कुशीवर वळू नका, रात्र भुताची आहे!!!!!!!!!!!!!! (स्वैर अनुवाद)

अजिंक्य विश्वास's picture
अजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 11:16 pm

हे मी खूप आधी अनुवाद केलेले आहेत. ते फेसबुकवर पोस्ट केले होते. आता इथे शेअर करत आहे.
घाबरा किंवा हसा. .. पण एन्जॉय जरूर करा !!!

कुशीवर वळू नका, रात्र भुताची आहे!!!!!!!!!!!!!!

१. मी काचेवरच्या टकटकीमुळे जागा झालो. पहिल्यांदा मला वाटले, खिडकीचा आवाज येत आहे, पण मग कळले की आवाज माझ्या आरश्याच्या आतून येत आहे!

२. शेवटचे मला आठवते, तेव्हा माझे घड्याळ रात्रीची १२:०७ वेळ दाखवत होते, त्या आधी तिची सडत चाललेली, नख्या वाढलेली बोटं माझी छाती कुरवाळत होती आणि दुसरा हात मला येणारी किंचाळी दाबून धरत होता. मी झटक्यात ताठ उठून बसलो, आणि माझ्या लक्षात आले की, हे फक्त एक स्वप्न होते. पण माझे माझ्या घड्याळाकडे लक्ष गेले, तेव्हा त्यात १२:०६ वाजत होते आणि माझ्या फडताळाचे दार हळूच करकरत उघडत होते.

३. कुत्र्या-माजंराच्याच सहवासात मोठा झालेलो असल्यामुळे, दारावर नख्या घासल्याचे मला नवीन नाही, पण सध्या पूर्ण घरात मी एकटाच राहत असल्यामुळे दचकणे मात्र चुकत नाही.
४. जितका वेळ मी ह्या घरात एकटा राहिलो आहे, देवाची शपथ घेऊन सांगतो- मी इतक्या वेळा घराची दारे लावली आहेत, जितकी मी उघडलेली पण नाहीत.

५. एका मुलीने आपल्या आईने खालून मारलेली हाक ऐकली आणि ती खोलीतून बाहेर निघून खाली यायला निघाली. ती जिन्यावरून खाली उतरणार तोच तिच्या आईने तिच्या हाताला धरून आपल्या रून मध्ये खेचले आणि म्हणाली, ’ मी पण ती हाक ऐकली आहे!’

६. माझ्या बायकोने मला काल रात्री उठवले आणि सांगितले, घरात कोणीतरी घुसले आहे. दोन वर्षापूर्वी ती अश्याच घरफोडीत मारली गेली होती.

७. ’मला झोप येत नाहीये’, ती बेडवर येत माझ्या कानात पुटपुटली. मी दचकून उठलो, माझ्या गार पडलेल्या हातात ती ज्या ड्रेसमध्ये पुरली होती, तो ड्रेस मातीसकट होता.

८. मला झोप येत नाही, पण मी दचकून सारखा सारखा जागा होत आहे.

९. मी त्याला बेडवर झोपवत होतो, तेव्हा तो मला म्हणाला, ’पप्पा, माझ्या बेडखाली बागुलबुवा आहे.’ त्याच्या भितीवर आश्चर्य वाटले, म्हणून मी सहज खाली वाकून पाहिले तर मला दुसराच तो खाली दिसला. तो भितीने थरथर कापत म्हणाला, ’पप्पा, पाहा ना. माझ्या बेडवर दुसरेच कोणीतरी आहे!’

१०. माझ्या मुलीचे मध्यरात्रीचे रडणे आणि किंचाळणे काही थांबत नाही. मी तिच्या कबरीपाशी जाऊन विनंती देखील केली. काही फायदा नाही.

११. माझ्या मोबाईलमध्ये मी शांत झोपलेल्या अवस्थेतील फोटो आहे. मी घरी एकटाच राहतो.

१२. माझ्या मांजरीला जणू काही माझ्याकडे टक लावून बघायची सवय आहे, असे मला वाटायचे. पण नंतर कळाले की, ती माझ्या मागे कोणाकडे तरी सारखी भेदरून पाहात असते.

१३. माझी बहीण मला सारखे सांगते, की तिला माझ्या आईने मारले. मग आई कशाला उगाचच सांगत असते, की मला बहीणच नाहीये, म्हणून?

१४. मी रोज सकाळी उठतो, आणि खिडकीबाहेर एकटक बघत राहतो. नेहमी मला काहीतरी चुकल्यासारखे वाटते. जाता-येता लोक सारखे माझ्या घरासमोर थबकून घाबरत कुजबुजत असतात. आता तरी त्यांनी हे थांबवायला हवे. मला जाऊनच ५ वर्षे झाली आहेत.

१५. आरशासमोर हसतमुख चेहर्‍याने उभे राहिल्याने दिवस चांगला जातो, असे म्हणतात. एक दिवशी तरी माझ्या प्रतिबिंबाला हसायला सांगितले पाहीजे.

१६. माझा रूममेट दार उघडून त्याला आत घेण्यासाठी माझे नाव घेऊन सारखे दार ठोठावत आहे. मी सरळ सरळ दुर्लक्ष करतो. काय कारु? तो माझ्या शेजारच्याच पलंगावर छान पैकी झोपला आहे.

स्वैर अनुवादक- अर्थात मीच
मूळ कल्पना- आंतरजालावरून साभार

मौजमजाआस्वादभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

6 Oct 2015 - 12:49 am | उगा काहितरीच

हेहेहेहे ! भारीऐ !!

मी हे आज पहिल्यांदाच वाचतोय.
.
.
.
.
आधी कधीतरी पंधरा वेळा वाचून देखील.
(हे झालंय रे मिपावर. खरंच!)

अजिंक्य विश्वास's picture

6 Oct 2015 - 7:34 am | अजिंक्य विश्वास

कारण एक वर्षापूर्वी मी हा लेख फक्त फेसबुकवर पोस्ट केला होता. कोणी काँपी पेस्ट केला असेलच तर मला कल्पना नाही.

अभय म्हात्रे's picture

6 Oct 2015 - 8:53 am | अभय म्हात्रे

खुप छान लेख आहे.

दिवाकर कुलकर्णी's picture

7 Oct 2015 - 10:47 pm | दिवाकर कुलकर्णी

कोण आहे तिकड
त्याला विचारा माझी साँवली पाहिली काय

ज्योति अळवणी's picture

8 Oct 2015 - 1:07 am | ज्योति अळवणी

आवडल

श्रीरंग_जोशी's picture

8 Oct 2015 - 2:00 am | श्रीरंग_जोशी

लेखनप्रयोग रोचक आहे.
पुलेशु.

नितिन५८८'s picture

8 Oct 2015 - 9:32 am | नितिन५८८

मस्तच

पियुशा's picture

8 Oct 2015 - 11:16 am | पियुशा

बब्बो , दिवसा वाचतिये तरी भीती वाटतीये .

प्रसाद गोडबोले's picture

8 Oct 2015 - 1:11 pm | प्रसाद गोडबोले

कुशीवर वळू नका, रात्र भुताची आहे!

कुशीवर वळलात तर भुत काही करणार आहे काय ;) ?

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 1:55 pm | टवाळ कार्टा

खाली ढकलायला सोपे जाईल =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Oct 2015 - 2:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

कॉटच्या कडेला झोपला असाल तर कुशीवर वळल्यावर स्वतःच खाली पडाल. नंतर स्वतःवरचा दोष भुतावर ढकलायला एक मस्त कहाणी लिहून काढा आणि मिपावर प्रसिद्ध करा ! :) ;)