फिरुनी पुन्हा..........

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जनातलं, मनातलं
6 Nov 2015 - 11:08 pm

नमस्कार ..........

माझी ही नवीन कथा तुमच्या समोर सादर करतोय.......

कथा थोडी मोठी आहे. खरतर कथेची लांबी पहाता ही दोन तीन भागात पोस्ट करायला हवी होती.

पण अश्या कथा तुकड्या तुकड्यात विभागणे एक लेखक म्हणुन व्यक्तिगतरित्या मला योग्य वाटत नाही.....

गेल्या कथेवरच्या चित्रे साहेबांच्या सुचनेनुसार ह्या कथेच्या सुरुवातीलाच नमुद करतोय की कथा थोडी मोठी आहे. सवडीने वाचा. आवडली तर नक्की सांगा....

***********************************************************************************************

फ़िरुनी पुन्हा.......

टेबलावरचा फोन कितीतरी वेळ खणखणत होता. आतापर्यंत सलग पाचव्यांदा त्या फोनची घंटी वाजत होती. संतोषला कल्पना होती की, हा कुणाचा फोन आहे ते. म्हणुन तो ही जाणुन बुजून हा फोन घ्यायचा टाळत होता. पण बहुतेक समोरचाही अगदी इरेला पेटला होता. त्या फोनच्या एकसलग वाजणार्या रिंगमुळे डोक उठत होत. अखेर न रहावुन संतोषने रिसिव्हर उचलला. समोर अपेक्षेप्रमाणे विरेंद्रच होता. संतोषने फोन उचलल्या उचलल्या विरेंद्रने "भ" ची बाराखडी सुरु करीत, आपली प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.
"अरे कुठेयस ?"
"येतोयस ना??????"
"आम्ही केव्हाचे पोहचलोय इथे.....चल ये लवकर वाट बघतोय तुझी."

"अरे सॉरी यार. आज नाही जमणार. आज थोड........" संतोष विरेंद्रला म्हणाला.

"XXXXX... कुणाला शेंड्या लावतो रे?
अजुन अर्ध्या तासात जर का तू इथे पोहचला नाहीस ना, तर मी तिथे येईन आणि तुला उचलून इकडे घेउन येईन" एव्हढ बोलून विरेंद्रने फोन कट केला.

'संतोष शिंदे' तीस वर्षाचा एक उमदा तरुण. व्यवसायाने लेखक. हल्लीच त्याची चार पाच पुस्तकही प्रसिध्द झाली होती. फार कमी वेळात संतोष एक चांगला गुढकथाकार म्हणुन नावारुपास आला होता. पण गेल्या वर्षी त्यांची एक गाजलेली कादंबरी वादाच्या भोवरयात सापडली. वाड:मय चोरीच्या आरोप त्याच्यावर लागला होता. कादंबरीतील काही प्रसंग हुबेहूब दुसऱ्या पुस्तकातून उचलले असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला होता. पण नंतर चौकशी दरम्यान त्यात काही तत्थ्य नसल्याच सिध्द झाले आणि संतोषला क्लिनचिट मिळाली होती. संतोषच निरापराधित्व कायदेशीररित्या जरी सिध्द झाल असल, तरी लोकांचा मात्र त्याच्याकडे बघायचा दृष्टीकोन बदलला होता. पूर्वी त्याच्या कथेला उत्तम प्रतिसाद देणारे, आता त्याच्या प्रत्येक नवीन लेखाला "हे अगोदर कुठेतरी वाचल्यासारख वाटतय" असे बोलून उगाचच त्याच्या जखमेवर मीठ चोळत होते. त्यातच काही समिक्षकांनी संतोषचे लिखाण हे पाश्चात नॉव्हेलवरुन चोरलेले आहे असे वाटते, असा सुर लावला होता. त्याचीच परिणीति म्हणुन की काय? त्याच्या आगामी पुस्तकांसाठी कुठलाही प्रकाशक तयार होत नव्हता. एकेकाळचा वाचकांचा लाडका लेखक, आज त्यांच्या खिजगणित ही नव्हता. चेहऱ्यावरुन दाखवत नसला, तरी संतोषला हा सध्याचा काळ फार कठिण जात होता. त्याला माहीती होत, की एक जबरदस्त स्टोरी त्याला ह्या सगळ्यातुन बाहेर काढु शकते. पण त्याच्याबाबतीत घडणार्या गोष्टी, मिडियामधली चर्चा आणि हल्ली तर त्याचा संदर्भ असलेल्या जवळपास सगळ्याच ठिकाणी फ़क्त त्याच्यासंबधीच चर्चा सुरु होती. ह्या सगळ्या प्रकरणात संतोष आता आपली बाजू मांडून मांडून थकला होता. म्हणुन की काय? की हल्ली म्हणाव तस लिखाण होत नव्हतं त्याच्याकडून. विशेष अस काही नाही पण नवीन काही सुचत नव्हतं. डोक्यात नुसते तेच तेच विचार घुमत होते. लिखाणातही तोच तोचपणा येत होता. ह्या सगळ्यातुन बाहेर पडावे, म्हणुन संतोषने आपला जनसंपर्क कमी केला होता. त्याला तस अजुन एक कारण होत. प्रत्येक वेळेस कुणी ओळखीचे भेटले की पुन्हा तोच विषय सुरु होत. संतोष अगदी विटला होता ह्या सगळ्याला. म्हणुन त्याने आताही विरेंद्रच्या पार्टीला नाही जायच अस ठरवल होत. पण विरेंद्रच्या हट्टी स्वभावापुढे त्याचा नाईलाज होता.

आता ठरल्या ठिकाणी जाणे संतोषसाठी अपरीहार्य होत. कारण विरेंद्र गायकवाड काय चीज आहे, ह्याची त्याला पुरेपुर कल्पना होती. तो गुपचुप कपडे घालून साई-दर्या हॉटेलला जायला निघाला.

**************************************************************************

पार्टीत फार मजा आली संतोषला. खुप दिवसांनी शाळेतले जुने मित्र भेटलेले. वेळही मस्त गेला. संतोष त्यांच्यामध्ये स्वत:ला फार कंफर्ट आणि रिलेक्स फिल करत होता. गेल्या काही दिवसांपासुन मनावर साचलेली मरगळ कुठेतरी दूर पळुन गेली होती. साले, शाळेतल्या मित्रांच्या बाबतीत हे एक बरं असतं. त्याच्यांत कुणीच आपला वाचक, प्रकाशक, किंवा समीक्षक नसतो. सगळे फ़क्त आपले 'मित्र' असतात. निव्वळ मित्र.......
बघता बघता सगळेजण पांगले. विरेंद्र संतोषला रात्री घरी सोडायला आला होता.

"सो...मजा आली ना आज? साला बऱ्याच दिवसांनी भेटलो" विरेंद्र संतोषला म्हणाला.

"हो ना ......हरामखोर साले, सगळे अजुन अगदी आहे तस्सेच आहेत" संतोष विरेंद्रची री ओढत म्हणाला.

"फ़क्त तू सोडुन, मग कशाला साल्या ह्या अगोदर आम्हा सगळ्यांना भेटायचं टाळत होतास?" विरेंद्र संतोषला आपली सल बोलून दाखवली. ह्यावर संतोष काही न बोलता गाडीच्या खिडकीबाहेर बघत राहिला. मग कुणीच कुणाशी बोलले नाही. एव्हाना संतोषच घर आलं

"मला कळतय यार सगळ. होईल सगळ पाहिल्यासारख ठीक. पण त्यासाठी अगोदर तू ह्या सगळ्यातुन बाहेर पडला पाहिजे. अरे मी वाचल्यात तुझ्या कथा फार जबरदस्त लिहितोस तू." विरेंद्र संतोषला अस गप्प झालेला पाहून त्याला समजावणीच्या सुरात म्हणाला. ह्यावर संतोष कसनुसं हसत गाडीचा दरवाजा उघडायला लागला.

"एक सुचवू...."

"बोल...." गाडीतून उतरता उतरता संतोष विरेंद्र काय सांगतोय हे ऐकण्यासाठी थांबला.

"तू ना दोन चार आठवड्यासाठी बाहेर फिरून ये कुठेतरी......इथून लांब गेल्यावर थोड बर वाटेल तुला. मुडपण चेंज होईल तुझा आणि एकदा तुला बर वाटल ना की आम्हालाही बर वाटेल. मी वाचलय कुठेतरी, की तुम्हा कलाकार लोकांच सगळं मुडवर डिपेंड असत म्हणे. बहुदा तुझी एखादी नवीन कथा तुझी तिथे वाट बघत असेल. बघ पटलं तर, माझ्या ओळखीतल्या बऱ्याच कंट्रातदार लोकांचे बंगले आहेत. अगदी तुला हवे तसे. मी शब्द टाकला तर फुकटात मिळतील...."
विरेंद्रने सुचवलेली आयडिया विचार करण्यासारखी होती. तसाही संतोषलाही एक ब्रेक हवाच होता ह्यासगळ्यातुन बाहेर पडण्यासाठी. पण खरच ह्याचा उपयोग होईल का?
"साउंड्स गुड.....पण...." संतोष अजुनही थोडा द्विधा मनस्थीतीत होता.
"आता पण नाही की बीण नाही. तू हा ऑप्शन ट्राय करच" ह्यावर संतोषच्या परवानगीची वाट न बघता विरेंद्रने खिशातुन नवा कोरा मोबाईल बाहेर काढला आणि कुणालातरी फोन लावला अन लगोलग मंडणगडच्या जवळचा एक बंगला बुकही करुन टाकला.

**************************************************************************

मुंबई सोडुन संतोषला आता सहा तास झाले होते. मुंबई ते मंडणगड हा अवघ्या 150 किलोमीटरचा रस्ता पण वाटेतल्या ट्रेफ़िकमुळे संतोषला ह्या मंडणगडपेक्षा कोल्हापुर जास्त जवळ वाटत होत. सकाळी 8 वाजता निघालेल्या संतोषला मंडणगडला पोहचेस तोवर 2.30 वाजले होते. विरेंद्रने संतोषला सांगितलेले की, मंडणगड एसटी स्टेंडवर तुला एक शिवदास नावाची व्यक्ती भेटेल. तीच तुला पुढे बंगल्यावर घेउन जाईल. अगोदर कळविल्याप्रमाणे संतोष एसटी स्टेंडवर दुपारी 12.00 पर्यंत पोहचायचा, तो दुपारी 2.30 ला पोहचला. आपल्याला उशीर झालेला पाहून आता तो माणुस तिथून कंटाळुन निघून नाही गेला म्हणजे मिळवली हीच चिंता संतोषला भेडसावत होती.

मुंबईहुन कुणीतरी इथल्या गव्हर्नर बंगल्यावर रहायला येणार आहे ही कल्पना अगोदरच शिवदासला बंगल्याच्या मालकांनी देऊन ठेवली होती. शिवदास हा बंगल्याचा केअर टेकर होता. तसा तोही ह्या गावात नवीनच होता. शिवदासला गावात येउन एक वर्षच झाल होत. ह्या बंगल्याच्या जुन्या केअर टेकरने अचानक कामावर येण्यास नकार दिल्याने, गेल्या वर्षीच ह्या बंगल्याच्या मालकाने शिवदासला हे काम दिल होत. मिळणार्या पैश्याच्या मोबदल्यात हे काम तस बरचस निवांत होत. जेव्हा कधी ह्या बंगल्यात पाहुणे येतील तेव्हा त्यांची बडदास्त ठेवणे एव्हढ्च काय ते काम. इतर वेळेस फ़क्त आराम म्हणुन शिवदासनेही हे काम आनंदाने स्विकारलं होत.

स्टेंडवरती एका टिपटॉप माणसाला रेंगाळताना शिवदासने पाहिलं आणि हाच तो मालकाने सांगितलेला पाहुणा असणार असा शिवदासने अंदाज लावला. तो लगबगीने त्या व्यक्तीजवळ पोहचला.

"आपणच शिंदेसाहेब का?"

संतोषने होकारार्थी मान डोलावताच, त्याच्या परवानगीची वाट न पहाता. शिवदासने त्याच्या हातातली हेंडबेग स्वत:च्या ताब्यात घेतली आणि म्हणाला.

"चला........."

संतोष शिवदासला काही विचारणार तोवर शिवदास बेग घेउन चालायलाही लागला अन बघता बघता तो स्टेंडच्या दारापर्यंत पोहचलाही. आता संतोषही त्याच्यामागुन गपगुमान चालु लागला.

अगोदरच एव्हढा झाला तेव्हढा प्रवास कमी होता की काय म्हणुन एव्हाना वीस मिनिट होत आलेली तरी शिवदास अजुन चालतच होता. गाव कधीचाच मागे पडला होता. पायाखालाचा डांबरी रस्त्याने संपून आता लाल मातीच्या वाट चालु झाली होती.

"अजुन किती लांब आहे???" संतोषने धापा टाकित विचारले.

"बास...आलं जी.इथून डावीकडे वळलं की 50 पावलावर आलं मग" शिवदास तत्परतेने म्हणाला.

शिवदासने सांगितल्याप्रमाणे डावीकडुन वळल्यावर थोड्याच वेळात एक गेट दिसू लागला. शिवदासने हाताने गेट ढकलला. समोरच दृष्य पाहून संतोष भारावून गेला. विरेंद्रच्या मित्राचा बंगला खरच खुप छान होता. बंगला तसा आडबाजुला होता खरा, पण ह्याच एकांताच्या शोधात तर तो इथे आला होता. बंगल्याची वास्तु खुप जुनी होती. मोठमोठ्या दगडांच्या भिंती तश्याच दगडांच्या कमानी तिच्या भारदस्तपणात भर घालत होत्या. बंगला चांगला दुमजली होता. बंगल्याचं बांधकाम इंग्रजांच्या धाटणीच होतं. म्हणुनच येथील गाववाले ह्या बंगल्याला गमतीने 'गव्हर्नरचा बंगला' असे म्हणायचे. ह्या बंगल्याचा रचनाकार फार दर्दी असणार कारण बंगला खरच खुप देखणा होता. ह्या बंगल्याला गव्हर्नर बंगला का म्हणतात? ह्याची प्रचिती बंगल्याच्या रुबाबाकडे पाहून पुरेपुर पटत होती. गेटपासुन एक पेव्हमेंटचा रस्ता बंगल्यापर्यंत गेला होता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुस मस्त लॉन होत. मात्र त्या लॉनच वाढलेलं गवत ह्या बंगल्याची नियमीत देखभाल होत नसल्याच जाणवुन देत होत.

"उद्याच माणस आणुन कापतो साहेब" संतोषची लॉनवर खिळलेली नजर पाहून शिवदास अजिजीने म्हणाला.

"हम्म्म्म्म....." संतोषला तसही शिवदासने गवत कापले काय किंवा नाही कापले काय ? काही फरक पडणार नव्हता, पण काहीतरी प्रतिक्रया द्यायला हवी ह्या उद्देशाने संतोष फ़क्त सुस्कारला.

शिवदासच्या पाठोपाठ संतोष बंगल्यात शिरला. तो आज प्रचंड दमला होता. आल्या आल्या त्याने समोरच्या सोफ्यावर अंग टाकले. थोड विसावल्यावर त्याने आजुबाजुला नजर फिरवली. आतला नजारा पाहून तो अचंबीत झाला. बंगल्याची आतली सजावट ही बाहेरील दर्शणीय भागापेक्षाही कितीतरी पटीने अजुन प्रेक्षणीय होती. सोफासेट, डायनींग, भितिंवरचे पेंटिंगस- वॉलपीस लक्ष वेधून घेत होत्या. बाजुच्या भितिंवरच भलंमोठं टोल्याच घड्याळ होत. संतोष सगळा बंगला पाहून भारावून गेला होता.

शिवदास संतोषच सामान त्याच्या वरच्या बेडरुम मध्ये ठेवून आला. खाली आल्या आल्या त्याने समोरच कोचवर निवांत पसरलेल्या संतोषला बंगल्याची जुजबी माहीती देण्यास सुरुवात केली.

"साहेब, तुमच सामान वरती डाव्याबाजुला असलेल्या रूममध्ये ठेवलय. इथे खाली उजव्या बाजुला किचन आहे. तिकडे सगळी सोय आहे साहेब. गेस, फ्रिज, भांडी सगळ सगळ. पाण्याचा पण काय प्रॉब्लेम नाही. सकाळी एकदा वरच्या टाकीत पाणी चढवल की दिवसभर काही टेंशन नाही बघा. मी इथे एकदा सकाळी, नंतर दुपारी जेवणाच्या वेळेस आणि रात्रीचं जेवण संध्याकाळच्या वेळेस घेउन येईन. तुम्हाला नाश्त्याला किंवा जेवणाला काही हव असेल तर मात्र आगाऊ कळवाव लागेल." शिवदासने इथले त्याने तयार केलेले नियम एका दमात संतोषला सांगितले.

"तू इथे नाही रहात?" संतोषने विचारलं.

"नाही" शिवदास चाचरत म्हणाला.

"पण इथून जवळच रहातो. हा घ्या माझ्या शेजारच्याचा नंबर बोलावलत तर वीस मिनिटाच्या आत हजार होईन. फ़क्त रात्रीचा नाही येणार"

"का?" संतोष ने कुतुहलाने विचारलं.

"त्याच काय आहे की घरी बायको आजारी आहे. तिला एकटीला सोडुन नाही येता येणार" शिवदास अडखळत म्हणाला.

"पण तुम्ही इथे नक्की किती दिवस रहाणार आहात?" शिवदासने हळूच संतोषला विचारलं.

"ते, अजुन ठरवल नाही. पण का?" संतोषने उत्तर दिलं.

"काही नाही सहजच विचारलं" शिवदासने सांगितलं.

"म्हणजे नुसतेच फ़िरायला आला आहात की काही कामानिमित्त????" थोड्यावेळाने शिवदासने पुन्हा एकदा संतोषला विचारल.

"काम म्हटलं तर आहेपण आणि नाहिपण" संतोष खिडकीच्या बाहेर पहात म्हणाला.

"अच्छा म्हणजे नुसतेच टाईमपास करायला आला आहात तर. पण ह्या गावात तीन चार दिवसापेक्षा जास्त दिवस टाईमपास होत नाही. तुम्हीपण त्याच अंदाजाने आला असाल ना?"
संतोषला शिवदासचा हे प्रश्न विचित्र वाटत होते. शिवदास अजुन काहितरी विचारणार होता.
तेव्हढ्यात.............
"मला एक चहा मिळेल...?" संतोषने शिवदासला विचारलं. ह्यावर शिवदास काय समजायच ते समजला.

वरती रूममध्ये आल्यावर हात पाय धुवून संतोष बेडवर पहुडला होता. प्रवास खरच खुप कंटाळवाणा झाला होता. त्याला आता एका कडक चहाची नितांत गरज होती. खाली शिवदास किचनमध्ये मोठमोठ्याने गाणी म्हणत होता. संतोषच शिवदासच्या बाबतीत प्रथम दर्शनी मत काही चांगल बनलं नव्हतं. त्याला तो थोडा आगाऊच वाटत होता. 'मरो आपल्याला कुठे त्याच्याशी लग्न करायचय?' असा विचार करीत संतोष फिरत फिरत त्याच्या बेडरुमला लागुन असलेल्या बंगल्याच्या टेरेसवर आला आणि समोरच दृष्य पाहून तो चांगलाच खुष झाला. त्याच्या डोळ्यासमोर जिथवर नजर जाईल तिथवर निळा समुद्र पसरला होता. समुद्रावरून भनानत येणारा वारा, अंगावर शहारे उमटवत होता. बंगल्याच्या समोरच्या भागाप्रमाणेच मागील भागातही एक छोटेखानी लॉन होत. त्या लॉनच्या भवताली लाकडाचं एक कुंपण होत. हा बंगला समुद्र सपाटीपासुन साधारण वीस-बावीस फ़ुट उंचावर एका टेकडीसदृश भागावर बांधला होता. बंगल्याच्या त्या कुंपणाची हद्द संपताच त्या टेकडीचा उतार सुरु होत होता. ती टेकडी कुठल्यातरी रानफ़ुलांच्या झुडुपांनी वेढलेली होती. त्या झाडांमधुन एक रस्ता ती टेकडी उतरून समोरच्या चमचमणार्या वाळुत अंर्तधान होत होता. संतोष समोरच्या नयनरम्य देखाव्यात इतका हरवून गेला होता की पाठी शिवदास उभा असलेला त्याला कळला देखिल नाही.

