लालीची गोष्ट भाग १

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Oct 2015 - 1:54 pm

भाग १
रोज कचऱ्याच्या पेटीच्या मागच्या रिकाम्या जागेत झोपताना लालीच्या मनात एकच विचार यायचा..... अजून किती दिवस? माईला विचारून विचारून लाली थकली होती. माईच एकाच उत्तर होत; "एक दिवस नक्की लाली बेटा; एक दिवस नक्की! मी पण वाट बघते आहे.!"

जेव्हापासून लालीला आठवत होत तेव्हापासून तिची माई तिला संध्याकाळी ५-६ च्या सुमाराला त्या कचरा पेटीच्या मागे आणून बसवात असे आणि सकाळी ८ नंतर येऊन घेऊन जात आसे. लालीबरोबर सुखी आणि रंगा पण असत. सुखी तशी मोठी होती. साधारण पाच एक वर्षांनी मोठी असेल लालीपेक्षा. काळी सावली सुखी लालीवर मनापासून प्रेम करायची. जर लालीच्या माईला - शीलाला- कचारापेटीकडे यायला उशीर झाला तर सुखीचा जीव घाबरा-घुबरा व्हायचा. कारण तिने लालीला अगदी ४-५ महिन्यांची असल्यापासून संभाळल होत. अगदी बाटलीतून दूध पाजण्यापासून ते कधीतरी आजारात तिच्यसाठी जागरण करण्यापर्यंत. पावसात आडोसा तयार करायला रंगाची मदत व्हायची. रंगा तसा अबोल. लाली आणि सुखीच्या मधला. सुखीचा धाकटा भाऊ.

लाली आठ वर्षांची असेल जेमतेम; पण तिला तिच्या एकूण परिस्थितीची पूर्ण जाणिव झाली होती. माईच्या एका कस्टमरने लालीची दया येऊन आपणहून माईला माहिती दिली होती की वेश्यांच्या मुलांना शिकवायला एका संस्थेचे काही कार्यकर्ते वस्तीच्या टोकाच्या एका बिल्डिंग मध्ये येतात. माई जाऊन भेटून आली होती त्या लोकांना. आणि मग तिने लालीला रोज रात्री तिथे सोडायला सुरवात केली होती. अर्थात त्याच कारण ही तसच होत.

सुखी तेराची झाली आणि अम्माने फर्मान काढल की सुखीची वेळ झाली आहे. त्या रात्री लालीला कुशीत घेऊन सुखी खूप खूप रडली होती. लाली गोंधळली होती.

"सुखी का रडते आहेस ग?" तिने तिचे डोळे पुसत चौथ्यांदा विचारल.

रंगा तिथेच एका बाजूला बसून हातातला वडापाव खात होता. सुखी काहीच बोलत नाही हे बघून तो म्हणाला;"तिला उद्यापासून कामावर लावणार आहे अम्मा. आता सुखी नाही येणार इथे. उद्या संध्याकाळी तिच नाव वेगळ होणार आहे."

झाल ही तसच. त्यानंतर लालीला सुखी कधी दिसलीच नाही. तिने रंगाला विचारल देखील. तो म्हणाला;" एका कस्टमरला आवडली सुखी. तो अरब होता. त्याने अम्माला किलो किलोने सोन दिल आणि सुखीला विकत घेतल."

लालीला हा सगळा प्रकार माहित होता पण अजून कळत नव्हता. अम्मा तिच्याशी तशी चांगली वागायची. "लाली तू मेरी जान हे. आगे तू ही मेरी गद्दी चलायेगी." अस म्हणून ती लालीचा गालगुच्चा घ्यायची आणि तिच्या हातात रुपया ठेवायची. माई मात्र लालीच्या गालावर कचकचून चढवून द्यायची २-४; लाली अम्माच्या समोर गेली तरी. आणि लाली मिठी मारायला गेली तर दूर ढकलून द्यायची. लाली बिचारी एकटीच कोपऱ्यात बसून रडायची. मग थोड्या वेळाने माई यायची. ती स्वतः रडत असायची. लालीला जवळ घ्यायची आणि म्हणायची;" बेटा लाली, तू या चिखलातून बाहेर पडणार आहेस. मला माहित नाही कस. पण मी अजून एक शीला किंवा सुखी बनू देणार नाही."

