील जागा भाजपला सगळ्यात जड जातील असे म्हटले जात होते. पण सध्या पहिल्या फेजमधील १० पैकी ८ जागी भाजप आघाडीवर आहे. तर फेज ५ मध्ये १२ पैकी ६ जागांवर दोन्ही भाजप आणि संजद आघाडीवर आहे. चौथ्या फेजमध्ये भाजपला फायदा होईल असे म्हटले जात होते तसे होताना दिसत आहे.

संजद आघाडीमध्ये राजदपेक्षा संजदला मोठा झटका बसताना दिसत आहे. लालूंबरोबर हातमिळवणी करायची शिक्षा मतदारांनी नितीशकुमारांनी दिइली असे सध्याचे चित्र आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:54 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: ८६
भाजप आघाडी: ५६ (+२२)
संजद आघाडी: २८ (-२२)
इतर: २ (०)

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

भाजपने आता चांगलीच आघाडी घेतलेली दिसत आहे. हे कल कायम राहिले तर भाजप आघाडी ही निवडणुक जिंकेल असे म्हणायला हरकत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:00 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: १०२
भाजप आघाडी: ६५ (+२४)
संजद आघाडी: ३४ (-२५)
इतर: ३ (१)

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

हे कल कायम राहिले तर भाजप आघाडी १५० पर्यंत जागा मिळवू शकेल. नितीशकुमारांना लालूंबरोबर हातमिळवणी केल्याचा पश्चात्ताप होईल असे दिसते.

पैसा's picture

8 Nov 2015 - 9:06 am | पैसा

पश्चात्ताप वगैरे आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी असतो!

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Nov 2015 - 9:20 am | कैलासवासी सोन्याबापु

पश्चाताप होणारच गो ताय घरचे होते थोड़े अन जावयाने पाठवले घोड़े असली गत नितीश कुमार ह्यांनी स्वहस्ते करून घेतली आहे

पैसा's picture

8 Nov 2015 - 9:38 am | पैसा

=))

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:06 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: ११५
भाजप आघाडी: ७३ (+२६)
संजद आघाडी: ३८ (-२८)
इतर: ४ (२)

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक
इतर कोण आहेत हे अजून समजलेले नाही. त्यात ओवेसी आणि पप्पू यादवला आघाडी आहे का हे बघणे इंटरेस्टींग ठरेल.

सिद्धार्थ ४'s picture

8 Nov 2015 - 9:09 am | सिद्धार्थ ४

शिवसेना ह्या पूर्ण पिच्तर मद्धे कुठे आहे?

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Nov 2015 - 9:21 am | कैलासवासी सोन्याबापु

कागदावर!

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:26 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: १४३
भाजप आघाडी: ९० (+२९)
संजद आघाडी: ५८ (-३१)
इतर: ५ (२)

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:28 am | गॅरी ट्रुमन

हे कल १५३ जागांवरील आहेत. १४३ नव्हे.

योगी९००'s picture

8 Nov 2015 - 9:30 am | योगी९००

मटा वर बीजेपी ९० आघाडी पण संजद्+राजद १०४ वर आघाडीवर दाखवत आहेत. एनडीटीव्हीवर वेगळ्याच फिगर आहेत...कोठे पहाता हा कल?

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:32 am | गॅरी ट्रुमन

मी एन.डी.टि.व्ही वर बघत आहे. अनुभव लक्षात घेता सगळ्यात लेटेस्ट आकडे एन.डी.टि.व्ही वर असतात.

सिद्धार्थ ४'s picture

8 Nov 2015 - 9:38 am | सिद्धार्थ ४

सगळीकडे महा आघाडी पुढे आहे. तुम्ही कुठे हे निकाल बघत आहात ?

योगी९००'s picture

8 Nov 2015 - 9:33 am | योगी९००

स्टार माझावर तर बीजेपी ७९ आणि जद+ ७३ दाखवत आहेत...

नक्की कोठला बरोबर मानायचा?

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:31 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: १६०
भाजप आघाडी: ९४ (+२८)
संजद आघाडी: ६४ (-२९)
इतर: ४ (१)

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

भाजप आघाडीचे मोमेन्टम थोडे कमी झाल्यासारखे वाटत आहे. बहुमत मिळायला अडचण नसावी. पण कदाचित १५० जागा मिळविणे कठिण जाईल तर गाडी १३५-१४० पर्यंत जाईल असे वाटते.

अर्धवटराव's picture

8 Nov 2015 - 9:32 am | अर्धवटराव

एकुण कल : १५६
एनडीए - ७२
महाआघाडी - ७९
इतर - ५

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:34 am | गॅरी ट्रुमन

दोन ठिकाणी इतका फरक म्हणजे कमाल आहे. तरीही सकाळपेक्षा (निदान आकड्यांच्या बाबतीत) एन.डी.टी.व्ही अधिक विश्वासार्ह वाटते.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:35 am | गॅरी ट्रुमन

आय.बी.एन लाईव्हवरही वेगळे आकडे दाखवत आहेत. संजद थोडे आघाडीवर दाखवत आहेत. नक्की काय चालू आहे हे समजत नाही.

पैसा's picture

8 Nov 2015 - 9:36 am | पैसा

=)) सकाळ कोणाचे आहे ते आठवा ना!

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:43 am | गॅरी ट्रुमन

सगळा प्रकार गोंधळाचा वाटत आहे.

एन.डी.टी.व्ही वर भाजप १०३, संजद ६८ दाखवत आहेत.
आय.बी.एन वर संजद १०६, भाजप ९० दाखवत आहेत.

असा फरक एक्झिट पोलमध्ये बघितला होता. प्रत्यक्ष मतमोजणीतही असा फरक आश्चर्यकारक आहे :)

काकासाहेब केंजळे's picture

8 Nov 2015 - 9:45 am | काकासाहेब केंजळे

नक्की काय चालू आहे कळत नाहीए,कुणी म्हणते भाजप पिछाड्वर आहे ,न्युज चॲनल वेगळेच कल दाखवत आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:50 am | गॅरी ट्रुमन

आय.बी.एन वर तर महागठबंधनला १२१ जागांवर आघाडी--- म्हणजे जवळपास बहुमत दाखवत आहेत. असा गोंधळ मतमोजणीच्या वेळी कधीच बघितला नव्हता.

आतिवास's picture

8 Nov 2015 - 9:54 am | आतिवास

Parties Won Leading
BJP + ((LJP, HAM, RLSP) - 104
JD(U), RJD, INC + - 71
Others (SP, JAP, AIMIM) - 4 (Source: TV reports ) - ९.३८ अं

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 9:57 am | गॅरी ट्रुमन

आताच एन.डी.टी.व्ही वर ऐकले लोकसभा टिव्ही भाजप आघाडीवर दाखवत आहेत तर राज्यसभा टिव्हीवर महागठबंधन आघाडीवर आहे असे दाखवत आहेत. कमाल आहे.

एक्झिट पोल्सप्रमाणेच प्रत्यक्ष मतमोजणीवरही विश्वास उडाला असे म्हणायचे का? :)

काकासाहेब केंजळे's picture

8 Nov 2015 - 10:03 am | काकासाहेब केंजळे

आज तक
बिजेपी १०१,जेडीयू ९७, अन्य ०७ , १०.०५ मिनिटापर्यंत.

कपिलमुनी's picture

8 Nov 2015 - 10:06 am | कपिलमुनी

प्रतेक ,news channel खाल्या अन्नाला जागुन आपापल्या मालकांची आघाडी दाखवत आहे

काकासाहेब केंजळे's picture

8 Nov 2015 - 10:09 am | काकासाहेब केंजळे

Result Status
Status Known For 68 out of 243 Constituencies
Party
Won
Leading
Total
Bharatiya Janata Party
0
23
23
Indian National Congress
0
4
4
Janata Dal (United)
0
11
11
Lok Jan Shakti Party
0
1
1
Rashtriya Janata Dal
0
23
23
Rashtriya Lok Samta Party
0
1
1
Hindustani Awam Morcha (Secular)
0
2
2
Independent
0
3
3
Total
0
68
68
इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरुन साभार

अविनाशकुलकर्णी's picture

8 Nov 2015 - 10:13 am | अविनाशकुलकर्णी

भाजप खतरे मे शरद यादव बोल रहे १५०+

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 10:15 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: २२७
भाजप आघाडी: १०५ (+१७)
संजद आघाडी: ११५ (-१७)
इतर: ७ (०)

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

सिद्धार्थ ४'s picture

8 Nov 2015 - 10:23 am | सिद्धार्थ ४

हारली बि जे पी

कपिलमुनी's picture

8 Nov 2015 - 10:24 am | कपिलमुनी

फरक ( jdu + bjp )- jdu+ असा आहे का ?

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 10:29 am | गॅरी ट्रुमन

हा फरक त्या त्या पक्षांना २०१० च्या तुलनेत मिळालेल्या जागांच्या तुलनेत आहे. म्हणजे भाजप आघाडीचा फरक भाजप+लोजप ला २०१० मध्ये मिळाल्या होत्या त्या तुलनेत तर संजद आघाडीचा फरक संजद+राजद+काँग्रेस या पक्षांना २०१० मध्ये मिळालेल्या जागांच्या तुलनेत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 10:24 am | गॅरी ट्रुमन

कल उपलब्ध: २३१
भाजप आघाडी: १०१ (+१०)
संजद आघाडी: १२४ (-११)
इतर: ८ (१)

कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

नितीशकुमार आणि लालूंच्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत हे बघायला हवे. नितीशकुमार मुख्यमंत्री होणार असे दिसते.