"साहेब, चहा???????"

शिवदासने अचानक मारलेल्या हाकेमुळे संतोष केव्हढ्याने तरी दचकला. पाठीमागे शिवदासला आपल्या इतक्या जवळ उभे असलेले पहाताच, संतोषची सटकली होती. पण ती त्याने चेहरयावर न दाखवता गुपचुप त्याने दिलेला चहाचा कप तोंडाला लावला. चहाचा एक घोट घेताच संतोषला तरतरी आली.

संध्याकाळी खाली हॉलमध्ये संतोष पुस्तक वाचत बसला होता. तेव्हढ्यात शिवदास तिथे आला.

"साहेब,अजुन काही हव आहे का?"

"नाही नको...." पुस्तकावरची आपली नजर न हटवता संतोषने शिवदासला उत्तर दिले.

शिवदास अजुन तिथेच घुटमळत उभा होता. त्याची सुरु असलेली घालमेल संतोषच्या नजरेतुन सुटली नाही. संतोषने पुस्तकावरची नजर हटवुन शिवदासकडे पाहिलं

"मग मी येतो साहेब...नाही म्हटलं आता अंधारही पडलाय मला आता निघायला हवं." उत्तरादाखल संतोष फ़क्त ठीक आहे एव्हढच म्हणाला. संतोषची अनुमती मिळताच
"जेवण सगळ करून ठेवलय साहेब. मी उद्या सकाळी बरोबर आठाला येतो." अस बोलता बोलता शिवदास दरवाजापर्यंत पोहचला देखिल.

"रात्री दरवाजा नीट लावून घ्या साहेब" बंगल्यावर आपली एक भिरभिरती नजर टाकीत शिवदास संतोषला म्हणाला. संतोषला ज़रा ते विचित्रच वाटलं.

शिवदास निघून गेल्यावर घरातल्या शातंतेने संतोषचा ताबा घेतला. आता एव्हढ्या मोठ्या बंगल्यात आपण एकटच रहायच, ह्या विचाराने तो थोडासा गडबडला होता. पण लगोलग त्याने स्वत:ला सावरल. अशी एकटी रहायची ही काय आपली पहिलीच वेळ थोडीच आहे? आजवर आपण एकटेच तर रहात आलोय. उलट माणसांपेक्षा हा एकटेपणाच आपल्याशी ज़रा जास्त प्रामाणीक रहालाय. निदान त्याने कधी आपल्याला एकट तर सोडल नाही. अस त्याने स्वत:च स्वत:ला समजावले आणि पुन्हा पुस्तकात स्वत:ला बुडवून टाकलं.

शिवदासने केलेले जेवण उरकून संतोष आता झोपायच्या तयारीला लागला. बराच प्रयत्न करूनही त्याला झोप काही येत नव्हती. बहुतेक जागा नवीन असल्यामूळे होत असेल कदाचीत, अस स्वत:लाच समजावून संतोष बेडवर पडल्या पडल्या झोपेची वाट पाहू लागला. उत्तररात्री कधीतरी त्याला झोप लागली.

****************************************************************************

सकाळी संतोषला जाग आली तीच मुळी जोरजोरात दार वाजवण्याच्या आवाजाने. संतोष दचकून उठला. क्षणभर आपण कोठे आहोत ह्याचा अंदाजच त्याला लागत नव्हता. नंतर त्याला आपण इथे काल आलेलो हे आठवले. रात्री उशीरा झोपल्यामुळे त्याच्या डोळ्यांवरुन झोप अजुन उडाली नव्हती. तो भानावर येईपर्यंत दारावरची थाप पुन्हा ऐकू आली. इतक्या सकाळी सकाळी कोण आल असेल ह्याचा विचार करीत दार उघल्यावर समोर शिवदासला पाहताच संतोषला काल शिवदासने तो सकाळी लवकर येणार असल्याचे सांगितलेले आठवले.

"काय साहेब? किती उशीर दार उघडायला?" शिवदासने आत येत वैतागत विचारले.

"अरे सॉरी, काल उशीरा झोपलो म्हणुन ज़रा डोळा लागला होता" संतोष दिलगीरी व्यक्त करत म्हणाला.

"का हो, काय झाल? " शिवदासने चमकून विचारलं. पण संतोषला शिवदासच्या या आवाजात उत्सुकतेपेक्षा भीतीच जास्त जाणवली. तो संतोष काय उत्तर देतो ह्याकडे लक्ष देऊन ऐकत होता. संतोषला शिवदासच असं वागणं विचित्र वाटलं

"नाही, काही नाही" संतोष काहीतरी उत्तर देऊन वर आपल्या बेडरुममध्ये निघून गेला. संतोष निघून गेल्यावर शिवदासने आपली एक दबकी नजर घरावरून फिरवली.

संतोष आंघोळ करून बाहेर आला. सगळी तयारी करून तो कालचं अर्धवट राहीलेले पुस्तक वाचु लागला. खालून शिवदासच्या मोठमोठ्याने गाण्याचा आवाज येत होता. खरतर संतोष शिवदासच्या ह्या रेकण्याला वैतागला होता. पण असते एकेकाची सवय असे मनाशी ठरवुन तो पुन्हा पुस्तकात डोक खुपसून बसला. वाचता वाचता संतोष कधी झोपी गेला हे त्याच त्यालाही कळलं नाही.

"साहेब जेवण तयार आहे."

शिवदासच्या हाकेने संतोष दचकून उठला. घड्याळात पाहिल तर दुपारचे 1.30 वाजले होते. म्हणजे संतोष नाही म्हणता बराच वेळ झोपला होता. संतोषला आज स्वत:लाच फार आश्चर्य वाटत होते स्वत:चे. कारण आजवर रात्री कितीही जागरणं झाली तरी दिवसा झोपण्याची त्याची सवय नव्हती. बहुतेक कालच्या प्रवासाचा परिणाम असावा अस वाटल त्याला. खरतर ही एव्हढी काही लक्ष देण्याची गोष्ट नव्हती, पण तरीही काहीतरी चुकल होत अस त्याला राहून राहून वाटत होत.

जेवण उरकल्यावर शिवदासने घरी जाण्याची परवानगी मागितली. संतोषने परवानगी दिली.

"अरे ती समोरची खोली बंद का आहे रे?" संतोषने शिवदासला विचारलं.

"ते...ते.आपलं हे ...हो साहेब. "

"काय आहे त्याच्यात?" संतोषने कुतुहलाने शिवदासला विचारलं

"मला नाही माहिती साहेब. मी जेव्हापासून इथे काम करतोय तेव्हापासून पहातोय ती खोली बंदच आहे. आणि तसही त्या खोलीची चावी माझ्याकडे नाहिए." शिवदास संतोषने विचारलेल्या ह्या प्रश्नांच फार सावधपणे उत्तर देत होता. उत्तर देताना त्याची होणारी चलबिचल संतोषला जाणवतं होती. आपण सहजच विचारलेल्या ह्या प्रश्नांला शिवदास एव्हढा का गोंधळला हे संतोषला समजत नव्हतं. जाऊ दे तसही ह्या शिवदासकडून साध्या साध्या प्रश्नांचीही विचित्र उत्तरच मिळतात हे एव्हाना संतोषला कळुन चुकलं होतं.

"ह्या इथे आजुबाजुला काही फ़िरण्यासारख आहे का?" संतोषने विषय बदलत शिवदासला विचारले.

"गावात तस जास्त काही नाही. एक बाजारपेठ, एक जून गावदेवीच मंदीर, आणि उरलेला हा समुद्र. बास एव्हढच आहे ह्या गावात, बाक़ी काही ख़ास नाही" शिवदासने सांगितलं.

"ठीक आहे." संतोष उत्तरला.

"साहेब तुम्हाला कंटाळा आलाय का? हवतर दुसरीकडे सोय करतो तुमची. रेटची काळजी करू नका. इथल्यापेक्षा कमी दरात नक्की करून देईन, ते तुम्ही माझ्यावर सोडा" शिवदास चाचरत म्हणाला.

शिवदासच्या ह्या प्रपोजलवर संतोष वैतागला.
"तुझा प्रॉब्लेम काय आहे नक्की? मी इथे आल्यापासून पहातोय, मी इथून कधी जातोय फ़क्त हयाचीच चौकशी चालू आहे. हे बघ तुला जर का इथल काम जमण्यासारख नसेल तर तस सांग. मी माझी दुसरीकडुन सोय करून घेईन आणि इथे काम करून दुसऱ्या लोकांची जाहिरात करतोस काय? इथल्या मालकाला हे कळलं तर तुझ काय होईल ह्याचा विचार केलायस का?"

संतोषला रागावलेला पाहून शिवदासची फ़ाफ़लली. संतोषने रागावून जर आपली तक्रार मालकाकडे केली, तर आपली काही खैर नाही हे शिवदास समजुन चुकला होता. अजुन ह्या गावात जोवर आपला जम बसत नाही तोवर हे काम सुटून शिवदासला चालण्यासारख नव्हतं.

"साहेब, एकदा मला माफ़ करा. पुन्हा अस नाही होणार. खर तर मला तुम्हाला वेगळ सुचवायच होत.पण...." शिवदास आपली बाजू मांडत म्हणाला.

"आता पण बीण काही नाही..आजपासून मी जेव्हढ विचारेन तेव्हढच सांगायच. आणि हो.... जोवर मी ह्या घरात आहे तोवर मोठमोठ्याने गाणी रेकायची नाहीत. समजलास....???" संतोष म्हणाला.

"ठीक आहे साहेब. ह्यापुढे लक्षात ठेवीन" शिवदास ओशाळत म्हणाला आणि तिथून निघून गेला.

*****************************************************************************

इथे येउन संतोषला आता दोन दिवस झाले होते. इथल्या शांत वातावरणाचा संतोष वर चांगला फरक जाणवत होता. ह्या नवीन वातावरणात सगळ चांगल होत. बहुतेक विरेंद्रने दिलेला सल्ला अंमलात येत होता. सगळी जुन्या विचारांची जळमटं गळुन पडली होती. इथल्या एकांतात मनाला हवी तशी शांतता मिळत होती. संतोष शरीरासोबत मनानेही बरचसा फ्रेश झाला होता.

त्या संध्याकाळी टेरेसवर समोरच्या निवांत पसरलेल्या समुद्राकडे पहात संतोष कॉफ़ी पित बसला होता.

कॉफ़ी पिता पिता तो विचार करू लागला. आता लिखाण करायला काही हरकत नाही. पण ह्यावेळेस काहीतरी वेगळ लिहू.

समथिंग डिफ़रेंट......

"काहीतरी विनोदी लिहायच का?"

"नाही नको" त्याच्या मनाने त्याला लगेच उत्तर दिलं. "तुझ्या लिखाणाला विनोदाच अंग नाही हे तुलाही माहिती आहे. मागे एक दोनदा काही विनोदी मासिकांसाठी तु तसा प्रयत्नही करून पाहिला होतास. काय झालं? त्यांनी तुझा लेख "तुमचे विनोद आमच्यासारख्या सामान्य वाचकांच्या डोक्यावरून जातात" अश्या शालजोडीतुन परत पाठवला.

"मग तत्कालीन सामाजीक जाणिवेवर काहीतरी लिहायच का?"

तर त्यावरही त्याच्या मनाने लगेच नकार घंटा वाजवली "ते तर सगळेच लिहितात. त्यात मजा नाही यार. फुकट परत वाद-विवादांना तोंड फुटेल"

"मग...एखादी लव्हस्टोरी????"

"हम्म्म......सांऊडस इंटरेस्टिंग....." मनाने विचार करून उत्तर दिले.

पण आपल्याला साला त्याचा काय एक्सपिरियंस नाही आणि ह्या बाबतीत काल्पनीक लिहिण्यात अजिबात मजा नाही.

"अरे नसु दे की, प्रत्येक गुढकथा काय तुझ्या आयुष्यात खरोखरची घडली होती?? त्या देखील तुझ्या फ़ेंटसीजच होत्या ना? मग ही पण तुझी एक फ़ेंटसी समज आणि लिहून टाक" मनाने संतोषच्या त्या शंकेवर एक चांगला मुद्दा मांडला होता.

"अरे कल्पनाविलासच जर का करायचा आहे, तर मग माझ्या गुढकथा काय वाईट आहेत." संतोषने मनाला विचारले.

"नाही नको, पुन्हा त्या गुढकथा नको. एकदा झाल्या तेव्हढ्या पुरे झाल्या."

"ठीक आहे, बघुया कस जमतय ते. जेव्हा जे सुचेल तेव्हा तस लिहू." असे म्हणुन संतोषने आपल्या आणि मनाच्या चर्चासत्राला पूर्णविराम दिला आणि जिभेवरल्या कॉफ़ीच्या चवीचा आनंद घेत समोरच्या रेंगाळणार्या संधिप्रकाशात हरवून गेला.

*****************************************************************************

मंडणगडच्या गावात संतोषचा बराचसा वेळ अगदी निवांत जात होता. दिवसभर शिवदास त्याच्या सोबतीला असायचा. नाश्ता आणि जेवणाच्या कामानंतर त्याला तस दुसर काही काम नसायच. मग संतोषच्या परवानगीने तो त्याची गावातली इतर काही काम आटपुन यायचा. संतोषलाही तो नसला की बरंच वाटायच. शिवदास तसा चांगला होता. पण नुसती बडबड आणि सारख अघळ पघळ काहीतरी बोलत असायचा. मुख्य म्हणजे त्याला बोलण्यासाठी संतोषचीही गरज भासायची नाही. संतोषने कित्येकदा त्याला एकटाच स्वत:शी बडबडताना पाहिल होत. असते एकेकाची सवय असे समजुन संतोष त्याच्याकडे लक्ष देत नसे. पण एक गोष्ट संतोषला जाणवली होती की, शिवदास ह्या बंगल्यात एकट रहाण्यास कचरत होता.....

दिवसाही..........

पण एकंदरीत पहाता इथे संतोषच मन रमल होत. एकतर त्याला इथे हवा तसा एकांत मिळत होता. दुसर म्हणजे शिवदासच्या हातच जेवण. फ़ार झक्कास जेवण बनवायचा शिवदास. संतोषचा इथला दिनक्रमही निवांत होता. दिवसभर आराम नाहीतर पुस्तक वाचणे. संध्याकाळी जवळच असलेल्या गावदेवीच्या मंदिरात जाउन यायचे. नाहीतर गावात एक फेरफटका मारून यायचा. कधी बाजारपेठेत चक्कर टाकायची.

पण त्याला सगळ्यात जास्त आवडायचा तो इथला समुद्र.......

ह्या मंडणगडला अप्रतिम समुद्रकिनारा लाभला होता. फारच सुंदर, शांत आणि एकटा. व्यवहाराची अजिबात जाण नसलेला. मन रमायच त्याच तिथे. संध्याकाळी कितीतरी वेळ तो तिथे बसून असायचा.

बाक़ी सगळ ठीक होतं, पण एकच गोची होती.

का कुणास ठावुक त्याला रात्रीची झोप मात्र यायची नाही. रात्र रात्र तो जागाच असायचा. सकाळी कधीतरी डोळा लागायचा. अस आजवर संतोषच कधीच झाल नव्हत.

*****************************************************************************

एकंदरीत संतोषला इथला मुक्काम आवडला होता. त्याने विरेंद्रला फोन करून आपण आपला मुक्काम इथे वाढवत असल्याचे कळवुन टाकले. विरेंद्रनेही त्याला तू तुला हवे तेव्हढे दिवस तिथे रहा काही लागल्यास कळव असे सांगितले. सुरुवातीला आपण इथे किती दिवस रहाणार ह्याबाबतीत स्वत:च साशंक असल्याने संतोषने जास्त सामान सोबत आणले नव्हते. आता इथे रहायच नक्की केलच आहे तर जरुरीच्या सामानाची खरेदी करायला लागणार होती. त्याच निमित्ताने संतोष आज संध्याकाळी फिरता फिरता बाजारात आला होता. इथला बाजार ह्या आडगावाच्या मानाने बराच अदयावत होता. जे सामान इथे मिळण्याची शक्यता कमी आहे असे संतोषला वाटत होते त्या सगळ्या गोष्टी संतोषला इथे हव्या त्या ब्रेंडनिशी मिळाल्या. त्यामुळे संतोषला खरतर फ़ार नवल वाटत होत. पण हे एकच कारण नव्हतं. खरतर अजुन एका गोष्टीमुळे संतोष चक्रावला होता. गावातली माणसं तशी साधी होती. बोलायलाही चांगली होती. संतोष ह्या गावात नविन आहे हे कळल्यावर ते फार कुतुहलाने त्याची चौकशी करीत होते. पण हेच कुतुहुल संतोषचे रहायचे ठिकाण कळल्यावर मात्र काळजीत बदलत होते. आपण आपले राहाण्याचे ठिकाण सांगितल्यावर लोकांचे चेहरयावरचे भाव बदलतात ही गोष्ट संतोषच्या नजरेतुन सुटली नव्हती. त्याने ए्कादोघांना त्याबाबत विचारलेही, पण कुणी काही नीट बोलले नाही. संतोषला हा सगळा प्रकार थोडा विचित्र वाटत होता. त्याने ह्याबाबतीत शिवदासला विचारायच ठरवलं.

संतोषला बाजारातून घरी येईस्तोवर रात्र झाली होती. ओळखीच्या खाणाखुणा एव्हाना अंधुक झाल्या होत्या. इतक्या रात्री घरी परत यायची ही संतोषची पहिलीच वेळ होती. त्यामुळे काळोखात त्याचा रस्त्याचा अंदाज चुकत होता. अखेर कसाबसा संतोष बंगल्यावर पोहचला. त्याने बंगल्याकडे पहिलं तर तो चमकला. कारण बर्यापैकी रात्र झाली असतानाही बंगल्याचा अजुन एकही दिवा लागला नव्हता. सगळीकडे अंधार दाटला होता. तेव्हढ्यात संतोषला बंगल्याच्या गेटवर एक आकृती उभी असल्यासारखी वाटली. त्याने जवळ जाऊन पाहिले तर तो शिवदास होता.

"अरे....तू असा गेटवर का उभा आहेस?" संतोषने शिवदासला गेटच्या बाहेर अस्वस्थ उभ असलेले पाहून विचारले.

"काही नाही, घरी जायच होतं, म्हणुन तुमची वाट पहात इथे उभा होतो" शिवदास घाईघाईत बोलला.

"अरे मग इथे असा बाहेर का उभा आहेस? आत बंगल्यात थांबायच ना?" संतोषने विचारलं.

"बंगल्यात?????" अस नुसतं म्हणताना देखिल शिवदास केव्हढातरी दचकला.

"नाही नको. इथेच ठीक आहे. चला येतो मी. ही घ्या बंगल्याची चावी. उद्या सकाळी भेटु" मागे बंगल्याकडे एकवार नजर टाकुन शिवदास लगबगीने अंधारात नाहीसा झाला. संतोषला शिवदासच हे असं वागणं ज़रा खटकलच. एकतर तो पहिलाच बाजारात घडल्या गोष्टीमुळे चक्रावला होता. त्यात पुन्हा हे अस शिवदासच विचित्र वागण भर घालत होत.

"मरो....उद्या बघु" एव्हढ बोलून संतोष अंधारात बंगल्याच्या दिशेने चालु लागला.