लाली रात्रीच्या वेळी संस्थेच्या ठिकाणी जायची. तिथे जेमतेम १०-१२ मुलच होती. तिने रंगाला पण यायचा आग्रह केला. रंगा आलाही काही दिवस. पण मग अचानक बंद झाला यायचा. कारण विचारल तर म्हणाला;"मला नाही आवडत ते गाणी म्हणण आणि त्यांच्या इशाऱ्यावर वागण. माझा मी बारा आहे इथे बाहेर."

लालीला मात्र तिथे जायला खूप आवडायचं. कधी एकदा संध्याकाळ होते आहे आणि संस्थेत जायला मिळते आहे याची ती वाट बघायची. तशी ती बिल्डिंग लांब नव्हती. लालीला वाटायच की ती एकटीसुद्धा जाऊ शकते तिथे. पण शीला तिला कधीच एकटी सोडायची नाही. दिवसा तर संडासला जायचं असेल तरी ती लालीला सोबत घेऊन जायची. इतर बायका तिला चिडवायच्या;"क्यो इतना नखरा करती हे शीला? एक दिन लाली भी अपने जैसी बनेगी." त्यावर डोळे लाल करून शीला त्यांना मारायला धावायची. पण तोंडाने काहीच बोलायची नाही. मात्र आजू-बाजूला कोणी नसल की ती लालीला कुशीत घ्यायची आणि तिच्या कानात सांगायची;"लाली तू इथे नाही राहणार. तू मोठी होणार ग. तू मला इथून नेणार. आपल्या गावात."

लालीने एकदा शीलाला विचारले;"माई कुठे आहे ग आपले गाव? आणि जर आपल्याला गाव आहे तर मग आपण इथे का आहोत?"

लालीच्या निरागस प्रश्नाने शीलाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. तिने लालीचा मुका घेतला आणि तिला सांगायला सुरवात केली. "ऐक बेटा. आपला फक्त गाव नाही ग तुला अजून ४ बहिणी देखील आहेत. तू सर्वात धाकटी. तुझा जन्म झाला आणि तुझ्या आज्जीने तुझ्या वडिलांना सांगितले, आपल्या घराण्याला वंशाचा दिवा हवा आहे. या घर रिकाम करण्याऱ्या मुली नको आहेत. तुझ्या या लाडक्या बायकोतच दोष आहे काहीतरी. काढ तिला घरा बाहेर. तुझ्या वडिलांचा पण नायलाज झाला ग. त्यांनी माझ्याशी लग्न केल होत तेच मुळी घरच्यांच्या मनाविरुद्ध. मी साध्या शेतमजुराची मुलगी. पण दिसायला चांगली होते असे सगळ गाव म्हणायचे. तुझे वडील सावकाराचा मुलगा. त्यांची नजर पडली माझ्यावर. त्यांच्या आईने २ रात्रीची बायको कर अस सांगितल होत.पण त्यांचा खरच माझ्यावर जीव जडला होता. त्यामुळे त्यांनी सर्वांचा विरोध सहन केला आणि माझ्याशी लग्न केल. पण मला पाठोपाठ ४ मुली झाल्या. तू पाचवी. तुझा जन्म झाला आणि सासू यांच्या मागे लागली की मला सोडून द्यावं. काही दिवस यांनी दुर्लक्ष केल. पण एक दिवस मी आडावर पाणी काढत होते तेव्हा सासूने मागून येऊन मला आत आडात ढकललं. यांनी ते पाहिलं आणि मला बाहेर काढल. माझ्या जीवाला धोका होता हे लक्षात आल्यावर ते मला इथे शहरात त्यांच्या मित्राकडे घेऊन आले. आम्ही इथे पोहोचलो आणि गावाकडून फोन आला की सासूची तब्बेत जास्त झाली आहे. त्यामुळे मला आणि तुला इथेच ठेवून ते परत गेले. तो मित्र नालायक निघाला. काही दिवस मला त्याने छळून मजा मारली आणि मग मला इथे आणून विकली. तू जेमतेम ४ महिन्यांची होतीस. मला आधार नव्हता. मी अशिक्षित. अग मला आपल्या गावाच नावही माहित नाही. फक्त स्टेशनवर मध्यावर एक मोठ वडाच झाड आहे. १०० वर्षे जून तरी असेलच. आणि पुढे २ स्टेशन्स सोडून जंक्शन येत. तिथेले वडे खूप फेमस आहेत अस त्यावेळी तुझे वडील मला सांगत होते; तेवढाच आठवत.