मी १९८९ पासून प्रत्येक महत्वाची निवडणुक अगदी भक्तीभावाने फॉलो केली आहे. सुरवातीला आघाडीवर असलेला पक्ष इतका मागे जाणे असे आतापर्यंत झालेले नाही. हा प्रकार अगदीच धक्कादायक दिसतो. बहुदा एन.डी.टी.व्ही आणि इतरांनी आकड्यांची खात्री न करताच उत्साहात आकडे रिपोर्ट केलेले दिसतात.

आर जे डी पुढे आहे असे म्हणतात, जे डी यू पेक्षा.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 10:54 am | गॅरी ट्रुमन

आर जे डी पुढे आहे असे म्हणतात, जे डी यू पेक्षा.

उत्तम. मला भाजप जिंकायलाच हवा होता. तो माझा नक्कीच पहिला चॉईस होता. त्यानंतर दुसरा चॉईस होता नितीशकुमारांपेक्षा लालूला जास्त जागा मिळणे आणि लालूने नितीशपुढे नंतर अडचणी निर्माण करणे. पहिला चॉईस नाही तरी दुसरा चॉईस पूर्ण होत असेल तर पहिला चॉईस पूर्ण झाला नाही याचे दु:ख थोडेतरी कमी होईल :)

बोका-ए-आझम's picture

8 Nov 2015 - 11:05 am | बोका-ए-आझम

तर नितीशकुमारांपुढच्या अडचणी वाढणारच आहेत आणि आता जर भाजपचं सरकार येत नसेल आणि राजदच्या भ्रष्ट लोकांना केवळ जातीच्या आधारावर बिहारची जनता मतं देणार असेल, तर बिहार परत जंगलराजच्या दिशेने जाणार हे अटळ आहे. लालूंचं पुनरूज्जीवन करण्याची मोठी किंमत नितीशकुमारना चुकवावी लागेल आणि दुर्दैवाने प्रादेशिक पक्ष परत राजकारणात शिरजोर होतील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Nov 2015 - 10:30 am | कैलासवासी सोन्याबापु

अहो हे फर्स्ट राउंड चे ट्रेंड आहेत मोजणीच्या अजुन होऊ दे पिक्चर क्लियर दीड दोन पर्यंत क्लियर होईल चित्र

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 10:32 am | गॅरी ट्रुमन

अरे बापरे. म्हणजे छत्तिसगडच्या निवडणुकांची आठवण करून देणार का या निवडणुका? :)

मराठी वाहीन्यांवर विश्वास ठेउ नका. कल्याण डोबीवलीमधे खूप गोंधळ घातला होता. त्यांना जो पक्ष जिंकावासा वाटतोय त्यांना ते पुढे दाखवतात, आणि फुकाच्या चर्चा करतात.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 10:40 am | गॅरी ट्रुमन

आय.बी.एन वर संजदला १५५ तर भाजपला ७९ जागांवर आघाडी दाखवत आहेत.

काकासाहेब केंजळे's picture

8 Nov 2015 - 10:47 am | काकासाहेब केंजळे

भाजप हरलेला आहे, ९० जागा येतील.वाचाळविरांना न आवरण्याची किंमत मोदिंना मोजावी लागली.अमित शाह काहीही चमत्कार करु शकतो हा भक्तांचा फाजिल विश्वास दिल्ली व आता बिहारमध्ये लागलेल्या निकालाने गळून पडायला हरकत नाही.दिल्ली व बिहारचे निकाल भाजपला वेसन घालायचे काम करतील यात शंका नाही.एकंदर देशातली जनता हुशार आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 10:58 am | गॅरी ट्रुमन

या पराभवामुळे मोदींची पकड ढिली झाली आहे असे चित्र नक्कीच उभे राहिल. यानंतर मे २०१६ मध्ये तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आसामात भाजपला थोडीफार कामगिरी करता येईल.पण तरीही आसामात भाजपला बहुमत मिळेल असे वाटत नाही.इतर राज्यांमध्ये भाजपला विशेष स्थान नाही.त्यानंतर महत्वाच्या निवडणुका आहेत मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये. उत्तर प्रदेशात साक्षी महाराज, संगीत सोम, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्यांनी बेताल बडबड करून पक्षापुढे अडचणी निर्माण करून केल्या आहेत. उत्तर प्रदेश जिंकणे भाजपला नक्कीच कठिण आहे.उत्तर प्रदेश हरल्यास उत्तराखंड, गोवा जिंकल्यास त्याचा फार उपयोग होणार नाही. एकूणच मोदींनी कोर्स करेक्शन केले नाही तर २०१९ मध्ये मोदी परत निवडून येणे फारच कठिण आहे. सगळ्यात पहिले मोदींनी या वाचाळवीरांना वेसण घालायला हवी. काही लोकांना हाकलून द्यायचे धैर्य मोदींनी दाखवले पाहिजे. आणि ज्या लोकांना मोदींनी हाकलून द्यावे असे मला फार फार वाटते त्यात मोहन भागवतांचा नंबर सगळ्यात पहिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत अडाण्यासारखे विधान करणे अगदीच अक्षम्य आहे.आम्ही तेवढे नितीमान आणि बाकी सगळ्यांचे पाय मातीचे हा होलिअर दॅन दाऊ ऍटिट्यूड असतो ते सगळेच लोक प्रचंड डोक्यात जातात. मग ते केजरीवाल असोत की मोहन भागवत असोत.

२०१९ ला अजून भरपूर वेळ आहे, तो पर्यंत लोक अनेक गोष्टी विसरतील. मे बी this exercise is just to test the waters? It is less risky to try out things now than in 2019, isn't it? जस्ट एक शक्यता. मे बी तोच खरा अजेंडा असेल बीजेपीचा? त्या मुळे हे वाचाळवीर सध्यातरी शांत होतील असे वाटत नाही

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 11:18 am | गॅरी ट्रुमन

त्या मुळे हे वाचाळवीर सध्यातरी शांत होतील असे वाटत नाही

शक्यता आहे. आणि त्याचे परिणाम भोगायची तयारीही भाजपने ठेवली पाहिजे.

भास्कर केन्डे's picture

10 Mar 2017 - 11:32 pm | भास्कर केन्डे

"आणि ज्या लोकांना मोदींनी हाकलून द्यावे असे मला फार फार वाटते त्यात मोहन भागवतांचा नंबर सगळ्यात पहिला आहे. "
-- उद्या म्हणाल मोदींनी कराताला डाव्या अघाडीतून हकलून द्यावे. पण त्या संस्थेवर ना भाजपाचे शासन ना ती सरकारी संस्था... तेव्हा ते कसे शक्य आहे? तसेच मोदी यांना संघाचा प्रमुख बदलाता येणे शक्य नाही.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 11:01 am | गॅरी ट्रुमन

दुसरे म्हणजे पराभवाची जबाबदारी मोदी आणि शहांनी स्वत: घ्यायला हवी. कॉंग्रेसमध्ये विजय झाल्यास त्याचे श्रेय गांधी घराण्यातील मंडळींचे आणि पराभव झाल्यास त्याचा दोष इतरांचा असे चित्र असते तसे व्हायला नको. दिल्ली निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा पराभव होऊनही मोदी आणि शहांनी पराभवाची जबाबदारी आपली हे जाहिरपणे म्हटले नव्हते.

कपिलमुनी's picture

8 Nov 2015 - 11:28 am | कपिलमुनी

This makes you different from Bhakt

भाजपने वृत्त वाहिन्याकडे फटाक्यांचे पैसे परत मागावेत.
- ओमार अब्दुल्लाह

योगी९००'s picture

8 Nov 2015 - 11:02 am | योगी९००

नितिश जिंकुन सुद्दा हरलेत आणि भाजप हरून हरलाच...सगळ्यात फायदा म्हणजे लालूसारख्या माकडाचा जो जिंकून जि़ंकलाच. मोदींना पुढील दिवस खडतर आहेत.

याॅर्कर's picture

8 Nov 2015 - 11:08 am | याॅर्कर

सकाळी 9.30 चे ट्रेंड बघता भाजप+ वाढून येईल असे वाटले होते.
पण आता शक्यता वाटत नाही भाजपची.
जरासंध(मगध)आणि कर्णाने(अंग) जातीयवाद्यांचा पराभव केला.

.
.
.
.म्हणजे मगध आणि अंग या भागातून संजदला मोठे बळ मिळाले.
(बिहार मे बहार हो, नितेशे कुमार हो)

प्यारे१'s picture

8 Nov 2015 - 11:23 am | प्यारे१

हम तो कबइ से कह रहा हूँ नितिसै ही जीतेगा. ससुरा लल्लन पूरा का पूरा राबडी निगल लिया क मीना

कपिलमुनी's picture

8 Nov 2015 - 11:27 am | कपिलमुनी

आता कोलांट्या उड्या , शब्दांचा भुलभलैया , आकड्यांची फिरवाफिरवी , पूर्वीपेक्षा कामगिरी सुधारली हे सांगायचा आटापिटा बघायला मजा येईल

प्यारे१'s picture

8 Nov 2015 - 11:30 am | प्यारे१

त्यांना मिपावर घ्या.
राममाधव, शाहनवाझ हुसैन वगैरे कोण कोण आहेत ते.
संजय राऊत 'ये मोदी की हार है' म्हणून कांडका पाडलेत.

