जाहीराती पाहुन

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in जनातलं, मनातलं
6 Oct 2015 - 9:37 am

जाहीराती मग त्या दुरदर्शच्या विवीध चॅनलवरच्या असोत की छापील विभागातल्या, मला सहसा भुरळ पडत नाही. काही वेळा ह्या जाहीराती त्या मुळ उत्पादकाचा उद्देश काय असावा किंवा ग्राहकांनी काय घ्यावा याबाबत अनेक पर्याय सुचवुन जातात.

१) समजा तुमच्या कडे पिढीजात संपत्ती आहे किंवा आत्ताच मिळाली आहे अश्या वेळी माणसाची झोप उडते याचे कारण बँकेत ठेवलेल्या संपत्ती शिवाय घरात दागिने/रोख रकमा किंवा किमती मौल्यवान वस्तु माणुस ठेवतोच. अश्या वेळी चोरी होईल की काय किंवा दरोडा पडेल की काय अश्या कारणांमुळे झोप उडत असेल तर एक पर्याय आहे.

दोन -चार जोड्या अमुल माचो च्या खरेदी करा आणि आरामात झोपा. चोर आलाच तर त्याचाच फोन हिसकाऊन त्याच्याच आईला फोन करण्याची हिंमत तुमच्यात नक्की येईल. अगदी आरामात.

२) समजा तुम्हाला डान्सर व्हायचय. उपाय सोपा आहे. दोन -चार जोड्या अमुल माचो च्या खरेदी करा मग पहा तुम्हाला कसा उत्तम डान्स करता येतो. मग डान्स इंडिया डान्स असो की नच बलिये तुम्हीच जाणार अंतिम फेरीत.

टीप. इथे महिलांना असेच प्रश्न असतील तर त्यांनी काय परिधान करावे असे विचारु नये कारण उत्पादकांनी हे प्रश्न फक्त आणि फक्त पुरुषांनाच पडतात असे गृहीत धरले असावे.

३) समजा आपल्याला मुलांची लग्ने कुंडली पाहुनच जुळवायची आहेत अश्या वेळी जर कुंडली जुळत नसेल तर आधी मोहिनी चहाचा कप असली कामे करणारे मंडळींच्या पुढे करावा.

४) देश बदल रहा है कारण चहा उकळत आहे हे टाटा चहाचे अनुमान सोशल रिसर्च करणार्‍या सर्व संस्था बंद करुन वेगवेगळ्या ब्रँडच्या चहाच्या उकळण्याने आणखी काही निष्कर्श निघतात की काय हे पहाण्यास हरकत नाही.

वाचकांच्या मनात असे अजुनही काही विचार जाहिराती पाहुन येतात का ?

मौजमजामाध्यमवेध

प्रतिक्रिया

असे लेख रोज पाडावेत असा विचार येतो प्रत्येक जाहिरात पाहून.
धन्यवाद.

५ स्टार ची ती बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांचा पोपट होतो आणि कॅडबरी ची सात समंदर पार मी तेरे पीछे पीछे वाली जाहिराती मस्त आहेत . अर्थात इल्लोजीकलच आहेत . perk ची आलीया भट ची जाहिरात चीड आणणारी आहे .

भैड्या's picture

8 Oct 2015 - 9:13 pm | भैड्या

भकवास ,

प्यारे१'s picture

8 Oct 2015 - 9:59 pm | प्यारे१

साडेसाती कधी संपणार?

सतिश गावडे's picture

8 Oct 2015 - 10:12 pm | सतिश गावडे

चाकोरीबद्ध लिखाणात न अडकता माणसाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत बाबींना स्पर्श करणारे लेखन मिपावर होत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

मी टिव्ही पाहत नाही त्यामुळे टिव्हीवरील जाहिरातींबद्दल काही लिहू शकणार नाही. मी ज्या प्रकारची पुस्तके वाचतो त्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये जाहीराती नसतात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

कविता१९७८'s picture

9 Oct 2015 - 5:29 am | कविता१९७८

आयडीया ईंटरनेटच्या अॅड ही तसल्याच,त्यात अभिषेक बच्चन आणि आय आय एन तर एकदमच फालतु.