पण मला खात्री आहे की मी मारायला माझ्याच मातीत जाणार आहे. तू नेणार आहेस मला. लाली बेटा तू कुंटणखाण्यात रहायला नाही जन्मालीस बेटा. तू कोणीतरी मोठी होणार आहेस. मला खात्री आहे." डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याला वाट करून देत शीलाने आपली कहाणी त्या लहानग्या लालीला सांगितली. नऊ वर्षाची लाली त्या दिवशी एकदम मोठी झाली. तिच्या आयुष्याला एक उद्धिष्ट मिळाल होत आता. तिच्या माईला परत तिच्या गावात घेऊन जाण.

त्या संध्याकाळी लाली संस्थेत पोहोचली आणि तिथल्या मुख्य ताईना तिने सांगितले;" मला खूप शिकायचे आहे. मी काम करून शिकायला तयार आहे. पण मला शाळेत घालाल का?"

निर्मला ताई खूप चांगल्या होत्या. त्याना लालीच्या चमकणाऱ्या डोळ्यात वेगळीच स्वप्न दिसली. दुसऱ्या दिवशी जेव्हा शीला लालीला घ्यायला आली त्येव्हा निर्मला ताईंनी शीलाला थांबवून घेतल.

"शीला तुझी मुलगी खूप हुशार आहे. ती शाळेत जायचं म्हणते आहे. मी मदत करायला तयार आहे. पण हे तास सोप नाही आहे. एकतर तिला इथून बाहेर काढण अशक्य आहे कारण आम्ही ज्यांच्या जागेत ही संस्था चालवतो त्यांचेच हे कुंटण खाने आहेत. हे मला माहित आहे. फिल्मी दुनियेतल बड नाव आहे ते. आणि त्याना पैसा कुठून पुरवला जातो ते देखील मला माहित आहे. पण त्यातल्या त्यात या मुलाना रात्रीचा थोडा आधार मिळावा असा विचार करून मी ही संस्था सुरु केली आहे. मी लालीची जवाबदारी घेईन. पण तिला इथून बाहेर काढायची जवाबदारी तुझी आहे. बस आज इतकच. जा तू आता. आपण खूप वेळ बोलत राहिलो तरी संशय येईल. हळू हळू करून आपण ठरवूया. तशी लाली अजून फक्त ९ वर्षांची आहे. आपल्या हातात वेळ आहे. अच्छा."
शीलाने सर्व एकून घेतले. ती काहीच बोलली नाही किंवा तिच्या चेहेऱ्यावरची रेषही हलली नाही. तिने लालीचा हात धरला आणि निघाली. रस्त्यात देखिल ती लालीशी इथल्या तिथल्या गप्पा मारत होती. जाताना तिने नेहेमीप्रमाणे पाव घेतेले. मात्र दुपारी लाली आणि ती एकट्याच आहेत हे पाहून तिने लालीला काल रात्री काय झाले ते विचारले आणि लालीने सगळे निट सांगितले. शीला विचारात पडली. पण तिने लालीला काहीच म्हंटले नाही. संध्याकाळी लालीला सोडायला शीला निघाली. लालीने शीलाला विचारले;"मी ताईना काय सांगू?" शीलाने तिच्याकडे शांतपणे बघितले आणि म्हणाली;"काही नको. त्या समाजातील."

कथा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

11 Oct 2015 - 5:37 pm | ज्योति अळवणी

कथा एकुण ४ भागात विभागलेली आहे.