कपिलमुनी's picture

8 Nov 2015 - 11:34 am | कपिलमुनी

राममाधव, शाहनवाझ हुसैन वगैरे कोण कोण आहेत ते.

मिपावर त्यांच्यापेक्षा कडवे आहेत .
फक्त मज्जा बघा

तिमा's picture

8 Nov 2015 - 11:47 am | तिमा

भाजपाचे बिहारमधे वस्त्रहरण झाले आहे. सत्ता हातात आल्यावर माणसांनी माकडांच्या बाबतीत केलेल्या सर्व म्हणी यांनी खर्‍या करुन दाखवल्या. आचरट विधाने करणार्‍यांना न रोखणे आणि प्रत्येक अप्रिय घटनेवर मोदींनी मौन बाळगणे, चांगलेच अंगाशी आले आहे. यातून धडा घेतील तर ते भाजपा कसले? भाजपाने सुवर्णसंंधी गमावली आहे.

एकंदरीत भाजपाने ही निवडणुक गमावली आणि बिहार पुन्हा पाच वर्षासाठी नितीशकुमार यांच्या हातात गेला. त्यातही नवीन बदल म्हणजे लालु यादवांच्या जागा नितीश पेक्षा जास्त दिसतात. अंतिम निकालानंतर हे नक्की होईल. पण आता पुन्हा निधर्मी, डावे आणि संघ, हिंदुत्ववादी यांच्यात टक्करी वाढतील. कारण हा बिहारचा विजय नितीश, लालु, काँग्रेस यांच्यासाठी सलाईनचे (मराठी शब्द ?) काम करणार. भावी काळ धामधुमीचा ठरणार.

लाल टोपी's picture

8 Nov 2015 - 11:56 am | लाल टोपी

लालूंची पार्टी ७२ जागी आघाडीवर एक क्रमा़काचा पक्ष नितीश यांच्या पार्टीच्या पुढे..

काकासाहेब केंजळे's picture

8 Nov 2015 - 11:57 am | काकासाहेब केंजळे

आमचे श्रीगुरुजी काय फिरकले णॉय बॉ परत इकडे!!!!

अविनाशकुलकर्णी's picture

8 Nov 2015 - 12:03 pm | अविनाशकुलकर्णी

नितिश २०१९ पी एम उमिदवार

कपिलमुनी's picture

8 Nov 2015 - 12:20 pm | कपिलमुनी

२०१९ पर्यंत सीएम राहीले तरी खूप आहे

मोगा's picture

8 Nov 2015 - 12:17 pm | मोगा

..

मोगा's picture

8 Nov 2015 - 12:31 pm | मोगा

एका बलीप्रतिपदेला एका लबाड वामनाने सज्जन बळीराजाला जमिनीत गाडले होते.

या बलीप्रतिपदेला लोक शहाणे झाले म्हणायचे.

......

गुर्जी लाडू खायला गेले वाटतं.

....

भाजपच्या कार्यकर्त्यांचे चेहरे उतरले आणि सगळे कार्यकर्ते गुलाल झटकून आपापल्या घरी परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आता १०० किलोची ऑर्डर रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे.

आजचा मटा...

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 12:57 pm | गॅरी ट्रुमन

या बलीप्रतिपदेला लोक शहाणे झाले म्हणायचे.

लोक शहाणे होणे म्हणजे काय हो मोगा?हे लिहिताक्षणी महागठबंधन १५७ जागांवर आघाडीवर आहे त्यात राजद ७४ जागी आणि नितीश ६७ जागांवर आघाडीवर आहे. लालूसारख्या हलकटाला निवडून देणे म्हणजे लोक शहाणे झाल्याचे लक्षण वाटत असेल तर ते सरळ लिहा की. उगीच नितीशमागे लपू नका.

संदीप डांगे's picture

8 Nov 2015 - 1:05 pm | संदीप डांगे

लालूसारख्या हलकटाला निवडून देणे

नशेंमें कौन नही है मुझे बताओ जरा....

काकासाहेब केंजळे's picture

8 Nov 2015 - 1:08 pm | काकासाहेब केंजळे

लालूसारख्या हलकटाला निवडून देणे म्हणजे लोक शहाणे
झाल्याचे लक्षण वाटत असेल तर ते सरळ लिहा की. उगीच
नितीशमागे लपू नका.>>>>>>>>>>>>>>>>>
>>>> लालू हलकट ,मग येडुयुरप्पा कोन, पक्षातून हाकलून दिलेला भ्रष्टाचारी परत भाजपात येतो ,पक्षाचा सरचिटणीस होतो, तेव्हा कुठे जाते चाल चरित्र????
लालूचे चाराघोटाळा प्रकरण आणि येडुयुरप्पाचे प्रकरण ,यात येडुयुरप्पाने कीतीतरी अधिक मोठा घोटाळा केला आहे.

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 8:01 pm | श्रीगुरुजी

लालूवर भ्रष्टाचाराचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन त्याला ५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

येडीयुरप्पाची भ्रष्टाचार प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

बोका-ए-आझम's picture

8 Nov 2015 - 12:45 pm | बोका-ए-आझम

आता अपहरण वगैरे कुटिरोद्योग परत सुरु होतील. एक बरं होईल. आता बिहारमध्ये दिवसाढवळ्या खून पडले तर भाजपवर खापर फुटणार नाही.

>>>आता बिहारमध्ये दिवसाढवळ्या खून पडले तर भाजपवर खापर फुटणार नाही.

लै आशावादी राव तुमी..!!

संदीप डांगे's picture

8 Nov 2015 - 1:02 pm | संदीप डांगे

चष्मा काडा ओ साहेब. 'गिरे तो बी टांग उपर' चा काय उपयोग नाही आता!

नितिशकुमारांच्या कार्यकाळात बिहार खूपच सुधारला आहे. त्यामुळे "अपहरण वगैरे कुटिरोद्योग परत सूरु होतील व खून पडतील" ही विधानं जरा तपासून पाहावीत असे सुचवतो.

लाल टोपी's picture

8 Nov 2015 - 1:13 pm | लाल टोपी

त्यावेळी लालू नितिशकुमारांबरोबर नव्हते हे विसरता तुम्ही आणि गेली दोन वर्षे सोडली तर त्या आघाडीचा भाजपही घटक होता.

संदीप डांगे's picture

8 Nov 2015 - 1:37 pm | संदीप डांगे

काळच ठरवेल बिहारचं भविष्य... बघू.

बोका-ए-आझम's picture

8 Nov 2015 - 1:34 pm | बोका-ए-आझम

यांच्यासाठी लालू आणि राजद हे विरोधक होते साहेब. आता तर सत्तेत सहभागी असणार आहेत. तेही सर्वात मोठा पक्ष म्हणून. बिघडलेली गोष्ट सुधरायला वेळ लागतो. सुधारलेली बिघडायला वेळ लागत नाही. आणि रच्याकने २०१३, म्हणजे नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडल्यानंतर बिहारमधले गुन्हेगारीचे आकडे बघा.

काकासाहेब केंजळे's picture

8 Nov 2015 - 1:13 pm | काकासाहेब केंजळे

कसे हो कसे ? काल पर्यंत नितिशकुमार बरोबर भाजप सत्तेत होता तेव्हा नितिश्कुमार ' विकासपुरुष होते, आज पुन्हा तेच नितिशकुमार सत्तेत बसणार आहेत, तर लगेच बिहारमध्ये गुंडाराज आले का?
लालुला ज्या जागा आल्या आहेत त्या नितिश्कुमारच्या स्वच्छ प्रतिमेमुळे मिळाल्या अहेत, आणि लालूला वेसन घालणे नितिशला सहजशक्य आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 1:22 pm | गॅरी ट्रुमन

लालूला वेसन घालणे नितिशला सहजशक्य आहे.

चला या निमित्ताने लालू हा वेसण घालण्याजोगा माणूस आहे हे तुम्ही मान्य केलेत हे पण काही कमी नाही. खरं तर लालू हा मोदीविरोधी म्हणजे सद्गुणांचा पुतळा असायला हवा तुमच्यासारख्यांच्या मते.

बोका-ए-आझम's picture

8 Nov 2015 - 1:29 pm | बोका-ए-आझम

जर इतकी स्वच्छ होती तर लालूंबरोबर युती केलीच का? एकट्याच्या बळावर विजय मिळवणं शक्य नाही हे समजल्यामुळेच ना? बरं, केली तर कुणाबरोबर? ज्याला संपविण्यासाठी गेली २० वर्षे प्रयत्न केले त्यांच्याचबरोबर. लालूला वेसण घालणे नितीशकुमारांसाठी कठीण नाही, तर अशक्य आहे. इथे मिपावर डू आयडींना संपादक वेसण नाही घालू शकले अजून. तुम्ही तर बिहारबद्दल बोलताय. शिवाय भाजपची साथ नितीशकुमारनी सोडली. ज्याचा त्यांना तात्पुरता फायदा झालेला दिसतो आहे पण आपल्या शत्रूला मोठं करण्याची किंमत त्यांना या ना त्या प्रकारे चुकवावीच लागेल. बिहारमध्ये राजदला जास्त जागा मिळणं याचा तोच अर्थ आहे. उलट नितीशकुमारांच्या जागा कमी आहेत याचा अर्थ त्यांचं विकासाचं माॅडेलही लोकांना पसंत पडलेलं नाही आणि ती एकदम छान गोष्ट झालेली आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 1:31 pm | गॅरी ट्रुमन

इथे मिपावर डू आयडींना संपादक वेसण नाही घालू शकले अजून. तुम्ही तर बिहारबद्दल बोलताय.