बासुंदी's picture

10 Oct 2015 - 3:58 pm | बासुंदी

सध्याची airtel ४जी ची जाहीरात अशीच अती कोटीतील आहे

मांत्रिक's picture

10 Oct 2015 - 4:00 pm | मांत्रिक

:)
मजेशीर आहे!!! लाईट एकदम!!!

वेगवेगळे डीओ, परफ्युम च्या सुंदर सुंदर जाहिराती विसरू नका.

हम्म. वाईल्ड स्टोनच्या ना?

तुषार काळभोर's picture

15 Oct 2015 - 5:13 pm | तुषार काळभोर

१) आधी एक होती- बंगाली
२) आता असते-पतंगाची कापाकापी

एका शितपेय नामक द्रवपदार्थाची "ओ माय बबली" आठवली, नंतर या जाहिरातीमधला लोकप्रिय भाग कापुन टाकला राव नतद्रष्टांनी

याचा अर्थ त्या बनवणा-याचा हेतू साध्य झाला. लोकांच्या लक्षातवराहावं म्हणून जाहिरातींमध्ये बरीच कल्पकता वापरलेली असते. गरज निर्माण करा अाणि मग ती पूर्ण जरा - Create a desire and then fulfill it - हा जाहिरातींचा मूलमंत्र आहे. वर्तमानपत्र आपल्याला कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकतं किंवा इंटरनेट वापरावर होणारा आपला खर्च कमी आहे किंवा आपल्या आवडीचं एखादं अॅप आपल्याला मोफत वापरता येतं - या गोष्टी जाहिरातींमुळेच होतात.

तर्राट जोकर's picture

11 Oct 2015 - 3:57 pm | तर्राट जोकर

जहिरातींबद्दल लोक खळखळ का कर्तात काय कळत नाय....? स्वस्तात मनोरंजन हवे तर असले भोग भोगायचे गपगुमान. अन्य्था. चांगले नेट्स्पीड कनेक्शन घेउन तेच करेक्रम युटुपवर बंगायचे म्स्त बिना अअ‍ॅड के.....

अविनाश पांढरकर's picture

13 Oct 2015 - 4:02 am | अविनाश पांढरकर

कॅडबरी ची सात समंदर पार मी तेरे पीछे पीछे वाली जाहिरात मस्त आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 7:36 am | कैलासवासी सोन्याबापु

जुन्या जाहिराती अनवट वाटतात आजकाल

विशेषतः

१ बजाज ची 'ये जमीं ये आसमां नया है कल' वाली बजाज चेतक स्कूटर ची एड
२ हीरोहोंडा ची 'अरे यही तो है देश की धड़कन'
३अमूल ची मंथन मधल्या क्लिप्स असणारी 'मेरो गाम काथा पारे'
४ धारा रिफाइंड तेलाची 'घर छोड़ के जाना तो है मगर २०-२५ साल बाद' एड

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 8:37 am | तर्राट जोकर

कुछ स्वाद है जिंदगीमें.....

वाशिंग पावडर निरमा... दूधसी सफेदी निरमासे आये.. रंगीन कपडा भी खिल खिल जाये...

आपकी पारखी नजर और निर्मा सुपर... दोनो को

आय अ‍ॅम अ कॉम्प्लॅन बॉय...

भूल न जाना ईसीई बल्ब लाना...

बारातीयों का स्वागत पान परागसे होना चाहिये...

ला..... ला ला ला ला............... ला ला ला ला ला ला ला ला....... ला ला ला

आय लव यु रसना....

बादशाह मसाला...

अतिरेका मुळे जाहिरातिंचा विट येतो पण काहि चांगल्या हि असतात. कोलगेट च्या जाहिराति अशच शतकानुशतके चालणार्या आहेत.