आज बंगल्यात त्याला ज़रा जास्तच एकट वाटत होता. का कुणास ठावुक पण रात्री इथे राहु नये असाच काहीसा विचार राहून राहून त्याच्या मनात येत होता. संध्याकाळपासुन घडलेल्या गोष्टी अजुनही डोक्यात फिरत असल्यामुळे असे नको नको ते विचार डोक्यात येत असावेत अस संतोषला वाटलं. एकतर साली तशीही इथे रात्रीची झोप येत नाही. त्यात पुन्हा असल काही म्हणजे दुष्काळात तेरावा महीना. पण आज तो काहीतरी ठरवून आला होता. त्याने लगेचच आज बाजारातून आणलेली ओल्डमंकची बॉटल बाहेर काढली आणि आजची रात्र तो ह्या ओल्डमंकच्या नशेत विरघळवण्याचा प्रयत्न करू लागला.

ओल्डमंकने आपलं काम चोख बजावलं होत. संतोष आज पहिल्यांदाच ह्या बंगल्यात आल्यापासून शांत झोपला होता. आजुबाजुच्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टी गडद अंधाराची चादर अंगावर ओढुन निद्रेच्या अधीन झाल्या होत्या.

फ़क्त एकजण सोडुन.....

एक सावली बेडरुमच्या खिडकीतुन मगासपासुन झोपलेल्या संतोषकडे कितीतरी वेळ नुसती एकटक पहात होती.

*****************************************************************************

सकाळी नेहमीप्रमाणे आठ वाजता शिवदास आला. आल्या आल्या त्याच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. खरतर त्याच्या ह्या सवयीचा इतर दिवशी संतोषला रागच यायचा, पण आज संतोष त्याला काही बोलला नाही. तो अजुनही कालच्याच तंद्रीत होता. काल रात्री बऱ्याच दिवसानी संतोषला चांगली झोप मिळाली होती. पण बऱ्याच दिवसानी काल ड्रिंक्स केल्यामुळे संतोषला तशी चांगलीच किक बसली होती. त्यामुळे त्याच डोक गरगरत होत. एकप्रकारची बधीरता आली होती त्याला.

"काय झालं साहेब?" शिवदासने अश्या अचानक विचारलेल्या प्रश्नांने संतोष दचकला.

"नाही... काही नाही, कुठ काय??" संतोष स्वत:ला सावरत म्हणाला.

"नक्की??? काही झालं नाही ना?" हे संतोषला विचारत असताना शिवदासची नजर मात्र वाड्यावर फिरत होती.

"नाही रे बाबा, ज़रा डोक दुखतय बाक़ी काही नाही. एक काम कर मला एक कडक कॉफ़ी बनवून दे" संतोष खरतर शिवदासच्या नको तेव्हढ्या चौकसपणावर वैतागला.

कधी जास्तीचा आरामही अंगात सुस्ती आणतो तसच काहीस त्याच्याबाबतीत झालं होत. कंटाळा घालवण्यासाठी तो समुद्रावर फिरायला गेला. संतोषला इथे येउन आता चार दिवस झाले होते. इथे येउन त्याच्या मनाला शांत तर वाटत होते, पण त्याचा खरा उद्देश मात्र अजुनही तडीस गेला नव्हता. म्हणुनच संतोषने आता तिथून निघायचा निर्णय घेतला होता. तसही त्याला इथे येउनही काही सुचत नव्हतं. उगाचच इथे राहून वेळ घालवण्यापेक्षा मुंबई आपल्या घरी परत जायचा त्याचा निर्णय जवळ जवळ पक्का झाला होता. बराच वेळ संतोष नुसता चालतच होता. आजुबाजुच्या परिसराचा अंदाज घेता विचारांच्या नादात आज आपण चालता चालता फार दूर निघून आलोय हे संतोषला जाणवले. त्याने मागे वळुन पाहिलं तर अख्ख्या किनारयावर तो एकटाच होता. दूर दूर पर्यंत त्याशिवाय दुसरं कुणीच दिसत नव्हतं. फारच शांत परिसर होता. समुद्रांच्या लाटांखेरिज बाक़ी कुणाचाच आवाज नव्हता. संतोषने एकवार सभोवताली नजर फिरवत परत घरी जाण्यासाठी वळला आणि थांबला.

गरकन मागे वळुन त्याने समोर पाहिलं आणि पहातच राहिला.

समोर किनाऱ्याच्या एका कडेला खडकांची रांग होती. त्या खडकावर कुणीतरी बसल होत. संतोष कुतुहलाने कोण असावं हे पहाण्यास पुढे गेला. अवघ्या पाचव्या मिनिटाला तो तिथे पोहचला.

त्याने पाहिलं की तिथे एक तरुण मुलगी पाठमोरी बसली होती. बहुतेक असावी पंचवीस सव्वीशीची. तिने लाल रंगाचा फ़्रॉक घालता होता. ती कश्याततरी फार गुंग होती. तिचे मानेवर रुळणारे कुरळे केस समुद्रावरून येणार्या वाऱ्यामुळे सारखे अस्त्याव्यस्त होत होते. संतोष ती नेमकी काय करतेय हे पाहण्यासाठी अजुन थोडा पुढे झाला. त्याने पहिलं की, तिच्या हातात रंगाच साहित्य होत. ती कसलतरी चित्र काढीत होती. संतोष तिच्या पाठीमागे जाउन उभा राहिला. त्याला आता ती काय करतेय हे स्पष्ट दिसत होतं. ती अगदी तल्लीन होऊन समोरची क्षितिजावरची संध्याकाळ रंगांनी आपल्या हातातल्या केनव्हासवर उतरवत होती.

अगदी हुबेहूब......

"Wow!!! simply marvelous" नकळत संतोषच्या तोंडुन शब्द बाहेर पडले.

संतोषच्या आवाजाने ती दचकली. एका अनोळखी व्यक्तीला आपल्या इतक्या जवळ उभ असलेल पाहून थोडी भांबावली आणि गडबडुन लगेच उठून उभी राहिली. संतोष तिच्याकडेच पहात होता. ती खुप सुंदर अशी नाही पण रेखीव नक्किच होती. तिला आपल्याला घाबरलेल पाहून संतोष ओशाळला. आपण खरच तिला अस दचकवायला नको होत. संतोष तिला काही बोलणार तेव्हढ्यात ती काहीएक न बोलता आपल सगळ सामान घेउन तिथून पळुन गेली.

संतोषही मग थोडा वेळ तिथे थांबुन, मग बंगल्यावर परत आला.

संध्याकाळी शिवदास निघून गेल्यावर संतोषला एकटेपणा खायला उठत होता. रात्री झोप न येण्याचा प्रकार सोडला तर इथे रहाण्यात संतोषला बाक़ी काहीच प्रॉब्लेम नव्हता. समोर ओल्डमंकची बॉटल संतोषला खुणावत होती. पण आता एकवेळ झोप नाही आली तरी चालेल पण उगाच नको ती सवय नको असे स्वत:ला समजावून संतोषने ती ओल्डमंकची बॉटलवरची आपली नजर हटवली आणि तो पुस्तक वाचायला लागला. मध्यरात्र उलटून गेली होती. पुस्तक वाचता वाचता संतोषला आता पेंग येउ लागली आणि संतोष सावकाश निद्रेच्या अधीन होउ लागला. खाली हॉलमधल्या घड्याळ्याने रात्रीच्या दोनचे टोले दिल्यानंतर पुन्हा एकदा शांततेने सगळ्या जागेचा ताबा घेतला. सगळीकडे सामसूम होती. सगळीकडे आलबेल असताना कसल्यातरी आवाजाने संतोषची झोप चाळवली गेली. थोडा वेळाने पुन्हा तसाच आवाज झाला. ह्यावेळेस थोडा स्पष्ट. संतोष त्या आवाजाने जवळ जवळ उठलाच. तो डोळे मिटुन पलंगावर पडल्या पडल्या तो आवाज पुन्हा येतोय का? ह्याची चाचपणी करू लागला. दोन मिनिटच झाली असतील की तो आवाज पुन्हा आला. बरोबर बेडरुमच्या दारामागुन. कुणितरी दरवाज्यावर नॉक केल होत अगदी ठसठशीत.......

'टक-टक'

संतोष उठून बसला त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. हा भास् तर नक्कीच नव्हता. कारण तो आवाज तिन्ही वेळेस त्याने एका ठरावीक अंतराने स्वत:च्या कानांनी ऐकला होता. तेव्हढ्यात दारावर पुन्हा "टकटक" झाली. संतोष ह्या आवाजाने कमालीचा दचकला. खरच ह्या दारामागे कुणी आहे की हा खरच आपला भास् आहे हे जाणुन घेण्यासाठी संतोष सावकाश दाराच्या दिशेंने चालु लागला. तो दाराजवळ पोहचलाच होता की दारावर पुन्हा टकटक झाली. त्याने आवाजासरशी लगेच दार उघडल, पाहिलं तर दारामागे कुणीच नव्हतं. संतोष गडबडला. त्याने पेसेज मध्ये दोन्ही बाजुला वाकून पाहिलं. पण पेसेज अगदी सुमसाम होता. त्याने घाबरून हलकेच दार लावून घेतले. पण दार लावून तो पलंगाजवळ पोहचलाच होता की त्याला बाहेर पेसेजमध्ये पुन्हा हालचाल जाणवली. कुणीतरी पेसेजच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत येराझाऱ्या घालत असल्याच वाटत होत. बाहेर जे कुणी होत त्याच्या पायातल्या चपलांची करकर स्पष्ट ऐकायला येत होती. संतोषची झोप आता पूर्णपणे उडाली होती. बाहेरच्या येरझाऱ्या अजुनही एकसलग चालु होत्या. संतोष धाडस करून जागचा हलला. दरवाज्यापाशी आला. बाहेर चपलांचा आवाज स्पष्ट येत होता. संतोषने हिम्मत करून एका दमात तो दरवाजा धाडकन उघडला आणि पटकन बाहेर आला. पण बाहेर कुणीच नव्हते. तो असाच आपल्या मनातला संशय घालवण्यासाठी खाली किचनमध्ये आला. तो तिथून तसाच घरभर फिरून आला पण काही सापडल नाही. तो पुन्हा आपल्या खोलीत गेला. संतोषने दार घट्ट लावून घेतलं. निदान आतापुरत तरी त्याला त्याच्या ह्या बेडरुममध्ये सुरक्षित वाटत होतं. तो पुन्हा बेडवर येउन पडला. त्याच सगळ लक्ष आता दाराकडे लागल होतं. थोड्याच वेळात त्याला दाराबाहेर पुन्हा हालचाल जाणवली. कुणितरी बाहेर पेसेज वावरत होत नक्की. त्याच्या पावलांचा आवाज एकसलग येत होता. पेसेजच्या एका कोपरया पासून दुसऱ्या कोपरया पर्यंत. दाराबाहेर येराझाऱ्या घालण्याचा हां प्रकार पहाटेपर्यंत चालु होता. नंतर मात्र तो आवाज बंद झाला. आता बाहेरुन आवाज येत नसला तरी संतोष बराच वेळ जागा होता.

*****************************************************************************

सकाळी संतोष विचार करत होता. कालच्या रात्रीच्या गोष्टींना भास म्हणावं तर ते इतके वास्तववादी कसे.

आपण ह्याबाबतीत शिवदासला विचारुया??

नाही नको, एकतर अगोदरच तो मी इथून कधी जातोय ह्याच्या प्रयत्नात आहे. त्यात त्याला कालचा प्रसंग सांगितला तर माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारख होईल. त्यापेक्षा आपणच बघु काय ते.

*****************************************************************************

आज संध्याकाळी संतोष पुन्हा समुद्रकिनारी गेला. त्याच जागेवर जिथे ती त्याला काल दिसली होती. पण आज तिथे कुणीच नव्हतं. त्याने आजुबाजुला पाहिलं. सगळ्या खुणा त्याच होत्या. तीच जागा, तोच समुद्र, तोच किनारा फ़क्त आज किनाऱ्यावर ती नव्हती. त्याने आजुबाजुला पुन्हा एकदा नजर फिरवून ती कुठे दिसतेय का? ह्याचा अंदाज घेतला. पण दुरवर ह्या मोकळ्या किनाऱ्याखेरिज दुसर कुणीच नव्हत.

"कुणी सांगितलं होत काल जास्त शहाणपणा करायला? च्यायला तुझ्या हिरोगीरीमुळे घाबरली ती. आता कशाला परत येतेय ती इकडे?" संतोष स्वत:वरच चरफ़डत होता. सुर्यास्त झाल्यावर तो तिथून निघणार की तितक्यात त्याला त्याच्या पाठीमागे कुणीतरी उभ असल्याच जाणवलं. त्याने गर्रकन मागे वळुन पाहिल आणि आश्चर्यचकीत झाला. मागे ती उभी होती. संतोषला अस अचानक मागे वळलेल पाहून ती गडबडली. त्याच गडबडीत तिच्या हातातून तिच्या पेंटिगच सामान खाली पडल. त्यातच नुकतच तिने काढलेल सुर्यास्ताच चित्रदेखिल होत. त्या चित्रात संतोषही होता पाठमोरा बसलेला.

"अच्छा म्हणजे इतका वेळ ही आपल चित्र काढत होती तर." संतोष ते चित्र पाहून मनातून सुखावला. त्याने तीच सगळं साहित्य आणि ते पेंटिग तिला उचलायला मदत केली. सामान गोळा करताना तो तिची होणारी धांदल पहात होता. आपली चोरी पकडली गेल्यामुळे ती खजील झाली होती.

"Nice painting" तिने काढलेल चित्र तिच्या हातात देत संतोष म्हणाला.

त्यावर तिने त्याच्या नजरेला नजर न देता लाजुन त्याच्या हातातून ते चित्र घेतल आणि काही न बोलता ती तिथून जाऊ लागली. तिला अस निघताना पाहून संतोषने पटकन विचारलं.

"मग उद्या इथेच ना?????"

तिने आश्चर्याने मागे वळुन पाहिल. उत्तरादाखल ती फ़क्त हसली आणि तिथून लगबगीने निघून गेली. ती गेल्यावर संतोष कितीतरी वेळ ती गेलेल्या वाटेकडे एकटक पहात होता.

*****************************************************************************

त्या मध्यरात्रीनंतर कसल्याश्या तरी आवाजाने संतोषला जाग आली. त्याने पाहिलं तर खोलीच्या खिड़कीची तावदान जोरजोरात एकामेंकावर आपटत होती. तो ती लावायला उठला. खिडकीजवळ आल्यावर त्याला एक गोष्ट जाणवली की काहीतरी चुकतय. खिडकीची तावदानं एव्हढ्या जोरजोरात वाजत असताना समोरच्या झाडांची एकही पान हलत नव्हत. जर का बाहेर वाराच नव्हता, तर मग ही तावदाने एव्हढ्या जोरजोरात का वाजत होती? तो फार गोंधळुन गेला होता.

खिडकीची तावदान बंद करताना संतोषच लक्ष सहजच समोरच्या अंगणात गेलं आणि तो जागीच थिजला. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. समोर अंगणात एका तरुणाची आकृती उभी होती. ती संतोषकडेच एकटक पहात होती. त्या तरुणाला आपल्याकडे अस बघताना पाहून तो चरकला. तो दचकून खिडकीपासुन लांब झाला. त्याला स्वत:वरती विश्वासच बसत नव्हता. त्याने स्वत:ची खात्री करून घेण्यासाठी पुन्हा अंगणात पाहिलं आणि काय आश्चर्य आता अंगण रिकामी होत. संतोषने घाबरून खिडकी लावून घेतली आणि पलंगावर येऊन झोपला. संतोष त्या रात्री रात्रभर जागाच होता.

*****************************************************************************

दुसऱ्या दिवशी सकाळी संतोष शिवदासची वाट पहात हॉलमध्ये बसला होता. उन्ह वर आली तरी अजुन शिवदास आला नव्हता. येईल इतक्यात, कुठतरी उलथला असेल असा विचार करून संतोष पुस्तक वाचत बसला. डोळ्यासमोर पुस्तक असल तरी त्याच्या डोक्यात मात्र काल रात्रीचेच विचार फिरत होते. काल रात्री खरच कुणीतरी अंगणात उभ होत का? होत तर मग एका क्षणात ते अस गायब कस झालं? आणि त्या तावदानांच काय? बाहेर वारा पडलेला असताना त्या इतक्या जोरजोरात कश्या वाजत होत्या? असे बरेचसे काहीही तत्कालीन तार्कीक उत्तर नसलेले प्रश्न संतोषच्या डोक्यात घोळत होते.

"शिंदेसाहेब" संतोषला कुणितरी बंगल्याच्या गेटवरुन हाक मारली.

त्या हाकेसरशी संतोष बाहेर आला. पाहिलं तर एक तरुण उभा होता. त्याने संतोषला आज शिवदास येणार नसल्याचा निरोप दिला त्याच्या बायकोची तब्येत बिघडली होती. संतोषने ठीक आहे असे बोलून त्याचा निरोप घेतला.

दररोजची काम उरकून संतोष दुपारी घराबाहेर पडला. शिवदास आज येणार नसल्याने त्याला दुपारच्या जेवणासाठी गावात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ह्या असल्या आडगावात जेवणाची काही सोय होईल का ह्याच्या शोधात तो बाजारात आला. नशिबाने तिथे एक टपरीवजा हॉटेल होत. संतोषने तिथे स्वत:साठी एक बऱ्यापैकी जागा बघून जेवणाची ऑर्डर दिली. जोवर ऑर्डर येत नाही तोवर आजुबाजुला पहात संतोष अआपला वेळ घालवत होता. सध्या त्या जागेचे स्वरुप पहाता, त्यादिवशी संध्याकाळी खरच इथे मोठा बाजार भरला होता. हे कुणाला सांगुनही खरं वाटलं नसतं. जेवण झाल्यावर पैसे देऊन संतोष बंगल्यावर जाण्यासाठी निघाला. बंगल्याची आठवण होताच त्याला काल रात्रीचा प्रसंग आठवला. हे सगळ खरंच घडतय की आपल्या मनाचे खेळ आहेत. पण जे काही आहे त्यात काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की. संतोष आपल्याच तंद्रीत चालला होता. अचानक त्याला जाणवल की कुणितरी मगासपासुन त्याच्या मागावर आहे. त्याने पटकन मागे वळुन पाहिलं तर त्याला मागच्या चौकावर एक म्हातारा उभा असलेला दिसला. तो संतोषकडेच पहात होता. त्याला पाहून संतोष वाटलं की ह्याला कुठेतरी पाहिलाय. तेव्हढ्यात त्याला आठवल की आत्ताच हां म्हातारा संतोष जिथे जेवत होता त्या समोरच्या रस्त्यावर उभा होता. तेव्हाही तो संतोषकडे तसाच एकटक पहात उभा होता. सुरुवातीला संतोषने त्याकडे जास्त लक्ष दिल नाही. पण जेव्हा जेव्हा त्याच लक्ष त्याच्याकडे जात होत तेव्हा तेव्हा त्याला जाणवत होत की त्या म्हातारयाच लक्ष हे फ़क्त त्याच्याकडेच होत. फार विचित्र नजरेने तो संतोषकडे पहात होता. जणु काही कुणितरी त्या म्हाताऱ्याला त्याच्या पाळतीवर पाठवला होता. असेल कुणितरी वेडा अस समजुन, संतोषने त्याच्याकडे लक्ष दयायच सोडुन दिल होतं. पण आता हां इथवर आपल्याच मागावर आलाय ह्याची संतोषला खात्री पटली. हां नक्की काय प्रकार आहे हे जाणुन घेण्यासाठी त्यालाच विचारुया असे ठरवून संतोषने आपली नजर पुन्हा त्या चौकाकडे वळवली तर तो म्हातारा आता तिथून गायब झाला होता. संतोष पुन्हा मागे चालत त्या चौकाकडे गेला. संतोषने उरलेल्या रस्त्यावर दुरवर आपली नजर फेकली पण तो म्हातारा कुठेच नव्हता. गोंधळलेला संतोष पुन्हा आपल्या बंगल्याच्या दिशेने चालु लागला.