पोट धरधरून गडाबडा लोळत हसायची स्मायली आहे का कोणाकडे?

सतिश गावडे's picture

8 Nov 2015 - 5:31 pm | सतिश गावडे

इथे मिपावर डू आयडींना संपादक वेसण नाही घालू शकले अजून.

बोकाजी, हे उदाहरण चुकीचे वाटते. :)

लाल टोपी's picture

8 Nov 2015 - 1:22 pm | लाल टोपी

नितिश्कुमारांच्या प्रतिमेमु़ळे? मग लालुंच्या जागा जास्त आणि नितिशकुमारांच्या कमी हे कसे?

काकासाहेब केंजळे's picture

8 Nov 2015 - 2:17 pm | काकासाहेब केंजळे

लालू भ्रष्टाचारी आहे ,पण मिडीयाने त्याला अति बदनाम केले आहे .लालूने जंगलराज आणले तो काळ वेगळा होता ,आज त्यातले पप्पू यादव वगैरे कुणीच लालू बरोबर नाही,केंद्रातही लालूला पाठीशी घालणारे नाहीत.त्यामुळे लालू परत चुगली करायची शक्यता नाही ,तसे त्याने केले तर त्याच्याशी नितिशकुमार संबंध तोडायला पुढे मागे बघणार नाहीत.
आज बिहार इलेक्शान एमाआयमला आणि पप्पू यादवला रसद पुरवनारे भाजपचेच लोक आहेत हे उघड सत्य आहे.सेक्युलर वोट खातात तर ओवैसीला आणि पप्पू यादवकडे दुर्लक्ष करा ही भाजपची नीती लपून राहीलेली नाही.

याॅर्कर's picture

8 Nov 2015 - 1:31 pm | याॅर्कर

लालूसारख्या हलकटाला निवडून देणे

त्यांनी काही घोटाळे असतील तसेच त्यांच्या बोलण्यातून मस्तीची कैफ दिसत असली तरी त्यांना का निवडून दिले ते प्रत्येक्षात बिहारमध्ये जाऊन दलित,महादलित,यादव यांना विचारा म्हणजे कळेल.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 1:39 pm | गॅरी ट्रुमन

त्यांना का निवडून दिले ते प्रत्येक्षात बिहारमध्ये जाऊन दलित,महादलित,यादव यांना विचारा म्हणजे कळेल.

हे १९९० च्या दशकाविषयी बोलत असाल तर मुद्दा पूर्ण मान्य. पण त्याच लालूंना त्याच मतदारांनी गेली १० वर्षे घरी बसवलेच होते की. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये दोनपैकी एका मतदारसंघात खुद्द लालूंचाही पराभव झाला होता. मग मधल्या काळात दलित, महादलित लोक लालूंनी त्यांच्यासाठी केलेले विसरले म्हणायचे का?

जितनराम मांझींना बरोबर घेऊन महादलित व्होटबँक आपल्याकडे खेचायचे भाजपचे डावपेच चांगलेच होते.पण मोहन भागवतांनी गाढवासारखे आरक्षणविरोधी वक्तव्य केले त्यामुळे हे मतदार परत लालूंकडे वळले असे दिसते. एकंदरीत संघाला कोणी डोईजड झालेला चालत नाहीसे दिसते. मोदी बरेच मोठे झाले आहेत आणि ते असेच मोठे राहिले तर नंतर आपल्याला जुमानणार नाहीत म्हणून अपशकुन करण्यासाठी भागवतांनी ते वक्तव्य केले असायची शक्यता आहेच. एकूणच भारतीयांची खेकड्यांची मनोवृत्ती आहेच. मग भारतीय जनता पक्षात खेकडे नाहीत असे कसे होईल?

विवेक ठाकूर's picture

8 Nov 2015 - 5:15 pm | विवेक ठाकूर

पण मोहन भागवतांनी गाढवासारखे आरक्षणविरोधी वक्तव्य केले त्यामुळे हे मतदार परत लालूंकडे वळले असे दिसते. एकंदरीत संघाला कोणी डोईजड झालेला चालत नाहीसे दिसते. मोदी बरेच मोठे झाले आहेत आणि ते असेच मोठे राहिले तर नंतर आपल्याला जुमानणार नाहीत म्हणून अपशकुन करण्यासाठी भागवतांनी ते वक्तव्य केले असायची शक्यता आहेच. एकूणच भारतीयांची खेकड्यांची मनोवृत्ती आहेच. मग भारतीय जनता पक्षात खेकडे नाहीत असे कसे होईल?

मालोजीराव's picture

8 Nov 2015 - 1:50 pm | मालोजीराव

गौमातेचा आशीर्वाद लालूंनाच आहे हे सिद्ध झाले म्हणायचे

आपल्या संस्कृतीत दोन फार मोठी असत्यं प्रस्थापित झालेली आहेत
१) आपले ज्यांच्याशी पटत नाही किंव मतभेद आहेत त्यांचा द्वेष केला पाहिजे किंवा त्यांचा बागुलबुवा उभा केला पाहीजे
२) आपल्याला जो आवडतो त्याच्याशी संपूर्ण सहमत झाले पाहिजे किंवा त्यांच्या प्रत्येक कृत्याचे समर्थन केले पाहिजे.

संदीप डांगे's picture

8 Nov 2015 - 2:01 pm | संदीप डांगे

ही असत्य नसून मान्यता आहेत. हेही खरं की ह्या मान्यता आता फार घट्ट रूतून बसल्यात.

शब्दबम्बाळ's picture

8 Nov 2015 - 6:33 pm | शब्दबम्बाळ

अगदी!!
आणि जो या दोन प्रकारात येत नाही त्याला दोन्हीकडचे लोक 'दुसर्या पार्टीचा' घोषित करून शिव्या घालतात!

संदीप डांगे's picture

8 Nov 2015 - 2:04 pm | संदीप डांगे

भाजपाला दिलासा देणारी बातमी:
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/ldf-takes-lead-big-gains-f...

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 2:17 pm | श्रीगुरुजी

राळहोतित
भाजपचा सत्ता मिळविण्यात दारूण अपयश आलेले आहे. आता पुढील बरेच दिवस भाजपचे नक्की काय चुकले याच्यावर काथ्याकूट होत राहील. बिहारमधील जनतेने जातीयवादाला नाकारले, धर्मनिरपेक्षतेला मत दिले, मग्रूरीला नाकारले इ. निष्कर्ष काढले जातील. मोहन भागवतांचे वक्तव्य, इतर वाचाळवीरांची वक्तव्ये, दादरी प्रकरण, महागाई इ. कारणांमुळे भाजपचा पराभव झाला असे ठासून सांगितले जाईल.

परंतु मी वरील कारणांशी सहमत नाही. वरील कारणांचा मतदानावर व निकालावर फारसा फरक पडलेला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मतांचे प्रमाण पाहिले तर असे दिसते की त्यावेळी भाजप+ आघाडीला ३५% च्या आसपास मते होती व ४० पैकी ३१ जागा मिळालेल्या होत्या. राजद (१८%) व काँग्रेस (८%) यांना एकत्रित अंदाजे २६% मते होती व ६ जागा मिळाल्या होत्या आणि संजदला अंदाजे १६% मते होती व २ जागा मिळाल्या होत्या. ३५% वि. २६% वि. १६% या तिरंगी लढतील सर्वाधिक ३१ जागा ३५% मते मिळविणार्‍या आघाडीला होत्या.

आजच्या निकालात आतापर्यंत आलेल्या टक्केवारीनुसार भाजप+ आघाडीला जवळपास तेवढीच म्हणजे ३५% मते मिळाल्याचे दिसत आहे तर राजद, संजद व काँग्रेस एकत्रित असलेल्या आघाडीला एकमेकांची मते मिळून ४२-४३% मते मिळाल्याचे दिसत आहे. लोकसभेला वेगवेगळे लढणारे हे तीन पक्ष एकत्र आल्याने विरोधी मतांची एकजूट होऊन ३५% वि. ४२% या सरळ लढतीत ४२% ला ७०% जागा मिळताना दिसत आहेत.

गेले दिड-दोन महिने दादरी, पुरस्कार परत करणारे साहित्यिक, महागाई, वाचाळवीरांची वक्तव्ये इ. अनेक मुद्दे विरोधात असूनसुद्धा भाजप+ आघाडीला आपली २०१४ मधील मते टिकविण्यात यश आलेले आहे. इतर विरोधी पक्षांची मते देखील टिकली आहेत. परंतु त्यांची मते एकत्रित झाल्याने व दुरंगी लढत झाल्याने त्यांना जागांचा प्रचंड फायदा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

त्यामुळे मोहन भागवत, दादरी, पुरस्कार वापसी, महागाई, वाचाळवीर इ. मुळे व नागरिकांनी जातीयवादाविरूद्ध मत दिल्याने भाजपला खूप कमी जागा मिळाल्या असे नसून विरोधी मते एकवटल्यामुळेच भाजपला खूप कमी जागा मिळत आहेत.

विरोधी पक्षांची मते एकवटल्याने सत्ताधारी पक्षाचा पराभव झाल्याची भूतकाळात अनेक उदाहरणे आहेत. १९६७-६८ मध्ये लोहियांनी बडी आघाडी स्थापन करून त्यात समाजवादी, जनसंघ, लोकदल इ. पक्षांनी युती करून निवडणुक लढविल्यावर त्यांना ८ राज्यात सत्ता मिळाली होती. नंतर वर्षभरात त्यांच्यात फाटाफूट झाल्यावर १९७१ मध्ये काँग्रेसला लोकसभेत ३५३ जागा मिळाल्या होत्या. १९७७ ला ५ विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केल्यावर सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला होता. याचीच पुनरावृत्ती १९८९ मध्ये झाली होती. नंतर आघाड्यांचे राजकारण सुरू होऊन ज्या आघाडीत सर्वाधिक व प्रबळ पक्ष ती आघाडी जिंकण्याची परंपरा १९९८ पासून सुरू झाली ती आजतगायत.

तस्मात भाजपच्या पराभवामागे मोहन भागवत, दादरी, पुरस्कार वापसी, महागाई, वाचाळवीर, नितीशकुमारांचे विकास मॉडेल इ. कारणे नसून विरोधी मते एकवटल्यामुळेच भाजपला खूप कमी जागा मिळत आहेत.

कपिलमुनी's picture

8 Nov 2015 - 2:26 pm | कपिलमुनी

भाजपा हारला नाहीये ! फक्त जागा कमी निवडून आल्यात .

याॅर्कर's picture

8 Nov 2015 - 2:59 pm | याॅर्कर

.

जातवेद's picture

8 Nov 2015 - 3:26 pm | जातवेद

=)

बॅटमॅन's picture

8 Nov 2015 - 3:58 pm | बॅटमॅन

"तो पडला" हे "हिज़ व्हर्टिकॅलिटी टर्न्ड इण्टु हिज़ होरिझाँटलिटी" अशा भाषेत सांगणार्‍या इंग्रजी वाक्याची, झालेच तर

औरंगजेब लंगडू लागला हे "खाविंदांच्या पूज्य पूर्वजांप्रमाणे (तैमूरलंग) होण्याचे भाग्य खाविंदांना लाभले" असे लिहिणार्‍या मुघल बखरकारांची आठवण झाली. =)) =))

संदीप डांगे's picture

9 Nov 2015 - 9:40 pm | संदीप डांगे

फार चुकीचा अर्थ काढता राव तुम्ही. 'इतरांना जास्त जागा मिळाल्यात...' बाकी काही नाही.

उदय८२'s picture

8 Nov 2015 - 4:22 pm | उदय८२

याला म्हणतात निर्लज्जपणाचा कळस. तोंड फुटले तरी माझ्या तोंडात दातच नव्हते म्हणत हसायचे.
धर्मांध प्रवृत्तींना बिहारमधे गाडले हेच सर्वकालिन सत्य आहे.

अरे तुम्ही पण आलात? स्वागत आहे.

एकूण काय तर भाजप योग्य मार्गावर आहे आणि त्यात बदल करण्याची काही एक गरज नाही.

याइतका हास्यास्पद प्रतिसाद बघितला नव्हता.

भाजपाला एकुण सर्व जागांची मते मिळून ३१% मते मिळाली आहेत. इतर पक्षांनी मुळात तेवढ्या जागाच लढवल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या मतांची आणि भाजपाला मिळालेल्या मतांशी थेट तुलनाच शक्य /,ही.

(अधिकस्पष्ट करण्यासाठी काल्पनिक आकडे घेतो. विदा आता हाताशी नाही. म्हणजे भाजपाला ५० मतदारसंघात १०० पैकी २६ मतदारांनी मतदान केले आहे. राजद व जदयुने केवळ प्रत्येकी २५ मतदारसंघच लढवले असले तर त्यांना मिळालेली मते भाजपापेक्षा कमीच असणार.)

तेव्हा भाजपा आघाडी विरूद्ध महाआघाडी अशीच टक्केवारी बघावी लागेल. नी त्यात लालुअत्तसतो तसा भाजपाचा 'सुपडा साफ'आहे.

बाकी, भाजपेयंंनी वाळूतच तोंड खुपसायचं ठरवलं असेल तर नाईलाज आहे! कमॉन, बी अ स्पोर्ट!

आनन्दा's picture

8 Nov 2015 - 7:00 pm | आनन्दा

तुमचा काहीतरी घोळ झालेला दिसतोय. जे मी उत्तरप्रदेश/दिल्लीत पाहिले तेच इथे पण पाहतोय - दुरंगी लढतीत भाजपा विरोधकांची सारी मते एकवटात. किंबहुना कोणत्याही ठिकाणी एक प्रबळ पक्ष विरुद्ध इतर सगळे असा मामला असतो तेव्हा तो कितीही प्रबळ असला तरी त्याने हरणे क्रमप्राप्तच असते. बिहारमध्ये देखील हेच झाले. पूर्वी लालू विरूद्ध सगळे असा सामना असायचा, आता भाजपा विरुद्ध सगळे असा सामना होतोय.

परंतु याव्यतिरिक्त, अजून एक गोष्ट मला दिसत आहे ती अशी - भाजपा हळूहळू काँग्रेसची जागा घेताना दिसतोय, बिहारच्या निकालांनी देखील हेच अधोरेखित केले.

आता याबद्दल -

भाजपाला एकुण सर्व जागांची मते मिळून ३१% मते मिळाली आहेत. इतर पक्षांनी मुळात तेवढ्या जागाच लढवल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या मतांची आणि भाजपाला मिळालेल्या मतांशी थेट तुलनाच शक्य /,ही.

इतर पक्षांनी जरी तेव्हढ्या जागा लढवल्या नसल्या तरी त्यांनी आपली मते आपल्या सहयोगी पार्टीच्या पारड्यात टाकेली होतीच की.

अजून एक गोष्ट मला दिसत आहे ती अशी - भाजपा हळूहळू काँग्रेसची जागा घेताना दिसतोय, बिहारच्या निकालांनी देखील हेच अधोरेखित केले.

अर्थातसमहहमत आहे. मात्र यात नवे अथवा धक्कादायक काही नाही.

किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या आधीच नेमका हाच आक्षेप मी मोदींबद्दल व्यक्त केला होता. ते आले की भाजपाचे व्यक्तीकेंद्रीत काँग्रेस होणार

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 7:48 pm | श्रीगुरुजी

निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरून खालील आकडे घेतलेले आहेत (Last Updated at 19:22 On 08/11/2015).

भाजप २४.५% + लोजप ४.८% + हम २.२% + बीएलएसपी २.६% = एकूण ३४.१%

राजद १८.४% + संजद १६.७% + काँग्रेस ६.७% = एकूण ४१.८%

एकूण फरक - ७.७%

मे २०१४ मध्ये वरील दोन आघाड्यातील एकूण मतांचा फरक ७.३% इतका होता. दीड वर्षानंतर दोन्ही आघाड्यातील मतांचा फरक जवळपास तेवढाच राहिला आहे.

त्यामुळे संजद+ आघाडीने भाजप+ आघाडीची मते खेचून घेतली, दादरी/मोहन भागवत/महागाई इ. मुद्द्यांमुळे भाजपने मते गमाविली व ती मते संजद+ कडे गेली यात तथ्य नाही हे वरील आकडेवारीवरून दिसून येते.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 8:25 pm | गॅरी ट्रुमन

आकडेवारी वगैरे सर्व ठिक आहे.पण तुम्ही एक महत्वाचा मुद्दा विसरत आहात का? नितीशकुमारांनी २००५ आणि २०१० मध्ये सत्ता लालूंच्या जंगलराजविरूध्द रान उठवून मिळवली होती. इतकेच नव्हे तर अगदी अलीकडल्या काळापर्यंत लालू आणि नितीश यांच्यातून विस्तवही जात नव्हता.मी हलाहल प्यायला तयार होईन, चंदनाच्या झाडाला सापाने विळखा घातला तरी झाडात विष पसरत नाही वगैरे वक्तव्ये नितीशकुमारांनी कोणाला उद्देशून दिली होती हे उघड होते.अगदी २०१४ मध्येही लालूंनी नितीशकुमारांवर टिका केलीच होती. तेव्हा लालू आणि नितीश यांचे मतदार परस्परविरोधी होते. उद्या आदित्यनाथ किंवा साक्षी महाराज आणि ओवेसी यांच्यात युती झाली आणि तरीही दोघांना स्वतंत्रपणे मिळत असलेल्या मतांइतकीच मते या युतीने मिळवली तर त्या मतदारांच्या अपरिपक्वपणाबरोबरच या युतीपासून मते खेचून आणण्यात विरोधकांचे अपयश नाही का?