*****************************************************************************

आज संतोष समुद्रावर ज़रा लवकरच आला होता. तीची येण्याची वाट बघत. बराच वेळ झाला तरी ती अजुन आली नव्हती हे पाहून संतोष थोडा हिरमुसलाच होता. घड्याळ्यात आता साडेसहा होत आले होते. एव्हाना ती यायला हवी होती. समोर सुर्याचा ह्या दिवसाचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता. तो उठून समुद्राकडे चालत गेला. शरीराला झोंबणार्या गार वाऱ्यामुळे पावलांना होणारा लाटांचा उबदार स्पर्श हवाहवासा वाटत होता. समोर क्षितिजावर रंगाची होणारी मुक्त उधळण मनाला मुग्ध करत होती. त्या रंगांकडे पहाताना त्याला त्याच्यात तिचा चेहरा दिसू लागला. आता ह्या क्षणी ती जवळ असती तर खरच किती छान झाल असत. हे मावळतीचे रंग तिच्यासोबत सर्वांगावर लेवुन घेतले असते. पण असो ........
हताश होऊं त्याने आजुबाजुला पाहिल तर त्याला ती दिसली. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर समुद्रकाठच्या खडकावर बसली होती. क्षितिजाकडे एकटक पहात स्वत:मध्ये हरवलेली. अचानक तिने तिची नजर संतोषकडे वळवली.
काहीतरी ख़ास होत तिच्या नजरेत. एक अनामीक ओढ होती. संतोष आपसुकच तिच्याकडे ओढला जात होता. तो आता तिच्याबाजुला येउन बसला. ती त्याच्याकडे पाहून पुन्हा एकदा गोड हसली आणी परत तिने आपली नजर क्षितिजापार फेकली. आजूबाजूच सगळ शांत होत. अश्या शांत मैफिलीत समुद्राची गाज एका सूफी गाण्यासारखा वाटत होती. खडकावर बसलेल्या त्या दोघांनाही एकामेकांच्या अस्तित्वाची जाण होती पण सुरुवात कुणी करायची इथेच बोंब होती. अखेर न रहावुन संतोषच तिला म्हणाला.

"Hi.....मी संतोष शिंदे"

ती सावरून बसली. एकवार संतोषकडे पाहून पुन्हा हसली. अरेच्या हसताना हिच्या गालाला खळ्या पडतात हे आपल्याला अगोदर कस दिसलं नाही. तिने पुन्हा संतोषकडे पाहिलं. मावळतीच्या रंगात ती खरच खुप सुरेख दिसत होती.

"तुम्ही रोज येता इथे??" -संतोष

"हो, मला आवडत इथे" ती समुद्राकडे पहात उत्तरली.

उफ्फ!!!! काय मस्त आवाज आहे हिचा. एखाद्या गजलेसारखा.

"तुम्हाला ह्या पूर्वी कधी पाहिल नाही इथे????" तिने तिच्याकडे निरखून पहात असलेल्या संतोषला विचारलं.

"मी हया गावात नवीनच आहे. मी मूळचा मुंबईचा. तुम्ही इथल्याच का?"

"हो........ मी त्या तिथे पलिकडे रहाते" तीने बाजुच्या एका टेकडीकडे हात दाखवून म्हटलं.

"छान मी इथेच गव्हर्नर बंगल्यात रहातो.........................."

संतोषने गव्हर्नर बंगल्याच नाव काढताच ती चपापली. तिच्या चेहरयावरचे भाव बदलले. पुढे संतोष जे सांगत होता त्याकडे तीच लक्ष नव्हत. दोन तीनच क्षण गेले असतील.

"आपल नाव ??" संतोष तिला तिच नाव विचारत होता.

"अरुणा... अरुणा इनामदार" तिने अडखळत उत्तर दिल. आणि संतोषची नजर टाळुन पुन्हा समुद्राकडे पाहु लागली.

संतोष अरुणाला पाहून खरच खुप इंप्रेस झाला होता. ती अजुनही समुद्राकडेच पहात होती. समुद्रावरून वहात येणारया वाऱ्यामुळे ती अंगभर शहारत होती.

"तुम्हाला समुद्र फार आवडतो वाटतं??" संतोषने तिला विचारलं

"अहं............., उलट बहुतेक मी त्याला आवडते...." हे सांगताना तिच्या चेहरयावर खट्याळ हसु होत आणि नजर अजुनही समुद्रावर.

"बहुतेक मलाही" संतोष नकळत पटकन बोलून गेला.

त्यसरशी अरुणाने चमकून संतोषकडे पाहिल. संतोषची आव्हानात्मक नजर पाहून अरुणा लाजली. असेच एक दोन क्षण गेले. मावळतीच्या सोनेरी रंगात किनाऱ्यावरचा उनाड वारा अरुणाच्या केसाची बट उडवत होता. संतोषने न रहावुन ती चुकार बट आपल्या बोटाने मागे सारली.

अरुणा शहारली.

"उशीर झालाय, मला आता निघायला हव" अस तुटक बोलून ती तिथून निघून गेली.

"उद्या इथेच भेटशील ना" संतोषने अश्या घाईघाईत तिथून निघून जाणाऱ्या पाठमोऱ्या अरुणाला विचारलं.

अरुणा मागे वळुन लडिवाळ हसून नाही म्हणाली आणि हसता हसता टेकडीच्या दिशेने पळाली. संतोष कितीतरी वेळ अरुणा गेलेल्या वाटेकडे पाहून स्वत:शीच हसत होता.

*****************************************************************************

त्या रात्री जेवण आटपुन संतोष झोपायच्या तयारीला लागला. अरुणाचा विचार करता करता त्याला झोप कधी लागली हे कळलच नाही. मध्यरात्री अचानक संतोषचे डोळे खाडकन उघडले. का कुणास ठावुक पण त्याचा जीव फार कासाविस झाला होता. थोडस सावरल्यावर त्याने सहज समोर पाहिलं तर तो सरपटलाच. समोर खिडकीजवळ "तो" उभा होता, तोच जो त्याला काल रात्री अंगणात दिसला होता. ह्याचाच अर्थ की हे जे काय आहे ते आता त्याच्या घरापर्यंत आलं होत तर. त्याने पुन्हा खिडकीकडे पाहिल तो अजुन तिथेच उभा होता एकटक खिडकीतुन बाहेर पाहत. अरे हा आहे तरी कोण? आणि मला का सारखा दिसतोय? संतोषला काहीच कळत नव्हत.

"कोण आहे ??" न राहवुन संतोषने हलकेच विचारलं

त्याने सावकाश मान वळवुन संतोषकड़े पाहिलं. तसा संतोष घाबरून पाठीमागे बेडला जाऊन टेकला. त्याची नजर आता संतोषवर खिळली होती. संतोषही, आता हा पुढे काय करेल ह्याचा अंदाज नसल्याने सावध होता. थोडावेळ असाच गेला. एव्हाना संतोष थोडा सावरला होता कारण समोर जे कुणी होत ते फ़क्त संतोषकडे एकटक पहात होतं, त्यापलीकडे त्याने संतोषला अजुन काही घात केला नव्हता. त्याची काहीच हालचाल होत नाहीय हे पाहून संतोषने थोड धाडस करुन त्याच्याजवळ जायचा निर्णय घेतला. संतोषला स्वत:लाही त्याच्या ह्या कृतीच आश्चर्य वाटत होत. संतोष उठला आणि सावधपणे एकएक पाउल टाकित तो त्याच्याजवळ जाऊ लागला. संतोषच्या हृदयाची धडधड फार वाढली होती. संतोष जस जसा त्याच्याजवळ जात होता तस त्याला जाणवत होत की त्याच्या समोर असलेला तो अजुनही तिथेच त्या जागेवर काहिएक हालचाल न करता उभा आहे. आता संतोष त्याच्यापासून एका फुटाच्या अंतरावर येउन पोहचला होता. आता संतोषला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर समोरच्याला भीती वाटेल अशी कुठलीच चिन्ह नव्हती उलट संतोषला त्याच्या नजरेत एक उदासीनता दिसत होती. एकप्रकारची आगतीकता त्याच्या चेहरयावर पसरली होती. संतोषने त्याला स्पर्श करण्यासाठी अलगद हात पुढे केला तसा तो त्याच्या डोळ्यासमोरच हळुहळु विरळ होउ लागला आणि समोरची खिडकी रिकामी झाली. आता त्या खोलीत संतोष एकटा होता.

संतोष सकाळी फार बेचैन होता.

"कोण आहे हां? जो मला आडून आडून सारखा दिसतोय. बर नुसताच दिसतोय, काही बोलत नाही की काही करत नाही. त्याच्या चेहऱ्यावर कसलीतरी व्याकुळता जाणवतेय. जणु काही त्याला मला काहीतरी सांगायचय. पण काय?" संतोषला आता ह्याबाबतीत लवकरात लवकर शिवदासशी बोलायलाच लागणार होतं.

सकाळी पुन्हा तो शिवदासचा मित्र आजही शिवदास कामावर येणार नाही असा निरोप देऊन गेला. आज शिवदास कामावर न येण्याचा दुसरा दिवस होता. काय झाले नक्की हे बघायला हवं? संतोषने मनोमनी ठरवलं.

*****************************************************************************

ती आता संतोषला दररोज भेटत होती. दिवस तिच्या भेटीच्या ओढीने फार लवकर सरत होता आणि संध्याकाळ तिच्या सहवासात हरवत होती. पण रात्र मात्र वैरीण झाली होती. त्याच वेळी अवेळी दिसण हे आता संतोषच्या अंगवळणी पडलं होत. तो काही करायचा नाही, काही बोलायचाही नाही. पण त्याची ती नजर मात्र संतोष आतुन हलवत होती. त्याच्या नजरेतल्या आर्जवांनी संतोष फार डिस्टर्ब झाला होता. काहीतरी गडबड होती हे नक्की.

ह्या सगळ्यात एक गोष्ट मात्र चांगली घडत होती. ती म्हणजे अरुणा संतोषच्या फार जवळ आली होती. ती तस काही बोलली नाही पण तिच्या नजरेतुन तो तिला आवडलाय हे जाणवत होत त्याला. संतोषलाही तिच्याशिवाय करमत नव्हतं.

पण ती फ़ारच भित्रट होती. दरवेळेस आपल्याला कुणी पाहिल आणी गावात चर्चेला विषय होईल ह्याच काळजीत असायची. ते दोघे एकत्र असताना तिचा बहुतेक वेळ हा आपला तीच आजुबाजुला लक्ष ठेवण्यातच जाई. त्याने तिला ह्याबाबतीत बऱ्याच वेळा समजावलदेखिल पण

"तुमच्या शहरातले नियम इथे गावात लागू होत नाहीत गव्हर्नर साहेब" अस बोलून ती त्याच तोंड गप्प करायची.

तीचही बरोबरच होत म्हणा. इन मीन 300 उंबऱ्याच गाव. बातमी पसरायला 300 सेकंदही पुरले नसते. पण एव्हढी एक गोष्ट सोडली तर अरुणा एकदम मस्त होती. अगदी त्याला हवी तशी होती. ह्या एकाच कारणास्तव तो ह्या गावात अजुन टिकून होता.

*****************************************************************************

आज बोलता बोलता संतोषने अरुणाला त्याला रात्री दिसणाऱ्या त्या माणसाबद्दल आणि बंगल्यात घडणाऱ्या विचित्र गोष्टीबद्दल सांगितलं.

संतोषच बोलणं ऐकताच गंभीर झालेली अरुणा अचानक हसायला लागली. संतोषने तिला तिच्या हसण्याच कारण विचारताच ती पुन्हा हसू लागली आणि म्हणाली.

"अरे, तुला भास् होत असतील."

अरुणाने आपलं बोलणं अस हसण्यावारी नेलेल बहुतेक संतोषला आवडल नव्हतं. तो काहिएक न बोलता दुसरीकडे पाहू लागला.

"रागावलास?"
"अरे माझ्या म्हणण्याला तस कारणही आहे तू एकतर आहेस गुढकथाकार त्यामुळेही असं होउ शकत एखाद वेळेस. अस म्हणतात की, ज्या गोष्टीचा आपण सारखा सारखा विचार करतो ती आपल्याला सगळीकडे दिसते". संतोषला अस रागावलेल पाहुन अरुणा त्याला समजावत म्हणाली.

"हो का? हे आपण कश्यावरुन म्हणताय आपण?" संतोषने तिच्या डोळ्यात पहात विचारलं

"कारण.....हल्ली मला सगळीकडे तूच दिसतोस" अरुणा संतोषच्या नजरेत नजर मिसळीत म्हणाली.

अरुणाची आव्हानात्मक नजर पाहून संतोष अलगद तिच्यावर झुकला. त्याचा इरादा लक्ष्यात येता, त्याच्या छातीवर हलकेच एक गुद्दा मारून अरुणा त्याच्यापासून दूर झाली.

"चल निघते मी. इथल्या वाऱ्याची लक्षण काही ठीक दिसत नाहित मला... आज फारच अंगचटीला येतोय" एव्हढ बोलुन अरुणा झक्कास लाजली. हां टोमणा आपल्यासाठी होता हे कळताच संतोष तिला पकडायला धावला. पण अरुणा भलतीच चपळ होती. ती बरोबर संतोषचे अंदाज चुकवत त्याला स्वत: पासून दूर ठेवत होती. अखेर संतोष दमला आणि एका ठिकाणी उभा राहिला. तशी अरुणा त्याच्या जवळ आली.

"अशी सहजा सहजी तुझ्या हातात नाही येणार मी." असे संतोषला चिडवुन अरुणा तिथून पळुन गेली.

दूर जाताना तिच्या हसण्याचा आवाज अजुनही संतोषच्या कानात घुमात होता. संतोष विचार करू लागला.

का? आपल्याला तिची एव्हढी ओढ लागली आहे?
का? आपल्याला ती एव्हढी हवीहवीशी वाटतेय?
अरे दोनच आठवडेच झाले आहेत तिला भेटुन तरी ती एव्हढी आपली का वाटते?

तिची बोलण
तीच हसण
तीच रुसणं
तिची बोलता बोलता गप्प होणं.
सगळच कस नादावतं आपल्याला.

आपण नाही राहु शकत आता तिच्याशिवाय?

आपण प्रेमात पडलोय का तिच्या?

हो बहुतेक....

पण तिलाही असच वाटत असेल का?

असणारच.......... तिचे डोळेच सांगतात कि तिला मी आवडतो ते......

पण तस नसेल तर........

नाही यार ......मला तर कल्पनाही नाही करवत तिच्या नकाराची.

पण तिला विचारल्याशिवाय कस कळणार की तिला आपल्याबद्दल काय वाटत ते.

बास.....आता ठरलं उद्या आपण तिला प्रपोज करायचाच.

*****************************************************************************

त्या संध्याकाळी अरुणाला भेटुन संतोष वाड्यावर परतत होता. की तेव्हढ्यातच अचानक एक माणुस त्याच्या वाटेत आडवा आला. अश्या अचानक घडलेल्या गोष्टीमुळे संतोष केव्हढ्यानं तरी दचकला. थोड सावरल्यावर त्याने नीट पाहिल तर त्याला त्या माणसाला कुठतरी पाहिल्या सारख वाटत होत. थोडा डोक्याला ताण देता त्याला आठवलं की हां तर त्यादिवशीचाच म्हातारा आहे जो बाजारात त्याच्या मागावर होता. संतोषला बेसावध बघून तो म्हातारा त्याच्या अंगावर आला. तसा संतोष घाबरून दोन पावलं मागे झाला.

"निघून जा इथून, नाहीतर तुझीपण तीच गत होईल जी त्याची झालीय. त्यालापण समजावलेल पण तो नाय ऐकला. शेवटी .....गेला" तो म्हातारा संतोषच्या जवळ जवळ अंगचटीला येत म्हणाला.

"मी तुला सांगतो. तू त्या........."

तो म्हातारा पुढे संतोषला काहीतरी सांगणारच होता की संतोषच्या मागे काहीतरी पाहून तो कमालीचा घाबरला आणि

"नाही नाही ......नाही नाही..............."

अस असंबध्द बडबडत आला तसाच अंधारात गायब झाला. संतोषने मागे वळुन पाहिल तर मागे कुणीच नव्हतं. त्या वाटेवर संतोष पुर्णपणे एकटा होता. आजुबाजुचा अंदाज घेत संतोष पुन्हा आपल्या वाटेला लागला. त्या म्हाताऱ्याच्या बोलण्याचा विचार करीत संतोष त्याच तंद्रित बंगल्यावर कधी पोहचला हे त्याच त्यालाच कळल नाही.

*****************************************************************************

आज रात्रीही तो येणार ह्याची जणु संतोषला खात्री होती. त्याची वाट पहात संतोष कितीतरी वेळ जागाच होता. बंगल्यातल्या घड्याळाने दोनचे टोले दिले. पण अजुनही त्याची काही चाहुल नव्ह्ती. एव्हाना यायला हवा तो. इतक्या रात्रींच्या अनुभवानंतर आज पहिल्यांदाच अस झालं होत. हळुहळु त्यांच्या डोळे पेंगायला लागले आणि काही क्षणांतच संतोष झोपी गेला.
अचानक कुणीतरी त्याला गदागदा हलवून जाग करीत असल्याचा भास् झाला. त्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने पाहिल तर "तो" समोरच्या खुर्चीत बसून एकटक त्याच्याकडे पहात होता. संतोष बेडवर सावरून बसला. त्याची नजर अजुनही संतोषवरच खिळली होती. आज त्याचा चेहरा वेगळा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या नेहमीच्या आगतिकतेची जागा आज रागाने घेतली होती. संतोष कमालीचा घाबरला. अचानक तो उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालु लागला. संतोष त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात होता. दरवाज्याकडे पोहचल्यावर त्याने एकवार शांतपणे संतोषकडे पाहिलं आणि पुन्हा दाराबाहेर चालु लागला. संतोषला एक गोष्ट मात्र पक्की जाणवली की, हां जो कुणी आहे त्याचा उद्देश फ़क्त आपल्याला घाबरवणे असा नक्कीच नाहीए. पण मग हा नक्की काय प्रकार आहे. आज ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावुनच टाकू ह्या उद्देशाने संतोषही आता त्याच्या मागोमाग खोलीबाहेर पडला.

बाहेर पेसेजमध्ये कुणीच नव्हतं. संतोषने आजुबाजुला पाहिलं तर तो पेसेजमध्ये एकटाच होता. तो कुठे गेला ह्याचा शोध घेत असताना संतोषला बंगल्यात एक वेगळी गोष्ट जाणवली. आजवर कुलुपबंद असलेली पेसेजच्या शेवटाला असलेली खोली आता सताड उघडी होती. त्याची कवाडं हेलकावे घेत होती. संतोषची नजर त्यावर पडताच ती हेलकावे घ्यायची थांबली. संतोषच्या खोलीच्या दिशेने चालु लागला. खरतर संतोष मनातून खरच खुप घाबरला होता. पण आज ह्या गोष्टीचा छडा लावायचाच ह्या उद्देशानेच तो हे धाडस करायला तयार झाला होता.
तो आता त्या खोलीच्या दारापाशी येउन पोहचला होता. संतोषच्या हृदयाची धडधड खुप वाढली होती. मनाचा हिय्या करून तो एका झटक्यात त्या खोलीत शिरला.