माझी अशी अपेक्षा होती की नितीशकुमार परत मुख्यमंत्री व्हावेत असे वाटणारे पण लालू अजिबात न आवडणारे मतदार भाजप आपल्याकडे खेचून आणू शकेल.आणि तसे होण्यासाठी परिस्थिती अनुकूलही होती.तरीही तसे करण्यात भाजपला यश का आले नाही? हे भाजपचे अपयश नाही का?

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2015 - 9:08 pm | श्रीगुरुजी

माझी अशी अपेक्षा होती की नितीशकुमार परत मुख्यमंत्री व्हावेत असे वाटणारे पण लालू अजिबात न आवडणारे मतदार भाजप आपल्याकडे खेचून आणू शकेल.आणि तसे होण्यासाठी परिस्थिती अनुकूलही होती.तरीही तसे करण्यात भाजपला यश का आले नाही? हे भाजपचे अपयश नाही का?

भाजप त्याबाबतीत अपयशी ठरला त्याचे मुख्य कारण म्हणजे लालूने निवडणुकीआधीच नितीशकुमारांना भावी मुख्यमंत्री म्हणून दिलेली जाहीर मान्यता. निवडणुकीपूर्वीच लालूने जाहीररित्या सांगितले की मतमोजणीनंतर नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार. जरी राजदला जास्त जागा मिळाल्या तरी राजद मुख्यमंत्रीपदावर दावा न करता नितीशकुमारांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणार.

कोणत्याही परिस्थितीत नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याने संजदचे मतदार निश्चिंत झाले व त्यामुळे लालू आवडत नसणार्‍या संजदच्या मतदारांनी सुद्धा राजद उमेदवारांना मते दिली. सर्वाधिक जागा मिळविणार्‍या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे जर ठरले असते, तर दोन्ही पक्षांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न केले असते. परंतु मुख्यमंत्री कोण हे सर्वांनी आधीच मान्य केल्याने पाडापाडी टळली.

असे जरी असले तरी लालूसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी व कारस्थानी माणूस अजिबात गप्प राहणार नाही. आपण सर्वाधिक मोठा पक्ष आहोत हे सिद्ध झाल्याने तो फोडाफोडी करून बहुमत जमविण्याचा प्रयत्न भविष्यात नक्की करणार. सध्या लालू + कॉंग्रेस यांचे एकूण १०७ आमदार आहेत. बहुमतासाठी त्यांना फक्त १५ आमदारांची गरज आहे. भाजप व संजद वगळता उर्वरीत आमदारांची संख्या १२ आहे. म्हणजे लालूला उर्वरीत आमदार आपल्या बाजूला वळविल्यावर फक्त ३ आमदारांची गरज भासेल. सध्याच्या पक्षांतरबंदी कायद्यामुळे भाजप फोडायला किमान ३६ आमदार फोडावे लागतील व संजद फोडायला किमान ४८ आमदार फोडावे लागतील. परंतु पक्षांतरबंदी कायद्याला टांग मारण्यासाठी लालूच्या पक्षाकडे सभापतीपद असले तरी पुरेसे आहे. आमदारांची फूट (आमदारांची संख्या कितीही असली तरी) ही कायदेशीर आहे का नाही हा निर्णय सभापतीचा असतो व सभापती आपल्या पक्षाबाबतीत नेहमीच पक्षपातीपणा करून कमी आमदारांची फूट सुद्धा कायदेशीर ठरवितो हा इतिहास आहे (उदा. १९९७ मध्ये उ.प्र. मध्ये सप, बसप आणि काँग्रेस मध्ये पडलेली फूट कमी आमदार असूनसुद्धा भाजपचे सभापती केदारनाथ त्रिपाठी यांनी आपल्या अधिकारात कायदेशीर ठरवून कल्याणसिंग सरकारला जीवदान देऊन ५ वर्षे निर्वेध कारभार करून दिला होता.). त्यामुळे सभापतीपदासाठी लालू आग्रह धरणार हे नक्की. तसेच आपल्या दोन मुलांना मंत्रीपदी बसवून पर्यायी नेतेपदाची सोय करून ठेवणार. नितीशकुमार नक्कीच हे ओळखून असणार व ते सभापतीपद लालूकडे न जाण्यासाठी प्रयत्न करणार. कदाचित तडजोड म्हणून काँग्रेसचा सभापती असेल. परंतु जर लालूच्या पक्षाचा सभापती झाला तर मात्र नितीशकुमारांसाठी अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे.

शब्दबम्बाळ's picture

8 Nov 2015 - 6:51 pm | शब्दबम्बाळ

भाजप महाराष्ट्रातही युती करूनच निवडून आले. NDA चे १३ राज्यामध्ये सरकार आहे त्यात माझ्यामते पाचच राज्यात भाजप कोणाशी युती न करता निवडून आला आहे.(चूक असेल तर दुरुस्ती सांगावी)
मग इथे पण असेच म्हणावे का कि भाजप एकट्याने निवडून येउच शकत नाही?
युतीचे राजकारण हे आता सामान्यपणे सगळीकडेच झाले आहे बिहार मध्येही काही अपवाद नव्हता. मग जर भाजपला हे आधीपासूनच माहित होते तर कि विरोधक एकवटले आहेत तर मग निवडणुका लढवायच्या कशाला ना?

मतदारांनी भाजपला नाकारले आहे हि वस्तुस्थिती आहे ती मान्य करून उपाय शोधायचे कि, आमच काहीच चुकल नाही असे म्हणून खापर जनतेच्याच माथी फोडायचे हे त्यांनीच ठरवावे...

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 7:53 pm | श्रीगुरुजी

भाजप अनेक राज्यात सध्या व यापूर्वी सुद्धा स्वबळावर निवडून आलेला आहे. काही राज्यात भाजपचे बळ कमी असल्याने भाजप काही पक्षांशी युती करतो. मी वरील एका प्रतिसादात आकडेवारी दिली आहे. जितक्या मतदारांनी मे २०१४ मध्ये भाजप+ आघाडीला मते दिली होती, जवळपास तितक्याच मतदारांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये भाजप+ आघाडीला पुन्हा एकदा मते दिली आहेत. परंतु यावेळी राजद्+काँग्रेस या आघाडीत संजद सामील होऊन त्यात त्यांनी आपल्या १६-१७% मतांची भर घातल्याने इतका एकतर्फी निकाल लागलेला आहे.

ओ गुर्जी हारलो तर हरलो म्हणा कि कशाला एवढी लांबड
तुम्हाला क्रिकेट आवडत ना मॅच १ run ने हारली काय आणि १०० runs ने हारली काय पराभव हा पराभव आहे मान्य करा आणि लागा कामाला

भाजप जिंकायला हव अस वाटणारा

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2015 - 8:18 pm | श्रीगुरुजी

भाजप हरलेला आहेच ना. ते कोण नाकारतंय. परंतु मोहन भागवतांचे विधान, भाजप नेत्यांचा तथाकथित उर्मटपणा, दादरी, तथाकथित असहिष्णुता इ. मुळे भाजप हरला ही कारणे खरी नसल्याने प्रतिसाद दिला.

काकासाहेब केंजळे's picture

10 Nov 2015 - 9:19 pm | काकासाहेब केंजळे

काल एबीपी माझावर भाजपचा अतुल भातखळकर आला होता,इतका उर्मट बोलत होता ,शेवटी ॲँकरने त्याला चूप केला ,हुसैन दलवाई,समीर खडस सर्वांनाच उर्मट उत्तरे देत होता.

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2015 - 9:27 pm | श्रीगुरुजी

हुसेन दलवाई, समर खडस अशांसारख्या निष्पक्षपाती, मुद्देसूद बोलणार्‍या व नम्र व्यक्तींना उर्मटपणे बोलणे हे चूकच आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2015 - 2:27 pm | गॅरी ट्रुमन

आजच्या निकालात आतापर्यंत आलेल्या टक्केवारीनुसार भाजप+ आघाडीला जवळपास तेवढीच म्हणजे ३५% मते मिळाल्याचे दिसत आहे तर राजद, संजद व काँग्रेस एकत्रित असलेल्या आघाडीला एकमेकांची मते मिळून ४२-४३% मते मिळाल्याचे दिसत आहे. लोकसभेला वेगवेगळे लढणारे हे तीन पक्ष एकत्र आल्याने विरोधी मतांची एकजूट होऊन ३५% वि. ४२% या सरळ लढतीत ४२% ला ७०% जागा मिळताना दिसत आहेत.

मतांची अधिकृत टक्केवारी अजून कळलेली नाही. तरीही हे आकडे खरे आहेत हे गृहित धरले तरी काही मुद्दे आहेत:

१. नितीश आणि लालूंची आघाडी परस्परविरोधी मतदारांची होती. मुळात नितीशकुमार जनता दलातून बाहेर पडले त्यामागे १९९४ मध्ये त्यांनी आयोजित केलेली कुर्मी रॅली आणि लालूंच्या राज्यात सगळा फायदा यादवांचा होत होता आणि कुर्मी-कोयरींना काहीच मिळत नव्हते हे कारण होते. गेल्या २० वर्षांमध्ये ही दरी अजून वाढली होती.या निवडणुकांमध्ये यादवांनी मते महागठबंधनला दिली हे समजू शकते. पण कुर्मी-कोयरी मतदारांनी मात्र आपल्या नेत्याने त्याच यादवांशी हातमिळवणी केली याचा बॅकलॅश मात्र दिसून कसा आला नाही?
२. जितनराम मांझींना बरोबर घेतल्यामुळे महादलित समाजातील मते भाजपकडे यायला हवी होती.ते होताना का दिसले नाही? मान्य आहे की मांझी हे पूर्वी मोठे नेते नव्हते.पण मुख्यमंत्रीपदावरून हटविले गेल्यानंतर मात्र आपल्याला हटविणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान हे चित्र उभे करण्यात यशस्वी झालेच होते.त्यामुळे ती मते भाजप आघाडीला मिळायला हवी होती.ते का झाले नाही?

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 2:37 pm | श्रीगुरुजी

(१) लालूने निवडणुकीआधीच नितीशकुमार मुख्यमंत्री होणार हे मान्य केले होते. त्यामुळे आपला मुख्यमंत्री होणार या भावनेने लालूबरोबर युती असूनसुद्धा आपली मते युतीच्याच पारड्यात टाकली.

(२) जीतनराम मांझी हे बिहारमधील फारसे प्रबळ पुढारी नाहीत. त्यांच्यामागे फारशी मते नाहीत. त्यांचे हे दुर्बलस्थान ओळखूनच नितीशकुमारांनी त्यांना आपल्या जागी बसविले होते. परंतु नंतर ते नख्या बाहेर काढायला लागल्यावर नितीशकुमारांनी त्यांना हाकलले. भाजपने त्यांच्या पक्षाला अंदाजे २० जागा दिल्या परंतु त्यातील निम्म्या जागांवर त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर उभे करायला भाजपनेच आपले उमेदवार दिले होते. त्यांच्या पक्षाचा मतांची टक्केवारी वाढायला भाजपला फारच किरकोळ फायदा झाला असावा कारण ते स्वतः महादलितातील एका जातीतील असले तरी त्यांच्यामागे फारशी मते नाहीत.

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 2:29 pm | श्रीगुरुजी

एकंदरीत फक्त अ‍ॅक्सिसचा एक्झिट पोल (अ‍ॅक्सिस : भाजप+ ६४, संजद+ १७६) निकालांच्या अगदी जवळ आहे.

राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रवक्ते वाहिन्यांवर आनंद व्यक्त करीत होते. त्यांना नक्की कशाचा आनंद झालाय तेच समजत नाही कारण बिहारमध्ये दोघांनाही भोपळा मिळालेला आहे.

राजदला संजदपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे नितीशकुमारांची झोप उडणार आहे. फक्त काँग्रेसला बरोबर घेऊनसुद्धा संजदचा आकडा ९० च्या पुढे जात नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संजदला राजदची मदत लागणारच आहे. लालू आपल्या पाठिंब्याची व सर्वाधिक मोठा पक्ष असल्याची जबरदस्त किंमत वसूल करणार. आधीच्या विधानसभेत संजदकडे स्वबळावर बहुमत असल्याने नितीशकुमारांना मुक्तहस्त होता, आता मात्र त्यांची लालूबरोबर तीन पायांची शर्यत होणार आहे.

मोदी सत्तेवर आल्याने हिंदुत्ववादी संघटनांना जोर चढला आहे असे बोलले जाते. त्याच न्यायाने आता लालू सत्तेत आल्याने बिहारमधील गुन्हेगार, अपहरणकर्ते, भ्रष्टाचारी यांना जोर चढणार हे नक्की. बहुमत नसल्याने व मुख्यमंत्रीपद पूर्णपणे लालूवर अवलंबून असल्याने नितीशकुमारांना ही कृत्ये निव्वळ हताश होऊन सहन करावी लागणार.

राजदसारख्या पूर्ण गाळात गेलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याची व लालूसारख्या क्षीण झालेल्या भस्मासुराला पुन्हा एकदा सामर्थ्यवान बनविण्याच्या चुकीची पूर्ण किंमत नितीशकुमारांना द्यावी लागणार आहे.

भविष्यात नितीश पुन्हा रालोआ मध्ये आले तरी देखील मला आश्चर्य वाटणार नाही, एव्हढा दणका नितीशना या निवडणूकीने दिला आहे.

याॅर्कर's picture

8 Nov 2015 - 3:12 pm | याॅर्कर

आता लालू सत्तेत आल्याने बिहारमधील गुन्हेगार, अपहरणकर्ते, भ्रष्टाचारी यांना जोर चढणार हे नक्की

→→खी खी खी खी...

.
.
.
जय पराजय तर होणारच,दुखी होऊ नका

सगळे शिवसेना -- आणि भाजपा यांच्या युतीसारखेच असतात असे दिवास्वप्न पाहणे बंद कर रे.
महाराष्ट्रात तर हे एकमेकांची इतकी लायकी काढतात कि विरोधीपक्षांची गरजच भासत नाही. तुम्ही आधी महाराष्ट्राकडे लक्ष द्या मग बिहारकडे बघा तिथे नितिश समर्थ आहे. जो भाजपासारख्या ध्रर्माचे राजकारण करंणार्‍यांना देखील टाचेखाली चेचून ठेवतो तो लालू सारख्याला देखील सांभाळेल.

तुम्ही आणि गैरी ह्यांनी नितीशनी लालुशी युती करायला नको होती असे वारंवार म्हटले आहे. त्यातल्या काही मुद्द्यात तथ्य असले तरी आता नितीशकडे दुसरा राजकीय पर्याय काय होता ह्याबद्दल विवेचन आवडेल.

यांच्या फालतू अ‍ॅनॅलिसिसला आता विचरतोयं कोण?

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 5:49 pm | श्रीगुरुजी

तुम्ही आणि गैरी ह्यांनी नितीशनी लालुशी युती करायला नको होती असे वारंवार म्हटले आहे. त्यातल्या काही मुद्द्यात तथ्य असले तरी आता नितीशकडे दुसरा राजकीय पर्याय काय होता ह्याबद्दल विवेचन आवडेल.

नितीशकुमारांकडे दुसरा पर्याय 'संजद + काँग्रेस + राष्ट्रवादी + सपा + डावे पक्ष' असा असू शकला असता. संजदने स्वतःकडे सर्वाधिक म्हणजे किमान १६०-१७० जागा ठेवून इतरांना उर्वरीत जागा दिल्या असत्या तर कदाचित या पर्यायाला १८० इतके मोठे नसले तरी किमान साधे बहुमत मिळून त्यात संजदचा सिंहाचा वाटा राहिला असता. अर्थात या जर-तर ला आता शून्य महत्त्व आहे. आता लालूबरोबर संसार करताना बिहारमध्ये विकास करताकरता लालूच्या पक्षाला वेसण घालण्याची दुहेरी कसरत नितीशकुमारांना करावी लागणार आहे. या सरकारचे स्थैर्य संपूर्णपणे लालूवरच अवलंबून असल्याने ही कसरत खूपच अवघड असणार आहे. १९९९ मध्ये लालूच्या मिसा या मुलीच्या लग्नाच्या वेळी राजद कार्यकर्त्यांनी टाटा मोटर्स व अनेक फर्निचर च्या शोरूम्स फोडून आतील महागड्या गाड्या व फर्निचर लग्नासाठी पळविले होते. माध्यमातून त्यावर खूप आरडाओरडा झाल्यावर लग्नानंतर काही दिवसांनी फर्निचर व गाड्या गुपचुप फुटपाथवर सोडून देण्यात आल्या. या गुन्ह्याची कोठेही नोंद केली गेली नाही. आता पुन्हा असाच प्रकार झाला तर नितीशकुमारांना गप्प बसून रहावे लागेल.

संपत's picture

8 Nov 2015 - 10:07 pm | संपत

बरोबर, पण राजद हा आता बिहारमधील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे बघता वरील समीकरण यशस्वी झाले असते असे वाटत नाही. कदाचित चाणाक्ष नितीशकुमारांनी राजदचा वाढलेला पाठींबा ओळखूनच कॉंग्रेसच्या गठबंधनसंबंधी प्रयत्नाला साथ द्यायचे ठरवले असावे.

या क्षणी महागठबंधनला १७१ जागांवर आघाडी आहे. राजद ७८,संजद ७० तर काँग्रेस २३ जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे काँग्रेसला बिहारमध्ये सुगीचे दिवस आले म्हणायचे तर. भाजप आघाडीला या क्षणी ६५ जागांवर आघाडी आहे. भाजप ५७, लोजप ३, रालोसपला ३ आणि जितनराम मांझींच्या हामला २ जागा आहेत. रामविलास पासवानांच्या लोजपला २०१० मध्ये लालूंबरोबर ४ जागा मिळाल्या होत्या.यावेळी मात्र तीनच जागा मिळताना दिसत आहेत. एकूणच सगळे ठोकताळे उलटेपालटे झालेले दिसत आहेत.

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 2:43 pm | श्रीगुरुजी

संजदचे अजून एक वैशिष्ट्य पुन्हा एकदा सिद्ध झाले. हा पक्ष एकट्याच्या बळावर काहीही करू शकत नाही हे या पक्षाच्या जन्मापासून दिसून आले आहे.