आतमध्ये खोली अगदी रिकामी होती. बऱ्याच दिवस खोली रिकामी असल्याने संतोष आत आल्या आल्याच एक कुबट वासाचा भपकारा त्याच्या नाकात शिरला. खोलीत गुडुप अंधार होता. बंद खिडक्यातुन बाहेरच्या चंद्राचा निळा प्रकाश झिरपत होता. तेव्हढाच काय तो उजेड होता त्या खोलीत. हळुहळु संतोषचे डोळे त्या निळ्या अंधाराला सरावले. तो सावधपणे आतल्या खोलीवर आपली नजर फिरवू लागला. ह्या रुमची ठेवण ही त्याच्या सध्याच्या बेडरुमच्या मिरर इमेज सारखी होती. बेड, राईंटींग टेबल, शेल्फ सगळ्या गोष्टी संतोषच्या खोलीच्या प्रमाणात होत्या. संतोष एव्हाना खोलीच्या मध्यभागी उभा होता. राहून राहून संतोषची नजर त्या तरुणाला शोधत होती जो त्याला ह्या आजवर बंद असलेल्या खोलीत घेउन आला होता. त्याला नक्की आपल्याकडून हवय तरी काय? तो जो कुणी आहे तो आपल्याला ह्या इथे बंद खोलीत का घेउन आलाय? आसमंत कमालीचा शांत होता. संतोष स्वत:शीच विचार करत होता की त्याच्या कानाने एक आवाज टिपला. संतोष जिथे उभा होता त्याच्या बरोबर मागे एक शेल्फ होत. त्याचा दरवाजा उघडण्याचा आवाज होता तो. संतोषला जाणवलं की त्याच्या व्यतिरिक्त अजुन कुणितरी ह्या खोलीत आहे. संतोष गरकन मागे वळला. मागे वळुन पाहिलं असता पाठीमागे कुणीच नव्हतं पण संतोषचा अंदाज बरोबर निघाला होता. त्याच्या पाठीमागे असलेल्या शेल्फ़चा दरवाजा उघडा होता. हा दरवाजा आपोआप कसा उघडला की....????
संतोष पुढे काही अंदाज लावणार की त्या शेल्फ़मधुन एक पुस्तक की काहीतरी खाली पडलं. शेल्फमधुन अचानक अस काहीतरी खाली पडलेल पाहून संतोष केव्हढा तरी दचकला. आतून प्रचंड घाबरलेला असुनही संतोष त्या पुस्तकाच्या जवळ जाऊ लागला. जस जसा संतोष पुढे जात होता तस त्याने त्या पुस्तकाकडे निरखून पहिलं असता त्याला जाणवलं की खाली पडलेलं ते पुस्तक नसून, ती एक डायरी होती. त्याने ती डायरी उचलली. थरथरत्या हातांनी त्याने ती डायरी उघडून त्याच्या पहिल्याच पानावर लिहिलेल नाव वाचल.

"विकास मोझर"

संतोषने ते नाव वाचताच खोलीतल्या खिडकी, दरवाजे, शेल्फची सगळी तावदान कवाडं एकत्र उघडझाप करू लागली. संतोष घाबरून धावत आपल्या खोलीपाशी आला. थोडासा जीव सावरताच त्याने आपल्या हातातल्या त्या डायरीकडे बघितलं. संतोष घामाने थबथबला होता. त्याने घाबरून पेसेजच्या शेवटला असलेल्या खोलीकडे नजर टाकली असता त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती खोली आता पुन्हा कुलुपबंद दिसत होती. अरे आत्ताच तर आपण त्या खोलीत जाउन आलो ना? मग लगेचच हे कुलुप?? संतोषला त्याच्या आजूबाजूच सगळ गरगरायला लागलं. तो झटकन आपल्या खोलीत शिरला आणि त्याने दार लावून घेतलं. थोड सावरल्यावर त्याने आपल्या हातातल्या त्या डायरीकडे एक नजर टाकली. आतातर त्याची त्या डायरीबाबतची उत्सुकता कमालीची चाळवली गेली होती. तो पुढच्याच क्षणाला समोरच्या रिडिंग टेबलकडे वळला. एक आवंढा गिळुन त्याने डायरीच पहिलं पान उघडलं अन धडधडत्या काळजाने ती डायरी वाचायला सुरु केली.

त्या डायरीच्या पहिल्या पानावर एका तरुणाचा फ़ोटो होता. त्या तरुणाचा फ़ोटो पहातच संतोष हडबडला कारण तो तोच चेहरा होता जो दररात्री संतोषला दिसायचा. साला....हे नक्की प्रकरण तरी काय आहे? आणि त्याला नक्की आपल्याला काय सांगायचय ह्या उत्सुकतेपोटी संतोषने ती डायरी वाचायला घेतली.

संतोषने डायरीच्या कव्हरवर एक हात फिरवला. कव्हरवर 2001 ही अक्षर कोरली होती. म्हणजे ही डायरी आजपासून दोन वर्षापुर्वीची आहे तर. डायरीची सुरुवातीची काही पानं वाचल्यावर संतोषला जाणवलं की ही विकास मोझर नावाच्या व्यक्तीची दैनदिनी आहे. संदर्भांच्या तारखांवरुन डायरीच्या कालखंडाच्या बाबतीतला त्याचा प्राथमीक अंदाजही बरोबर होता. वाचताना डायरीतल्या काही संदर्भावरुन संतोषला कळलं की विकास हा जवळपास त्याच्याइतकाच वयाचा तरुण होता. विकासने त्याच्या त्या डायरीत बरच काही लिहिलं होतं. त्याच्या त्या दैनदीनी लिहिण्याच्या सवयीवरुन संतोषला विकासची बऱ्यापैकी माहीती मिळत होती. उदाहरणार्थ, तो व्यवसायाने इंजिनिअर होता. मुंबईत एका MNC मधे कामाला होता. मुंबईत तो एकटाच रहायचा. एका वेल सेटल्ड कुंटुबातुन आलेला विकास US ला चांगली संधी उपलब्ध असतानाही केवळ स्वत:ला सिध्द करण्यासाठी आई बाबांपासुन दूर राहून मुंबईत नोकरी करत होता. व्यवसायीकदृष्टया स्थिरावलेल्या विकासला फ़िरण्याची भारी हौस होती. त्याच्या डायरीतल्या अनुभवावरून तो बराच फिरलेला होता. दर तीन महिन्यानंतर त्याची एक ट्रिप फिक्स असायची. तो एकटाच फिरायचा बहुतेक. आणी जास्त करून अश्या ठिकाणी ज्या पर्यटनाच्या दृष्टीने अजुन बाहेरच्या जगाला अनभिद्न्य आहेत. असाच एकदा तो नवीन जागेच्या शोधात तो ह्या गावात पोहचला होता.

पुढची अक्षरं संतोषला धूसर दिसू लागली. संतोषच्या डोळ्यांवर आता झोपेचा अंमल चालु झाला होता, वाचता वाचताच संतोष केव्हा झोपी गेला हे त्याच त्यालाच कळलं नाही.

*****************************************************************************

आजही सकाळी शिवदास आला नाही. आज तो येणार आहे की नाही हां निरोप द्यायलाही कुणी आल नव्हत. अखेर शिवदासला नेमक झालय तरी काय ह्याची शहनिशा करायची म्हणुन संतोष गावाकडे निघाला. तिथे गावात शिवदास कुठे रहातो अशी चौकशी केली असता एका लहान मुलाने संतोषला गावाच्या एका कडेला एका छोट्या घरासमोर आणुन उभ केल. त्या मुलानेच त्या घरात जाउन शिवदासला भेटायला संतोष नावाच कुणीतरी आलाय असा निरोप दिला. संतोषच नाव ऐकताच शिवदास लगबगीने बाहेर आला. समोर संतोषला उभा असलेला पाहून बाहेर अंगणात खेळणाऱ्या दोन तीन मुलांपैकी एकाला त्याने घरातून खुर्ची आणि पाणी आणायला पिटाळलं. शिवदासला पहाताच संतोषला बर वाटलं. वरून वरून नेहमीसारखा वाटणारा शिवदासचा चेहरा आज मात्र फार दमल्यासारखा वाटत होता.

"काय झाल रे शिवदास सगळ ठीक आहे ना?? नाही गेले काही दिवस कामावर आला नाहीस म्हणुन विचारलं" संतोषने शिवदासला विचारलं.

"काही नाही साहेब, सगळं ठीक आहे" शिवदास संतोषची नजर चुकवीत म्हणाला.

शिवदास आपल्यापासून काहीतरी लपवतो आहे हे संतोषला त्याच्या अश्या चाचरत बोलण्यावरुन जाणवत होत. त्याने शिवदासच्या खांद्यावर आपला हात ठेवला. कधी कधी शब्दांपेक्षा एखादा फ़क्त स्पर्शदेखिल बरच काही बोलून जातो. संतोषच्या स्पर्शामधली आश्वासकता शिवदासला जाणवली. त्याने एकवार संतोषकडे पाहिलं आणि त्याचा बांध फुटला. तो धाय मोलकुन रडू लागला. त्याचा आवेग ओसरताच त्याने संतोषला सांगायला सुरुवात केली.

"बायको फार आजारी आहे साहेब. सारख पोटात दूखतय तिच्या. सगळ करून झालं बघा उपास-तापास,देव-देवस्की, वैद्य-हकीम सगळ करून झालं बघा. तरी पण काही उपयोग झाला नाही. गेल्या आठवड्याला शहरातून काही डाक्टर लोक गावात तपासणीसाठी आले होते. मी पण माझ्या बायकोला दाखवलं त्यांना तर म्हणाले हिच्या पोटात टुमीर की काहीतरी आहे म्हणाले. शहरात जाउन इलाज करावा लागणार. आता जास्त उशीर करून चालणार नाही "

"अरे मग घेउन जायच ना......" डॉक्टरांनी एव्हढ सांगुनसुध्दा शिवदासने अशी दिरंगाई केल्याबद्दल संतोषने त्याला दरडावणीच्या सुरात विचारले.

"कस घेउन जाऊ? बोलायला सोप्प आहे. पण इथे आमच हातावर पोट आणि तसही शहरात उपचारासाठी भरपूर खर्च येणार. तेव्हढे पैसे कुठुन आणु? एखाददुसरा जमीनीचा तुकडा असता तर निदान तो तरी विकून काहीतरी केल असतं पण आम्ही मेले जन्माचे दळभद्री ते दळभद्रीच" शिवादासच्या बोलण्यातुन त्याची स्वत: बद्दलची वाटत असलेली चिडचिड स्पष्ट जाणवत होती.

थोडा विचार करून संतोष शिवदासला म्हणाला. "उद्या घरी ये तुला काही पैसे आणि एक पत्ता देतो. त्या पत्त्यावर जा आणि माझं नाव सांग तुला हमखास मदत मिळेल."

संतोषने अस सांगताच शिवदासला फार आनंद झाला. तो सरळ संतोषच्या पाया पडला. संतोषने त्याला उठवले आणि त्याला आपण त्याच्यासोबत आहोत काळजी करू नकोस असा धीर दिला. संतोषने दिलेल्या आश्वासनामुळे शिवदास थोडासा तणावमुक्त झाला होता. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर शिवदासला उद्या बंगल्यावर यायची आठवण करुन देऊन संतोष आता परत निघायच्या तयारीला लागला.

"साहेब तुम्हाला एक विचारायचं होतं?" संतोषला निघताना बघून शिवदासने त्याला पटकन विचारलं.

उत्तरादाखल संतोष फ़क्त हसला.

"साहेब तुम्हाला त्या बंगल्यात काही त्रास तर होत नाही ना?" शिवादासचा हां प्रश्न ऐकून संतोष गांगरला.

तसा हां प्रश्न शिवदासने त्याला आजवर कित्येकदा आडून आडून विचारला होता. पण आज त्याच्या ह्या अवघडलेल्या परिस्थितीतही त्याचा हां प्रश्न संतोषला भंजाळुन गेला.

"कसला त्रास? काय ते स्पष्ट सांगशील?" शिवदासला आपल्याला नेमक काय विचारायचेय हे माहिती असुनही संतोषने हां प्रश्न शिवदासला विचारला.

"त्या बंगल्यात म्हणे कुणीतरी आहे. अस मी नाही ह्या गावातले लोक सांगतात. ह्या अगोदरचा केअर टेकर ही त्याच गोष्टीला घाबरून तिथून पळुन गेला होता. मला ही गोष्ट नंतर बाहेरून समजली. पण सध्याच्या परिस्थितीमुळे मला ही नोकरी करणं आवश्यक होत." शिवदास थोड चाचरतच ही गोष्ट संतोषला सांगत होता.

"जरा मला नीट सांगशील का? की तुला नक्की मला सांगायचे काय आहे?" संतोष अजुन थोडा खोलात शिरत म्हणाला.

"त्या बंगल्यात भास् होतात. अस वाटत की कुणीतरी आपल्या भवती सारख वावरतय. मला ही एक तसा अनुभव आला होता. म्हणुन मी तिथे एकटा नाही रहात.

तुम्ही येण्या अगोदर तुमच्यासारखाच एक शहरी पाहुणा इथे हवा पालट करायाला म्हणुन ह्या गावात आला होता. त्याने हां बंगला सुरुवातीला दोन तीन दिवसासाठीच भाड्याने घेतला होता. नंतर तो ह्या गावाच्या इतक्या प्रेमात पडला की त्याने इथे अजुन काही दिवस रहायचा निर्णय घेतला. तसाही इथे जास्त कुणी पर्यटक येत नाहीत त्यामुळे त्याच्या मुदतवाढीच बंगल्याच्या मालकाने स्वागतच केल. पण नंतर मात्र मालकाला त्याच्या ह्या निर्णयाचा पश्चाताप झाला"

"का??" संतोषने उत्सुकतेने विचारलं

"कारण तीन आठवड्यानंतर एके रात्री तो पाहुणा अचानक गायब झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याच प्रेत समुद्र किनाऱ्यावर सापडले. काय झाल?, कस झाल? कुणी केल?, कारण काय? कुणाला काहीच कळल नाही." संतोष शिवदासने सांगितलेल्या गोष्टीमुळे खर तर चांगलाच गडबडला होता. तो त्याच तंद्रीत शिवदासकडुन तडक उठून बाहेर पडला. पाठीमागून हाका मारणाऱ्या शिवदासचही भान उरलं नव्हतं.

शिवदासकडून बाहेर पडलेला संतोष वाट फुटेल तिथे चालत होता. त्याच डोकं फार भंजाळुन गेल होत. शिवादासने जे संगितलय त्याच्याच अर्थ आपल्याला दिसणारा तो तरुण आणि शिवदासने त्याच्या गोष्टीतला तरुण ह्या एकच तर व्यक्ती नाहित? आणि माझा अंदाज जर का बरोबर असेल तर हे दोन्ही तरुण एकच असून त्याचच नाव विकास मोझर तर नसेल?
पण जर का हे खरं असेल तर तो मग मला का दिसतोय? त्याच माझ्याकडे काय काम आहे? विकास मोझर त्याची डायरी आणि मी ह्या तिघांमध्ये काय नातं आहे? हां नक्की काय घोळ आहे हे मला शोधलच पाहिजे.बहुतेक त्याला माझ्या मदतीची गरज आहे. हो असच असणार. त्याशिवाय तो आपल्या असा सारखा सारखा समोर येणार नाही. आणि हे खर असेल तर मग मला त्याची मदत केलीच पाहिजे.
अस स्वत:शी ठरवून कसल्यातरी दृढ़ निश्चयाने संतोष बंगल्याची वाट चालु लागला.

*****************************************************************************

शिवदासकडुन आल्यापासून संतोष अख्खी दुपार फ़क्त विकासचाच विचार करत होता. उन्हं कलायला लागल्यावर तो उठून टेरेसवर आला. समोरच्या समुद्रात संध्याकाळ हळुहळु विरघळत होती. क्षितिजावर गुलाबी रंगाच्या अलवार छटा पसरल्या होत्या. तो गुलाबी रंग पहाताना संतोषला अरुणाची आठवण झाली. लाजताना अरुणाच्या गालावर हां रंग अगदी हुबेहूब उमट़ायचा. अरुणाची आठवण होताच संतोषने लगेच घड्याळ्यात पाहिले.

Ohh shitt.......

तो धावतच समुद्रकिनारी आपल्या नेहमीच्या ठिकाणी पोहचला. आज त्याला नेहमीपेक्षा बराच उशीर झाला होता. त्याने सगळीकडे पाहिलं त्याला अरुणा कुठेच दिसली नाही. आज तो त्या किनाऱ्यावर एकटाच होता. तो अरुणाला शोधत थोडा अजुन पुढे गेला. थोड दूर चालल्यावर एका गोष्टीने त्याच लक्ष वेधल. समोर खडकाच्या रागांमधल्या एका दगडावर रानफुलांची एक जुडी ठेवली होती आणि टेकडीच्या दिशेने एक बाण दाखवला होता. संतोष बाणाच्या दिशेने चालत गेला असता. पाच दहा मिनिटातच तो टेकडीच्या पायथ्याशी पोहचला. समुद्राची वाळु संपून आता लाल मातीची हद्द सुरु झाली होती. थोडस पुढे चालला असता समोरच्या एका झाडाच्या बुंध्याशी आतापर्यंतची पायाखालची वाट दोन वाटांमध्ये विभागली गेली होती. आता कुठल्या वाटेने पुढे जायचे ह्या विचारात संतोष पडला. त्याने तिथे आजू बाजूला पाहिल. उजव्या हाताने पुढे जाणार्या वाटेवरल्या मार्गात काही रानफ़ुलांची झाडे होती. अगदी संतोषच्या हातातल्या फ़ुलांच्या जुडीसारखी. हिच खुण पकडून संतोष उजवीकडल्या वाटेने पुढे निघाला. थोड पुढे गेल्यावर. एक झाडाच्या बुंध्याला एक लाल स्कार्फ बांधलेला होता. हा स्कार्फ संतोषने लगेचच ओळखला. हा अरुणाचा आवडता स्कार्फ होता. नेहमी तिच्या सोबत असायचा. संतोषने तो स्कार्फ अलगद सोडवला. त्याच झाडाच्या बुंध्यावर पुढे जाण्याचा बाण होता. अरुणच्या कल्पकतेची दाद देत संतोष उत्साहाने बाणाने दाखवलेल्या दिशेने चालु लागला.

एव्हाना संतोष टेकड़ीच्या माथ्यावर येउन पोहचला होता. टेकडीचा माथ्याचा भाग हां एका छोट्या पठारासारखा होता. ते पठार समुद्राच्या दिशेने निमुळतं होत गेल होत. पठारावर गुडघ्या एव्हढ गवत वाढलं होतं. त्या गवतातुन एक वाट पठाराच्या निमुळत्या टोकाशी असलेल्या लाईट हाउसकडे जात होती. गुलाबी आकाशाच्या बेकग्रांउडवर, हिरव्या गवताच्या गालिच्याने वेढलेला तो सफ़ेद लाईट हाउस एका निष्णात चित्रकाराने काढलेल्या सुंदर लेंडस्केप सारखा वाटत होता.

थोड्याच वेळात संतोष त्या लाईट हाउसच्या जवळ पोहचला. लाईट हाउसच्या दारावर एक स्माईली काढली होती. ती स्माईली पाहून संतोषने मनोमन अरुणाच्या कल्पकतेला दाद दिली. त्याने एकवार वर मान करून त्या लाईट हाउसला पाहिलं अन दुसरयाच क्षणाला तो त्या अंधाऱ्या जिन्यातुन वर गेला. शेवटची पायरी चढून संतोष लाईट हाउसच्या वर आला. वरचा दरवाजा समुद्राच्या उलट्या बाजुला उघडत होता. दरवाजा उघडून संतोष टेहळणी करिता असलेल्या बाल्कनी वर उतरला. बाल्कनी वर आल्यावर त्याने आजुबाजुला पाहिलं, पण त्याला अरुणा दिसली नाही. तो गोंधळला. तिच्या सगळ्या खुणा त्याने बरोबर फ़ॉलो केल्या होत्या. रानफ़ुलं, स्कार्फ आणि लाईट हाउसच्या दारावरची स्माईली हे सगळ तिच्याच खुणा दाखवत होते. मग सगळ बरोबर आहे तर मग ती कुठाय? अपेक्षेप्रमाणे अरुणा तिथे न दिसल्यामुळे संतोषच्या मनात नाना तर्हेच्या शंका येउ लागल्या. आपण येताना वाटेत कुठे रस्ता तर चुकलो नाही ना. असा विचार करून संतोष माघारी वळणार इतक्यात,

"मला माहिती होत की तू बरोबर येशील माझ्या मागावर"

अरुणाचा आवाज ओळखुन संतोष आवाजाच्या दिशेने वळला. ती लाईट हाउसच्या वरच्या छतावर बसली होती. तिने संतोषला हात दिला आणि भिंतीच्या खाचेमध्ये पाय रोवून वर यायला सांगितले. अगदी अल्पश्या मेहनतीने संतोष लाईट हाऊसच्या छतावर चढला. वरती चढल्यावर त्याने सभोवताली पाहिलं आणि पहातच राहिला.