या पक्षाचा आधीचा अवतार म्हणजे समता पक्ष. हा पक्ष जोपर्यंत एकटा लढत होता तोपर्यंत त्याला अजिबात यश मिळाले नव्हते. भाजपबरोबर युती केल्यावर त्यांचा प्रचंड फायदा झाला. २०१४ मध्ये एकट्याने लढल्यावर फक्त २ जागा मिळाल्या. तर आता काँग्रेस व राजदबरोबर युती केल्याचा फायदा झाला. म्हणजे या पक्षाला कायम कोणतातरी दुसरा पक्ष बरोबर लागतो.

काकासाहेब केंजळे's picture

8 Nov 2015 - 2:43 pm | काकासाहेब केंजळे

राजदसारख्या पूर्ण गाळात गेलेल्या पक्षाला नवसंजीवनी
देण्याची व लालूसारख्या क्षीण झालेल्या भस्मासुराला
पुन्हा एकदा सामर्थ्यवान बनविण्याच्या चुकीची पूर्ण किंमत
नितीशकुमारांना द्यावी लागणार आहे.>>>>>>>>>>>लालू भस्मासूर असता तर बिहारच्या जनतेने त्याला निवडून दिले असते का? याचा अर्थ श्रीगुरुजी बिहरच्या जनतेला मुर्ख समजत आहेत....
जंगलराज आले तरी चालेल पण मोदी नको ,असे जनतेला जेव्हा वाटते तेव्हा मोदींची नीती जंगलराजपेक्षा वाईट आहे असाच त्याचा अर्थ होतो.

जंगलराज आले तरी चालेल पण मोदी नको ,असे जनतेला जेव्हा वाटते तेव्हा मोदींची नीती जंगलराजपेक्षा वाईट आहे असाच त्याचा अर्थ होतो.

असे काहीही नाही. हा सरळसरळ नंबर गेम आहे. आणि यामध्ये पूर्वी कोंग्रेसला असलेले स्थान मिळवायला भाजपाला अजून बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. बाकी लालू नितीशचे पुढे काय हे बघणे अधिक रोचक ठरेल.

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 5:30 pm | श्रीगुरुजी

असे काहीही नाही. हा सरळसरळ नंबर गेम आहे.

बरोबर. दुरंगी लढतीत एका बाजूला एकमेकांच्या मतांची बेरीज होऊन दुसर्‍या बाजूपेक्षा ८-९% मते जास्त मिळाल्याने हा निकाल लागलेला आहे.

बाकी लालू नितीशचे पुढे काय हे बघणे अधिक रोचक ठरेल.

सध्या अशी परिस्थिती आहे.

राजद - ८०, संजद - ७३, काँग्रेस - २६, भाजप - ५२

बहुमताचा १२२ हा आकडा गाठण्यासाठी राजद्,संजद व भाजप या ३ पक्षांपैकी कोणत्या तरी २ पक्षांना एकत्र यावे लागणार. काँग्रेस व इतर कोणत्याही पक्षाची बहुमतासाठी गरज नाही. सध्या राजद व संजद एकत्र आहेत. बहुमतासाठी संजदला संपूर्णपणे राजदवरच अवलंबून रहावे लागणार आहे व त्यामुळे संजदची बाजू लंगडी झालेली आहे. मावळत्या विधानसभेत संजदकडे स्वतःचे १२८ आमदार असल्याने त्यांना बहुमतासाठी कोणाचीही गरज नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. संजदला मागे सारून राजद प्रथम क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पक्ष बनलेला आहे.

काही वेळापूर्वी लालू व नितीशकुमारांची संयुक्त पत्रकार परीषद सुरू होती. नितीशकुमार फारसे उत्साही वाटत नव्हते. लालूबरोबर पुढील ५ वर्षे संसार करायला लागणार आहे याची काळजी वाटत असावी. संजदचे भाजपबरोबर सुरळीत सुरू होते, परंतु नितीशकुमारांनी मोदींवर खार खाऊन युती तोडली. लालूबरोबरचे हे लग्न ५ वर्षे टिकेल असे वाटत नाही.

विवेक ठाकूर's picture

8 Nov 2015 - 5:36 pm | विवेक ठाकूर

नितीशकुमार फारसे उत्साही वाटत नव्हते. लालूबरोबर पुढील ५ वर्षे संसार करायला लागणार आहे याची काळजी वाटत असावी.

काय इमले बांधतायंत मनातल्या मनात. इथे लिहायला स्वतःचा उत्साह कसा टिकवायचा हे बघा आता !

लालूबरोबरचे हे लग्न ५ वर्षे टिकेल असे वाटत नाही.

याक्षणी मला तरी तसे वाटत नाही.. हे ५ वर्षे संसार करणाअर.

कपिलमुनी's picture

8 Nov 2015 - 2:53 pm | कपिलमुनी

दिल्ली , बिहार मधली जनता मूर्ख आहे.
हळूहळू मूर्खांची संख्या वाढत चालली आहे.

मुनीवर, जनता कधिच मुर्ख नसते. जनतेला स्वतःचे मत मांडण्याचे निवडणूक हे प्रभावी माध्यम आहे व प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळे देण्याची कामगिरी जनता चोख पार पाडत असते. भाजपा कुठेतरी कमी पडले हेच खरे; आधि दिल्ली आणि आता बिहार.

कपिलमुनी's picture

8 Nov 2015 - 4:55 pm | कपिलमुनी

तो प्रतिसाद उपहासात्मक आहे

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 5:37 pm | श्रीगुरुजी

लालू भस्मासूर असता तर बिहारच्या जनतेने त्याला निवडून दिले असते का? याचा अर्थ श्रीगुरुजी बिहरच्या जनतेला मुर्ख समजत आहेत....
जंगलराज आले तरी चालेल पण मोदी नको ,असे जनतेला जेव्हा वाटते तेव्हा मोदींची नीती जंगलराजपेक्षा वाईट आहे असाच त्याचा अर्थ होतो.

लालू भस्मासुर नसता तर २००५ पासून लागोपाठ ४ निवडणुकात बिहारी जनतेने त्याला का घरी पाठविले असते? मोदींची नक्की कोणती नीति जंगलराजपेक्षाही वाईट आहे? भाजपला दीड वर्षांपूर्वी जेवढी मते मिळाली होती ती मते भाजपने टिकविली आहेत. दीड वर्षांपूर्वी जितक्या मतदारांना मोदी हवे होते, तितक्या मतदारांना दिड वर्षानंतर सुद्धा मोदी हवे आहेत. इतर पक्षांनी देखील आपापली मते टिकविली आहेत. परंतु निकाल एकतर्फी लागला याचे एकमेव कारण म्हणजे भाजपविरोधात विरोधी मते एकवटली गेली.

याॅर्कर's picture

8 Nov 2015 - 5:46 pm | याॅर्कर

लालू भस्मासुर नसता तर २००५ पासून लागोपाठ ४ निवडणुकात बिहारी जनतेने त्याला का घरी पाठविले असते?

हेच भाजपला पण लागू होते.
2005-2014 = केंद्रात
2000-2015 = महाराष्ट्रात

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2015 - 6:02 pm | श्रीगुरुजी

फरक आहे. लालूचा पक्ष १९९० पासून ३ वेळा स्वबळावर निवडून आला होता. १९९५ नंतर भाजप व संजद युती असूनसुद्धा राजदने स्वबळावर सरकार स्थापन केले होते. १९९६ पासून २०१३ पर्यंत संजद व भाजप एकत्रित राजदशी लढले परंतु २००५ पर्यंत जनतेने राजदलाच कौल दिला होता. परंतु लालूच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत बिहारमध्ये अराजकाची परिस्थिती येत गेल्याने अखेर बिहारी जनतेने लालूला लागोपाठ ४ निवडणुकात घरी बसविले.

२००४ व २००९ मध्ये लोकसभेत भाजपचा पराभव होण्यामागे भाजप हा भस्मासुर असण्याची थिअरी नसून काँग्रेसने योजनाबद्ध पद्धतीने अनेक पक्षांशी आघाडी करून भाजपविरोधातील मतविभाजन टाळले हे मुख्य कारण होते. भाजपविरोधातील मते एकवटल्याने भाजपचा पराभव झाला होता.

महाराष्ट्रात अशीच परिस्थिती होती. १९९९ व २००४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा भाजप-सेना युतीला जास्त जागा होत्या, परंतु विधानसभेला कमी जागा मिळाल्या कारण आपल्यापेक्षा दुसर्‍याला कमी जागा मिळाव्यात (व जेणेकरून आपल्या पक्षाला मुक्यमंत्रीपद मिळावे) यासाठी दोघांनीही काही ठिकाणी एकमेकांचे उमेदवार पाडले. २००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचा पराभव होण्याचे एकमेव कारण म्हणजे मनसे. भाजप-सेना युती भस्मासुर असल्याने जनतेने त्यांचा पराभव केला हे त्यामागे कारण नसून मनसेने अनेक जागांवर (लोकसभेत किमान ८ जागांवर व विधानसभेत किमान ३८ जागांवर) भाजप-सेना युतीचा पराभव घडवून आणला हे ते कारण होते.

उदय८२'s picture

8 Nov 2015 - 6:07 pm | उदय८२

मिपावरचा

संबित पात्रा