नजरेसमोर अथांग जांभळा समुद्र पसरला होता. किनार्यावरची वाळु एका मलमली गालीच्या सारखी दिसत होती. आजुबाजुच्या सगळ्या गोष्टी जांभळ्या रंगाच्या विविध छटेत न्हाउन निघाल्या होत्या. समुद्रावरून वहात येणारा गार वारा धुंदावत होता. क्षितिजावरचा मागे उरलेला संधिप्रकाश पुर्वेकडुन उगवणाऱ्या चांदण्याची छबी डोळ्यात साठवण्यासाठी धडपडत होता. संतोषने अलगद आपलं लक्ष समोरच्या देखाव्यावरून काढून घेतलं आणि आपल्या बाजूला बसलेल्या अरुणाकडे पाहिलं. ती अजुन समोरच्या दृश्यातच हरवली होती.

"अरुणा........"

"..................."

"एक विचारू......."

उत्तरादाखल अरुणाने संतोषकडे पाहून एक छानशी स्माईल दिली.

"माझ्याशी लग्न करशील" संतोषने तिच्या डोळ्यात डोळे घालुन विचारलं

संतोषच प्रपोजल ऐकून अरुणा खुष झाली. तिच्या डोळ्यात तिचा होकार स्पष्ट दिसत होता. संतोषला ही तिची पॉसिटिव्ह रिअक्शन पाहून हायसं वाटलं पण दुसर्याच क्षणाला तिच्या चेहरयावरचे रंग बदलले. चेहर्यावरच्या आनंदाची जाग आता कठोरतेने घेतली.

" नाही संतोष हे शक्य नाही...." बोलताना अरुणाचा आवाज थरथरत होता.

संतोषला तर आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मी प्रपोज केल्यावर मघाशी पाहिलेला अरुणाचा चेहरा खरा की आता मला नकार देणारे तिचे हे शब्द खरे. संतोष अरुणाच्या स्पष्ट नकाराने बिथरला होता.

काही क्षण असेच गेले.

"तुझ्या नकाराचं कारण कळु शकेल?" संतोषने अरुणाला विचारलं. अरुणा काही न बोलता दूर एकटक दुसरीकडे पहांत होती. अरुणा उत्तर देत नाही हे पाहून, संतोषने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. अरुणा अजुनही संतोषची नजर टाळत होती. अखेर संतोषचा संयम सुटला. त्याने अरुणाच्या दंडाला पकडून तिला आपल्याकडे ओढली.

"मी काय विचारतोय अरुणा. मला माझ्या प्रश्नांच उत्तर हवय"

"मला नाही माहिती. मला फ़क्त एव्हढच माहितीय की आपलं लग्न नाही होउ शकत. तू मला विसरून जा कायमचा....." एव्हढं बोलून अरुणा संतोषच्या हाताला हिसडा देऊन तिथून निघून गेली.

अरुणाकडून असल काही संतोषला अपेक्षित नव्हतं. त्याच्यासाठी हा फार मोठा धक्का होता. तिने खरच आपल्याला नकार दिला आहे का? त्याला हे खरच वाटत नव्हतं. तेव्हढ्यात त्याची नजर, समोर दिसणाऱ्या गवतातल्या त्या पायवाटेवर गेली, जिथून तो इथवर आला होता. आता त्याच वाटेवरून त्याच्या आयुष्याची उमेद, अरुणाच्या रुपाने त्याच्यापासून दूर जात होती. अरुणाचा स्कार्फ गडबडीत तिथेच राहिला होता. तिची ही बहुतेक शेवटची आठवण असा विचार करून त्याने तो उचलला आणि आपल्या छातीशी कवटाळुन संतोषही आता हताश मनाने लाईट हाउसवरुन खाली उतरू लागला.

*****************************************************************************

संतोषच आज कशातच मन लागत नव्हत. आज तो जेवलादेखील नाही. त्याच्या डोक्यात सारखे अरुणाचेच विचार येत होते, खासकरून तिने दिलेल्या नकाराचे.

तिला मी आवडलो नाही का?
जर का मी तिला आवडलो नव्हतो, तर मग इतकी सलगी तिने का दाखवली?
माझ्यात काय कमी आहे?
सरळ नकार देताना निदान त्या नकाराचे कारण सांगायचयही तिने सौजन्य दाखवू नये?
ह्याच विचारात त्याला कधी झोप लागली त्याच त्यालाच कळल नाही.

मध्यरात्री संतोष खडबडून जागा झाला. बेडरुमच्या खिडक्या जोरजोरात वाजत होत्या. तो सावकाश बेडवरुन उठला. आजवरच्या अनुभवातून त्याला आताच्या प्रकाराची कल्पना आली होती. तो खिडकी बंद करायला गेला. खिडकी बंद करून तो बेडकडे वळणारच होता की खिडकीजवळच्या स्टडी टेबलवर त्याला हालचाल जाणवली. त्याने पाहिल तर ती विकासची डायरी जोरजोरात फ़डफ़डत होती. तिची पान भराभर एका मागोमाग एक आपोआप पलटत होती. संतोष तिथेच स्टडी टेबलवर बसला. तो निरखून त्या डायरीकडे पाहू लागला. डायरीची फ़डफ़ड आता एका पानावर येउन थांबली. संतोषने डायरीच्या उलटलेल्या पानाकडे कुतुहलाने पाहू लागला अणि डायरीने स्वत:हुन उघडलेल्या पानाकडे पहाताच संतोषला आता फ़क्त वेड लागायच बाकी होत. डायरीची फ़डफ़ड बरोबर त्याच पानावर येउन थांबली होती जिथे काल रात्री संतोष वाचायचा थांबला होता. एका भारावलेल्या अवस्थेत संतोषने ती डायरी पुढे वाचायला घेतली. आता ही डायरी वाचण्यापासुन त्याला कुणीही अडवु शकल नसत ......खुद्द तो देखिल

'दिनांक 07 एप्रिल 2001

इथे येउन आता चार दिवस होतील. गाव तसा बरा आहे. पण गावदेवीच मंदिर, बाजार सोडला तर दुसर काही फ़िरण्यासारख नाही. तरीही इथे अशी एक गोष्ट आहे जी मलाच काय, जो कुणी इथे येईल त्याला वेड लावून टाकेल.
ती गोष्ट म्हणजे........
इथला पसरलेला समुद्र.
फार सुंदर समुद्रकिनारा लाभलाय ह्या गावाला. आपण तर एकदम प्रेमातच पडलोय या गावाच्या आणि इथल्या समुद्रकिनाऱ्याच्या. सुरुवातीला थोडा कंटाळा आला होता. वाटत होत की बहुतेक इथला मुक्काम वेळेअगोदरच आवरावा लागणार, पण आता तस नाही वाटत. बऱ्याच दिवसानी अगदी मनासारखा निवांतपणा लाभलाय या जिवाला.'

'दिनांक 09 एप्रिल 2001'

आजची आपली ह्या गावातली शेवटची संध्याकाळ. उद्यापासून पुन्हा मुंबई. तशी अजुन एक आठवड्याची सुट्टी बाकी आहे. पण आता इथे रहायचा कंटाळा आलाय. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा निवांतपणा आता आळशीपणाकडे झुकू लागलाय. तेव्हाच ठरवल की आता इथे रहाण्यात काहीच उपयोग नाही. पण बहुतेक मी चुकीचा होतो. निदान आज संध्याकाळपर्यंत तरी......जोवर ती मला दिसली नव्हती.
तिला पाहिलं आणि खात्री पटली की ह्या गावात बघण्यासारखी अजुन एक गोष्ट आहे...........'

दिनांक 12 एप्रिल 2001

सुवर्णा...............

एकदम झक्कास मुलगी आहे. अगदी मला हवी तशी. मी तिला ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिली, तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. तीच सगळच कस लाघवी आणि हळुवार आहे. तिचे बोलणं, तिचे विचार, तिचा आवाज आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तिची नजर.
एक अनामिक ओढ आहे तिच्या त्या नजरेत.
बास ठरलं ......आता एकच काम उद्या तिला विचारायच.
"माझ्याशी लग्न करशील का म्हणुन?"
पण ती हो म्हणेल का?'

विकासची डायरी वाचुन संतोष जवळ जवळ उडालाच. ही तर हुबेहूब त्याचीच स्टोरी होती. संतोष स्वत:शीच विचार करू लागला. आता पुढे काय? ह्या उत्सुकतेने त्याने पुढचं वाचायला सुरुवात केली.

'दिनांक 26 एप्रिल 2001

आज सुवर्णा खुप रडत होती, मी तिला पदोपदी समजावायचा प्रयत्न केला की तू नको टेंशन घेउस, हव तर मी बोलतो तुझ्या घरच्यांशी. पण तिने नकार दिला. तीच्या मते त्याचा काहिएक उपयोग होणार नाही उलट ह्यामुळे माझ्या जिवाला धोका होईल. ती फ़ार घाबरली होती. मला म्हणाली की "तू माझ्या वडिलांना ओळखत नाहीस. एक काम कर मला विसरून जा." आणि एव्हढं बोलुन सरळ ती निघून गेली माझ्याकडे एकदाही न पहाता.

"अग पण अस कस तुला विसरून जाऊ. मी नाही जगु शकत तुझ्याशिवाय. आता काहिएक झाल तरी मी तुला अंतर देणार नाही. त्यासाठी मला माझ्या जिवाची बाजी लागली तरी बेहत्तर"

तुझाच विकास...............

"बिच्चारा विकास". संतोषला मनातुन चुकचुकला. विकासच्या आत्ताच्या ह्या नोंदीमुळे, पुढे नक्किच काहीतरी अघटीत घडणार आहे असा संशय संतोषला येउ लागला. देव करो आणि सगळं व्यवस्थित असू दे अशी प्रार्थना करीत संतोष पुढे वाचु लागला.

'दिनांक 27 एप्रिल 2001’

आता आम्हाला इथून पळुन जाण्याशिवाय पर्याय नाही. खरतर मला हा पर्याय मनापासून पटलेला नाहिए. पण सध्या आमच्यासमोर दुसरा काही मार्गही उरलेला नाहीय.
असो, एकदा का लग्न झाले, की मग जाऊन भेट घेईन सुवर्णाच्या घरच्यांची. मला वाटत की ते ऐकतील. पण सध्यातरी तिला पहिलं इथून बाहेर घेउन जाणे हाच एक पर्याय आहे. पण हे सगळ सुरळीत पार पडेल का?
सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळवुन आल्या की होईल सगळं नीट.

'दिनांक 28 एप्रिल 2001

आज समुद्रकिनारी फिरत असताना एक माणुस आमच्या मागावर होता. ही बाब मी सुवर्णाच्या लक्ष्यात आणुन दिली. त्या माणसाला पाहून सुवर्णा बिथरली. तो माणुसही सुवर्णा त्याच्याकडे बघतेय हे पाहून गडबडला आणि बघता बघता मागच्या झाडीत गायब झाला. तिने चेहरयावरून काही दाखवल नाही पण आतून ती नक्कीच घाबरली होती. ती लगोलग निघायची घाई करू लागली. जाता जाता ती म्हणाली की,

"विकास आता आपल्याला काहीतरी करायला हवं. तू मला इथून लवकर घेउन जा. ह्या लोकांच काही खर नाही."

तिच्या डोळ्यातली भीती पाहून माझा जीव कासावीस झाला. मला तिची अवस्था कळत होती. आता लगेच काही करणं मलाही शक्य नव्हत. मी तिला समजावल की, उदयाच मी तुला इथून घेउन जाईन. आता तू घरी जा आणि काही घडलच नाही अस दाखव.
ती घरी जायला तयारच नव्हती. शेवटी मी तिला माझा प्लान सांगितला तशी ती थोडी सावरली. तरी तिची भिती काही कमी झाली नव्ह्ती. मी कशीबशी तिला समजाउन परत पाठवली.

आता काहीही झालं तरी मी तिला उद्या इथून घेउन जाणार. पण तिला उद्या ठरल्या ठिकाणी यायला जमेल ना.
हो तिला जमेल.......
तिला जमवावंच लागेल..

Best of luck विकास...'

संतोषने घाईत पुढच पान उघडलं पण डायरीची पुढची सगळी पानं कोरी होती. संतोषने वैतागुन डायरी बंद केली. तो सुन्न झाला होता.

अरेरे!!!!!!!!
पुढे काय झाल?
सुवर्णा विकासला दुसऱ्या दिवशी भेटली का?
त्याचं प्रेम सफल झाल का?
सगळी प्रश्नं त्या डायरीच्या कोऱ्या पानांमध्ये हरवून गेली होती. त्याने पुन्हा एकदा ती डायरी चाळुन बघितली पण संतोषचे प्रश्न अनुत्तरितच होते. बहुतेक ह्याच प्रश्नांची उत्तर त्याला आता शोधायची होती.

*****************************************************************************

सकाळी संतोष फार अस्वस्थ होता. काल विकासची डायरी वाचल्यापासुन तो फारच टेंशनमधे आला होता. पण त्याला अजुनही कळत नव्हतं की विकासला त्याच्याकडून काय हवं होत? डायरीच्या कोऱ्या पानांची हकीकत संतोषला कुठुन कळणार होती?

तेव्हढ्यात शिवदास आला. त्याला पाहून संतोषची आशा पल्लवीत झाल्या.

"इथे इनामदारांचा वाडा कुठाय?" आल्या आल्याच संतोषने शिवदासला विचारलं

संतोषने इनामादाराच्या वाड्याबद्दल विचारताच शिवदासने चमत्कारीक नजरेने संतोषकडे पाहिलं. त्याने काही उत्तर दिलं नाही. संतोषने पुन्हा तोच प्रश्न शिवदासला विचारला.

"साहेब तुम्ही मला पत्ता देणार होतात ना? लवकर दिलात तर बर होईल. घरी मुलं एकटी आहेत." शिवदासने संतोषच्या प्रश्नांकडे पूर्णत: दुर्लक्ष केल होत. शिवदास मुद्दामून आपल्या प्रश्नांला टाळतोय हे संतोषने लगेचच ओळखलं. संतोषने त्याला विरेंद्रचा पत्ता दिला आणि सोफ्यावर जाऊन बसला. पत्ता मिळाल्यावरही शिवदास तिथेच घुटमळत होता.

"तुम्हाला कशाला हवाय तो वाडा??" शिवदासने संतोषला विचारलं. हां प्रश्न विचारताना शिवदासचा कापणारा आवाज संतोषने बरोबर पकडला.

"काही नाही सहजच. तू ज्या कामासाठी आला होतास ते झालं ना? मग तू जाऊ शकतोस" संतोष थोडा घुश्यातच म्हणाला.

शिवदास गुपचुप दाराकडे निघाला. अचानक त्याला काय वाटलं कुणास ठावुक शिवदास परत संतोषकडे आला आणि सांगु लागला.

"मला जास्त काही माहीती नाही, पण टेकडीच्या पलिकडे इनामदाराचा वाडा आहे असं गाववाले सांगतात. एकेकाळी गावातलं फार मोठे प्रस्थ होते हे "इनामदार". गावात फार वचक होता त्याचा. गाववाले देखिल फार घाबरून असायचे त्या इनामदाराला. त्याचा हुकुम हां शेवटचा शब्द होता सगळ्यांसाठी. लोक इनामदाराच्या वाऱ्यालाही उभी रहायची नाहित, पण आता पुर्वीच काही राहिल नाही साहेब. एकेकाळी फार राबता होता तिथे, पण आता कुणी जात नाही आणि तुम्हीपण तिकडे जाऊ नका." शिवदास संतोषला सांगितलं.

"का?" संतोषने उत्सुकतेने विचारलं

"त्या इनामदारांबाबतीत लोक चांगलं बोलत नाही साहेब." शिवदास बोलला.

"म्हणजे???"

"तो इनामदार फार तापट होता. त्याच्या ह्याच सवयीमुळे त्याच्या कुंटुबाची वाताहत झाली. झालं अस की त्या इनामदाराच्या मुलीच बाहेर कुठतरी लफड होत. मुंबईवरून कुणीतरी आला होता इथे गाव फिरायला. हि त्याच्या प्रेमात पडली. इनामदाराला ह्या गोष्टीचा सुगावा लागला. सहाजीकच इनामदाराला पसंद नव्हतं हे प्रकरण. त्याने जबरदस्ती केली. पण पोरगीपण जिद्दी होती. तिने इनामदाराच्या मनाविरुध्द लग्न करायचा निर्णय घेतला. एकेरात्री ती घरातून पळुन गेली.

"मग???????"

"घडलेल्या गोष्टीचा इनामदाराने फार धसका घेतला होता. पोरीने आपल्या तोंडाला काळं फासलं ही गोष्ट त्याच्या जिवाला फार लागली होती. त्याने गावात यायच सोडुन दिलं. काही लोकांनी त्याच्या वाड्यावर जाऊन घडल्या प्रकाराची चौकशी करायचा प्रयत्न केला पण इनामदाराने त्यांना हाकलून दिलं. त्यांच्या अंगावर धावून गेला. लोकांच्या मते पोरगी पळुन गेल्यापासून इनामदाराच्या डोक्यावर परिणाम झाला. तो पिसाटलाय. खरखोट कुणालाच माहीत नाही. आपल्याला कशाला नसत्या उचापत्या. पण त्यादिवसापासुन इनामदाराने गावाशी फारकत घेतली, आणि गाववाल्यानीही इनामदाराचा नाद सोडला. तो कायमचाच" एव्हढ बोलून शिवदास थांबला. एक दोन क्षण शांततेत गेले की अचानक काहीतरी आठवुन संतोषने विचारलं

"ह्या इनामदाराला एकुण मुली तरी किती होत्या?" संतोषने अधिरपणे शिवदासला विचारलं

"मला जास्त काही माहिती नाही साहेब. गावात जे ऐकल ते तुम्हाला सांगितल. गावात इनामदारांबद्दल जास्त काही बोलल जात नाही साहेब."

"पण का हो साहेब? तुम्ही का एव्हढी चौकशी करताय?" शिवदासने संतोषला विचारलं.

"नाही काही सहजच" एव्हढ बोलुन संतोष पुन्हा त्याच्या विचारत गुरफ़टला. का कुणास ठावुक पण त्याला विकासची गोष्ट स्वत:ची गोष्ट वाटत होती. संतोषला अस अचानक गप्प झालेल पाहून शिवदासला थोड विचित्र वाटलं.

"बर साहेब, मी येतो आता" एव्हढ बोलून शिवदासने घरी जायला निघाला. संतोष त्यावर काही बोलला नाही, तो अजुन त्याच्याच तंद्रीत होता. इतका की एव्हढा वेळ त्याच्या परवानगीसाठी उभा असलेला शिवदास शेवटी कंटाळुन बंगल्यातुन कधी निघून गेला हे त्याला कळलदेखिल नाही.

शिवदासकडून इनामदार आणि त्याच्या मुलीची गोष्ट ऐकल्यावर संतोष बराच वेळ स्वत:शीच विचार करत होता.

Ohh!! My God, ह्या सुवर्णाचा आणि त्या इनामदाराचा काही संबध तर नाही ना?
तस नसेल तर बरच होइल.

पण मग असला तर ???????

पण मग माझ्या अरुणाच काय?

ह्या सुवर्णच्या घटनेमुळेच तर अरुणा मला दूर करत नसेल ना?

Shitt! डोक भणभणायला लागलय आता. ते काही नाही आता आपण ह्या गोष्टीची सगळी शहनिशा करायलाच हवी.

मला अरुणाला ह्याबाबतीत विचारायालाच हवं.

*****************************************************************************

अरुणाला लाईट हाउसच्या दिशेने येताना पाहून संतोषच्या जिवात जीव आला. आज त्याला सगळ्या गोष्टीची उत्तर हवीच होती. अरुणाला आल्या आल्या त्याने तिला पुन्हा तोच प्रश्न केला.

"अरुणा माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही?"

"तुला मी माझ उत्तर कालच दिलय" अरुणा संतोषची नजर चुकवित म्हणाली.

"ते उत्तर खोट आहे हे तुलाही माहीतीय" संतोष आवेगाने तिला आपल्या जवळ ओढीत म्हणाला.

"कश्यावरुन" अरुणा संतोषच्या नजरेला नजर देत उसन्या अवसानाने म्हणाली.

"तुझ्या डोळ्यांवरुन" संतोष शांतपणे उत्तरला.

त्यासरशी अरुणा संतोषच्या मिठीत शिरून हमसा हमशी रडू लागली.
"नको एव्हढा गुंतवुस मला तुझ्यात. एकदा जर का मी माझा आखून घेतलेला परीघ मोडला तर माझी मी मलाच आवरणार नाही. प्लीज नको असं करूस"

संतोष तिच्या पाठीवरुन हलकेच हात फिरवीत तिला थोपटत होता. थोड्या वेळाने सावरल्यावर अरुणा संतोषच्या मिठीतुन दूर झाली आणि त्याला म्हणाली
"संतोष तू मला इथून घेउन जा. इथे राहिलो तर आपलं काही नाही होणार. उलट आपल्या प्रकरणाची चाहुल माझ्या घरी लागली तर बहुतेक मी तुला कधी दिसणारही नाही." अरुणा संतोषकडे पहात म्हणाली. तिच्या नजरेत तिची असाहय्यता स्पष्ट वाचता येत होती.

"Thanks अरुणा, तुझही माझ्यावर प्रेम आहे हे सांगीतल्याबद्दल. कालपासून जिवाला नुसता घोर लागला होता. मी तुला इथून घेउन जाईन. पण ते पळवुन नाही तर सर्वांच्या सहमतीनेच." संतोष

"मग तर तुला मला विसरून जाण्याखेरिज दूसरा कुठलाच पर्याय उरणार नाही. तुम्ही पुरुष नेमक्या वेळेला नेहमीच कशी काय माघार घेता?" अरुणा विषण्णतेने म्हणाली.

"अस तुला वाटत पण मी माघार घेत नाहिए. आपण एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे" संतोष

"ह्याअगोदर ही असा एक प्रयत्न करून झालाय" अरुणा

"हो मला माहितीय"

"तुला माहितीय ?म्हणजे?"

"सुवर्णा......." संतोषने आपला खडा टाकला.

संतोषने सुवर्णाच नाव उच्चारताच अरुणाच्या चेहरयावर भितीयुक्त आश्चर्य उमटले.

"तुला काय माहितीय सुवर्णाबद्दल" तिने अविश्वासाने संतोषकडे पाहिलं.

"सगळच......तिच्याबद्दलही आणि विकासबद्दलही" आपली शंका खरी ठरत असल्याच संतोषला जाणवत होतं.

एक दीर्घ सुस्कारा सोडीत संतोषने अरुणाला सगळ सांगितल. त्याला होणाऱ्या भासांबद्दल, विकासच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या डायरीबद्दल.
अरुणाला ह्या सगळ्या गोष्टी अशक्यप्रायच वाटत होत्या आणि तिच्या चेहर्यावरुन ते जाणवतही होत. अन ते सहाजीकच होत म्हणा तिचीच काय इतर कुणाचीही तीच गत झाली असती.

"मी बरोबर बोलतोय ना....." संतोषने अरुणाला विचारल आणि कानात प्राण आणुन अरुणा आता काय सांगतेय ह्याकडे संतोषच लक्ष लागलं होतं.

तिने दोन क्षण त्याच्याकडे पाहिल. संतोषकडून जे ऐकायला मिळालं होत त्यावर तिला अजुनही विश्वास बसत नव्हता. इतका वेळ अडवून ठेवलेल्या तिच्या भावनांना तिने आता अडवल नाही. ती ओक्साबोक्सी रडू लागली. भावनांचा निचरा झाल्यावर तिने डोळे पुसले व् सांगु लागली.

"तू बरोबर बोलतोयस संतोष. सुवर्णा माझी लहान बहिण होती. मला फार आवडायची ती. तिच्या माझ्या सगळ्याच सवयी सारख्या होत्या. जणुकाही माझच प्रतिबिंब म्हण हव तर. आम्हा दोघींनाही समुद्र खुप आवडायचा. ती एकदम साधी होती. चटकन कुणावरही विश्वास ठेवायची. अखेर ह्याच सवयीने घात केला तिचा.
नको त्या वेळेला नको त्या माणसावर विश्वास ठेवून बसली. आणि...."

"आणि.....?"

"आणि काय, वाताहात झाली बिचारीची. प्रेम केल होत तिने, अगदी मनापासुन प्रेम केलं होत आणि हिच मोठी चुक झाली तिची. फ़क्त ह्या एका चुकीसाठी सगळ्यांनी नाकारली तिला.....अगदी अखेरच्या क्षणीसुध्दा तिला कुणी पदरात घेतल नाही. ज्यानी जन्म दिला त्यांनीही नाही आणि ज्याच्यावर विश्वास ठेवला होता त्यानेही नाही."

"मग..???"

"जगाने पाठ फ़िरवली तरी तो आपल्याला कधिही फ़सवणार नाही. हे माहित होतं तिला. अन तो त्यांच्या आजवरच्या मैत्रीला जागला. सगळ्यांकडुन लाथाडल्या गेलेल्या तिला, अखेर त्याने जवळ केल.......... " हे सांगताना अरुणाने समुद्राकडे बोट दाखवलं. हे सगळ ऐकताना संतोषच्या अंगावर काटा आला. त्याने पटकन अरुणाला मिठीत घेतल. अखेर संतोषला ज्या गोष्टीची भिती वाटत होती. तीच गोष्ट खरी झाली होती. सुवर्णा ही 'इनामदाराचीच' मुलगी होती.

"बास कर अरुणा, नाही ऐकवत पुढच काही. अगदी माझा जीव गेला ना तरी मी तुला कधी अंतर देणार नाही. सगळ्या गोष्टी सुरळीत होतील फ़क्त माझ्यावर विश्वास ठेव" एव्हढ बोलून संतोषने अरुणा भवतीची आपली मिठी अजुन घट्ट केली.

अरुणा काही न बोलता संतोषच्या मिठीतली उब आपल्या शरीरात साठवुन घेत होती. जणु काही तिला उद्याची शाश्वती वाटत नव्हती.

************************************************************

अरुणाला निरोप दिल्यानंतर संतोष तिथुन निघाला. पावसाची चिन्ह दिसत होती. म्हणुन संतोषही लगबगीने बंगल्याकडे चालला होता. थोडच अंतर संतोष गेला असेल की त्याला रस्त्याच्या कडेला झाडाच्या मागे काहितरी हालचाल जाणवली. मघासपासुन संतोषला आपला कुणीतरी पाठलाग करतय ह्याची जाणीव होत होतीच. अचानक संतोषने पाठिमागंच्या झाडाच्या दिशेने पाहिलं तर त्याला तोच म्हातारा दिसला. संतोषला पाहून तो पुढे आला. दुसर्याच क्षणाला संतोषने सरळ त्याची गचांडीच धरली.

"कोण आहेस तू आणि कशाला माझा पाठलाग करतोयस?"

"तू आता कुणासोबत होतास?" त्या म्हाताऱ्याने संतोषलाच उलट विचारलं

"त्याच्याशी तुला काय करायचय" संतोष भडकला.

"तुला माहितीय का ती कोण आहे ते" म्हाताऱ्याचाही आवाज चढला.
"मी तुला सांगतोय तिच्या नादी नको लागुस. फार वाईट परिणाम होतील. फ़ुकटचा जिवाला मुकशील....." म्हातारा संतोषला बोलला.

"हो..माहितीय.ती तुझ्या इनामदाराची पोर आहे ते" आधीच अरुणाने सांगीतलेल्या गोष्टीमुळे संतोष भडकला होता आणि त्यात त्या म्हाताऱ्याच्या अश्या चिथावणीने संतोषची तारच सटकली

"जाऊन सांग तुझ्या इनामदाराला. म्हणावं की ह्या वेळेस गाठ माझ्याशी आहे." एव्हढ बोलून चिडलेल्या संतोषने रागाच्या भरात एक ठोसा सरळ त्याच्या चेहर्यावर मारला. त्या आघाताने तो म्हातारा बेशुध्दच पडला. तो मेला नाहिए ह्याची खात्री पटताच त्याला तिथेच टाकुन संतोष बंगल्याच्या दिशेने भरभर चालु लागला.

***************************************************************

घरी आल्यावर संतोषला काय कराव हेच सुचत नव्हत. विकाससारख त्याला त्याच्या प्रेमाला मुकायच नव्हतं. पण पळुन जाण हे त्याच्या तत्त्वात बसत नव्हतं. पण सद्य परिस्थीतीत त्याला काही सुचतही नव्हतं. उद्या अरुणाला शेवटच निर्वाणीच विचारायच आणि ती हो म्हणाली तर ठीक नाहीतर सरळ तिच्या घरी जायच, पुढे जे होईल ते होईल. असं ठरवून संतोष झोपण्याची तयारी करू लागला. घरी आल्यापासुन बाहेर पावसानेही बराच जोर धरला होता.

अचानक डोअर बेल वाजली. इतक्या पावसात एव्हढ्या रात्री कोण आल असेल हा विचार करीत संतोषने दरवाजा उघडला आणि थबकला.

दारात अरुणा उभी होती.

पुर्णपणे भिजलेली. बाहेर सुटलेल्या थंडगार वाऱ्यामुळे थंडीने कुडकुडत उभी होती. बहुदा धावत आल्यामुळे तिला दमही बराच लागला होता. तिची अशी अवस्था पाहून संतोषने लगोलग तिला आत घेतले.

"अरुणा तू इथे ह्यावेळी काय करतेयेस?" संतोषने गोंधळुन तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

"मी घरातुन पळुन आलेय, संतोष" अरुणाने शांतपणे उत्तर दिलं

"हां शुध्द मुर्खपणा आहे अरुणा, आपण अस करायला नको. तू एक काम कर थोडा वेळ आराम कर मी तुला घरी सोडुन येतो" संतोष कमालीचा गडबडला होता. अरुणा अस काही करेल ह्याचा विचारच संतोषने केला नव्हता.

"नाही मी नाही जाणार. मी तुझ्यासाठी अगोदरच बराच धोका पत्करून इथपर्यंत आली आहे. आता मी पुन्हा त्या घरात नाही जाऊ शकत. प्लीज ऐक माझ त्यांनी आपल्याला इथे गाठायच्या अगोदर आपण आत्ताच इथून पळुन जाउयात." अरुणा घाई करत म्हणाली.

"हे बघ अरुणा हे अस घर सोडुन येण योग्य नाही. आपण आत्ताच तुझ्या घरी जाऊ. मी बोलतो तुझ्या घरच्यांशी. माझा विश्वास आहे की, ते ऐकतील आपलं." संतोषने अरुणाला समजावायचा प्रयत्न केला. घराच नाव ऐकताच अरुणा बिथरली. तिचा घरी जायला सपशेल नकार होता. तीच एकच पालुपद चालु होत की 'तू मला इथून घेउन जा इथे आपल्या जिवाला धोका आहे'. बोलता बोलताच ती रडायला लागली, पण संतोष आपल्या मतावर ठाम होता. त्याला अरुणाला अस पळवुन घेउन जाण भ्याडपणाच लक्षण वाटत होत आणि तसही तो अरुणाला घेउन कुठे कुठे पळणार होता. ह्या पावसात तसही घराबाहेर पडणं मुश्किल होतं त्यात पुन्हा पोलिसांचा ससेमिरा मागे लागला असता तो वेगळा. त्यामुळे अरूणा सांगतेय त्याप्रमाणे पळुन जायचा पर्याय सोपा नव्हता. त्यापेक्षा तिच्या घरच्यांना एकदा भेटुन त्यांच एकवेळ मन वळवणं त्याला सोयीच वाटत होत. जी चुक विकासने केली ती तो करणार नव्हता. संतोष ऐकत नाही हे पाहून अरुणा भडकली.

"अरे तुझ्या भरवश्यावर मी एव्हढी मोठी रिस्क घेतली आणि आता तू पाठ फ़िरवतोयस." रागाच्या भरात अरुणा संतोषवर तो तिला फसवत असल्याचा आरोप करू लागली.

"हे बघ अरुणा, मी अजिबात पाठ फिरवत नाहीय. तू उगाचच गैरसमज करून घेतेयेस. हे बघ पळुन जाउन काहीही उपयोग होणार नाहीए. आज ना उद्या आपल्याला परिस्थितीला सामोर जावच लागणार आहे" संतोष अजुनही अरुणाला त्याच म्हणन पटवुन द्यायचा प्रयत्न करीत होता पण अरुणाची अजुनही धुसफुस चालूच होती पण संतोषवर त्याचा काहिएक परिणाम होत नव्हता.

अखेर संतोष ऐकत नाही हे बघता हताश झालेली अरुणा संतोषला म्हणाली की "ठीक आहे...होउ दे तुझ्या मनासारखं पण फ़क्त आजची रात्र मला इथे थांबु दे, उद्या आपण माझ्या घरी जाउ". ह्या अटीवर संतोष तयार झाला. सरतेशेवटी अरुणाला आपलं म्हणन पटलं ह्याचा संतोषला समाधान वाटत होत. एव्हाना बाहेर पावसाचा जोर ही आता कमी झाला होता.

संतोषने अरुणाला बेडरुममध्ये झोपवले आणि स्वत: खाली हॉलमध्ये झोपायला गेला. रात्र मुंगीच्या गतीने सरकत होती. उद्या अरुणाच्या घरी गेल्यावर नेमक काय होईल ह्याचा विचार करून करून बराच वेळ त्याला झोपच येत नव्हती. रात्री घड्याळ्याने दोनचे टोले दिले. संतोष हॉलमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या घालत होता. अरुणाने घर सोडायची उगाचच घाई केली असं त्याला राहून राहून वाटत होतं. आणि त्यात पुन्हा त्याने तिला आज रात्री इथे ठेवून घेतली होती. एकतर ती अशी घरातून पळुन त्याच्याकडे आलेली. तिच्या घरातले तिला शोधत शोधत इथवर आले असते तर एक मुसीबत होणार होती. ह्या प्रकरणात ती त्याच्याकडे सापडणं तिच्यासाठी आणि त्याच्यासाठी दोघांसाठीही धोक्याचं होतं. त्यात पुन्हा ते विकास प्रकरण पण आहेच की......

अरे बापरे ह्या सगळ्या घडामोडीत मी विकासला पूरा विसरुनच गेलो होतो. त्याची यायची वेळ झाली होती आणि अरुणा........

Ohh shitt अरुणा वर एकटीच आहे.

तो तसाच धावत वर गेला. आत नजर टाकताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बेडवर अरुणा नव्हती. त्याने रूममध्ये सगळीकडे शोधलं पण अरुणाचा कुठेच पत्ता नव्हता. संतोषची आता चांगलीच तंतरली होती. संतोष अरुणाला शोधायला खाली जाणारच होता की, त्याला बाहेर टेरेसवर कुणाची तरी हालचाल जाणवली. कुणाच्या तरी मुसमुसण्याचा आवाज येत होता. तसा तो जागीच थांबला. त्याने टेरेसच्या दिशेने पाहिले तर टेरेसचा दरवाजा सताड ऊघडा होता. बाहेरच्या वाऱ्यामुळे त्याची कवाड हलत होती.

"अरुणा" संतोषने खात्री करून घेण्यासाठी हलकेच हाक मारली.

बाहेरून काहीच प्रतिसाद आला नाही. संतोष हळुहळु दरवाज्याच्या दिशेने जात होता.अजुनही बाहेरून फ़क्त कुणीतरी मुसमुसत असल्याचा आवाज येत होता. संतोष दरवाज्याजवळ पोहचला. त्याने कवाडं हलकेच ढकलली. बाहेर पावसाची रिपरिप अजुनही चालूच होती. बाहेरचा तो मुसमुसण्याचा आवाज आता स्पष्ट येत होता. जणु काही कुणीतरी आपल्या तोडांवर हात ठेवून स्वत:चे रडणं लपवायचा प्रयत्न करत होतं. संतोषने त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

त्याने पाहिलं की अरुणा पाठमोरी उकडीव बसून तोडांवर हात ठेवून मुसमुसत होती. रडताना तीच शरीर जोरात गदगदत होत. म्हणजेच ती फार जोरात रडत होती. संतोष तिच्याकडे जाणार की त्याला त्याच्या पाठीमागे दरवाजात काही हालचाल जाणवली. त्याने मागे वळुन पाहिल तर तो चमकलाच. पाठीमागे टेरेसच्या दारात विकास उभा होता. तो त्याच्याकडेच पहात होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आज काहीतरी वेगळेच वाटत होती. त्याचा चेहरा जणु वेदनेने पिळवटला होता. त्याच्या नजरेतली व्याकुळता काळजात आरपार घुसत होती. तो सारखी त्याची मान जोरजोरात हलवून "नाही" "नाही" असं सांगत होता. संतोषला कळत नव्हतं की आज हां असा का वागतोय?. ह्याला नक्की सांगायच तरी काय आहे. अचानक तो त्याच्या समोरून विरळ होउ लागला. असं वाटत होत की तो स्वत: जात नाही आहे कुणीतरी बळजबरीने त्याच्या मनाविरुद्ध त्याला तिथून घेउन चालले आहे. पण जाता जाताही त्याच्या डोळ्यातली वेदना संतोषला जाणवत होती. संतोषला हे काय चालले आहे काहीच कळत नव्हतं. त्याने पुन्हा अरुणाकडे पाहिले आणि तो जागीच थिजला.

अरुणा आता त्याच्यासमोर पाठमोरी टेरेसच्या रेलींगला खेटुन उभी होती. संतोषने तिला दबक्या हाक मारली. पण अरुणा अजुनही तशीच उभी होती. तीच मुसमुसणं आता थांबलं होतं. दोन तीन हाका मारुनही अरुणाचा प्रतिसाद न आल्याने संतोष हळुहळु तिच्याकडे जात होता. तिच्याजवळ जाताना संतोषला जाणवलं की अरुणा तोडांने काहीतरी पुटपुटत होती आणि पुटपुटताना सारखी अंगाला झटके देत होती. संतोष अरुणाच्या जवळ पोहचला. तो तिला हात लावणार तितक्यात ती गरकन मागे वळली. तिचा चेहरा पाहून संतोषची बोबडीच वळली. भितीने संतोषच्या तोडुंन किंचाळीच बाहेर पडणार होती. तिचा चेहरा पांढरा फ़ट्टक दिसत होता. बराच वेळ पाण्यात काम केल्यामुळे आपल्या बोटांची त्वचा जशी होते अगदी तशीच अरुणाची सगळी चामडी लिबलिबीत दिसत होती. तिच्या डोळ्याच्या बाहुल्याच गायब झाल्या होत्या. तिचे केसही विस्कटलेले होते आणि वाऱ्यामुळे तिच्या चेहरयावर पसरले होते. त्यामुळे तिचा चेहरा अजुनच बेसुर वाटत होता. संतोषला अरुणाला ह्या अवस्थेत पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती संतोषकडे पाहून जोरात फ़िस्कारली. संतोष घाबरून एक एक पाउल मागे जात होता. त्यासरशी अरुणाही संतोष कडे एक एक पाउल पुढे सरकत होती. ती संतोषकडे सारखी मान एकदा इकडे तर एकदा तिकडे करून पहात होती. तिच्या पासून दूर होताना संतोष घाबरून पायात पाय अडकुन खाली पडला. तशी अरुणा जोरात हसली. तिचं असं खदखदून हसणं ऐकणाऱ्याच्या उरात धडकी बसवत होतं. संतोष आता बसल्या बसल्या तिच्यापासून दूर होत पाठीमागे सरकू लागला. पाठीमागे सरकता सरकता एका क्षणाला संतोषची पाठ भितिंला टेकली. संतोष आता ह्यापेक्षा तिच्यापासून दूर जाऊ शकत नव्हता. संतोषला खाली पडलेल बघून अरुणाही खाली जमिनीवरून गुडघ्यावर रांगत रांगत त्याच्याजवळ जाऊ लागली. संतोषची तर ह्या प्रकाराने बोबडीच वळली होती. भीतीने त्याच्या तोंडातुन शब्दच फुटत नव्हता. अरुणा रांगत रांगत आता संतोषच्या अगदी जवळ आली होती. त्याच्या आणि तिच्या चेहरयात आता फ़क्त एका इंचांच अंतर होत. आपल्या सावजाचा घास घेण्याअगोदर श्वापदाच्या चेहऱ्यावर जसे भाव असतात अगदी तसेच भाव अरुणाच्या चेहरयावर दिसत होते. तिच्या निर्जीव डोळ्यामध्ये संतोषला स्वत:च मरण स्पष्ट दिसत होत. शेवटचा उपाय म्हणुन आता संतोष आपले हात जोडून रडत रडत तिच्याकडे स्वत:ला सोडवण्याची विनवणी करत होता. संतोषची गयावया पाहून ती एक क्षण थांबली. ती संतोषकडे एकटक पहात होती. पुढच्याच क्षणाला तिच्या चेहरयावर एक मिश्कील हास्याची लकेर उमटली आणि दुसरयाच क्षणाला तिने संतोष वर झडप घातली.

त्यासरशी संतोषची आर्त किंचाळी आजुबाजुच्या शांत परिसरात चिरत गेली.

*********************************************************************

दुसऱ्या दिवशी सकाळी किनाऱ्यावर लोकांची गर्दी झाली होती. गावात खबर मिळाल्यावर शिवदासही धावत धावत तिथे पोहचला होता. सकाळी गावातल्या काही पोरांना किनाऱ्यावरती एका तरुणाच प्रेत दिसल होत. त्यांनी लगोलग गावात खबर पोहचवली. पोलिसही आता घटनास्थळी पोहचले होते. घटनास्थळी आता बघ्यांची गर्दी वाढली होती. शिवदासही गर्दीतून कसाबसा वाट काढत पुढे पोहचला. त्या प्रेताचा चेहरा पहाताच शिवदास सरपटलाच.

संतोष शिंदे..........

पंचनामा वगैरे झाल्यावर हवालदार राणे इन्स्पेक्टरांना म्हणाले
"साहेब ही केस सेम अगदी दोन वर्षापूर्वी घडलेल्या त्या विकास मोझरच्या केस सारखी वाटतेय ना?"
"हो, मलाही तसच वाटतय. ती केसही अजुन ओपनच आहे. त्या केसमध्ये ही काही धागेदोरे सापडले नव्हते. आता ह्या संतोषचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यावर नक्की काय ते कळेल. पण सध्या एक काम करा. संध्याकाळची किनाऱ्यावरची आपली गस्त वाढवा." संतोष शिंदेची फाईल बंद करीत इंस्पेक्टर, हवालदार राणेंना म्हणाले.

*******************************************************************

इकडे इनामदाराच्या वाड्यात तो म्हातारा आपल्या हातात एका मुलीचा फ़ोटो घेउन ओसरीत बसला होता. वाडा अगदीच जुना होता. एकेकाळी बरेच वैभव अंगावर खेळवल्याची सगळी लक्षण त्या वास्तुत दिसत होती पण आता ती सगळी रया उतरली होती. आजुबाजुच्या आसमंतात एकप्रकारची उदासीनता पसरली होती. इतके दिवसापासून इथल्या परिसराला वाळीत टाकलेल असल्यामुळे तिथे एक बधीरता साचली होती.

"अजुन ही पोर कितीजणांचे जीव घेणार आहे देवजाणे?" हातातल्या तिच्या फ़ोटोकडे पाहून तो हलकेच चुकचुकला.

तिच्या फ़ोटोतल्या तिच्या हसऱ्या चेहरयावर आपली थरथरती बोट फिरवत तो आपल्या भुतकाळात गेला.

आजही तो दिवस त्याच्या लक्ष्यात होता. किती गोड पोर होती. समुद्र फार आवडायचा तिला. तास न तास बसून असायची तिथे. तिला कुणी विचारलं की तुला आवडतो का समुद्र? तर सांगायची 'मला तो नाही तर त्याला मी आवडते.' हे सांगताना तिच्या खळखळुन हसण अजुनही आठवतय. पण एकेदिवशी तो तिला भेटला. तिथेच समुद्रावर. मुंबईतुन आला होता तो. गाव फिरायला. इथे गव्हर्नर बंगल्यात उतरला होता. त्या हरामखोराने नादी लावल तिला. त्याच्या बतावणीला फसली होती बिचारी. एव्हढ समजावूनसुध्दा शेवटी तिने आपल तेच खर केल. त्याच्यावरच्या आंधळ्या प्रेमात सगळ विसरली होती. त्याने दिलेल्या लग्नाच्या खोट्या वचनाच्या आधारावर त्याला सर्वस्व देऊन बसली होती. शेवटी ही गोष्ट लपतेय थोडीच. अखेर ती गोष्ट बाहेर फ़ुटलीच. आता तिच्यासमोर दूसरा काही पर्यायच नव्हता.

अश्याच एका पावसाळ्या रात्री घरच्या विरोधाला न जुमानता तिने हा वाडा सोडला आणि त्याला भेटायला गव्हर्नर बंगल्यावर गेली. त्याच्यासोबत पळुन जायला. ती मोठ्या आशेने त्याच्याकडे गेली होती, पण त्याने तिला त्याच रात्री तिथुन भर पावसात हाकलून लावली. तिने फार गयावया केली त्याची, पण तो बधला नाही. तिला इथेच सोडुन पळुन गेला हरामखोर. सगळ्यांनी दूर लोटलेल्या तिला अखेर त्या समुद्राने जवळ केली. तेव्हापासून समुद्रावरच्या त्या भागात येणारया जाणार्यात प्रत्येकात ती त्यालाच शोधत असते. आपला प्रतिशोध पुर्ण करण्यासाठी.

तेव्हढ्यात त्यादिवशी झालेल्या त्या प्रहारामुळे चेहरयाच्या त्या दुखावलेल्या भागातून एक कळ सरसरत मेंदुपर्यंत गेली आणि तो म्हातारा भानावर आला.

मागे दोन वर्षापुर्वी एकजण आणि त्यादिवशीही तो दुसरा. पहिला ज़रा कमनशिबीच. मी त्याला गाठायच्या अगोदरच तिने डाव साधला. पण दुसऱ्याला मी माझ्या परीने बराच समजवायाचा प्रयत्न केला. पण तो काहिएक ऐकायच्या तयारीतच नव्हता. मला म्हणत होता की जाउन सांग त्या इनामदाराला..........
अरे काय त्या इनामदाराला जाउन सांग. इथे इनामदार स्वत: तुला सांगायला तिथे एव्हढा धोका पत्करून आला होता. पण नाय.... तो ऐकला नाय अखेर तोही समुद्राच्या पोटात तिच्यासारखाच गुडुप झाला. झाल्या प्रकाराचा विचार करून करून आता त्याच डोक आता दुखायला लागल होत. मध्येच त्याला काय झाल की तो ताडकन उठला आणि अंगणात येउन जोरात ओरडला.

" अग ए....... तू माझ्या चुकीची शिक्षा त्या निष्पाप जिवांना का देतेस. मला माहितीय की माझ चुकलय, त्यारात्री तू जेव्हा त्याच्याकडून झिडकारल्यावर वाड्यावर परत आली होतीस, तेव्हा मी तुला दूर लोटायला नको होत. तेव्हा मी तुला परत घरात घेतल असत तर आज ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या........मला माफ़ कर.......
मला माफ़ कर............."

एव्हढ बोलून तो म्हातारा इनामदार अंगणात धाय मोकलुन रडायला लागला.

**********************************************************************

आज समुद्रावर तो ज़रा लवकर आला होता. तीच्या येण्याची वाट बघत. गेले दोन दिवस तो तिला इथेच पहात होता.

पण आज अजुन ती आली नाही. कुतुहलाने त्याने आजुबाजुला पाहिलं की ती कुठे दिसतेय का ते? पण ती कुठेच दिसली नाही. पुर्ण किनारयावर तो एकटाच होता. असाच थोडावेळ गेला. आता काय ती येत नाही असा विचार करून तो तिथून जाण्यास वळला की, त्याच्यापासून थोड्याच अंतरावर ती समुद्राच्या पाण्यात आपली पावले भिजवीत लाटांशी खेळताना दिसली. तो तिला पाहून खुष झाला. ती त्याच्याकडेच पहात होती. तो आपसुकच तिच्याकडे ओढला गेला. तिच्या बाजुला तोही समुद्राच्या पाण्यात उभा राहून त्या गार वारयात, लाटांचा उबदारपणा अनुभवत होता. त्याने एकवार तिच्याकडे पाहिलं ती आज मस्त दिसत होती. नजर क्षितिजावर लावून, कसलतरी गाणं गुणगुणत होती. थोडा वेळ तिच्या बाजुला शांत उभ राहिल्यावर शेवटी न रहावुन त्याने बोलायला सुरुवात केली.

"Hi......मी अमोल परब"

त्याच्या आवाजासरशी ती गुणगुणायची थांबली. त्याच्या डोळ्यांत पहात ती उत्तरली.

"मी तृप्ती ... तृप्ती इनामदार."

"Good, तुम्ही इथल्याच का? मी ह्या गावात नवीन आहे. इथेच गव्हर्नर बंगल्यात उतरलोय"

त्याच्या तोंडुन गव्हर्नर बंगल्याच नाव ऐकताच तिचे डोळे चमकले.

त्याच्याकडे एक कटाक्ष टाकुन तिने पुन्हा आपली नजर त्या समुद्रावरून क्षितिजापार फेकली आणि मगासच तिच अर्धवट राहीलेलं गाणं ती पुन्हा गुणगुणु लागली.

"एकाच ह्या जन्मी जणु
फिरुनी पुन्हा ......जन्मेन मी....."

.....समाप्त....

कथा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

6 Nov 2015 - 11:31 pm | मांत्रिक

वाचतोय! आत्ताच पूर्ण वाचता येणार नाही! बाकी भयकथा जबरा लिहिता तुम्ही!

शा वि कु's picture

7 Nov 2015 - 12:34 pm | शा वि कु

पूर्ण वाचली . शेवट जबराट झालाय .

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 4:59 pm | टवाळ कार्टा

भारि

बाबा योगिराज's picture

7 Nov 2015 - 7:46 pm | बाबा योगिराज

समजली समजली म्हणे पर्यन्त कथा जोरदार वळण घेऊन गेली.
भेष्ट, आवड्यास.
जबराकुस...

आज वाचली पूर्ण. खतरनाक लिहिता हो.
अगदी बेस्ट. शेवटपर्यंत कळलं नाही काय होणारंय ते.
असो. पण शेवटी तुम्ही कशाला पोहोचलात तिच्यापर्यंत.
राजे सावध व्हा आत्ताच! अजून तरी या माघारी!!! ;)
;) ;)

मांत्रिक's picture

7 Nov 2015 - 8:58 pm | मांत्रिक

तुमचं नाव अमोल परब असल्याचं कुठेतरी वाचलंय. तुमचा ब्लाॅग पण आहे ना? पाहिल्याचं आठवतंय.

एक एकटा एकटाच's picture

7 Nov 2015 - 9:04 pm | एक एकटा एकटाच
एक एकटा एकटाच's picture

7 Nov 2015 - 9:01 pm | एक एकटा एकटाच

आता काय करणार.....

झालीच चुक .........

पण टेंशन इल्ले

तिने काही केलच तर तुम्ही आहातच की

मांत्रिक's picture

7 Nov 2015 - 9:02 pm | मांत्रिक

नहीं मै नै जौंगा ऊसके पास!!!

_मनश्री_'s picture

7 Nov 2015 - 9:22 pm | _मनश्री_

जबराट
1

मांत्रिक's picture

7 Nov 2015 - 10:38 pm | मांत्रिक

वी विली विंकी...
रन्स थ्रू द टाऊन...

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Nov 2015 - 9:59 pm | लॉरी टांगटूंगकर

ज ब र द स्त!!!!!!!!!!!!!!!

आणि एकाच भागात टाकल्याबद्दल खास धन्यवाद!!!! मी नेहमीच खाली क्रमशः नाही हे आधी पहातो आणि नसले तरच वाचायला घेतो.

खेडूत's picture

7 Nov 2015 - 10:17 pm | खेडूत

छान कथा!
आवडली.

उगा काहितरीच's picture

8 Nov 2015 - 1:36 am | उगा काहितरीच

वाचेन नंतर...

उगा काहितरीच's picture

9 Nov 2015 - 5:34 pm | उगा काहितरीच

जब्राट ... कडक... एकाच बैठकीत पूर्ण कथा वाचायला मजा आली. रच्याकने या कथेवर श्रीयुत इमरान हाश्मी या महाशयांचा चित्रपट कल्पावा . काही "सीन" ;-) थोडे बदलावे लागतील पण चांगला होईल चित्रपट .

मांत्रिक's picture

9 Nov 2015 - 5:50 pm | मांत्रिक

;)
आजकाल उ.का.साहेबांची गाडी जोरात हाय म्हणायचं...

उगा काहितरीच's picture

9 Nov 2015 - 9:02 pm | उगा काहितरीच

म्हणायचं तर म्हणा आमची काही हरकत नाही , पण आमची गाडी (होय तीच बोक्यावाली) सध्या बंद आणि पुण्याला आहे. ;-)
हघ्या हेवेसांनलगे !

मांत्रिक's picture

9 Nov 2015 - 9:08 pm | मांत्रिक

अहो गंमतीत म्हटलं साहेब. आज तुमच्या २ अगदीच भन्नाट मजेशीर प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या म्हणून.

उगा काहितरीच's picture

9 Nov 2015 - 9:40 pm | उगा काहितरीच

हो कळालं , धन्यवाद !
रच्याकने मला अरेतुरे म्हटलेलं आवडेल...
-आपला उगा

एकनाथ जाधव's picture

22 Dec 2015 - 7:21 pm | एकनाथ जाधव

खुप जब्राट

योगी९००'s picture

8 Nov 2015 - 8:19 am | योगी९००

कथा आवडली...एकाच भागात टाकल्याने पुर्णपणे वाचली गेली.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2015 - 10:17 am | मुक्त विहारि

सध्या तरी वाखूसा.

एक एकटा एकटाच's picture

18 Dec 2015 - 1:20 pm | एक एकटा एकटाच

झाली का वाचुन........

बोका-ए-आझम's picture

8 Nov 2015 - 10:30 am | बोका-ए-आझम

शिवदास हा red Herring चांगला टाकला आहे. सुरूवातीला त्याच्यावरच संशय येतो. पुलेशु.

एक एकटा एकटाच's picture

18 Dec 2015 - 1:22 pm | एक एकटा एकटाच

Good catch

सर

रातराणी's picture

8 Nov 2015 - 10:47 am | रातराणी

कथा आवडली. शैली छान. थोडी प्रेडीकटेबल झाली शेवटाकडे.

एक एकटा एकटाच's picture

8 Nov 2015 - 2:10 pm | एक एकटा एकटाच

सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे मनपुर्वक आभार

एकाच बैठकीत वाचून काढली. एक नंबर लिहिता राव तुम्ही. लयच भारी.

संदीप डांगे's picture

9 Nov 2015 - 6:17 pm | संदीप डांगे

खूप सुंदर अमोल...परब....

वाचायला सुरुवात केल्यावर मधे सोडताच आली नाही......
जबरदस्त लिहिली आहे. असेच लिहित रहा....
<<पण अश्या कथा तुकड्या तुकड्यात विभागणे एक लेखक म्हणुन व्यक्तिगतरित्या मला योग्य वाटत नाही>>
+१. शक्यतो कथा लिहिताना असलेला एकसंधपणा वाचतानाही जाणवला पाहिजे.

एक एकटा एकटाच's picture

14 Nov 2015 - 8:03 am | एक एकटा एकटाच

अगदी बरोबर

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 10:28 am | कविता१९७८

छान लिहिलंय

एक एकटा एकटाच's picture

14 Nov 2015 - 8:01 am | एक एकटा एकटाच

सगळ्यांचे मनपुर्वक आभार.

छान कथा.. काही काही प्रसंगी खरंच श्वास रोखुन धरला गेला.. लिहीत रहा पण एवढी मोठी कथा एकत्र वाचणं थोडं अवघड आहे हो.

एक एकटा एकटाच's picture

20 Nov 2015 - 6:26 pm | एक एकटा एकटाच

पण अश्या कथा तुकड्या तुकड्यात वाचायला मजा नाही येत.
तुम्हाला आली असती का?
जर मी ही कथा दोन तीन भागात टाकली असती तर

स्पा's picture

18 Dec 2015 - 3:04 pm | स्पा

जबराट एकदम, आवडली

एक एकटा एकटाच's picture

18 Dec 2015 - 11:11 pm | एक एकटा एकटाच

तुम्हाला माझी कथा आवडली

हे बघून

दिल गार्डन गार्डन हो गया........

प्रियाजी's picture

18 Dec 2015 - 3:48 pm | प्रियाजी

कथा एकाच भागात टाकली ते छान झाले. कथेतील वळणेही छानच. पण शेवटाचा अंदाज थोडा आलाच फक्त तो कसा होणार त्याची उत्सुकता वाटत होती.

एक एकटा एकटाच's picture

18 Dec 2015 - 11:13 pm | एक एकटा एकटाच

प्रतिसादासाठी मनपुर्वक आभार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2015 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा आवडली. एकाच भागात लिहिल्याने हातात कथेचं पुस्तक घेऊन वाचल्यासारखं मोबाईलवर सलग वाचत राहीलो. मजा आली. वर्णनं छान होती. मला गुढ समुद्र तरुणीसह आवडला. मी समुद्राला आवडते हे तर खासच. बाकी, गाव, बंगला, पात्रं, आकृत्या, डायरी, हे सर्वच खास होतं. शेवटही आवडला. अर्थात शेवट अजून दमदार करता आला असता किंवा माझ्या मते ''त्याच्या तोंडुन गव्हर्नर बंगल्याच नाव ऐकताच तिचे डोळे चमकले'' इथेच ही कथा संपली. अर्थात आम्हा वाचकांना म्हणायला काय लागतं. आपण लिहिलंय खुप दमदारपणे. लिहित राहा. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

एक एकटा एकटाच's picture

20 Dec 2015 - 10:13 am | एक एकटा एकटाच

आपल्या प्रतिसादासाठी मनपुर्वक आभार......

अश्या दिलखुलास प्रतिसादाने हुरूप येतो.

एकदम भारी राव . काय लिहिता . असेच लिहित रहा पुढच्या एका कथेच्या प्रतिक्षेत .

एक एकटा एकटाच's picture

20 Dec 2015 - 10:14 am | एक एकटा एकटाच

लवकरच नवीन कथा घेउन येतोय.....

किसन शिंदे's picture

20 Dec 2015 - 6:02 pm | किसन शिंदे

एक नंबर लिहिलीये राव कथा...मानलं ब्वाॅ तुम्हाला..

छोटा चेतन-२०१५'s picture

21 Dec 2015 - 7:58 pm | छोटा चेतन-२०१५
लय भारी अर्थात लयच भारी राव
एक एकटा एकटाच's picture

23 Dec 2015 - 7:47 pm | एक एकटा एकटाच

सगळ्यांचे मनपुर्वक आभार

मराठी कथालेखक's picture

27 Jun 2016 - 5:49 pm | मराठी कथालेखक

कथा आवडली